जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आदरणीय सर,इनामवर्ग ६ ब ची जमीन मूळ वतनदारांना बिगरशेती कामी विकसित करून इमारत बांधून flat विक्री करावयाचे आहेत त्यासाठी सदर जमीन जुन्या शर्तीवर करणे आवश्यक आहे का?फक्तं NAकेली तर चालेल का?मार्गदर्शन होणेस विनंती........
वडिलोपार्जित जमीन खरेदी घेताना ७/१२ सदरी नाव असलेल्या व्यक्तींच्या वारसांची संमती घेणे आवश्यक आहे का?
७ /१२ वर जेवढ्या व्यक्तींची नवे असतात , त्या सराव व्यक्ती मालक आहेत
त्या सर्वांकडून जमीन विकत घ्यावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर्
आम्हाला १९७६ साली सिलिंग कायद्या नुसार ज़मीन मिळाली आहे पैन तो पूर्ण डोंगर भाग आहे त्याला डेवेलोप करण्या साठी खुप खर्च लागत आहे शासकीय कर्ज खुप कमी आहे त्यात हे होने श्यकय नहीं प्राइवेट बँक गहन ख़त मागतत पण ते होत नहीं आसे सांगण्यात आले आहे हे खरे आहे का जर होत असेल तर ते कोणत्या कायद्य नुसार व कोणाचा परवानगी ने होते ते सांगा.
मज़ा दूसर प्रश्न असा की जर् कोणी कंपनी नई जागा विकसन साठी घेत असेल करारा वर त्यातून आम्हाला रोजगार आणि मिळणाऱ्या उत्पनातून कही हिस्सा देणार असेल तर त्यांच्या नावे कोणता करार करता येईल अणि तय साठी कोणाची परवानगी लागेल ते कृपया सांगावे
आपला
अनिल जाधव
या बाबत आपणास भ्रमण ध्वनी द्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखाद्या कर्मचार्याला निलंबित करण्याअगोदर कोणती कार्य पद्धती अवलंबवावी ?
total sanctioned/filled/empty Tahsildar posts divisionwise. Also pls provide Tahsildar's divisionwise Gradation/seniority lists.(not statewide combined seniority list)
नोदणीकृत खरेदीखत न करता नोटरी करून फ्लॅट खरेदी केल्यास त्याला कायदेशिर आधार राहतो का?नोटरीची मुद्दत किती वर्ष आहे?
पाटबंधारे विभागाने वैक्तिक उपसा सिंचानखाली क्षेत्र येते असा दाखला दिला आहे सदर खातेदाराचे क्षेत्र कमाल जमीन धारण कायद्यापेक्षा जास्त आहे प्रांत ऑफिस कडे वाटप परवानगी घेण्यास गेले असता तुम्हाला पुनर्वसन साठी क्षेत्र काढून द्यावे लागेल असे सागितले जाते परंतु महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात सादर गावाचा कोणताही उल्लेख नाही तर परवानगी घेण्यासाठी पुनर्वसन साठी क्षेत्र काढून द्यावे लागेल का याबाबत मार्गदर्शन करावे
१. यामध्ये प्रांत ऑफिस यांना परवानगी देण्याचे अधिकार नाही. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे कडे अर्ज सादर करावा.
२. महाराष्ट्र प्रकल्प बाधित पुनर्वसन व्यक्तीचे अधिनियम १९९९ खालील कमाल ११ व १३ ची अधिसूचना तपासून पहा .
३. कमाल जमीन धारण कायद्यानुसार कमाल धरण शेत्र व महाराष्ट्र प्रकल्प बाधित पुनर्वसन व्यक्तीचे अधिनियम १९९९ खालील साल्याब खाली ठरविण्यात आलेले शेत्र व त्या नुसार वाटपास परवानगी ह्या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहे .

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

नमस्कार सर आपण माझा पहिल्या प्रश्नाचे उतार दिल्या बदल धन्यवाद तर ठूमी विचारले कि त्या वर कोणतही अपील झालेले नाही व प्रलंबित सुधा नाही मी सर्व कागद पत्रे तलाठी ओफ्फिचे माडे दिली आहेत १) दत्तक पत्र २) कोर्टाचा हुकूमनामा ३) जुना फेरफार पुन तलाठी नोनद धरत नाही ते सागंतात ठूमी प्रांत अधिकारीकडे विनंती अर्ज करा कि जुना फेरफार दुरुस्थ करून हुकूमनामा प्रमाणे नवीन फेरफार ची नोंद धारा असा आदेश आल्यवर आम्ही तुमची नोंद धरून ७/१२ वर तुमचे नवा येईल मी नाकी काय करू क्रुपय योग्य मार्ग सांगा .
सर माझ्या मावशीची गावी ४९ गुंठे नियात्रिक सत्ता प्रकारातील आहे सात बारा तिच्याच नावे आहे, तर ती विधवा आहे कोनही मुले नाही तर तिला या जम्नीतील २५ गुंठे जमीन विकायची आहे तर ती विकू शकते काय जर नसेल तर त्या साठी कोणाची परवानगी घ्यावी .
नियंत्रित सत्ता प्रकार म्हणजे , मओशीकडे कुल कायद्यची जमीन मिळालेली आहे
जर कुल कायद्या खालील्म खरेदी किंमत निच्चीत होऊन १० वर्षे झाले असतील तर , पर्व्नागीची गरज नाही
मात्र १० वर्षे झाले नसतील तर , प्रांत अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,गटवारी योजनेपुर्वी ७/१२ च्या कब्जेदार सदरी खरेदीखताद्वारे नाव दाखल झाले होते परंतु गटवारीनंतर कोणताही फेरफार न होता नावास कंस लागला परंतु ताबा आहे. त्याचा गैरफायदा घेऊन मूळ मालकाने सदर जमीन अन्य व्यक्तीस विक्री केली.गटवारीतील चुकीबाबत मा.जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांचेकडे अपिल दाखल केले असता त्यांनी जास्त कालावधीचे कारण देऊन अपिल फेटाळले.व खरेदीखत रद्द करणेकमी दिवाणी कोर्टात अपील दाखल करण्यास सांगितले त्यानुसार अपील दाखल केले आहे..तरी याबाबत आणखी मार्गदर्शन होणेसविनंती.
आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे त्याचे निर्णयाची वाट पहा
मात्र उप संचालक यांनी जरी अपील फेटाळले असले तरी जमाबंदी आयुक्त यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
मला विहिर मालकी हक्कासंबंधी मार्गदर्शन करावे.
त्याचप्रमाणे विहिरी संबंधी नियम व शासन निर्णय असल्यास पाठवावे. कळावे.
आदरणीय सर,कुळकायद्या नुसार ३२ एम द्वारे जमीन खरेदी घेतली आहे.खरेदी घेनाराचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सादरी दाखल आहे.परंतु पूर्वीपासून इतर हक्कात मूळ मालकाच्या बहिणीच्या वारसांची नावे अ.पा.क. म्हणून दाखल आहेत.सदर नावे पोकळीस्त म्हणून कमी करता येतील का? त्यासाठी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
३२ ग किंमत निच्छित होताना ती नवे कमी करणे आवश्यक होती
आताही ती नवेकमी करता येतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मी अनेक प्रश्न विचारले पण उत्तर मिळाले नाही मला विचारणा करायची आहे की खरेदीखतामध्ये क्षेत्र किती घेतले याचा व गटामध्ये कोणती जमिन याचा चतुरसिमा नसला तर फेरफार ला नोंद कशी घेतली व सातबारा वर क्षेत्र नोंद कसे झाले याबाबत प्रश्न उपस्थित झाला तर काय खरेदीखत रद्द होईल का व झाले तर कोण करील व कोणत्या नियमाखाली हे सविस्तर सांगावे हि विनंती
मी सरकारी कर्मचारी असून मला शासकीय घर अग्रिम घ्यायचे आहे त्यासाठी मला कार्यालय कडून घर घेणे बाबत पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे का? व तसेच नवीन घर बाधानी अग्रिम बाबत शासन निर्णय पारित झालेला आहे परंतु त्या मध्ये पूर्व परवानगी अथवा कार्योतर परवानगी बाबत कोणता हि खुलासा नाही अथवा माहिती नाही तरी याबाबत उचित मार्गदर्शन करावे
सर नमस्कार नारायण नावाच्या इसमाला 222 गटामध्ये १० एकर जमीन होती त्या पैकी त्याने 3 एकर जमीन नागनाथला विकली त्यानंतर त्याने पुन्हा ३ एकर जमीन प्रकासला विकली त्यानंतर त्याने पुन्हा दोन एकर जमीन दिपक ला विकली शेवटी नारायण ची दोन एकर जमीन त्या गटामध्ये राहीली व उरलेली दोन एकर जमीन मी 1990 ला खरेदी केली पण खरेदीखतामध्ये चतुरसिमा नाही जमीनीचे क्षेत्र नाही जमीनीचा फेरफार व सातबारा नोंद दोन एकरची माझ्या नावे आहे आता नारायण मयत आहे नारायण च्या वारसाने खरेदीखताचा आधार घेत खरेदीखतामध्ये क्षेत्र नाही म्हणून प्रांत कडे सदर फेर विरोधात अपिल दाखल केले आहे मुळ खरेदीखताची नक्कल तपासणी केली असता त्यावर क्षेत्र व चतुरसिमा नाही आता नारायण च्या वारसाला गावामध्ये व त्या गटामध्ये काहिच जमीन नाही मला काय करावे लागेल सविस्तर सांगावे ही विनंती
चातुर्सिमा नमूद नाहीत म्हणून , नारायांचे वारसांचे नवे जमीन होणार नाही .
त्याचे प्रांत अधिकारी यांचे कडे अपील फेटाळले जाईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,
माझ्या मालकीच्या असणार्‍या जमिनीतून १९८५ साली पुढील गावासाठी जाण्यासाठी तात्त्पुरत्या स्वरुपात रस्ता गेला. त्यानंतर तो डांबरी झाला.परंतू हा रस्ता जुन्या सर्व्हे नंबरच्या नकाशात व नवीन गट नंबरच्या नकाशातही नाही. कोणत्याही प्रकारचे भुसंपादनही झालेले नाही किंवा ७/१२ च्या इतर हक्कातही तशी नोंद नाही. तर या रस्त्याच्या जमिनीवर कायदेशीर मालक म्हणून माझा हक्क आहे का? आणि रस्त्यासाठी गेलेली जमीन परत मिळविण्यासाठी कोणता कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल? मार्गदर्शन व्हावे.
माझ्या मालकीच्या जमिनीतून नवीन कालवा (सन २०१० साली) गेला आहे. प्रत्यक्षात तो २०१४ ला पूर्ण झाला व २०१५ साली पाणी आले.परंतू कलम ४(१) नोटीस भुसंपादन विभागाकडून व्यपगत झालेली आहे. तर या भुसंपादनाला नवीन भुसंपादन कायदा लागू होऊ शकतो का? तसेच याच जमीनीतीतून आधीच्या प्रश्नात सांगितल्याप्रमाणे रस्ताही गेलेला आहे. तर कायद्यानुसार वेगळ्या दोन प्रकल्पांसाठी एकाच शेतकर्‍याची जमीन भुसंपादित करता येते का? येत असेल तर तो माझ्यावर अन्याय नाही का? कृपया मार्गदर्शन व्हावे.
सप्रेम नमस्कार माझ्या आजींच्या नावे आमचे राहते घर व शेतजमीन होती.आजींच्या निधनानंतर घर व शेताला दोन वारसदार होते. माझे वडील व काका. आता वडील ह्यात नाहीत. त्यामुळे माझी आई(वारस:मी) व काकाच्या नावावर सध्या ही मालमत्ता आहे. आमची 17 गुंठे शेती आहे. आईचे म्हणणे आहे की,मी ह्यात असेपर्यंत शेती व घराची वाटणी करून टाकावी. काकुंचा स्वभाव खूपच वाईट आहे.माझ्या हिष्यावर त्यांचा डोळा आहे."कांकाना कुठेही सह्या करायला पाठविणार नाही,असे काकू बोलल्या आहेत".काका व्यवहराबद्दल माझ्याशी बोलत नाही व काकू मारायला करते. मला नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागले,आता गावी काका व काकू राहतात. 1)घराचा आमचा हिस्सा आमच्या(आई व वारस:मी) ताब्यात आहे.घर कॅमेटीची पावती आता काकांच्या नावे येत आहे.आमच्या नावानेघर कॅमेटीची पावती मिळणेसाठी व ८अ उतारामिळणेसाठी काय करावे लागेल.
2) आमच्या प्रकरणमध्ये तडजोड करणे शक्य नाही. सदर शेतजमीन 17 गुठे टुकड़ा आहे. त्यामुळे खातेफोड करता येनार नाही.मला त्यांच्याशी व्यवहार करायचा झाल्यास योग्य तो मोबादला मिळणार नाही. तसेच ते पण मला शेत् घेऊ देणार नाही. सदर शेत् जमीन टुकड़ा असल्याने कायद्याने वाटनी करण्यास प्रतिबंध आहे. परंतु वारसास वारस हक्क मिलने हा कयदेशिर प्रश्‍न असल्याने मी प्रयत्न करीत आहे. मला त्यांचा स्वभाव चांगला असता तर तडजोड करायला हरकत नव्हती. या प्रकरणात मला कुणाची मदत घ्यावी लागेल. आता मला हे प्रकरण कसे हाताळावे ,त्याबद्दल योग्य मार्गदर्शन हवे आहे.
आपण न्यायालयात , शेती व घर याचे वाटप करून मिळणे बाबत दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नोंदणीकृत वाटप म्‍हणजे काय?
केलेले वाटप , नोंदणी कायद्या खाली नोंदवणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वारस तपास बद्दल माहिती व सेवा हमी विधेयकानुसार कालावधी वारस तपासाचा देण्यात यावा....
वारस तपासाचा कालावधी १५ दिवस आहे

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

आमच्या आजोबांच्या १९६७ पूर्वीच्या जन्म नोंदी ह्या जात म्हणून ' कु ' लागलेल्या आहेत व कुठेही 'कुणबी' अशी जन्म/मृत्यू नोंद नाही परंतु संक्षिप्त असलेल्या 'कु' या नोंदीच्या आधारे २०१० पूर्वी आमच्या संबंधितानी 'कुणबी' या जातीचे दाखले काढले आहेत तरी 'कु' या नोंदीद्वारे 'कुणबी' जात स्पष्ट होत असेल तर त्या विषयी शासन निर्णय ,परिपत्रक, न्यायालयीन निर्णय इ. माहिती मिळावी
सर नमस्कार मी 25 वर्षाच्या पुर्वी दोन एकर जमीन खरेदी केली होती फेरफार करून सातबारा ला माझे नावे दोन एकर क्षेञ आहे पण खरेदी खतामध्ये क्षेत्राचा उल्लेख नाही जमीन देणारा मयत आहे पण त्याचे वारस म्हणतात आम्ही तुम्हाला जमीन विकली नाही घान ठेवली आहे तसे अपिल त्यांनी तहसिलदार यांचेकडे केले आहे काय करावे सविस्तर माहिती द्यावी हि विनंती
खरेदी खतामध्ये क्षेत्राचा उल्लेख नसणे अपेषित नाही. खरेदी खताची मुल प्रत तपासून पहा.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

मला हे विचारयाचे आहे कि माझे वडील शासकीय कर्मचारी होते ते सेवानिवृत्त झले आहे व त्याचा मृत्यू देखील झला आहे तर मला त्यांचा सिर्वीस
पुस्तकाची कोपी कार्यालय कडे मागू शकतो का ?
साहेब, सध्याच्या सेवा विधेय़क कायद्यानुसार वा राईट टू सर्व्हैस द्वारे वडिलांचे नाव सात-बारा उता-यावरती असल्यास मुलांची वा पत्नीचीं नावे अर्ज केल्यानंतर कीती दिवसात लावली जातात. व या वारस तपासची प्रकीया देण्यात यावी.धन्यवाद.
मयत वडिलांचे सात-बारावरती नाव असल्यास त्याच्या मुलांचे व पत्नी चे नाव लागण्यास सध्याच्या राईट टू सर्व्हीस कींवा सेवा हमी विधेयकानुसार कीती दिवस लागतात. व त्याची प्रक्रीया सांगावी

This page was generated in 0.32 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3460
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3