जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर,मला फेरफार बाबत काढ्ण्यात येणारे नोटीस किती नमुने आहेत आणी कशा काढल्या जातात या बाबत माहीती हवी आहे मला मार्गदर्शन करावे ही विंनती
आपण महाराष्ट्र जमीन महसूल ( अधिकार अभिलेख तयार करणे , सुव्यवस्थित ठेवणे ) नियम वाचा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गावची जमीन पूर्वी पासून कोणाची होती किवा मूळ मालक कोण होता आणि त्या नंतरची पिढी कोण आहे
याची कागतपत्र कुठे मिळू शकेल . आणि त्यासाठी अर्ज कोणाकडे करायचा .
तलाठी याचेकडे जुने ७/१२ , फेरफार असल्यास , तलाठी कडे १९५० पासून चे , ७/१२, फेरफारमागा

तलाठी याचकडे हे अभेल्ख नसल्यास , तहसील कार्यालयात अर्ज करा .

या अभिलेखावरून आपणास अपेक्षित माहिती मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vipulnaik
17-07-2015
mailvipulnaik@gmail.com

माननीय साहेब
मागे मी प्रश्न विचारलेल्या प्रश्नांची उत्तार दिल्याबद्दल धन्यवाद मला आज असा विचारायचं आहे कि मी आता तहसील दर ऑफिसस मध्ये वरसाची आफ्फ्फिदेवीत केली आहे व तलाठी मोहदायानी आपली रजिस्टर मध्ये नोंद केली आहे मग आमचे नाव वारस म्हणून लागायला किती कालावधी लागेल
विभागीय चौकशीमध्‍ये सादर कर्ता अधिकारी म्‍हण्‍ाून वर्ग ३ चा महसूली कर्मचारी अव्‍वल कारकून किंवा मंडल अधिकारी यांची नियुक्‍ती कोणत्‍या शासन निर्णयान्‍वये करता येते याबाबत माहिती मिळावी हि विनती आहं.

Question by Sunil Murkar
17-07-2015
sunilmurkar@gmail.com

१. जर ग्रामविकास अधिकारी वडिलोपार्जित घरा संबधित अर्जा प्रमाणे माहिती/कागत पत्रे देत नसेल तर कोणाकडे दाद मागावी?
२. वडिलोपार्जित घरा संबधित महत्वाची कागत पत्रे/उतारे कोणती/कोणते ?

धन्यवाद
१. आपण माहिती अधिकारात माहिती मागा

२. गट विकास अधिकार यांना भेता. आपली व्यथा मांडा.

३. तालुका लोकशाही दिनी अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by samadhan
16-07-2015
iamsamg19@gmail.com

नमस्कार सर,
जुने (४० ते ५० वर्षे ) दत्तक विषयीचे दस्त रेकॉर्ड शोधायचे असतील तर शासनाच्या कोणत्या विभाग अथवा कार्यालयाकडे मिळतील.
दत्तक घेतलेल्या कुटुंबाच्या जमिनीचे वारस फेरफार नोंदीवरून काही माहिती मिळू शकेल का?
वेबसाईट चांगली आहे १)सर १९९५ साली १० गुंठे जमीन पाझर तलावासाठी संपादित झाली आहे नोकरीसाठी प्रकल्पग्रस्त दाखला मिळेल का? पण कार्यालय सांगते २० गुंठे जमीन जायला हवी २०१० चा GR सांगतात २)पण सोलापूर जिल्हात दाखला दिला जात नाही या साठी कुठे अपील करू ३)आता पर्यंत सोलापूर मध्ये २०१० च्या पूर्वी २० गुंठे पेक्षा कमी जमीन संपादित झालेल्यांना नोकरी साठी दाखला दिला जात नाही ४)तुम्ही माहिती दिल्या प्रमाणे आम्हला २०१० चा GR लागू नाही दाखला मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर कुठे भेटू ? ५)२०१० चा GR इमेलवर पाठवा आपण मला आधी च्या प्रश्नात चांगली माहीती दिली आहे आपला आभारी आहे
आपण जिल्हाधिकारी यांना भेटा

शासन निर्णय शासन संकेत स्थळावर भेटेल

मी आपणास शासननिर्णय उदय पाठवण्याचा प्रयत्न करतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

इतर हक्की आलेले नावे कमी डी एं बोर्डाचा नियमाप्रमाणे .

डी एं बोर्ड म्हणजे कुठले बोर्ड आणि वरील ओळीचा काय अर्थ आहे.
विष्णुजी , आपली मिळकत कोठे आहे /

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर्व प्रथम आपले आभार आपण माझ्या प्रश्नाची उत्तर दिल्याबद्दल .

जुना रद्ध झालेले नावाचे फेरफार घेऊन आम्ही प्रांताधिकारी यांच्या कडे गेलो होतो पण ह्या फेरफारवर आत्ता वर्ष २००३ पुढील पिडीची अपडेट झालेली नावे आत्ता रद्ध करू शकत नाही असे सांगितले . जर नावे रद्ध करायचे असेल तर आम्हाला याची मेळाची फ़ाइल तलाठी कडून घेऊन या असे सांगितले .

पण जुनी मेळाची फ़ाइल मिळण्याबाबत तहसील ऑफ़िस व तलाठी ऑफ़िस यांच्याकडे माहितीचा अधिकारात आंम्ही विचारणा केल्यानंतर . आम्हाला ही मेळाची फ़ाईल मिळत नाही असे उत्तर लिहून देंण्यात आले आहे .

मग मेळाची फ़ाईलचा मिळत नाही या लिहून दिलेल्या उत्तरावर आम्ही प्रांताधिकारी यांचा नावे रद्ध करण्याचा अर्ज करू शकतो का
दिनेशजी ,
जर नसती मिळत नसेल तर , प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करून काय उपयोग ? त्यांचे कडे हि नसती भेटणार नाही .

फेराफ्र रद्द झालेला असल्यास , त्या आधारे लागलेली नवे निरर्थक ठरतात . त्या आधारे वारसांची लागलेली नवे रद्द होणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

इतर मागासवर्ग व एस बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्याना जातीचे प्रमाणपत्र देतांना,त्यांचे वडिल किंवा आजोबा हे त्या गावचे मानिव दिनांक १९६७ पूर्वीपासूनचे रहिवासी असावयास पाहिजे असा नियम आहे(जी आर) आहे.तेव्हा हाच नियम नाॅनक्रिमिलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी सुध्दा आहे काय ? असल्यास कृपया जी आर तारीख सांगावी ही विनंती.
उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे दाखल्यास हा नियम लागू नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

किरण पाणबुडेसो, नमस्कार
जर जमिनीमध्ये १९५६ पासून आज साधे कुल इतर हक्कात असेल आणि जमीन मालक जर जमीन विकत असेल, तर ती घेतली तर चालेल का? विकत घेण्यासाठी काय करावे लागेल? ज्या व्यक्तीला हे कुल लागले आहे ती व्यक्ती वारली आहे व कुल हि वारले आहेत पण आता त्यांच्या वारसांची नावे आहेत व जे जमीन मालक होते ते आता वारले आहेत त्यांच्या मुलांची नावे आत्ता वारस म्हणून लावायची आहेत व विकत घ्यायची आहे
मध्यंतरी १९७० - ७१ च्या काळात कुल पण विधवा होते व जमीन मालक पण विधवा होत्या मग आता जमीन आम्ही घ्यायची झाल्यास काय करावे लागेल? खरेदी पत्र होईल का? काय अडचण येईल का ? कुपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे कि आम्ही गावठाण प्लॉट नंबर १८ व २२ बदल जिल्हा भूमी अभिलेख येते अपील केले आहे व विलंब माफीचा अर्ज केला आहे कि १९९५ साली झालेला सिटी सर्वे मधील प्लॉट नंबर १८ ला लागलेले ग्रामपंचायतीचे नाव चुकीचे आहे आता आम्ही ग्रामपंचायतीचे नाव कमी करून आमचे नाव लावले आहे त्या नुसार सिटी सर्वे रेकॉर्डला आमचे नाव लावावे व प्लॉट नंबर २२ ला चौकशी उताऱ्याला बरोबर लावले आहे पण नकाशा बनवताना नकाशा व मोजमाप चुकीचे बनवले आहे त्याची दुरुस्ती व्हावी असे अपील व विलंब माफी चा अर्ज केला आहे तर चालेल का ? व सिटी सर्वे ला आणखी काय करावे लागेल म्हणजे सिटी सर्वेला आमची नोंद होईल कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
१. राजे ,
खरतर कुल हे मालक झाले आहेत . मुल जमीन मालक यांचा केवळ ३२ ग किंमत मिळण्याचा हक्क उरलेला आहे .

२. जर मालक यांना जमीन खरेदी करायची असेल , तर त्यांना केवळ कलम ३१ , मुंबई कुल्वहिवत व शेतजमीन अधिनियम कायद्या अंतर्गत घेत येयील . .त्या साठी मालकाने १९५६ पूर्वी कुअलल नोटीस दिलेलेइ असणे आवश्यक आहे .

३. नाही तर सध्या स्थित , कुल अथवा त्याचे वारस तयार असतील तर , कुळाने त्याचा कुल्वाहीवात हक्क , मालकास विकणे .


४. विलं माफीचा अर्ज दाखला करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ashish Mane
13-07-2015
ashumane82@gmail.com

Sir,
AlpBhudhark Babat Pripatrak / G.R. che Mahiti Milave Hi Vinati

Question by Pradip Boraste
13-07-2015
pradip_boraste@yahoo.com

मामलतदार केट्र्ट्च्या कलम २३ (२) प्रमाणे जिल्हाधिकारी / प्रांत अधिकारी स्वत:हुन फेर चोकशी करू शकता मग त्यासाठी मला अर्ज्र करावा लागेल का किंवा करता येईल का .
फेर चौकशी जर दिलेला निकाल हा ,
बेकायदेशीर , विहित कायद्याची प्रक्रिया पार न पडता दिलेला अथवा अतर्क्सनगत असेल तर करता येते .
आपणास जीन्हाधिकारी / प्रांताधिकारी यांचे निदर्शनास अश्या निकालाबाबत आणून देणे आवश्यक आहे . त्यासाठी अर्ज करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा .महोदय,

१०.०७.२०१५ रोजी मी विचारलेल्या प्रश्नावर मला मार्गदर्शन करावे
मा. म्होद्य
रत्नागिरीला माझ्या वडिलांनी जागा घेतली आहे ती एन ए केलेली आहे आमच्या जागेच्या पुढे दुसर्याची जागा आहे त्या जागेची कोर्टात केस चालू आहे व कोर्टाने त्या जागेवर स्टे आणला आहे आम्हाला आमच्या जागेत जाण्यासाठी व घर बांधताना रस्ता हवा आहे तो त्यासाठी कुठे अपील करावी ?
बिनशेती परवानगी देताना , जागेत जाण्यासाठी रस्ता असल्याशिवाय परवानगीदिली जात नाही
बिनशेतीनकाशात , रस्ता दाखवला असेल , तर आपण रस्त्याचा वापर करू शकता .
बिनशेत परवानगीघेताना , शेजार्याकडून आपण रस्ता वापर करून दिला जेल , याबाबत लिहून घेतले आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कोतवालांची ज्येष्ठता यादी तयार करतांना प्रामुख्याने कोणत्या निकषांचा विचार करावा ?
सर,
मी राहणारा देवगड, गदितह्मने माझे गाव. आमची सार्वजनिक ११ गुंत्ते जमीन आहे, त्यामधे ३ हिस्से होतात, २ हिस्सेदार जमीन वाटणी साठी तयार आहेत १ हिस्सेदार वाटणी साठी तयार नाही अश्या वेळी जमीन वाटप कसे करावे?
दिवाणी न्यायालयात , हिस्स्यापारमाणे जमिनीचे वाटप व ताबा देणे बाबत दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर १९९५ साली पाझर तलावात मध्ये १० गुंठे जमीन संपादित झालेली आहे तर प्रकल्प ग्रस्त दाखला मिळेल काय ? प्रश्न १) २०१० च्या GR नुसार शासनाच्या नियमानुसार कमीकमी २० गुंठे जायला हवी २)पण अधिक माहिती घेतली असता उस्मानाबाद मध्ये २०१० च्या पूर्वी संपादित झालेल्यांना दाखला देण्यात येतो ३)मग सोलापूर मध्ये दाखला देण्यात येत नाही ४) विभागानुसार GR वेगळा आहे काय
आपले भू संपादनास , २०१० चा शासन निर्णय लागू होणार नाही
आपणास प्रकल्प ग्रस्त देणे , आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

1. मी ग्रामपंचायत निवडणुक लढविणार आहे. पण माझ्याकडे वैयक्तिक शौचालय नाही तरी मला निवडणूक लढविता येईल का
2. निवडणूकीचा अर्ज दाखल करताना संडास असलेबाबतचा दाखला सादर करणे आवश्यक आहे का
3. दाखला नसल्यास पर्याय काय आहे
4. संडास निवडणूक निकालानंतर बांधले तर चालु शकते का
मी एक आदिवासी नागरिक असून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका गावात राहत आहे. मी माझ्या स्वकामैतून एका बिगर आदिवासी व्यक्तीकडून 2 एकर ७ गुंठे शेतजमीन १९९९ ला विकत घेतली . हि जमीन मी निव्वळ एक गुंतवणूक म्हणून घेतली होती. आज या जमिनीची किमत ५० पट झालेली आहे . परंतु या कारणामुळे गावातील काही असंतुष्ट लोकांच्या सांगण्यावरून संबंधित तलाठी माझ्या ७-१२ वर "आदिवासीची जमीन " असा शेरा मारून घेण्यासाठी तगादा लावत आहे . जर असा शेरा मारला गेला तर कदाचित मी माझी जमीन बिगर आदिवासी व्यक्तीला विकू शकणार नाही व मला अपेक्षित फायदा मिळणार नाही,
कृपया मला मार्गदर्शन करावे कि तलाठी " आदिवासीची जमीन" असा शेरा माज्या ७-१२ वर मारू शकतो का ? जी जमीन मी माझ्या स्वक्मैतून विकत घेतली आहे त्याला महसुल खाते अशी बंधने टाकू शकते का ? मला हि शेत जमीन बिगर आदिवासी व्यक्तीला विकावयाची असल्यास काही अडचणी येवू शकतात का ?
मिळकत कशी मिळाली / घेतली , याला ३६ अ प्रमाणे महत्व नाही
जमीन अदिवशी यांची असल्यास , शेर ठेवणे क्रमप्राप्त
तलाठी शेरठेऊ शकतो . शेरा ठेवला पाहिजे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by J T SAWANT
11-07-2015
jtsawant58@gmail.com

मा .महोदय,
मी राज्य सरकारी नोकर असून .कुटुंबासह बदल्यांच्या ठिकाणी नोकरी karato .१९८४ साली मी ani माझे wadeelanni ४ gunthe जमीन घेतली .दोघांनी अर्धा अर्धा वाटा पैसे दिले.तेंवा लहान भाऊ १५ वर्षाचा होता .आता फक्त आई आहे .विश्वासामुळे पुरावा नाही .भाऊ ने आईची निर्णयक्षमता नसल्यामुळे मला कोणतेही कागद मिळण्यास व गरात येऊ देण्यास मनाई केली आहे. मी काय कर शकतो?
४ गुंठे जमीन खरेदी केली त्या वेळेस , 7/१२ / मिळकत पत्रिका या वर आपले व वडिलांचे नाव दाखल करण्यात आले होते का? खरेदी खातात , दोघांचे , वडील वआपले नावाचा उल्लेख आहे का ?
नसल्यास आता काही करता येणार नाही . जर आपण जमीनखरेदी करण्यासाठी , पैसे धनादेश द्वारे दिले असल्यास , आपणास न्यायालयाकडून , जमीनएकत्रित खरेदीकेली असल्याने , आपलेनावजमिनीस लावणे बाबत दावा दाखलकरावा लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर. आम्ही वैभववाडी येतील काम्भाल्वादी येतील तेम्भेवादी येते घर आहे ते आम्ही २००९ ला बांधले आहे.परंतु आम्हाला त्याचा ७/१२ किवा बुकंग क्रमांक माहित नाही आहे. तरी अंभी कसा काई सोधाचा कृपया मार्गदर्शन करावे तुमच्या उत्तराची वाट bhagoto
राजेश्जी ,
आपण २००९ मध्ये घर बांधले आहे . म्हणजे त्या पूर्वी आपल्या नावावर जमीन होती .
जर गावठाणात जागा असेल तर , ग्राम पंचायत मध्ये घर नंबर बाबत चौकशी करा .
गावठाण बाहेर घरअसेलतर, तलाठी कडे चौकशी करा आपणास ७/१२. बाबत माहिती मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सप्रेम नमस्कार माझ्या आजींच्या नावे आमचे राहते घर व शेतजमीन होती.आजींच्या निधनानंतर घर व शेताला दोन वारसदार होते. माझे वडील व काका. आता वडील ह्यात नाहीत. त्यामुळे माझी आई(वारस:मी) व काकाच्या नावावर सध्या ही मालमत्ता आहे. आमची 17 गुणठे शेती आहे. आईचे म्हणणे आहे की,मी ह्यात असेपर्यंत शेत व घराची वाटणी करून टाकावी. काकू स्वभाव खूपच वाईट आहे.माझ्या हिष्यावर त्यांचा डोळा आहे."कांकाना कुठेही सह्या करायला पाठविणार नाही,असे काकू बोलल्या आहेत".काका व्यवहराबद्दल माझ्याशी बोलत नाही व काकू मारायला करते. मला नोकरीसाठी बाहेर जावे लागले,आता गावी काका व काकू राहतात. 1)घराचा आमचा हिस्सा आमच्या(आई व वारस:मी) ताब्यात आहे.घर स्वातंत्र 8-अ उतारा मिळाल्यावर, घर कॅमेटीची पावती आमच्या नावाने मिळेल काय.2)सदर शेत तुकडा आहे,त्यामुळे खतेफोड करता येणारनाही. तलाठीसाहेबांच्या सांगण्यावरून शेताला आनेवारी लावणे,आनेवारी म्हणजे काय.आनेवारी लावल्यावर 7/12 आमच्या(आई व वारस:मी) नावाने मिळेल काय.शेताचा सर्वे करणे म्हणजे काय.
. आपले शेतीचे क्षेत्र १७ गुंठे आहे . दोघात विभागणी झाल्यावर , काका व तुम्हाला प्रत्येकी ८.५ गुंठेक्षेत्र मिलेले . त्या मुले तुकडा तयार होईल वत्यास कायद्याने प्रतिबंध आहे
त्यासाठी आपले दोघांपैकी एकास , आपले हिस्स्याचे जमिनीचे पैसे घेनेची तयारी ठेवावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
मी पदवीधर आहे. पदवीच्या अगोदर माझे नाव हर्षल असे होते आणि सध्या मी ते शासन राजपत्रानुसार अर्ज करून बदलले आहे व राजपत्रात ते प्रसिद्ध सुद्धा झाले आहे. व ते अमित असे केले आहे. दोन दिवसापुर्वी मी ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज अमित या नावाने दाखल केला होता पण तो तहसीलदार यांनी स्वीकारला नाही मग मी उप विभागीय अधिकारी यांच्याकडे अपील केले होते आणि त्यांनी सुध्दा ते नामंजूर केले आहे.
१. अपीलात ते म्हणाले की आपण आपल्या जुन्या नावाने अर्ज दाखल केला पाहिजे.
2. मी अर्जासोबत शासनाने दिलेल्या राजपत्राची प्रत दिली होती आणि ती पण त्यांनी स्वीकारली नाही.
३. तर सध्या मी काय करू शकतो याबाबत योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.
१ . ग्राम पंचाय्यात निवडणुकीसाठी , तहसीलदार यांचे कडे , नामनिर्देशन पत्र दाखल केले जात नाही . ग्राम पंचायत निवडणुकीसाठी पर्यवेक्षीय दर्जाचा अधिकारी , निर्णय अधिकारीम्हणून नियुक्त केला जातो . त्याचे कडे अर्ज दाखलकरू शकता .
नाम्निदेषण पत्रात जरी काही चूक , तृत्त्ती असल्या तरी , नामनिर्देशन पत्र दाखलकरून घेण्यास नाकारलेजात नाही . छाननी वेळी , फार तर ते अवैध ठरवले जाते .
त्या मुले वास्थुस्तीती योग्य वाटत नाही.

२. नामनिर्देशन पत्र बाबत , अपील जिल्हा न्यायालयात दाखलकरावयाचे असते . प्रांत अधिकारी यांना अधिकार नाही.

३. आपण जिल्हान्यायालयात दावा / निवडणूक याचिका दाखलकरा . ( आवश्यकते प्रमाणे )

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर
माझे आजोबा यांच्या नावे 20 एकर जमीन असुन ति माझ्या वडीलांच्या नावे न करता मी व माझ्या भावाच्या नावे करावयाची आहे.
1. मी 21 वर्ष वयाचा असुन माझा लहान भाऊ 14 वर्ष वयाचा आहे. तरी जमीन त्याच्या नावे करता येईल का
2. सदर जमीन आमच्या नावावर कशी करून घ्यावी
3. आजोबांच्या जमीनीवर आम्ही 5 लाख रुपये बॅकेचे कर्ज घेतलेले असुन जमीन वाटप करता येईल का
4. सदर कर्ज निल न करता जमीन वाटप करताना आमच्या नावे वर्ग करता येईल का
आजोबा यांचही हि जमीन आपले व भावाचे नववार जमीनकरून देण्याची इच्छा असली पाहिजे

२. आजोबा आपलेवभावाचे नावावर बक्षीस पत्र करू शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.39 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3