जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

जमीन मालक विधवा असल्यास कुळ ३२ ग जमीन विकत घेऊ शकतो का? व जमीन मालक स्वता ३२ ग खाली जमीन कुळाला विकू शकते का ?
जमीन मालक कृषक दिनी अथवा त्या पूर्वी विधवा असल्यास , कुल जमीन खरेदी करू शकत नाही . कृषक दिनान्नातर , मालक , विधवा असल्यास , ३२ ग किंमत निच्छित करता येते .

कलम ६४ खाली , मालक कुलास जमीन विकू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

respected sir, majya mothercha nave 1.5 acer sheti kharedi ,my brothercha nave :2 acer kharedi ,Fathercha nave 10 acer sheti aahe . mala equally vatap karat nahit motherchi ani brotherchi sheti det nahit ,me kay karu?
आपणास न्यायालयात सिद्ध करावे लागेल; कि जरी , आई व भावाचे नावे शेती घेतली असली तरी , जमीन खरेदी करण्यासाठी , एकत्रित कुटुंबाचे पैसे , देण्यात आले होते .
The Specific Relief Act खाली आपणास , आई व भाऊ यांचे नावे खरेदी केलेली मिळकत , हि एकत्रित कुटुंबाची आहे हे जाहीत करून मिळणे बाबत दिवाणी दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या panjichi जमीन आहे म्हणजे आईच्या आजीची तिला ३ मुली आहेत मुलगा नाही ३ मुलीपैकी १ माजी आजी आहे आता सध्या माजी आजी व पणजी एकत्र राहतात व दुसर्या २ मुली पैकी एक वारली आहे तिला २ मुले २मुलि आहेत व एक दुसर्या गावी तिच्या कुतुबासोबत राहत आहे आता तिच्या दोन्ही मुलीचे मुले माझ्या पणजीला पाहत नाही व कधी भेटायला पण येत नाही फक्त माझी आजीच तिचा सांभाळ करते आता ती पणजी म्हणते मला जमीन विकायची आहे कारण मला घर खर्च व हॉस्पिटल साठी पैसे पाहिजे कारण आता ती काम नाही करू शकत परतू तिचा दुसर्या दोन्ही मुलीचे नातू म्हणतात आमचा त्यात वाटा आहे आम्ही ती जमीन विकू देणार नाही व तुला पण सांभाळनार नाही. तर मला एक सांगा साहेब aaj ती त्या जमिनीची मालक आहे तीला जमीन विकायला यांची परवानगी घावी लागेल का बिन परवानगी ती जमीन विकू शकत नाही का
परवानगीची गरज नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
मी तलाठी पदासाठी अर्ज केला असून त्या साठी कोणत्या पुस्तकांचा संदभ म्हणून अभ्यास करावा
.
आपण ज्या जिल्ह्यामधून pariksha देत आहात , त्या जिल्ह्याचा भूगोल , तसेच एइत्त १० वि पर्यंतची शास्त्र , इतिहास , तसेच सामान्य ज्ञान या विषयाची पुस्तके वाचा , ७ विपर्यंतचे गणित अभ्यास .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर, नमस्कार,
माझे गाव खैरेवाडी कान्हूर मेसाई , त शिरूर, पुणे . येथॆ असून आमच्या गावाच्या दोन मोठ्या वस्त्या आहे. (खैरेवाडी, खैरेमला) गट ग्रामपंचायत आहे. खैरेमला येथे साधारण १०० घरे आणि ८५०-१००० लोकवस्ती आहे . पण तेथे गावठाण जमीन नाही , सर्व लोकांची घरे हि फोरेस्ट जमिनीवर आहे सध्या वन विभागाने झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम चालू केले आहे , त्यांनी सर्वाना घरे वनविभागाच्या जमिनीवरून हटवण्यास सांगितले आहे अशा वेळी काय करावे लागेल .
कृपया लवकरात लवकर मार्गदर्शन करावे हि विनंती.
वनविभागाच्या जमिनीवरून अतिक्रमणे काढावीच लागतील. .किंवा न्‍यायालयाकडून स्‍थगिती घ्‍यावी लागेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आमच्या अजोबाची गावातील जमिन आहे पण अम्हाला गट नंम्बर काही माहीत नाही मग कोणाच्या नावे अहे किती आहे हे कोठे पाहत एईल
गाव कामगार तलाठी यांचेकडे चाौकशी करावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माझे गांव मु.पो. लाटवण, ता. मंडणगड, जिल्हा रत्नागिरी असून आजोंबांची/वडिलांची कुळ कायद्यामध्ये जमीन गेली आहे किंवा नाही याबाबत मला माहिती नाही. परंतु त्या जमीनीविषयी शोध घ्यावयाचा आहे. त्याबद्दल माझेकडे काही पुरावे नाहीत. त्याबद्दल मला माहिती मिळाल्यास किंवा शोध कसा घ्यावा या बद्दल मार्गदर्शन केल्यास मी आपला आभारी राहील.
कळावे.
धन्यवाद
सदन कदम
काहीच कागदपत्रे नसतांना शाोध घेणे अवघड जाईल. तथापि गाव कामगार तलाठी यांना संपर्क करावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

काही मालमत्ता पत्रकामध्ये धारणाधिकार मध्ये इंग्रजी जी (ग) असे लिहिलेले असते व खाली धारकांचे नावापुढे इंग्रजी एच असे लिहिलेले असते. जी मंझे काय व त्याचा परिणाम मालकी हक़्क़ावर काय होतो याबाबतीत खुलासा केलेस उपकार होतील.
धन्यवाद
मिळकतीच्या मालकी हक्कात (Ownership) बदल झाल्यास इंग्रजीत "H' (Holder) असे अक्षर तर मराठीत ‘धा’ (धारक) असे अक्षर लिहितात.
पट्टेदाराच्या हक्कात (Lease Holder) बदल झाल्यास इंग्रजीत "L' (Lease Holder) असे अक्षर तर मराठीत ‘प’ (पट्टेदार) असे अक्षर लिहितात.
इतर हक्कात (Other rights) बदल झाल्यास इंग्रजीत "O' (Other rights ) असे अक्षर तर मराठीत ‘इ’ (इतर हक्क) असे अक्षर लिहितात.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

१. जर एखादा महसूली कर्मचारी (लिपीक)एस.एस.डी परीक्षा तीन वर्षात व तीन संधीत उत्तीरर्ण झाला नाही तर त्यााची ज्ये.ष्टाता खाली जाते का ?
२. जर एखादा महसूली कर्मचारी (लिपीक) याने एस.एस.डी. परीक्षा तीन वर्षात पण चौथ्याल किंवा पाचव्या संधीत उत्ती र्ण झालेस त्याखच्यार ज्येीष्टΪतेवर काय परिणाम होतो ? कृपया माहिती मिळावी हि विनंती
नमस्कार सर, मी एक माजी सैनिक असून, मौजे राळेगण सिद्धी गावचा रहिवासी आहे. माझे वडील संपत आणि त्यांचे चुलते बाबुराव यांचेमध्ये गट नं: १६५ (५२ आर क्षेत्र, सर्वे.नं :१६६ चा पोट हिस्सा क्र:१) सामाएक होता. १९८४ साली वडिलांनी आणेवारी लावली असता २६ आर क्षेत्र वडील व आम्हा ५ भावांच्या नावे झाले. तसेच बाबुराव मयत झाल्यानंतर वारसाहक्काने २६ आर क्षेत्र त्यांची मुले भारत व बबन यांचे नावे आले. २००७ मध्ये माझ्या वडिलांनी त्यांचे ६ आर क्षेत्र माझ्या बहिणीस कायम खरेदी ने दिले. २००५ मध्ये बबन च्या दोन मुलांनी आमच्या उपरोक्ष पूर्व बाजूस घरे बांधली व ग्रामपंचायत मध्ये नोंद केली. सदर जमीन खडकाळ असल्याने बरीच वर्षे पडीक होती. २०१४ मध्ये भारत च्या नातवांनी पश्चिम बाजूस घर बांधण्यास दांडगाईने सुरवात केली असता आम्ही ग्रामपंचायत मध्ये अर्ज देऊन सदर जमिनीची मोजणी व पृत्थाकरण होईपर्यंत घराची नोंद करण्यास हरकत घेतली. सदर गटाच्या पश्चिमेस आमच्या मालकीचा स्वतंत्र गट असल्याने सदर जमिनीचे पृत्थाकरण करून पश्चिमेकडील क्षेत्राचा ताबा मिळविण्यासाठी तसेच घराच्या बांधकामास मनाई करण्याबाबतचा दावा एकतर्फी निकालाने मंजूर झाला व सदर गटाची जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार भूमी अभिलेख तर्फे कोर्ट वाटप मोजणी येत्या २५ तारखेस आहे. परंतु सदर गटात बऱ्याच वर्षांपासून आमची वहिवाट नाही, दांडगाईने आम्हास मज्जाव केला जातो.. परंतु स्कीम, ७/१२ मध्ये अर्धे क्षेत्र आमचे असल्याची नोंद आहे. तरी सदर जागेवरील बांधकाम पडून आमचे २६ आर क्षेत्र आम्हास मिळेल का?
तसेच आमच्या मालकीच्या इतर दोन गटांचे ते लगतचे धारक असून त्या गटांची सरकारी मोजणी करून हद्दकायम करूनही वारंवार हद्दीच्या खुणांची मोडतोड केली जाते. त्यांना राजकीय पाठबळ आहे काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे.....सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मार्गदर्शक अधिकारी यांचे आभार.
न्यायालयाचा आदेश तुमच्या बाजूने आहे . त्या मुले मोजणीस आपले चुलत बंधू मज्जाव करू शकणार नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sujit
22-06-2015
spj100@rediffmail.com

आमची वडिलोपार्जित शेतजमिनीचे वाटप करावयाचे आहे,वडिलांकडून वाटप मुलांकडे करावयाचे आहे त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती मिळावी
तहसीलदारांकडे म.ज.म. कायदा कलम ८५ अन्‍वये अर्ज करावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

जमिनीचे खरेदीखत तयार केल्यानंतर आपण किती वर्षानंतर कामगार तलाठी यांच्याकडे ७/१२ ला नोंद लावू शकतो. त्याबद्दल काही नियम व अटी आहेत का ?
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, कलम 154 अन्वये नोंदणी अधिकार्याने पाठविलेली जमीन हस्तांतरणाची माहिती वगळता इतर बाबींची माहिती (वारस इत्यादी), हक्क संपादन करणार्याने तीन महिन्याच्या आत गाव कामगार तलाठी यांना कळविणे आवश्यक आहे. अन्यथा हक्क संपादन करणारा दंडास पात्र ठरतो.
नोंदणीकृत खरेदी दस्त हा कितीही जुना झाला तरीही त्याची पत/किंमत (Value) कमी होत नाही. तत्कालीन खरेदी देणार याने स्वत:चे नाव 7/12 सदरी अद्यापही तसेच असले तरीही दरम्यानच्या काळात जमीन इतर कोणाला विकली नसेल आणि आजही 7/12 सदरी तत्कालीन खरेदी देणार याचेच नाव असेल तर नोंद प्रमाणीत करता येते.
परंतू तत्कालीन खरेदी देणार याने स्वत:चे नाव 7/12 सदरी अद्याप तसेच असल्याचा गैरफायदा घेऊन दरम्यानच्या काळात जमीन इतर कोणाला विकली असेल तर जुन्या खरेदीदारास त्याचा मालकी हक्क दिवाणी न्यायालयातून शाबीत करून आणावा लागतो.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

शिव रस्ता मोकळा करून (खुला) घेण्यासाठी काय करावे लागेल. कोणाकडे अर्ज सादर करावा लागेल.
माम्लेतदार कोर्ट कायद्या खाली , तहसीलदार यांचे कडे अर्ज करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा..सराना नमस्‍कार ,
सर एखादी महिला कर्मचारी ज्‍याना लागून एक वर्ष झाले आहे .त्‍यांचे रजा खाते 30 दिवस अर्जित रजा शिल्‍लक असताना संबधीत महिला कर्मचारी हे अर्धवेतनी रजा /असधारण रजा घेतली असेल तर अशा वेळी संबधीता कोणताही कर्मचारी यांना वैद्यकीय बिल देय आहे किंवा नाही तसेच असाधारण रजेवर असताना सदर कर्मचारी मयत अथवा सेवा निवृत्‍त झाल्‍या असल्‍यास अशा कर्मचारी यांना वरील सर्व फायदे मिळतात का ?,
नमस्कार साहेब माझ्या वडिलांची खोपडी या गावात शेतजमिन आहे. परंतु ते २००९ साली स्वता घरातून निघून गेले व ते कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही व मी एकटीच वारस आहे. जेव्हा ते निघुन गेले तेव्हा त्यांचे वय ७४ होते आणि ते खूप आजारी होते त्याना टीबी हा आजार होता आजारला कंटाळून निघून गेले आता ते जिवंत आहेत की नाही हे कोणालाच माहीत नाही तर ७/१२ वर माझे नाव लावायचे आहे तर काय करावे लागेल आणी मी पोलिस तक्रार केली नाही कारण ते परत येतील असे मला वाटले होते पण ते आजपर्यंत परत आले नाही आणी आता या गोष्टीला ६ वर्ष झाल्याने पोलिस तक्रार घेत नाही आता मला ७/१२ वर नाव चढवायचे आहे तर काय केले पाहीजे ? कृपया या बाबत मला कायदेशीर मार्गदर्शन करावे ही विनंती.
वडील परागंदा झाल्या बाबत आता , पोलिस ठाण्यात तक्रार द्या .
७ वर्ष एखादी व्यक्ती दिसली नाही अथवा तिचा थांग पत्ता नसेल , तर पुरावा कायद्या नुसार अशी व्यक्ती मयत झाली आहे अशे मानले जाते
आपणास ७वर्षे थांबावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बाकिचे ४मधे २भाउ व २ बहीन आहेत. आणि वादाचे कारन मोठ नाही ते फेमेली मॅटर आहे .आणि हा वाद अजुन तरी न्यायालयात नाही दाखल केला. तर माझ्या आईच्या हिस्सेची जमीन कायदेशीर कशी विकु शकतो त्यांच्या शिवाय मार्गदर्शन करा .
मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलम 44 अन्वये अविभक्त कुटुंबातील एक किंवा अनेक हिस्सेदार आपल्या हिश्याची जमीन विकू शकतात. असा खरेदी घेणार हा खरेदी घेणार्‍याची जागा घेतो.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by ASHISH PATIL
20-06-2015
ashishpatilgeca@gmail.com

शासकीय सेवेत कार्यरत असताना इतर शासकीय विभागात निवड झाल्‍यास राजीनामा द्यावा अथवा कार्यमुक्‍त व्‍हावे यासंबंधी माहीती
कार्यमुक्त व्हावे . सेवा ज्येष्ठ था लाभ मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

भूमी अभिलेख खात्यातील कर्मचारी हे तांत्रिक काम करून देखील त्यांना
तांत्रिक वेतन दिले जात नाही याबाबत शासन स्तरावरून अनेकदा प्रस्ताव मागितले होते परंतु शासन फक्त आश्वासन देते याबाबत आपले मार्गदर्शन व्हावे

शासन सर्वोच्च आहे . आपल्या मागणीचा te लवकर विचार करेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी मौजे येणेरे , ता.जुन्नर . जि.पुणे येथील रहिवाशी आहे तर गट क्र.१४५ मधील १९८० साली ५० - ५० गुंठे अशी जमीन वाटप झाली पण आता आमच्या ७/१२ वर ४८ गुंठे व त्याच्या ७/१२ वर ५२ गुंठे अशी नोंद आहे . कुठेही पोटखराबा नाही व कोणत्यही फेरफार मध्ये कोणतीही नोंद नाही तर आमचे २ गुंठे जमीन परत लावण्यासाठी काय करावे.???
वाटप झाल्या पासूनचे 7/१२ पहा . २ गुंठे तफावत कशी झाली हे तपासा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या आजोबानी ३ गुटे जमीन विकली ती व्यक्ति ६ गुटे वापरते मागीतले तर देत नाही काय करावे
तुमच्या जागेत tresspass kele म्हणून आपण गुन्हा दाखल करू शकता
तसेच दिवाणी दावा दाखल करून , तुमच्या जागेतत्याने वहिवाट करूनये या साठी त्यास मनाई करण्यासाठी दिवाणीदावादाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rajesh
19-06-2015
r.kakare@gmail.com

एका व्यक्तीला (सध्या मयत १९६८ ला )२ बायका आसतील आणि त्या दोन बायकांना प्र्यातेकी ४ न २ मुले आसतील ..तसेच पहिली बायको मयत झाल्यावर(४ मुले आहेत ) दुसरी केली न तिला २ मुली आहेत.(आता दुसरी पण मयत आहे - सन १९८२ ला ). ४ मुले न २ मुली ह्यांची वये अंदाजे ४० ते ६५ मध्ये आसतील.

वारसा हक्क कायदा किंवा हिंदू विवाह कायद्या नुसार वरील वारसांचा वडिलोपार्जित मिळकतीत किती वाटा असेल ??
थोड details मध्ये सांगावे.
धन्यवाद..!
सर्व , ४+२ = ६ वारसांना , समान हिस्सा मिळणार

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, आरोपीची ओळख परेड घेण्‍याबाबतीत उपविभागीय अधिकारी हे कोणत्‍या नियमानुसार व कलमानुसार नायब तहसिलदार यांची नेमणुक करू शकतात या विषयाी मार्गदर्शन होण्‍यास विनंती.
कार्यकारी दंडाधिकारी यांनी ओळख परेड घेण्याची आहे ( उच्च न्यायालय मार्गदर्शक पुस्तिका )
प्रशासकीय आदेशाने प्रांत अधिकारी यांनी नायब तहसीलदार यांची नेमणूक केली असेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by दिलीप Ghule
19-06-2015
dilipg@hotmail.com

माझी जामीन शेजारी असणारांनी कोरली आहे. शेजारी मोठे असल्याने माझे काही समझुन घेत नाहीत . मला काय केले तर माझी जामीन मला मिळेल.
आपण आपल्या jaget शेजारील शेतकर्याने अतिक्रमण केले आहे va ते दूर करून देण्याबाबत शेजारील शेतकर्यास हुकुम / आदेश देणे करणे करिता दिवाणी दावा दाखल करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर ग्राम पंचायत ने महसुलची खाली जागा बांधकाम करण्यासाठी मागीतली़, त्यांना कोणत्या GR नुसार जमीन हस्तांतरित करता येईल, व त्याच्यावर फी,दर लावायचे का? GR परीपञक कृपा करून सांगावे,
जमीन शासनाकडून हस्तांतरण होते .
जिल्हाधिकारी यांचे कडून आयुक्तामार्फात शासनास अह्व्हाल saddar केला जातो . नंतर जमीन हस्तांतरित होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जिल्हा परिषदेचा कर्मचारी हा शासकीय असतो की निमशासकीय असतो?

This page was generated in 0.45 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3