जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Mahesh Kadam
07-10-2025
maheshkadam8199@gmail.com

शासकीय जमीन मालकी हक्काने देताना 1961 व 1962 च्या कबुलायती अटी मिळण्याबाबत

Question by Mahesh Kadam
07-10-2025
maheshkadam8199@gmail.com

सर जमीन भोगवटादार 2 मध्ये जमीन स्वतः करण्याचा अटीवर दिलेली असेल आणि जमीन दुसरा कसत असेल 12 वर्षे त्याची कागदोपत्री नोंद असेल तर त्याला कूल कायदा लागु होईल काय? ती जमीन आता सरकार हक्क असेल तर जमीन 12 वर्षे करणारा व्यक्ति नावावर करू शकतो का? ही जमीन दुसर्‍या व्यक्तीने खरेदी करण्याचा प्रयत्न केलेने जमीन शर्त भंग झाली आहे त्यामुळे सध्या सरकार हक्क आहे.
प्रतिसाद :
शासनाने प्रदान केलेली जमीन ही भोगवटादार वर्ग दोन म्हणून तिचा धारणाधिकार असतो. शासनाने जमीन प्रदान केल्यावर त्याच व्यक्तीने ते जमीन कसणे आवश्यक आहे. व जमीन प्रदान आदेशामध्ये या अटी व शर्तीचा उल्लेख असतो. जर ती व्यक्ती स्वतः जमीन करत नसेल तर सदर जमीन शासन जमा केली जाते.
नवीन प्रश्न मी सशस्त्र दलात कार्यरत आहे तर ती जमीन मला मागणीसाठीचा अर्ज फॉरमॅट मिळावा मिळेल काय याची माहिती मिळावी
सर, माझे आजोबा यांनी 60/65 वर्षे पुर्वी शेतजमीन खरेदी केली होती. आजुबाजुला पडिक जमीन असल्याने शेत रस्ता असेल परंतु वापर केला नाही.पडिक क्षेत्रातुन वापर केला , परंतु आता सर्व शेतकरी शेती करु लागले. कुणासही ठाऊक नाही कि, वहीवाट रस्ता कुठे आहे . शेतात येणे,जाणे . माल बाहेर काढने यास त्रास होत आहे. काय करावे ‌
वर्ग 2 जमिनीचा 32 म झाल्यानंतर वर्ग 1 करण्यासाठी 40% आकारणी रक्कम फक्त रु 31 आहे. ही रक्कम अती अल्प असल्याने नियमानुसार त्याचे चलन ची किमान रक्कम किती आहे.
माझ्या नावावर वडिलोपार्जित शेतजमीन आहे , आणि मी आता सज्ञान झालो परंतु , माझे वडील सध्या कौटुंबिक वादातून स्वतः माझी जमीन मला कायदेशीर हक्क असतांनाही मला शेतवहिती करण्यास प्रतिबंध निर्माण करीत आहेत. तरी त्यासाठी मला कोणती कायदेशीर पद्धत वापरावी लागेल ?
1963 चा ७/१२ मध्ये क्षेत्र 35 गुंठे आहे. त्यामध्ये 6,6,7,15 अशी फक्त आणेवारी असून सामंजस पणे वहिवाट आहे. वाटप पत्र नाही. 1963 साली 35 गुंठे क्षेत्र असल्याने तुकडा असे नमूद केले आहे. परंतु आता जिरायत किमान क्षेत्र २० असल्याने तुकडा शब्द कमी होईल का?
तत्कालीन राजपत्र नुसार तुकडा म्हणून जाहीर केलेले क्षेत्र आहे प्रमाणभूत क्षेत्र आता जरी कमी झाले तर पूर्वलक्षी प्रभावाने कमी झालेले नाही त्यामुळे आपले गटावरील तुकडा कमी होणार नाही तथापि आज रोजी तुकडा कमी /नियमाकुल करणेसाठी नियमानुसार अर्ज तहसिल कार्यालयात सादर करावा

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

नमस्कार सर
सर माझ्या आजोबांनी 1990 साली महार वातानाची 4 एकर जागेपैकी 5 गुंठे खरेदी केली होती त्यावेळी त्यांनी 7/12 वर नाव नोंदीवलं नाहीं पण आत्ता आजोबा expire झालेत मग वडिलांचे नाव पण 7/12 वर नोंदवले नाहीं तलाठी साहेबांनी सर मला कर्ज काढण्यासाठी bank noc मागत आहे तहसीलदार कडून ते equitable mortguage करनार आहेत त्या साठी मला सहकार्य करावे
सदर व्यवहार तुकडे बंदी कायद्या विरुद्ध आहे तसेच आपण सक्षम अधिकारी यांची परवानगी खरेदी खत मध्ये आहे का ते तपासावे तदनंतर काही कायदेशीर मार्ग सांगता येईल

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

Question by Bhushan vartak
23-09-2025
shilparaut35@gmail.com

नमस्कार सर मी भूषण वर्तक वसई येथे राहत असून आमच्या कुटुंबाची सामायिक जमीन आहे ज्यामध्ये माझ्यासह माझे चुलत भाऊ तसेच चुलत भावांची मुलं असे सर्वांचे नावे आहेत. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सदर जमिनीवर माझ्या आईचे आणि आम्हा तिन्ही भावांचे नावे चढलेली आहेत सदर जमिनीवर माझ्या चुलत भावांची किंवा चुलत भावांच्या मुलांची जमिनीवर नाव आहेत अशा सर्वांनी काही जमिनीवर जर माझ्या आईच्या नावाने विना मोबदला हक्क सोडा केला तर त्यावर स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का किंवा किती स्टॅम्प ड्युटी लागेल.
गायराण /गावठाण जमीन ही ग्रामपंचायतीच्या ठरावाने /संमतीने एखाद्या धार्मिक शिक्षण संस्थेस देता येऊ शकते का ? आणि तशी जमिन देण्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी प्रतिबंध निर्माण केलेले आहेत का ?
महसूल संहितेच्या कलम २२- अ अन्वये , केवळ राज्य शासन / केंद्र शासन यांना सार्वजनिक उद्देशासाठी गायरान जमीन वळती करता येते . खाजगी प्रकल्पाही अशी जमीन देता येते त्यासाठी , जेवढी जमीन वळती करण्यात आली आहे त्याच्या दुप्पट जमीन गायरान यासाठी द्यावी लागते .
उपरोक्त गायरान जमीन वळती तेंव्हा केली जाते ज्यावेळेस गावामध्ये अन्य जमीन शिल्लक नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by patil
15-09-2025
np896799@gmail.com

मा. कोर्ट द्वारा दिवानी दावा आदेश आणि मा. कलेक्टर साहेब व तहसीलदार साहेब यांचा कडून शेत जमींन वर 7/12 वरती नाव आणि शेत्र लावण्या साठी तलाठी ,सर्कल अधिकारी व उप भूमि अभिलेख यांचा कड़े प्रकरण पाठवले आहे . तर ही प्रकिया कशा प्रकारे होत आसते आणि किती वेळेत पूर्ण होते
दिवाणी न्यायालयाचा आदेश / हुकूमनामा असला तरी हि महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम च्अया कलम ३ अन्वये मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे . तसेच नोंदणी अधिनियम १९०८ अन्वये नोंदणी करणे आवश्यक . या बाबी केल्या असतील तरच आपले नाव अधिकार अभिलेख पत्रकाला लागेल अन्यथा नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

27 + 2 पोट खराब गुंठे सामायिक क्षेत्र चा तुकडा ७/१२ (1963 नुसार) मध्ये प्रत्येकी ६+2 पोट खराब , ६, 15 आर अशी तीन आनेवारी नमूद आहे. आहे. त्या प्रमाणे समंजस प्रमाणे व वहिवाटीने 1963 पासून शेती करत आहोत. वाटप पत्र नाही. तुकडा शब्द निघू शकतो का व कसा? तीन वेगळे 7/12 होऊ शकतात का?
मा अजय साहेब
महाराष्ट्राचा तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याचा व त्यांचे एकत्रीकरण करण्याचा अधिनियम अस्तित्वात आल्यानंतर , प्रमाणभूत क्षेत्र स्थानिक क्षेत्र निहाय ( महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक क्षेत्र - जिल्हा आहे ) निच्छित करण्यात आले आहे . प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र म्हणजे तुकडा ( Fragment ) . सुरवातीला प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेले तुकडे यांची यादी करण्यात आलेली आहे व त्याचा एक फेरफार ( गावनिहाय ) प्रमाणित करण्यात आलेला आहे . मात्र अश्या तुकड्यांची विक्री नजीकच्या खातेदारा खेरीज करता येत नाही.
त्यामुळे स्वतंत्र ७/१२ करता येणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by saga patil
13-09-2025
sp109391@gmail.com

माझा प्रश्न असा होता की तहसीलदार यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे मंडळ अधिकाऱ्यांनी व तलाठ्यांनी स्वतः येऊन अगोदर नोटीस काढून करून दिलेला रस्त्याची नोंद सातबारा वरती इतर हक्कात किंवा ग्रामपंचायतीकडे किती दिवसात तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे
आणि तो अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार किंवा प्रांतांच्याकडे किती दिवसात सादर करणे आवश्यक आहे
1955 सालामधे 2100 रुपये च्या मोबदल्यात एका संस्थानाच्या राजाने निरंतर कौलाने दिलेली जमीन संबंधित राजघराण्याला त्या व्यक्तीकडून किंवा त्यांच्या वारसांकडून परत घ्यायचा अधिकार राहतो का

Question by saga patil
12-09-2025
sp109391@gmail.com

सर माझा प्रश्न असा होता की तहसीलदार यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे मंडळ अधिकाऱ्यांनी व तलाठ्यांनी स्वतः येऊन अगोदर नोटीस काढून करून दिलेला रस्ता जबाबदाराकडून पुन्हा अडवणूक होऊ शकते का झाल्यास काय करावे लागेल
माझे शेत क्षेत्र १.३१ हे आर + ०.० हे १०.० आर = १.41 हे आर आहे , ७/१२ वरती १० आर पोट खराब क्षेत्र नाल्याचे आहे परुंतु मोजणी शीट मध्ये तो नाला माझ्या शेताच्या बांधाच्या पलीकडे आहे माझे क्षेत्र क्लियर १.४१ हे आर आहे व ते लागवडी खाली आहे , ते १० आर क्षेत्र मला काढून क्लियर १.41 क्षेत्र कराचे आहे
आपला प्रश्न:
सर माझ्या पनजोबांना 1968 साली वन जमीन मिळालेली आहे त्याची नोंद ही सर्व्हे नंबर वर झाली आहे परंतु नंतर जमीन एकत्रीकरण योजनेनंतर ते नाव कमी होऊन पुन्हा गट नंबर 7/12 वर फॉरेस्ट चे नांव लागले ते नाव कमी करण्यासाठी 1989 साली फेरफार झाला आहे परंतु त्याचा अंमल फेरफार सदरी झाला नाही त्याचा अंमल होण्यासाठी 2025 साली मी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दिला आहे आणि तो अर्ज तहसीलदार यांनी मंडळअधिकारी यांच्याकडे पाठवले आहे त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी जमीन निर्वणीकरण दाखला मागितला

Question by Manish Paspohe
08-09-2025
manishpaspohe@gmail.com

ता. रावेर जि. जळगाव येथील शेतातून गेलेला पाट मोजायचे असल्यास कुठल्या कार्यालयात संपर्क करावा लागेल?

Question by V choure
07-09-2025
vihanchoure09@gmail.com

नमस्कार साहेब,
माझ्या आजोबांनी 16 एकर शेत जमीन 1949 रोजी खरेदी केली.त्या खरेदी खतामध्ये विहिरीचा पण उल्लेख केला.
पण सातबारा च्या इतर हक्क मध्ये विहिरीचा उल्लेख नाही.
त्यानंतर ती शेत जमीन 1964 रोजी त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला म्हणजे माझ्या वडिलांना वाटणी करून दिली.पण वाटणी पत्रात विहिरीचा उल्लेख केला नाही.
त्यानंतर माझ्या वडिलांनी आम्हा तीन भावांमध्ये रमेशला 4 एकर , सुरेशला 4 एकर आणि मला 8 एकर जमीन वाटणी करून दिली .पण त्यामध्ये पण विहिरीचा उल्लेख करण्यात आला नाही.विहिरी माझ्या आणि सुरेश च्या बांध्याच्या मधोमध आहे.
त्यानंतर मी 2005 साली 4 एकर जमीन विष्णू यांना विकली असून विकलेल्या क्षेत्रात विहीर गेली आहे.पण मी शेत जमीन विकताना खरेदी खतामध्ये विष्णू ला विहिरीत हिस्सा दिला नाही. फक्त खरेदी खतामध्ये आंब्या च्या झाडात अर्धा हिस्सा लिहून दिला आहे.तर आता मला विहिरीची नोंद 7/12 सदरी इतर हक्क मध्ये लावायची आहे तर मग मी काय करावे.
500 शपथ पत्रावर कोणताही भाऊ सहमती देत नाही.
आणि माझा हिस्सा विहिरीत किती असेल?
गांव नमुना 14 कुठे मिळेल

Question by Vasant Kumbhar
28-08-2025
diliparmy@gmail.com

सन 2025 मध्ये मिळकत पत्रिकेत सत्ता प्रकार नमुद नाही, असा शेरा आला आहे. सदरहू जागा मी सन 1998 साली विकत घेतली असून धारक सदरी बिगर परवाना बिन शेती अशी नोंद 1977 साली घेतलेली आहे. मला जमीन खरेदी देणार याचे नाव धारक सदरी नमूद नाही. परंत, जमीन खरेदी देणार व घेणार यांची नावे ग्रामपंचायतीतील रेकॉर्ड मध्ये नमुद आहे. व खरेदी घेणार आजही ग्रामपंचायतीस कर भरणा करत आहे. तरी मिळकत पत्रिकेवर कोणती सत्ता प्रकार नमुद करावी? याची प्रक्रिया काय आहे? याबाबत मार्गदर्शन व्हावे, ही विनंती.
32 म ला दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्ग १ जमीन करण्यासाठी ४० पट आकारणी नजराणा रक्कम अती अल्प रु ५.६० असेल तर नियमानुसार किमान रक्कम किती भरावी लागेल याबाबत नियम, परिपत्रक ची प्रत तथा माहिती द्यावी ही नम्र विनंती

Question by ujval
26-08-2025
ujvaltavar@rediffmail.com

मंडळ अधिकारी यांना जिल्हा बदलीसाठी विनंती अर्ज देता येतो का
मी ता.जि. धाराशिव येथील प्लॉट जमीन (3000 फुट) 2020 मधे खरेदी केली आहे. जमीन खरेदी वेळी सदर जमीन वर्ग-1 होती अता शासनाने सदर जमीन वर्ग-2 मध्ये समाविष्ठ केली आहे. मी प्लॉट खरेदी केलेनंतर 7/12 वर नांव लावले नव्हते. अता 7/12 नांव लावता येते का ? कृपया मार्गदर्शन व्हावे सर
मला शेतात जाण्यास कुठलाही रस्ता नाही आहे, तरी मला शेतात जाण्यास प्रशासन रस्ता मिळवून देईल का

Question by Chandan Mokashe
22-08-2025
mokashe@gmail.com

सीलिंग जमीनीचे रहिवाशी अकृषिक करने करिता अनुज्ञ आहे का?
असल्यास काही प्रक्रिया आहे का

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3367
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3