जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by लहानभाऊ वर्पे
31-07-2015
lahanbhauvarpe@gmail.com
सर अमचाकडे कुल कायद्याने मिळालीये अशी १० एकर जमीन आहे
1972 मधला उतारा पण आहे
भूमी अबिलेख चे २००० पर्यत चे रेकॉर्ड पण आहे
पण आता उतारावर आमचे नावच येत नाही
तलाठी म्हणतात कि जमीन खालसा झाली असेल पण ती आता पण आम्हीच करतो
उतारा hva आहे काय करावे लागेल
Question by पुरूषोत्तम पटेल
30-07-2015
patelpm31@gmail.com
सर,नमस्कार इ.मा.व.शेतकरी आहे.मला सरकार उपयोगी ईनाम वर्ग ६ ची व वर्ग २ ची ई.मा.व.शेतक-याकडील शेतजमीन विकत घेता येईल का?जमीन खरेदीसाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल का?मार्गदर्शन मिळावे.
Question by विकास बांगर
30-07-2015
vikasbangar14@gmail.com
सर, मी महाराष्ट्र शासन राजपत्र नुसार नावात बदल केला आहे .मी माझे सर्व कागदपत्रे लायसन्स ,रेशन कार्ड आधार कार्ड नवीन नावाने केले आहे मला माझ्या शेतीच्या ७/१२ वर जुने नाव बदलून नवीन नाव करायचे आहे तरी कुठे अर्ज करावा लागेल त्याची प्रोसेस काय करावी लागेल.
आपण तहसीलदार यांचे कडे अर्ज करा . अर्ज समवेत , राज पत्र प्रत जोडा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक पाटील
30-07-2015
rachnavinay123@gmail.com
नमस्कार सर,
माझा प्रश्न क्रमांक २८ दिनांक २२ जुलै चे उत्तर देण्याची कृपा करावी हि नम्र विनंती.
धन्यवाद,
विनायक पाटील
Question by सुनिल मुरकर
29-07-2015
sunilmurkar@gmail.com
नमस्कार,
माझ्या चुलत आजी ने चुलत आजोबा वारल्या नंतर तिची वडलोपार्जित मिळकत तिने आणि तिच्या मुली ने (म्हणजेच चुलत आत्त्याने) १९८९ मध्ये स्वताच्या वा चुलत आत्त्या च्या नावे न करता माझ्या काकांच्या नावे करून दिली होती. त्यानंतर २०११ मध्ये आम्हीही तिच्या वडलोपार्जित मिळकतीत सहहीशेदाराची नावे लावण्यासाठी तलाठी कडे प्रतिज्ञा पत्रा सहित अर्ज केला, त्यावर तलाठ्याने आजी आणि चुलत आत्त्याला तसेच काकांना, माझ्या वडिलांना, सख्या आत्यां ना सहहीशेदारा च्या नोटिसा पाठवल्या त्यावर फक्त माझ्या काकांनी हरकत घेतली. माझ्या काकांनी हरकत घेतल्यावर पुन्हा तलाठ्याने सगळ्यांना नोटीसी पाठवून त्याची सुनावणी मंडळ अधिकारी कडे केली. माझ्या काकांनी हरकती वर काकदी पुरावे न दिल्याने मंडळ अधिकारी ने आमच्या नावांची सहहीशेदार म्हणून नोंद केली. त्यावर काकांनी पुन्हा अपील केले परंतु काकदी पुराव्या अभावी उप विभागीय अधिकारी, कणकवली यांनीही काकांचे अपील फेटाळले.
चुलत आजी आमच्या कडेच राहत होती, आता चुलत आजी वारल्या नंतर चुलत आत्त्याला आणि तिच्या मुलींना त्यांच्या आजी ची मिळकत मिळू शकते का ? त्यांची आजी चे हिशेदार म्हणून नोंद होऊ शकते का? त्यांचे त्याच्या आजीच्या वडलोपार्जित मिळकतीवर त्यांचे हक्क आहेत का? चुलत आत्त्या वा तिच्या मुली फक्त काकांना मृत्युपत्र/बक्षीस पत्र/खरेदी पत्र कायदेशिररित्या देऊ शकते का?
आम्ही कसलेही मृत्युपत्र केलेले नाही. अजूनही चुलत आत्याचे तसेच तिच्या मुलींची नावे ७/१२ वर नोंद नाही.
Question by संध्या गरुड
29-07-2015
adv.sandhyadeshmukh@rediffmail.com
माननीय सर
जर पानधन रस्ता असेल तर त्याचा विकास करता येतो का त्या साठी काही नियमावली आहे का असल्यास त्या बाबत माहित द्यावी हि विनंती
होय , पंधान रस्त्याचा विकास करता येतो . आपण सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत गावकर्यांच्या , तहसीलदार , तलाठी यांच्या मदतीने रस्ता मोकळा करून घ्या . न रे गा, योजने अंतर्गत ग्राम पंचायत च्या व तहसील च्या कृती आराखड्यात मंजूर करून घ्या . मजुरान द्वारे रस्ता विकसित होईल . अधिक माहिती साठी ग्रामसेवक , गट विकास अधिकारी , तहसीलदार यांचेशी संपर्क साधा .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by राजेंद्र शांताराम वरतक
29-07-2015
rajendra.vartak2012@gmail.comt
किरण सर धन्यवाद मझ्या प्रश्नांची उत्तरे दिलया बद्द्ल. मझा पुढील प्रश्न असा आहे की कंपाऊंड साठी पोलीस प्रोटेक्शन मीळते काय.? त्याची फी किती व अर्ज कुठे करावा? कारण चौकशी केली होती. तर नाही मीळत सांगितले.
Question by पांडुरंग श्रीराम गोन्द्से
29-07-2015
psgondse67@gmail.com
नमस्कार सर,
३ एकर शेताचे ५ वारसदार आहे. सर्व एकाच कुटुंबातले असून त्यापैकी १ वारसदाराचे नावाने संपूर्ण शेत करण्यसाठी हक्क सोडणासाठी किती टक्के मुन्द्रंक शुल्क लागते. कुपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
Question by vikram yadav
29-07-2015
vikram.vru@gmail.com
maze dattak पत्र झाले आहे खी वर्षी प्रवी वादिलान्च्चे निधन झाले माझा दत्तक आईने तलाठी ओफ्फिचे मध्ये जाऊन अर्ज केला कि मला मुलगा नाही २ मिली आहेत .तसा फेरफार बनून तालातीहय्नी ७/१२ वर फक्थ ३ जनाची नोंद केअलि व माझे नवे वागले व टायनी जमीन विकली मी मी केस काळी व तडजोड झाली मी मुलगा आहे मान्य केले वाह्वाहाराचे पासे मी समोरचा पर्ठीला मी भरले तयमुले ३ गहिनी हक्क सोड पत्रे माझा नवे केले पण ७/१२ वर्थून थांचे नवे निगाले नाही तयीने ती जमीन परत विकली दस्त नोदनि साठी तलाठी ओफ्फिचे मध्ये आला आहे मी तक्रार अर्ज करत आहे .हाय फुडे मी काय करू कि तय ७/१२ वरठी माझी नोड होइएल .
Question by पाबळे रोहिदास सखाराम
28-07-2015
rohidaspable@yahoo.in
२५ वर्षा पूर्वी बक्षिसपत्र शाळेशाठी १ एकर व एका धर्मदाय संस्थेसाठी १ एकर करून दिले आहे परंतु त्या संस्थांनी त्या जागेचा कसलाही उपयोग केला नाही ती जागा आजही बक्षिसपत्र करुन देणाऱ्याच्या वारसाच्या ताब्यात आहे ७/१२ त्या संस्थांच्या नावे आहे तरी सदर ७/१२ आमच्या नावे करण्यासाठी काय करावे लागेल
बक्षीस पत्र हे २५ वर्षापूर्वी केलेले आहे . त्या बक्षीस पत्रात , जागेचा वापर ठराविक कालावधीत केला नाही तर , जागा परत घेतली जाईल असा उल्लेख केलेला असेल , तर भारतीय करारकायदा १८८२च्या कलम १२६ , अन्वये , बक्षीसपत्र रद्द करून , जागा परत देण्याबाबत , दिवाणी दावा दाखल करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय यादव
28-07-2015
sanjay_yadav25@yahoo.com
माजी सैनीकाना मिळालेल्या इनामी जमिनी विकण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी प्रांतअधिकारी यांचे मार्फत काय प्रोसिजर करावी लागेल ? कलेक्टर परवानगी आवश्यक आहे काय ? त्यासठी काय कागदपत्रे लागतील ? कृपया माहिती मिळावी.
Question by क्षिरसागर एम.बी.
28-07-2015
kshirsagar.mahes44@gmail.com
आदरणीय सर,
एखादया जमिनीवर सं. कुळ म्हणून एक व्यक्ती काबीज आहे त्याने त्याच्या नावाची जमीन मुलांच्या नावावर केली. त्या मुलांनी स. कुळ म्हणून वडीलांची नोंद कमी करणे बाबत अर्ज दिलेला आहे. या प्रकरणात काय करावे लागेल या बाबत मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
Pirchase price under section 32 of BTAL act shold be fixed . During the life time of tenant , property cannot be transferredto his heir .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेंद्र शांताराम वतक
28-07-2015
rajendra.vartak2012@gmail.comt
नमस्कार सर जर जमीनीचा सातबारा क नकाशा प्रत ग्रामपंचायत परवानगी तसेच लोखंडी पोल कंपाऊंड आहे. जर तार कंपाऊंड करायचे आहे. . पण शेजारी करून देत नाही तर काय करावे. ..
...
Question by सतिश देगलूरकर
28-07-2015
satishdegloorkar1964@gmail.com
आपला प्रश्न/सूचना ... पंढरपूर मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत सरकारी एअर स्पेस 650 H अशी नोंद केली आहे. तरी ती जागा संस्थान ची आहे ती परत कशी मिळेल ते कृपया माहिती द्या वी. ही विनंती आहे.
The land belongs toGovernment for Air Space .
जागा शासनाने संपादन केलेली असेल . परत मिळणे कठीण
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद शिर्के
27-07-2015
psshirke14@gmail.com
माझे आजोबा यांच्या नावे वडीलोपार्जीत 10 एकर एवढी शेतजमीन आहे. माझे आजोबा ति जमीन माझे वडिल यांच्या नावे न करता थेट माझ्या नावे करण्यास इच्छुक आहेत व माझ्या वडीलांची सुद्धा यास सहमती आहे. मला चुलते वगैरे कोणी नाही.
1. सदर जमीन माझ्या नावावर कशी घेता येईल.
2. त्यासाठी किती खर्च येईल.
3. जमीन किती दिवसात माझ्या नावे करता येईल.
१. आजोबाना बक्षीस पत्र द्वारे आपले नावे करता येयील .
२. मुन्द्रांक शुल्क सध्या माफ करण्यात आले आहे
३ बक्षीस पत्रनोंदणीकृत झाल्या पासून , १५ दिवसात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prasad Salunkhe
27-07-2015
vprasad.161@gmail.com
आदरणीय सर माझ्या पणजोबांची ११० एकर जमीन कोयना प्रकल्पासाठी संपादित झाली आहे. बुडीताचे उतारे काढले असता माझ्या आजोबांचे किवा माझ्या वडिलांचे नाव त्यात दिसत नहि. मला प्रकल्पग्रस्त दाखला काढायचा आहे. त्यसाठी माझ्या सावत्र तसेच सख्ख्या चुलत्यांनी संमती पत्र दिले आहे. पण शासन निर्णयानुसार दाखला नातवा पर्यंत देता येतो. दाखला मिळवण्यासाठी काय करता येइल.
प्रकल्पग्रस्तांची यादी जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयात उपलब्ध असते . ती कृपया पहावी . त्या प्रमाणे प्रकल्प ग्रस्ताच्या दाखल्यासाठी अर्ज करावा . प्रकल्प ग्रस्ताचा दाखला एकदा मिळाला असेल तर केवळ एकदाच तो दुसऱ्याच्या ( nominee ) नावे हस्तांतरित करता येतो . यात स्वतः ,मुलगा ,सून , नातू ,अविवाहित मुलगी , विवाहित मुलगी किवा तिची अपत्ये ,कायदेशीर दत्तक पुत्र या पैकी कुटुंबातील कुणीही एकाला हा मिळू शकतो ..
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by Aishwarya Parchure
27-07-2015
ashiparchure@gmail.com
Where can I get to read information about MPSC exams ?? Can you recommend any site ?
Question by संजय लांजेवार
27-07-2015
sanjul1986@gmail.com
सर,
मी, Sanjay Lanjewar गाव. सिल्ली, Taluka कुही , जिल्हा Nagpur येथील रहिवाशी आहे . मला माझी वडिलोपार्जित जमीन माझ्या नावाने कराची आहे. माझ्या वडिलांच्या हिश्याला आलेल्या जमिनीवर ७/१२ वर माझ्या वडिलांच्या आईचे नाव आहे माझे वडील हयात नसल्यामुळे माझे , माझा भाऊ आणि माझ्या माझ्या आईचे नाव आहे, मला माझ्या आजीचे नाव ७/१२ वरून कमी करायचे आहे तर मी काय करावे.
मला, आजी कडून हक्क सोडण्याचा लेख रजिस्टर करून आजीचे नाव कमीकरता येईल का .
कृपया लवकर उत्तर द्यावे.
Question by Khilari balu sudam
26-07-2015
bkhilari@ymail.com
sir
mi takali haji .taluka-shirur.Dist-pune ya gavcha rahivashi hahe maza adilana maza pahunayni rahanay sathi bigar bhojachi jaga dili hothi attha thy jagevar ghar asun te vadilanchy navavar hahe pan jaga navavar nahi va te jage vale ghar padun taku aase manath hahe yachy sathi kay karava lagel
जागे वर जर घर २० वर्षापूर्वी पासून असेल , तर आपण दिवाणी न्यायालाय्त adverse - possession तत्वानुसार जागा , मालकी आपले नावावर करून मिळण्यासाठी , दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप जोशी
26-07-2015
pradip777123@gmail.com
शासन परिपत्रक क्र. टीएनसी-३००९/९७३/प्र,क्र.३४४/ल-९ दिनांक २७ ऑक्टोबर २००९ (महसूल व वनविभाग) मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ८४ (क) नुसार करावयाची कारवाई याची प्रत मिळावी
Question by narshing
26-07-2015
narshingtugave@gmail.com
Sir mazakde yk aarj aala aahe tyamadhe tyanni dongri dakhlyababt jbab panchname sathi aarj aslyas konte kagdpatr bgayche v dongri dakhala sathi talathi panchnama lagte ka ? Dongri dakhlyasathi kontya g.r.aahe ka ? V rhivasi purava mhnun konte kagdpatr bgayche ? Shidhspstrika ha rhivasi purava nahi mhnun yk g.r.pn aahe tyasathi r rhivasi dakhlyasathi kontya g.r.aahe tyancha no dya.
Question by विपुल naik
25-07-2015
mailvipulnaik@gmail.com
किरण साहेब
मागे दिलेल्या उत्तरासाठी धन्यवाद साहेब मेळा ची फाईल म्हणजे kay
Question by vishal dipak ubhare
25-07-2015
ubharevishal@gmail.com
Sir maja sister ch validity kraych ahe but amcha kde 67 ch maratha asa proof ahe kunbi proof nahi tr yasati kay krav lagel
वैधता समिती , अश्या प्रकरणात , प्रत्यक्ष ग्रह भेट अव्हालावर , विचार करून वैधता प्रमाण पत्र देणे बाबत विचारकरते .
गृह भेटीत
१. आपले सन , व्यासाय - agriculture
2 geneology
yacha abhyas करते
please read Madhuri Patil vs State of Maharashtra
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by chandrakant somwanshi
25-07-2015
vishalkhot47@rediffmail.com
respected sir,
भू संपादने १९६९ त्या नंतर २००६ मध्ये जमीन चे पूर्वीचे मालक यांही तालुका जिल्हा मंत्रालय हि कोर्ट याचे सर्व निकाल भू संपादन कायम ठेवलेला आहे , तरी पण मुल मालकांनी ती जमीन गावातील एका व्यक्तीस राजीस्त्री करून दिली आहे व कलेक्टर साहिबानी त्या वाकातीचा फेर रद्द केला आहे ,पण तरी तो व्यक्ती त्या जमिनीवरील ताबा सोडण्यास तयार नाही. सात बारा वर महाराष्ट्र शाषण याची नोंद असून पोलिस व तहसील कार्यालय याचा सोबत संगनमत करून तो व्यति जमीन सोडण्यास तयार नाही , या साठी आम्ही काय करावे लागेल व तहसीलदार यांचे अधिकार त्या व्यातीस जमिनीतून काढण्यास कलम कोणते वापरण्यात यावे ,या दोन प्रश्नाचे उत्तर मिळावे हि नम्र विनंती .
Tahsildar under section 53 of MLRC can summrarily evict such person
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद शिर्के
25-07-2015
psshirke14@gmail.com
माझे आजोबा यांच्या नावे वडीलोपार्जीत 10 एकर एवढी शेतजमीन आहे. माझे आजोबा ति जमीन माझे वडिल यांच्या नावे न करता थेट माझ्या नावे करण्यास इच्छुक आहेत व माझ्या वडीलांची सुद्धा यास सहमती आहे. मला चुलते वगैरे कोणी नाही.
1. सदर जमीन माझ्या नावावर कशी घेता येईल.
2. त्यासाठी किती खर्च येईल.
3. जमीन किती दिवसात माझ्या नावे करता येईल.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
