जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

जर एका व्‍यक्‍तीला सिलींगमध्‍ये जमीन मिळालेली असेल व तो मयत झाल्‍यानंतर वारसाला मिळते किंवा कसे
मिळत असेल तर कोणत्‍या कलमान्‍वये मिळते व त्‍याची परवानगी कोणाकडे मागावी. क़पया माहिती मिळावी.
वारसाने जमीन हस्तांतरण होताना परवानगीची गरज लागत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
शेत जमीन मोजणी करण्यासाठी अंदाजे किती खर्च येतो
जमीन मोजणी साठी दर हेक्टर प्रमाणे खर्च येतो , त्यासाठी मोजनी किती वेळात{ म्हंजे तत्काळ, मधयम तात्काळ तसेच नियमितपणे ( म्हणजे नंबर प्रमाणे ) } करायची त्याप्रमाणे खर्च येतो , आता साधी मोजणीसाठी अंदाजे ३००० रु, खर्च येतो , अचूक माहितीसाठी तालुका मोजणी .... उपाधीक्षक कार्यालयात कृपया संपर्क करा

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by sachin hatkar
10-07-2015
sachinhatkar121@gmail.com

वाणिज्य वापर बिगरशेती करण्याची पद्धत व त्याचा जी आर
ग्रामपंचायत व नगरपरिषद
म . ज . म. आ १९६६ चे कलम ४२ अ , ४४ वाचा .
बिनशेत नियम हि वाचा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या सातबारामध्ये काही लोकांची नावे आहेत आणि त्या लोकांचा आमच्याशी कुठलाही संबंध नाही तरी ते लोक आमच्यावर हक्क सांगत आहेत . आमच्या वडिलांनी किवा आमच्या काकांनी पूर्वीचे काही लक्षे दिली नाही . पण आत्ता आम्ही या गोष्टी शोधून काढल्या आहेत .त्यावरून असे आढळते कि या लोकांच्या पूर्वजांची नावे १९५८ साली रद्ध करण्यात आली आहेत आणि आमच्या पूर्वजांची नावे त्यांचामधून १९५८ साली रद्ध करण्यात आली आहेत . आणि दोघाच्या मेळाची तारीख ही एकच आहे . आणि तसा १९५८ रोजी चा रद्ध झालेला फेरफार आमच्याकडे आहे. हा फेरफार आधारे आम्ही तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना या लोकांची नावे रद्ध करण्यास सांगितली तेव्हा आम्हाला या फेरफारची मेळाची फ़ाईल तलाठी कार्यालयात चेक करण्यास सांगितली, पण फेरफार क्रमांक २१३६ मेळाची फ़ाईल मिळण्याबाबत तहसील ऑफ़िस व तलाठी ऑफ़िस , तसेच प्रांत अधिकारी यांच्याकडे माहितीचा अधिकारात पाठपुरावा करत आहोत पण आम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाही .
२१३६ या फेरफाराची मेळाची फ़ाईल मिळण्याबाबत तहसील ऑफ़िस व तलाठी ऑफ़िस यांच्याकडे माहितीचा अधिकारात आंम्ही विचारणा केल्यानंतर . आम्हाला ही मेळाची फ़ाईलचा मिळत नाही असे उत्तर लिहून देंण्यात आले आहे . आणि आत्ता अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार वेंगुर्ला ( महसूल ) सावंतवाडी येथे अपील करायला सांगितले आहे .
या मेळाची फ़ाईल बाबत आम्ही दीड वर्षापासून शोध घेत आहोत . पण आम्हाला तेच तेच उत्तर मिळत आहेत .

आज रोजी जमीन आणि घराचा ताबा आमच्याकडे आहे आणि त्याचा दस्त आम्ही पूर्वीपासून भरत आहोत . तरी त्या लोकांची नावे रद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करावे .


दिनेशजी,
काही लोकाची नवे रद्द करण्यात आली . असे आपण उत्तरात नमूद केले आहे . तसेच आपण हे हि नमूद केले आहे कि , आपले पूर्वजांची नवे रद्द करण्यात आली . याचा बोध होत नाही .
आपणास अशे म्हणायचे आहे का , कि, काही लोकाची नवे कमी केली व आपले पूर्वजाची नवे समाविष्ट करण्यात आली .
जर त्या लोंकाची नवे कमी करण्यात आली असतील व तसा फेरफार असेल तर त्याची नसती शोधण्याची आवश्यकता नाही .
फेर्फारच्या आधारे , साम्भांदिताना सुनावणी संधी देऊन , त्याची नवे कमी करता येतील .
आपण प्रांताधिकारी यांना भेटा . आपली व्यथा मांडा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

इतर हक्की आलेले नावे कमी डी एं बोर्डाचा नियमाप्रमाणे .

डी एं बोर्ड म्हणजे कुठले बोर्ड आणि वरील ओळीचा काय अर्थ आहे.

Question by Pradip Boraste
09-07-2015
pradip_boraste@yahoo.com

किरण सर धन्यवाद
१. प्रांत अधिकारी यांचेकडे पुनरीक्षण अर्ज मामालेतदार कोर्ट अक्ट खाली दाखल केला होता परंतु त्यांनी फोर पंचनामा न करता खालील निकाला कायम केला. वास्तस्त्तैती असी आहो की तहसील दार यांनी दखवलेला रस्ता यात आमचे राहतो घर १९६४ चे व दिद्युत खांब १९६४(म.एस.बी. च्या पुरवठा तारखे प्रमाणे ) चा लगत सरकारी पाटची चारि हे आहे त्याचा विचार केला नाही. आज मंड्ल अधिकारी कब्जा दोण्यासटि आले असता त्यांनी जुने राहतो घर पाहून निघुन गेले पण यामुळे माझ्या आजोबाची तब्बोत अत्यावस्त झाली आहे तरी लवकरात लवकर स्टे साठी मी काय करू.
२. मामलतदार केट्र्ट्च्या कलम २३ (२) प्रमाणे जिल्हाधिकारी / प्रांत अधिकारी स्वत:हुन फेर चोकशी करू शकता का.

Question by samadhan
09-07-2015
iamsamg19@gmail.com

नमस्कार सर,
सर माझे आजोबाना ३ मुली व ४ मुले होती.पैकी एक मुलगा दत्तक दिला गेला..(दत्तक दिला गेला) त्यानंतर आजोबांचे मृतुनंतर ३ मुले व ३ मुली यांमध्ये कोर्ट वाटप झाले हिस्से ठरून खातेफोड झाली.
सहा हिस्से होऊन खातेफोड झाली(१९९९ साली).त्यानंतर एका इसमाने प्रत्येक खात्यावर १/७ हिस्सा असि नोंद करून घेतली आहे.फेरफार वर वारस रजिस्टर वरून नोंद असे लिहिले आहे.हा इसम स्वताला माझे आजोबांचे अपत्यांपैकी दत्तक दिल्या घेलेल्या मुलाचा मुलगा आहे असे सांगतो.
१) दत्तक दिल्या घेलेल्या अपत्यांना हिस्सा असतो का?
2) दत्तक गेल्यानंतर कोर्ट वाटप झालेल्या जमिनीला असे हिस्से लावता येतो का ?
3) हि नोंद रद्द करण्यासाठी काय करावे?
कृपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद.
समाधंजी
जी मिळकत दत्तक प्रक्रिया होण्या पुर्ची , दत्तकगेलेल्या मुलाचे नावे झाली असेल , तर ती त्यास मिळण्याचा हक्क आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी ग्राम पंचायत उमेदवारी साठी इच्छुक आहे .पण माझ्याकडे संडास नाही तरी मी निदणूक लढू शकतो का नसेल ;तर कायदा कोणता आहे/ किंव्हा माझा फोरम बाद होईल काय


आपण निवडणूक लढवू शकत नाही , पहा ग्रामपंचायत अधिनियम पाहावा. तसेच याबाबत शासनाने एक परिपत्रक काढले

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

विभागीय चौकशीमध्‍ये सादरकर्ता अधिकारी म्‍हणून वर्ग 3 चा कर्मचारी मंडल अधिकारी किंवा अव्‍वल कारकून यांची नियुक्‍ती करता येते का ? याबाबत शासन निर्णय आहे का ? कृपया माहिती मिळावी विनंती आहे.
मा. जिल्हाधिकारी साहेब , समजा एका गटातील शेत जमीनीचा काही भाग जिल्हापरिषद अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाझर तलावासाठी हस्तांतरित केलाय व त्याच शेत जमिनीतून डांबरी रस्ता गेलेला आहे. त्यासाठीही जमिनीचा काही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरित केलेला आहे. सदरहू एकाच जमिनीचे दोन वेगवेगळ्या कामासाठी हस्तांतरण झालेले असून त्या जमिनीचे मूळ मालक हे मयत आहेत परंतु त्यांच्या पत्श्चात त्यांच्या मुली आहेत पण त्या मुलीही आता वयस्कर असून तर प्रकल्प ग्रास्ताचा लाभ जमीन मालकाच्या दोन नातवांना मिळेल का? तसेच मुख्य प्रश्न असा आहे कि पाझर तलावासाठी हस्तांतरित केलेल्या जमिनीचे व सा. बा. वि . अंतर्गत डांबरी कारणासाठी केलेले हस्तांतरण या दोन वेगवेगळ्या गोष्टींसाठी एकाच जमिनीवर दोन प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र मिळू शकेल का? तसेच पाझर तलावासाठी हस्तांतरित केलेल्या जमिनीचा मोबदला घेतलेला असून मात्र डांबरी कारणासाठी झालेल्या जमीन हस्तांतरणाचे हप्ते मात्र मिळालेले नाहीत तर त्यासाठी संबंधित विभागात जमीन मालकाच्या वारसास (नातवास ) डायरेक नियुक्ती मिळू शकेल का ? पाझर तलावासाठी सन - १९८१मध्ये तर डांबरी रस्त्यासाठी सन - १९७०च्या आसपास जमीन हस्तांतरित करण्यात आलेली असून प्रथम प्राधान्य १९७० कि 1981 च्या जमीन हस्तांतरणाला दिले जाईल कृपया मला हि माहिती कळवावी हि नम्र विनंती .
संपादन ज्या वर्षात झाले आहे त्यावरून , त्यास प्रकल्प ग्रस्त दाखला, १९८० चा शासन निर्णय तरतुदी लागू होतील . या निर्णय नुसार आपणास , दोन दाखले मिळण्यास हरकत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्रामपंचायत उमेदवारासाठी घरी संडास आसने बंधनकारक आहे का असल्यास त्यासंबंधित नियम काय आहे त्याची माहिती देणे .
महाराष्ट्र ग्राम पंचायत कायदा कलम १४ ( ज-५ )

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा किरण पाणबुडे साहेब उपजिल्हाधिकारी भागयया किष्टय्या मंगल्पल्ली व भागाम्मा भागयया मंगल्पल्ली यांना अपत्य १ ते ६ आहेत भागयया किष्टय्या मंगल्पल्ली यांच्या मृत्यू नंतर वारस भागाम्मा भागयया मंगल्पल्ली व त्यांची अपत्य आहेत. १ व्यान्काम्म पोला २ तुकाराम मंगल्पल्ली ३यांकाम्मा संगा ४ यशोदा जिल्ला ५विठ्ठल मंगल्पल्ली ६ नारायन मंगल्पल्ली भागयया किष्टय्या मंगल्पल्ली यांनी वाटणीपत्र केले त्यात १,३,४,त्यांचा वाट ५ व ६ यांना हक्कासोड दिले . १००० २५० x ४ = १००० १) भागाम्मा २) तुकाराम ३)विठ्ठल ४) नारायन यांना प्रत्येकी २५० चौ मी येतात. २) तुकाराम हे व्यापार करत. त्यांनी सावकाराकडे उधारी केली व सावकारांनी राहत्या घरचा ताबा घेतला २ व ३ यांनी बाहेर भाड्याने राहून सावकारांची उधारी फेडली व घर ताब्यात घेतले. १ ने त्यांनी केलेली उधारीवर फेडल्यामुळे हक्कासोड ३ व ४ यांना दिले. १००० १) भागाम्मा २५० चौ मी ३)विठ्ठल २५०+१२५=३७५ चौ मी ४) नारायन २५०+१२५=३७५ चौ मी आता वारस १,३,४ आहेत पण १ चा मुलगा त्या घरात त्यांच्या वडिलांनी हक्कासोड देवून सुद्धा अजून राहत आहे त्या घरचा tax ३ व ४हे भरतात १ यांचा मुलगा बिगर भाडयाने राहत आहे व आजीचा हिस्सा नातू म्हणून मागत आहे तो आम्ही दयाला तयार आहे पण त्याच्याकडे ३०० एवढा जागा ताब्यात घेतला आहे १००० १) भागाम्मा यांचा मृत्य नंतर २,३,४ यांचा वाट येतो म्हणजे २) तुकाराम यांचा वाट त्यांचा मुलास ८४ .३३ चौ मी ३)विठ्ठल यांचा वाट २५०+१२५+८४.३३ = ४५९.३३ चौ मी ४) नारायन यांचा वाट २५०+१२५+८४.३३ = ४५९.३३चौ मी. २) तुकाराम यांचा वाट त्यांचा मुलास ८४ .३३ चौ मी देण्यास ३,४ तयार आहेत पण ३०० चौ मी. चा ताबा देण्यास तयार नाही.३,४ यांचा ताबा मिळण्याबाबत कृपया मार्गदर्शन करावे
कृपया खालील माहिती सादर करा

१. भागय्या व भाग्म्मा यांची एकूण मिळकत कित्ती होती ?

२. सावकारास मिळकत गहन ठेवली होती का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

भूमी अभिलेख कार्लायाकादुने केल्या गेलेल्या हद्द कायम मोजणी मध्ये सातबारा उतरा वरींल क्षेत्रा पेक्षा जास्त क्षेत्र अर्ज दाराला देता येते का

Question by Pradip Boraste
07-07-2015
pradip_boraste@yahoo.com

पूर्वापार वहिवाट रस्ता नसतांना तहीसिलदार यांनी मामलतदार कोटाचा कलम ५ खाली खोटा निकाल द्ल्यास काय करावं .
प्रांत अधिकारी यांचेकडे पुनरीक्षण अर्ज मामालेतदार कोर्ट अक्ट खाली दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by samadhan
07-07-2015
iamsamg19@gmail.com

नमस्कार सर,
माझे आजोबांचे मृतुनंतर कोर्ट वाटप होऊन सहा हिस्से होऊन खातेफोड झाली(१९९९ साली).त्यानंतर एका इसमाने प्रत्येक खात्यावर १/७ हिस्सा असि नोंद करून घेतली आहे.फेरफार वर वारस रजिस्टर वरून नोंद असे लिहिले आहे.हा इसम स्वताला माझे आजोबांचे अपत्यांपैकी दत्तक घेलेल्या मुलाचा मुलगा आहे असे सांगतो.
१) दत्तक घेलेल्या अपत्यांना हिस्सा असतो का?
2) दत्तक गेल्यानंतर कोर्ट वाटप झालेल्या जमिनीला असे हिस्से लावता येतो का ?
3) तलाठी, मंडलाधिकारी किंवा प्रांतअधिकारी यांना असे अधिकार आहेत का?
4) हि नोंद रद्द करण्यासाठी काय करावे?
कृपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद सर माझे आजोबाना ३ मुली व ४ मुले होती.पैकी एक मुलगा दत्तक दिला गेला..(दत्तक दिला गेला) त्यानंतर आजोबांचे मृतुनंतर ३ मुले व ३ मुली यांमध्ये कोर्ट वाटप झाले हिस्से ठरून खातेफोड झाली.तरी कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार,

दोन पेक्षा जास्त अथवा तीन पेक्षा जास्त अपत्ये असणाया शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांस शासकीय सेवेत पदोन्न्ती देता येत नाही या बाबतचा सन 2000 चाशासन निर्णय दिनांक मिळावा हि विनंती अथवा शासन निर्णयाची प्रत इ-मेल आय-डी वर पाठविण्यात यावी हि विनंती.

धन्यवाद
आपणास मेल करण्यात आलेला आहे . मेल डबा उघडून पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्ते, मी सुभाष गलांडे, राहणार वडगाव शेरी, पुणे ता. हवेली. माझे वडील श्री राणू गलांडे व त्यांचे चार भाऊ ह्यांना वडगाव शेरी, विमान नगर, श्री जिम शेजारी २८ घुन्ठे जमीन कुळ म्हणून मिळाली होती. ती जमीन खाली असल्यामुळे त्या जमिनीवर श्री बंब नावाच्या व्यक्तीने गुंडांच्या मदतीने कब्जा केला आहे. तहसीलदार हवेली ने आमच्या नातेवायीकाना ३२ग sartificate दिलेले आहे. श्री बंब ती जमीन हादाप्ण्यासाठी त्यांनी आमच्या नातेवायीकाना लाच देवून ३२ग रद्द करण्यासाठी तगादा लावला आहे पण त्या साठी मी मंजूर नाही कारण मी एक भारतीय नौसेनेचा निवृत्त जवान आहे. मला कोणतीच माझ्या नावावर जमीन नाही आणि मी जमीन विकण्याच्या विरोधात आहे. मी तहसील कार्यालयात केस टाकली आहे पण तहसीलदार साहेबांनी कोणताच निकाल माज्या बाजूने घेतला नाही. तरी मला मदतीची गरज आहे.

आपला विश्वासू,
सुभाष गलांडे
९५४५४५०८०६
३२ ग किंमत आपले नातेवायीकाचे नवे निच्छित केलेली आहे . मग आपला या मिळकतीवर हक्क काय आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

7/12 var navin shart aasa shera aahe . to kothe clear Karun milel.
tasech ya babat kay kay pepar lagtat
नवीन शर्थ म्हणजे , हस्तांतारानास निर्बंध .जमीन शःसन प्रदान असल्यास , आयुक्त यांची परवानगी आवश्यक मात्र शर्थ कायम राहते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by kiran
07-07-2015
kirant.lote94@gmail.com

Sir.mazi jamin 240 gunte ahe .tya madli 40 guntyavr kes ahe.tri mala urvarit. 200 gunte NA Karachi ahe.tr mi karu shkto ka...

Question by samadhan
06-07-2015
iamsamg19@gmail.com

नमस्कार सर,
माझे आजोबांचे मृतुनंतर कोर्ट वाटप होऊन सहा हिस्से होऊन खातेफोड झाली(१९९९ साली).त्यानंतर एका इसमाने प्रत्येक खात्यावर १/७ हिस्सा असि नोंद करून घेतली आहे.फेरफार वर वारस रजिस्टर वरून नोंद असे लिहिले आहे.हा इसम स्वताला माझे आजोबांचे अपत्यांपैकी दत्तक घेलेल्या मुलाचा मुलगा आहे असे सांगतो.
१) दत्तक घेलेल्या अपत्यांना हिस्सा असतो का?
2) दत्तक गेल्यानंतर कोर्ट वाटप झालेल्या जमिनीला असे हिस्से लावता येतो का ?
3) तलाठी, मंडलाधिकारी किंवा प्रांतअधिकारी यांना असे अधिकार आहेत का?
4) हि नोंद रद्द करण्यासाठी काय करावे?
कृपया मार्गदर्शन करावे.
Hindu Adoption and Maintaince Act
पूर्वीच्या उत्तरात कायद्याचे नाव वरीलप्रमाणे आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दत्तक मुलाला सख्या मुला इतकेच हक्क /अधिकार आहेत .
मात्र दत्तक घेणारे वडील/आई यांना , स्वताचा मुलगा, मुलाचा मुलगा अथवा मुलाचा मुलगा व त्याच्घा मुलगा ( मुलगा नातू ) नसावा . आपले प्रकरणात , आपले आजोबाना male अपत्ये किती होती ? जर male अपत्ये असतील तर , पुन्हा मुलगा दत्तक घेत येणार नाही व अशे दत्तक प्रकरण Hindu Minority and Adoption Act नुसार अवैध आहे . अश्या दत्तक मुलास मिळकतीत हक्क राहणार नाही .
ज्या फेर्फाराने दत्तक मुलास हिस्सा देण्यात आला आहे त्यास अह्वानित करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

किरण सर आपण माझ्या प्रश्नांचे उत्तर दिले त्या बाबत मी आपला आभारी आहे परंतु पदवी परीशेस अनुमती बाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाचा शासन निर्णय संकेत स्थळावर टाकण्यात आलेला नाही तरी सदर शासन निर्णय मला माझे मेल वर पाठवावा अथवा तो कुठे मिळेल याबाबत मार्गदर्शन करावे
अस्थापना शाखा , आयुक्त कार्यालय कोंकण महसूल विभाग येथे आपणास हा शासन निर्णय मिळू शकेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नवीन गावठाण विस्तार योजनेद्वारे मिळालेले भूखंड विकत येतात का विकता येत असल्यास कोणाकडे परवानगी घ्यावी लागेल
होय
प्रांत अधिकारी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखादा कर्मचारी माहे सप्टेंबर २०१४ ला नवनियुक्तीने हजर झालेला आहे. आणि त्याने २०१५ च्या मे महिन्यात सलग १ महीना अर्जित रजा घेतली आहे. तरी, सदर कर्मचार्याच्या खाती वर्षाच्या सुरुवातीला अर्जित ३० आणि वैद्यकीय २० अश्या रजा जमा करता येतात का ?
चांगली वेबसाईट अाहे
ईमारत बांधकामात खड़ा खोद्न्यचि तपशील कोणाकडे मागावी
खड्डा खोदण्याची परवानगी नसते . मात्र गौण खनिज , माती , दगड उत्खनन परवानगी घ्यावी लागते .
तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
इमारत बांधकाम परवानगी नियोजन प्राधिकरणा कडून अगोदर प्राप्त करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.40 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3