जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by sujit
22-06-2015
spj100@rediffmail.com

आमची वडिलोपार्जित शेतजमिनीचे वाटप करावयाचे आहे,वडिलांकडून वाटप मुलांकडे करावयाचे आहे त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती मिळावी
तहसीलदारांकडे म.ज.म. कायदा कलम ८५ अन्‍वये अर्ज करावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

जमिनीचे खरेदीखत तयार केल्यानंतर आपण किती वर्षानंतर कामगार तलाठी यांच्याकडे ७/१२ ला नोंद लावू शकतो. त्याबद्दल काही नियम व अटी आहेत का ?
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, कलम 154 अन्वये नोंदणी अधिकार्याने पाठविलेली जमीन हस्तांतरणाची माहिती वगळता इतर बाबींची माहिती (वारस इत्यादी), हक्क संपादन करणार्याने तीन महिन्याच्या आत गाव कामगार तलाठी यांना कळविणे आवश्यक आहे. अन्यथा हक्क संपादन करणारा दंडास पात्र ठरतो.
नोंदणीकृत खरेदी दस्त हा कितीही जुना झाला तरीही त्याची पत/किंमत (Value) कमी होत नाही. तत्कालीन खरेदी देणार याने स्वत:चे नाव 7/12 सदरी अद्यापही तसेच असले तरीही दरम्यानच्या काळात जमीन इतर कोणाला विकली नसेल आणि आजही 7/12 सदरी तत्कालीन खरेदी देणार याचेच नाव असेल तर नोंद प्रमाणीत करता येते.
परंतू तत्कालीन खरेदी देणार याने स्वत:चे नाव 7/12 सदरी अद्याप तसेच असल्याचा गैरफायदा घेऊन दरम्यानच्या काळात जमीन इतर कोणाला विकली असेल तर जुन्या खरेदीदारास त्याचा मालकी हक्क दिवाणी न्यायालयातून शाबीत करून आणावा लागतो.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

शिव रस्ता मोकळा करून (खुला) घेण्यासाठी काय करावे लागेल. कोणाकडे अर्ज सादर करावा लागेल.
माम्लेतदार कोर्ट कायद्या खाली , तहसीलदार यांचे कडे अर्ज करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा..सराना नमस्‍कार ,
सर एखादी महिला कर्मचारी ज्‍याना लागून एक वर्ष झाले आहे .त्‍यांचे रजा खाते 30 दिवस अर्जित रजा शिल्‍लक असताना संबधीत महिला कर्मचारी हे अर्धवेतनी रजा /असधारण रजा घेतली असेल तर अशा वेळी संबधीता कोणताही कर्मचारी यांना वैद्यकीय बिल देय आहे किंवा नाही तसेच असाधारण रजेवर असताना सदर कर्मचारी मयत अथवा सेवा निवृत्‍त झाल्‍या असल्‍यास अशा कर्मचारी यांना वरील सर्व फायदे मिळतात का ?,
नमस्कार साहेब माझ्या वडिलांची खोपडी या गावात शेतजमिन आहे. परंतु ते २००९ साली स्वता घरातून निघून गेले व ते कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही व मी एकटीच वारस आहे. जेव्हा ते निघुन गेले तेव्हा त्यांचे वय ७४ होते आणि ते खूप आजारी होते त्याना टीबी हा आजार होता आजारला कंटाळून निघून गेले आता ते जिवंत आहेत की नाही हे कोणालाच माहीत नाही तर ७/१२ वर माझे नाव लावायचे आहे तर काय करावे लागेल आणी मी पोलिस तक्रार केली नाही कारण ते परत येतील असे मला वाटले होते पण ते आजपर्यंत परत आले नाही आणी आता या गोष्टीला ६ वर्ष झाल्याने पोलिस तक्रार घेत नाही आता मला ७/१२ वर नाव चढवायचे आहे तर काय केले पाहीजे ? कृपया या बाबत मला कायदेशीर मार्गदर्शन करावे ही विनंती.
वडील परागंदा झाल्या बाबत आता , पोलिस ठाण्यात तक्रार द्या .
७ वर्ष एखादी व्यक्ती दिसली नाही अथवा तिचा थांग पत्ता नसेल , तर पुरावा कायद्या नुसार अशी व्यक्ती मयत झाली आहे अशे मानले जाते
आपणास ७वर्षे थांबावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बाकिचे ४मधे २भाउ व २ बहीन आहेत. आणि वादाचे कारन मोठ नाही ते फेमेली मॅटर आहे .आणि हा वाद अजुन तरी न्यायालयात नाही दाखल केला. तर माझ्या आईच्या हिस्सेची जमीन कायदेशीर कशी विकु शकतो त्यांच्या शिवाय मार्गदर्शन करा .
मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलम 44 अन्वये अविभक्त कुटुंबातील एक किंवा अनेक हिस्सेदार आपल्या हिश्याची जमीन विकू शकतात. असा खरेदी घेणार हा खरेदी घेणार्‍याची जागा घेतो.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by ASHISH PATIL
20-06-2015
ashishpatilgeca@gmail.com

शासकीय सेवेत कार्यरत असताना इतर शासकीय विभागात निवड झाल्‍यास राजीनामा द्यावा अथवा कार्यमुक्‍त व्‍हावे यासंबंधी माहीती
कार्यमुक्त व्हावे . सेवा ज्येष्ठ था लाभ मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

भूमी अभिलेख खात्यातील कर्मचारी हे तांत्रिक काम करून देखील त्यांना
तांत्रिक वेतन दिले जात नाही याबाबत शासन स्तरावरून अनेकदा प्रस्ताव मागितले होते परंतु शासन फक्त आश्वासन देते याबाबत आपले मार्गदर्शन व्हावे

शासन सर्वोच्च आहे . आपल्या मागणीचा te लवकर विचार करेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी मौजे येणेरे , ता.जुन्नर . जि.पुणे येथील रहिवाशी आहे तर गट क्र.१४५ मधील १९८० साली ५० - ५० गुंठे अशी जमीन वाटप झाली पण आता आमच्या ७/१२ वर ४८ गुंठे व त्याच्या ७/१२ वर ५२ गुंठे अशी नोंद आहे . कुठेही पोटखराबा नाही व कोणत्यही फेरफार मध्ये कोणतीही नोंद नाही तर आमचे २ गुंठे जमीन परत लावण्यासाठी काय करावे.???
वाटप झाल्या पासूनचे 7/१२ पहा . २ गुंठे तफावत कशी झाली हे तपासा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या आजोबानी ३ गुटे जमीन विकली ती व्यक्ति ६ गुटे वापरते मागीतले तर देत नाही काय करावे
तुमच्या जागेत tresspass kele म्हणून आपण गुन्हा दाखल करू शकता
तसेच दिवाणी दावा दाखल करून , तुमच्या जागेतत्याने वहिवाट करूनये या साठी त्यास मनाई करण्यासाठी दिवाणीदावादाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rajesh
19-06-2015
r.kakare@gmail.com

एका व्यक्तीला (सध्या मयत १९६८ ला )२ बायका आसतील आणि त्या दोन बायकांना प्र्यातेकी ४ न २ मुले आसतील ..तसेच पहिली बायको मयत झाल्यावर(४ मुले आहेत ) दुसरी केली न तिला २ मुली आहेत.(आता दुसरी पण मयत आहे - सन १९८२ ला ). ४ मुले न २ मुली ह्यांची वये अंदाजे ४० ते ६५ मध्ये आसतील.

वारसा हक्क कायदा किंवा हिंदू विवाह कायद्या नुसार वरील वारसांचा वडिलोपार्जित मिळकतीत किती वाटा असेल ??
थोड details मध्ये सांगावे.
धन्यवाद..!
सर्व , ४+२ = ६ वारसांना , समान हिस्सा मिळणार

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, आरोपीची ओळख परेड घेण्‍याबाबतीत उपविभागीय अधिकारी हे कोणत्‍या नियमानुसार व कलमानुसार नायब तहसिलदार यांची नेमणुक करू शकतात या विषयाी मार्गदर्शन होण्‍यास विनंती.
कार्यकारी दंडाधिकारी यांनी ओळख परेड घेण्याची आहे ( उच्च न्यायालय मार्गदर्शक पुस्तिका )
प्रशासकीय आदेशाने प्रांत अधिकारी यांनी नायब तहसीलदार यांची नेमणूक केली असेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by दिलीप Ghule
19-06-2015
dilipg@hotmail.com

माझी जामीन शेजारी असणारांनी कोरली आहे. शेजारी मोठे असल्याने माझे काही समझुन घेत नाहीत . मला काय केले तर माझी जामीन मला मिळेल.
आपण आपल्या jaget शेजारील शेतकर्याने अतिक्रमण केले आहे va ते दूर करून देण्याबाबत शेजारील शेतकर्यास हुकुम / आदेश देणे करणे करिता दिवाणी दावा दाखल करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर ग्राम पंचायत ने महसुलची खाली जागा बांधकाम करण्यासाठी मागीतली़, त्यांना कोणत्या GR नुसार जमीन हस्तांतरित करता येईल, व त्याच्यावर फी,दर लावायचे का? GR परीपञक कृपा करून सांगावे,
जमीन शासनाकडून हस्तांतरण होते .
जिल्हाधिकारी यांचे कडून आयुक्तामार्फात शासनास अह्व्हाल saddar केला जातो . नंतर जमीन हस्तांतरित होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जिल्हा परिषदेचा कर्मचारी हा शासकीय असतो की निमशासकीय असतो?
प्रिय सर,
नमस्कार!
पूर्वी सरनिखर पद्धतीने शेत जमिनीचे वाटप वडीलधारी मंडळी हलकी व भारी जमीन हा एकमेव निकष लावून कमी जास्त जमीन मुलांना वाटप केली जात होती. वडिलोपार्जित मिळालेल्या जमिनीवर २ ते ३ पिढ्यांपासून हमिनी कसत आहेत. त्यांच्यामध्ये आजतागायत कोणताही वाद नाही. परंतु ७/१२ नुसार सर्वांचे क्षेत्र कमी जास्त प्रमाणात व प्रत्यक्ष वाहिवाटीतील जमिनीनुसार न लागता सारख्याच पद्धतीने लागलेले आहे. अजूनही जमिनीच्या गटाची मोजणी झालेली नाही. परंतु मोजणी झाल्यावर मोठे वाद निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी व प्रत्यक्ष कसत असलेली जशी आहे तशी जमीन प्रत्येकाच्या नावे लागण्यासाठी/ ७/१२ दुरुस्त होण्यासाठी मार्गदर्शन व कायदे व नियम काय आहेत याची माहिती मिळावी,
आपण कसत असलेले क्षेत्र भूमी अभिलेख खात्याकडून मोजणी होणे आवश्यक . मोजणी प्रमाणे वाहिवातीखालील क्षेत्राचा ७/१२ , आकार्फोड पत्रक प्राप्त झाल्यावर होईल .
बिगर मोजणी , कसत असलेलेक्षेत्र कसे समजून येणार ?

आपण कसतअसलेले क्षेत्र मोजणीकरून घ्या . हा एकाच उपाय आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
मी आपणास दिनांक १२/०६/२०१५ रोजी वाढीव गावठाणातील शिल्लक प्लॉटबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले त्याबद्दल मी आपला आभारी आहे .
सदर वाढीव गावठाणातील शिल्लक प्लॉट घेणे साठी मा. प्रांताधिकारी यांचेकडे अर्ज करताना त्या सोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागतील या विषयी माहिती मिळावी .
तसेच सदर प्लॉट मिळताना काही प्राधान्यक्रम आसतो असतो का ? सदर प्लॉट कोणाला मिळू शकतो ? या विषयी माहिती मिळावी . ही नम्र विनंती.
आपण त्या गावाचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक
प्रथ्य्मया क्रम nahi

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by nilesh furade
18-06-2015
nileshfurade@gmail.com

Amchya ajobani x ya vktila 3.5 Gunte jamin vikli ti vkti 6 gunte vaprte 4 Gunte var ghar janvarasati gota ahe 2Gunte khule ahe magitle tar det nahi kay mi kay karave manje ti jamin mala milel

Question by nilesh furade
18-06-2015
nileshfurade@gmail.com

Amchya ajobani x ya vktila 3.5 Gunte jamin vikli ti vkti 6 gunte vaprte 4 Gunte var ghar janvarasati gota ahe 2Gunte khule ahe magitle tar det nahi kay mi kay karave manje ti jamin mala milel
सर
माझे गाव सावंतवाडी येथे आमची वादिलोन्पार्जीत जमीन आहे परंतु त्यात माझ्या आजोबांचे व वडिलांचे नाव नाही आहे ती जमीन आमच्या पंजोबाच्या नावावर पहिली होती नंतर त्यांच्या दोन मुलांचं नावावर झली पाहिझे होती परंतु माझे आजोबा हे कामानिमित मुंबईला आलेहोते त्यामुळे त्यांचा मोठा भाउ त्यांचे नाव ७\१२ मध्ये टाकणार नाही यांची त्यांना माहिती देखील न्हाव्ह्ती तर साहेब माझ्या आजोबांचे नाव त्यांनी ७\१२ मध्ये टाकले नाही तर माझ्या चुलत आजोबांच्या मृतुनंतर हि जमीन व त्यांचं मोठ्या मुलाचं नावर झालेली आहे तर आम्हाला देखील आमचे नाव ७\१२ मध्ये नोंदवायचे आहेपरंतु माझे चुलत काका प्रतिज्ञा पत्र detnahi तर साहेब आम्हाला काय करावे लागेल याचे उत्तर मलू शकेल का
आपण प्रांताधिकारी सावंतवाडी यांचेकडे ज्या फेर्फाराने केवळ चुलत आजोबांचे नाव दाखल करण्यात आले आहे त्या फेरफार नोंदिविरुद्ध अपील करा .
आपणास पणजोबांचे कोण कोण वारस होते हे दाखवून द्यावे लागेल


Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vipulnaik
17-06-2015
mailvipulnaik@gmail.com

सर
मला आमच्या खाते क्रमंक २७६ च्या दोन पिद्धायंचा फेरफार व ६ क ची माहिती कोणाकडे मागता येईल तलाठ्या कडे मागितली तर त्यांनी असे उत्तर दिले कि २००९ ला गावल पूर आलेला तर त्यात रेकॉर्ड सगळे वाहून गेल माघ मला कोणाकडे माहिती मिळेल .......साहेब आपण मला सहकार्य करा
सर..सात बारा त देवस्थान सस्थेच नाव असुन ईतर आधिकारात कुळाच्या नाव असुन त्याचे नावे खरेदीची किमत होइल का?
जर देवस्थान मुंबई सार्वजनिक न्यास कायद्याखाली नोंदणीकृत नसेल व न्यासाचे सर्व उत्तपन्न धर्मादाय कामासाठी वापरले जात नसावे
जिल्हाधिकारी यांनी अश्या न्यायासास , ३२ कलम व त्या खालील उप कलम या असून सूट , अशे प्रमाणपत्र दिलेले नसावे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, मी सुनील मारुती वडघुले राहणार मौजे टाकळी भीमा ता. दौंड जिल्हा पुणे येथील माझे पंजोबा श्री.नामदेव तुळशीराम वडघुले यांना २४ एकर शेतजमीन वडिलोपार्जित होती. त्यांना तीन मुले होती त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत श्री. केरु नामदेव वडघुले , श्री.बाजीराव नामदेव वडघुले , श्री. आनंदराव नामदेव वडघुले . त्यांना वारसा हक्का प्रमाणे प्रत्येकी आठ एकर जमीन वाट्याला यायला पाहिजे होती परंतु त्यांचे शेतजमिनीचे वाटप चुकीच्या पद्धतीने झाले आहे . श्री. केरु नामदेव वडघुले यांना ७.५० एकर, श्री. बाजीराव नामदेव वडघुले यांना ७.५० एकर, श्री. आनंदराव नामदेव वडघुले यांना ९ एकर असे वाटप १९८५ साली झाले. माझे वडील श्री. मारुती बाजीराव वडघुले नौकरी मुळे बाहेरगावी होते. वडिलांचे चुलते श्री.केरु नामदेव वडघुले आणि आजोबा श्री.बाजीराव नामदेव वडघुले याचे शेतजमिनीचे वाटप होण्याअगोदर निधन झाले. वडिलांचे चुलतभाऊ श्री. नानासाहेब केरु वडघुले हे श्री. केरु नामदेव वडघुले यांचा मुलगा हे पुणे येथे सर्वीसला होते हुशार होते त्यांनी त्यांच्या अक्कल हुशारीने जमिनीचे तिघा भावांना चुकीचे वाटप केले आहे . श्री. आनंदराव नामदेव वडघुले यांना स्वताचे कोणीही वारसदार नाही. श्री.आनंदराव नामदेव वडघुले हे वयस्कर अडाणी होते जमिनीचे वाटप झाल्यानंतर एक महिन्याच्या थोड्याच कालावधी मध्ये वडिलांचे चुलतभाऊ श्री.नानासाहेब केरु वडघुले यांनी, श्री. आनंदराव नामदेव वडघुले यांची ९ एकर शेतजमीन स्वतःच्या बायकोच्या सौ.सरस्वती नानासाहेब वडघुले हिच्या नावावर १५०००/- रुपयाचे खरेदी खत करून १९८५ साली विकत घेतली ही जमीन ही एकत्र कुटुंबातील होती. ही जमीन वडिलोपार्जित होती. आणि हे खरेदी खत करताना कोणत्याही भावांची ही समंती घेतली नाही तलाठ्याने फेरफार ची नोंद करताना कोणाही नातेवाईकाला कळवले नाही त्यामुळे आमची फसवणूक केली आहे . व परस्पर सह्या /अंगठे घेतले आहे . ही वडिलोपार्जित जमीन आहे आणि त्यांनी स्वकमाईतून घेतली नाही. त्यामुळे श्री. आनंदराव नामदेव वडघुले यांना ती जमीन परस्पर सौ.सरस्वती नानासाहेब वडघुले खरेदी खत करून विकली. जमिनीचे समान वाटप झाले नसल्यामुळे श्री. आनंदराव नामदेव वडघुले यांना खरेदी खत करण्याचा आधिकार राहत नाही . व त्या जमिनीवर आमचा श्री.बाजीराव नामदेव वडघुले यांच्या वारसदारांचा ही समान अधिकार आहे. त्यामुळे ९ एकरांचे समान वाटप प्रत्येकी ४.५० एकर श्री. केरु नामदेव वडघुले आणि श्री.बाजीराव नामदेव वडघुले यांच्या वारसदारा मध्ये होयाला पाहिजे. ही बाब आम्हाला सातबारा आणि फेरफार उतारे पाहिल्यानंतर लक्षात आली आहे . आमच्या शेतजमिनीचे वाटप चुकीचे झाले आहे आणि हे वाटप रजिस्टर्ड पद्धतीने झाले नाही साध्या अर्जावर तहसीलदार कडे अर्ज करून १९८५ मध्ये झाले आहे . यासाठी मला काय करावे लागेल यासाठी आपण चांगला सल्ला द्यावा ही विनंती .
तहसीलदार यांनी कलम ८५ अन्वय वाटप केले असल्यास , त्या विरुद्ध प्रांताधिकारी यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी तालुका सावंतवाडी,गाव माडखोल मेटवाडी येथे खाते क्रमांक २७६ येथे माझ्या सासऱ्यांची वेडिलोनपार्जीत शेत जमीन आहे .शिवराम दाजी नाईक ,त्यांची दोन मुले नारायण शिवराम नाईक व अर्जुन शिवराम नाईक .शिवराम दाजी नाईक याचं मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे वारसदार महणून त्यांची दोन मुले होती नारायण शिवराम नाईक व अर्जुन शिवराम नाईक तर नारयण नाईक ह्यांनी अर्जुन नाईक हे कामानिमित मुंबईला जात येत राहिल्याने अर्जुन नाईक यांच्या शेत जमिनीवरील नाव नसल्याचे त्यांच्या ध्यानात नाही आले ,नारायण हा मोठा भाव असल्यामुळे तो शेत जमिनीत अर्जुन नाईक याचं नाव नोंदवणार नाही यांची त्यांना जाणीव न्हवती अर्जुन नाईक हे वेळोवेळी गावाला घरासाठी व शेती साठी पैसे पाठवत होते कालांतरान नारायण नाईक हे मृत्यू झाले त्या नंतर त्यांचा मोठा मुलगा शिवराम नारायण नाईक व परशुराम नारायण नाईक याचे नाव खाते क्रमांक २७६ या मध्ये त्यांनी आपली नाव नोंदवली. शिवराम नारयण नाईक यांचे देखील दोन मुले आहेत व अर्जुन शिवराम नाईक यांची देखील दोन मुले आहेत विजय अर्जुन नाईक व अंकुश अर्जुन नाईक परंतु शिवराम नारयण नाईक यांनीही देखील आपल्या चुलत भावांची नाव टाकली नाहीत ,अर्जुन नाईक यांचा देखील मृत्यू झाला आहे , तर अर्जुन शिवराम नाईक हे माझे सासरे त्यांच्या वेडिलोनपार्जीत शेत जमिनीत नाव नोंदवायचे आहे माझे पती विजय अर्जुन नाईक हे देखील ५ डिसेम्बर २०१५ रोजी मृत्यू पावले आहे तर माझ्या पाश्च्यात मला माझ्या मुलांच्या भवितव्याचा व त्यांच्या भविष्य साठी नाव नोंदवायचे आहे .आमच्या गावचा कुटूब प्रमुख म्हणून माझ्या चुलत मोठ्या दिराचे ,व त्याच्या भावाचे व बहिणीची नाव लागली आहेत तर मला माझे नाव नोंदवण्यास आपण सहकार्य कराल अशी अशा बाळगते .
शिवराम नाईक मयत झाल्यावर , केवळ नारायण नाईक यांचे नाव ज्या फेर फाराने दाखल झाले त्या विरुद्ध , प्रांताधिकारी यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शिवराम नाईक मयत झाल्यावर , केवळ नारायण नाईक यांचे नाव ज्या फेर फाराने दाखल झाले त्या विरुद्ध , प्रांताधिकारी यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ankush mane
15-06-2015
ankush098@hotmail.com

वाटणी पत्र न होता ७ / १२ वरील नाव असलेला व्यक्ती इतर नाव असलेल्या लोकांचे परवानगी शिवाय जमीन विकू शकतो ?

जर दस्त केला असेल तर त्यास हरकत घेता काय? कोणाकडे.घ्यावी?
ज्या व्यक्तीने जमीन विकली आहे त्याने त्याचे मालकीचे क्षेत्र विकले असल्यास , हरकत घेण्याचा रशना उद्भवत नाही

उ. दा
७/१२ वर तीन लोन्कांची नावे आहेत .प्रत्येकाचे क्षेत्र विभागणी झाली आहे . त्या एकी एकाने विकल्यास , अन्य दोघांना हरकत घेण्याचा रशना उद्भवत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.28 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3460
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3