जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

मा. महोदय,
एका जमिनीच्या ७/१२ वर कायम कुळाचे हक्क आहेत व त्यांचे वारस नोदले आहेत. जमीन धारक / जमीन मालक हयात नाही व त्याचेही वारस ७/१२ वर नोंदले आहेत. जमीन धारकाच्या काही वारसांनी अन्यत्र दूरच्या शहरात राहणारे इतर वारस मयत झाल्यावर २०१३ साली खोटे प्रतिज्ञा पत्र देऊन ७/१२ चे फेर-फार केले. सदर प्रतिज्ञा पत्रात त्यांनी असे लिहून दिले की मयत वारसदारांना मुले नव्हती. त्यामुळे मयत वारसांच्या मुलांची नावे ७/१२ मधे आली नाहीत. त्या नंतर ७/१२ वरील कुळाचे ४ पैकी ३ वारस व जमीन धारकाचे ७/१२ वरील दाखवलेले असलेले वारस यांनी एकत्रितपणे खरेदी खत करून जमीन एका त्रस्थास विकली जो शेतकरी असल्याचे त्याच्या स्वतःच्या अन्य जमिनीच्या ७/१२ नोंदी नुसार दिसून येते. कूळ व जमीन धारक यांच्या सही करणारया संबंधित वारसांना म्हणजे एकूण १०-१२ लोकांना प्रत्येकी दीड लाख रुपये चेकने व सुमारे तितकेच रोखीने दिले गेले असे खरेदी खतात नोंदले आहे. सदर व्यवहार सप्टेंबर २०१४ मधे झाला आहे. दिलेले चेक वटले आहेत. जमिनीचा सदर व्यवहार सरकारी दराच्या अर्ध्या दरात झाला.
त्या नंतर त्या दोन त्रयस्थ खरेदीदारानी २ महिन्यात सदर जमीन अन्य शेतकरी नसलेल्या विकासकास दुप्पट भावा पेक्षा जास्त भावाने विकली. मात्र एका कुळाच्या वारसदाराची प्रथम खरेदी खतात लेखी सहमती / अनुमती घेण्याची राहिली असल्याने त्याला पुढील म्हणजे दुसर्‍या खरेदी खतात १०,०००/- रुपये देऊन विक्रेता म्हणून सदर दोन त्रयस्थां सोबत सामिल केले गेले. सदर दुसर्या खरेदी खताचा व्यवहार नोव्हेंबर २०१४ मधे झाला आहे.
अशा प्रकारे पहिल्या व दुसर्‍या अशा दोन्ही खरेदी खतात कुळासाठी अनेक किंवा १ वारसदार विक्रेते म्ह्णून नोंदणीत आले.
दोन्ही खरेदी खते सर्व स्पोस्कार जसे - स्टॅंप ड्यूटी रजिस्ट्रेशन फी इत्यादी पार पाडून नोंदविली आहेत.
कूळ कायद्यतील सदर जमीन ग्राम पंचयत हद्दीत आहे व ते गाव नगर पालिका / परिषदेच्या हदीत जाणार आहे असे कळले आहे पण अद्याप तसे झालेले नाही.
कुळ कायदा अथावा BOMBAY TENANCY AND AGRICULTURAL LANDS ACT मधील कलम ३२-ग नुसार एकतर कूळ जमीन धारकाची जमीन खरेदी करते व मालक बनते. किंवा कलम १५ नुसार कूळ आपले अधिकार सोडून देते व जमीन पुन्हा जमीन धारकास परत मिळते. म्हणजे कूळ कायद्यातील जमीन जमीन धारक व कूळ यांना एकत्रितपणे खरेदी खतेने विकताच येणार नाही हे सदर कायद्या नुसार दिसते.
मात्र सदर जमीन विकण्या पुर्वी BOMBAY TENANCY AND AGRICULTURAL LANDS ACT कलम १५ अथवा ३२-ग नुसार प्रक्रिया झालेली नाही, पण त्यातील एक प्रक्रिया तरी होणे गरजेचे होते काय ?
किंवा सदर जमीन विकण्या आधी मा. जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेणे आवश्यक होते काय ?
सदर कायद्यातील कलम ८४-क नुसार कलम ६४ सह दोन्ही खरेदी खत रद्द होतील काय ? होत असल्यास त्याला किती काळ जातो?

कपया मार्गदर्शन करावे.

आपला कृपाभिलाषी
अभिमन्यू यशवंत अळतेकर
मुंबई कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ हा , कसेल त्याची जमीन या तत्वावर आधारित आहे . कुळाचे सौरक्षण करणे , कुळाचे हित या कायद्याने पहिले जाते

मात्र या प्रकरणात , कुल व मालक यांनी संमतीने त्रयस्त व्यक्तीस जमीन विकली आहे . कुल व मालक यांना , मोबदला मिळालेला आहे .
कुल व मालक यांनी , ३२ ग किंमत निच्छित होण्याचे अगोदर , जमीन एकत्रित विकण्यावर , उपरोक्त कायद्या अंतर्गत बंधन नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१. जर एखादा महसूली कर्मचारी (लिपीक)एस.एस.डी परीक्षा तीन वर्षात व तीन संधीत उत्‍तीर्ण झाला नाही तर त्‍याची ज्‍येष्‍टता खाली जाते का ?
२. जर एखादा महसूली कर्मचारी (लिपीक) याने एस.एस.डी. परीक्षा तीन वर्षात पण चौथ्‍या किंवा पाचव्‍या संधीत उत्‍तीर्ण झालेस त्‍याच्‍या ज्‍येष्‍टतेवर काय परिणाम होतो ? कृपया माहिती मिळावी हि विनंती
प्रथम माझी ओळख करून देतो . माझे नाव अनंत जयराम झेपले . माझ्या वडलांनी असुर्डे - kutare , चिपळूण या गावी सन २००७ मध्ये श्रीमती भारती बळीराम महाडिक यांच्याकडून 18 गुंते जमीन विकत घेतली , पण वडिलांनी त्यावेळी 7/12 वर "तुकड्या विरुद्ध व्यवहार " हे पेन्सिलीन लिहिलेले बघितले नाही आणि श्रीमती. बळीराम महाडिक ह्यांनीही कडी सांगितले नाही . वडिलांनी त्यांच्याबरोबर व्यवहार पूर्ण केला . वडील जेव्ह्या जेव्ह्या जमीन नावावर करायला चिपळूण ला गेले ठेव्हा तेतील अधिकार्याने त्यांना हा मुधा सांगितला कि जो पर्यंत हे तुमच्या 7/12 वरून काडला जात नाही तो पर्यंत तुमच्या नावावर जमीन होऊ शकणार नाही . त्यानंतर ते kadnyasati भरपूर खेपा घातल्या परंतु योग्य margadarshan milal nahi. vadlana 5 varshyapurvi lakava marlyamule te gavi jau shakale nahi aani aamhala gavchya ya gosti badal jast mahiti naslyamule aamhi chokashi karunahi aamhala pan tech uttar milal je vadlana milal.

Tyamadhe jamin malak mahnto ti jamin tumhi tumchya navavar kara mi tumachya kharedi khatavar sahi karto. Pan khardi khat karnyasathi aadhi 7/12 navavar karayala lagato. Tyamadhe to kahihi madat karnar nahi ase mahnato.

Tyamule mazi aapnas vinatee aahe ka aapan mala yavar kahitari todga sangava jene karun yevadya varshya pasun pending aslel kam purn hoiel aani ti jamin aamchya navavar hoiel.

Applyala aankhi mahiti havi aslyas tase sangave.
खरेदी केलेली जमीन , भातशेती / बागायत / जिरायत या कोणत्या सदराखाली येते ?
७/१२ वरील पिक पाहणी पाहून सांगा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by devendra
12-06-2015
aaryatandel82@gmail.com

सर
सर्वे ४५ हिस्सा २ चे १९३२ साली २ ए ११गु व खराब ३ गु आहे त्यातील १ए भात व १एक ११गु केली . १९५६ साली आकार्फोड झाल्याचा उलेख ७/१२ वर आहे परंतु आज ७/१२ वरील क्षेत्र ९३.८ गु व खराब ३ गु आहे परंतु आकारबंद मात्र ५२.२ गु व खराब ३ गु आहे सदर जमिनीचा नकाशा ५२.२ गु असून गाव नकाशात सदर जमिनीच्या बाजूला असलेले क्षेत्रास कोणताही सर्वे नंबर नाही तेव्हा माझा प्रश्न आहे कि ७/१२ वरील क्षेत्र व आकार बंद यातील कोणते क्षेत्र ग्राह्य धरावे
जमिनीचे वाटप झाले असून ७/१२ प्रमाणे जमिनी ताब्यात नसून, एक गटाच्या लागवडीच्या जमिनी ताब्यात आहेत व वर्कसाची वाटणी झालेली नाही फक्त ताब्यात आहे, सर्व जमिनीचे ताब्या प्रमाणे ७/१२ बनवायचे असल्यास काय करता येईल? स्टम्प डूटी, रजिस्ट्रशेन लागू होईल का? जमीन वडलोपर्जित आहे , हक्कासोड पत्रक केल्यास चालू शकेल का त्यास काय खर्च येतो?
नमस्‍कार सर
पतीच्‍या नावाने 4 एकर व पत्‍नीच्‍या नावाने 4 एकर जमीन असल्‍यास पती (अर्जदार) यांना अप्‍लभूधारक प्रमाणपत्र देता येईल का ?
नवीन भू संपादन कायद्यानुसार
१. अल्पभूधारक - ज्याचे नावे / कुटुंबाचे नावे, जिरायत ५ एकर जिरायत अथवा २.५एकर बागायत आहे
२ . अत्यल्पभूधारक म्हणजे - ज्याचे/ कुटुंबाचे नावे १.२५ एकर बागायत शेती अथवा २.५ एकर शेती जिरायत आहे

शेती स्वरूपावरून ठरवा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by devendra
12-06-2015
aaryatandel82@gmail.com

सर
एखाद्या जमिनीस १९३२ साला पासून फळ पिक घेत असल्यास सदर जमिनीस कुल १९५७ सालापासून कुल नोड असल्यास आता जमीन मालक कुल कमी करण्यासाठी अर्ज करू शकतो काय
कलम ३१ खाली , ( कलम ३१ अ ला अधीन ) स्वत कसण्यासाठी अथवा बिन शेती साठी , मालक अर्ज करू शकतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आईच्या वडलोंपर्जी जमीन आहे. माझ्याआईच्या हिस्सेची जमीन विकने आहे पन बाकीचे ४ जनांसोबत वाद आहेत तर मी आमच्या हिस्सेची जमीन विकू शकतोका ? आणि ते सुधा विकू शकतील का त्यानच्या हिस्सेची कारन आमचे वाद आहे तर त्यांच्या शीवाय कशी विकु शकतो आमच्या हिस्सेची जमीन ?
बाकीचे ४ लोक कोण आहेत ?
वादाचे स्वरू काय आहे
वाद न्यायालयात प्रलंबित आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या वडिलांनी १९८३ ला खोपोली येथे घर बांधणी साठी जागा विकत घेतली.आणि १९८६ ला घर बांधून पूर्ण झाले.ते अडाणी होते त्यांना माहित नव्हते कि ती जागा ग्रीन झोन मध्ये येते.तर आता आम्ही अलिबागला सदर केस हरलो.कारण आमच्या वकिलांनी आम्हाला फसवल.ते केस ला हजारच झाले नाहीत आणि आम्हालाही काही हजार राहायला सांगितले नाही.पण आमची केस आता मुंबईला कोकण आयुक्तांकडे चालू आहे.तसेच सदर व्यक्तीने हायकोर्ट मध्ये नगरपालिके विरुद्ध केस लावली व तो ती केस जिंकला आहे.पण नगरपालिकेने आमच्या घराविरुद्ध नो ओबजेक्षण घेतले आहे.तर सदर बाबतीत मला मार्गदर्शन करावे.व ग्रीन झोन विषयी माहिती द्यावी हि विनंती.
हरित क्षेत्रात , घर बाधले म्हणून , अलिबाग येथे कोणत्या न्यायालयात दावा चालू होता ?

सदर व्यक्ती कोण ? त्याने नगरपालिके विरुद्ध दावा दाखल करण्याचे कारण काय ?

विस्तृतप्रश्न मांडा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या गावांमध्ये मा .जिल्हाधिकारी सॊ .यांनी सन १९८१ मध्ये गावठाण विस्तार योजने अंतर्गत प्लॉट पाडून कबजेपट्टी करुन दिली आहें .
सदर योजनेमधील काही प्लॉट शिल्लक आहेत. सदर प्लॉट घेणेसाठी काय करावे लागेल. या विषयी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आपण प्रांत अधिकारी यांचे अर्ज करा
आपणास , भू खंडाची कब्जे हक्काची रक्कम भरावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
आमच्या गावांमध्ये मा .जिल्हाधिकारी सॊ .यांनी सन १९८१ मध्ये गावठाण विस्तार योजने अंतर्गत प्लॉट पाडून कबजेपट्टी करुन दिली आहें .
सदर योजनेमधील काही प्लॉट शिल्लक आहेत. सदर प्लॉट घेणेसाठी काय करावे लागेल. या विषयी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
प्रांताधिकारी यांचे कडे अर्ज करा
प्लॉट ची बाजार मुल्य किंमत भरावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या वडिलांनी 1987ला 42गुंठे जमिनी खरेदी केली होती. त्यात21 गुंठे बागायत व 21गुंठे खराबा.परंतु आताच्या 7/12 मध्ये फक्त 21गुंठे येते.21गुंठे खराबा नोंद नाही.त्या नोंदी साठी काय करावे लागले?
पूर्वीचे फेरफार पहा
जमीन घेतानाचा , ७/१२ आपले संग्रही असल्यास तपासून पहा

आपण कथन केल्याप्रमाणे वस्तू स्थिती असेल तर जुन्या फेरफारावरून , कमी झालेले क्षेत्र तफावत दिसून येयील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या वडिलांनी आजोबांच्या नावावरील जमीन
१९५५ साली विकली. नंतर १९६० साली दुसरी जमीन घेतली . तर १९६० साली घेतलेली जमीन
स्वकस्तर्जित आहे की वडिलोपार्जित ?
स्वकस्तर्जित व वडिलोपार्जित म्हणजे काय सविस्तर उत्तर द्या plz.
आपले प्रश्नात उत्तर आहे .
स्वकष्टार्जित म्हणजे , स्वताचे पैस्याने , स्वतासाठी खरेदी केलेली जमीन
मात्र आपले वडिला shivay , आजोबांना अन्य वारस कोण होते / आहेत .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी या अगोदर प्रश्न विचारला आहे कि माझे पती यांना वडील नसल्या कारणाने वारसा हक्काने जमीन मिळाल होती सदर जमिनीमध्ये त्यांच्या बहिणीची वारस म्हणून नवे नाहीत व जमीन विकली आहे मंझे त्यांच्या चुलत भावाने ती फशवून घेतली आहे व त्यामध्ये बहिणी यांच्या सह्या नाहीत तर त्यामध्ये बहिणीच्या सह्या लागतील का आणि त्या हक्क मागू शक्ताल का कृपा करून सर मला याचवर उपाय सांगा माझ्या अगोधारच्या प्रश्नाची उत्तर दिले मी आपली आभारी आहे
नमस्कार सर
मी एका सहकारी पतपेढी मध्ये नोकरीस आहे. आमच्या संस्थेत तारणी कर्ज वितरित करीत असतात त्या कर्जासाठी तारण मुल्याकन कर्ज रकमेच्या दुप्पट असणे आवश्यक असते. त्यामध्ये मुख्य तारण महणून बांधीव अथवा एन अ प्लॉट कि ज्याचे मुल्याकन कर्ज रक्कम इतके असावे व उर्वरित तारण शेतजमीन असावी अशी कार्यप्रणाली आहे. परुंतु ग्रामीण भागामध्ये मुख्य तारण बांधीव अथवा प्लॉट याचे मुल्याकन कर्ज रक्कम इतके मिळत नाही परंतु शेतजमिनीचे मुल्याकन मिळते. त्यामुळे सहकारी पतसंस्था यांना तारणी कर्जासाठी फक्त शेतजमीन तारण घेता येतील का व भविष्यात सदर कर्ज थकित घेल्यास कर्ज वसुली करिता काही अडचणी निर्माण होतील का व पतसंस्था यांना शेतजमीन तारण घेनेस जिल्लाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे का याबाबत कृपया याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती
जी जमीन तारण म्हणून दिलेली असेल व ती शाश्नाने कर्जदारास दिलेली नसेल तर , जिल्हाधिकारी यांचे परवानगीची गरज नाही
मात्र तारणम्हणूनदिलेली जमीन जर शासनाने दिलेलीअसेल , तरत्यास जिल्हाधिकारी/ आयुक्त/ शासन यांची पूर्व परवानगी लागेल
शासनाकडून , माजी सैनिक , स्वातंत्र सैनिकयांना वइतर यांना शेती करण्यासाठी , गृह बांधकामासाठी जागा दिली जाते . अशी जागा तारण, गहन ठेवण्य पूर्वी परवानगीघेणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्‍कार सर,
उत्‍पंन्‍न प्रमाणपत्र व रहिवाशी प्रमाणपत्र देण्‍याबाबत निकष काय आहेत. त्‍या बाबत शासन निर्णय आहेत काय ?

Question by shantiram
08-06-2015
sgksdm123@gmail.com

I want the recruitment rules of revenue department.
भरती नियम महसुल विभागाचे असे नसते ......महसुल विभागातील वेगवेगळ्या प्रवर्गाचे /पदाचे ( उदा . तलाठी , तहसीलदार )वेगवेगळे भरती नियम असतात

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या आईचे मामाने हक्कसोड पत्र फासुवून घेतले आहे, आई निरक्षर आहे, तर हक्कसोड पत्र बाद करता येते का ?
दिवाणी न्यायालयात दावा करणे योग्य होईल

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

भोर तालुका वर्वे (खुर्द) गट नं.१८मधे २५गुंटे जमीन आहे. त्यामधे ६हिस्से माझया आईचे २भाउ व २बहीन व माझी आज्जी. माझया आईच्या(अंजना अशोक शेलार) वडलोंपर्जी जमीन २००१ साली विकली आहेअसे आत्ता मला समजले असता मी तो दस्त काढला दस्तामधे मुखत्यार पत्र दिले आहे असे दुय्यम निंबधक भोर या कचेरितून सांगितले पण अशा कोणत्याच पत्रावर सही अथवा अंगठा दिलेला नाही आणि मी त्या मुखत्यार पत्राची प्रत मागितल्यावर देत नाही. कारण जे मुखत्यार पत्र आहे ते अनरजिस्टर आहे असे दुय्यम निंबधक भोर येथील कर्मचारी सांगतात म्हणून मुखत्यार पत्राची प्रत दस्तासोबत जोडली नाही. याचा अर्थ जो दस्त झाला आहे तो रद्द होऊ शकतो का ? आणि यासाठी मी काय केले पाहिजे ? कृपया मार्गदर्शन करावे.

प्रफूल्ल अशोक शेलार
दुय्यम निबंधक भोर , यांचे कार्यालाय्त , आपण , नमूद विक्री दस्त , त्याचे सोबतचे सर्व कागदपत्राचे प्रमाणित प्रती , अर्ज व अथवा माहिती अधिकार खाली मागवा
आपण कथन केल्याप्रमाणे , मुखत्यार पत्रावर , आपले आई ने , सही अथवा अगन्था केलेला नसल्यास , आपण फास्वनुकीबाबत फौजदारी कारवाई हि करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दिवाणी दावा हाच पर्याय दिसतो

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

2001 साली भोर तालुक्यात वर्वे खुर्द येथील गट न.18 ही जमीन माझया आईच्या सहमती शिवाय विकली आहे. परंतु 7/12 मधे 6 जनाची नावे आहेत. त्या दस्त मधे 3 जणांचा अंगठा व सही आहे व 3 जणांचा मुखत्यार पत्र आहे. परंतु त्या पत्राचा पुरावा तलाटी कार्यालयात नाहीये ते पत्र नसल्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की ते मुखत्यार पत्र रजिस्टर नसल्याने त्याची प्रत कार्यालयात नाहीये. तर त्या मुखत्यार पत्रावर झालेली जमिनीची विक्री कायदेशीर आहे का आणि नसेल तर ती रद्द होउ शकेल का क्रुपया मार्गदर्शन करावे
मुखत्यार आहे का नाही , खरे का खोटे?

आता जवळ जवळ १४ वर्षे झालेली आहेत....................त्यामुळे आता . दिवाणी दावा हाच उत्तम पर्याय दिसतो .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर, पिक पाहणी चा आदेश देताना जर जमीन नि.स.प्र. / trust ची जमीन / संस्था ची जमीन / कुळ असलेले / न्याय प्रविष्ट / सरकारी जमीन / वन खात्याचा शेरा असलेल्या ७/१२ च्या जमिनी मध्ये इतर व्यक्ती चे नाव दाखल करण्या बाबत आदेश देता येतो का? जर नाही, तर त्या बाबत शासन निर्णय अथवा कुठे तरतुत नमूद आहे का?
महा . जमीन महसूल ( अधिकार अभिलेख ) नियम ३१ अन्वये , चौकशी प्रक्रिया पार पडून , व प्रकरण निकषात बसत असेल तर लावता येयील
मात्र , जमीन नि.स.प्र. असल्यास , कुल झालेले मालक स्वत कसत नाही , या कारणावरून , कुलवहिवाट कायद्या खाली , ३२ र अन्वये, कार्यवाही / कारवाई सुरु करणे अपेक्षित

सरकारी जमिनीवर पिक पाहणी आदेश देत येणार नाही, अतिक्रमण समजून , काढून टाकावे लागणार

न्याय प्रविष्ट प्रकरणात - न्यायालयाचा जैसे थे ठेवण्याचा आदेश असल्यास , पिकपाहणीआदेश देतयेणार नाही
वन खात्याचे जागे वर , शेती करता येत नाही, ते अतिक्रमण होए . काढून टाकणे आवश्यक ( वन विभागामार्फत )

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे नाव अनुपमा महेन्द्र माळी माझे लग्न झालेले आहे व एक मुलगा आहे माझया वडिलांची खोपडी या गावी जमीनआहे माझे वडील बौध भिक्षुक असल्याने ते घर सोडून २००९ साला पासून निघून गेलेले आहेत त्यांचे वय ६५ वर्ष होते ते परत आलेले नाही ते परत येतील असे वाटल्याने पोलिस तक्रार केली नाही. व पोलिस आता हरवले म्हणून तक्रार घेत नाहीए माझया वडिलाना मी एकुलती एक मुलगी आहे पण ते कुठे आहेत जिवंत आहेत की वारले ते काहीच माहीत नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू दाखला व मृत्युपत्र काहीच नाही त्यामुळे माझे नाव ७/१२ वर वारस म्हणून लावण्यासाठी काय करावे कृपया या साठी मार्गदर्शन करावे .
पोलिस तक्रार देवून सात वर्षे झाली...................तरच दिवाणी न्यायालय एखादी व्यक्ती असेल किंवा नसेल याबाबत निर्णय घेतात.

म्हणजे हरवल्याचे तक्रारीपासून ७ वर्षानंतर माणूस सापडला नाहीतरच ............तसा पोलिचे दखल घेवून पुढील कारवाही करता येईल असे वाटते .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Maza prashna asa ahe ki hyrabad kul kayda kay asto
Karan mazq prashna tya hydrabad kul vahivat kaydya varcha ahe
Prashna asa ahe
Maze ajoba san 1952-58 paryant sheti krit hote ti jamin vadilo parjit novhati tyancya navache khasara patrakavar vahitidar lagandar v kul mhanun lagle ahejune lok mhanatat tyana ti jamin ceiling madhe midali tyacha vivah anjana bai hichyashi zala tyana 2 mule hoti va maze ajoba 1959 madhe varle v tyavedes ti mul 6 varshacha motha mulga va 1 varshacha lahan mulga hota mag ajine dirashe lagn kel va ti 2 lahan mule chulat ajoba kde raht hoti tyanche palan poshan tya chulat ajobanich kele tya lahan mulanche shadet nav takaychya vedes chulat ajobani aplech nav vadil mhanun takayla lavle nant te shet 1960-61 madhe chulat ajobachya navani ferfar zale v 38 e pramane ti jamin chulat ajobachya navane decleare zali te chulat ajoda san 2001 madhe varle tyana 7 mule v 2 muli hotya tyancya mrutunantr chulat ajobanchya mulanchi nave san 2003 madhe adhikar abhilekh patrakavr chadvli ahe pan mazya vadilache v motya vadilache nav nai chadhvle amhi prashna kela ki mazya ajobachya 2 mulanchi nave nai chadavli amhi tyana vicharl amche nav ka nai chadavli tar te mhnanale ki tumchya vadilanchi shetich navhe tar tumche nav kashe chadel ata sir tumhich sanga amcha tya shetivar kahi adhikar nai ka jr adhikar asel tar ksa midel mhn konta nirnay lagel jas
1 ) ti jamin mazya vadilanchya navachi houn fakt amhi doghe bhau varasdar bananar ka
2) mazya chulat ajonachya mulanche nav jase varsan mhnun ahe tasch ani tewadhach hissa amhala pan midel ka
3)tya jaminiche do hisse hota 1 mhanje mazya ajonacha hissa 2 mhnje mazya chulat ajobancha hissa. Ha prashan ata mahtvacha ahesaheb plz mala yacha ani khalil prashnache answer lavker hi mazi agrahachi tumchya samor vinanti ahe
Ani hydarabad kul kaydya nusar 38 e pramane sheti decleare hone mhnje kay aste ani san 1952 -58 paryant sheti karnaryana konate kul mhnun mhanatat
hyadrabad kul kaydyanusar kulachi vyakhya kay ahe
Pl
१९६० ६१ रोजी , ज्या फेर फाराने , चुलत आजोबाचे / सावत्र आजोबाचे नाव लागले , त्या फेरफाराविरुद्ध आपण अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,लीज पेंडन्सी नोंदी बाबत मंडलाधिकारी यांचेकडे तक्रार केस चालू होती.दिवाणी न्यायालयाचा स्थगिती आदेश (हस्तांतरास बंदी)असा असल्याने त्यांनी सदर नोंद मंजूर केली.वास्तविक इतर लीज पेंडन्सी नोंदीबाबत उच्च न्यायालय मुंबई येथे दावा चालू आहे.याची कल्पना व इतर निकालांबाबत पुरावा देऊनही त्यांनी सदरचा निकाल दिला आहे.अपिलात गेल्यास सदर नोंदीबाबत स्थगिती आदेश होऊन नोंद रद्द होऊ शकेल का?सदर लीज पेंडन्सी नोंद गावदप्तरी घेणेबाबत शासन निर्णय /परिपत्रक असल्यास bkganesh.shinde10@gmail.काम यावर कृपया ईमेल वर पाठवू शकाल का?महसूल व्यतिरिक्त इतर न्यालायास फेरफार नोंदीवर स्थगिती देण्याचा अधिकार आहे का? तसेच महसूल व्यतिरिक्त इतर न्यायालयास फेरफार नोंद घेणेकामी आदेश देण्याचे अधिकार आहेत का?कृपया मार्गदर्शन करावे..
आम्ही 5 भावंडे जमीन सामाईक वडीलोपार्जित,बहीणींना मिळकतींमधील जमीनीतील ठराविकच हिस्सा हवा आहे.तो मला मान्य नाही.काय करावे ?
प्रत्येकाला समान हिस्सा मिल्नेचा हक्क आहे . समजुतीने सरस निरस पद्धतीने वाटणी करावी लागेल . अन्यथा कोर्ट कचेरीचा वेळखाऊ व खर्चाऊ मार्ग ..................

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.32 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3460
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3