जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Sunil Ghevade
24-07-2015
ghevade.sun@gmail.com

करारनामा आणी मुखत्यारनामा यातील फरक काय?
आपला प्रश्न/सूचना ...इनाम जमीन ट्रस्ट च्या विक्री केल्यास त्या वर काय कार्यवाही होईल.
नमस्कार,

माझ्या पहिल्या प्रश्नांची उत्तरे दिल्या बद्दल धन्यवाद!

माझ्या चुलत आजी ने चुलत आजोबा वारल्या नंतर तिची वडलोपार्जित मिळकत तिने आणि तिच्या मुली ने (म्हणजेच चुलत आत्त्याने) १९८९ मध्ये स्वताच्या वा चुलत आत्त्या च्या नावे न करता माझ्या काकांच्या नावे करून दिली होती. त्यानंतर २०११ मध्ये आम्हीही तिच्या वडलोपार्जित मिळकतीत सहहीशेदाराची नावे लावण्यासाठी तलाठी कडे प्रतिज्ञा पत्रा सहित अर्ज केला, त्यावर तलाठ्याने आजी आणि चुलत आत्त्याला तसेच काकांना, माझ्या वडिलांना, सख्या आत्यां ना सहहीशेदारा च्या नोटिसा पाठवल्या त्यावर फक्त माझ्या काकांनी हरकत घेतली. माझ्या काकांनी हरकत घेतल्यावर पुन्हा तलाठ्याने सगळ्यांना नोटीसी पाठवून त्याची सुनावणी मंडळ अधिकारी कडे केली. माझ्या काकांनी हरकती वर काकदी पुरावे न दिल्याने मंडळ अधिकारी ने आमच्या नावांची सहहीशेदार म्हणून नोंद केली. त्यावर काकांनी पुन्हा अपील केले परंतु काकदी पुराव्या अभावी उप विभागीय अधिकारी, कणकवली यांनीही काकांचे अपील फेटाळले.

चुलत आजी आमच्या कडेच राहत होती, आता चुलत आजी वारल्या नंतर चुलत आत्त्याला आणि तिच्या मुलींना त्यांच्या आजी ची मिळकत मिळू शकते का ? त्यांची आजी चे हिशेदार म्हणून नोंद होऊ शकते का? त्यांचे त्याच्या आजीच्या वडलोपार्जित मिळकतीवर त्यांचे हक्क आहेत का? चुलत आत्त्या वा तिच्या मुली फक्त काकांना मृत्युपत्र/बक्षीस पत्र/खरेदी पत्र कायदेशिररित्या देऊ शकते का?

आम्ही कसलेही मृत्युपत्र केलेले नाही. अजूनही चुलत आत्याचे तसेच तिच्या मुलींची नावे ७/१२ वर नोंद नाही.
एका गांवी गट नं.12 चे क्षेत्र 0 हे 48 आर एवढे आहे त्यांनी त्यांचा कुटूंबिक अडचणीसाठी 0 हे 10 आर जमिन एका व्यक्तीस खरेदीने विकली गावच्या तलाठीकडे संबंधित खरेदीदाराने दस्तऐवज सादर केले व तलाठीने सदर खदेरी क्षेत्रा बाबत सामाईक खातेदार म्हणून नोंद करणे बाबत फेरफार नोंदविला व त्या आधारे फेरफारचा कालावधी पूर्ण झाल्यावर मंडळ अधिकारीने सदर सामाईक नोंद जमिन खरेदीदाराचा नांवे नोंदण्यासाठी नोंद मंजूर केली ही बाब योग्य आहे व कसे ? या बाबत तुकडे जोड कायदयाचा भंग होत कसे . कृपया विवेचन करावे
आम्ही १९५५ पुर्वीचे संरक्षीत कुळ आहोत. आमच्या जमिनीचे दोन हिस्से होते. एक मुलाच्या नावाने व एक आईच्या नावाने. आम्हा दावा दाखल केल्यानंतर मुलाच्या हिश्श्याच्या जमीनीचे मालकी प्रमाणपत्र आम्हाला मिळाले व ७/१२ वर आमचे नाव मालकी रकान्यात लागले. मात्र आईच्या हिश्श्याच्या दाव्यामध्ये १९६३ मध्ये सदर महीला विधवा असल्यामुळे त्यांच्या हयातीत कुळाला मालकी प्रमाणपत्र देता येत नाही असे कळवुन अर्ज निकाली काढला होता. सदर महीला मयत झालेली आहे व जमिन आमच्याच कब्ज्यात आहे. दरम्यानच्या काळात सदर महीला व तिचे कुटूंब गावातुन स्थलांतरीत झाले. त्यांचा कोणालाही ठावठीकाणा नाही. आता आम्हाला अर्ज करायचा असेल तर सदर महीलेचे मृत्युप्रमाणपत्र व वारसप्रमाणपत्र जोडावे लागेल. परंतु ते कुठे मिळेल हे कोणालाही माहीत नाही. अश्या परीस्थितीत काय करावे. ?
एका कुटुंबामध्ये आपसी वाटणीने जमिनी तीन भाऊ व आई यांचे नांवे वाटणी फेरफाराने जमिन नावे झाल्या आहेत. त्यापैकी एक भाऊ मयत झाल्याने त्याच्या वाटणीच्या जमिनीमध्ये आई व पत्नी असे वारस दाखल झाले आहे. पंरतु आजरोजी आई मयत झाली आहे. तर मुलाच्या वाटणीच्या जमिनीत आई चे नांव कमी करुन आईचे वारस दाखल करावे अगर फक्त आईचेच नांव कमी करावे लागेल काय? अगर कसे व कोणत्या कायदयाने. कृपया मार्गदर्शन करावे.

Question by narshing
23-07-2015
narshingtugave@gmail.com

Sir Namaste
Maza asa prashn aahe ki Jr varsacha ferfar mndlatil yak sazet mnjur zalyas tyach mndlatil dusrya sazet mnjur ferfar vrun nond mnjur Krta yet ka ? Kontya niymanve mnjur Krta yet yabddl sanga

Question by samadhan
22-07-2015
iamsamg19@gmail.com

नमस्कार सर,
जुने (४० ते ५० वर्षे ) दत्तक विषयीचे दस्त रेकॉर्ड शोधायचे असतील तर शासनाच्या कोणत्या विभाग अथवा कार्यालयाकडे मिळतील.
दत्तक घेतलेल्या कुटुंबाच्या जमिनीचे वारस फेरफार नोंदीवरून काही माहिती मिळू शकेल का?
एका इसमाने आमच्या शेत जमिनीवर १/७ हिस्सा नोंद करून घेतला आहे.हा इसम माझे आजोबांचे अपत्यापैकी (४ मुले पैकी १ मुलगा दत्तक दिला गेला + ३ मुली) दत्तक दिला गेलेल्या मुलाचा मुलगा आहे.ज्या कुटुंबात दत्तक दिले गेले त्या कुटुंबाचे जमीन विकून टाकली आहे व आता आमच्या जमिनीवरपण हिस्सा लावला आहे. तरी कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

Question by Vinayak patil
22-07-2015
rachnavinay123@gmail.com

Namaste Sir,

मी अलिबाग येथे राहत असून माझा प्रश्न खालील प्रमाणे.

माझ्या आजोबांची १०० गुंठे जमीन आहे. चार मुलांमध्ये सर्वसंमत्तीने खालील प्रमाणे वाटप झाले. वाटप रजिस्टर झाले आहे व सर्व भावंडांना मान्य आहे. सर्वांनी रजिश्टर ऑफिस मध्ये जाऊन सह्या केल्या आहेत.

अ (भाऊ) - २५ गुंठे + "५ गुंठे (घराची जागा )"
ब (भाऊ)- ३० गुंठे
क (बहिण) - २० गुंठे
ड (बहिण) - २० गुंठे

आता प्रश्न असा आहे कि दस्त नोंद करताना असे लक्ष्यात आले कि "अ" च्या वाट्याला आलेली "५ गुंठे (घराची जागा )" हीच उल्लेख वाटप पत्रात झाला नाही. सर्व भावंडे खूप दूर दूर अंतरावर राहत असल्यामुळे आम्ही तलाठी तसेच प्रांत अधिकारी यांस कडे उपाय मागितला त्यांनी सुचवलेला उपाय खालील प्रमाणे.

१) सदर वाटप पत्राची नोंद "५ गुंठे (घराची जागा )" सोडून वरील प्रमाणे होऊ शकते व ५ गुंठे जागा सामायिक चारही भावंडाच्या नावावर राहील.
२) ५ गुंठे (घराची जागा) :- हिस्सेदार "अ" ह्यांच्या नावावर करण्यासाठी वेगळे रजिश्टर (हक्कासोड पत्र ) करून, त्यावर सर्व भावंडांची सही घेता येऊ शकते.

माननीय साहेब,

वरील बाब लक्ष्यात घेता १ व २ हे समाधान बरोबर आहे का ?
भविष्यात हे वाटप कायद्यानुसार वैध मानले जाईल का ?

कृपया मार्गदर्शन करावे.

आपला विश्वासू,
विनायक पाटील.

Question by G.W sawale
22-07-2015
savalegaganan@gmail.com

सवॅप्रकारचयामहसु मागनया निशचित करने याचि माहिती
महोदय
आम्ही १९५५ पूर्वीचे संरक्षित कुळ आहे,आमचा तहसीलदार कार्यालय येथे “३२ग” दावा चालू असताना परराज्यस्थित मूळ मालकांचे वारसदार यांनी सदर जमिनीचे तिऱ्हाईत इसमास जमिनीची विक्री केली आहे,त्याचवेळी “कुलमुखत्यार पत्र” खरेदीदारास मूळ मालकांचे वारसदार यांनी करून दिले आहे, सदर “३२ग” चा दावा निकाल आमच्या नावे झाला असून निकालाची समज उभय पक्ष यांना देण्यात आली आहे, निकालाची समज “तिऱ्हाईत इसमास-खरेदीदार” यांना देण्यात आलेली नाही, खरेदीखताची नोंद हि मंडल अधिकारी यांनी फेटाळली असून तसा निकाल आम्हला मिळाला आहे.
“३२ग” दाव्याच्या निकालात मूळ मालकाने केलेळे खरेदीखत हे “कुळकायद्याचे कलम ८४ चे तरतुदीविरुद्ध बेकायदेशीर झाल्याचे दिसून येत आहे”.असे तहसीलदार यांनी निकालात नमूद केले आहे.
“३२ग” दाव्याची विहित निकालाची ६० दिवसाची मुदत संपल्यानंतर, ७ दिवसानंतर आम्ही तहसील कार्यालयात “३२म” प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला असता तो पर्यत कुठलेही अपील झाले नाही असे आम्हाला सांगण्यात आले आणि आमचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी स्विकारण्यात आला असताना आम्हाला १५ दिवसानंतर अपील दाखल झाले आहे असे पत्र आले आहे, सदर अपील हे “तिऱ्हाईत इसम-खरेदीदार” यांनी “कुलमुखत्यार पत्र” धारक असल्यामुळे केले आहे,परंतु मूळ मालकांच्या वारसदाराने खरेदीखत करून देताना सदर क्षेत्राचा “हक्क” खरेदीदार इसमास खरेदीखताद्वारे दिल्यावर त्याच क्षेत्राचे “कुलमुखत्यार पत्र” त्याच “इसमास-खरेदीदार” यास करून दिले आहे, हे “कुलमुखत्यार पत्र”बेकायदेशीर आहे असे मला वाटत आहे त्यामुळे हे अपील महुसुल नियम प्रमाणे नाही असे वाटते आहे तरी, या अपिलाचा जो पर्यत निकाल लागत नाही तो पर्यंत आम्हाला “३२म” प्रमाणपत्र मिळणार आहे/अथवा नाही, तसेच अपील फेटाळण्यासाठी कुठली कागदपत्रे सादर करावी,पुढे आम्ही काय करावे याचे मार्गदर्शन कृपया करावे
३२ ग दावा निकाल आपले बाजूने लागला आहे . त्या विरुद्ध , कुल मुक्त्यारीने अपील केले आहे . अपील मध्ये , प्रांत अधिकारी यांनी स्थगिती आदेश दिला नसेल तर , आपणास ३२ म प्रमाणपत्र मिळणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रति,
श्री. किरण पाणबुडे

धन्यवाद साहेब, मी दि. १७/७/२०१५ रोजी विचारलेल्या प्रश्न्या चे उत्तर दिल्या बद्दल.

१. घरा संबधित माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकारात कोणाकडे अर्ज करू. (तलाठी कि तहसीलदार कार्यालय)
२. तालुका लोकशाही दिनी अर्ज करा - म्हणजे काय ते समजले नाही?

धन्यवाद!

Question by Sanchita More
21-07-2015
sanchitamore56@gmail.com

माननीय किरण पाणबुडे सर

माझे जुने नाव संगीता असे होते ते बदलून मी संचिता असे केले आहे व त्याबाबत मी शासन राजपत्रामध्ये सूचना प्रसिद्ध केली होती व सदर राजपत्र मला प्राप्त झाले आहे.
1. मी माझे बॅकेच्या खात्यामधील माझे नाव संगीता ऐवजी संचीता असे बदलण्यासाठी अर्ज दाखल केला होता पण तो त्यांनी स्वीकारला नाही अर्जासोबत मी राजपत्र सादर करून सुध्दा त्यांनी माझ्या नावात बदल केला नाही तरी मी काय करावे.
2. मी सदर राजपत्राच्या सहाय्याने माझे आधार कार्ड मधील व रेशनकार्ड मधील नाव दुरूस्त करू शकते का.
3. शाळेच्या दाखल्यावर माझे नाव संगीता असे आहे आता ते मी बदलविल्यामुळे मला भविष्यात कोणती अडचण येणार नाही ना.

आपण मला योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आमचे चुलत काका आणि त्यांचे पूर्ण कुटुंब आम्हाला हक्क सोड पत्र देण्यासाठी तयार आहेत पण आमची जमीन सामायिक आहे आणि घर हे आजीचा नावावर असून ती मयत आहे तसेच या सामायिक जमिनीमध्ये पूर्वीपासूनची सर्वाची नावे आहेत .
तर हक्क सोड पत्र कोणाच्या नावाने देले पाहिजे किवा हक्क सोड पत्रासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे .
हक्क्सोद्पात्र नोंद्निद्कृत हवे
सह्धारक असावा

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर
बेकायदेशिर अकृशक आदेशाच्या नोंदी बाबत ऊपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपिल चालू आहे , सदर आदेशातील काही भूखंडधारक वरिल वस्तूस्थिती माहीत असतानाही सदर भूखंडाची बेकायदेशिरपने खरेदी- विक्री करतात, सदर भूखंडात बेकायदेशिर पने बांधकामे करतात अशी वस्तूस्थिती असताना...........
मला खालील प्रश्नांची ऊत्तरे हवी आहेत
१. सदर वादातील अकृशक भूखंडामध्ये कोनतीही बाधंकामे न करनेबाबत. व सदर भूखंडांची खरेदी विक्री नकरनेबाबत प्रांत साहेब स्टे आडर देतील का? सदर प्रकरनाबाबत स्टे आडर कोन देऊ शकतील ?
२ स्टे आडर देन्याचा कोनाला-कोनाला अधिकार आहे

Question by samadhan
20-07-2015
iamsamg19@gmail.com

नमस्कार सर,
जुने (४० ते ५० वर्षे ) दत्तक विषयीचे दस्त रेकॉर्ड शोधायचे असतील तर शासनाच्या कोणत्या विभाग अथवा कार्यालयाकडे मिळतील.
दत्तक घेतलेल्या कुटुंबाच्या जमिनीचे वारस फेरफार नोंदीवरून काही माहिती मिळू शकेल का?
नमस्कार सर,
माझ्या वडिलांनी स्वत शेत घेतले विकत आहे. वडील मरण पावले त्यांचे माझी आई , चार मोठे मुले त्यापैकी एक मुलगा मरण पावला आहे . मरण पावलेला मुलाचे पतनि व दोन मोठे मुले आहे. मी चार मुलापैक्य असून माझा नावाने ७/१२ नोदनि कराची आहे त्य्कारिता मुंद्राक शुल्क
लागते काय ? तसेच नोटरी केली तर चलते काय? वरील वारसदार कोणकोण आहे? कुपया माहिती द्यावी. हि विनंती
आपले वडिलांचे पशचात , आई , आपण चार भाऊ ( एक भाऊ मयत असल्यास , त्याची पत्नी/मुले यांना सर्वांना भावाचा १/५ हिस्सा ) असे वारस आहात .
त्यामुळे आपणास १/५ मिळकतीचा हिस्सा मिळेल . त्यासाठी मुन्द्रंक शुल्क भरण्याची गरज नाही .
मात्र आपल्या तीन भावांची मिळकत हि आपले नावावर करण्यासाठी , त्यांनी हक्क सोड पत्रक करून दिले पाहिजे .
हक्क सोड पत्रक नोब्दानी करणे आवश्यक . तसेच आपल्याला मुन्द्रंक शुल्क भरावा लागेल . नोटरी केलेल्या दस्तावरून , अधिकार अभिलेख सादरी आपले नाव लागणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीप्रमाणे ताबे साठेखाताची नोंद ईतर अधिकारात घेता येत नाही परंतु अशी नोंद घेतली गेली असल्यास काय करावे याबाबत आपण माहिती सविस्तर माहिती द्यावी
प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करा व नोंद कमी करून मिळण्याची मागणी करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर ,

जर मेळाची फ़ाइल मिळण्याबाबत तलाठी ऑफ़िस व तहसील ऑफ़िस यांच्याकडे माहितीचा अधिकारात आंम्ही विचारणा केल्यानंतर . आम्हाला ही मेळाची फ़ाईल मिळत नाही असे उत्तर लिहून देंण्यात आले तर आम्ही प्रांत अधिकारी यांना
माहितीच्या अधिकारी विचारणा केल्यावर त्यांनी आम्हाला परत तहसीलदार यांना अर्ज करायला सागितले .

आत्ता आम्ही कुठे विचारणा अर्ज करावा . शेवटी आम्हाला मेळाची फ़ाइल कुठे मिळेल .
Sir maja que as ahe ki amchi jmin ahe ti jmin amcha aji ajobane gavatil aka vyakti la bhat lagvdi sati dili tya vyaktine only 2 years ti sheti kei and tya jminila kul laun ghetl and ata tya vyakti 3 son tya jminila kul ahet and ata ha kul nighel ka and ks nighel ami khup info milvli but nahi kul night bolle yasati sir solution pahije
१. ज्या व्यक्तीस जमिन्कास्न्यासाठी दिली होती , तो जर १.४.१९५७ अथवा त्या पूर्वी पासून जमिनीची मशागत करत असेल , तर ती व्यक्ती /तिचे वारस , मानीव मालक झाले आहेत .
आपणास काही हक्क उरलेला नाही

२. मात्र जर त्या व्यक्तीचे नाव कुल म्हणून १.४.५७ नंतर लागले असेल , त्या व्यक्तीचे नवे ३२ ग किंमत , कुल नाव लागले पासून १ वर्षाचे आत होणे आवश्यक . अशी ३२ ग किंमत झाली नसेल तर , कुलास जमीन किंमत ठरवण्याचा हक्क नाही अशी वेळी आपण कलम ३१ , खाली व्यक्तीक मशागतीसाठी अथवा बिनशेती उपयोगासाठी जमीन , ओअरत घेऊ शकता . मात्र त्यासाठी , माम्लेतदार यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Sir,my name Vishal Dipak Ubhare AT.Mangaon
sir maj que as ki amchi aji Sulochana Nathuram Ubhare tichi jmin ahe ti jamin ami village mdil aka vyaktila krayla dili but jya vyaktila krayla dili tyach vyaktine tya jminila kul lavl.and to kul i think 50 yers agodr lavly tya kulala tyanchi family vars mhanun laglet.sir main ti jmin amchi ahe he tyana pn mahit ahe and tya kulamdil ak vyakti mayat ahe tr tyachi family vars lagle tr sir ha kul nighel ka plese sir help me?
जर ती व्यक्ती १.४.१९५७ पूर्वीची कुल असेल तर , ती व्यक्ती /तिचे वारस जमिनीचे मालक झाले आहेत . कुल निघण्याचा प्रश्न उद्भवत नाही

२. मात्र कुल , १.४ १९५७ नंतर चा असेल , तर अस्य कुळाने कलम ३२ ओ खाली , एक वर्षाचे आत , ३२ ग किंमत निच्छित करून घेणे आवश्यक होते

३. ३२ ग किंमत , किंमत निच्छित झाली नसल्यास , आपण कलम ३१ खाली स्वताचे मशागतीसाठी अथवा बिनशेती उपयोगासाठी परत मागि शकता
माम्लेतदार यांचे कडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir I joined government polytechnic as lab assistant in direct recruitment of class 3 post, but during medical fitness test the civil surgeon disqualifies me for only color blindness defect, as per rules color blindness test is applicable only to police, fire service, railway, military and for lab assistant post in diploma engineering college, please guide me to obtain fitness certificate,
Thanks
What you say is correct . If color blindness is not the disqualification for the post you selected , then you have every right to fight for the same . But check , whether color blindness is a not a disqualification .
You may make representation to the Director of Health or deputy director Health

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

maza wadilani shet vikat getalele hote wadil hayat nahi tyana eak patni w tichi aammi char bhau aahe typaiky eak bhau hayat nahi tyla eak patni w tichi don mule samajdar aahe tar wadiache shet sapurn maza nawane karanasathi hakk sod prata karata yete kay ? wril warsdarapaiky konache sahi ghywi lagtil ? hakka sod pratra notari karavi lagtil kiwa kase kupya magdarshan karawe danywad.
या बाबत , आपण दोन वेळा प्रश्न विचारला आहे . असोत
१. वादिलानंतर नंतर , आई , चार भाऊ वारस आहेत .
२.. एक भाऊ मयत आहे , त्याचे वारसांना , मयत भावाचा १/५ हिस्सा मिळेल
३. आपले दोन भाऊ , आई . एका मयत भावाचे सव वारस , यांनी आपल्याला हक्क सोड पत्रक करून देणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Namste sir
1)maze wadil class 4 ya padavar nagar palika Madhe ahe tyanchya jagi mala anukampa var nokri mile ka?
2)tyasathi Kay karave
3)sadhya maze vadil ruzu age.
अनुकंपा नोकरी हि , वर्ग ३ /४ कर्मचारी शासकीय सेवेत असताना , मयत झालेवर , त्याचे कुटुंबाची परवड होऊ नये म्हणून आहे .
वडील हयात असताना , अनुकंपा तत्वा वर नोकरी देण्याची सध्या तरतूद नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्न/सूचना :
नमस्ते, मी सुभाष गलांडे, राहणार वडगाव शेरी, पुणे ता. हवेली. माझे वडील श्री राणू गलांडे व त्यांचे चार भाऊ ह्यांना वडगाव शेरी, विमान नगर, श्री जिम शेजारी २८ घुन्ठे जमीन कुळ म्हणून मिळाली होती. ती जमीन खाली असल्यामुळे त्या जमिनीवर श्री बंब नावाच्या व्यक्तीने गुंडांच्या मदतीने कब्जा केला आहे. तहसीलदार हवेली ने आमच्या नातेवायीकाना ३२ग sartificate दिलेले आहे. श्री बंब ती जमीन हादाप्ण्यासाठी त्यांनी आमच्या नातेवायीकाना लाच देवून ३२ग रद्द करण्यासाठी तगादा लावला आहे पण त्या साठी मी मंजूर नाही कारण मी एक भारतीय नौसेनेचा निवृत्त जवान आहे. मला कोणतीच माझ्या नावावर जमीन नाही आणि मी जमीन विकण्याच्या विरोधात आहे. मी तहसील कार्यालयात केस टाकली आहे पण तहसीलदार साहेबांनी कोणताच निकाल माज्या बाजूने घेतला नाही. तरी मला मदतीची गरज आहे.

आपला विश्वासू,
सुभाष गलांडे
९५४५४५०८०६

प्रतिसाद :
३२ ग किंमत आपले नातेवायीकाचे नवे निच्छित केलेली आहे . मग आपला या मिळकतीवर हक्क काय आहे ?
श्री. किरण पानबुडे
उपजिल्हाधिकारी

श्री किरण पाणबुडे साहेब, ३२ ग दाखल्या वर माझ्या वडिलांचे व चार चुलत्यांची नावे आहेत. माझ्या वडिलांना दोन मुले आहेत त्या पैकी मी एक आहे. मला कृपा करून न्याय मिळेल का ?

गलांडे साहेब ,
एकदा ३२ ग किंमत निच्छित झाल्यावर ती रद्द होण्याचा प्रश्न उद्भवत नाही
तरीही तहसीलदार , यांनी आपले विरुद्ध निकाल दिला असल्यास , आपण प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.45 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3