जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर माझ्या आजीने रजिस्टर खरेदी खताने २५ पैसे विहीर भांडेपाणी हिस्सा विहिरीचे खरेदी खत १४७२/९५ अन्वये रजिस्टर खरेदी खताने घेतला आहे. ह्याची नोंद फेरफार क्र. २०१२ अन्वये होऊन ती रद्द झाली होती. त्यानंतर ह्याचावर सुनावणी होऊन मा.उपविभागीय अधिकारी ,जुन्नर उपविभाग खेड (पुणे) यांनी निकालाची समज आरटीएस /अपील/५४२/२०१२, राजगुरूनगर, दिनांक ८/३/२०१३ रोजी दिली या मध्ये खालील प्रमाणे आदेश देण्यात आला.
१) मौजे चांडोली बुII. येथील गट न. ११५९ मधील विहीर भांडेपाण्यातील २५ पैशाचे हक्क व हिश्याबाबत नोंदणीकृत दस्तऐवाजावरुन गावाचे दफ्तरी केलेली फेरफार नोंद क्र.२०१२ रद्द करण्याचा मंडलअधिकारी कळंब यांचा निर्णय रद्द करण्यात आला.
२) प्रस्तुतची नोंद मंजूर करण्यात आली. दक्षिणेकडील पूर्व बाजूचे विहीर भांडेपाण्यात २५ पैसे हिश्याबाबत अपिलार्थी पार्वताबाई शंकर थोरात यांचे नाव दाखल करण्यात यावे,असा आदेश दिला.
हाच आदेश मा. अपर जिल्हाधिकारी , पुणे यांनी आरटीएस/२/अ/१६४/२०१३, दिनांक १६/०३/२०१५ अन्वये कायम करण्यात आला. हा निकाल लागून ९० दिवस पूर्ण होऊन गेले आहेत.
तसेच मा. अपर आयुक्त पुणे, विभाग पुणे यांनी आरटीएस/पुणे/रि/४९/२०१५ , दिनांक २७/०४/२०१५. अन्वये सदर प्रकरणात कॅव्हेट असलेने वादींचा यांचा स्थगन आदेश मिळणेबाबतचा अर्ज हि नामंजूर केला आहे.
मा. अपर जिल्हाधिकारी पुणे यांच्या निकालाला ९० दिवस पूर्ण होऊन गेले आहेत माझी २५ पैसे हक्काची नोंद त्वरित करावी या साठी तलाठी यांच्याकडे लेखी अर्ज देऊन देखील त्यांनी ७/१२ वर अजून नोंद घातली नाही.
वादी यांच्या विरोधात सर्व निकाल गेल्यामुळे त्यांनी दिवाणी कोर्टात निरंतर मनाई साठी दावा दाखल केला आहे व त्याची सुनावणी १४/७/२०१५ रोजी आहे. वादी यांची खरेदी खाते आमच्या नंतरची आहेत.
सरकारी कायद्यांचा आधार घेऊन आम्हाला २० वर्ष हक्कापासून वंचित ठेवले आहे , आता दिवाणी कोर्टाचा निकाल किती दिवसात येईल माहित नाही , त्यानंतर पुन्हा अपिल.. पुन्हा अपिल हि साखळी संपण्याची चिन्हे नाहीत.
वादी यांनी आमचे ७/१२ दफ्तरी नाव नसल्याचा गैर फायदा घेऊन काल्पनिक विहिरीची स्वतःच्या नावे (संपूर्ण विहिरीची ) २००५ नोंद रोजी घातली आहे .
कृपया मार्गदर्शन करावे
तलाठी याने , सर्व अपील अधिकारी , यांचा आदेश अंमलबजावणी करणे आवश्यक आहे
आपण सम्भंडीत प्रांत अधिकारी यांना भेटा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या वडीलाकडून (वय ६२) एका रक्तातल्या नातेवायकाने आमही (दोघे भाऊ) बाहेरगावी नोकरीला असताना जबरदस्तीने दस्त करून आमचे जुने घर (गुंठेवारीतील) खरेदी करून घेतले आहे. त्याची नोंद ग्रामपंचायतीला आहे पण ७/१२ वरील फेरफार मध्ये गुंठेवारीचा व्यवहार म्हणून रद्ध अशी नोंद आहे. सदरचा व्यवहार कायदेशीर ग्राह्य आहे काय व सदरची व्यक्ती ते घर इतरांना विकू शकते काय ?
जर वडिलांना फसवून घर विकत घेतले असेल तर आपण फौजदरी दावा न्यायालयात दाखल करा . घर व जमिनीचे दोन्ही व्यवहार रद्द होतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्न :- वडिलोपार्जीत जमिनीतील दोन भावांचा हिस्सा खरेदी केला आहे.पन मोठा भाऊ जमिनीचा ताबा घेऊ देत नाही.आम्ही ताबा घेण्यासाठी काय करावे ?
सदर जमिनीत ७/१२ ला १९६० पासून सर्वाची नावे आहेत.
१० हे ४ आर जमिनीत ३ भाव हिस्से आहेत तरी मोठा भाऊ असा दादागिरी करतोय.तरी कायदेशीर मार्ग सूचवा.
जमिन खरेदी करून ३ महिने झाले आहेत.vijaysing.deshmukh@gmail.com
मोठा भाऊ ताबा देत नाही तर , त्याने जमीन कशी आपणास विकली ?

आपण न्यायालयात , ताबा मिळणे साठी दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्न:- शेतजमिन खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे.
प्रश्न:- ५० एकर शेतजमिनीची खरेदी करताना कायदेशीर बाबी सांगा.
प्रश्न:- ग्रीन झोन किंवा अँग्रीझोन असलेली जमिन खरेदी करून बिनशेती करता येईल का ?
१. मिळकत खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी या बाबत चे , साहित्य आपणास e mail करण्यात आले आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर तुम्ही मला जिल्हा अधीक्षक यांच्याकडे अपील करायला सांगितले आहे तर त्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील . मला उत्तरेकडील कबजेदाराकडून ञास होतो काय करावे
ताबे साठेखाटची नोंद इतर अधिकारात घेणेबाबत काही शाषन निर्णय परिपत्रक आहे काय असल्यास ते मिळावे साठेखताच्या वैधतेबाबत काही शाषन निर्णय परिपत्रक आहे काय
साठे खताची नोंद इतर अधिकारात घेण्यात येत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मुखत्यार पत्र म्हणजे काय ?

मुखत्यार पत्र रद्द करता येते का ?
त्यासाठी काय करावे लागेल ?
कृपया माहिती खूप आवशक आहे ? तत्काळ सांगावे
धन्यवाद
1. मुखत्यार पत्र म्हणजे - एखादे काम करण्यासाठी , दुसर्या वाक्तीस अधिकार देणे

contact Act- section 182
An "agent" is a person employed to do any act for another, or to represent another
in dealing with third persons. The person for whom such act is done, or who is so
represented, is called the "principal".

2. मुखत्यार पत्र रद्द करता येते . मात्र जे अधिकार , मुख्त्यारीस देले होती , त्याचा वापर त्याने केलेला नसेल / अश्या अधिकारात मुख्त्यारीचा हित्संभंद नसेल

Contract Act-
Section 201 -An agency is terminated by the principal revoking his authority, or by the agent
renouncing the business of the agency; or by the business of the agency being
completed; or by either the principal or agent dying or becoming of unsound mind;
or by the principal being adjudicated an insolvent under the provisions of any Act for
the time being in force for the relief of insolvent debtors.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मी तुम्हाला या अगोदर प्रश्न विचारल्याप्रमाणे तुम्ही मला फसवणुकीबाबत कोर्टात जा असे सांगितले परंतु माझी काही शंका आहे कि आमची जमीन हि २००८ साली विक्री केली माझ्या पतीने तर माझे दीर त्यांनी ती घेतली आहे त्यांनी सांगितले कि मी घर घेऊन देतो ते त्यांनी दिले नाही व २ लाख रुपयॆ दिले परंतु मी जेव्हा गावी गेले तेव्हा तिकडे माजे चुलत सासू सासरे यांनी मला सांगितले कि दिरांनी तुझ्या पतीला फसवले आहे आणि मला याची कल्पना नवती माझ्या नकळत त्यांनी जमीन विकली होती तरी मी आणि माझ्या दिराने त्या जमिनीवर कर्ज काढले आहे असे असताना मी कोर्टामध्ये दावा लाऊ शकते का आणि मी दिराकडे समजुतीने बोलायला गेले होते परंतु ते नीट बोलत नाहीत त्यामुळे मी काय करावे याबाबत मला मार्गदर्शन करावे हि आपल्याकडे विनंती आहे
महोदया,
हा कुटुंबातील वाद आहे . एकत्रित बसून मार्ग काढा . प्रश्न सुटेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझी मौजे नागाव अलिबाग येथे ग.न.131 ची सरकारी मोजणी सन 2007 मध्ये झाली परंतु प्रत्यक्ष जमीन व मिळालेला नकाशा यात तफावत होती.यामुळे तक्रार केली व पुनः मोजणी झाली व चुकीची दुरुस्ती झाली व लगतच्या कबजेदारांना ती मान्य होती. सदर जमीनीवर आम्ही घर दुरुस्ती केली. दिनांक 18/ड6/2015 रोजी लगतचे कबजेदाराने सरकारी मोजणी केली त्यात त्याची आडीच फुट जागा आमच्या कडे दाखवीते . मोजणी ऑफीसमध्ये चौकशी केली असता सन 2015 ची मोजणी बरोबर आहे व तुमची 2007ची मोजणी चुकली असे सांगितले. आमचे लोखंडी पोल कंपाऊंड आहे. दोन्ही सरकारी मोजणी असुन सुद्धा मोजणीमधे तफावत येउ शकते का. ? सदर झालेल्या घराच्या व जमीनीचे नुकसानीबाबत आम्ही काय करावे ?
अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वडिलांच्या नावे 2 हे. 27 आर. जमीन आहे. त्यापैकी 1 हे. जमीन आईच्या नावे करायची आहे. पण तलाठी म्हणतात कि असे करता येत नाही. व आसे होत नाही. जमीन आईच्या नावे करायची असल्यास काय करावे. कृपया सविस्तर माहिती द्यावी.
सर, आमची जमीन मोजणी करण्यासाठी सरकारी मोजणी करण्यासाठी आले होते. पण त्यांनी ती मोजणी केली नाही कारण त्यांना मोजणी करायाल सपाट जागा हवी आणि आमची जमीन थोडा डोंगराळ भाग असल्यामुले झाडेझुडपे आहेत, म्हणून त्यांनी ती जमीन मोजली नाही.तसेच निघून गेले. ते जंगल एवढे दाट नाही.सर आता तुम्ही सांगा कि ते तसे मोजणी न करता जाऊ शकतात काय , मग डोंगराळ भागाची मोजणी कशी करणार ? त्याच जाब कोणाला विचारणार.
टेबल सर्वे करण्यासाठी मोजणी करण्याची जागा सपाट असणे आवश्यक आहे . त्या बाबी जमाबंदी आयक्त यांचे परिपत्रक आहे .
आपणास जागा झाडे झुडपे विरहीत करून द्यावी लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Namskar Sir,
सर्व प्रथम मी आपले खूप आभार मानतो की आपण एवढी सुंदर website चालू केली आहे.
माझा प्रश्न असा आहे की, माझे मुळचे गाव आहे पिंपळनेर, तालुका- शिरूर कासार, जिल्हा - बीड, पण आम्ही सर्वजण पुण्याला राहतो, आहे. आजोबांचे ७ वर्षांपूर्वी निधन झाले आहे, आजोबांच्या नवी काही जमीन आहे, तिचे अजून मुलांच्या नावे हिस्से केले नाहीत, आम्ही ४ जन आहोत, पैकी ३ जन तयार आहोत हिस्से पाडण्यासाठी पण एकजण तयार होत नाही, तर माझा प्रश्न असा आहे की आजोबांच्या नावावरची जमिनेचे हिस्से करण्यासाटी सर्वांची गरज असते का? आणी त्याची प्रोसिजर कशी आहे, आम्ही सार्वजन पुण्याला असल्याने आम्हाला कमीत कमी वेळात कसे जमेल? कुर्पया त्या बद्दल थोडे व मोलाचे मार्गदर्शन करावे. मी आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.
वाटप ,करण्यासाठी सर्वजण तयार असणे / सर्वांची संमती असणे आवशयक आहे .
संमती नसेल तर , न्यायालयात जा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
माझ्या नातेवाईकात आता पर्यंत कोणाचीही जात वैधता झालेली नाही

तर मला माझ्या नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही

तरी मी कोणते जात वैधता जोडावे

वैधता प्रमाणपत्र मिल्नेसाठी , नातेवाईकाचे वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे असे नाही
व्यक्तीची जात , हि त्याचे वडिलाचे जातीवरून ठरवली जाते
वडिलांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रावर , जातीचा उल्लेख असल्यास , वैधताप्रमाणपत्र मिळण्यास अडचण येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Mohan
02-07-2015
mohanmsutar@gmail.com

namaste साहेब
साहेब १९९७ मदे भूसंपादन झालेले आहे सदर प्रकल्पग्रस्त व्यक्ती त्यांचे स्वत चे कुटुंबातील वगळुन त्यांचे जात मधील दुसर्या भावांचे नातुना प्रकल्पग्रस्त दाखला हस्तांतर करता येईल काय? माहिती मिळावे .
मा.सराना नमस्‍कार,
सर मागे मी आपणास प्रश्‍न केला होता की मी 2009 मध्‍ये महसूल अर्हता परिक्षा उर्तीण झालेा व माझे पूर्वी लागलेले इतर कर्मचारी हे माझे नंतर अर्हता परिक्षा उर्तीण झाले सध्‍या आमच्‍या आस्‍थापना यांनी सेवा जेष्‍ठते प्रमाणे निवड यादी प्रसिध्‍द केली आहे माझे नंतर परिक्षा उर्तीण झालेले कर्मचारी हे माझे पुढे त्‍याचा नंबर आहे तर ज्‍यावेळी पदोन्‍न्‍ाती ची बैठक घेण्‍यात येईल त्‍यावेळी मी कोणती भूमीका घेवू नियम पाहता जर माझी निवड झाली नाही तर अशा वेळी मी काय करू प्रशासनाच्‍या विरूध्‍द मला जाता येत नाही . आपण मागे सांगीतल्‍या प्रमाणे जे अगोदर परिक्षा उर्तीण त्‍याचा नंबर अगोदर परतु अधिकारी /किवा निवड समिती सदस्‍य हे जर नियम 6 व 7 प्रमाणे कार्यवाही करत आहे जालना जिल्‍हयात अशी कार्यवाही करण्‍यात आली आहे तेथील कर्मचारी हे मॅट मध्‍ये जाणार आहे आमच्‍या येथे पदोन्‍नती ची बैठक होणार आहे कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विंनती
महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण मुंबई , यांनी या बाबत निर्णय दिलेला आहे . मात्र त्या बाबत अंमल बजावणी झालेली नाही . या निर्णय विरुद्ध , उच्च न्यायालयात आह्वान दिलेले आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखादी मालमता खरेदी कामी विसारा पावती केली असल्यास सदरची विसारा पावती किती कालावधी नंतर कालबाह्य होते
शासकीय कर्मचारीस कायदाचे पदवी परीशेस प्रवेश घ्यायचा असेल तर कार्यालयाची परवानगी घेणेची आवशकता आहे का असेल तर त्या बाबतच्या परिपत्रक / शासन निर्णय ची माहिती मिळावी
होय
सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय नाही
मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाचा शासन निर्णयआहे . त्या नुसार परवानगी घेणे आवशयक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
मी पदवीधर आहे. पदवीच्या अगोदर माझे नाव हर्षल असे होते आणि सध्या मी ते शासन राजपत्रानुसार अर्ज करून बदलले आहे व राजपत्रात ते प्रसिद्ध सुद्धा झाले आहे. व ते अमित असे केले आहे. दोन दिवसापुर्वी मी ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज अमित या नावाने दाखल केला होता पण तो तहसीलदार यांनी स्वीकारला नाही मग मी उप विभागीय अधिकारी यांच्याकडे अपील केले होते आणि त्यांनी सुध्दा ते नामंजूर केले आहे.
१. अपीलात ते म्हणाले की आपण आपल्या जुन्या नावाने अर्ज दाखल केला पाहिजे.
2. मी अर्जासोबत शासनाने दिलेल्या राजपत्राची प्रत दिली होती आणि ती पण त्यांनी स्वीकारली नाही.
३. तर सध्या मी काय करू शकतो याबाबत योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.
ग्राम पंचायत निवडणुकीसाठी , तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी नाहीत . त्यामुळे त्यांना अर्ज न स्वीवाक्र्ण्याचा प्रश्न उद्भवत नाही
आपण निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडे अर्ज दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गावात एखादया समाजासाठी स्‍मशानभूमी उपलब्‍ध नसल्‍यामुळे स्‍मशानभूमी करीता जागा उपलब्‍ध करुन देण्‍या बाबत तहसिल कार्यालयात अर्ज आलेला आहे तरी आपण पुढील कार्यवाही बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती
प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सदर करा .

महा जमीन महसूल ( सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम५ अन्वये , स्मशान भूमीसाठी , शासन ग्राम पंचायात्साठी जमीन प्रदान करते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Please send me info about legal heirs in land matters.
मा. सर
१. माझे आजोबा यांचे नावे सन १९८० च्या अगोदर जुन्या सर्वे नंबर १७०/१ व १७०/२ नुसार जमीन होती.
२. त्या जमिनीमध्ये सन १९८० मध्ये एकत्रीकरण योजना आली व जुन्या दोन्ही सर्वे नंबरचे गटामध्ये रुपांतर झाले आणि सध्या तो गट १९१ असा आहे.
३. सध्या आजोबांच्या नावावर असलेल्या १९१ या गट नंबरच्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर १ या नंबरचा एकत्रीकरण योजनेचा फेरफार निघत आहे.
४. सध्या आम्ही एकत्रीकरण स्कीमचा उतारा काढला आहे व त्याच्या वरती जुन्या सर्वे नंबर १७०/१ व १७०/२ चा कोठेही उल्लेख नाही त्या ऐवजी तेथे सर्वे नंबर ९१/१ व ९१/२ असे सर्वे नंबर निघत आहेत.
५. आजोबांच्या नावावर आलेली १९१ गट नंबर मधील जमीन कोठून आली याबाबत आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही तर आम्ही काय करावे.
६. फेरफार आणि स्कीम उतारे काढले असता त्याच्यावरती सर्वे नंबर १७०/१ व १७०/२ न निघता तेथे सर्वे नंबर ९१/१ व ९१/२ असे सर्वे नंबर निघत आहेत.
एकत्री- करण योजनेचे अभिलेख पहा
भूमी अभिलेख खाते या बाबत आपणास माहिती देऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

२००२ साली केलेल्या ताबे साठेखाताची नोंद २०१० साली इतर अधिकारात घालण्याचा अधिकार सर्कल /तलाठी यांना आहे का अशी नोंद घातली असल्यास काय करावे
साठे कराराची नोंद ७/१२ सदरी घेत येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साठेखाताची वैधता किती वर्ष असते
एखाद्या अर्जदाराचे त्याचे स्वतःचे वार्षिक उत्पन्न १५ लाखांपेक्षा जास्त आहे, तर अशा अर्जदारास उत्पन्नाचा दाखला देता येतो का ? तसेच, तहसीलदारांना किती रुपयांच्या मर्यादेपर्यंत उत्पन्न दाखला देता येतो ?
उत्पन्न मर्यादा नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, अ. का. व लिपीक यांच्या सेवा अन्य कार्यालयात व स्वतःच्या कार्यालयात वर्ग करणेचे अधिकार आहेत का ?
अशा अन्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा वर्ग करण्याचे अधिकार कोणास आहेत ? याबाबत मार्गदर्शन मिळणेस विनंती.
सेवा वर्ग करणे यास , कोणताही आधार नाही
परंतु कामाचे निकडी नुसार अल्प काळासाठी , सेवा वर्ग केल;इ जाते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3