जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

माझ्या शेती जवळ पाझर तलाव आहे. मला माझ्या शेतीमध्ये विहीर खोदावयाची आहे. पाझर तलाव पासून किती अंतरावर विहीर खोदावी असे काही नियम आहे का?
भू जल कायद्या नुसार , सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतापासून ५०० मीटर , अंतराच्या आत , विहित खोदता येत नाही .
पाझर तलावाची , सार्वजनिक पाण्याचा उद्भव म्हणून , नोंद आहे का पहा ?
जर सार्वजनिक उद्भव नसेल तर , आपणास ५०० मीटरचे आत विहीर खोदता येयील . अन्यथा ५०० मीटर चे बाहेर विहित कोह्दा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे वडील हे राज्य शासनाच्या महसूल विभागातून अव्वल कारकून म्हणून ५ वर्षा पुर्वी सेवा निवृत्त झाले आहेत. पण अजूनही त्यांना सेवा निवृत्त वेतन मिळाले नाही. आम्ही मुंबई मध्ये असलेल्या आयोगा कडे ही वारंवार तक्रारी आणि अर्ज करूनही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जर शासन त्यांच्या कर्मचाराचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सोडवणार ?
जिल्हाधिकारी कार्यालय , आयुक्त कार्यालय येथे , नियमितपणे , Pension अदालत आयोजित केली जाते
तेथे आपला प्रश्न मांडा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे आजोबा तुकाराम कोडूं गायकवाड हे १९७७ रोजी मयत झाले त्यानां २ मुल १)सखाराम २)विजय मयत झाले १९८२
आज़ोबा च्या नावे जी जीमन होती तीचा शेतसारा न भरल्याने सरकारी पड नाव नोदं होती नतंर १९९९ रोजी सखाराम याने शेतसारा भरून एकट्यानेच नाव लावले आम्ही विजयचे वारस मुले आहोत आम्ही वारस नोदं कशी करू मदत करा
सर्वप्र्रथम श्री तुकराम यांचे वारस रहिस्टर उतारा पाहा त्यात जर दोन्ही मुलांची नावे असतील तरच तुम्ही तुमची नावे लावणेबाबत तहसीलला अर्ज देऊ शकता

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

ग्रामपंचायत ची जागा आहे ती एका शिक्षण संस्थेला द्यायची आहे तसा ग्रामपंचायत व ग्रामसभेने ठराव पारित केला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगी साठी प्रस्ताव सादर करावयाचा आहे प्रस्तावासोबत कोणती कागद पत्र जोडून द्यायला पाहीजे म्हणजे परिपूर्ण प्रस्ताव होईल सविस्तर मार्गदर्शन व्हावे
१. मिळकतीचा अधिकार अभिलेख
२. ग्राम पंचायत ठराव
३. मिळकत ग्राम पंचायतीची आहे त्या बाबत , रजिस्टर मधील उतारा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by swati swami
21-10-2015
swati.swami@yahoo.com

उपविभागीय अधिकारी यांना त्याचे उपविभागात महसुलशी निघडीत उपक्रम / कार्यक्रम राबवायचे असतील तर varisthanachi परवानगी घेणे गरजेचे आहे का ?
तलाठी हे नवीन नियुक्तीने १ आठवड्यापूर्वी रुजू झाले आहेत . त्यांना विभागीय दुय्यम सेवा परीक्षा पुढच्या महिन्यातील देत येईल का ?
फौजदारी प्रक्रीया संहिता कलम १०७ च्‍या प्रकरणात जाब देणार यास अनेक वेळा समन्‍स पाठवुन जर तो तारखेवर हजर होत नसेल तर काय कार्यवाही करावी ?
अटक वॉरंट काढा आणि पोलीसाना अटक करुन हजर करणेचे आदेश द्यावेत

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

साहेब, प्रांत साहेबांनी संहीता 133 नुसार दाखल झालेल्या प्रकणाचा निकाल जवळपास एक वर्षांनंतर दिला. त्यामध्ये माझा अर्ज मान्य केला गेला व विरोधी पक्षाला १५ दिवसांच्या आत आवश्यक खात्याची परवनागी मिळवून कडूनिंबाचे तसेच नारळाचे झाडाचे धोकादायक फाटे तोडण्याचा आदेश दिला. परंतु विरोधी पक्ष अजूनही सदरची उपद्रवी झाडे तोडण्याच्या मनस्थिती दिसत नाही. साहेब आपली लोकशाही तसेच आपली न्याय प्रकीया आपल्याला माहीत आहे. तर मला एवढंच मार्गदर्शन पाहीजे आहे की, विरोधी पक्ष सदर आदेशा विरूध्द कुठे अपील करू शकतात वा वकीलांशी चर्चा करून कोणता मार्ग काढू शकतात. कृपया मार्गदर्शन तात्काळ देण्यात यावे. मी वाट पाहात आहे.
विरोधी पक्ष , जिल्हा सत्र न्यायालयात अपील करू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये एका कुटूंबाने दोन-तीन घरांचा पारंपारिक रस्ता बंद केला आहे. त्यामध्ये दगड टाकून सिमेंटचे क्राँकीटकरण आपल्या फायद्यासाठी केले आहे. त्यामुळे इतर घरातील वा वाडीतील ग्रामस्थांना त्याचा त्रास होत आहे. त्यांनी या साठी ग्रामपंचायत मध्ये तक्रार केली. परंतु तंटामुक्ती ही प्रश्न सोडवू शकली नाही. तरी साहेब आम्ही सदर प्रकरणामध्ये त्या ग्रामस्थांना म्हणजेच रस्ता अडवणा-या विरूध्द कुठे तक्रार करायला सांगू. दरचे रस्ता हा त्यांचा फार वर्षापासून म्हणजेच १०० वर्षापासून वापरात असल्याचे कळते. रस्त्याची मालकी कुणाची आहे हे अद्याप समजू शकले नाही. गाव नमुना २७ मध्ये सदर पांदण / बोळ नोंद नाही. यासाठी आपण काय सल्ला द्याल.
फौजदारी प्रक्रिया संहिता , कलम १४७ अन्वये , तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
रस्त्याचा वापर कोणत्याही कारणासाठी होत असेल तर,

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

रस्त्याचा वापर जर शेतात जाने साठी हि केला जात असेल तर , आपण माम्लेतदार कोर्ट अक्ट काह्ली , तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
जर रस्त्याचा वापर शेती साठी केला जात नसेल तर , आपणास , दिवाणी न्यायालाय्त दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

रस्त्याचा वापर जर शेतात जाने साठी हि केला जात असेल तर , आपण माम्लेतदार कोर्ट अक्ट काह्ली , तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
जर रस्त्याचा वापर शेती साठी केला जात नसेल तर , आपणास , दिवाणी न्यायालाय्त दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखाद्या व्यक्तीला कार्यालयात साधा किंवा माहिती अधिकारांतर्गत अर्ज करायचा असेल परंतु, कोर्ट फी स्टॅम्प उपलब्ध नसल्यास अशा परिस्थितीत अर्जदाराने सदर फी कोणत्या स्वरुपात, रक्कम किती व कुठे भरावी ?
सर मी परवा विचारलेल्या कृषी सहाय्यकांची माहिती एवढ्या साठी पाहिजे आहे कारण ते माझ्या विरोधात फोजदारी केस मध्ये खोटी साक्ष देण्यासाठी आले होते म्हणून मी तालुका कृषी अधिकारी, चिपळूण यांना माहितीच्या अधिकारात न्यायालयीन कामासाठी माहिती हवी आहे असा अर्ज केला आहे तर मला माहिती मिळेल का ?
सर माझी किडनी प्रत्यारोपण झाले आहे तर मला अपंगाचे प्रमाणपत्र व कोणते लाभ मिळु शकतात
एखाद्या गटाच्या जमिनीवर लीजपेनडशी दाखल असेल तर अशा जमिनीची विक्री करता येते का ?

Question by Sujit
21-10-2015
sujitchavan456@gmail.com

मनरेगा अंतरगत कोण कोणती कामे केली जातात व कामे घेण्यासाठी कोणती पात्रता लागते सविस्तर माहिती मिळावी
www mahaegs gov in या साईटला भेट द्या

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

सर,
आमची जमीन १८ गुंते आहे. माझा एक प्रश्न आहे के जमीन नावावर करण्यासाटी ७/१२ ची गरज लागते का? कारण आमच्या जमिनीवर तुकड्या विरोधी कायदा असा उल्लेख आहे म्हणून. जमीन नावावर करण्यासाटी कोणाला भेटायला लागेल ? आणि खरेदी खात कुटे बनवून मिळेल. खरेदी खात मुंबई ला बनवून गावी सदर केंल तर चालत का? खरेदी खत करताना दोन्ही बाजुकाडाचे आसने जरुरीचे आहे का?
१) होय
२) दुय्यम निबंधक कार्यालय
३)होय
४)होय
Reply By - शशिकांत सुबराव जाधव
नायब तहसीलदार (महसूल) सावंतवाडी

सर,
आपल्या उतराबद्दल धन्यवाद, पण जो पर्यंत ७/१२ वरचा शेरा निघत नाही तो पर्यंत जागा होणार नाही हे खर आहे का ? आणि तो काढण्यासाठी काय करायला लागेल? कारण जमीन MALAK कोणतीही मदत करायला तयार नाही आणि आम्ही जागा घेता वेळी हा पेंसिलिनी लिहून तेवलेला शेरा बघितला नव्हता हि आमची मोती चूक झाली. यावर काही तरी उपाय असेल तर खरच सांगा. कारण २००६ पासून हि जमीन AAMCHYA नावावर करायची RAHILI आहे. प्रत्येक वेळी गावाचे अधिकारी काहीतरी वेगळ सांगून DIVAS कडत आहे. तरी अशा आहे आपण आम्हाला योग्य मार्गदर्शन कराल. आपल्या उताराची वाट भागतो आहे.
७/१२ वर जो शेर आहे तो असा काढता येणार नाही . तुकडे बंदी कायद्याचे विरुद्ध व्यवहार असल्याने , जमीन शासनाची झालेली आहे. ( कलम ९ )
आपण शासनाचे जमिनीवर अनाधीकारपणे ताबा कब्जा घेतला आहे असा कायद्याचा अभिप्रेत अर्थ आहे.
आपण काय करायचे ते ठरवा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कुळकायदा कलम ३२ (पी) पोटकलम (२) अन्वये ३०/ ९/२००० रोजी मिळालेल्या जमिनीची विक्री करण्यासाठी परवानगी आवशक आहे का ?
असल्यास परवानगी कशी मिळवावी
आपणास जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक .
कलम ४३ , मुंबई कुल वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Maze ajoba naav tukaram kondu gaikwad yana 2 mul 1)sakharam 2)dnanu ajoba 1977 la expired zale tyamule amchya jamini cha shet sara na bhrlyane sarkari akari pad lagli mhanun 1999 la sakharam yani tyache paise bharun jamin ektyache naave keli mazya vadil dnanu Che naav lavle nahi dnanu 1982 la expired zale amhi tyanhe varas mhanun tyachi mul apply kase karu please help
अंतर जिल्हा बदलीने ताल्ठी रुजू झाले आहेत . पूर्वीच्या जिल्ह्यामध्ये तलाठी विभागीय दुय्यम सेवा परीक्षेतून ३ विषयात सुत मिळाली आहे . मग आता त्यांना पूर्ण पेपर द्यावे लागतील का ? सुत ग्राह्य धरवी ;लागेल का ? शासन तरतुदीसह कृपया मार्गदर्शन व्हावे.
फक्त स्वकष्टित मिळकतीचे मृतुपत्र करता येते कि? वडिलोपार्जित व स्वकष्टित मिळकतीचे दोन्हीचे मृतुपत्र तयार करता येते ?
donhiche करता येयील.परंतु वडिलोपार्जित एस्तते मध्ये जितका share असेल त्या शहरे तितकेच भाग purta

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

donhiche करता येयील.परंतु वडिलोपार्जित एस्तते मध्ये जितका share असेल त्या शहरे तितकेच भाग purta

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

वडिलोपार्जित मिळकती मधील अविभक्त हिस्सा मृतुपत्राने तबदील करता येतो का ? मिळकती मधील अविभक्त हिस्सा व पोटाहीस्सा म्हणजे काय ?
सर,
आमची जमीन १८ गुंते आहे. माझा एक प्रश्न आहे के जमीन नावावर करण्यासाटी ७/१२ ची गरज लागते का? कारण आमच्या जमिनीवर तुकड्या विरोधी कायदा असा उल्लेख आहे म्हणून. जमीन नावावर करण्यासाटी कोणाला भेटायला लागेल ? आणि खरेदी खात कुटे बनवून मिळेल. खरेदी खात मुंबई ला बनवून गावी सदर केंल तर चालत का? खरेदी खत करताना दोन्ही बाजुकाडाचे आसने जरुरीचे आहे का?
१) होय
२) दुय्यम निबंधक कार्यालय
३)होय
४)होय

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

सर मला खरवते तालुका चिपळूण येथील कृषी सहायक यांची ऑफिस मधून त्यांच्या मस्टर ची माहिती/ त्यांनी घेतलेल्या रजा, त्यांची झालेली सेर्विचे, त्यांचावर असलेल्या काही तक्रारी, त्यांना बाहेरील असणार्या कामाचा भत्ता , त्यांच्या झालेल्या बदल्या व त्याचा कालावधी ई. माहिती माहितीच्या अधिकारात कृषी अधिकारी चिपळूण यांचाकडे मागवली तर चालेल का ? नाहीतर कानाकडे व कशी मागवावी ?.
दुसर्‍याची वैयक्तीक माहिती मिळणार नाही

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

मा. महोदय,
माझ्या मागील प्रश्नास उत्तर दिल्या बद्दल धन्यवाद. माझे गावातील घर हे गावाच्या मध्य भागात आहे. मला घराचा व् लागूं असलेल्या जागेचा सर्वे करायचा झाल्यास कोणकोणती कागतपत्रे जमवायला लागतील. कृपया मार्गदर्शन करावे.
घराखालील जमीनीचा उतारा आणि रिकाम्या जागेचा ७/१२/ प्रॉर्पर्टी कर्ड सह भुमी अभिलेख कार्यालयास भेट द्या

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

एखाद्या व्यक्तीला शेतजमिन विकत घ्यायची असून सदर व्यक्तीच्या नावे मालकीची इतर कुठेही जमीन नाही. तर त्या व्यक्तीला शेतजमीन विकत घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची आवश्यकता आहे की नाही ? आणि सदर दाखल्याची आवश्यकता असल्यास कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील ?
तसेच, एखादी त्रयस्थ व्यक्ती त्या व्यक्तीला बक्षिसपत्राने जमीन नावे करुन देऊ शकते का ? असल्यास, त्या बाबत मागदर्शन मिळणेस विनंती आहे.
मुंबई कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६३ , अन्वये शेतजमीन खरेदी करण्यासाठी , व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक .
शेतकरी दाखला, हा ती व्यक्ती सावाताचे मालकाची जमीन कसत असेल तर मिळतो
१. ७/१२ उतारा
२. ८ आ उतारा
३. तलाठी अह्व्हाल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Sir,
आम्ही सन २००६ मध्ये आसुर्डे चिपळूण येथे जमीन विकत घेतली . ती जमीन आता नावावर करायची आहे त्यासाटी कोणते कागद पत्र लागतील आणि जमीन नावावर करायची पद्धत काय आहे ते जरा सांगा . जेणे करून जमीन नावावर करायला कोणताही त्रास होणार नाही . सर एक , जी जमीन घेतली त्या 7/12 असे लिहिले आहे कि तुकड्या विरोधी कायदा . त्यामुळे काही प्रोब्लेम होयल का ते पण सांगा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पाहत आहे. लवकरात लवकर उत्तराची उपेक्षा आहे.
महाराष्ट्र तुक्देबंदी व जोड कायदा कलम , ८ , ८अ प्रमाणे , प्रमाणभूत क्षेत्र पेक्षा कमी शेत्राची विक्री करता येत नाही
बागायत - ५ गुंठे
एकपिकी - १५ गुंठे
वर्कस - २० गुंठे
विक्रीमुले , मुल क्षेत्राची , विभागणी होऊन , प्रमाणभूतक्षेत्र पेक्षाकमी क्षेत्र निर्माण झाले तर त्यास , तुकडा निर्माणझाला असे सभोडले जाते .
आपला व्यवहार या सदरातील आहे
या कायद्याच्या कलम ९ प्रमाणे, अशी जमीन , शासनाचे मालकीची होते वअसते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3