जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर
आमचे कडे वडिलोपार्जित सन १९६४/६५ च्या वाटपाची वर्ग २चि
जमीन आहे सदर जमीन आम्हाला
वर्ग १ करावयाची आहे
त्या साठी काय करावे लागेल.
कृपया kayda सांगा
सात १२ वर,
जिल्हाधिकारी साहेबांचा परवानगी
शिवाय हस्तांत्र्नास मनाई हा शेरा
आहे
काही तरी उपाय सांगा.
नमस्ते सर
माझे माझे आजोबाबांचे
नावावर ३३ गुंठे शेतजमीन आहे.मात्र त्या जमिनीत आजोबा अडाणी असल्यामुळे इतर भौबंदानी पक्की घरे बांधली आहेत.व त्याच्या ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंदी केल्या आहेत.
त्याला कायदेशीर महत्व आहे का. कृपया मागर्दर्शन व्हावे. तसेच सदर जमीन ३३ गुंठे आहे. आम्हाला ती जमीन ७ नातवाच्या नावावर करता येईल का.काय करावे लागेल.
मालकी हक्काशिवाय त्यांचे कडे मिळकतीचा ताबा आहे .
त्या आधारे ते न्यायाय्लायात जाऊन , adverse possession दावा दाखल करू शकतात व मालकी हक्क जाहीर करण्या बाबत मागणी करू शकतात

कायदेशीर प्रक्रिया पार पद्लीयाशिवाय त्यांना आपण , मिळकतीतून काढून टाकू शकत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir mazya sasare yachi set jamin 1 hekatar hoti Tya paiki tyani 50 gunte eka mansas vikali Tyavar ferfar kramank sudha padala bakichi 50 gunnte ji hoti ti Tyache bhau yani Tyachi sahamati nasatan aplya navavar karun ghetali Tyavar ferfar kramank padala nahi Tyamule Tyani chukicha margane ti 50 gunte set jamin tyani apalya navavar karun ghetali tyamule ti amala parat ghaychi ahe ami kay karave?
जर अक्रुशिक परवानगी घेताना सम्भन्दित अर्जदार यानि शपथपत्र ,बन्धपत्र व शतपूर्ति बन्धपत्र यात खोटी माहिती देवून जर फसवणूक केली असेल तर दिलेली अक्रुशिक परवानगी रद्दबादल होते का !

Question by gopal thenge
20-05-2015
gopalthenge34@gmail.com

शेताला जाणारा रस्ता आडवला तहसील कार्यालयात application दिले.पण ते काही कारवाही करत नाही. आता रस्तासाठी काय करावे.?
आपण माम्लेतदार कोर्ट अक्ट १९०५ च्या कलम ५ प्रमाणे , तहसीलदार यांचे कडे दावा दाखला करा .
मात्र अडवलेला रस्ता , वहिवाटीचा , पारंपारिक व शेतीसाठीचा असला पाहिजे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय साहेबांना नमस्कार
माझ्या आजोबांनी 4/5/1966 ला त्यांच्या नावे असलेली 1 हे 2आर पैकी 40 आर ईतकी शेतजमिन रू 1500 ला खरेदी खत करून अ या ईसमास दिली आहे, पण आता पर्यंत फेरफार नोंद झालेली नाही. आज रोजी माझे आजोबा व अ हि व्यक्ती जिवंत नाहीत व साक्षीदार देखिल जिवंत नाही आज रोजी माझे वडील देखील जिवंत नाही. आज रोजी 7/12 वर माझी आई, मि आणि माझ्या लहान भावाचे नावे असून पिक पाहणी खुद्द अशी आहे. अ या ईसमाच्या वारसा कडे फक्त खरेदी खत आहे. आज जमीनीवर माझाच ताबा आहे. तरी त्या खरेदी खतामुळे मला काही धोका आहे का? जमीनीवर ते हक्क दिखावू शकता का? जर त्यानी दावा केला तर ते जमिन मिळवू शकता का?
मंगेश्जी
जमीन विकलेली आहे . त्यामुळे निश्चितच त्यांचा अधिकार आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब,
खातेदारांच्या नवे ७/१२ झालेले आहेत परंतु वडील व त्यांची ४ भाऊ यांना शेती करणे सुलभ जावे म्हणून गटा प्रमाणे ताबा घेवून ती करू लागले त्यामुळे आमच्या नावे असलेल्या ७/१२ ची जमीन काकांच्या ताब्यात आहे. आत्ता ताब्याप्रमाणे ७/१२ करून घ्यावयाचे असल्यास काय करावे लागेल? त्यास काय खर्च येतो? मार्च महिन्या पासून एकत्र कुटुंबाचे वाटप पत्र किवा समझोता करार ५०० रुपयाच्या स्टम्प पेपर वर करता येतो असे वाचनात आले, ते खरे आहे का? असल्यास त्याचा आम्हाला कसा उपयोग करता येईल ? जागेचा ७/१२ व ताबा एका कडे नसल्याने सतत होणारे वाद कसे थाबवता येतील? आमच्या ताब्यातील जमीन काकांनी नावी सल्याने विक्री केल्यास काय करता येईल?

कळावे,
आपला कृपाभिलाशी
ताब्याप्रमाणे जमीन नावावर करण्यासाठी exchange Deed करा .
आपापसात अडला बदल असल्याने , मुन्द्रंक शुल्क कमी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

७/१२ वर इतर अधिकारामध्ये ५ बहिनींची नावे असताना मूळ मालक सदरी असलेल्या २ भावाकडून १९८६ मध्ये शेतजमीनीचे खरेदीखत केले आहे. त्यावेळेस फेरफाराची नोंद घेताना त्यांना तलाठ्यामार्फत नोटीस बजावली असताना इतर हक्कातील अधिकार कायम ठेवून नोंद कायम करण्यात आलेली आहे. तेव्हापासून इतर अधिकारातील लोक काहीही म्हटले नाही. परंतू आता ते आपला अधिकार आहे. असे लोकांना सांगतात, तर मला इतर अधिकारातील नावे काढण्यासाठी काय करावे लागेल. ती नावे निघतील का?
बहिणीची नावे इतर अधिकारात असण्याचे कारण काही नाही. त्याचे नवे कब्जेदार सादरी असणे आवश्यक आहे. बहिणीचा मिळकतीत हक्क आहे .
त्यांची नावे कमी करता येणार नाहीत
त्यांनी त्यांचा हिस्सा आपणास विकणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बहिणीची नावे इतर अधिकारात असण्याचे कारण काही नाही. त्याचे नवे कब्जेदार सादरी असणे आवश्यक आहे. बहिणीचा मिळकतीत हक्क आहे .
त्यांची नावे कमी करता येणार नाहीत
त्यांनी त्यांचा हिस्सा आपणास विकणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय साहेबांना नमस्कार
माझ्या आजोबांनी 4/5/1966 ला त्यांच्या नावे असलेली 1 हे 2आर पैकी 40 आर ईतकी शेतजमिन रू 1500 ला खरेदी खत करून अ या ईसमास दिली आहे, पण आता पर्यंत फेरफार नोंद झालेली नाही. आज रोजी माझे आजोबा व अ हि व्यक्ती जिवंत नाहीत व साक्षीदार देखिल जिवंत नाही आज रोजी माझे वडील देखील जिवंत नाही. आज रोजी 7/12 वर माझी आई, मि आणि माझ्या लहान भावाचे नावे असून पिक पाहणी खुद्द अशी आहे. अ या ईसमाच्या वारसा कडे फक्त खरेदी खत आहे. आज जमीनीवर माझाच ताबा आहे. तरी त्या खरेदी खतामुळे मला काही धोका आहे का?
होय .
अ या इसमाचे वारस मिळकतीत हक्क सांगू शकतील व त्यांचा मिळकतीत हक्क आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

२००५ नंतर एक अपत्य असेल व नंतर जुळे (twins) जन्मले तर Maharashtra Civil Services(Declaration Of Small Family)Rule, 2005 चा भंग होतो काय ?
सर, झाडे तोडताना परवानगी कोणाची घ्‍यावी. ?
अधिसूचित वृक्ष असेल तर , वन क्षेत्र पाल यांची परवानगी आवश्यक
अधिसूचित वृक्ष म्हणजे
आंबा , हिरडा , साग , कांदळ वृक्ष, शिसम , फणस , तिवस असे २४ वृक्ष

या वृक्षांपेक्षा अन्य वृक्षांची तोड करायची असेल व असे वृक्ष
१. पाण्याचा प्रवाह , तलाव या पासून ३० मीटर अंतर्मधील असतील
२. वृक्ष मृत झाले असतील/ पिंकाचे वाढीवर वृक्षमुले परिणाम होत असेल
३. प्रती एकर २० पेक्षा झाडांची संख्या कमी होतअसेलतर

जिल्हाधिकारी / तहसीलदार यांचीपरवानगीआवशयक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
एका गावाचे दोन गाव झाल्यावर ७/१२
नंबर बदलला तर खाता नंबर पण बदलतो का
Sir mazya sasare yachi set jamin movaja jila washim yete sarve nuber 317 hi 1 hektar hoti tyatil 50 gute tyani vikali ani bakichi hoti ti 50 gunte tyache bhau yani tyana n vicharta apalya navi karun ghetli ahe 7/12 var maze sasare yace nav nasun tyache bhavache ahe ata amala ti jamin part ghaychi ahe tar ami kay karave
आपला प्रश्न नित समजत नाही ................परंतु आपल्या सासर्याने जर जमीं विकली असेल व सासर्याचे भावाने बाकीची तितकीच जमीन त्याचे नावावर केली असेल व दोनीही व्यवहार संमतीने झाले असतील तर ते ठीक वाटतात

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by jitendra patil
14-05-2015
jitendrapatildc@gmail.com

नमस्कार, कालच मी या साईटवर जाॅईन झालो पण प्रोफाईल मधील काही नोंदी चुकीच्या होत आहेत. कृपया मदत करावी.
होम पेज वर उजव्या बाजूला Profile मध्ये Edit Profile असा Option आहे. त्यात जावून आवश्यक ते बदल करता येतील. धन्यवाद .

Reply by MCS Maharashtra | इतर

Question by ravikiran
14-05-2015
ravikirana510@gmailcom.

amachi set jamin mojayachi ahe kagadapatre konate lagatil Record la 48 gunthe ahe pan 45 50 varapasun shajari 5 gunthe ahe te nahi manatat mag amhi kay karu court dava dakhal kela tar jamin milu shekela ka?? prosijar kay kay ahet ani jaminisathi police bandobast milel ka?? krupua mahiti dya
आपले प्रश्नावरून ७/१२ सादरी असलेले ४८ गुंठे क्षेत्र , प्रत्यक्ष वाहिवती खाली नाही असे दिसून येते . जे क्षेत्र ७/१२ नमूद क्षेत्रकमी आहे , त्या वर शेजारील खातेदाराची वहिवाट आहे .
असी वस्तुस्थिती असेल तर , आपणास न्यायालाय्त दावा दाखल करावा लागेल
मोजणी केली आणि हे दिसूनआले कि , 5 गुंठेक्षेत्र शेजारीलखातेदाराचे वाहिवतीखाली आहे , हि बाब न्यायालयाचे निदर्शनास आणून दया

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपला प्रश्न नित समजत नाही..............तरीही आपल्या प्रश्नाच्या अंदाजावरून खालील माहिती देत आहे

१) शेत मोजणीस .....अर्ज , ७/१२, शेजारील सर्व जमिन्धाराकांची नवे व पत्ते , गट नकाशाची छायाप्रत इत्यादि पत्र लागतात आपण कृपया तालुका मोजणी कार्यालयात संपर्क करावा .
२) आपल्या नावावर पूर्वीपासून जमीन असेल तर ती आपल्याला मिळू शकते ...........अर्थात त्याबाबत ताबा..जुने दस्त इत्यादि तपास्ल्यावरच वस्तुस्थिती उगाद होईल

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

एक्‍स व्‍यकतीने परगणा वतन इनामर्ग 5 च्‍या जमीनीची सहापट रक्‍कमभरलेमुळे सरकारचे नांव कमी करुन नवीन अविभाज्‍य शर्तीवर तबलीस न करणेच्‍या शर्तीवर जमिन मिळालेली आहे. सदर जमीन विक्री करावयाची झालेस महाराष्‍ट्र शासन‍ परिपत्रक क्रमांक /वतन/1099/प्र.क्र./233/ल-4 दिनांक 09/07/2002 प्रमाणे परवाणगी घ्‍यावी लागणार नाही अगर कसे याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
आम्ही एका गावातील एकूण १२ एकर जमिनीपैकी ११२ गुंठे जमिन सन २००८ मध्ये खरेदीखताने विकत घेतलेली असून सदर जमिन माझ्या पत्नीच्या नावे आहे.
सदर जमिनीचा मूळ एकच ७/१२ असून त्यावर सद्यस्थितीत १० नावे आहेत.
आम्हाला आता त्या जमिनीची विक्री करायची असून आमच्या हिश्श्याच्या ११२ गुंठे जमिनीचा वेगळा ७/१२ करुन घ्यायचा आहे.
त्यासाठी आम्ही उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मागील आठवड्यात सरकारी मोजणी करुन घेतलेली आहे.
तरी, आता वेगळा ७/१२ करुन घेणेसाठी पुढील प्रक्रिया काय आहे, याबाबत सखोल मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे.
मोजणी झालेली आहे . भूमी अभिलेख खात्याकडून आकारफोड पत्रक तयार केले जाईल .
तलाठी यांचे कडे सादर करा . तलाठी फेरफार मंजूर करण्याची कार्यवाही मंडळ अधिकारी यांचेकडून करून , स्वतंत्र ७/१२ तयार करेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

फाळणी १२ प्रक्रियेनुसार तुमचा ७/१२ वेगळा होईल............कृपया तसा अर्ज उपाधीक्षक कार्यालयात करा

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या चुलतयानी आत्या चे हक्क सोड पञ त्यांच्या नावावर करून घेतली व आता आत्याचा हिस्सा माझा आहे असे म्हणतात व आतया त्यांच्याच बाजुने साक्ष देत आहे मला फक्त माझ्या वडिलांचा हिस्सा देत आहे मी काय करू शकतो
नोंदणीकृत दस्ताने हक्क सोडला असेल तर तो खरा मानण्यात येतो .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

नोंदणीकृत दस्ताने हक्क सोडला असेल तर तो खरा मानण्यात येतो .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

नोंदणीकृत दस्ताने हक्क सोडला असेल तर तो खरा मानण्यात येतो .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

नोंदणीकृत दस्ताने हक्क सोडला असेल तर तो खरा मानण्यात येतो .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

प्ल्झ सर माझ हा problem solve करा
माझे आजोबा करुजी सन १९५२-५८ paryant शेती करीत होते tyancya नावानी कुल लागल आहे यांचा विवाह anajana बाई हिच्याशी झाला त्यांना २ मुले hoti ते सन १९५९ ला वारले त्यावेदेस हे २ मुल अज्ञान होते त्यानंतर त्या anjanabaai ने dirashi लग्न केल त्याचे नाव आहे मेंगाजी त्यांनंतर ती jamiण मेंगाला सन१९६०-६१ मध्ये ३८ प्रमाणे देच्लेअर झाली to सन २००१ मध्ये marn पावला tyala ७ मुले व २ मुली होत्या त्या सर्व ७ मुले व २ मुलीचे नाव त्या ७/१२ वर आहे पण आमचे नाव त्यांनी नाई टाकले
तर कृपया सर मला हे सांगा कि त्य शेती वर आम्ही कारुचे २ मुले ह्यांना ती पूर्ण जमीन मिडेल का कि त्यांच्या बरोबर वारसान म्हुणुन ७/१२ नाव चढेल का कारुचे मुल म्हणून अर्ध्या जमिनीचे मालक होता येते कृपया योग्य अशी मदत करा प्लेअसे please
कुल म्हणून केवळ करुजी कसत असेल व गाव अभिलेख सादरी केवळ करुजीचे नाव लागले असेल तर , या मिळकतीत केवळ आपला म्हणजे करुजीचे दोन मुलांचा हक्क आहे . मात्र कुल म्हणून करुजीचेवडिलांचे अथवा करुजीवमेंगाळ याचे नावअसेलतर , सर्वांचा समान हक्कआहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी सातारा येथील रहिवासी असून २००६ मध्ये मी गावामध्ये ३ भावांच्या मध्ये सामायिक असणारे घर यापैकी ५० % हिसा जो एक भावाचा होता तो घेतला. म्हणजे ३५ x १८ एवढी जागा घेतली, परंतु १ भिंत सामायिक असलेमुळे मला ३५ x १६ एवढीच जागा बांधकामासाठी उपलब्ध झाली आहे. आणि आता शिल्लक २ फुट जागेत त्या जागेच मालक स्वताची जागा आहे असे सांगतो, तरी त्याची भिंत काढून मला माझ्या जागेचा ताबा कसा मिळवता येईल. कृपया मार्गदर्शन करावे.
तीन भावांमध्ये सामायिक असलेले घरामध्ये , एका भावास १/३ हिस्सा मिळेल . १/२ हिस्सा (५०%) मिळणार नाही

आपण जर त्याही पेक्षा ५० % हिस्साघेतला असेल तर. , २फूट क्षेत्राकरता आपणास न्यायालयात दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

धन्यवाद सर, पण सहहिशेदार म्हणून काकासोबत आम्ही कागदोपत्री नोंद कशी करावी ?
माझी बहिण नगर परिषद मध्ये कार्यरत आहे .
नगर परिषदे मध्ये शासन निर्णय मध्ये २००० च्या निर्णयाप्रमाणे क्रमाचायला तीन अप्पते असल्यास प्धोन्नातीचा फायदा देता येते काय कोणते फायदा मिळत नाही नगर परिषद मध्ये तुकड्या कमी होऊन राहिल्या त्या मध्य सेनिओर कार्माचायला डावलता येते काय
कृपया नगरपालिका कार्यालयात किंवा नगर विकास विभागात चौलाशी करावी ...

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

sir
7 / 12 chya ether aadhikareat 'vane ' ha shera ahe tyche kharedekheat hiol ka....
१.इतर अधिकारात २२ अ चौकशीवर असा शेर असेल .
२.अथवा कब्जेदार सादरी वने असा शेर असेल .
३.किव्वा वनेतर कामास बंदी असा शेरा इतर अधिकारात असेल .

३ बाबत विक्रीस हरकत नाही . तथापि १ व २ , ची विक्री करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१.इतर अधिकारात २२ अ चौकशीवर असा शेर असेल .
२.अथवा कब्जेदार सादरी वने असा शेर असेल .
३.किव्वा वनेतर कामास बंदी असा शेरा इतर अधिकारात असेल .

३ बाबत विक्रीस हरकत नाही . तथापि १ व २ , ची विक्री करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir
majhya vadilancha mrutu
1969 v aaicha mrutu 1971 la mukkam anjarle taluka-dapoli dist-ratnagiri la jhala tar tyancha mrutu dakhala aata kuthe milel
जर ग्रामपंचायत येथे मृत्यू नोंद केली असेल तर दाखला मिळेल

अन्यथा ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यासाठी ग्रामपंचायत ला आदेशित करणेसाठी साठी तालुका न्यायालयात अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तलाठी यांना ३ वर्षानंतर सेवेत कायम करणेसाठी एस एस डी पास होणे आवशक आहे का

This page was generated in 0.38 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3