जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अभिजीत
16-08-2015
abhijitkadam55@gmail.com
महोदय,
माझ्या मालकीच्या असणार्या जमिनीतून १९८५ साली पुढील गावासाठी जाण्यासाठी तात्त्पुरत्या स्वरुपात रस्ता गेला. त्यानंतर तो डांबरी झाला.परंतू हा रस्ता जुन्या सर्व्हे नंबरच्या नकाशात व नवीन गट नंबरच्या नकाशातही नाही. कोणत्याही प्रकारचे भुसंपादनही झालेले नाही किंवा ७/१२ च्या इतर हक्कातही तशी नोंद नाही. तर या रस्त्याच्या जमिनीवर कायदेशीर मालक म्हणून माझा हक्क आहे का? आणि रस्त्यासाठी गेलेली जमीन परत मिळविण्यासाठी कोणता कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल? मार्गदर्शन व्हावे.
Question by अभिजीत
16-08-2015
abhijitkadam55@gmail.com
माझ्या मालकीच्या जमिनीतून नवीन कालवा (सन २०१० साली) गेला आहे. प्रत्यक्षात तो २०१४ ला पूर्ण झाला व २०१५ साली पाणी आले.परंतू कलम ४(१) नोटीस भुसंपादन विभागाकडून व्यपगत झालेली आहे. तर या भुसंपादनाला नवीन भुसंपादन कायदा लागू होऊ शकतो का? तसेच याच जमीनीतीतून आधीच्या प्रश्नात सांगितल्याप्रमाणे रस्ताही गेलेला आहे. तर कायद्यानुसार वेगळ्या दोन प्रकल्पांसाठी एकाच शेतकर्याची जमीन भुसंपादित करता येते का? येत असेल तर तो माझ्यावर अन्याय नाही का? कृपया मार्गदर्शन व्हावे.
Question by Sachin Tryambak Javale
15-08-2015
sachin19121981@gmail.com
सप्रेम नमस्कार माझ्या आजींच्या नावे आमचे राहते घर व शेतजमीन होती.आजींच्या निधनानंतर घर व शेताला दोन वारसदार होते. माझे वडील व काका. आता वडील ह्यात नाहीत. त्यामुळे माझी आई(वारस:मी) व काकाच्या नावावर सध्या ही मालमत्ता आहे. आमची 17 गुंठे शेती आहे. आईचे म्हणणे आहे की,मी ह्यात असेपर्यंत शेती व घराची वाटणी करून टाकावी. काकुंचा स्वभाव खूपच वाईट आहे.माझ्या हिष्यावर त्यांचा डोळा आहे."कांकाना कुठेही सह्या करायला पाठविणार नाही,असे काकू बोलल्या आहेत".काका व्यवहराबद्दल माझ्याशी बोलत नाही व काकू मारायला करते. मला नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागले,आता गावी काका व काकू राहतात. 1)घराचा आमचा हिस्सा आमच्या(आई व वारस:मी) ताब्यात आहे.घर कॅमेटीची पावती आता काकांच्या नावे येत आहे.आमच्या नावानेघर कॅमेटीची पावती मिळणेसाठी व ८अ उतारामिळणेसाठी काय करावे लागेल.
2) आमच्या प्रकरणमध्ये तडजोड करणे शक्य नाही. सदर शेतजमीन 17 गुठे टुकड़ा आहे. त्यामुळे खातेफोड करता येनार नाही.मला त्यांच्याशी व्यवहार करायचा झाल्यास योग्य तो मोबादला मिळणार नाही. तसेच ते पण मला शेत् घेऊ देणार नाही. सदर शेत् जमीन टुकड़ा असल्याने कायद्याने वाटनी करण्यास प्रतिबंध आहे. परंतु वारसास वारस हक्क मिलने हा कयदेशिर प्रश्न असल्याने मी प्रयत्न करीत आहे. मला त्यांचा स्वभाव चांगला असता तर तडजोड करायला हरकत नव्हती. या प्रकरणात मला कुणाची मदत घ्यावी लागेल. आता मला हे प्रकरण कसे हाताळावे ,त्याबद्दल योग्य मार्गदर्शन हवे आहे.
आपण न्यायालयात , शेती व घर याचे वाटप करून मिळणे बाबत दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुनिल मुरकर
14-08-2015
murkar@outlook.com
नोंदणीकृत वाटप म्हणजे काय?
Question by गणेश सुभाष माजरेकर
14-08-2015
mjrkrganesh@gmail.com
वारस तपास बद्दल माहिती व सेवा हमी विधेयकानुसार कालावधी वारस तपासाचा देण्यात यावा....
Question by राहुल पाटील
14-08-2015
patilrb10@yahoo.com
आमच्या आजोबांच्या १९६७ पूर्वीच्या जन्म नोंदी ह्या जात म्हणून ' कु ' लागलेल्या आहेत व कुठेही 'कुणबी' अशी जन्म/मृत्यू नोंद नाही परंतु संक्षिप्त असलेल्या 'कु' या नोंदीच्या आधारे २०१० पूर्वी आमच्या संबंधितानी 'कुणबी' या जातीचे दाखले काढले आहेत तरी 'कु' या नोंदीद्वारे 'कुणबी' जात स्पष्ट होत असेल तर त्या विषयी शासन निर्णय ,परिपत्रक, न्यायालयीन निर्णय इ. माहिती मिळावी
Question by दिपक गोरे
13-08-2015
shivajikb17@gmail.com
सर नमस्कार मी 25 वर्षाच्या पुर्वी दोन एकर जमीन खरेदी केली होती फेरफार करून सातबारा ला माझे नावे दोन एकर क्षेञ आहे पण खरेदी खतामध्ये क्षेत्राचा उल्लेख नाही जमीन देणारा मयत आहे पण त्याचे वारस म्हणतात आम्ही तुम्हाला जमीन विकली नाही घान ठेवली आहे तसे अपिल त्यांनी तहसिलदार यांचेकडे केले आहे काय करावे सविस्तर माहिती द्यावी हि विनंती
खरेदी खतामध्ये क्षेत्राचा उल्लेख नसणे अपेषित नाही. खरेदी खताची मुल प्रत तपासून पहा.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by माधव naik
13-08-2015
madkholmetwadi@gmail.com
मला हे विचारयाचे आहे कि माझे वडील शासकीय कर्मचारी होते ते सेवानिवृत्त झले आहे व त्याचा मृत्यू देखील झला आहे तर मला त्यांचा सिर्वीस
पुस्तकाची कोपी कार्यालय कडे मागू शकतो का ?
Question by गणेश सुभाष माजरेकर
13-08-2015
mjrkrganesh@gmail.com
साहेब, सध्याच्या सेवा विधेय़क कायद्यानुसार वा राईट टू सर्व्हैस द्वारे वडिलांचे नाव सात-बारा उता-यावरती असल्यास मुलांची वा पत्नीचीं नावे अर्ज केल्यानंतर कीती दिवसात लावली जातात. व या वारस तपासची प्रकीया देण्यात यावी.धन्यवाद.
Question by गणेश सुभाष माजरेकर
13-08-2015
mjrkrganesh@gmail.com
मयत वडिलांचे सात-बारावरती नाव असल्यास त्याच्या मुलांचे व पत्नी चे नाव लागण्यास सध्याच्या राईट टू सर्व्हीस कींवा सेवा हमी विधेयकानुसार कीती दिवस लागतात. व त्याची प्रक्रीया सांगावी
Question by सुनिल मुरकर
13-08-2015
sunilmurkar@gmail.com
कृपया मार्गदर्शन करावे.
माझ्या चुलत आजी ने चुलत आजोबा वारल्या नंतर तिची वडलोपार्जित मिळकत तिने आणि तिच्या मुली ने (म्हणजेच चुलत आत्त्याने) १९८९ मध्ये स्वताच्या वा चुलत आत्त्या च्या नावे न करता माझ्या काकांच्या नावे करून दिली होती. त्यानंतर २०११ मध्ये आम्हीही तिच्या वडलोपार्जित मिळकतीत सहहीशेदाराची नावे लावण्यासाठी तलाठी कडे प्रतिज्ञा पत्रा सहित अर्ज केला, त्यावर तलाठ्याने आजी आणि चुलत आत्त्याला तसेच काकांना, माझ्या वडिलांना, सख्या आत्यां ना सहहीशेदारा च्या नोटिसा पाठवल्या त्यावर फक्त माझ्या काकांनी हरकत घेतली. माझ्या काकांनी हरकत घेतल्यावर पुन्हा तलाठ्याने सगळ्यांना नोटीसी पाठवून त्याची सुनावणी मंडळ अधिकारी कडे केली. माझ्या काकांनी हरकती वर काकदी पुरावे न दिल्याने मंडळ अधिकारी ने आमच्या नावांची सहहीशेदार म्हणून नोंद केली. त्यावर काकांनी पुन्हा अपील केले परंतु काकदी पुराव्या अभावी उप विभागीय अधिकारी, कणकवली यांनीही काकांचे अपील फेटाळले.
चुलत आजी आमच्या कडेच राहत होती, आता चुलत आजी वारल्या नंतर चुलत आत्त्याला आणि तिच्या मुलींना त्यांच्या आजी ची मिळकत मिळू शकते का ? त्यांची आजी चे हिशेदार म्हणून नोंद होऊ शकते का? त्यांचे त्याच्या आजीच्या वडलोपार्जित मिळकतीवर त्यांचे हक्क आहेत का? चुलत आत्त्या वा तिच्या मुली फक्त काकांना मृत्युपत्र/बक्षीस पत्र/खरेदी पत्र कायदेशिररित्या देऊ शकते का?
आम्ही कसलेही मृत्युपत्र केलेले नाही. अजूनही चुलत आत्याचे तसेच तिच्या मुलींची नावे ७/१२ वर नोंद नाही.
Question by शशिकांत रामचंद्र नाचण
12-08-2015
vsn2577@gmail.com
मुलीचे वडिलोपार्जित जमीन मिळकत पहिला विवाह झाला व पती पासून मुलगा झाला पती मयत झालेनेंतर मुलगी वडिलाकडे परत आली तदनंतर दुसरा विवाह केला वडील मयत वारसाने मुलीचे नाव दाखल मुलगी मयत झालेनंतर दुसय्रा पतीचे मुलाने आईचे मिळकती मध्ये ( वाडवडिलोपार्जित ) वारस नोंद करणेसाठी तलाठी कडे अर्ज दिला तलाठीने वारस पंचनामा करताना दुसर्या पतीपासुंचे मुलाचे वारस तपास करून फेरफार वर नोंद घेतली सदर फेरफार वर पहिल्या पतीचे मुलाने हरकत गेतली सदर फेरफार मध्य निर्णय गेताना वारस तपास अपूर्ण म्हणून नोंद रद्द करावी अगर कसे अथवा पंचनामा प्रमाणे मंजूर करावी
Question by राजेंद्र पाटील
10-08-2015
patil.rajendra27@gmail.com
एक्स गांवातील सरपंच पदावर इतर मागासवर्ग हे आरक्षण पडले आहे. सदर सरपंच पदावर इतर मागासवर्ग राखीव असलेल्या गटातून निवडूण आलेल्या उमेदवाराचीच केवळ निवड होते अगर सर्वसाधारण गटातून निवडूण आलेल्या उमेदवार (जो इतर मागासवर्गीय आहे)ची निवड केली जाऊ शकते ? कृपया याबाबत माहिती मिळावी
hoy , ashi nivad hou shakate . matra nivadnuki purvi tyanna hamipatra dyave lagel ki 6 mahinyachya aat caste validity submit karin .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by Tushar Bhandwalkar
10-08-2015
tussh87bhand@gmail.com
सर, नमस्कार आमचे आडनाव भांडवलकर आहे पण पहिल्यापासून माजा आजोबांचे आडनाव सुतार आसे लागले गेले त्या नंतर माजा वडिलांचे पण तेच आडनाव लागले आहे परंतु वडिलांनी मला शाळेत घातले तेंवा भांडवलकर असे आडनाव दिले आता माजे कागत पत्र भांडवलकर नावाने आहेत यामुळे मला काही कागत पत्र देत असताना आडचन येते मला माग्रदर्शन करावे
आडनावा बाबत प्रथम शासकीय मुद्रणालयात राजपत्र तयार करावे नंतर शालेय बोर्ड मध्ये नाव दुरुस्ती बाबत अर्ज करावा.
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
Question by yogendra bawankar
09-08-2015
yogi.Bawankar90@gmail.com
जिल्हाधिकारी यांनी कबुलायात नवीन अविभाज्य शर्तीवर एका व्यक्तीस जमीन (भोह्वातदार वर्ग २ ) प्रदान केली.
सदर व्यक्तीने ही जमीन त्याचा आर्थीक अडचणी मुड़े दुसरयला विकली
१.सदर प्रकरणामध्ये शर्त भंगहोतो काय?? २.जर शर्त भंग होत असेल तर शर्त भंग नियमित करून जमिनीची विक्री करण्यासाठी काय करावे लागेल?
३.सदर जमिनीची विक्री करताना किती % नजराणा शासनास भरावा लागेल
Question by Pramod Shirke
09-08-2015
psshirke14@gmail.com
सर
माझे आजोबा यांच्या नावे वडीलोपार्जीत 10 एकर एवढी शेतजमीन आहे. आणि त्या जमिनीवर गेल्या महिन्यात आम्ही रू. 3,00,000/- एवढे बॅकेचे कर्ज घेतले आहे. सध्या आम्ही आजोबांच्या नावावर असलेली जमीन माझे वडिल यांच्या नावे करण्यासाठी बक्षीसपत्र तयार केले असता ते नोंदवून घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आम्ही गेलो असता त्यांनी आम्हाला जमीनीवरील बॅकेचा बोजा कमी करून आणण्याच्या सुचना केल्या आहेत.
1. बॅकेचा बोजा कमी न करता दस्त नोंदवून घेता येईल का
2. बोजा कमी न करता दस्त नोंदवून घेण्याबाबत दुसरा उपाय सुचविण्यात यावा.
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ मधील कलम ५२ ला अधीन राहून विक्री होऊ शकते. दुयाम निबंधक याचेकडे कलम ५२ बाबत विचारणा करा.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by शिवाजी choudhari
09-08-2015
shivajiuchoudhari@gmail.com
महोदय,
माझ्या वडिलांच्या नावावर असणाऱ्या जमिनीवर आमच्या गावातील व्यक्तीने कुळकायदा लाऊन अधिकार दाखवला. सदरील जमिनीच्या सातबाऱ्यावर आम्ही सर्व वारस असून सदरील व्यक्ती कुल आहे. सदरील व्यक्तीने ती जमीन विकली आहे. सदरील जमिनीची विक्री आम्हाला डावलून कशी काय झाली आणि सदरील जमीन हि माळरान असताना त्या जमिनीवर कुळकायदा लाऊन अधिकार प्राप्त करू शकतो का.
Question by माधव naik
08-08-2015
madhkholmetwadi@gmail.com
माननीय सर धन्यवाद मागे दिलेल्या प्रश्नाचे उत्तरे मिल्ल्ळे माल असे विचारे आहे कि सेवा निवृत्त होऊन कर्मचार्याला शाशकीय वसाहतीत अधिक काळ राहिल्यास डुबल भाडे द्यावे लागते का ? व का? असा कोणता जीआर निघाला आहे का व कोणत्या साली निगाहाला असावा आपण मला माहिती द्याल का?आपपल्या उत्तराची मी वाट Pahen
Question by सुनील पडवळ
08-08-2015
sunilpadwal395@gmail.com
भूसंपादनासाठी माझी ३ एकर जमीन सरकारने घेतली पण मी ३ एकर चे सरकारी मोबदला घेतला नाही व मिळाला नाही तर ती जमिनीसाठी मी कोर्टात न्याय मघु शकतो का
होय , मात्र त्या पूर्वी तुम्हाला कलम ४ व त्या नंतर च्या नोटीस बजावल्या गेल्या आहेत का ? विशेष भूसंपादन अधिकारी कोण आहेत ( पदनाम ) , तसेच हि जमीन एखाद्या स्थानिक प्राधिकरण उदा . नगर पालिकेचे हॉस्पिटल ई साठी संपादित आहे का ? या सर्व बाबीची माहिती काढून संबंधित विभागास ,स्थानिक प्राधिकरण ई , स tप्रतिवादी करावे लागेल . भूसंपादन अधिनियम १८९४ पाहावा . स्थानिक प्राधिकरणा साठी town planning act पाहावा .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by सुवर्णा पालवे
07-08-2015
adv.palve@gmail.com
मौजे नांदगाव येथे तुकडेबंदी कायद्यानुसार किती क्षेत्राला तुकडा असे म्हणता येईल
पर्मान्भूत क्षेत्राच्या बाबतीत उप अधीक्षक कार्यालयात अधिसूचना ठेवलेली असते.त्याचे अवलोकन करावे .
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
पर्मान्भूत क्षेत्राच्या बाबतीत उप अधीक्षक कार्यालयात अधिसूचना ठेवलेली असते.त्याचे अवलोकन करावे .
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by कैलास उंडे
07-08-2015
kailasunde@gmail.com
सर,जर एखाद्याने बातिस्मा करून घेतले असेल तर त्याला पूर्वी असलेल्या जातीचा व त्या जातीच्या दाखल्यावरून त्याला सवलत किंवा उपभोग घेता येतो का ?
Question by धीरज
07-08-2015
dhiraj.a.sonawane@gmail.com
आम्ही आमची जागा विकसित करण्यासाठी बिल्डर ला दिली आहे , तर बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर आणि सगळी घरे विकल्यानंतर बिल्डिंग च्या टेरेस वर बिल्डर चा काही हाक्क राहतो का ?
Question by दिनेश विष्णू दाभोलकर
07-08-2015
dinesh.dabholkar@rediffmail.com
आमचे चुलत काका आणि त्यांचे पूर्ण कुटुंब आम्हाला हक्क सोड पत्र देण्यासाठी तयार आहेत पण आमची जमीन सामायिक आहे आणि घर हे आजीचा नावावर असून ती मयत आहे तसेच या सामायिक जमिनीमध्ये पूर्वीपासूनची सर्वाची नावे आहेत .
तर हक्क सोड पत्र कोणाच्या नावाने देले पाहिजे किवा हक्क सोड पत्रासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे .
हयात असलेल्या व्यक्तीचे नावे ७/१२ वर कायम करून घ्यावे. ओ नंतर हकसोड लेख दुय्यम निबंधक यांचे कडे नोद्वावा.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by कैलास उंडे
07-08-2015
kailasunde@gmail.com
नमस्कार सर, जर एखाद्याने पूर्वी एस.सी जातीचा दाखला काढलेला असेल व नंतर त्याने बाप्तिस्मा म्हणजेच धर्मांतर करून ख्रीच्चन असेल तर त्याला पूर्वीच्या एस.सी जातीच्या प्रमाण पत्राच्या आधारे सवलत व उपभोग घेता येती का ?
Question by Sunil Murkar
07-08-2015
sunilmurkar@gmail.com
माझ्या चुलत आजी ने चुलत आजोबा वारल्या नंतर तिची वडलोपार्जित मिळकत तिने आणि तिच्या मुली ने (म्हणजेच चुलत आत्त्याने) १९८९ मध्ये स्वताच्या वा चुलत आत्त्या च्या नावे न करता माझ्या काकांच्या नावे करून दिली होती. त्यानंतर २०११ मध्ये आम्हीही तिच्या वडलोपार्जित मिळकतीत सहहीशेदाराची नावे लावण्यासाठी तलाठी कडे प्रतिज्ञा पत्रा सहित अर्ज केला, त्यावर तलाठ्याने आजी आणि चुलत आत्त्याला तसेच काकांना, माझ्या वडिलांना, सख्या आत्यां ना सहहीशेदारा च्या नोटिसा पाठवल्या त्यावर फक्त माझ्या काकांनी हरकत घेतली. माझ्या काकांनी हरकत घेतल्यावर पुन्हा तलाठ्याने सगळ्यांना नोटीसी पाठवून त्याची सुनावणी मंडळ अधिकारी कडे केली. माझ्या काकांनी हरकती वर काकदी पुरावे न दिल्याने मंडळ अधिकारी ने आमच्या नावांची सहहीशेदार म्हणून नोंद केली. त्यावर काकांनी पुन्हा अपील केले परंतु काकदी पुराव्या अभावी उप विभागीय अधिकारी, कणकवली यांनीही काकांचे अपील फेटाळले.
चुलत आजी आमच्या कडेच राहत होती, आता चुलत आजी वारल्या नंतर चुलत आत्त्याला आणि तिच्या मुलींना त्यांच्या आजी ची मिळकत मिळू शकते का ? त्यांची आजी चे हिशेदार म्हणून नोंद होऊ शकते का? त्यांचे त्याच्या आजीच्या वडलोपार्जित मिळकतीवर त्यांचे हक्क आहेत का? चुलत आत्त्या वा तिच्या मुली फक्त काकांना मृत्युपत्र/बक्षीस पत्र/खरेदी पत्र कायदेशिररित्या देऊ शकते का?
आम्ही कसलेही मृत्युपत्र केलेले नाही. अजूनही चुलत आत्याचे तसेच तिच्या मुलींची नावे ७/१२ वर नोंद नाही.
आपले प्रश्नात आपण मंडळ अधिकारी यांनी सह हिस्सेदार म्हणून नोंद केली व उप विभागीय अधिकारी यांनी काकांची अपील फेटाळली असे नमूद केले आहे . त्यानुसार नावे नोंद का झालेली नाहीत. ते तपासा . ७/१२ वर नाव नोद झाल्यावर पुढील दस्त करता येईल .
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
