जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by नलवाडे पंडीत सुर्यकांत
19-09-2015
nalwadepandit241189@gmail.com
सर आपल्या महाराष्ट्र सिव्हील सर्व्हीसेस मध्ये नविन खाते तयार केलेले आहे तरी माझा पासर्वड कधि मिळणार
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
19-09-2015
ravindra.golesar@rediffmail.com
१] मृतुपत्राच्या आधारे सध्याच्या वारस नोंद मध्ये फेराफार वारस नोंद करता येईल का २] मृत्यू पत्रात वडिलांनी मुलीला जमीन हिस्सा दिला नाही [ वडिलोपार्जित स्वकष्टित ] तर मुलीला जमीन हिस्सा मिळूशक्तो का ३] जमिनीची वाटप होण्यासाठी भावाने कोर्टात दावा दाखल केला व त्याच जमिनीत घर व संडास बांधले आहे तक्रार कोणाकडे करावी
१. होय
२. मृत्य पत्राने जर हिस्सा दिला नसेल तर , काही करता येणार नाही .
३.मृत्य पत्राने , भावाचे नवे जमीन झाली आहे . भाऊ जमिनीचा मालक आहे . त्याचे मालीकीचे जमिनीत तो बांधकाम करू शकतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by jagadis padamawat
19-09-2015
mehtaj40@gmail.com
Marathwada mukti sangramatil...swatntrya senikanchya..namnirdeshit palya sathi naukri sathi maharastra sashnane kontya prakarchi suvidha uplabhda keli aahe he ...kalwWe
Question by स्वाती स्वामी
18-09-2015
swati.swami@yahoo.com
एन.ऐ . अर्ज स्वीकारताना अर्जदार यांचेकडून ७/१२ , ८ अ , ले आओत , मोजणी नकाशा च्या प्रती ८ किंवा आवशयक प्रती मागणी करता येतील का ?
जमिनीचे अधिकार अभिलेख तपासण्यासाठी , हे अधिकार अभिलेख आवश्यक आहेत , आपण हे नमुने मागू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
18-09-2015
swati.swami@yahoo.com
एन . ऐ . आदेश मंजूर करणेसाठी कोणते शासन निर्णय आहेत ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
NA आदेश म ज म अ १९६६ चे कलम ४२ अ, ४४ च्या तरतुदीचे अनुषगाने दिले जातात .
ज्या zone मधील जागा आहे , त्या ठिकाणी , मागितलेला बिन शेती वापर अनुद्नेय असणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप नामदेव बोरले
17-09-2015
pradip.borle6226@gmail.com
तलाठ्याकडे अर्जदार/शेतकरी फेरफार नोंदीसाठी अर्ज, वारस/बोजा/विक्री/वाटणीपत्र/मृत्रुपत्राचा लेख व इतर कागद पत्र जोडून सादर करतात.त्यावर तलाठी कार्यवाही करतात जसे फेरफार नोंद घेणे;नमुना ९ व १२ ची नोटीस काढतात.त्या सर्व कागदपत्राची एक संचिका तयार होते.सदर संचिका फेरफार मंजूर झाल्यापासून तलाठी दफ्तरी किंवा अभिलेखागारात किती कालावधीसाठी जतन करावयाचा असतो.कृपया माहिती द्यावी.विशेषता नमुना ९ व १२ ची नोटीस. .
Question by प्रदीप नामदेव बोरले
17-09-2015
pradip.borle6226@gmail.com
महसूल कार्यालयीन पत्रे/चौकशी अहवाल यांचा जतन करण्याचा कालावधी किती असतो.कृपया माहिती द्यावी.
संबंधीत प्रकरणावर अवलंबुन आहे....उदा. अकृषक प्रकरणातील चौकशी अहवाल ब अभिलेख आहे
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by मगरे गणेश आत्माराम
17-09-2015
ganesh.magare@gmail.com
नमस्कार सर
सर शेजारील शेतकरी 2-3 वर्ष पासून भांडन करून वापरू देत नव्हता तक्रार करून तहशील दारानी रस्ता दिला....तरी ही तो 4 महिन्यापासून वापरू देत नहीं...के करु???please nkki marg sanga
त्याचे विरुद्ध पोलिस तक्रार दाखल करा
The Specific Relief Act, खाली त्याचे दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश कुंदेकर
15-09-2015
ndk1193@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या सर्व कुटुंबांना जागा जमीन आहे आणि फक्त आह्मालाच नाही? तर आमच्या जमिनीचा शोध कसा घायचा, यावर काही उपाय आहे का?
माझ्या आजोबाच्या भावांना आणि त्यांच्या मुलांना सुद्धा जमिनी आहेत आम्ही सोडून सगळ्यांना....
वडील लहान असतांना माझे आजोबा वारले आणि आजी पण वारली आहे..
या विषयावर आपल्या कडून काही माहिती मिळेल अशी अपेक्षा करतो....
जमिनीचा हिस्सा तुमच्या आजोबा किवा वडिलांच्या नावे नोंदवली गेली नसेल हि शक्यता आहे . तरीही खात्री साठी रेसर्वे पासून चे रेकॉर्ड तपासा .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by kapil ingle
15-09-2015
ingle.kapil50@gmail.com
dongari pramanpatra tehsil office marfat deta yete ka?wa pramanpatra देण्याची karyapadhati
Question by स्वाती स्वामी
14-09-2015
swati.swami@yahoo.com
एखादा कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहे .. तर त्या कर्मचारी यांची अर्जित रजा प्रतिनियुक्ती असलेल्या कार्यालयात मंजूर करता येईल का ? अर्जित रजेचा अर्ज मुल कार्यालयात मंजुरीसाठी पाठवावा लागेल का ?
Question by विशाल एकनाथ khairnar
14-09-2015
vishalkhairnar84@rediffmail.com
मी सदनिका खरेदी करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरलेले आहे सदर भरलेले मुद्रांक शुल्क किती दिवस वैध असते अथवा किती दिवसात खरेदी व्यवहार पूर्ण करणे बंधनकारक आहे
चार महिन्यात नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी , ज्यास्तीत ज्यास्त ८ महिन्यात ती पूर्ण करावी . अन्यथा आपली नोंदणी ( registration) होणार नाही
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by दुर्गादास जोशी
14-09-2015
dsjoshi26@yahoo.com
भूमी अभिलेख च्या वेब पेज वर ७/१२ ओपेन होत नाहीत .त्या साठी काय करावे लागेल .
प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटला लिंक दिली आहे......... तेथुन ओपन करा
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by संतोष नटवे
14-09-2015
santoshnatave@gmail.com
सर, मोजणीबाबत विचारलेल्या प्रश्नास मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद .
एखाद्या वर्ग 3 कर्मचा'याने त्याच्या सद्यस्थितीत कार्यरत कार्यालयात रुजू होण्यापुर्वी तो ज्या ठिकाणी कार्यरत होता त्या ठिकाणी एक महिना उशिराने राजीनामा दिला परंतु संबंधीत कार्यालयाने राजीनामा मंजूर न केल्यामुळे सदर कर्मचा'याने मॅटमध्ये अर्ज दाखल केल्यानंतर सदर कार्र्यालयाने जवळपास दोन वर्षानंतर कर्मचा'याचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यांनी सदर कार्यालयात राजीनामा दिल्यानंतर वेतन व भत्ते स्विकारले नाहीत. त्यामुळे संबंधीत कर्मचा'याचे वेतन व भत्ते अद्याप मंजूर केले नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
Question by गोकुल निषाद
14-09-2015
nishadgokul@gmail.com
सर....... मला माझ्या बहिनींनी हक्क सोडण्याबाबतचा लेख्ा लिहून दिलेला अाहे.व त्याबाबतची सब रजिस्टर कार्यालयात नोंद केलेली आहे. परंतू मला भविष्यात वारस हक्काने तिला हिस्सा द्यावयाचा असेल. तर मला हिस्सा देण्यासाठी कोणता लेख तयार करावा लागेल कृपया मार्गदर्शन करावे.
Question by अशोक टेकाळे
14-09-2015
ashoktekale17@gmail.com
सर नमस्कार मी विचारले होते की आम्हाला सरकार कडून चार एकर जमीन मिळालेली आहे सदर जमीन भोगवटादार वर्ग 2 वरून भोगवटादार वर्ग 1 झालेली आहे पण जमीनीचा आकार सातबारा वर येत नाही सातबारा वर आकार येणेसाठी काय करावे लागेल सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
Question by अमोल वाघ
13-09-2015
amolwagh6828@gmail.com
नमस्कार सर,
माझे आजोबा यांनी तारीख ६-१-१९५० रोजी खरेदी खताने सर्वे न. १ पैकी ११ गुंठे जमीन विकत घेतली. ५०/५१ ते ६२/६३ पर्यंत जमिनीचा सर्वे न.१/३ सातबारा उतारा निघत होता. एकत्रीकरण योजनेनंतर सातबारा निघत नाही. एकत्रीकरणा पूर्वीच्या हक्कनोंदीच्या पत्रका नुसार सर्वे न.१/३ ची नोंद आढळून येत नाही. आज रोजी सदर जमीन आमच्याच ताब्यात आहे. तरी सात बारा उतारा कसा मिळवावा.
एकत्रीकरण योजने मध्ये सर्वे न १/३ , अन्य इसमाचे ताब्यात गेली असेल .
त्या बाबत आपणास .अन्य जमीन मिळाली असेल .
आपण अपील करू शकता . मात्र अपील विलंब माफ होईल का या बाबत शाश्वती नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल वाघ
13-09-2015
amolwagh6828@gmail.com
नमस्कार सर,
नोंदणी महानिरीक्षक कार्यालय परिपत्रक ३८४६/२००५/७१० दि.१०-०५-२००६ कुठे बघावयास मिळेल.
www.igrmaharashtra.gov.in ह्या वेब साईट वर शासन निर्णय सदरात कृपया पहा
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल वाघ
13-09-2015
amolwagh6828@gmail.com
सर,
माझ्या जमिनीत जाण्यासाठी अधिकृत रस्ता नाही आहे. शेजारील जमीन मालकाचे आज रोजी त्याच्या जमिनीतून जाण्यासाठी कोणतेही हरकत नाही. त्यास कडे रस्ता ची मागणी असता रस्त्याच्या डबल जमिनीची त्याची मागणी असून ती देण्याची आमची तयारी आहे. दोघाचीही जमीन ही एकाच सर्वे न.मध्ये आहे. सातबारा उतारास नोंद करण्यासाठी काय करावे लागेल. सविस्तर माहिती द्यावी.
महारष्ट्र जमीन मह्सील अधिनियम १९६६ चे कलम १४३ प्रमाणे , आपणास आपले शेती वर जाने साठे , बांधावरून रस्ता मिळणे साठी , तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुजित चव्हाण
11-09-2015
sujitchavan456@gmail.com
सर १)आर टी एस म्हणजे काय व ते कुठे मिळते २)सर आमचे ३ एकर जमिन आहे त्याची सरकारी मोजणी झाली आहे क पत्र तयार झाले आहे जर आकार फोड झाले असेल तर वेगळा ७/१२ तयार होईल काय ३) ३ एकर मध्ये २ भाऊ होते ते मयत झाले दोघांच्या पन्ती सुद्धा मयत झाल्या १ नंबर त्यांना ४ वारस त्यांच्या मध्ये १.५ एकर जमिन व२ नंबर त्यांना पण ४ वारस तर वेगळा ७/१२ तयार होऊ शकतो का त्यासाठी काय करावे लागेल ४) सरकारी मोजणी झाल्या शिवाय आकार फोड तयार होत नाही का? ५)१ नंबर त्यांच्या वारसांना जमिन विकता येईल का? ५)२ नंबर यांच्या १.५ एकर जमिनीचे वाटप पत्र होते का? वाटप पत्र करणे महत्वाचे आहे का?
१. RTS म्हणजे record of Rights
2. आकार्फोड झालेवर ७/१२ वेगळा होतो
३. १.५ एकर जमीन म्हणजे ६० गुंठे
चार लोकांचे नावे, वाटप होईल . तुक्देबंदी कायद्याचा भंग होणार नाही
तथापि आपल्या जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र किती आहे याची माहिती घ्या व नंतरचा वाटप करा
अन्यथा तुक्देबाम्डी कायद्याचा भंग झाल्यास , जमीन शाषण जमा होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by VIKRAM YADAV
11-09-2015
vy11135@gmail.com
नमस्कार सर, धन्यवाद अप्पान माझ्या प्रश्नाचे उतार दिलाय्बदल .इक प्रश्न आहे कि हक्क सोडपत्र हुकुम होऊन सोडलेला हिस्सा ची नोंद ७/12 वर कराय्नायाचा अधिकार सर्कल अधिकारी यांना असतो का ?
Question by रोहिदास सखाराम पाबळे
11-09-2015
rohidaspable@yahoo.in
जमीन विक्रीचे अधिकार दिलेल्या कुलमुखत्यार ची मुदत किती वर्षे असते सदर कुलमुखत्यार कोणत्या कारणाने रद्द होईल
आता मुखत्यार पत्र नोंदणीकृत करणे आवश्यक आहे
मुखत्यार पत्रास मुदत नसते
मात्र आज्याने मुखत्यार पत्र करून दिले आहे तो , ते रद्द करू शकतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल सावंत
11-09-2015
sawantrahul1974@gmail.com
सर आमचे आजोबा वारल्यानंतर आमच्या मोठ्या काकांनी वारस तपासणी केली होती तेव्हा त्यांनी कुटुंब प्रमुक म्हणून आपले नाव सातबारावर मध्ये लावले आहे पण सातबारावर माज्या वाडिलांचे व लहान काकानचे नावे सातबारावर नाहीत . तरी आता आमचे मोठे काका वारलेले आहेत मोठ्या काकांच्या कुटुंबाकडून वारस तपासणी करीत असताना माज्या वडिलांचेहि नाव गाव नमुना ६क प्रमाणे वारस म्हणून लावन्यास ते चाल धक्काल करीत आहेत तर मी त्यांच्या शिवाय माझ्या वडिलांच्या नावाची गाव नमुना ६क प्रमाणे वारस तपासणीसाठी तळाठी कार्यालयात अर्ज करू शकतो काय ?
होय , आपण पूर्वीचा कुटुंब प्रमुख फेरफार घ्या व आपले नाव लावण्यास अर्ज करा . तरहि काम न झाल्यास प्रांत यांचेकडे अपील करा
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by विजय Chouguale
10-09-2015
vijaychouguale@gmail.com
सर आमच्या शेतात महावितरणचा मोठा टाॅवर उभा केला आहे तर आम्हाला प्रकल्पग्रस्थ असा दाखला मिळू शकतो का?
Question by संतोष नटवे
10-09-2015
santoshnatave@gmail.com
एखाद्या वर्ग 3 च्या कर्मचा'याची विभागीय चौकशी जिल्हाधिकारी यांनी पुर्ण करुन दोषमुक्त केले असेल तर पुन्हा नव्याने त्याच दोषारोपासाठी चौकशी करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक आहे का किंवा नियुक्त्ाी प्राधिकारी नव्याने चौकशी करु शकतात. कृपया मार्गदर्शन मिळण्यास विनंती आहे.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
