जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by bhrat borude
03-11-2015
bharatborude69@gmail.com

माझ्या आजोबांची व वडिलांची शेतजमीन १४.६५ हे होती, परंतु २/४१९९० मध्ये आजोबांनी व वडिलांनी तलाठी दफ्तरी अर्ज केला कि आमच्या वयो मानानुसार आमची जमिनीची देखभाल होत नाही म्हणून जमीन आमच्या मुले,सून ,नातू यांचे नावें करण्यात यावी नंतर तलाठी साहेबांनी खाते फोड केली (फेरफार नोंद-अर्जावरून व जंगल वहिवाटवरून नोंद केली)
१.सावत्र (मोठा)भाऊ २.० हे +पो ख १.१४ हे
२. सावत्र (मोठा)भावाची बायको २.० हे +पो ख १.१४ हे
३.मी स्वत(अ प क माझीआई):२.० हे +पो ख १.१४ हे
४.माझी आई १.० हे
५.आमचे वडील १.९९ हे +पो ख१.१६ हे
६. आमची आत्या १.०८ हे
असे विभागले असून नंतर आजोबा २.११.१९९० ला वारले नंतर वडिलांनी २००४ ला तलाठी दफ्तरी अर्ज केला कि माझ्या नावावर असलेले क्षेत्र पत्नीच्या नावें करण्यात यावे(फेरफार नोंद- तहसीलदार वाटप रजिस्टर २४८/२००४ प्रमाणे नोंद मंजूर) आता आईच्या नावावर २.९९+१.१६,माझ्या २.०+१.१४,भाऊ २.०+१.१४,वाहिनी २.०+१.१४,आत्या १.०८,असे क्षेत्र असून माझ्या वाट्यास कमी क्षेत्र आले आहे.
कब्जे वहिवाट प्रमाणे भावाकडे त्याचे व वाहिनीचे क्षेत्र(जमीन)त्याच्याकडे आहे व आईचे,आत्याचे व माझे क्षेत्र (जमीन)माझ्याकडे(आई,वडील व मी एकत्र राहतो)आहे,भाऊ विभक्त राहतो १९९० पासून.माझ्या वडिलांना पहिल्या पत्नीपासून
१ मुलगा
३ मुली आहेत
(पत्नी वारली आहे ~१९७०)नंतर माझ्या आई शी विवाह झालेला आहे ,एक मुलगा(मी) व २ बहिणी आहेत
माझा प्रश्न तुम्हाला असा आहे
१) आमची ७/१२ ,८ अ ला नोंद आहे परंतु भूमिअभिलेख ला नाही ,२०१४ लि मी पूर्ण गट मोजणी करून घेतलेली(भूमिअभिलेख) आहे
२) मला माझे क्षेत्र कसे घेता येईल (आई देण्यास तयार आहे परंतु भावाची संमती
लागेल का)
३) भाऊ आत्याची जमीन आत्या कडून(फसवणूक
करून) घेण्याच्या तयारीत आहे व मला कब्जा मागत आहे
.(आत्याला कोणीही वारस नाही)
५)भावाने त्याच्या हिश्यात नवीन घर बांधून त्याची नोंद ग्रामपंचायत
ला केलेली आहे माझ्या हिस्शात जुने घर वडिलांचे नावें आहे परंतु ते मोडकळीस आल्याने मी शेजारीच दुसरे नावें
घर बांधले आहे तेथे आई वडील राहतात मी नोकरी निमित दुसऱ्या गावी आहे,मला वडिलांचे नाव कमी करून माझे
नाव ग्रामपंचायत ला लावता येते का? ते कसे.
१.आपण मोजणीसाठी भूमी अभिलेख खात्याकडे अर्ज करा . मोजणी अंती वाहिवती प्रमाणे , भूमी अभिलेख येथे क्षेत्राची नोंद होईल
२. आत्या तिचे नावाची जमीन , आपले नावावर करून देण्यास तयार असल्यास , आपण तिचे कडून बक्शिश पत्र करून घ्या
३. आपणास कमी शेत्र आले आहे असे म्हणता येणार नाही
४. घराबाबत , आपण वादिलाकडून बक्षीस पत्र घेऊन , त्यास आपले नाव लाऊ शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by J. P. Bhopale
03-11-2015
medsto.darwha@gmail.com

मला माझ्या ७/१२ मध्ये भावाचे नाव टाकावयाचे होते आम्ही एकत्र कुटुंबात राहणारे असल्यामुळे तेव्हा आमच्या वडिलांनी माझ्या नावे शेत घेतले होते त्यामुळे मी शासकीय नियमानुसार चालान भरून माझ्या अर्ध्या शेती वरचा हक्क सोडून दुय्यम निबंधक कडे रजिस्टर केले व जमिनीचा तुकडा न पाडता सामाईक वाहितीत नोंदणी केली माझे काही चुकले का / चुकीची दुरुस्ती कशी करू
स्वतंत्र ७/१२ असला म्हणजे तुकडे निर्माण होतो असा नाही
उदा . आपले नावावर २५ गुंठे वर्कस क्षेत्र आहे . त्या पैकी अर्धे क्षेत्र आपण , भावाचे नावावर केले आहे
म्हणजे अप्क्ले नावावर १२.५ गुंठे व भाव्वाचे नावावर १२.५ गुंठे
जरी आपले डोंघांची नवे ७/१२ वर सह धारक म्हणून असली तर त्या मुळे तुकडा निर्माण झाला आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपल्या रक्ताच्या नातेवाईकाला स्थावर मालमत्तेची मालकी हस्तांतर करतांना आता स्टम्पशुल्क द्यावे लागणार नाही असा जी .आर निघाला आहे काय ?
सर्व मुद्रांक शुल्क माफ केले नाही ... कायद्यातील नाते असेल तर २०० भरावे लागतात....इतरांना पूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागते .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

२४ एप्रिल २०१५ रोजी मुद्रांक शुल्क कायद्यात तसा बदल केला आहे , पण तो ठराविक नात्यानाच आहे याची कृपया नोंद घ्यावी.

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by राहुल
02-11-2015
rahhul_111@yahoo.com

अतिरिक्त कार्यभार देल्यास आणि तो आपल्याला नको असेल तर त्यासाठी महाराष्ट्र सेवा नियमात कोणती तरतूद केलेली आहे व तो नाकारल्यास होणारी कारवाई काय आहे
आपणास अतिरिक्त कार्यभार नाकर्त येणार नाही
नाकारल्यास , शिस्तभंग कारवाई होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार
१९७४ चा जमिनीसंबधित फेर फार वर लबाडीने मुळ मालकाची नावे बदली करून दुसऱ्याची नावे तलाढ्यानी करून आज त्या जमिनीवर त्यांच्या वारसांची नावे आहेत तरी त्या जमिनीवर मुळ मालकांच्या वारसांची नावे करू शकतो का? माझे वय ४० आहे तरी अपिल कुढे व कसा करावा
आपले प्रांत अधिकारी यांचे कडे अपील दाखल करा .
अपील दाखल करण्यास झालेलेल्या विलंब बाबत सबळ कारण दया

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वडिलांचे वडिलोपार्जित जमिनीचे मृतुपत्र असून त्यात त्यांनी मुलीना जमिनी मध्ये काहीही हिस्सा दिलेला नाही. परंतु त्यांची नावे ७/१२ वरती वारस नोंद लागली आहे. मृतुपत्र प्रमाणे वाटणी करताना बहिणीचे हक्क सोड पत्र घ्यावे लागेल का ? किंवा बहिणींनी हक्क सोड पत्र नाही दिले तर चालेल का.
मालमत्ता हस्तांतरण कायद्या नुसार केवळ आपल्या हिस्स्या इतक्या वाट्या चे मृत्यूपत्र करता येयील.हक्क्सोद्पात्र करावे लागेल.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

माझ्या वडिलांच्या मुत्यूनंतर वारस तपासानुसार सात बारामध्ये नाव टाकण्यासाठी अर्ज करताना कोणकोणत्या माझ्या वडिलांच्या मुत्यूनंतर वारस तपासानुसार सात बारामध्ये नाव टाकण्यासाठी अर्ज करताना कोणकोणत्या ( आईच्या नावाचे प्रतिज्ञापत्र (100 च्या बाँडवरती). इतर वारसांची ओळखपत्रे, सरपंच पोलीस पाटिल दाखले , मुत्यू दाखला आदि पैकी कोणती कागदपत्रे तसेच दाखल्यांची निकट आवश्यकता असते. आणि जर का पोलीस पाटिल तसेस सरपंच दाखला देण्यासाठी वेळ काढूपणा करत तसेच नाही देत असतील काय करावे. कुठे तक्रार करावी.
कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही . आपणास फक्त वडिलांचा मृत्य दाखला, अर्ज समवेत जोडावा लागेल

तलाठी स्थानिक चौकशी करून , वारस पंचनामा करतात .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कुळवहीवाट शेतजमीन ४३ ची विक्री परवानगीसाठी ४० पट नजराणा रक्कम भरली असता सदर जमिनीवर निसप्र ची नोंद राहते का?
आदरणीय सर,अ व्यक्ती १९३० पूर्वी मयत झाल्यास सदर व्यक्तीस मुले नव्हती.3 मुली होत्या.पत्नीही पूर्वीच मयत झाल्याने ७/१२ च्या कब्जेदार सदरी १९३० सालच्या उताऱ्यास फक्त एका मुलीचे नाव असून अपाक.म्हणून चुलत्याचे नाव आहे.आज रोजी सदर जमीन तिऱ्हाईत व्यक्तीच्या नावे असल्यास वारसा हक्काच्या अधिनियम २००५ नुसार १९३० सालातील मुलीच्या वारसांना आता सदर जमिनीत हक्क सांगून हिस्सा मागता येईल का?त्यासाठी काय करावे लागेल ?
हिंदू वारसा कायदा १९५६ , अमलात येणे पूर्वी , मुलीना मिळकतीत हिस्सा नव्हता
माझे मते , हक्क मागता येणार नाही
तज्ञाचे अभिप्राय घ्यावेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

७/१२ सदरील इतर हक्कात बंडिंग तगाई असा शेरा दाखल असल्यास तो कमी करणेबाबत कोठे अर्ज करावा?त्याबाबत शासन निर्णय असल्यास कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
तगाई पूर्वीच माफ झालेली आहे . कृपया तहसील कार्यालयात संपर्क साधा . किंवा तगाई हि हजार रुपयेच्या वर सहसा नसते , जी असेल ती भरा व शेरा काढून घ्या.

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by Mahesh More
31-10-2015
mr.moremahesh@gmail.com

सर , ७/१२ उताऱ्यावर पोटखराब जमीन लावलेली नाही तर पोटखराबा लावता येतो का ? जमिन वडिलोप्राजित आहे व शेजारी डोंगर आहे
पोट खराबा , लागवडी लायक झाले वर त्या प्रमाणे , क्षेत्र दुरुस्ती करता येते
मात्र मुल जमाबंदी मध्ये न लावलेला , पोट खराबा , ७/१२ सादरी लावणे बाबत तरतूद नसावी
अर्ज करावा . जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

औद्योगिक क्षेत्रात शेतकऱ्यांच्या जागेत निवासी इमारती बांधावयाच्या असल्यास कोणाची परवानगी लागेल?त्याबाबत काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांची परवानगी घेणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मला काही प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारायचे आहेत जर जमीन मालक हा मृतू झाला असेल आणि त्याची जमीन हि नावावर केलेली नसेल आणि त्याच्या मृतुनंतर जर त्याची वाटणी झाली तर त्याचा वाटणी चा हिस्सा हा त्याचा वारसाला मिळाला आणि त्या वारसांनी जर ती जमीन दुसर्या ला विकली तर त्या जमीन खरेदी करणाऱ्या वक्तीला खरेदी खात बनवताना त्या वारसाचा वडिलांचे मृतूचा दाखला द्यावा लागतो का आणि तो जर नाही दिला तर खरेदी खात बनू शकते का आणि जर मृतूचा दाख्लायाशिवाय खरेदी खात बनवले तर काय होऊ शकते मला या प्रश्नाचे उत्तर द्यावे हि आपल्या कडे विनंती
जमीन मालक मयत झाला आहे . वारस यांची नवे ७/१२ सादरी दाखल आहेत . त्या मुले वारसांकडून जमीन खरेदी करण्यासाठी , मुल मालकाचे मृत्य दाखल्याची आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,शेतजमिनीची सरकारी मोजणी केली असता ७/१२ पेक्षा ६ आर क्षेत्र जास्त भरते त्याबाबत आजूबाजूच्या कोणत्याही शेतकऱ्याची हरकत नाही .तर मोजणी नकाशावरून ७/१२ सदरी बदल करता येईल का? त्याबाबत काही शासन निर्णय आहे का?
क्षेत्र दुरुर्स्ती साठी जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर १९८५ ला वडिलांनी वर्ग२ ची शेती रजिस्टर सोदापावती करून खरेदी केली. नोंदणी व मुद्रांक विभागात नोंद केली. शेती मालकाने जून १९८५ ला तहसीलदर कार्यालय ला परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला
१९८९ ला शेती मालक मयत झाले
१९९१ साली तहसील कार्यालय कडून संबधित मालक मयत झाले असल्यमुळे वारस लावावे व नव्याने अर्ज सादर करावे असे कळविले परंतु पत्र आम्हाला २०१४ साली प्राप्त झाले. आता शेती जमीन मालकाच्या लहान भाऊ च्या पत्नी च्या नांवे आहे
सदर शेती वरील वारस आता आमच्या नावाने शेती करून देण्यास तयार नाही.
मी न्यायालयात जावे कि तहशील कार्यालय शी पत्र व्यवहार करावा
कृपया मार्गदर्शन करावे
वर्ग २ ची जमीन असल्यामुळे , आपण प्रथम त्याचे विक्री/खरेदी साठी , सक्षम अधिकारी ब यांची परवानगी घेणे आवश्यक होते .
आपण सौदा पावती ने खरेदी केलेई आहे म्हणता ? सौदा पावती म्हणजे नेमके काय केले आहे ?
हा साठे करार आहे कि खरेदी खात केले आहे ?
साठे करार असेल तर , आपणास प्रथम सक्षम अधिकारी यांचीपरवानगी घेणे आवश्यक आहे . परवानगी घेत्क्या ननतर , सध्याचे मालक यांचे विरुद्ध Specific Relief Act खाली दावा दाखल करावा लागेल .

जर परवानगी न घेत खरेदी केली असेल , तर अशे हस्तांतरण नियामंकुल करून घेणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, वाटणी न झालेल्या जमिनीमध्ये २५ आंब्याची झाडे आहे. त्यातील ८ झाडे मृत झाली आहे. त्यातील काही झाडे माझ्या घराच्या छपरावर पडण्याच्या स्थितीत आहे. वाटणी न झाल्याने भाऊ सदरची झाडे तोडण्यास हरकत घेत आहे. या बाबत कोणाकडे दाद माघावी.
वृक्ष तोड परवानगी , तहसीलदार यांचे कडून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Mahesh More
30-10-2015
mr.moremahesh@gmail.com

रहिवासी na केलेल्या जमीन मध्ये open space म्हणून असलेल्या जागेची विक्री करता येते का
नाही
Open Space हि स्थानिक स्वराज्य सौन्स्थेच्या मालीकीची असते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमीन खरेदी केल्या नंतर तलाठी कडे जमीन खरेदीची नोंद करावी लागते त्याची procedure काय? जमीन विकणारा व खरेदी करणारे दोघांच्या हि सह्या तलाठी कार्यालयात होणे आवश्यक असते का ? या बद्दल चा GR असल्यास नमूद करावे
खरेदी खात नोंदणीकृत असेल तर असेल तर खरेदीदराने कळवणे बंधनकारक नाही.
फेरफारदोघांकडे चौकशी केली जाते
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम १४९]१५० vacha


























































































































































































































































































































Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

आदरणीय सर,अ व्यक्ती १९३५ पूर्वी मयत झाली.त्याच्या नावे असलेल्या जमिनीस त्याच्या 3 मुलीन.पैकी २ मुलींची नावे दाखल न होता भावांची नावे वारस म्हणून दाखल आहेत .आज रोजी सदर जमीन तिऱ्हाईत व्यक्तीच्या नावे खरेदीखताने झाल्यास मूळ वारस मुलींच्या नातवाना सन २००५ च्या कायद्यानुसार त्यांच्या हक्कासाठी अपील दाखल करता येईल किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
गुरचरण जमिन अतिक्रमण नियमानुकूल होऊन एका व्यक्तीला नवीन अविभाज्य शर्तीने मिळाली आहे. त्या व्यक्तीने मुलीच्या मुलाचे नांवे या जमिनीचे मृत्युपत्र दिले आहे.
तसेच मृत्युपत्र लिहणाऱ्या व्यक्तीला दोन मुली आहेत.
तर सदर जमिन न.अ.शर्ती च्या जमिनीमध्ये मृत्युपत्रानुसार नांव दाखल करावे अगर सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे काय?
आदरणीय सर, जमीन मनपा.हद्दीत असून निवासी हद्दीत आहे .१ आर खरेदी केल्यास ७/१२ सदरी नोंद होईल का?तुकडेबंदी लागू होईल का?
एकत्र कुटुंब कर्ता असलेल्या व्यक्तीने १९८३ मध्ये संपूर्ण जमीन तिर्हाईत व्यक्तीस विकली असल्यास आता अपिल करता येऊ शकेल का?
आदरणीय सर,अ व्यक्ती सन १९३०-३५ दरम्यान मयत झाली.सदर व्यक्तीस ३ मुली होत्या.मुले नव्हती.तर त्यावेळी मुलींची नावे ७/१२ च्या कब्जेदार सदरी लावता येत होती का?याबाबत शासन निर्णय आहे का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
हे संकेतस्थळ कोण वापरू शकते. फक्त महसूल विभागाचे अधिकारीच वापरू शकतात. की सामान्य जनता ही वापर करू शकते.. जर हो.. तर आम्ही नोंदणी कशी करावी. .माग॔दश॔क करावे. .
नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय हि आपण माहिती वाचू शकता . धन्यवाद .

Reply by MCS Maharashtra | इतर

सर , ७/१२ उताऱ्यावरील पोटखराब जमीन वहिती लायक करता येते का ? वहिती लायक करण्याचे अधिकार कोणास आहे व त्याबाबतची प्रकिया कशी आहे. कृपया मार्गदर्शन होणेस विनंती .
होय
क्षेत्र दुरुस्ठी साठी आपणास जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.41 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3