जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर नमस्कार शेतकर्यांना सरकारी कामात येत असणार्या अडचणी आपल्या या वेबसाईट मुळे दुर होतात फारच चांगली वेबसाईट आहे मी विचारले होते की खरेदीखत करताना खरेदीखतामध्ये खरेदी चे क्षेत्र व चतुःसिमा न टाकता पुर्ण गटाचे क्षेत्र व चतुःसिमा टाकलेला आहे तसेच कायम खरेदीखत असा उल्लेख नाही १९९० ची खरेदी आहे खरेदीखत देणारा मयत आहे आता खरेदी देणारा च्या वारसाने खरेदीखतमध्ये झालेल्या चुकीचा आधार घेत प्रांत अधिकारी यांचेकडे सदर खरेदीखतावरून झालेला फेर रद्द करणेसाठी अपिल दाखल करत खालील मुद्दे उपस्थित केले आहेत १) खरेदीखतामध्ये दिलेल्या क्षेत्राचा उल्लेख नसताना फेर कोणत्या आधारावर मंजूर करण्यात आला २) पुर्ण गटाचा चतुःसिमा व क्षेत्र टाकण्यामाघे कोणता उद्देश आहे घेतलेले क्षेत्र दोन एकर आहे तर ते का टाकलेले नाही ३) कायम खरेदीखत असा उल्लेख नाही ४) पुर्ण गट विक्री केली तर पुर्ण गटाचा फेर का मंजूर केला नाही दोनच एकर चा फेर कोणत्या आधारे केला असे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत काय करावे लागेल सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
खरेदी खत मध्ये , खरेदी केलेले क्षेत्र नमूद करणे आवश्यक होते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री. किरण पानबुडे साहेब नमस्कार
प्रथम आपले धन्यवाद माझा प्रश्न असा कि आम्ही गावठाणातील जागेवर ग्रामपंचायतीचे नाव कमी करून आमचे नाव लावले व तसा चुकीची दुरुस्ती होऊन मिळणेसाठी सातारा जिल्हा भूमी अभिलेख यांच्याकडे अपील दाखलहि केले आहे कि ग्रामपंच्यायती चे नाव चुकीने लागले आहे व ग्रामपंच्यायती ने आमच्या नावाची नोंद केली आहे तर त्या चुकीची दुरुस्ती होऊन मिळावी त्यासाठी आम्ही तालुका भूमी अभिलेख यांना व सध्या त्या जागेवर असणार्या एकाला पार्टी केले आहे पण अजून ते अपील बोर्डावर यायला २ ते ३ महिने लागतील. आता ग्रामपंच्यायत विरोधकांच्या कडे आहे मग आता ग्रामपंच्यायत आमचे नाव कमी करू शकते का ? किवा त्यांना तसे करायचे असल्यास काय कोणत्या नियमाने व आम्हाला न कळवता त्यांना आमचे नाव कमी करता येईल का ? व आमचे नाव कमी करू नये म्हणून आम्हाला काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
सर आमची वडीलोपाजीत सामाईक जमीन आहे. या जमिनीमध्ये माझे आजोबा व त्यांचे ५ भाउ असे ६ मुख्य हीसेदार होते या आमच्या सर्व आजोबांचे निधन झल्या नंतर वारस तपासणी होऊन त्यांच्या सर्व लहान थोर वारसादारांची नावे सात बारा वर लागलेली आहेत, त्याजमिनीतील ४ गुंटे जमीन आम्ही मंदिर बांधण्यासाठी आमच्या गावाला बक्षीस देणार आहोत,सात बारावर जेवढी नावे आहेत त्यानी सर्वानी बक्षीस पत्रावर साही करणे जरूरी आहे काय की मुख्य ६ हीसेदार साही करू शकतात काय, तसेच या सात बारावर काही १८ वर्षा खालील मुलांचीही नावे आहेत तर त्यांचीही साही लागेल काय याची आपण माहिती देणे. धन्यवाद
आपण ४ गुंठे जागा , कोणाचे मालकी पैकी देणार आहात?
जर सर्वजण , ४ गुंठे जागा देणार असतील तर , सर्वांची सही लागेल
अज्ञान लोकांचे वतीने त्याचे पालक सही करतील मात्र त्यास न्यायालयाची परवानगी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ajay s kamble
30-08-2015
tak315121@gmail.com

Sir; maze vadil pudcha vershi retirement hot ahe mi tyancha pahilya patnicha mulga aho v mi ani mazi aai mi lahnpinipasun alag rahto maza vadlani dusari patni keli tila 2 mule ahe tyamulana tyani government service laun dili ghar pn bhandhun dil mala v maza aaila Kaihi hi madat keli nai Ami mamacha adharane Ata paryant gujara kela .... Tr mala v maza aaila vadilacha property madhun hisa midal ka? Ani kontya padhatin yyasathi kort process krav lagel ka? Vadilach property madhun mala kiti hisa midu shekel
आपण न्यायालयात दावा दाखल करा
मात्र आपण हे वडिलांचे मृत्य पाचहात करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर आमचे वडिलांचे निधन झाले असून वडिलांचे नावे वडिलोपार्जित जमीन व स्वकष्टित जमीन आहे वडिलांनी २००४ मध्ये मृतुपत्र तयार केले आहे त्या मध्ये सात मुलांना जमीन दिली व दोन मुलीना जमीन दिली नाही शेत कसणाऱ्या भावाच्या मुलाने सात भाऊ आई व दोन बहिणीची वारस नोंद ७/१२ केली. आता बहिणीची वारस नोंद मृतुपत्राच्या आधारे रद्ध करता येईलका. व तशी वारस नोंद रद न झाल्यास बहिणींना हिस्सा द्यावा लागेल का. २००८ मध्ये वडिलाचे निधन होऊन अद्याप मोठ्या भावाने जमीन वाटप केले नाही. शेती कसणाऱ्या भावाच्या मुलाने त्याच्या वडिलांचे मुखत्यार पत्र करून बाकीच्या आमच्या सहा भावावर व बहिणीवर वाटपाची केस दाखल केली. आता शेती करणारा भावाचा तो मुलगा ग्राम पंच्यात मध्ये निवडून आला असून गावाचा सरपंच झाला आहे. परंतु त्याच्या वडिलाच्या नावे व त्याच्या नावे घर नाही व संडास नाही म्हणून भावाच्या मुलाने वाटप न झालेल्या जमीन मध्ये संडास बांधला आहे. ज्याने दावा केला तोच जमिनीवर अतिक्रमण करत आहे. आमच्या वकिलाने सांगितले कि पोलिसात तक्रार करा. पोलिस त्याची तक्रार न घेता आमची समजूत घालून काढून देतात या बाबत कुणाकडे तक्रार करावी. का त्याच्यावर दावा दाखल करावा. त्याने वाटपाचा दावा दाखल केला परंतु तो अद्याप हजर झाला नाही त्यामुळे आमचा वकीलही काही करत नाही. या बाबत आपण सविस्तर मार्ग दर्शन करावे हि विनंती.
आमची वाटप न झालेली जमीन असून त्या जमीनवर महाराष्ट्र सरकारचा दुष्काळ निधी आला आहे तो दोन वर्षा पासून आम्ही सहा भावांनी १०० रु बॉंडवर आईचा खात्यावर रूपये जमा वाहवे म्हणून समती पत्र तयार करून दिले परंतु शेत करणाऱ्या भावाने त्यावर सही केली नाही त्यामुळे आईला रक्कम काढता आली नाही. काही दिवसानंतर शेतीकारणाऱ्या भावाच्या मुलाने खोटा रूपये १०० बॉंड तयार करून त्यावर सहा भावांच्या बोगस सह्या केल्या व आमच्या आईस पैसे काढून मी देतो म्हणून बँकेत नेले व तिचा अंगठा घेवून रक्कम काढून घेतली व तिला फक्त ५००० रुपये दिले बाकीची रक्कम हडप केली. बोगस सह्या केल्या म्हणून बँकेस विचारले असता बँक माहिती देत नाही. महितीच्या अधिकारात बँक कडून बॉंड ची नक्कल मागितली असता बँक सांगते आम्हाला हा कायदा लागू नाही. म्हणून सहकार खाते कडे अर्ज केला त्यांनी तेच सांगितले या बाबत कोणाकडे तक्रार करावी.
महोदय ,
मी तलाठी /मंडल का.यांना ३ हरकती बाबत चे पत्र देवून ही ८/१२/२०१४ तहसीलदार
२०/१२/२०१४ मंडल व तलाठी यांना जमीनीचे २ वारस यांनी १००/- नोटरी केलेला स्टंप पेपर वर हरकत .
व ३ री हरकत वजा १५५ अंतर्गत वारस चौकशी व बेकदेशिर नोंदी रद्द करणे बाबत मा.तहसीलदार यांचे मार्फ़त तलाठी / मंडल आधिकारी यांना १८/२/२०१५ रोजी अर्ज दिला हे सर्व अर्ज देवुन्ही दि.२७/२/२०१५ रोजी माझ्या चुलत भावाने बिन्शेती जमीन ६२५ चौ.मी.तावातावने मंडल आधिकारी याच्या मदतीने त्याचा सासरा यास विक्री केली असे दाखवले .
या सर्व हरकती पत्र मिळाल्याच्या पोच पत्रावर घेतल्या आहेत . या बाबत मंडल आधिकारी व तलाठी यांचे वर गुन्हा दाखल करता येतो का ? व कोणत्या कलमा अंतर्गत ? कलम द्यावी .
तसेच लीज पेंडसी खरेदी नंतर १७/४/२०१५ ला नोंद कोर्टाने मंजूर केली परंतु आज दि.२६/८/२०१५ रोजी पर्यन्त मंडल / तलाठी यांनी नोंद घेतली नाही यावर हि तक्रार करता येते का? असल्यास कोणते कलम ?
कृपया खुलासा द्यावा
साहेब, मला प्रांत कार्यलयामधून धोकायर वृक्षा तोडण्याबद्दल नोटीस आली आहे की आपण ३१ या तारीखला उपस्थित रहावे. मी आपल्याला विनंती करतो की, ते धाोकादाय झाड मी अगोदर तोडण्याचा प्रयन्त केला परुंतु नातेवाईकांनी विरोध केल्यामुळे प्रांतकांडे मी हे प्रकरण नेले आहे, तरी ते झाड प्रांत साहेबांनी तोडण्यासाठी मला सांगितले तर मला ते पुन्हा तोडणे शक्य नाही नाही. तर मी ते विरोध करणा-या नातेवाईंकाना तोडण्यास सांगावे असे मला वाटते.त्यासाठी प्रांतांनी निर्णय दिल्यानंतर मी पुन्हा काय करावे....कृपया सल्ला द्यावा.
श्री. किरण पानबुडे साहेब, नमस्कार माझ्या प्रश्नाचे आपल्याकडून मिळालेल्या प्रतिसादासाठी प्रथमता धन्यवाद !
माझा प्रश्न असा आहे कि, ग्रामपंचायतीचे नाव कमी करून आमचे नावाची नोंद झाली सन १५ ऑगस्ट २०१३ ला. पण आता ग्रामपंचायत विरोधी गटाकडे आहे. तर आता ते आमचे नाव कमी करू शकतील का ? आमचे नाव कमी न करण्यासाठी काय करावे लागेल ? कारण त्या जागेवर असणारया खाजगी मालकाला व तालुका भूमी अभिलेख साहेब यांना आम्ही नोटीस काढन्यासाठी जिल्ला भूमी अभिलेख साहेब यांच्याकडे अर्ज केला आहे कि, नोंदीच्या चुकीची दुरुस्ती करावी म्हणून. पण तो अर्ज व त्यांना नोटीस निघायला अजून २ ते ३ महिने लागतील. तोपर्यंत आता निवड झालेल्या ग्रामपंचायती कडून नोंदी मध्ये काही फेरफार झाला तर तो चालू शकेल का ? नोंदी मध्ये जर बदल करायचा झाला तर ग्रामपंचायति ने आम्हाला कळवणे गरजेचे आहे का ? किवा न कळवता ते फेरफार करू शकतील का ? जर तसे केल्यास आम्हाला पुढे काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
जर एखद्या बिन आकारी पड जमिनीतून पुर्वी टेम्पररी घराकरीता ०-२-५३ जागा एका व्यक्तीला दिलेली आहे. सदर क्षेत्राची नोंद गाव नमुना नं.२ मध्ये दिसून येत आहे. पंरतु दप्तरी ७/१२ उतारा तयार करण्यात आलेला नाही. तर ७/१२ उतारा तयार करता येईल का? सदर ७/१२ तयार करण्याचे आदेश देण्याबाबत अधिकार कोणाला आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.

Question by INGOLE VIJAY HARI
28-08-2015
vv_rt@rediffmail.com

एखादे भाडेपट्टा धारकास जमिन ठराविक कालावधी साठी मंजुर केली जाते व मधल्या कालावधीत त्याचा मृत्यु झाल्यास ती जमिन त्यांचे वारसांचे नांवे करणेसाठी फेरफार मंजूर करता येईल काय

Question by INGOLE VIJAY HARI
28-08-2015
vv_rt@rediffmail.com

वारस नोंद ही हस्तांतरण संज्ञेत मोडत नाही असे म्हटले जाते. तरतूदी (नियम) सांगा.

जर वारस नोंद हस्तांतरण सज्ञेत मोडत नसेल तर नवीन शर्तीने दिलेली जमिनीचे मृत्युपत्रा नुसार त्याचा वारस नोंदीचा फेरफार होणेस काय अडचण आहे. तरतूदी (नियम) सांगा.
जर फेरफार नोंदणे व तो मंजूर करणे व याला काही पूढे तक्रार असल्यास म.ज.म.अ.1966 चे कलम 247 नुसार फेरफार हा विषय अविलीय बाब आहे. मग सामनेवाला व्यक्ती महसूल कर्मचारी/अधिकारी विरुध्द कोर्टात गुन्हा नोंदी साठी थेट का जातात व कोर्टातून तसे आदेश का पारीत केले जाते .
जमिन गांवठाण क्षेत्रात येते असा दाखला तलाठी/मंडळ अधिकारी देवू शकतात का ?
एखादे NA जमिन धारकाने काही कारणास्तव रक्कम दरवर्षी नियमित भरली नाही व तो खातेदार तलाठी कार्यालयात 5 वर्षाने आला तर NA जमिनीवर आपण व्याज आकारणी करुन त्यांचेकडून वसुली करुन शकतो ÛúÖ? आकारवयाचा दर ?

Question by INGOLE VIJAY HARI
28-08-2015
vv_rt@rediffmail.com

सन 2001 रोजी फेरफार मंजूर आहे परंतु त्यांचा अंमल 7/12 ला न झालेने त्याचा अंमल देतांना गांव तलाठी तालुके कडून या बाबत परवानगी न घेता आज तारखेस अंमल देवू शकतो का ?

Question by INGOLE VIJAY HARI
28-08-2015
vv_rt@rediffmail.com

खऱ्या खुऱ्या औदयोगिक क्षेत्रासाठी कोणत्याही सक्षम अधिकारी कडून परवानगी न घेता समोरची व्यक्ती दस्तऐवज करुन शकतो/ कोणतीही शर्तीची जमिन असली तरी असे प्रचलीत परिपत्रक आहेत हे खरे असेल तर असे व्यवहार गांव दप्तरी अथवा सब रजिस्टर कार्यालयात का नोंदविले जात नाही.

Question by INGOLE VIJAY HARI
28-08-2015
vv_rt@rediffmail.com

एखादया एका व्यक्तीकडे गांवठाण जागेचे किती क्षेत्र ताब्यात /वाहिवाटीत असू शकते काही गांवठाण क्षेत्रासाठी मर्यादा आहे का ?

Question by INGOLE VIJAY HARI
28-08-2015
vv_rt@rediffmail.com

एखादे झाडे किती वर्षाचे झालेवर त्याचेवर रोजगार हमी योजना/शिक्षणकर/विशेष शिक्षण आकारणी करतात

Question by INGOLE VIJAY HARI
28-08-2015
vv_rt@rediffmail.com

एखादे व्यक्तीने त्याचे मूळ गांवा शिवाय अन्य ठिकाणी जमिन खरेदी केली आहे व त्याचा अकरमात मृत्यु झाला तर त्याची वारस चौकशी ज्या गांवी जमिन खरेदी केली आहे. तो मंडळ अधिकारी अथवा असा कारकून फेरफार मंजूर करु शकतो का किंवा त्याने मुळ गांवी वारस चौकशी करुन असा फेरफार नोंदविणे गरजेचे आहे.

Question by INGOLE VIJAY HARI
28-08-2015
vv_rt@rediffmail.com

कोलंबी प्रकल्प/मिठागरसाठी दिलेले भाडेपट्टाजमिनीची वसुली आकारणी ज्याप्रमाणे त्या गांवचा कायम बिनशेती आकारणी दर असतो त्यानुसार करणे योग्य आहे का अथवा कसे ?

Question by INGOLE VIJAY HARI
28-08-2015
vv_rt@rediffmail.com

ज्या त्या ठिकाणी मोबाईल टॉवर्स आहेत प्रत्येक तलाठी/मंडळ अधिकारी/ तहसीलदार वेगवेगळे नियम सांगतात किती रुपये अनधिकृत कर वसूल करावा. तरतूद सांगा. सविस्तर सांगा.
विनापरवाना मोबाईल टॉवर :- (MLRC sec 44a)
1) नोटीसीची मुदत संपल्यानंतर किती दिवस उल्लघंन चालु राहिल त्या प्रत्येक दिवसासाठी 100/- प्रतिदिन दंड [ MLRC 44a(4a) ]
2) 10000/- दंड [ MLRC 44a(a1) ]
3) 5000/- दंड [ MLRC 44a(4a) ]
4) अकृषक सारा

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by INGOLE VIJAY HARI
28-08-2015
vv_rt@rediffmail.com

कुळासाठी जातीची अट आहे का कलम सांगा. वर्ग 1 च्या कोणत्याही जातीचे व्यक्तीचे जमिनीवर कोणताही जातीचा व्यक्ती कुळ नोंद होते का ?
कुळासाठी जातीची अट नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

प्रति,
श्री. किरण पाणबुडे

धन्यवाद साहेब, मी दि. १७/७/२०१५ रोजी विचारलेल्या प्रश्न्या चे उत्तर दिल्या बद्दल.

१. घरा संबधित माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकारात कोणाकडे अर्ज करू. (तलाठी कि तहसीलदार कार्यालय)
२. तालुका लोकशाही दिनी अर्ज करा - म्हणजे काय ते समजले नाही?
श्री. व्ही. आर. थोरवे साहेब मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद.

This page was generated in 0.51 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3