जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by गणेश शिंदे
06-10-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,६ ब ची जमीन फर्म तर्फे भागीदार या नावे विक्री परवानगी घेऊन खरेदी करावयाची आहे जमीन रहिवास झोन मध्ये असून म.न.पा.हद्दीत आहे.भागीदाराचा शेतकरी दाखला चालेल का?की६३ ची परवानगी घ्यावी लागेल ? याबाबत शासन निर्णय असल्यास कृपया क्र.व दि.द्यावा.
कायद्याचे भाषेत भागीदारी संस्था , कायदेशीर व्यक्ती नाही . त्ये मुले भागीदारी संस्थाच्या नवे जमीन/ मिळकत खरेदी करता येत नाही . मात्र भागीदारांचे नावे जमीन खरेदी करतयेते . जर भागीदार शेतकरी असेल तर , त्याचे नवे जमीन खरेदी करा . ६३ ची परवानगी भागीदार संस्थेस दिली जात नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
06-10-2015
bkganesh.shinde10@gmail.com
इनाम वर्ग ६ ब ची जमीन ९९ वर्षाच्या भाडेपट्ट्याने सन २००२मध्ये रजि.दस्ताद्वारे देण्यात आली आहे.परंतु सदर जमिनीबाबत मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून रीतसर परवानगी घेऊन २००८ रोजी रजि.खरेदी घेऊन ७/१२ सदरी नाव दाखल केले आहे?भाडेकरार रद्द करण्यासाठी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
दोनीही पक्षकारांचे उभय संमतीने , lease deed , cancel करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
05-10-2015
swati.swami@yahoo.com
स्मशानभूमीसाठी जमीन प्रदान करावयाची कार्यपद्धती कोणती आहे ? कोणता शासन निर्णय आहे ?
स्मशान भूमी साठी म ज म अ १९६६ चे कलम २२ अन्वये व मह जमीन महसूल ( जमिनीचे प्रदान ) नियम १९७१ अन्वये , स्थानिक स्वराज्य संस्थे कडे निहित केले जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष सोनू निम्बरे
05-10-2015
nimbares@yahoo.co.in
सर , माझे घर २० वर्षे ज्या जागेवर होते ती जागा मोजणी केल्या नंतर ती जागा दुसऱ्या वेक्तीची निघाली. पण त्यांना ती जागा हवी असल्याने त्यांनी मला घर बांधण्यासाठी तिथेच बाजूला दुसरी जागा दिली.त्यांच्याकडून मी कोणतेही खरेदीखत केलेले नाही. परंतु मी त्या तीन हिस्सेदारांपैकी एकाने त्याच्या हिस्स्या पैकी मला घर बांधण्यासाठी जागा दिली आहे. त्याने मला Executive Magistrate कलेक्टर ऑफिसर समोर संमतीपत्र लिहून दिले आहे.त्याबद्दल त्या तिघांपैकी कोणाचाही वाद नाही. आता ती जागा माझ्या नावावर होऊ शकते का ? तसे नसेल तर मला काय करावे लागेल ?
कार्यकारी दंडाधिकारी , यांचे समोरील संमती पत्रास , कोणताही कायदेशीर आधार नाही . आपले नावावर जमीन होणार नाही
आपण नोंदणीकृत खरेदी करावे
अन्यथा आपण दिवाणी न्यायालयात , Adverse Possession चा The Specific Relief Act खाली दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रवीण पाटील
05-10-2015
pypatil77@gmail.com
माझ्या आअजाओबंचो एकुन शेत ५ हेक्टर ४ आर आहो पैकी १ होक्टर ६५ आर पोट्खरब (उतार्यावर तसी नोंद आहो ) आहो सदरील पोट्खरब आता आम्ही तयार केले असून त्यात आम्ही विविद पिके घेताए तसी नोंद उतार्यावर करता येइल का ? करता येत असोल तर कुणाकडे अर्ज करावा लागेल
आपणास कलम ६८( म ज म अ १९६६ ) खाली जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करावा लागेल
क्षेत्र दुरुस्ती होईल . जो पोत्खाराबा , लागवडी लायक केलें आहे त्या वर जमीन महसूल आकारणी करून , क्षेत्र दुरुस्ती होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मांगीलाल सहदेव
05-10-2015
sahadeomangilal@gmail.com
खूप छान वेबसाईट आहे.
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
04-10-2015
ravindra.golesar@rediffmail.com
एखाद्या व्यक्तीचे ७/१२ वर नाव आले म्हणजे ती व्यक्ती त्या जमिनीचा खरा मालक बनते काय !
7/१२ हा , जमीन महसूल वसूल करण्यासाठी कोण जबाबदार आहे , हे दाखवणारे अभिलेख आहे . It is fiscal document .
त्या मुले , ७/१२ वर नाव आहे म्हणजे , ती व्यक्ती कायदेशीर मालक आहे , असे म्हणता येणार नाही
मात्र व्यहारात , मालकी पाहणे साठी ७/१२ पहिला जातो
आपण मिळकतीचे Title Search करा
मागील ३० वर्षाचे दुय्यम निबंदक ( मुन्द्रांक ) यांचे अभिलेख पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल उत्तम चव्हाण
03-10-2015
amolchavhan234@gmail.com
सर मी दिनांक ८/८/२००६ रोजी वन विभागामध्ये junieor क्लेर्क म्हणून रुजू झालो व दिनांक १२/५/२००८ रोजी राजीनामा दिला मला त्याच संवर्गाची नौकरी दुसर्या विभागात लागल्यामुळे त्यामुळे माझी सेवा कोन्तिनेव होईल का असल्यास शासन निर्णय सांगण्याची कृपा करावी
Question by Shashikant sondekar
03-10-2015
ssondekar8@gmail.com
एकत्र कुटुंब जमिन वाटप कायद्यात एखाद्या गटात मोठ्या मुलाला कोनती बाजु मिळते व लहान मुलाला कोनती बाजु मिळते .जमिनीच्या दिशा कशा ठरल्या जातात. त्याचा संदर्भ मला कोठे मिळेल.
जमिनीचे वाटप , हिस्सा प्रमाण व जमिनीची प्रत या वरून केले जाते .
उदा
वाटप करावयाचे क्षेत्र ४ एकर आहे
त्या पैकी , ३ एकर शेत्र , बागायत , ०.५ एकर क्षेत्र एकपिकी व .५ एकर क्षेत्र वर्कस आहे
वाटप करताना तुकडे बंदी कायद्याचा भंग होणार नाही , याची खात्री करण्यात येते .
वरील क्षेत्र , तीन भावामध्ये वाटप करावयाचे असल्यास ३ एकर बागायत क्षेत्र तीन भावात प्रत्येकी १ एकर या प्रमाणे वाटप केले जाईल , तथापि ०.५ एकर एकपिकी व ०.५ एकर वर्कस क्षेत्र वाटप करता येणार नाही . तुकडे बंदी कायद्याचा भंग होईल . त्या मुले वर्कस व एकपिकी क्षेत्र अन्य भावाने खरेदी करून त्याची किंमत अन्य भावांना देणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रामराव काष्टे
03-10-2015
kashte876@gmail.com
किशनरावांना 2 मुले व4 मुली आहेत,चारही मुलींचे लग्न 1987 पूर्वी झालेले आहेत.4 मुलींपैकी 1 सरकारी नोकरीस आहे व 1 रिटायर आहे, 2 मुली गृहणी आहेत.किशनरावांचा मृत्यू 1984 साली झाला.किशनरावांच्या दोन्ही मुलांनी शेती व घर आपसात वाटणी करून घेतले व शेती आपापल्या मुलांचे नावे करून दिली.8 वर्षापूर्वी किशनरावांच्या नातवांनी त्यांचे नावावर असलेली शेतजमिन खरेदीखता दवारे कायमस्वरूपी शेतकर्यांना विक्री केली.आता किशनरावांच्या चारही मुली आपला हिस्सा मागत आहेत.प्रश्न असा आहे की,किशनरावांच्या नातवाकडून शेती खरेदी केलेल्या शेतकर्यांना काही अडचण येईल का ?किशनरावांच्या नातवांनी विक्री केलेल्या शेतीमध्ये मुलींचा हिस्सा/अधिकार इतक्या वर्षानंतर राहतो का ?सध्या चारही मुली 60 ते 70 वर्षाच्या आहेत.
किसान रावच्या मुलींचा मिळकतीत हिस्सा आहे .
मात्र सध्या मिळकतीत त्रितीय पक्ष हित संबंद निर्माण झालेले आहेत
तसेच मुलाची नवे मिल्कातीस लागणे , त्यांनी मिळकती विकणे , या मध्ये बराच काळ झालेलाल आहे .
मुलीचे मिळकतीतील हक्क निर्माण मागणीस , मुदतीचे कायद्याची बाधा येऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेश कोटलवार
01-10-2015
rajeshkotalwar@gmail.com
नमस्कार सर,
आमच्या गावी माझ्या व माझ्या परिवराच्या नावे काही
जमीन आहे.
गावातील एक इसम ज्याची जमीन आमच्या शेतच्या खुप पुढे आहे व त्याला येण्या जाण्या साठी शिवरस्ता आहे
तरी पण तो मुद्दाम आमच्या शेतातुन बैलगाड़ी घेऊन जात आहे त्या मुळे माझ्या पिकाचे नुकसान पण झाले आहे.
तो काही केल्या आमचे ऐकन्यास तैयार नाही
त्याचा सोबत वाद घेतल्यास तो हाना मारीची भाषा करतो
आम्ही सर्व दुसऱ्या गावी राहात असतो रोज रोज शेताकडे नाही जाऊ शकत यावर काही कार्यवाही होउ शकते काय?
आपण या व्यक्ती विरुद्ध , पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा
दिवाणी न्यायालयात , त्याचे विरुद्ध मनाई हुकुम मिळणे साठी दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by यतिन पाटील
01-10-2015
ypatil73@gmail.com
मा. महोदय
मी मुंबई येथे रहात असून, रायगड, तालुका उरण येथे माझे वडीलोपार्जित घर आहे. सध्या घराची भाड़ेपट्टी माझ्या नावावर केलि आहे. पण काही नातेवाईकांच्या सांगन्यानुसार घराच्या आसपास सुद्धा आमची काही जागया आहे. पण त्यावर शेजार्यांनी बांधकामे केली आहेत. ती जागा परत मिळवण्यासाठी मला काय करायला लागेल.
.
Question by रमीज मुल्ला
01-10-2015
ramijrajamulla@gmail.com
इतर अधिकारात नवीन अविभाज्य शर्त कु.का. क. ४३ ला पात्र (400) नवीन अविभाज्य व तबदील न करणेचे शर्तीवर (400) या जमिनीची खरेदी होऊ शकते का
कुल कायदा कलम ४३ ला पत्र म्हणजे , सदर जमिनीची , उपविभागीय अधिकारी यांचे परवानगी शिवाय खरेदी विक्री करता येत नाही
तथापि नवीन , कायदा सुधारणेनुसार जर , ३२ ग किंमत निच्छित होऊन १० वर्षापेक्ष जादा काळ झालेला असल्यास , परवानगीची आवश्यकतानाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विशाल एकनाथ khairnar
01-10-2015
vishalkhairnar84@rediffmail.com
सरकारी कर्मचारीला पत्नीच्या प्रसृतीवेळी पतीला काही विशेष रजा मिळण्याची तरतूद आहे काय असल्यास त्याबाबत माहिती मिळावी व शासन परिपत्रक बाबत माहिती मिळावी
Question by स्वाती स्वामी
01-10-2015
swati.swami@yahoo.com
बदली सुट्टी मिळणेबाबत चा शासन निर्णय कोणता आहे ? कृपया असेल तर देण्यात यावा .
Question by स्वाती स्वामी
01-10-2015
swati.swami@yahoo.com
जमीन अदला-बदलीचे आदेश काढण्यासाठी कोणती तरतूद आहे ? कोणत्या नियामानाव्ये आदेश काढता येतील ? karypadhati कोणती आहे ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
Question by vishal eknath khairnar
01-10-2015
vishalkhairnar84@rediffmail.com
पोट हिस्सा मोजणीत हद्दी खुणा दाखवता येतात का त्याबाबत चे शासन निर्णय / परिपत्रक मिळावे
Question by तानाजी जाधव
30-09-2015
tanaji.jdhv@gmail.com
नमस्कार सर, मी पूर्वी पाणबुडे साहेबाना मेल केला होता त्याचे उत्तर मिळाले , माझे आजोबा १९४७ साली मयत झाले, त्यावेळी त्याचे वारस नोंद रजी .मद्ये ए.कु.म म्हणून थोरले आजोबा बाजीराव यांचे नाव ७/१२ वर आले . माझे वडील व चुलत्याचे नाव ७/१२ नाही , आम्ही आता जुने फेरफार काढून पहिले असता अमचे वडिलाने व चुलत्याने नाव वारस रजी . असल्याने आम्ही ए.कु.म.शेरा कमी करून सर्व वर्साची नावे ७/१२ वर येण्यासाठी तहसील येथे अर्ज केला , सदर अर्ज सोबत सर्व फेरफार व ७/१२ जोडले त्यानुसार तहसील दरानी वारस नोद करावी असे आदेश तलाठी यांना दिले, तलाठी यांनी वारस नोद घेतली व सदर फेरफारास बाजीराव यांचे वारस यांनी तक्रार घेतली आहे . आज आम्ही बाजीराव सोडून बाकी सर्व जन दुसर्या गावी राहत आहे त्यामुळे त्याजामिनीवर आम्ह्चा वहिवाट नाही, त्यांनी तक्रार अर्जाम्द्ये अम्हच काहीही संबद्ध नाही असे म्हंटले आहे. १९४७ झालेला फेरफार हा चुकीचा आहे असे त्याने म्हंटले आहे आम्ह्च्या आजोबाना ६८ वर्ष मयत होऊन झाली त्यामुळे आम्हाला वारस हक्क मागता येणार नाही असे त्याचे म्हणणे आहे,
हे खरे आहे का? आम्ही आजही सर्वजण आम्ह्च्या वडिलोपार्जित गावी एकमेकांच्या सुखदुखात सह्बागी होत असोतो, आम्ह्च्या सर्वच्या नावे गावात राहण्याची जागा आहे त्यावर आम्हा सर्वाची नावे आहे.
तर वारस नोंद होण्यासाठी काय karave
आपला मिळकतीत हक्क आहे
त्यांनी काय म्हणावे हा त्यांचा प्रश्न आहे
त्यांनी आपली नवे ज्या फेर्फाराने लागली , त्या विरुद्ध अपील केल्यास , आपण हजर राहून आपली बाजू मांडा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by KAVYAPARAB
30-09-2015
Priyarane1989@gmail.com
Domicile dakhale, shanik vastvya dakhale १५ येअर्स,cenior citizens, income certificate, हे abhilekhat किती वर्ष जतन करून ठेवावेत ABCB वर्गवारी मध्ये कशात येतात
Question by ओमेश
29-09-2015
barapatreomesh@gmail.com
गावठाण हद्द वाढविण्याचे अधिकार कोणास आहे. तसेच गावठाण हद्द वाढ कोणत्या नियमा अंतर्गत करण्यात येते, त्याची कार्यवाही काय आहे.
जिल्हाधिकारी शासनाचे आदेशने , गावठाण हद्दीत बदल करू शकतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
म ज म अ चे कलम १२२ प्रमाणे शासनास , गावठाण हद्द्द वाढवण्याचे अधिकार आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by swati swami
29-09-2015
swati.swami@yahoo.com
अर्जदार यांनी वाणिज्य व निवासी प्रयोजनासाठी akrashi परवानगीसाठी एकच अर्ज केला असेल तर वाणिज्य व निवासी प्रयोजनासाठी akrashi आदेश एकच काढता येतो का ? अर्जदार यांना वेगळे अर्ज करण्यास सुचित करावे लागेल का ?
Question by संजय अ. बोंडगुलवार
29-09-2015
sanjaybondgulwar@gmail.com
नमस्कार सर- सामुहिक 7/12 असून एकूण 39 नावे आहेत- त्या मध्ये माझंसुद्धा नाव आहे- मला त्या जमीन मधून माझा पोट हिस्सा विभक्त करता येणार का?. व उटीत पण करता येणार का?
७/१२ वरील सर्वांचे मालकीचे क्षेत्र किती आहे , त्या वर अवलंबून आहे .
जर वाटप केल्याने , तुकडे बंदी कायद्याचा भंग होत असेल तर , वेगळा ७/१२ करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sunil Kale
29-09-2015
sunilste@gmail.com
खंबाळे या गावात आमचे वडलोपार्जित घर असून ते माझ्या काकांनी आम्हाला कसलीही समज न देता ते स्वताच्या नावे करून घेतले. वडलोपार्जित घरात सहहीशेदार म्हणून माझ्या वडिलांचे नाव लागण्यासाठी मी दिवाणी न्यायालयात दावा करू शकतो का? माझे वडील हयात असून त्यांचा न्यायालयात जाण्यास विरोध आहे.
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती!
घर ग्राम पंचायत क्षेत्रात असल्यास , गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
घर ग्राम पंचायत क्षेत्रात असल्यास , गट विकास अधिकारी यांची परवानगी आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष नटवे
28-09-2015
santoshnatave@gmail.com
सर,
जर एखादा कर्मचा'यास प्रथ्ाम कालबध्द पदोन्नती दिल्यानंतर त्यांची नियमित पदोन्नती दोन वर्षानंतर झााली असेल तर त्यांना व्दितीय कालबध्द पदोन्नती देता येते का तसेच सदर कर्मचा'याला प्रथम पदोन्नती देण्या आगोदर तीन वेळेस सहा सहा महिन्ो वरिष्ठ पदोवर पदोन्नती देऊन तांत्रिक खंड दिला आहे. त्यामुळे प्रथम कालबध्द पदोन्नतीच्या तारखेपासुन 12 वर्षानंतर व्दितीय कालबध्द पदोन्नती सदर कर्मचा'यास द्यावी का कृपया मार्गदर्शन मिळण्यास विनंती आहे.
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
28-09-2015
ravindra.golesar@rediffmail.com
माझ्या काही प्रश्नाची आपण उत्तरे दिल्या बद्धल प्रथम श्री. किरण पाणबुडे साहेब आपले धन्यवाद! माझा पुढील प्रश्न असा आहे. तहशिलदार यांना भावाने मृतुपत्र न दाखवता वारस नोंद मंजूर करून घेतली. व त्याप्रमाणे रेकॉर्डला वारस नोंदी झाल्या आहे. आत्ता मृतू पत्र दाखून वारस नोंद फेरफार करण्या करिता ताशिलदार याचेकडे अर्ज करू कि उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करू त्याचा काही प्रिंटेड फ़ॉर्म आहे. याबाबत मार्गदर्शन करावे हि विनंती.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
