जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by प्रदीप जुमडे
28-08-2015
pradeepjumde19@gmail.com
मला सेवानिवृत्ती करता दोन वर्ष सिलक आहे मला माझे होम तहसीलमध्ये बदली बाबत काही शासन निर्णय किवा नियम आहेत काय मी सद्य नक्षल ग्रस्त भाघात महसूल खातायत काम करीत असून मंडळ अधिकारी आहे कृपया माझे मेल वर पाठविण्याची विनंती आहे धन्यवाद
Question by swati.swami
27-08-2015
swati.swami@yahoo.com
अनुसूचित जाती , अनिसुचीत जमाती , इतर मागास वर्ग जातीचे (प्रमाणपत्र पडताळणीचे विनिमयन ) २००० अधिनियम कोठे मिळेल ?
Question by मोहसीन शेख
27-08-2015
mohsin7128a@gmail.com
श्री किरण पाणबुडे सर,
देवस्थान जमीन इतर हक्कात वारस नोंद करणेबाबत कोणती तरतूद आहे व त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागतात ? त
Question by संतोष जवरे
27-08-2015
jaware_sb@rediffmail.com
नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीमध्ये मृत्युपत्रान्वये नांवे दाखल करण्याकरीता मा.जिल्हाधिकारी यांची परवानगीची आवश्यकता आहे काय?
Question by prafulla kamble
27-08-2015
pappukamble10@gmail.com
आमच्या तालुक्यामध्ये ज्यांचे उत्त्पन्न दोन लाखाचे वर आहे ते सुद्धा उत्पन्नाचा दाखला रक्कम रूपये २१०००/- ची मागणे करतात आणि ज्यांचें उत्त्पन्न कमी आहे ते सुद्धा २१०००/- ची मागणे करतात. दाखला मागणीचे प्रयोजन संजय गांधी योजने करिता असते. तर दाखला देते वेळी खरे खोटे काय हा निर्णय घेणे कठीण होते तर.संजय गांधी योजने चे अनुदान योग्य व्यक्ती स जावे या दृष्टीने उत्पन्नाचा दाखला निर्गमित करताना काय कार्यपद्धती अवलंबवावी.? २१०००/- चा दाखला देणे बंद करणे योग्य राहील काय? मार्गदर्शन नियमासह होनेस नम्र विनंती आहे.
या प्रश्नाचे उत्तर अपाचे शोधणे आवश्यक
आपण तलाठी यांचे मार्फत सखोल चौकशी करून घ्या
ज्यांनी खोटे उत्पन्न अडखावले अश्या , लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दताञय गावडॆ
27-08-2015
gavadedattatray386@gmail.com
नमस्कार सर,
माझे वङील 1936 सालापासुन 5 हॆ. 19 आर. (1/2) हिश्यानॆ जमीन कसत हॊतॆ. 1948 साली आजॊबांची संरक्षित कूळ अशी नोंद झाली. त्यानंतर वङील हॆ 1988 साली वारलॆ व त्यांना वारसदार 4 मुलॆ व 3 मुली आहॆत. त्यानंतर मुळ मालकानॆ हि सर्व जमिन खरॆदिखतानॆ तिस-या इसमास विकली आहॆ. तरी या खरॆदिखतावर माझी व 1 भावाची सही नाही. माञ 3 बहिनी व 2 भावांनी सहया कॆल्या आहॆत. यात त्यानी त्या 2 भावांच्या नावॆ 3 एकर जमीन कॆली आहे. व 10 एकर त्या इसमास. या जमिनीवर आमचा ताबा 2014 पर्यंत हॊता. माञ मनगटशाहीनॆ तॊ घॆतला. माञ माझॆ व भावाचॆ नाव इतर हक्कात 7/12 वर आहे. तर आम्हाला हि जमिन कुळ कायदयानॆ मिळॆल का? व किती जामिन मिळॆल व त्यासाठी काय करावॆ लागॆल? कुपया माहिती द्यावी हि विनंती.
Question by सुनिल मुरकर
27-08-2015
sunilmurkar@gmail.com
धन्यवाद श्री. किरण पानबुडे, व्ही. आर. थोरवे साहेब मार्गदर्शन केल्या बद्दल. माझा पुढील प्रश्न असा कि,
वर्दी अर्जा ने केलेले मालमत्तेचे संपादन कायदेशीर आहे का?
कारण तसे करण्यास मानसिक दबाव टाकून हि करून घेता येऊ शकतो.
वर्दी म्हणजे माहिती देणे. संपादन करण्यात आलेली मालमत्ता कशाच्या आधारे करण्यात आली हा दस्त जो पर्यंत सोबत सदर करणार नाही तो पर्यंत वर्दी ला वजन (महत्व) नाही.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by सुनिल मुरकर
27-08-2015
sunilmurkar@gmail.com
माझा प्रश्न असा कि, दिवाणी न्यायालयात (जिल्हा स्तर) दावा चालू असताना वडलोपार्जित घरा च्या असेसमेंट लिस्ट च्या उतारे वर सहहीसेदार म्हणून नाव लावण्यास ग्रामपंचायती/ग्रामसेवकाकडे/गट विकास अधिकारी कडे अपील केल्यास ते अपील दिवाणी न्यायालात दावा चालू आहे म्हणून अपील फेटाळण्याचा अधिकार ग्रामपंचायती/ग्रामसेवकाकडे/गट विकास अधिकारी यांना आहे का ?
Question by मोहसिन शेख
26-08-2015
mohsin7128a@gmail.com
खूप छान वेब आहे खुप प्रश्नांची उत्तरे याठिकाणी मिळतात या वेब मुले अनेक महसूल खातेतील कर्मचारी व अधिकारी यांना काम करताना कोणतेही कायदेशीर अडचण येणार नाही व काम करताना ते अधिक आत्मविश्वासाने काम करू शकतील यात शंका नाही ....मोहसिन शेख ,तलाठी
धन्यवाद !!!!
आपला व आपल्या सहकर्याचा सहभाग नोंवावा व सर्वाना सक्षम करण्यास मदत करावी.
.maharashtracivilservice.org
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by स्वाती स्वामी
26-08-2015
swati.swami@yahoo.com
कार्यालय प्रमुखामार्फतच cr ची प्रत मागणे बंधनकारक आहे का ? तो कर्मचारी प्रत्यक्ष मा. जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करू शकतो का ? उदा :- मा.जिल्हाधिकारी यांचेकडून लिपिकास cr ची प्रत हवी आहे . तर त्यांनी मा . तहसीलदार यांचेमार्फतच मागणी करणे बंधनकारक आहे का ?
गोपनीय अहवालाची प्रत साम्भांडीत अधिकार्यास देणे बंधन कारक आहे .
ती दर वर्षी दिली जाते , त्या साठी मागणी करण्याची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेंद्र सोनवाने
26-08-2015
mrsona71@gmail.com
महोदय ,
मी तलाठी /मंडल का.यांना ३ हरकती बाबत चे पत्र देवून ही ८/१२/२०१४ तहसीलदार
२०/१२/२०१४ मंडल व तलाठी यांना जमीनीचे २ वारस यांनी १००/- नोटरी केलेला स्टंप पेपर वर हरकत .
व ३ री हरकत वजा १५५ अंतर्गत वारस चौकशी व बेकदेशिर नोंदी रद्द करणे बाबत मा.तहसीलदार यांचे मार्फ़त तलाठी / मंडल आधिकारी यांना १८/२/२०१५ रोजी अर्ज दिला हे सर्व अर्ज देवुन्ही दि.२७/२/२०१५ रोजी माझ्या चुलत भावाने बिन्शेती जमीन ६२५ चौ.मी.तावातावने मंडल आधिकारी याच्या मदतीने त्याचा सासरा यास विक्री केली असे दाखवले .
या सर्व हरकती पत्र मिळाल्याच्या पोच पत्रावर घेतल्या आहेत . या बाबत मंडल आधिकारी व तलाठी यांचे वर गुन्हा दाखल करता येतो का ? व कोणत्या कलमा अंतर्गत ? कलम द्यावी .
तसेच लीज पेंडसी खरेदी नंतर १७/४/२०१५ ला नोंद कोर्टाने मंजूर केली परंतु आज दि.२६/८/२०१५ रोजी पर्यन्त मंडल / तलाठी यांनी नोंद घेतली नाही यावर हि तक्रार करता येते का? असल्यास कोणते कलम ?
कृपया खुलासा द्यावा
अधिकारी यांनी आपल्या प्रकरणात केलेली कार्यवाही हि प्रशासकीय कार्यवाहीचा भाग आहे. त्या बाबत गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही. जर आपल्यावर अन्याय झाला असे वाटत असेल तर प्रांताकडे अपील करावे.
लीज पेंडसी खरेदी नोंद घेतली नाही यावर तहसीलदार यांचे कडे तक्रार अर्ज सदर करावा.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by नागेश हुगे
26-08-2015
nageshhuge70@gmail.com
आमच्या वडिलोपर्जित शेत जमिनित आम्ही दोन भाऊ व एक बहिण असे एकुण तीन नावावर सामाईक क्षेत्र ७/१२ वरिल नोन्द आहे .तरी आम्हाला पिक कर्ज घ्यायचे असेल तर खाते फोड करणे आवश्यक आहे असे बँक चे म्हनने आहे हे बरोबर आहे का?
सन्मत्ती पत्र दिले तरी चालेल का?
क्रुपया मार्ग्
Question by संजय रा. कोकरे
25-08-2015
S.r.kokare1992@gmail.com
धन्यवाद सर
आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल..
मी गावठाण जमिनीचे आकारणीचे पत्रक तपासले असता ती गावठान जागा सरकारी आहे. तरी माझ्याजवळ घर नाही तरी तेथे घर बांधण्यास कोणत्या शासकीय अधिकार्या कडे किंवा कोणत्या सरकारी कार्यालयाकडे जागेसाठी मागणी करावी लागेल
शिवाजी ब
Question by swati swami
25-08-2015
swati.swami@yahoo.com
वर्ग - ३ च्या कर्मचारी यांना वैयक्तिक कागदपत्रे (जसे : स्वतःचे गोपनीय अहवालाची प्रत ) वरिष्ठ कार्यालयाकडून हवी असतील तर कार्यालय प्रमुख यांचेमार्फत अर्ज करणे बंधनकारक आहे का ?
कर्मचारी यांना गोपनीय अहवालाची प्रत देणे आवशक आहे. परंतु फार पूर्वीचा असेल तर अर्ज करावा लागेल .
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by swati swami
24-08-2015
swati.swami@yahoo.com
रजा रोखीकरण मंजूर करताना सोबत जोडलेले रजेचे प्रपत्र व मुळ सेवापुस्तीकेतील रजा लेखा यात फरक असेल तर कोणती कार्यवाही करावी ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
Question by स्वाती स्वामी
24-08-2015
swati.swami@yahoo.com
रजा रोखीकरण मंजूर करताना परावर्तीत रजा लेखा अध्ययावत असणे आवश्यक आहे का ? मुळ सेवापुस्तिकेत रुजू असलेबाबत नोंदी आहेत परंतु स्वाक्षरी नाही . अशा वेळी मंजुरी देत येईल का ?
Question by अभिजीत पवार
23-08-2015
abhipawar1902@gmail.com
आदरणीय महोदय,
क्रुपया ७/१२ उतारा मधिल 'भोगवटदार वर्ग २' बद्दल माहिती द्यावी.
७/१२ उतारा मधिल 'भोगवटदार वर्ग २' खरेदी देऊ शकतो का?
७/१२ उतारा मधिल 'भोगवटदार वर्ग २ असलेल्या बहुतांश जमिनी नवीन शर्तीच्या (शासना कडून मिळालेल्या ) असतात अशा जमिनी होय.
पूर्व विदर्भात ७/१२ उतारा मधिल 'भोगवटदार वर्ग २ असलेल्या बहुतांश जमिनी ह्या खाजगी मालकीच्या आहे. सार्याच्या ३ पट नजराणा रक्कम भरून त्या वर्ग १ करता येतात.
तर 'भोगवटदार वर्ग २ असलेल्या नवीन शर्तीच्या (शासना कडून मिळालेल्या ) जमिनी प्रकार पाहून बाजार मूल्याच्या ५० % किवा ७५% रकम भरून त्या वर्ग १ करता येतात.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by अशोक टेकाळे
23-08-2015
ashoktekale17@gmail.com
प्रथम आपले आभार मला असा प्रश्न आहे खरेदीखतामध्ये नजर चुकीने जर घेतलेल्या जमीनीचे क्षेत्र टाकण्या ऐवजी पुर्ण गटाचे क्षेत्र व चतुःसिमा पुर्ण गटाचा असेल व कायम खरेदीखत असा शब्द नसेल व जमीन विकणारा व्यक्ती मयत असेल तर खरेदीखत रद्द करण्यासाठी काय करावे लागेल याविषयी कोणते कायदे व नियम आहेत हे सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती आहे
खरेदीखत रड करण्याचे अधिकार दिवाणी कोर्टाला आहे.
जमीन विकणारा व्यक्ती मयत असेल तर ७/१२ अद्यावत करून घ्यावा.
शुद्धीपत्रक बाबत सबरजिस्टर यांचे कडे विचारणा करावी .
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by सुनिल मुरकर
22-08-2015
sunilmurkar@gmail.com
वर्दी अर्ज काय? आणि कशासाठी करतात?
मालमत्ता संपादना बाबत , तालाठीस लेखी अथवा तोंडी माहिती देणे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by RAJESH TELHARKAR
22-08-2015
rajeshtelharkar@gmail.com
jya personkade shet nahi asha vyaktine shet kharedi kele tar to person kiti days madhe shetkari hoil kiva shetkari hoto .....pls ans me
मा. जिल्हाधिकारी यांचे परवानगी घेऊन शेती घावी लागेल.
किती दिवसात शेतकरी होईल या बाबत कायद्यात तरतूद नाही.
परंतु साधारणता एक हंगामानातर शेतकरी दाखल्या करिता अर्ज करू शकतात.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by शिवाजी राजे
22-08-2015
shivajirajetarale@gmial.com
किरण पानबुडे साहेब, नमस्कार
माझा प्रश्न असा आहे कि
गावठानात आमची वडिलार्जित मालकी वहिवाटीची जागा आहे, सदर जागा आमच्या आजोबांनी एकाला भाड्याने दिली होती- त्याचा भाडेपट्टा आमच्याकडे आहे- आजोबा वारल्यानंतर आजीनी ती जागा दुसर्याला भाड्याने दिली- त्याचा भाडेपट्टा आम्हाला सापडत नाही- पण त्या भाडेकरूने त्या जागेवर असणारे घर रिकामे करून आमची मोकळी जागा आमच्या ताब्यात तोंडी दिली- ती आमच्या ताब्यात देताना जो माणूस साक्षीदार होता तो आता वारला आहे - ती जागा मोकळी करून तो त्याच्या गावी निघून गेला - परंतु त्याने ग्रामपनच्यायतिला त्याचे नावाची पोकळ नोंद केली होती याची माहिती आमच्या आजींना न्हवती - त्यानंतर तो भाडेकरू वारला आता त्याच्या वारसांच्या नावाची नोंद ग्रामपनच्यायतिला झाली आहे - परंतु १९९५ साली झालेल्या सिटी सर्वे ला आम्ही मालक म्हणून हजर राहून आमची नोंद करून घेतली त्या सिटी सर्वे च्या चौकशी उतार्याला भाडेकरू म्हणून राहत होते असे सांगण्यात येते - व चौकशी वेळी सदर भाडेकरू पैकी कोणीही हजर न्हवते असा शेरा आहे - व १९८० साली आमच्या आजी वारल्या त्या पासून ती जागा आमचा वडिलांच्या ताब्यात होती व आजही ती आमच्याच ताब्यात आहे - वडिलांनी १९९० - ९१ साली त्यांचे नावाची नोंद केली व आज पर्यंत सदर जागेवर आमची नोंद, कब्जा व वहिवाट आहे - ती जागा आम्ही २००८- ०९ साली रिलायंस टोवर ला भाड्याने दिली आहे मग आता त्या भाडेकरूनच्या वारसांनी त्या ग्रामपंच्यायतिच्या नुसत्या नोंदीवर नोटीस देऊन आमच्यावर दावा ठेवणार आहेत असे समजले आहे - तर तसा त्यांचा दावा चालेल का ? त्यांना ती जागा मिळेल का ?
Question by संजय रा. कोकरे
22-08-2015
s.r.kokare1992@gmail.com
महोदय,
माझ्या आजोबांनी घेतलेली गावात घर व शिल्लक जागा आहे. माझे आजोबा कोणतेही मृत्युपत्र न करता वारले. त्यामुळे ती जमिन माझ्या वडीलांच्या नावाने झाली. त्यावर जागेवर माझ्या भावांनी अजुन दोन घरे बांधलीत. परंतु माझ्या वडीलांनी मला न विचारता ती जागा व घरे ही माझ्या भावांच्या नावे १०० स्टँप वर करुन दिली. व तो स्टँप ग्रामपंचायत मध्ये दाखल केला. त्यामुळे माझ्या वडीलोपार्जीत जागेवरिल घरामध्ये व जागेमध्ये माझा हक्क लागु होईल का? व ग्रामपंचायत मधील माझ्या संमती शिवाय दाखल केलेल्या स्टँप पेपर ग्राह्य धरला जातो का? मला माझ्या हिस्स्याची जागा माझ्या नावे करण्यासाठी मला काय करावे लागेल??
१०० स्टँप वर करुन हस्तांतरण नियमात नाही.
वडिलोपार्जित मालमत्ते मध्ये आपला हक्क कायम आहे. परंतु त्या करिता दिवाणी नाय्यालातात दावा दाखल करावा लागेल.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by शिवाजी बनसोडे
22-08-2015
shivajikb17@gmail.com
सर नमस्कार नारायण नावाच्या व्यक्ती कडून मी २० वर्षापुर्वी दोन एकर जमीन खरेदी केली रजिस्टार कडे खरेदीखत करताना खरेदीखतामध्ये जमीनीचे क्षेत्र टाकताना संपुर्ण गटाचे म्हणजे २० एकर क्षेत्र खरेदीखतामध्ये टाकलेले असून गटाचा चतुःसिमा टाकलेला आहे मी खरेदी केलेल्या जमीनीचे क्षेत्र ही नाही व चतुःसिमा ही नाही संपुर्ण गटाचे आहे मी फेर मंजूर करून सातबारा नोंद दोन एकर ची घेतली आहे नारायण आता मयत आहे नारायण च्या वारसाने माझ्या फेर व सातबारा नोंद रद्द करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपिल केले आहे मी खरेदी केलेल्या जमीनीचे क्षेत्र खरेदीखतामध्ये नसल्याने फेरफार नोंद व सातबारा नोंद रद्द होईल का¿ मला काय करावे लागेल याविषयी सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
आपण फेरफार मंजूर परत करून घेतला म्हणजे परत खरेदी खात केली कि केवळ फेरफार मंजूर करूनघेतला .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रामेश्वर काका
22-08-2015
kashte876@gmail.com
एका व्यक्तीच्या मुलाने तो सज्ञान झाल्यावर त्याच्या नावावर असलेली बारा एकर शेती खरेदीखता द्वारे ईतराना विक्री केली.आता आठ वर्षा नंतर त्या मुलाची आत्या काही हरकत घेवु शकते का?त्या मुलाचे नावे सदरील सर्वे नं.मध्ये काहीच जमिन शिल्लक नाही
हरकत घेणे नैसगिक हक्क आहे. त्यामुळे हरकत घेऊ शकतात. मात्र सदर बाब न्यायालयात अधिकार क्षेत्रातील आहे. मालमत्ता वडिलो परजीत आहे काय ? आत्याचे लग्न केव्हा झाले ? मुदत अधिमियाम काय सागतो ? या सर्व बाबीवर निर्णय अवलंबून राहील.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by VIKRAM YADAV
21-08-2015
vy11135@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे कि माझही बहिणी व आईने कुरतात तडजोड होऊन अप्प्ले हक्क मला सोडले आहेत तसा हुकिम नाम झाला अह्हे , ते आत्ता तो हुकुम नाममा फासाहून केला अह्हे असा वाद हलीत आहे व तो रद्ध कार्नायची धमकी देत आहेत तोह ह्कासोड पत्र रद्ध होऊ शकते का कृपया मार्गदर्शन करावे .
त्यांना हक्क सोड पत्र रद्द करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल .
केवळ दिवाणी न्यायालाय्स हक्कसोड पत्ररद्द करण्याचा अधिकार आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
