जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Namskar, maza prashna asa ahe mazi aai 2008 year la expire zali ahe. tichya nave nashik yethe ghar ahe
pan tya veles varas nond lagtana vadil,bhau,bahin yanche nav lagle ahe.
maze nav talathi yanche kadun
lavayche rahile ahe va tyachi hard(Affidivate) copy mazya kade ahe. tar mala maze nav lavayche asel tar
process kay ahe?
bhau,bahin,vadil yanchi parvangi lagel ka? ani te permission nasel det tar?
mahiti adhikara marfat kahi paryay ahe ka?
माननीय सर कर्मचारी यांचे वेतन मधून संघटना वर्गणी वजावट करता येते का
सदस्याचे समती पत्र व संघटनेची विनंती

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

संघटनेच्या विनंती पत्रावरून

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Rohit Jathar
05-02-2016
www.roraj8@gmail.com

केलेले बक्षिसपत्र रद्द कसे करता येईल.?
आमच्या कोणच्याही परवानगी शिवाय बक्षिसपत्र केलेले आहे.
ते सद्या दुय्यम निबंधक याच्याकडेच केलेले आहे.
तलाठ्याने नोंद केलेली नाही.
ज्याने बक्षिसपत्र केले आहे ती व्यक्ती दारू पिऊन हे काम केले आहे.
सादर जमीन हि दोन भावाच्या नावे आहे त्यापैकी एकाने बक्षिसपत्र केले आहे.
हि जमीन वडिलोपाजीत आहे.
बक्षिसपत्र करताना सदर व्यक्तीने वारसांना विचारलेही नाही.
हि जमीन फक्त दोन भावाच्या नावे आहे.
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
स्वतःच्या हिस्स्यापुरते बक्षिसपत्र करता येते

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by ARJUN
04-02-2016
mohanms9775@gmail.com

साहेब , x या व्यक्ती १९७३ मध्ये वारल्यानंतर x या व्यक्तिंचे वारसदार AB दोन मुले व PQR तीन मुलींचे नांव व B या व्यक्तिंचे नांव इतर हक्कात ठेवले . ग A या व्यक्ती कुटुंब प्रमुख होते.सदर B या व्यक्तीने १९९० मध्ये वाटणी करून घेतले , वाटणी करून घेताना B व्यक्तिंचे ७/१२ उतार वर PQR या बहिणींचे नांव आढळून येत नाही सदर PQR बहिणींचे नांव A या भावांचे ७/१२ उतार वर वारसा लागले पासून कायम आहे ,१९९७ मध्ये भूसंपादन झाल्यानंतर बहिणींचे हक्क सोड पत्र द्यावे असे बोलतात सदर तिनी बहिणींचे २००१ पूर्वी मयत झालेले आहे,बहिणींचे वारसा लावले नाही व A या व्यक्तिंचे २००१ मध्ये मृत्यू झाले नंतर त्यांचे वारसदार चे नाव लावले, सदर भूसंपादन रक्कम आजतागायत मिळाले नसून रक्कम मिळवणे साठी इतर हक्कातील व्यक्तींचे २००५ पूर्वी मृत्यू झालेने १६/१०/२०१५ या सुप्रीम कोर्ट निर्णयानुसार रक्कम मिळवणेसाथि पुढील मार्ग दर्शन मिळावे .विनंति
आदरणीय सर,अकृषिक वापर करणेकामी सहायक नगरसंचालक यांचेकडे अर्ज दाखल केल्यानंतर दि.२२/१/१६ च्या शासन निर्णयानुसार विनिश्चीती बाबत प्रमाणपत्र तहसील कार्यालयाकडून घेणेकामी तहसील कार्यालयात नव्याने अर्ज दाखल करावा लागेल का?नियोजन प्राधिकरण यांचेकडून त्याबाबत तहसील कार्यालयास पत्र दिले जाते का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
नियोजन प्राधिकरण यांचेकडून त्याबाबत तहसील कार्यालयास पत्र दिले जाते

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by VIKRAM YADAV
03-02-2016
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार.
साहेब तुम्ही सागीतल्या प्रमाणे मी मुंबई अध्निअम १९५८ चे कलम ४१ खालील कमी पडलेले मुद्रांक शुल्क बरण्या साठी अर्ज केला आहे .( तःशील ओफ्फिचे मधून तसा हुकुम घाला आहे .ह्क्कासोड पत्रावर मुद्रांक शुल्क भरा ) मी अर्ज करून ८ दिवस झाले आहेत तरी ताय्नी कोन्तीच माहिती दिली नाही कि किती मुदारंक शुल्क भरावे लागेल ,चलन मिळण्यास किती दिवस लागतात .त्या मुले मी नोदेची प्रक्रिया फ्हुडे नेहु शकत नाही कृपया मार्ग सांगा . धन्यवाद !
मुद्रांक शुल्कासाठी सब रजिस्ट्रार क्षेत्राचे सह जिल्हा निबंधक यांचे कार्यालयातून आपला दस्त अभिनिर्णीत करून घ्या . त्यामध्ये आपल्याला भरावयाचे मुद्रांक शुल्क किती हे नमूद केलेले असते.

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by Yogesh Hande
03-02-2016
yogesh12321@gmail.com

नमस्कार,
चार भावांपैकी महेश कामानिमित्त परगावी स्थायिक आहे. गावी वडिलोपार्जित जमिनीची खातेफोड झालेली नाही. महेशला कोणीही वारस नाही. त्याला त्याच्या हिश्याची शेतजमीन गावी असणा-या भावाच्या एका मुलाला हस्तांतरित करायची आहे. काय करावे लागेल?
खातेफोड होउन किवा वारसाने महेशचे नाव लागल्यावर नोंदणीकृत बक्षिस पत्र करता यॆइल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर
माझ्या मालकीच्या ७/१२ उतारा असलेल्या जमिनीवर २०१० साली दुसर्याने घर बांधले आहे ग्रामपंचायत कार्यालयाने त्यास घरपट्टी दिली असून
माझा प्रश्न असा आहे कि घरपट्टी बाबत मालकी जमिनीबाबत शासनाचा शासन निर्णय काय आहे त्याबद्दल माहिती द्यावी
माझ्या आईचे वडील ३० वर्ष अगोदर वारले, शेत जमीन दत्तक पुत्राला मिळाली मुलीला हिस्सा देण्याबाबत मुतृपत्रात नोंद नाही आजीच्या मुतृपत्रात तिच्या मालकीची काही जमीन मुलीला देण्याबत नोंद होती परंतु तीच जमीन आजीने हयात असताना विकली आता आजोबाची जमीन दत्तक पुत्राकडे आहे यामध्ये मुलीला हिस्सा देण्याबाबत काही प्रावधान आहे का न्यायालयात जायचे झाल्यास मुलीच्या सासरे कडील शहरातील न्यायालयात दाद मागितल्या जाउ शकते का क्रुपया सविस्तर प्रक्रिया सांगावी हि विनंती
नमस्कार सर,
मी माझ्या शेताची पोटहिस्सा मोजणी केली माझी जमीन सात बारा नुसार २ एक्कर कमी भरत आहे भूमी अभिलेख कडे ७/१२ नुसार नकाशा उपलब्ध नसल्यामुळे हद्दकायम होऊ शकत नसल्याचे कळविण्यात आले माझी तरी आपणास विनंती कि ७/१२ नुसार संपूर्ण शेत मिळविण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे
आदरणीय सर,मनपा.हद्दीत गृहप्रकल्प सुरु करावयाचा असल्यास म्हाडास किती flat /क्षेत्र हस्तांतरित करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
नमस्कार सर माझ्या वडिलाच्या नावावर ७/१२ वर वि. हि.हिस्सा असे यते त्यमुळे त्यच्या नावावर कोणतेही अनुदान मिळत नाही तर काय करावे
नमस्कार सर,
सर जमिन देवस्थान ईनाम वर्ग ३ च्या मिराशी कुळाची माहिती हवी अाहे.
प्रश्न १) मिराशी कुळ हक्क हस्तांतर करण्याकरता परवानगीची अावश्यकता अाहे का?
प्रश्न २) कायम कुळ अाणि मिराशी कुळ यामध्ये फरक काय अाहे?
प्रश्न ३) अशा पद्धतीचे दस्त होतात का?
प्रश्न ४) स्वकष्टार्जित मिळकत हस्तांतर करता येते का?
प्रश्न ५) सन १९९८ ते १९९९ या कालावधीत देवस्थान ईनाम वर्ग ३ चे मिराशी कुळाचे दस्त दुय्यम निबंधकाकडे कोणत्या अाधारावर केले जात किंवा कोणत्या act ने केले जात याची माहीती मिळावी.
ही विनंती.
सर
आमच्या आजोबंच्या वाट्याला दीलेली २० आर ईतकी जमिन सध्या आमच्या ताब्यात सूमारे २५ सालापासून आमच्या ताब्यात आहे .मात्र ती जमिन सध्या आमच्या चूलत चूलत्याच्या वारसांच्या नावावर आहे . चूलत चूलते ते हयात असताना ती जमिन आमच्या वाट्याला दिल्यामूळे ती जमीन आमच्या नावावर करुन द्यायला तयार होते मात्र आता ते मयत झाले आहेत त्यांच्या वारसांनी सदर जमिनी वर त्यांच्या नावाची वारस नोंद लावली आहे आता ते सदर जमिन आमच्या नावावर करुन देत नाहीत . आमच्या आजोंबाच्या वाट्याला सदर जमिन दिली असल्याबाबत आमच्याकडे सध्या कोनताही पूरावा नाही मात्र सदर जमिन २५ सालापासून आमच्याच ताब्यात आहे सदर जमिनीत आमचे १० सालापासून घर आहे त्या घराची ग्रामपंचायत ला तेव्हापासून नोंद आहे तेव्हापासून सदर घराची दरसाल आम्ही ग्रामपंचायतीकडे पट्टी भरत आहोत तसेच महावितरनाने आम्हाला सदरजमिनीतील आमच्या घराला विज मिटर दीले आहे त्याचेही आम्ही विजबिल भरत आहोत त्या जमिनीत आमचे २० नारळाचे झाडे आहेत व दरसाल आम्ही सदर जमिनीत विविध पिके घेत आहोत मात्र पिक पाहणीला आमचे नाव तलाठीने घेतलेले नाही अशी स्थिती असताना आम्हाला आमचे चूलत चूलत्याचे वारसदार ती जमिन आमच्या नावावर करुन देत नसल्यामूळे आम्हाला सदर जमिन आमच्या नावावर कायदेशिर मागाने करावयाची आहे .
१. तरी आम्ही सध्या काय करु
२ कामगार तलाठी सदर जमिनीवर आमचे पिकपाहणीला नाव लावू शकतो का?
३ सदर जमिन आमच्या नावावर करण्यासाठी आम्ही काय करु
४ महसूली अधिकारी सदर जमिन आमच्या नावावर करुन देऊ शकतिल का त्या साठी काय करा वे
१. आपली जर २० वर्षा हून अधिक काळ वहिवाट असेल तर , आपण Adverse -possession चा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करा .
२.पिक पाहणीला नाव लावण्यासाठी , जमीन मालकाने त्याचे संमतीने जमीन आपल्याला कसण्यास दिलेलेइ असणे आवश्यक आहे . आपले जमीन कसणे किंव्हा आपली वहिवाट कायदेशीर असणे आवश्यक आहे . आपली वहिवाट आपले , चुलत चुलत्यांचे वारसांचे , इच्छे विरुद्ध असणार , त्यामुळे आपली वहिवाट हि कायदेशीर नाही . पर्यायाने , आपले नाव पिक पाहणी सादरी लावले जाणार नाही
३. उत्तर क्रमांक १ प्रमाणे , उपाययोजना करणे उचित
४. नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्रामीण पेयजल योजनेतील टाकी बांधकाम करण्यास जागा मिळणेबाबत वस्तीवाधीसाठी संपादित केलेली जमीन इतर प्रयोजनासाठी देता येते का ? कृपया शासन तरतुदी सह मार्गदर्शन करावे हि विनंती .
जमीन ज्या कारणासाठी संपादित झाली असेल त्याच कारणासाठी जमिनीचा वापर होणे आवश्यक आहे .
नवीनभू संपादन कायद्याच्या कलम ९९ नुसार , अन्य कारणासाठी जमिनीचा वापर अनुद्नेय नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बांधकाम परवानगी /परवाना देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना आहेत का ? असतील तर कोणत्या शासन तरतुदीनुसार कृपया मार्गदर्शन करावे .
बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार , नियोजन अधिकार यांना आहेत .
प्रादेशिक योजना असेल तर - जिल्हाधिकारी नियोजन अधिकारी आहेत
कलम ११३ प्रमाणे Special Township असेल तर - अशे प्राधिकरण

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by rajesh
28-01-2016
gawandestate@gmail.com

aaicha mrityu patr ani bahinicha khredi khat banvlela ahe pn talathi karyalay nondani kryala kahi tharavik mudat aste ka krupya madat kra.
जमीन चा निकाल नाशिक कोर्टाने आमच्या बाजूने दिला आहे तर समोरच्या ने मुम्बई हाइ कोर्ट मधी अपील केला आहे तर काय होइल क्रुपया सांगा
hmmmmm
या प्रश्नाचे उत्तर आपणास काय अपेक्षित आहे.
एक तर निकाल आपले बाजूने लागेल अथवा विरोधी पक्षाचे बाजूने लागेल ................................

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब माजा प्रश्न पुढील प्रमाणे आहे माजे मित्र पुणेकर यांची पुण्याला त्यांच्या गावी दोन जीमिनी आहेत एक जमीन त्यांच्या चुलत्यांनी विकत घेतली आहे व दुसरी त्यांच्या चुल्त्यांसकट व्दिलोपाजित जमीन आहे .ज्या वेळी या लोकांनी व्दिलोपाजित जिमीनवाटण्या च्या विचार केला तेव्हा व्दिलोपाजित जमीन म्हणून त्यान्ही त्यांच्या चुलत्यांनी वयक्तिक विकत घेतलेल्या लामिनीची वाटणी केली होती. त्याला आता जेव्हा सत्य काय ते कळले तेव्हा चुलत्यांची जी वाटणी झालेली जमीन ती त्यांना परत करायची आहे किव्हा सदर जमानीचा जो सर्वे नंबर आहे तो व व्दिलोपाजितजमानीचा जो सर्वे नंबर आहे तो अद्लाबद्ल करायचा त्यांचा विचार आहे तर असे करता येईल काय . त्या साठी कोणते पेपर लागतील कोणाला भेटावे लागेल याची आपण माहिती द्यावी हीच विनंती .
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८१ च्या कलम ११८ ते १२१ नुसार , जमिनीची आदला-बदल करता येते.
मात्र त्या साठी आपणास नोंदणी व मुन्द्रंक शुल्क भरणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

रक्ताच्या नात्याला स्टेम्प ड्यूटी माफ़ हयाचे परिपत्रक आहे का कोनकडे कृपया असेल तर त्याचे लिंक पाठवा नहितर अपलोड केरा
कृपया 23 april २०१५ चे शासन अधिसूचना पहा

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

नोंदणी महानिरीषक पुणे यांचे संकेत स्थळ पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by VIKRAM YADAV
25-01-2016
vikram.vy11135@gmail.com

namaskar ,
kortat hukumnama zala ahe mazaa aai va 2 bhinini hakka soad lela hahe kortat.atta maze nava 7/12 var lagave mhnun mi tahsil office madhe arg kela ahe thoha mala sagnyat ale ki thumala mudrank bhrave lagel.
बरोबर
हक्क सोड खत नोब्द्निकृत करावे lagel

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by abhijit
24-01-2016
abhijitkadam55@gail.com

११/१२/२०१५ शासन आदेशा प्रमाणे ग्रामिन भागात घर बाधनी परवाना चे अधिकार ग्रामपचायत यांना देण्यात आले आहेत, त्यासाठी नगर रचना विभागाची परवानगी आवश्यक आहे का? तसेच बाधकाम परवानगी साठी लागणारे कागद पत्रे व कार्यपध्दती सविसतर माहीती मिळावे?
ग्राम पंचायत यांनी नगर रचना विभागाचे अभिप्राय घेण्याचे आहेत
आपणास बंधं नकाशे सदर करावे लागतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by rajaram
20-01-2016
rajaram4021@gmail.com

सर, माझे आजोबा १९७० साली मयत झालेले आहेत,मयत झालेनंतर ६ क फेरफारला आमची सर्वांची म्हणजे माझ्या वडिलाची,आत्याची , चुलत्यांची नावें लागलेली होती .परंतु ७/१२ वरती माझे आजोबा मयत झालेवार फक्त माझ्या चुलत्याचे ए.कु .म. म्हणून नाव लागलेले होते.इतर हकाम्ध्ये कुणाची नावें लागलेली नव्हती .१९८५ सालापासून चुलत्याने ए.कु म.नाव कमी करून आमच्या आजोबांची जमीन विकलेली आहे त्यावरती माझ्या वडिलाची,आत्याची सही , सोढपत्र ,वाटणीपत्र ,वाटप झालेले नसताना चुलत्याने जमीन विकलेलीआहे . आता ५.३० मधील ३.०० एकर विकलेली आहे व जी २.०० एकर आहे ती मुदत खरेदी दिलेली आहे. आणि ३० गुंठे जमीन आपल्या पत्नीच्या नावें केलीली आहे.तरी सर आम्हला आमची सगळी जमीन परत मिळेल का ,त्यासाठी काय करावे लागेल.कृपया उपाय सांगा.
आपण The Specific Relief Act खाली , आपले चुलत्याने केलेलं विक्री व्यवहार राद्द्द करून मागा
त्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rameshwar Kashte
20-01-2016
kashte876@gmail.com

महाराष्ट्र शासनाने, शहराजवळील जमिनीवर प्लाॅट घेतल्यास तुकडेबंदी कायदा लागु होणार नाही असा निर्णय घेतला आहे;त्याचा जी.आर.मराठी भाषेतला कोठे मिळेल ?तो G.R.माझ्या email वर पाठवता का प्लीज ?
आपण महाराष्ट्र शाषण संकेत स्थळ पहा . त्या ठिकाणी आपणास कायदा दुरुर्स्ती आदिसुचना भेटेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,
ग्रामीण भागात घर/इमारत बंधनेसाठी परवानगी घेनेची आवश्यकता नाही असे सुधारित परिपत्रक आहे असे म्हणतात या बाबत कृपया सविस्तर विवेचन करावे.

This page was generated in 0.41 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3