जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

माझ्या माहितीस्तव सेवानिवृत अधिकारी / कर्मचारी यांचे पेन्शन पेपर तयार करण्याची जबाबदारी ही आस्थापनेची असते . परंतु आस्थापनेकडून सेवानिवृत अधिकारी / कर्मचारी यांना तीन प्रतीत पेन्शन पेपर सादर करण्यासाठी पत्र देणे योग्य आहे का ?
गावातील तलाठी कार्यालय मध्ये जमिनी विषयी कोण कोणती कागद पत्रे उपलब्ध असतात
तलाठी दप्तरातील सर्व गाव नमुने .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

सर नमस्कार आम्हाला सरकारी मिळालेली चार एकर जमीन आहे ती भोगवटादार २ वरून भोगवटादार १ झालेली आहे पण सातबाराच्या ईतर हक्कात सरकारी गायरान व शेतीचे नाव सरकारी गायरान असे आहे भोगवटादार १ म्हणजे कोणतेही निर्बंध नसलेली जमीन मग जमीन विक्री करायची म्हटल्यावर विक्री करता येईल का कसे व परवानगी घ्यावी लागेल का व कोणाकडून सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
सरकारी जमीन भोग्वातदार वर्ग १ होत नाही . आपणास विक्रीची परवानगी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

'शासनाकडून मिळालेली जमीन भूधारणा वर्ग २ ची जमीन भावाच्या नावाने मिळाली आहे त्यामुळे ७/१२ वर त्यात तीन भावाचे हिस्से झाले परंतु ७/१२ नाव दाखल होत नाही . काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
गावातील तलाठी कार्यालय मध्ये जमिनी विषयी कोण कोणती कागद पत्रे उपलब्ध असतात
सर १९६३ साली झालेली खरेदी खताची नोंदीचा फेरफार आहे परतुं दस्त नंबर तहसिलदार कार्यालय तसेच प्रांत कार्यालय मिळत नाही व दोन्ही ठिकाणी दस्ताची नोंद नाही खरेदी खत मिळवण्या साठी काय करावे लागेल
दुय्यम निबंधक कार्यालयात शोध घेऊन पाहावा .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

फाळणी बारा म्हणजे काय व तो कोठे मिळतो
फाळणी बारा म्हणजे जमीची मोजणी करून तुकडा ( तुक्देबंदी कायदा उल्लांगण न होता )करणे होय , त्या बाबत प्रक्रिया तालुका मोजणी कार्यालयात होते

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

शेतीचे न प्लॉट करण्यासाठी रुंदी किती लागते
कोणत्या कामासाठी NA करायचे ह्यावर अवलंबून असते , आपण कृपया नगर रचना कार्यालयात संपक साधा आपल्याला व्यवस्थित माहिती मिळेल

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by Balaji sawant
08-09-2015
Balaji.sawant44@gmail.com

सर मला 5 भाऊ आहेत त्या पैकी 1 भाऊ चुलत्याला मुलबाळ नसल्यामुळे दत्तक दिला व हिस्याप्रमाणे चुलत्याची सर्व प्रॉपर्टी त्यांना देण्यात आली पण चुलत्याची प्रॉपर्टी घेऊन देखील तो आता वडीलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागतोय तर ; काय करावे
(1) दत्तक दिल्यास वडिलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा मिळतो काय
जर दत्तक जाने पूर्वी , त्या भावाचे नावे मिळकत झाली असेल तर , ती त्याचे मालीकीचीच राहील .

मात्र दत्तक गेल्या नंतर त्याला , मुल आई वादिलाकडून मिळकतीत कोणताही हिस्सा मिळणार नाही

Section 12 of Hindu Maintenance and Adoption Act -वाचा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझया ताब्‍यात जेवढी जमीन आहे स.नं. नुसार त्‍याची मोजणी करुन कायम खुणा करावयाच्‍या आहेत. परंतु ता.नि.भू.अभिलेख यांनी तुमच्‍या सातबारवरील जमीनीमध्‍ये व त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध रेकॉर्डमध्‍ये फरक असल्‍याचे कळविले आहे. माझयाकडे माझया जमीनीची खरेदी आहे. त्‍यानुसार सातबारामध्‍ये जमीनीचे क्षेत्रफळ नमूद आहे. त्‍यामुळे माझया जमीनीची मोजणी करण्‍यास अडचण निर्माण होत आहे. कृपया सल्‍ला देण्‍याची विनंती आहे.
प्रथम ताब्या प्रमाणे मोजणी करा . त्या मोजणीस/शेत्रास , शेजारील खातेदारांची हरकत नसल्यास , शेत्र दुरुस्ती अर्ज , जिल्हाधिकारी यांचे कडे करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

133 संहीता प्रमाणे (एका उपद्रवी झाडाची ) केस प्रातांकडे उभी राहली असता..सलग तीन तारांखांना विरोधी हजर राहत नसेल तर...प्रांतानी अजून कीती ताराखांती वाट पहावी... कींवा या प्रकरणामध्ये प्रांत जास्तीत जास्त कीती तारीख लावू शकतात.वा निर्णय देवू शकतात.. कारण साहेब सलग तीन तारखांनी मी उपस्थित राहतो आहे. परुंतु आमच्या तालुक्याचे प्रांत मला वारंवार तारीख देत आहेत..मी काय करू...लोकशाही वरील तसेच न्याय प्रकीयेवरील माझा विश्वास उडून जात आहे. .हे प्रकरण सदर प्रांताकडे डिसेंबर २०१४ पासून पडून आहे. कारवाई काहीच होत नाही. उलट मलाच त्रास सहन करावा लागत आहे. का माझ्यासारख्या नागरिकांनी नक्षलवादी व गुंड होवु नये..कृपया मी आपल्या उत्तराची वाट पहात आहे.....धन्यवाद

प्रांत यांची अडचण हि समजून घ्या . कदाचित ते मुद्दाम तारीख देत नसतील अशी बाब नसेल

जिल्हाधिकारी यांचे हि निदर्शनास बाब आणून दया

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

७/१२ सदरील इतर हक्कात अतिरिक्त नागरी समूह क्षेत्र असा शेरा दाखल आहे.तो कमी करून घेण्यासाठी कोणाकडे अर्ज दाखल करावा लागेल?कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील.
श्री. पी.एम. गड्डम सर, आपण कळविले आहे की, लक्ष्मी योजने अन्वये पत्नीचे नांव दाखल करता येते. त्याबाबतचे शा.परिपत्रक क्र.१४/२१६/१६/प्र.क्र.४५८/ल६ सन १९९२ चे परिपत्रक माझ्या ईमेल वर मिळू शकेल का? कृपया सदर परिपत्रक पाठवावे ही ‍व‍िनंती.
"३२ म" प्रमाणपत्रासाठी अर्ज्र करून ६० दिवस झाले आहेत तरी आजतागायत प्रमाणपत्र मिळाले नाही, महसूल कर्मचारी चाल ढकल करत आहे, "३२ म" प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय कार्यपद्धत अवलंबली जाते याची माहिती मिळावी.
सदरचे प्रमाणपत्र ७ दिवसात देणे अपेक्षित
जिल्हाधिकारी , प्रांत अधिकारी यांना कळवा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

"७/12' उतार्यावर "नवीन शर्थ
" असतानाही कुळाला मीहिती न देता, मुल मालकाने
अन्य इसमास खरेदी खात Karun दिले आहे
त्याची नोंद फेटाळली आहे
"३२ ग" आमच्या नावे
आहे, असे असताना मुल मालक
पुन्हा या शेत्राचे अन्य इसमास खरेदी खात करून देण्याच्या प्रयत्नात आहे , तरी महसूल कार्यालय गुन्हा दाखल करू शकते काय? तसेच त्यासाठी आम्ही काय करणे आवश्यक आहे
आपण जर कृषक दिन पूर्वी कुल असाल तर आपण मानीव मालक आहात . आपली मिळकत मालक विकत आहे . खरेदी खत रद्द करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या प्लॉट समोरील रस्त्यावरील (राज्य मार्ग व शासकीय जागा ) अतिक्रमणे (टपर्या ,अनधिकृत दुकाने) कश्या प्रकारे हटवू शकतो. या मध्ये शासनाकडून काही मदत (पोलिस सुरक्षा ) मिळू शकते का ?
रस्ता ज्या प्राधिकरणाचा , त्याची जबाबदारी आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मोबदला देऊन जमिनीबाबत कधीही रद्द न होणारे रजि.कुलमुखत्यार पत्र व रजि.करारनामा करून घेतले परंतु कु.मु.करून देणारी व्यक्ती मयत झाली.IGR च्या परिपत्रक नुसार न्यायालयाच्या विशिष्ट आदेशाशिवाय कु.मु.रद्द करता येत नाही.परंतु सदर कु.मु.पत्र वारसांवर बंधनकारक राहील का?ते बंधनकारक राहण्यासाठी काय करावे लागेल?वारस ऐकत नाहीत.कृपया मार्गदर्शन करावे.
आपले कुल मुखत्यार पत्र नोंदणीकृत आहे . आपण मोबदला दिला असल्याने , कुलमुखत्यार पत्र , मुल attorney जरी मयत झाला तरी ते रद्द होत नाही . ते त्याचे वारसावर बंधन कारक आहे .
वारस मनात नाहीत . त्या मुले आपण व्यथित होण्याचे कारण नाही
या मुखत्यार पत्राचे आधारे आपण पुढील व्यवहार करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रथम धन्यवाद . माझी असा प्रश्न आहे कि आमच्या आजोबांनी १९७१ मध्ये बाळू लोंढे यांच्याकडून जी जमीन खरेदी केली आहे त्या जमिनीचे त्यांच्या मृतू नतर वाटप होऊन ती जमीन आमच्या वाट्याला आली आहे . पण त्या उतारा मध्ये उजव्या बाजूला इतर हक्कात लक्ष्मन आबाजी असे असून पुढे स सा कु ८३२ असे नाव येत आहे . ते मला कमी करावयासाठी काय करावे लागेल उतार्याच्या भोगावातदार वर्ग १ येत असून तिथे माझ्या वडिलांचे नाव आहे भोगावातदार वर्ग १ काय आहे आणि इतर हक्कात असलेला व्यक्तीचा काय संभंध आहे काय. कृपया माहिती द्यावी
भोग्वातदार वर्ग १ म्हणजे , हस्तांतारांवर निर्भंद नाहीत

इतर हक्कात असलेला शेरा, काय आहे हे पाहण्यासाठी , त्या खालील नमूद फेरफार पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

भुधारणा पध्दती वर्ग २ च्या (नि.स.प्र.) शेरा असलेल्या जमिनीमध्ये हक्कसोडपत्रान्वये इतरांची नांवे दाखल / कमी करता येतील का?
हक्क जर , ७/१२ वरील , इतर नातेवायिक असतील तर त्यांचे लाभत सोडता येयील
नातेवायिक - भाऊ , बहिण , आई , वडील , मुलगा /मुलगी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जर एखाद्याला एका सर्व्हे नंबरची जमिन ही कुळ कायदान्वये मिळलेली असून, नि.स.प्र. आहे. सदर जमिनीमध्ये सन १९८० सालामध्ये कब्जेदाराने अर्ज दिल्यावरुन भाऊ व चुलत भाऊ यांचे सामाईक नाव लावणेबाबत फेरफार गावी मंजुर आहे. पंरतु त्याचा अमंल ७/१२ ला दिलेला नाही. तर नि.स.प्र जमिनीमध्ये सदर फेरफारान्वये नावे दाखल करता येतील का?
एखाद्या खाजगी मालकीच्या जमिनीमध्ये ७/१२ उताऱ्याच्या इतर अधिकारामध्ये महाराष्ट्र खाजगी वने अधिनियमातील तरतुदीस अधिन राहून असा शेरा आहे. सदर जमिन मालकाला विक्री करावयाची असल्यास हस्तांतरणास वन विभागाकडून परवानगीची आवश्यकता आहे काय?
परवानगीची आवश्यकता नाही
तथापि सदर जमीन या कायद्या खालील कलम २२ अ चे तर्तुदिद अधीन आहे
कदाचित जमीन शाशानाकडे वन म्हणून हि जायील
वनेतर काम या जमिनीवर करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार सातबारा वर भोगवटादार वर्ग एक व ईतर हक्कात सरकारी गायरान असा शेरा आहे जमीन विकण्यासाठी शासनाची परवानगी लागेल काय व लागत असेल तर कोणाची सविस्तर मार्गदर्शन
इतर हक्कात गायरान असा शेरा आहे

त्या मुले हि जमीन शाश्नाची हि असू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by VIKRAM YADAV
31-08-2015
vy11135@gmail.com

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे कि मी दत्तक मुलगा आहे .माझा दत्तक वडिलांचा मृतू झालाय्नातर माझी आईने .आमचे राहते वादिल्पर्जीत घर स्वताचे नावावर केले .तय्नंतर तिने आपल्या मोठ्या मुलीचे नवे ते घर केले आहे.अ-८ वर मुलीचे नवा आहे . ते घर ते आत्ता विक्रीस कडले आहे.तर मी काय करू माझा हक्क तय घरावर सागता एऐएल का .तय्साठी काय करावे लागेल .ग्राम पंचायत मध्ये मी तक्रार अर्ज देणार आहे .मिलीप्रमाणे माझा हक्क मिळवण्यासाठी काय करावे क्रुपय मार्गदर्शन करेवे .
आपले आई ने म्हणजे दत्तक घरी गेलेल्या आई ने जर , वडिलांचे पाचहात , परस्पर घर विक्रीस काढले असल्यास , आपण हरकत घ्या
न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by INGOLE VIJAY HARI
31-08-2015
vv_rt@rediffmail.com

आरआरसी प्रकरणात वसुल केलेल्‍या रकमेचे १०% वसुल केलेली रक्‍कम कोणत्‍या लेखाशिर्षाखाली तसेच तहसिल कार्यालय किंवा जिल्‍हाधिकारी कार्यालयात जमा केली पाहीजे माहिती मिळावी
आदरणीय सर,इनामवर्ग ६ब जमिनीबाबत जुनी शर्त विक्री परवानगी मिळाली आहे परंतु मूळ मालक खरेदीखत करून देत नाहीत त्यांना मोबदला देऊन रजि.कु.मु.पत्र फर्म च्या नावे घेतलेले आहे.त्या आधारे ज्या व्यक्तीच्या नावे खरेदी घेणार आहे त्या व्यक्तीस कु.मु.द्वारे सदर जमीन खरेदी करता येईल का?

This page was generated in 0.41 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3