जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सरकारी परिसरातून बाहेर काढणे (Eviction ) या साठी १९५५ च्या कायद्या व्यतिरिक्त कोणते परिपत्रक/G R आहे का
कायदा अंतिम आहे
शासन निर्णयाची गरज नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सरकार ने दिलेली चार एकर जमिन आहे पण सातबारा वर आकार येत नाही आकार येणेसाठी काय करावे लागेल सविस्तर मार्गदर्शन व्हावे
जिल्हाधिकारी यांचे कडे म ज म अ १९६६ चे कलम ६८ खाली अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Abhijit
26-09-2015
abhijitkadam55@gmail.com

B.N.D.CASE म्हणजे काय त्यासाठी Advocate ची गरज असतेच का
जमिनीच्या हद्दी संबंधित बाबी
nahi

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

जमिनीच्या हद्दी संबंधित बाबी
nahi

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

आदरणीय सर,इनामवर्ग ६ ब जमिनीबाबत रीतसर परवानगी घेऊन खरेदीखत केले असून 7/१२ सदरी नाव दाखल झाले आहे.परंतु पूर्वी तिर्हाईत इसमाने सदर जमिनीचे परवानगी न घेता खरेदीखत केले.परंतु त्याचा फेरफार रद्द झाला.तर त्यास हक्क प्राप्त होईल का?झाल्यास काय करावे?
फेरफार रद्द झालेला असल्यास , तीरीहीत इसमाचे नाव मिल्कातीस लागणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बदली रजा विषय शासन निर्णय / परिपत्रक / अधिसूचना या बाबतमाहिती

Question by Balaji sawant
24-09-2015
Balaji.sawant44@gmail.com

सर आपल्या सुचनेप्रमाणे 500 रुपये च्या स्टँम्पवर बक्षीस पत्र तयार करून त्या प्रमाणे 1 हे. जमीन वडीलांच्या नावावरून आईच्या नावे करायची आहे परंतु तलाठी फेर त्यांच्या कडे होत नाही म्हणून टाळताहेत तसा फेर कोणाकडे होईल
बक्षीस पत्र , दुय्यम निबंदक यांचेकडे नोंदवणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by swati swami
24-09-2015
swati.swami@yahoo.com

तलाठी कर्मचारी यांचा राजीनामा कोणी मंजूर करावयाचा असतो ? मंजूर करण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत ? अटी व शर्ती कोणत्या आहेत ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
माझा प्रश्न असा आहे की,संपतरावाला 2मुले व4मुली आहेत.मुलींचे लग्न 1987 अगोदर झालेले आहेत.संपतराव मरण पावले आहे.मुलांनी शेतीच्या खाजगी वाटण्या केल्या व आपसात वाटुन घेतल्या.वाटण्या होतांनी संपतरावांच्या मुलींनी काहीही मागणया केल्या नाहीत.संपतरावांच्या मोठ्या मुलाने त्याच्या हिशाची शेती मुलगा तुकारामाच्या नावे केली 8 वर्षा पुर्वी तुकारामाने त्याच्या नावावरील सर्व शेती 5 लोकांना कायम विक्री खरेदी खताने केली.परंतु आता संपतरावांच्या 3 मुली हिस्सा मागत आहेत.तुकाराम कडून शेती विकत घेतलेल्या लोकांना आता काही अडचण येईल का ?कृपया मार्गदर्शन करा.
सर सातबारयावरील कुल कसे कमी करण्यात येते त्याची प्रक्रिया कशी असते.
7 /१२ वरील कुल , कमी करायचा आहे म्हणून कमी होत नाही . महाराष्ट्र कुल्वहिवत अंड शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४ , मधील तरतुदींची पुर्तातता झाली तर , कुल कमी होतो
कलम ३१ खाली , जमीन मालकास , व्यक्तीक कस्वानुकीसाठी अथवा बिनशेती वापरासाठी जमीन आवश्यक असल्यास , कुलाचा कुल हक्क्का संपुष्टात आणता येतो
मात्र कलम १४ व ३१ , हि कलमे अन्य तरतुदींशी निगडीत आहेत त्या तरतुदींची पुर्तातता झाली आहे का ? हे हि पहाहावे लागते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by swati swami
23-09-2015
swati.swami@yahoo.com

नवीन karmchayari जर एक वर्ष होण्याआधी ६ ते ७ महिन्याच्या रजेवर गेला तर त्यास कोणती रजा मंजूर करता येईल ? कोणता नियम लागू होतो ?
कार्यालयीन कामकाज करताना jantechi kame / तक्रारींचा किती divasat niptara करणे आवश्यक आहे ? कोणत्या नियमानुसार ?
Right TO Service Act , मध्ये या साठी कालावधी निच्छित केलेला नाही .
मात्र Maharashtra Government Servants Regulation of Transfers and Prevention of Delay in
Discharge of Official Duties Act, 2005.
मधील तरतुदी नुसार नागरिक सनद प्रत्येक कार्यालयाने तयार करणे आवश्यक
त्या नुसार , तक्रार निर्गती कधी होईल याचा कालावधी निच्छित करावा
अन्यथा , कार्यालयीन नस्ती, या कायद्याचे तरतुदी नुसार , ४५ दिवसात निर्गत करावा
तथापि , नागरिक तक्रार , शक्यतो लवकरात लवकर निर्गमित करावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, महसूल विभागातून नियत वयोमानाने शासन सेवेतुन सेवानिवृत्‍त होत असलेल्‍या अधिकारी/कर्मचारी यांचे नादेय/नाचौकशी प्रमाणपत्र निर्गमित करण्‍यात येत असलेल्‍या प्रक्रियेत संबधीतांनी सेवा केलेल्‍या संपुर्ण सेवाकालावधीतील संबधीत कार्यालयाचे नादेय/नाचौकशी अहवाल मागविले जातात. जेव्‍हा कि इतर इतर विभाागातून नि.से.नि. होणा-या अधिकारी/कर्मचारी यांच्‍या शेवटच्‍या दहा वर्षाच्‍या सेवाकालावधीचे अहवाल मागविले जातात. याबाबत कृपया मागदर्शन व्‍हावे ही विनंती.
सर, वाटणी म्‍हणजे काय ? महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्‍वये वाटणी करीत असतांना आई-वडील व त्‍यांची सर्व अपत्‍ये यांना समान वाटप होणे आवश्‍यक आहे का ?
दूस-या एका प्रकरणात भावाच्‍या नाववर असलेली जमीन भावाभावात वाटणी करुन देण्‍यासाठी अर्ज आलेला आहे तर वाटणी करण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत का ?
कलम ८५(२) खाली , वाटप म्हणजे निच्छित असलेल्या क्षेत्र प्रमाणे , सह धारकत जमिनीची विभागणी करणे

मिळकतीत प्रत्याकाचा हिस्सा किती आहे , हे दिवाणी न्यायालय मार्फत निच्छित केले जाते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख हे एकच आहेत का ?
जर कार्यालय प्रमुख हे तहसिलदार असतील तर विभाग प्रमुख तहसिलदार यांना म्‍हणता येईल का ?
सर, साधारण बारा वर्षापुर्वी खरेदीखत झालेले आहे, आज पर्यंत फेरफार झालेला नाही पण आज खरेदी घेणार मयत झालेला आहे अशावेळी मयताच्‍या वारसांच्‍या नावे फेरफार करणे योग्‍य राहील का ? विक्री करणार जिवंत आहे व तो फेरफार करुन देण्‍यास तयार आहे काय करावे मार्गदर्शन करा.
खरेदी देणार जरी मयत असला तरी , घेनाराचे नाव ७ /१२ सादरी लावता येयील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, माझा लॉगीन आयडी mahadiwalek.v2009@gmail.com हा आहे पण पासवर्ड टाकला असता तो ओपन होत नाही तरी कृपया नविन पासवर्ड रिसेट करुन देण्‍यात यावा. तसेच कर्मचारी व्‍यासपीठ मध्‍ये समाविष्‍ठ होण्‍यासाठी काय करावे लागेल याची माहिती दया.
आपली सदस्य नोंदणी झालेली नाही . कृपया नव्याने फॉर्म भरा आपल्याला पासवर्ड पाठविण्यात येयील . तसेच कोणताही कर्मचारी , कर्मचारीव्यासपीठ मध्ये लोग इन होवून समाविष्ट होऊ शकतो . धन्यवाद .

Reply by MCS Maharashtra | इतर

सर, दिवाणी प्रक्रीया संहितेचे कलम 54 नुसार सरसनिरस वाटणी करीता प्रकरण जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडुन तहसिल कार्यालयात आले असता उपअधिक्षक भूमी अभिलेख यांनी मोजणी करुन दिलेली आहे. अशावेळी वादी प्रतिवादी यांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणी शुल्‍क व मुद्रांक शुल्‍क भरण्‍यास पत्र देणे योग्‍य राहील का ? महाराष्‍ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक दिनांक 27 मार्च 1995 मधील तरतुदीनुसार न्‍यायालयीन डिक्रीव्‍दारे झालेल्‍या हस्‍तांतरणावर नोंदणी व मुद्रांक शुल्‍क जमा करणे आवश्‍यक आहे तरी कृपया दिवाणी प्रकी्या संहितेच्‍या कलम 54 नुसार आलेल्‍या डिक्रीवर नोंदणी व मुद्रांक शुल्‍क भरण्‍यास वादी यांना कळवणे आवश्‍यक आहे का ?
सर, एका व्‍यक्‍तीला 2001 नंतर जन्‍माला आलेली तिन अपत्‍ये आहेत. पण त्‍यातील एक अपत्‍य त्‍या व्‍यक्‍तीने आपल्‍या बहिणीला कायदेशिर बाबी पुर्ण करुन दत्‍तक दिलेले आहे अशावेळी त्‍या व्‍यक्‍तीस ग्रामपंचात किंवा इतर कोणत्‍याही निवडणुकीस फॉर्म भरुन निवडणुक लढवता येईल का ?
नाही........... त्या मुलाचे नैसर्गिक पालकत्व त्याच व्यक्तीकडे राहते

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

सर, राशन दुकानदार यांना जनमाहिती अधिकारी म्‍हणता येईल का ? किंवा तसे आदेश तहसिलदार यांना काढता येतील का ?
शासकीय कर्मचारी विरुध्‍द फौजदारी खटला दाखल करणेस मंजूरी देणेबाबतचा विहीत नमुना आहे का ? असलेस कोठे मिळेल ? (महाराष्‍ट्र नागरी सेवा (शिस्‍त व अपील) नियम 1979 व विभागीय चौकशी पुस्तिका 1991 मध्‍ये अशा प्रकारचा नमुना आढळून येत नाही.)
नमस्कार सर, आमच्या ७/१२ वरील इतर ह्क्क मध्ये जुन्या शर्तीवर असा शेरा दिलेला आहे त्यामुळे बांधकाम संबंधित विभाग महसूल विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मागत आहे कृपया त्यासाठीचे माहिती / मार्गदर्शन करावे अशी विनंती

Question by संदीप
21-09-2015
aspire200ns@gmail.com

माझे वडील संपत यांचे नावी ५ एकर १० गुंठे वडिलोपार्जित जमीन होती. सन १९८४ साली वडिलांनी आणेवारी लावली. आणेवारी नुसार क्षेत्र प्रत्येकी ४२ गुंठे प्रमाणे वडील + ४ मुले यांचे नावे आली. सन २००९ मध्ये वडिलांनी त्यांचा हिस्सा कायम खरेदीने मुलीच्या नावें केला आहे. जमिनीचे वाटप पत्र झालेले नाही, सन २००३ ते २००९ या काळात माझ्या मोठ्या भावाने इतर ४ हिस्सेदार यांच्या परस्पर काही (५+३+५=१३ गुंठे) जमीन विकली व उरलेली जमीन कायम खरेदीने मुलाचे नावे केली. ४२-१३=२९ गुंठे क्षेत्र मुलाचे नावे होणे अपेक्षित होते परंतु ३२ गुंठे क्षेत्राची खरेदी दिली. मुलाने परस्पर २००९ साली २०+३+११= ३४ गुंठे जमीन विकली. अशी जास्तीची जमिनीची खरेदी कशी झाली ? मी व माझा लहान भाऊ नोकरी निमित्त बाहेरगावी राहत असल्या कारणाने सदर प्रकरणाची आम्हाला कल्पना नव्हती. तसेच गावी शेती कसणारा भाऊ निरक्षर आहे. मागील दोन वर्षापासून सदर जमिनीचे खरेदीदार आम्हास शेती कसण्यास अडथला आणत आहेत. तसेच एका खरेदीदाराच्या फेरफार मध्ये 'तुकडे बंदी कायद्याविरुद्ध व्यवहार' असा शेरा आहे, तो इतर खरेदीदारांच्या फेरफार मध्ये का नाही? आमचा अधिकार डावलला जातोय. या प्रकरणी काय कारवाई करावी या बाबत मार्गदर्शन करावे.
आणेवारी झाली म्हणजे वाटप झाले .
एकदा वाटप झालेवर , मोठ्या भावास , इतरांची जमीन विकण्याचा हक्क नाही .
जर अशी जमीन विकली असेल तर आपण सर्व फेरफार आव्हानित करा . तसेच खरेदी खाते हि रद्द करून मिळणे बाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गट न.२०२ हा ००.०१आर व गट न.२०३हा ००.०५ आर आहे. भोगवटदार सदरी तीन जणाची नावे असून प्रत्येकाचा हिस्सा ०५आणे ०४पैसे आहे. गट न.२०१ व गट न.२०४ हे लगत आहेत. गट न.२०१ च्या हद्दीत (पोटात) गट न.२०२ हा आहे. गट न.२०४ व गट न.२०१ च्या हद्दीत निम्मा निम्मा (पोटात) गट न.२०३ आहे. गट न.२०४चे संपूर्ण क्षेत्र व गट न.२०१ चे अर्धे क्षेत्र माझे नावावर असून ते खरेदी खताने घेतलेले आहे. गट न.२०२ व गट न.२०३ च्या ३ हिस्से पैकी २ हिस्से मला खरेदी घ्यावयाचे आहेत. सहायक निबंधक कार्यालय गुंठे ची खरेदी बंद असल्याचे कारण सांगत आहेत. गट न.२०२ व २०३ चे हिस्से ची खरेदी मी घेऊ शकतो का? अशी खरेदी ही गुंठेवारी मध्ये येते का?
एवढ्या कमी क्षेत्राचा गट असू शकत नाही . गट स्कीम योजनेचा उदेश हा छोट्या क्षेत्राचे एकत्रीकरण करून किफायतशीर , आकारमानाचे क्षेत्र भूखंड बनवणे असा आहे .
जर गट स्कीम योजना झाल्या नंतर , त्याची पोत्विभाग्णाई झाली असेल , तर हे व्यवहार तुक्देबंदी कायद्या विरुद्ध आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर

मज़े वडिल वर्ल्यानंतर माज्या अजोबने त्यांच्ये नावे असलेली १५ एकर जमीन माज्या ककाच्या नावे केलि व् आम्हाला त्यात कही हिस्सा नही दिला. ति जमीन अजोबने स्वत कमोवलेली आहे तर दावा करुण आम्हला जमीन हिस्सा मिळेल का कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार सर,
भुमिअभिलेख कार्यालय यांचे कडील आकारबंद पत्रकानुसार गटाचे एकुण क्षेत्र (पो.ख.सह) 02हे.22आर आहे. सध्याचे सात बारा उतारांतील एकुण क्षेत्र (पो.ख.सह) 02हे.19आर आहे. म्हणजेच ते 03आर कमी आहे. गट स्कीम झाल्यापासुन आज पर्यतच्या सात बारा उतारांत ते 02हे.19आर आहे. सात बारा उतारांवरील क्षेत्र वाढवले जाईल काय? याबाबत कोणाकडे अर्ज करावा.
गट स्कीम नंतर जर क्षेत्र २.१९ र झाले असेल तर , आता वाढवता येत येणार नाही . गट स्कीम योजने विरुद्ध अपील करावय्स खूप विलंब झालेला आहे
मात्र आपण अधिषक भूमी अभिलेख यांचे कडे अर्ज करा . विलंब माफ केला तर , आपणास कदाचित न्याय मिळू शकेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज करावा .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

This page was generated in 0.38 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3