जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

धन्यवाद सर
आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल..
मी गावठाण जमिनीचे आकारणीचे पत्रक तपासले असता ती गावठान जागा सरकारी आहे. तरी माझ्याजवळ घर नाही तरी तेथे घर बांधण्यास कोणत्या शासकीय अधिकार्या कडे किंवा कोणत्या सरकारी कार्यालयाकडे जागेसाठी मागणी करावी लागेल
आपणास शासनास अर्ज करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार पंकज च्या नावावर पाच एकर जमीन आहे पंकज ने २० वर्षापुर्वी चार एकर जमीन विकली आता त्याच्या नावावर एक एकर जमीन राहिल त्याने ती राहिलेली जमीन विकताना पुर्ण गटाचे जमीनीचे क्षेत्र २० एकर टाकून व विकलेल्या जमीनीचा चतुःसिमा न टाकता पुर्ण गटाचा चतुःसिमा टाकलेला आहे मग पंकज ने किती जमीन विकली पंकज च्या नावावर तर एकच एकर जमीन आहे मग आता चार एकर जमीन त्याने यापुर्वी विकली आहे मग आता मंडळ अधिकारी यांनी किती जमीनीचा फेर मंजूर करावा व कशावरून सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
एखादा वर्ग 3 चा कर्मचारी सतत 6 वर्षे गैरहजर आहे. तसेच त्याचेवर कामकाजात गैरव्यवहार केल्याप्रकरणी भा.दं.सं. अन्वये गुन्हा दाखल आहे. परंतु, सदर गुह्याबाबतची कारवाई अद्याप प्रलंबित आहे. सदर कर्मचा-यास आजपावेतो 3 नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. परंतु, त्यांचा खुलासा अद्याप अप्राप्त आहे. तरी, सदर कर्मचा-याला सेवेतून बडतर्फ करता येईल का ? तसेच त्यांना बडतर्फ करणेबाबतची कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे.
नमस्कार सर, माझे वडील यांच्या नावे सात बारा उताऱ्यावरती ५ हेक्टर एवढे क्षेत्र आहे. त्यामध्ये २ हेक्टर लागवडीलायक व ३ हेक्टर पोट खराबा असे क्षेत्र आहे. परंतु सध्या आंम्ही ३ हेक्टर पोट खराबा पैकी २ हेक्टर एवढे क्षेत्र लागवडीयोग्य बनविले आहे व त्यामध्ये आम्ही सध्या पिकांची लागवड घेत आहोत.
१. तरी सदर २ हेक्टर हे क्षेत्र आम्हाला सात बारा उताऱ्यावरती लागवडीयोग्य क्षेत्र असे नोंदवून घ्यायचे आहे. तरी त्याबाबत माहिती द्यावी.
२. सदर २ हेक्टर हे क्षेत्र आम्हाला सात बारा उताऱ्यावरती लागवडीयोग्य क्षेत्र असे नोंदवून घेता येईल का.
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचे कडे अर्ज करावा .

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

सर माझ्या गावच्या गावठाणा मध्ये जमिन शिल्लक आहे. परंतु तेथे कोणतेही काम प्रस्थावित नाही. काही लोकांनी तेथे शेणखत व गुरे बांधुन अतिक्रमन केलेले आहे. माझ्या जवळ राहायला घर नाही त्यामुळे त्या शिल्लक गावठाणा जमिनीची घरासाठी मागणी करायची असल्यास कोणत्या महसुल अधिकार्या कडे मागणी करावी लागेल
आकारणी पत्रकास , त्या जागेची मालकी कोणाकडे दाखवली आहे ते पहा .
जर सरकारी असल्यास , आपणास शासनाकडे मागणी करावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर

माज्या वडिलांच्या नावे गावात एक प्लाट होता.पण आता ते हयात नहीं त्यामुले त्यांचे वारस म्हणून आम्ही ग्राम्पंच्यायत मधे नोंद केलि अहे.पण मज़े काका तो प्लाट बलकायचा प्रयन्त करत आहेत. प्लाट चा( NA)नहीं ज़ालेला.आम्ही शिक्षानासाठी बाहेर शहरात असतो तरी आमचा प्लाट कसा सुरक्षित ठेवता येइल यासाठी मार्गदर्शन करावे ही विनंती
काका ना असा प्लॉट बळकावता येणार नाही .
दरवर्षी जागेचा जमीन महसूल / घरपट्टी ( गावठाणात असल्यास) भरत जा
अधिकार अभिलेख , ७/१२ / अप्कारणी पत्रक दर वर्षी घेत जा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महसूल कर्मचारी / तलाठी यांना स्थायी प्रमाणपत्र देण्यासाठी कोणते निकष , नियम आहेत ? कार्यपद्धती कोणती आहे ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
सिनियर कर्मचारी यांना मंजूर पदानुसार स्थायी करण्याबाबत आदेश निवड/नियुक्ती अस्थापना यांचे कडून काढले जातात. मंजूर पदापेक्षा अधिक (अस्थाई पदाकरिता ) स्थायीत्वचे फायदे मिळण्याबाबत प्रमाणपत्र निवड/नियुक्ती अस्थापना यांचे कडून देणे आवशक असते.
या बाबत आस्थापना यांचे कडे विचारणा करावी.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

कोतवाल यांना cl मंजूर करता येतात का ?
नमस्कार सर,
आमच्या वडिलांच्या नावावर असणाऱ्या जमिनीवर आमच्या गावातील एका व्यक्तीने कुळकायदा लाऊन सदरील जमिनीच्या सातबार्यावर त्याची कुल म्हणून नोंद आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यू नंतर आम्ही सर्व भावंड त्या सातबार्यावर वारस आहोत. सदर व्यक्तीने ती जमीन विकली आहे मग सदरील जमीन विकताना आम्हाला विचारणा का झाली नाही तसेच सदर जमीन हि माळरान आहे त्या जमिनीवर कुल म्हणून लागता येऊ शकते का तसेच सदर जमिनीचे हप्ते आम्ही स्वीकारलेले नाहीत. याविषयी माहिती हवी आहे.
आपल्या कथनावरून , कुलाच नावे खरेदी किंमत निच्छित झालेली आहे . आपण जरी किंमत स्वीकारलेली नसली तरी , कुल अशी जमीन विकू शकतो
आपण त्याचे कुल वाहिवती विरुद्ध व किंमत निच्छित करणे प्रक्रियेविरुद्ध अपील करा . ( subject to limitation act )

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमाबंदी / आस्थापना विभागाचे टपाल आवक जावक शाखेकडून प्राप्त झाल्यास किती कालावधीमध्ये निकाली काढणे आवश्यक आहे ? विभागाची सनद तयार करता येऊ शकते का ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
आदरणीय सर,इनामवर्ग ६ ब ची जमीन मूळ वतनदारांना बिगरशेती कामी विकसित करून इमारत बांधून flat विक्री करावयाचे आहेत त्यासाठी सदर जमीन जुन्या शर्तीवर करणे आवश्यक आहे का?फक्तं NAकेली तर चालेल का?मार्गदर्शन होणेस विनंती........
वडिलोपार्जित जमीन खरेदी घेताना ७/१२ सदरी नाव असलेल्या व्यक्तींच्या वारसांची संमती घेणे आवश्यक आहे का?
७ /१२ वर जेवढ्या व्यक्तींची नवे असतात , त्या सराव व्यक्ती मालक आहेत
त्या सर्वांकडून जमीन विकत घ्यावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर्
आम्हाला १९७६ साली सिलिंग कायद्या नुसार ज़मीन मिळाली आहे पैन तो पूर्ण डोंगर भाग आहे त्याला डेवेलोप करण्या साठी खुप खर्च लागत आहे शासकीय कर्ज खुप कमी आहे त्यात हे होने श्यकय नहीं प्राइवेट बँक गहन ख़त मागतत पण ते होत नहीं आसे सांगण्यात आले आहे हे खरे आहे का जर होत असेल तर ते कोणत्या कायद्य नुसार व कोणाचा परवानगी ने होते ते सांगा.
मज़ा दूसर प्रश्न असा की जर् कोणी कंपनी नई जागा विकसन साठी घेत असेल करारा वर त्यातून आम्हाला रोजगार आणि मिळणाऱ्या उत्पनातून कही हिस्सा देणार असेल तर त्यांच्या नावे कोणता करार करता येईल अणि तय साठी कोणाची परवानगी लागेल ते कृपया सांगावे
आपला
अनिल जाधव
या बाबत आपणास भ्रमण ध्वनी द्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखाद्या कर्मचार्याला निलंबित करण्याअगोदर कोणती कार्य पद्धती अवलंबवावी ?
total sanctioned/filled/empty Tahsildar posts divisionwise. Also pls provide Tahsildar's divisionwise Gradation/seniority lists.(not statewide combined seniority list)
नोदणीकृत खरेदीखत न करता नोटरी करून फ्लॅट खरेदी केल्यास त्याला कायदेशिर आधार राहतो का?नोटरीची मुद्दत किती वर्ष आहे?
पाटबंधारे विभागाने वैक्तिक उपसा सिंचानखाली क्षेत्र येते असा दाखला दिला आहे सदर खातेदाराचे क्षेत्र कमाल जमीन धारण कायद्यापेक्षा जास्त आहे प्रांत ऑफिस कडे वाटप परवानगी घेण्यास गेले असता तुम्हाला पुनर्वसन साठी क्षेत्र काढून द्यावे लागेल असे सागितले जाते परंतु महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात सादर गावाचा कोणताही उल्लेख नाही तर परवानगी घेण्यासाठी पुनर्वसन साठी क्षेत्र काढून द्यावे लागेल का याबाबत मार्गदर्शन करावे
१. यामध्ये प्रांत ऑफिस यांना परवानगी देण्याचे अधिकार नाही. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे कडे अर्ज सादर करावा.
२. महाराष्ट्र प्रकल्प बाधित पुनर्वसन व्यक्तीचे अधिनियम १९९९ खालील कमाल ११ व १३ ची अधिसूचना तपासून पहा .
३. कमाल जमीन धारण कायद्यानुसार कमाल धरण शेत्र व महाराष्ट्र प्रकल्प बाधित पुनर्वसन व्यक्तीचे अधिनियम १९९९ खालील साल्याब खाली ठरविण्यात आलेले शेत्र व त्या नुसार वाटपास परवानगी ह्या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहे .

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

नमस्कार सर आपण माझा पहिल्या प्रश्नाचे उतार दिल्या बदल धन्यवाद तर ठूमी विचारले कि त्या वर कोणतही अपील झालेले नाही व प्रलंबित सुधा नाही मी सर्व कागद पत्रे तलाठी ओफ्फिचे माडे दिली आहेत १) दत्तक पत्र २) कोर्टाचा हुकूमनामा ३) जुना फेरफार पुन तलाठी नोनद धरत नाही ते सागंतात ठूमी प्रांत अधिकारीकडे विनंती अर्ज करा कि जुना फेरफार दुरुस्थ करून हुकूमनामा प्रमाणे नवीन फेरफार ची नोंद धारा असा आदेश आल्यवर आम्ही तुमची नोंद धरून ७/१२ वर तुमचे नवा येईल मी नाकी काय करू क्रुपय योग्य मार्ग सांगा .
सर माझ्या मावशीची गावी ४९ गुंठे नियात्रिक सत्ता प्रकारातील आहे सात बारा तिच्याच नावे आहे, तर ती विधवा आहे कोनही मुले नाही तर तिला या जम्नीतील २५ गुंठे जमीन विकायची आहे तर ती विकू शकते काय जर नसेल तर त्या साठी कोणाची परवानगी घ्यावी .
नियंत्रित सत्ता प्रकार म्हणजे , मओशीकडे कुल कायद्यची जमीन मिळालेली आहे
जर कुल कायद्या खालील्म खरेदी किंमत निच्चीत होऊन १० वर्षे झाले असतील तर , पर्व्नागीची गरज नाही
मात्र १० वर्षे झाले नसतील तर , प्रांत अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,गटवारी योजनेपुर्वी ७/१२ च्या कब्जेदार सदरी खरेदीखताद्वारे नाव दाखल झाले होते परंतु गटवारीनंतर कोणताही फेरफार न होता नावास कंस लागला परंतु ताबा आहे. त्याचा गैरफायदा घेऊन मूळ मालकाने सदर जमीन अन्य व्यक्तीस विक्री केली.गटवारीतील चुकीबाबत मा.जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांचेकडे अपिल दाखल केले असता त्यांनी जास्त कालावधीचे कारण देऊन अपिल फेटाळले.व खरेदीखत रद्द करणेकमी दिवाणी कोर्टात अपील दाखल करण्यास सांगितले त्यानुसार अपील दाखल केले आहे..तरी याबाबत आणखी मार्गदर्शन होणेसविनंती.
आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे त्याचे निर्णयाची वाट पहा
मात्र उप संचालक यांनी जरी अपील फेटाळले असले तरी जमाबंदी आयुक्त यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
मला विहिर मालकी हक्कासंबंधी मार्गदर्शन करावे.
त्याचप्रमाणे विहिरी संबंधी नियम व शासन निर्णय असल्यास पाठवावे. कळावे.
आदरणीय सर,कुळकायद्या नुसार ३२ एम द्वारे जमीन खरेदी घेतली आहे.खरेदी घेनाराचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सादरी दाखल आहे.परंतु पूर्वीपासून इतर हक्कात मूळ मालकाच्या बहिणीच्या वारसांची नावे अ.पा.क. म्हणून दाखल आहेत.सदर नावे पोकळीस्त म्हणून कमी करता येतील का? त्यासाठी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
३२ ग किंमत निच्छित होताना ती नवे कमी करणे आवश्यक होती
आताही ती नवेकमी करता येतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मी अनेक प्रश्न विचारले पण उत्तर मिळाले नाही मला विचारणा करायची आहे की खरेदीखतामध्ये क्षेत्र किती घेतले याचा व गटामध्ये कोणती जमिन याचा चतुरसिमा नसला तर फेरफार ला नोंद कशी घेतली व सातबारा वर क्षेत्र नोंद कसे झाले याबाबत प्रश्न उपस्थित झाला तर काय खरेदीखत रद्द होईल का व झाले तर कोण करील व कोणत्या नियमाखाली हे सविस्तर सांगावे हि विनंती
मी सरकारी कर्मचारी असून मला शासकीय घर अग्रिम घ्यायचे आहे त्यासाठी मला कार्यालय कडून घर घेणे बाबत पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे का? व तसेच नवीन घर बाधानी अग्रिम बाबत शासन निर्णय पारित झालेला आहे परंतु त्या मध्ये पूर्व परवानगी अथवा कार्योतर परवानगी बाबत कोणता हि खुलासा नाही अथवा माहिती नाही तरी याबाबत उचित मार्गदर्शन करावे
सर नमस्कार नारायण नावाच्या इसमाला 222 गटामध्ये १० एकर जमीन होती त्या पैकी त्याने 3 एकर जमीन नागनाथला विकली त्यानंतर त्याने पुन्हा ३ एकर जमीन प्रकासला विकली त्यानंतर त्याने पुन्हा दोन एकर जमीन दिपक ला विकली शेवटी नारायण ची दोन एकर जमीन त्या गटामध्ये राहीली व उरलेली दोन एकर जमीन मी 1990 ला खरेदी केली पण खरेदीखतामध्ये चतुरसिमा नाही जमीनीचे क्षेत्र नाही जमीनीचा फेरफार व सातबारा नोंद दोन एकरची माझ्या नावे आहे आता नारायण मयत आहे नारायण च्या वारसाने खरेदीखताचा आधार घेत खरेदीखतामध्ये क्षेत्र नाही म्हणून प्रांत कडे सदर फेर विरोधात अपिल दाखल केले आहे मुळ खरेदीखताची नक्कल तपासणी केली असता त्यावर क्षेत्र व चतुरसिमा नाही आता नारायण च्या वारसाला गावामध्ये व त्या गटामध्ये काहिच जमीन नाही मला काय करावे लागेल सविस्तर सांगावे ही विनंती
चातुर्सिमा नमूद नाहीत म्हणून , नारायांचे वारसांचे नवे जमीन होणार नाही .
त्याचे प्रांत अधिकारी यांचे कडे अपील फेटाळले जाईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3