जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by कृष्णकांत पुजारे
16-10-2015
krishnakantpujare@gmail.com
नमस्कार,
प्रश्न : सात बारामधून कुटुंबा बाहेरील व्यक्तीचे नाव कमी करावयाचे आहे. माहिती खालील प्रमाणे आहे.
सात बारा मधील कुटुंबा बाहेरील व्यक्तीचे निधन झालेले आहे तसेच वारस तपास पूर्ण झालेला आहे आणि ज्याचे नाव कमी करावयाचे आहे त्यांच्या कुटुंबाची काही हरकत नाही आहे. तसेच मयत व्यक्तीची पत्नी , त्यांची मुले आणि त्यांच्या पत्नी जमिनीवरील हक्क सोडण्यास तयार आहेत. तर काय करणे उचित ठरेल. हक्क सोड पत्र का बक्षीस पत्र ? त्याची प्रक्रिया काय आहे ? का अजून काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल काय ? हक्क सोड पत्र किंवा बक्षीस पत्र कुठे व कसे करावे ? त्याचे मुद्रांक शुल्क किंवा अजून कुठले शुल्क असेते का ? जर ती जमीन अविकसित किंवा पड जमीन असेल तर एकरी काय शुल्क असेल. कृपया मार्गदर्शन करावे.
हक्क सोड पत्र करावे
जमीन ज्या ठिकाणी आहे , त्या तालुक्याचे दुय्यम निबंडक कार्यालयात , आपणास हक्क सोडपत्रकरता येयील
नोंदणी व मुंद्रंक शुल्क माहिती तेथे मिळेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जयसिंग
16-10-2015
jaybanne@gmail.com
सावत्र भावामध्ये वडिलोपार्जित जमिनीचे वाटणी / हिस्सा कसा केला जातो .
हिंदू विवाह कायदा नुसार , सावत्र भाऊ अथवा , दुसर्या पत्नीचे मुलास , वडिलांचे मिळकतीत हिस्सा आहे .
कलम 16
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवराज जाधव
15-10-2015
shivraj225@rediffmail.com
शशिकांत सुबराव जाधव सर आपल्या उत्तराबद्दल खूप आभारी आहे. सर आपण जसे आपल्या उत्तरा मध्ये विचारले आहे त्या प्रमाणे १) अतिक्रमित जागेचे रस्त्याच्या मध्यापासून अंतर ६० फुट आहे २) जागेसामोरील रस्ता हा राज्य मार्ग आहे ३) सध्या जमिनीचा ७/१२ उतारा महाराष्ट्र शासन या नावाने निघतो ४) शहराची कुठलीही विकास योजना मंजूर नाही. तरी हे माझे अतिक्रमित जागेवरील दुकान नियमित होऊ शकते का . मार्गदर्शन करावे हि विनंती.
सर्व महिती पाहता आपण शासकीय जमीनीवर अतिक्रमण केले आहात, याबबत कधीपासुन अतिक्रमण केला आहे तेव्हा पासुन आजपर्यत दंड भरावे लागेल आणि त्यानंतर सदर अतिक्रमण नियमानुकुल करणेसाठी प्रकरण तहसील कार्यालयामार्फत मा. जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावे.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by गणेश शिंदे
15-10-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,७/१२ सदरील इतर अहस्तांतरनीय शर्त असा शेरा दाखल त्याचा अर्थ व तो कमी करणेबाबत काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
अहस्तान्तार्नीय म्हणजे जमिनीची विक्री , सक्षम अधिकार्याच्या परवानगी शिवाय विक्री करता येत नाही .
आपण सक्षम अधिकारी यांची परवानगी घ्यावी
शासनाने प्रदान केलेल्या जमिनीचे बाबतीत , परवानगी घेऊन हि असा शेर कमी होत नाही . केवळ विक्री करण्यास परवानगी मिळते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अनंत जयराम झेपले
15-10-2015
anantzeple2202@gmail.com
Sir,
Amhi san 2006 madhe aasurde chiplun yethe jamin vikat khetali. Ti jamin aata navar karayachi aahe tyasati konte kagad patra lagtata aanhi tyachi procedure kay aahe te jara sanga. jene karun jamin navar karayala konta tras honar nahi. sir ek, ji jamin ghetali tya 7/12 ase lihale aahe ki tukadya virodhi kayada. tyamule tyache hi uttar dya.
आपण खरेदी खत, अनुसूची क्रमांक २ ची प्रत सह तलाठी यांचे अर्ज करा
अन्य कायद्याने जमीन हस्तांतारानास निर्बंध नसतील तर , जमीन आपले नावावर , अर्ज केले पासून १५ दिवसात होईल
बागायत जमीन- ०.५ र
एकपिकी जमीन- ०.१५ र
वर्कस जमीन- ०.२० र
वर नमूद एवढे क्षेत्र्स कमीत कमी असल्या शिवाय , जमिनीची विक्री करता येत नाही
त्या पेक्षा कमी क्षेत्राची विक्री केल्यास , असा व्यवहार तुकडे बंदी कायदे विरुद्ध ठरतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by हेमंत करटुले
15-10-2015
hem.kartule007@gmail.com
नमस्कार सर,
माझा प्रश्न असा आहे,
माझ्या आजोबांना दोन पत्नी होत्या. माझ्या आजोबांचे 2006 साली त्यांचे निधण झाले.
त्यापैकी एक पत्नीची 7/12 वर वारस नोंद झाली आहे व दुस-या पत्नीची 7/12 वर वारस नोंद झालेली नाही.
पहिल्या आजीला 1 मुलगा व 1 मुलगी आहे. व दुसरीला 4 मुलगे आहे. पहिल्या आजीचा मुलगा नोकरीला नाही व दुस-या आजी चे 4 ही मुलगे नोकरीला आहेत. त्यापैकी 3 जनाचे निधण झाले आहे.
आमची जमिन आदीवासी कुळाची आहे.
माझे आजोबांच्या निधना नंतर माझ्या पहिल्या आजीचे नाव 7/12 लागले आहे. माझी पहिल्या आजीचे 2011 मध्ये निधण झाले. व पहिल्या आजीच्या निधना नंतर माझे चुलत चुलते व आत्या (पहिल्या आजीचा मुलगा व मुलगी) यांचे 7/12 ला वारस नोंद झाली आहे.
माझे आजोबांच्या निधणा नंतर दुस-या आजीचे 7/12 वारस नोंद झालेली नाही तर त्यासाठी काय करावे लागेल. दुस-या आजीची वारस नोंद करण्याकरीता कोठे अर्ज सादर करावा लागेल, व कोणकोणते कागदपत्रे सोबत जोडावे लागतील, व दुस-या आजीचे वारस नोंद करण्याकरीता किती दिवसामध्ये अर्ज करायला हवे हयाबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
ज्या फेर्फाराने , केवळ पहिल्या पतीनीच्या वारसांची नोंद झाली त्या फेर्फार्विरुद्ध , अपील करा .
Hindu Marriage Act च्या कलम १६ (३) अन्वये , दुसर्या पत्नीच्या , वारासानही , मिळकतीत हिस्सा आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मांगीलाल सहदेव
15-10-2015
sahadeomangilal@gmail.com
मी रजिस्ट्रेशन केला होता.पण माझा पासवर्ड चा मेल डिलीट झाला.कृपया माझा पासवर्ड पाठवण्यात यावा.
Your password sent on your mail...But one can use "forgot password?" option to get his/her password. So please remember your username to get your password if forgotten. Thanks.
MCS.
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by शिवराज जाधव
14-10-2015
shivraj225@rediffmail.com
नमस्कार सर, गावठाण हद्दीतील मुख्य रोड लगत माझे गेली १५ ते २० वर्षापासून अतिक्रमित जागेवर दुकान आहे, त्या वेळी या संबंधी परवानगी ग्रामपंचायत (आता नगरपालिका आहे) , बांधकाम विभाग या कडे घेतली होती. आता मला हि जागा नियमित माझ्या नावे करून घेता येईल का ? आणि कोणत्या पद्धतीने. ख्रुपया मार्गदर्शन करावे.
सदर जागा रस्र्तापासुन किती अंतरावर आहे, रस्ता कोणता आहे, जमीनीची मालकी कोणाची आहे, आपल्या गावासाठी / शहरासाठी विकास योजना मंजुर आहे का इ. सर्व गोष्टी समजलेस त्याबाबत सांगता येईल............ शासकीय जागेत असेल तर नियमनुकुल करता येणार नाही.........
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by धीरज श्रीरामजी स्थूल
14-10-2015
dhirajsthul@gmail.com
pls forward chokkalingam commitee report on paisewari
Question by गणेश शिंदे
13-10-2015
bkganesh.shinde10@gmail.com
मोबदला देऊन बहिणींकडून हक्कसोड पत्र केल्यास मुद्रांक शुल्क भरावे लागेल का?
आपणास २ % मुन्दारांक शुल्क ( जमीन किमतीच्या )
१ % नोंदणी फी ( जमीन किमतीच्या )
१ % जी प सेस भरावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन गणेश धनमने
13-10-2015
sachinpapa@gmail.com
सर माझ्या आजोबाच्या नावने असलेली शेत जमीन डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड कॉलेज साठी जमीन संपादित केलेली आहे तर मला नोकरी मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळत नाही.
मी काय करू सांगा सर
आपली जागा केव्हा संपादित झाली आहे ?
जर आपली जागा २००६ पूर्वी संपादित झाली असेल व त्यास पुनर्वसन कायदा लागू केला असेल तर , आपणास प्रकल्प ग्रस्त मिळेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रामेश्वर काष्टे
13-10-2015
kashte876@gmail.com
मा.सर दि.3-10-15 रोजी मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.कृपा करून मार्गदर्शन करा.खूप उपकार होतील.
Question by vishal eknath khairnar
12-10-2015
vishalkhairnar84@rediffmail.com
सरकारी कर्मचारीला पत्नीच्या प्रसृतीवेळी पतीला काही विशेष रजा मिळण्याची तरतूद आहे काय असल्यास त्याबाबत माहिती मिळावी व शासन परिपत्रक बाबत माहिती मिळावी
Question by vishal eknath khairnar
12-10-2015
vishalkhairnar84@rediffmail.com
पोट हिस्सा मोजणीत हद्दी खुणा दाखवता येतात का त्याबाबत चे शासन निर्णय / परिपत्रक मिळावे
Question by कोंडीबा
12-10-2015
gabale.kondiba8080@gmail.com
अंतर विभाग बदली मध्ये अपंग व्यक्तीसाठी जागा रिक्त असेल तर त्या ठीकाणी अपंग व्यक्तीची सदर ठीकाणी बदली करता येते का ?
Question by गोळेसर रवींद्र
11-10-2015
ravindra.golesar@rediffmail.com
मिळकत जमीन वर्ग १ व मिळकत जमीन वर्ग २ या बाबत सविस्तर माहिती द्या.
वर्ग १ जमीन म्हणजे - या जमिनीचे विक्रीस कोणतेही निर्बंध नसतात
वर्ग २ जमीन म्हणजे - या जमिनीचे विक्री करण्या साठी , सक्षम अधिकारी यांची परवानगी आवश्यक
उदा शासन प्रदान जमीन, कुल वहिवाट कायद्याखाली प्राप्त झालेली जमीन ( विक्री किंम्मत निच्छित होऊन १० वर्ष कालावधी झालेला नाही )
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुभाष
09-10-2015
rajmudra123@gmail.com
सर,
माझे वडीलांची जमीन पाझर तलावामध्येत १९७२ ला संपादीत झाली. काही संपादीत जमीन पैसे २००/- मिळाले व काही नोडीसवर पैसे देणे बाकी असा शेरा आहे. वडील हयात असताना मी माझे नावे प्रकल्पवग्रत प्रमाणपञ घेतले आहे. मला त्या जमिनाची मोबदला किंवा नवीन जमीन मिळेल काय आणि त्यासाठी काय करावे लागेल.
आपले प्रश्नावरून , आपल्या संपादित जमिनीपैकी , काही जमिनीची नुकसान भरपाई रक्कम मिळाली आहे , तथापि , काही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही असे दिसून येते .
जरी नोटीस वर , मोबदला देणे बाकी असा शेर असला तरी , पैसे मिळाले नाहीत याची खात्री , साम्भंधित भू संपादन कार्यालयाकडून करून घ्या . जर पैसे मिळाले नसतील , तर आपणास पैसे मिळतील .
आपली जमीन 1972 साली संपादित झाली आहे , त्या वेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता . त्या मुले लाभ क्षेत्रात पर्यायी जमीन मिळणार नाही
मात्र त्या वेळेस , कार्यकारी आदेशाने , पुनर्वसन योजना लागू केली होती का , या बाबत , ओउनर्वसन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कडून माहिती घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजीराजे राजेमहाडिक
08-10-2015
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पानबुडे साहेब नमस्कार
माझा प्रश्न असा कि आम्ही गावठाणातील जागेवर ग्रामपंचायतीचे नाव कमी करून आमचे नाव लावले व तसा चुकीची दुरुस्ती होऊन मिळणेसाठी सातारा जिल्हा भूमी अभिलेख यांच्याकडे अपील दाखलहि केले आहे कि ग्रामपंच्यायती चे नाव चुकीने लागले आहे व ग्रामपंच्यायती ने आमच्या नावाची नोंद केली आहे तर त्या चुकीची दुरुस्ती होऊन मिळावी त्यासाठी आम्ही तालुका भूमी अभिलेख यांना व सध्या त्या जागेवर असणार्या एकाला पार्टी केले आहे पण अजून ते अपील बोर्डावर यायला २ ते ३ महिने लागतील. आता ग्रामपंच्यायत विरोधकांच्या कडे आहे मग आता ग्रामपंच्यायत आमचे नाव कमी करू शकते का ? किवा त्यांना तसे करायचे असल्यास काय कोणत्या नियमाने व आम्हाला न कळवता त्यांना आमचे नाव कमी करता येईल का ? व आमचे नाव कमी करू नये म्हणून आम्हाला काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
ग्राम पंचायातीस , परस्पर आपले नाव कमी करता येणार नाही .
याही उप्रोक्षा ग्राम पंचायतीने नाव कमी केल्यास , आपण गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by swati swami
08-10-2015
swati.swami@yahoo.com
एक कर्मचारी यांना एथदर्थ मंडळाकडील मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून ची सुट मिळाली आहे परंतु दहावीला हिंदी हा विषय नसल्यामुळे त्यांना सुट मिळाली नाही . परत sambhandit कर्मचारी यांनी बहिस्त वर्गातून यावर्षी दहावीला हिंदी हा विषय घेऊन उत्तीर्ण झाले आहेत . तर त्यांना हिंदी भाषा सुट मंजूर करता येईल का ? एथदर्थ मंडळाकडील हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे का ?
Question by कुणाल अंकुश जाधव
08-10-2015
mr.k1387@gmail.com
एखाद्या अपंग कर्मचाऱ्याची २००४ च्या शासन निर्णयानुसार राहत्या ठिकाणाजवळ बदली होणे अपेक्षित असूनही काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या राहत्या ठिकाणापासून फार लांब करण्यात आलेल्या आहेत.
तरी, अश्या अपंग कर्मचाऱ्याने कोणाकडे दाद मागावी ?
Question by गणेश शिंदे
07-10-2015
bkganesh.shinde10@gmail.com
वडिलोपार्जित जमिनीमध्ये २ बहिणी ५ भावांपैकी एका भावाच्या नावे त्यांच्या संपूर्ण हिश्याचे रजि.हक्कसोडपत्र करू शकते का?
Question by संदीप सरोदे
07-10-2015
sarodesms@gmail.com
नमस्कार सर
माझ्या वडीलांची १३ एकर जमिन आहे
आम्ही ४ भाऊ ४ बहिणी आहोत
आमची र्काट वाटपात १/६ हिस्सा ठरवला आहे
४ भाऊ आणि आई वडिल
आई वडील मयत आहे
१३ एकरा पैकी ५४ गुठें गावा जवल आहे
त्यात आम्हा सर्व भावांना समान हिस्सा भेटन का
४ भाऊ व ४ बहिणी असतील तर , प्रत्येकी १/८ हिस्सा निच्छित होणे आवश्यक
न्यायालयात बहिणी आहे हि बाबा निदर्शनास आणून देण्यात आली होती का ? बहिणींनी मिळकतीतील हिस्सा सोडून दिला आहे ?
जर अशी बाबा असेल तर , बहिणी , न्यायालयाचे आदेश विरुद्ध , वरिष्ट न्यायालयात अपील करू शकतील
आपला मुल प्रश्न , ५४ गुंठे जमीन गाव जवळ असली काय किव्न्हा दूर असली काय , कोर्टाने निच्छित केल्या प्रमाणे , भावना समान हिस्सा , वरील वस्तुस्थिती व काय्देषित तरतुदींच्या अधीन , मिळण्यास हरकत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sunil Kale
07-10-2015
sunilste@gmail.com
वडील हयात असताना वडलोपार्जित मिळकती मध्ये वडिलांचे सहहीशेदार म्हणून नोंद होण्यासाठी मी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकतो का ?
नाही
हिंदू वारसा ( सुधारणा ) कायदा २००५ नंतर , Coparcenary Property हि संकल्पना संपुष्टात आली आहे
वडील हयात असताना , मुलाला वडिलांचे मिळकतीत हक्क प्राप्त होत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप नामदेव बोरले
07-10-2015
pradip.borle6226@gmail.com
सर्व प्रश्नाची उत्तरे दिली जात नाही काय ?
अधिकारी त्यांचे दैनदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात ...प्रतिसाद वाढेल तसे वेळेत व सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करण्यात येईल. धन्यवाद .
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by विश्वास मांडे
06-10-2015
vvm.comp@coep.ac.in
सर , मी मधेवाद्गाव श्रीगोंदा जी. अहमदनगर येथील खरेदि केलेल्या ६४ आर जमिनी पैकी ३२ आर जमीन माझी पत्नी चे लक्ष्मि मुक्ती योजने अन्वये नावावर करावयाची आहे. त्या करता मार्गदर्शन करावे .१) या मुले तुकदेबंदी नियमाचा भंग होतो काय ? 2) लक्ष्मि मुक्ती योजना कार्यान्वित आहे काय ? असल्यास अटी काय आहेत 3) जमीन कुटुंबातील मुलगा किंवा पत्नीला विक्री न करता हस्तात्न्तर करता येते काय ? 4) त्या करता किती मुद्रांक शुल्क लागते ?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
