जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सांगळे वसंत अशोकराव
13-12-2013
sangletannmay@yahoo.com
कार्यालात काम करताना कार्यातक्क्ता,अवेट रजिस्टर ठेवले जातात मग केस रजिस्टर केंव्हा ठेवतात.विषेयावार ठेवले जातात का ? संकलनावर ठेवले जातात.उदा.हक्क्नोंद संकलनाकडे केस रजिस्टर कलम १५५ ची कार्यहीची प्रकारणे,पीकपाहणी प्रकारणे,तक्रारी नोंदी प्रकारणे इत्यादी.मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
Question by किशोर प्रभाकर शेंडे
12-12-2013
shendekishor@yahoo.co.in
दि.1.1.06 रोजी किंवा त्यानंतर पदोन्नती झालेल्या कर्मचा-याची ग्रेड वेतनानुसार किमान वेतनावर वेतननिश्चिती करावी काय ? उदा. ग्रेड वेतन रुपये 3500/- किमान वेतन 8920/- किंवा एक वेतनवाढ देवून येणारे वेतन घ्यावे.
Question by khairnar vishal eknath
11-12-2013
vishalkhairnar84@rediffmail.com
नवीन शर्तीची जमिनीचे आकारफोड करता येते का? कुटल्या शासन निर्णय नुसार
नवीन शर्थ जमीन परवानगी शिवाय विक्री करता येत नाही . त्यामुळे आकार्फोड करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र प्रदान केलेली जमीन सर्वे नुम्बेर चा भाग असेल तर , आकार्फोड करता येईल . आदेशाची आवशकता नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
नवीन शर्थ जमीन परवानगी शिवाय विक्री करता येत नाही . त्यामुळे आकार्फोड करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र प्रदान केलेली जमीन सर्वे नुम्बेर चा भाग असेल तर , आकार्फोड करता येईल . आदेशाची आवशकता नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vinod rajkumar thorawe
09-12-2013
thorvevinod80@gmail.com
महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन नियम १९८९ अपलोड करण्याची कृपा करावी. धन्यवाद !
Question by मेघ
09-12-2013
medhaware81@gmail.com
सर्व सभासद व वाचकांना नम्रपणे विंनती करण्यात येते की, प्रश्नावर उत्तर/ प्रतिसाद देतांना कायदयातील/नियामायील तरतुदीचा खुलासा करून प्रतिसाद दयावा.असेल,असावी, वाटते अशा प्रकारे अर्धवट स्वरुपात प्रतिसाद देऊ नये. कारण मिळालेल्या माहितीच्या आधारे बरेचजण मुदतबाह्य प्रकरणे सुरु करण्याकरिता संबंधित कार्यालयात अर्ज व नाहक प्रकरणाची संख्या वाढते.
सूचना चांगली आहे,कारण अपवाद सोडून कोणतीही बाब उचित तरतुदीसह टाकणे अपेक्षित आहे. तथापि अनेक वेळा ते शक्य होत नाही कारण practically उत्तर माहित असते व ते दिल्याने समोरच्याचे समाधान होवू शकते.
तसेच आपल्या संकेत स्थळा वरील उत्तराचा कोणीही न्यायिक,अर्ध न्यायिक बाबी साठी वापर करू नये अशा अर्थाचे Disclaimer आपल्या संकेत स्थळावर आहे.त्यामुळे केवळ आपल्या संकेतस्थळावरील उत्तराच्या अनुषंगाने कोणीही कार्यवाही करणे अपेक्षित नाही. आपण पाठवीत असलेल्या उत्तरासोबत पाठवीत असलेले Disclaimer खालील प्रमाणे आहे......
" No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against maharashtracivilservice.org or its members,owners, authors ,agents , representative.
The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. maharashtracivilservice.org , its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages."
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by सुनील म झवर
09-12-2013
smzawar@gmail.com
गौण खनिज अधिनियम २०१३ अतंर्गत १८ जुलै २०१३ च्या आधी सूचनेने असाधारण ११३ दि-१९ ऑगस्ट २०१३ प्रसिद्ध केलेले पत्रक
व २३-१०-१३ मंत्रीमंडळ बैठक क.१३४ चे निर्णय मिळावे
Question by नितेश सुरेश सावंत
07-12-2013
sawant.9@gmail.com
मा.विनोद राजकुमार थोरवे साहेब धन्यवाद आपण दिलेल्या माहिती साठी ..
पण हि फेरफार नोंदणी ची माहिती कुठून मिळेल. आणि हे प्रकरण कुठे अपील करायचा ह्या बद्दल थोडा मार्गदर्शन करावे हि विनंती .
फेरफाराबद्दलची माहिती तलाठ्यांकडे मिळेल. आव्हान संबंधित मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडे द्यावे. सदरचे अपील आज रोजी मुदत अधिनियमाच्या बाहेर आहे. त्यामुळे अपील अर्ज सदर करताना या प्रकार बाबत आपणास माहिती नसल्यामुळे अपील दाखल करण्यास बिलंब झालेला आहे सिद्ध करून द्यावे लागेल.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by vinod rajkumar thorawe
07-12-2013
thorvevinod80@gmail.com
विक्री व्यवहार रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी याचे कार्यकक्षेत येते काय ? त्यांचे कार्यकक्षेत नसल्यास कोणाच्या कार्यकक्षेत येते ?
विक्री व्यवहार म्हणजे खरेदीखत असेल तर त्याबाबत दिवाणी न्यायालयास अधिकार आहेत.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by नितेश सुरेश सावंत
06-12-2013
sawant.9@gmail.com
मा.शशिकांत सुबराव जाधव आपण सहकार्य केल्या बद्दल धन्यवाद...
सदर फेरफार संबंधी माहिती मला कुठे मिलेल कारण शांताराम यांच्या आधी सीताराम याचं नाव होता .. आणि मला हे आव्हान कुठे द्यावे लागेल.
फेरफाराबद्दलची माहिती तलाठ्यांकडे मिळेल. आव्हान आपन मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडे द्यावे.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by निळकंठ ईंगळे
05-12-2013
nileshingle54@gmail.com
N/A झालेला ३.३६ गुंठा प्लॉट अर्धा-अर्धा खरेदी करण्यासाठी किंवा खरेदी केल्यास त्याची फेरफार नोंद तलाठ्याकडे करण्यासाठीs.d.o.ची परवानगी लागते काय ? s.d.o.च्या परवानगी साठी तलाठ्याने हेतुपुरस्सर मागणी केल्यास काय करावे ?
बिन शेती आदेश शर्थी नुसार भूखंड विभागणी करता येत नाही. परवानगी लागेल . भूखंडाचा आकार कमी आहे . तनगर रचना विभागाचे अभिप्रयाशिवाय विभागणी करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
सदर प्लॉट हा अकृषिक मंजुरी व नगर रचना मंजूर नकाशात त्या आकाराचा असेल तर एस .दि .ओ ची परवानगीची गरज नाही.
पण त्यापेक्षा कमी आकार असेल तर व्यवहार रीतसर नाही असे म्हणावे लागेल . कारण परवानगी देताना भूखंड आकार आणि सामासिक अंतरे , तसेच एकूण मोकळी जागा याचा भविष्याचा विचार केलेला असतो .
त्यामुळे तपास आणि पहा
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by नितेश सुरेश सावंत
05-12-2013
sawant.9@gmail.com
वडिलोपार्जित जमीन आहे ती जमीन माझ्या पणजोबां सीताराम यांच्या नावावर होती . त्यांना दोन बायका होत्या . एक पहिली वारली आणि त्यांनी दुसरा लग्न केलं.
पहिल्या बायकोला एक मुलगा होता शांताराम आणि दुसरा लग्न केल्यावर त्यांना एक मुलगा झाला सावळाराम. शांताराम आणि सावळाराम हे दोघ एकमेकांना खूप आदर ठेवायचे . सीताराम वारल्या नंतर संपूर्ण प्रोप्रटी शांताराम यांच्या नावावर झाली. शांताराम डॉक्टर असल्या कारणाने तसेच मोठा भाऊ असल्याने सावळाराम मोठा भाऊ कुठे जाणार म्हणून आपला नाव लावला नाही. पण जेव्हा शांताराम वारले तेव्हा ती संपूर्ण प्रोप्रटी त्यांचा मुलगा शरद यांच्या नावावर झाली .
पण आता सावळाराम यांच्या पिढी च नाव कुठेही लागला नाही . आणि माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी असे प्रयत्न्न केले नाही . आता ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती कधीही गावी गेली नाही आणि आता सहकार्य करायला तयार नाही
आता माझ्या कडे आजोबांचं मृत्यू दाखला आहे . आता मी काय करू शकतो ???
प्रथम सीताराम यांच्या मूत्यू ज्या फेरफार क्रमांकाने शांताराम यांचे नाव दर्ज झाले त्या फेरफार च्या विरोधात अपील करून प्रकरण सुरु करावे .
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
ह्या फेरफारांनी शांताराम हे मालक सदरी आले आहे, त्या फेरफारास आव्हान देणे योग्य वाटते. आणि आपल्याला सदर मालमत्ता वडिलोपार्जित असलेबाबत सिध्द करावे लागेल.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by नितेश सुरेश सावंत
05-12-2013
sawant.9@gmail.com
माझं नाव नितेश सुरेश सावंत , माझ गाव पेंडूर खरारे वाडी , तालुका मालवण, जिल्हा - सिंधुदुर्ग. सध्या राहणार मुंब्रा जिल्हा - ठाणे माझे वडील हयात नाहीत . माझी आई आणि माझे लहान काका गेले २५ते ३० वर्ष शेती करत आहेत .ती जमीन वडिलोपार्जित जमीन आहे.
ती जमीन माझ्या पणजोबां सीताराम यांच्या नावावर होती . त्यांना दोन बायका होत्या . एक पहिली वारली आणि त्यांनी दुसरा लग्न केलं.
पहिल्या बायकोला एक मुलगा होता शांताराम आणि दुसरा लग्न केल्यावर त्यांना एक मुलगा झाला सावळाराम. शांताराम आणि सावळाराम हे दोघ एकमेकांना खूप आदर ठेवायचे . सीताराम वारल्या नंतर संपूर्ण प्रोप्रटी शांताराम यांच्या नावावर झाली. शांताराम डॉक्टर असल्या कारणाने तसेच मोठा भाऊ असल्याने सावळाराम मोठा भाऊ कुठे जाणार म्हणून आपला नाव लावला नाही. पण जेव्हा शांताराम वारले तेव्हा ती संपूर्ण प्रोप्रटी त्यांचा मुलगा शरद यांच्या नावावर झाली .
पण आता सावळाराम यांच्या पिढी च नाव कुठेही लागला नाही . आणि माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी असे प्रयत्न्न केले नाही . आता ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती कधीही गावी गेली नाही आणि आता सहकार्य करायला तयार नाही. आता माझे काका हयात आहेत. आता माझ्या कडे माझे वडील व आजोबांचं मृत्यू दाखला आहे . आता मी काय करू शकतो ???
वास्तविक आपण खूप विलंब केलेला आहे. मात्र आपण पूर्वीचे सर्व फेरफारतलाठी यांचे कडून प्राप्त करून घ्या. त्या फेरफार वरून आपला मिळकतीत हक्क असल्याचे दिसून येयील. त्या आधारे प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करा.
अथवा specific relief act व CPC कलम ५४ खाली दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amar S. Patil
04-12-2013
amarpatil1612@gmail.com
Sir,
Mala maharashtra jameen mahsul adhiniyam 1966 che kalam 29,
maharashtra jameen mahsul adhiniyam 1971 ya chi purna mahiti milavi.
he vinanti
Question by Amar S. Patil
04-12-2013
amarpatil1612@gmail.com
Devsthan sheti vichayak asnare sampurna kayadyachi mahiti milavi hi vinanti
Question by sagunashelke
03-12-2013
sagunashelke9@gmail.com
तहसीलदार यांना कोतवाल , शिपाई , लिपीक,वाहन चालक , अव्वल कारकून, तलाठी व मंडळ अधिकारी या सर्व कर्मचा-यांचे अर्जीत रजा मंजूर करण्याचे हक्क आहेत पण तहसीलदार यांना किती दिवसाच्या अर्जीत रजा मंजूर करण्याचे हक्क असतात?(किती दिवसाची मर्यादा आहे?)
Question by सगुना शेळके
02-12-2013
sagunashelke9@gmail.com
तहसीलदार यांना तहसील कार्यालयात कार्यरत कर्मचा-यांचे किती दिवसांची अर्जीत रजा मंजूर करण्याचे हक्क आहेत?
Question by स्वाती स्वामी
02-12-2013
swati.swami@yahoo.com
एखादा कर्मचारी निलंबित आहे .त्या कर्मचारी यांना परत शासन सेवेत पुनःस्थापित केले आहे. तर निलंबित कालावधीत मुख्यालय असलेल्या कार्यालयाने कार्यमुक्त केल्याशिवाय पुनःस्थापित केलेल्या कार्यालयात त्या कर्मचारी यांना रुजू होता येते का ?
Question by prakash band
02-12-2013
aslpsb@gmail.com
N. A. Darpatrak rural karita kay aahet ?(dist -Aurangabad)
मा, जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेप्रमाणे दर असतो. आपल्या कार्यालयाच्या शासन निर्णयाच्या फाईलला असेल
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by सगुना शेळके
01-12-2013
sagunashelke9@gmail.com
तहसीलदार यांना किती दिवसांची अर्जीत रजा मंजूर करण्याचे हक्क आहेत?या संदर्भात परीपत्रक किंवा GR कोणता आहे ?
Question by shivaji राजेम्हादिक
30-11-2013
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पाणबुडे सो, नमस्कार माझा प्रश्न असा आहे राजेम्हादिक यांची खाजगी वडिलार्जित स्वमालकीची गावठाण मिळकत होती ती त्यांनी २ फेबुर्वारी १८९७ रोजी दादा अप्पाभाई यांना भाडेपट्ट्याने दिली पुढे त्या जागेत दादाचे नातू इब्राहीम हे रहात होते त्यांनी ती जागेवर असणारे त्यांचे घर पडले म्हणून त्यांनी तो पसारा १५ ऑगेस्त १९५७ ला पांडू निमत यांना विकला असे सांगून गुपचूप त्या जागेचेच रजिस्टर खरेदीखत १६ एप्रिल १९५६ रोजी केले त्यावेळी पांडू निमत हा साहित्य न्हेण्यासाठी आला असता त्यास राजेम्हादिक यांनी इब्राहीम याचेक्डून भुई भाड्याची रक्कम येणे बाकी आहे तो पसारा न्ह्यायचा नाही म्हणून सांगितले त्यानंतर निमत याने २९ ऑगस्ट १९६६ ला सरस्वती कदम यांना रजिस्टर खरेदी पत्राने मोकळ्या जागेचे खरेदी पत्र केले त्यानंतर सरस्वती कदम यांनी रजिस्टर खरेदी पत्राने मोकळ्या जागेचे खरेदी पत्र मधुकर पाटील यांच्याशी केले ते तिथे कब्जा करणेसाठी आले असता त्यास राजेम्हादिक यांनी कब्जा घेऊ दिला नाही व दैवात्सिंघ राजेम्हादिक यांनी त्याच्यावर दावा दाखल केले परंतु त्या दाव्याचेवेली इब्राहीम ने कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले कि ती जागा माझी मालकीची न्हवती ती भाड्याने मी राजेम्हादिक यांचे कडून घेतली होती मग मधुकर पाटील यांचेवर केलेला दावा कोर्टाने खर्चा सह फेटाळला मग अशा वेळी आम्ही दैवात्सिंग राजेम्हादिक यांचा बहीण माणगाव जिल्हा रायगड येथे राहतात तर त्यांचे नावाने आम्ही सुवातीचे म्हणजे इब्राहीम यांचा वारसावर इब्राहीम याने केलेले खरेदी पत्र रद्द करण्याची मागणी केली तर चालेल का ? कोणत्या आधारे दावा करावा कृपया माहिती द्यावी हि विनंती आहे.
Question by vijay sankhe
27-11-2013
vijaysankhe@rediffmail.com
I would like to know that if some one is getting provisional pension after retirement due to criminal matter is pending in the court. & the pensioner dies before the matter is being heard or settled in the court. When court close this matter as the accused is no more . To whom legal heirs should approach to settle the matter of provisional pension and gratuity to get regularized. What is the procedure to approach the concerned authority.
Question by devendra
27-11-2013
jyotitandel82@gmail.com
सर
सर्वे न- ४२३ हिस्सा ३ ची जमीन कुळाने १७ / ११ / १९५६ रोजी मालकाकडून खरेदी करून त्याच दिवशी १७/११/१९५६ रोजी दुसर्या व्यक्तीला विकली आहे तर व त्या नंतर दिनांक १/४/१९५७ रोजी त्या कुलाची सातबार्यावर सामान्य म्हणून कुलाची नोद झाली तर कुलाची मुलगी आता अपील करू शकते काय ? व किव्हा सदर खरेदी मध्ये कुल कायद्याचे उलघन आहे काय ?
Question by sanjay dalvi 67@gmail.com
26-11-2013
sanjaydalvi67@gmail.com
what rules are regarding casual leave.
किरकोळ रजेबाबत नियमावली अशी नाही, पण याबाबत काही शासन निर्णय आहे....
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by devendra
23-11-2013
jyotitandel82@gmail.com
सर
सर्वे ११० ची हिस्सा १ च्या एकूण शेत्र च्या १/३ जागे कुळाने दिनांक १५/६/१९५६ रोजी मूळ मालक कडून घेतली व त्याच दिवशी दिनांक १५/६/१९५६ रोजी कुळाने दुसर्या व्यक्तीस विकली आहे सदर खरेदीबाबत सदर कुलाची मुलगी अपील करू शकते का ?
Question by devendra
23-11-2013
jyotitandel82@gmail.com
सर
सर्वे १५४ हिस्सा २ शेत्र ५२.१ हे .आ .चौ व खराब शेत्र ३ .० हे .आ .चौ आहे
सदर जमिनीपैकी मालकाकडून खरेदी करून कुळाने १/३म्हणजे १७.८ हे .आ .चौ व खराब १ हे .आ .चौ जमीन दुसर्या व्यक्तीस सन १९५६ साली विकली
उर्वरित २/३ जमिनीस मालक व कुल म्हणून माझे नाव आहे माझ्या हिस्सास ३४.३ हे .आ .चौ व खराब ३.० हे .आ .चौ जमीन आहे सदर जमिनीचा धारा मला भरवायला लागतो तेव्हा
सदर जमिनीची विभागणी करावयाची आहे माझ्याकडल दुसर्या व्यक्तीचे खरेदीखताच्या आधारे भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करून आकार फोड करता येईल का ? व जमिनीची विभागणी करून सर्वे न अ व ब करता येईल का ?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
