जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by गजानन पोतदार, नांदेड
18-10-2013
gajananvpotdar@gmail.com
सर, शासन निर्णय, महसुल व वन विभाग दि.06/11/2001 अनुसार परिविक्षाधीन नायब तहसिलदार यांना प्रशिक्षणांतर्गत सहा महिने कालावधी साठी स्वंतत्र अव्वल कारकुन (महसुल ) या पदावर पदस्थापना देते वेळेस पदस्थापना देण्यात येत असलेल्या तहसिल कार्यालयातील अ.का. हे पद रिक्त असणे आवश्यक आहे का ? कि सदर नियुक्ती ही अतिरिक्त पणे देत असतात ? कृपया मार्गदर्शन व्हावे.
शक्यतो रिक्त पदावर नियुक्ती दिली जाते. पद रिक्त नसल्यास अतिरिक्त कार्यभार दिला जातो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रवीण बाळू गट्कुळ
18-10-2013
pravin.gatakul@gmail.com
माझ्या वडिलाच्या नावाची जमीन १९९३ मध्ये साकॅत मध्यम प्रकल्पात १२ गुठे गेली आहे ( तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद ) तर मला प्रकल्पग्रस्त दाखला पाहिजे परंतु मला २०१० च्या जी आर नुसार देत येत नाही असे सागितले व त्यांनीच सांगितले की कोर्टाचा निकाल लागलेला आहे व मला १ महिन्याने शाश्नाचा जी आर येणार आहे त्यानंतर तुला दाखला देण्यात येईल त्यानुसार मी १६.१.२०१३ ला अर्ज केला असून आजतागायत मला दाखला मिळाला नाही माहिती अधिकाराखाली मी तो निकाल घेतला असून वकिलाला भेटलो तर वकील म्हणाले कोर्टाचा निकाल आला आहे म्हणजे झाले तो सर्वांनाच बंधनकारक असतो तर मला दाखला मिळवण्यासाठी काय करावे लागेल कृपया माज्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळावे एवढी माफक अपेक्षा
न्यायालयाची निकाल प्रत पहिले शिवाय या बाबत मत प्रदर्शित करता येणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
न्यायालयाच्या दावा /जन हित याचिका/writ क्रमांक नमूद करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandeep Chavare
18-10-2013
chavare.sandeep@gmail.com
Sir,
We at Ruddhi Biotech Pvt Ltd, A/P Dewale,TAl-Panhala,Kolhapur, registered Biotechnology Company wants to purchase 20 R Agricultural land for its new "Plant Tissue Culture Laboratory " at Gat No. 637 Borpadale,Tal-Panhala.Dist-Kolhapur. As per Govt policy registered biotechnology unit is eligible for Package Scheme of Incentives and thus we have applied for the Stamp Duty Exemption Certificate to District Industries Centre(DIC),Kolhapur before proceeding for the sale deed.But DIC has put our application on hold saying that Non Agricultural(NA) Sanad is required for the land in question to avail the facility of stamp duty exemption.
Sir, we want to know whether before sale deed NA order is necessary for a company to purchase agricultural land for its intended bonafide industrial use?
With reference to amended Industrial policy under section 44 A (2) of MLRC 1966 a company can purchase the land in question for its intended bonafide industrial use and can apply for NA Sanad as per section 44 A (2) of MLRC1966 after starting the development of land in question for the bonafide industrial use within limitation.
We are ready to submit the affidavit that as per section 44 A of MLRC1966 after starting our work within limitation company will apply for NA Sanad and produce it.
We hereby request you to guide us in this matter and help us to avail the Stamp Duty Exemption Certificate and to execute the sail deed.
Thanking you.
Sandeep Chavare
Director
Ruddhi Biotech Pvt Ltd.
Kolhapur
DIC should not have withhold the Exemption Certificate. On the basis of the said certificate , you will have to adjudicate the stamp duty from the Joint District Register Kolhapur. ( adjudication Order)
If land intended to be purchased is situated in Industrial zone or agricultural zone where industrial use is permissible , you can purchase the land. And as you said after putting land to actual NA use, you have to inform tahsildar within 30 days and execute sanad. It is deemed NA. There is no need to separately apply and obtain NA permission.
You submit your Project Report to DIC. If they don't grant certificate , approach District Collector/RDC Kolhapur to instruct DIC or otherwise Higher Authority in Industry Department.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय सपकाळे
18-10-2013
sapkalesanjay5@gmail.com
माझ्या कडे असलेल्या जमीनीवर कुळाचे नाव तुकडा असे नमूद केलेले असून' नविन अविभाज्य शर्त ' असा उल्लेख आहे कृपया याचा अर्थ समजून सांगाल का..?
तुकडा म्हणजे तुकडेबंदी व तुकडे जोड कायदा अन्वये निश्हीत केलेल्या किफायतशीर क्षेत्रा पेक्षा कमी क्षेत्रं धारण केलेले असल्यास त्याचा उल्लेख तुकडा असा केला जातो.
आपणास कुल वहिवाट कायदाद्वारे जमीन प्राप्त असल्यास त्या वर अविभ्ज्या सत्ता प्रकार असा उल्लेख असावा. मात्र तो शेरा नियंत्रित सत्ता प्रकार असणे आवश्यक. याचा अर्थ विक्री वर परवानगीशिवाय निर्बंध.
अथवा आपणास शासनाने जमीन प्रदान केलेली असावी. अश्या जमिनीच्या ७/१२ वर अविभाज्य सत्ता प्रकार असा उल्लेख केला जातो. म्हणजे विक्रीवर निर्बंद.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विजय इंगोले
17-10-2013
vv_rt@rediffmail.com
रोजगार हमी उपकर ,जिल्हापरिषद उपकर व ग्रामपंचायत उपकर व तसेच शिक्षण कर हे कोण कोणत्या लेखासिर्शाखाली भरणा करतात
Question by prakash band
16-10-2013
aslpsb@gmail.com
7/12 ला 10 वर्ष पूर्ण jhali असतील तर पुनर्लेखन करिता कोणाची परवानगी तलाठी यांनी घ्यावी किंवा नाही ?
Question by nirmal ravikiran tukaram
15-10-2013
nirmalravikiran@gmail.vom
पूर्वी मी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे लिपिक होतो जिल्हा बदलीने मी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक आहे महसुल आर्हता परेक्षेतील सात पैकी पाच विषयात मी जालना जिल्ह्यातूनच उत्तीर्ण आहे जालना व बीड जिल्ह्याचीआर्हता परीक्षा मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचेच कार्यालयामार्फत घेतली जाते त्यामुळे मला उर्वरित दोनच विषयांची पर्कीषा उत्तीर्ण व्हावि लागेल कि मला संपूर्ण विषयांची परीक्षा पुन्हा द्यावी लागेल कृपया मार्गदर्शन हवे आहे.
उर्वरित दोन विषयांची. या पूर्वी हि या प्रश्नाचे उत्तर दिले होते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mayur baviskar
14-10-2013
mayurbaviskar46@yahoo.com
mazya aajobana 2 bhau ahet. 15 varshapurvi tyani 1 bhavakadun tyanchya vatyachi jamin vikat ghetli. total 6 ekre jamin ahe. ti ajobanchya navavar hoti. Mag tyani 2 ekre aaichya & 2 ekre vadilanchya navavar keli.Urleli 2ekre 3rya bhavachi jamin aajobanchya navavar ahe. Vikat ghetleli jamin ragister n karta fakt stampvar sign getlelya ahet. 7/12 respective navavar yeto. Pan aajobani tyanchya bhavana varas lavlele navhate.Tar mag tyatla ek bhau aata jamin vikat ghetlya nantar suddha bhava-bahinina varas lavnyasthi sangat ahe.Tyani Kortat ya baddal yachika dili ahe.Tar aata amhi kay karave?
आपण पूर्ण वस्तुस्तिथी कथन केलेली नाही. आजोबांनी केव्ह्ना जमीन खरेदी केली आहे.
३ रा भाऊ कोण? आजोबांचा कि तुमच्या वडिलांचा ? आजोबांचा भाऊ त्यांचा तुम्ही कथन केलेल्या वस्तुस्थितीनुसार वारस ठरू शकत नाही.
मालमत्ता हस्तांतरण कायदा नुसार विक्री म्हणजे , मालकी हक्काचे पश्याचे मोबदल्यात हस्तांतरण. १०० रुपये किंमती वरील प्रत्येक हस्तांतरणाची नोंदणी होणे आवश्यक.
आजोबांनी नोंदणी दस्ताद्वारे जमीन खरेदी केलेली नाही.त्यामुळे कायद्याच्या भाषेत यास खरेदी मानता येणार नाही. तथापि , जमिनीवर २० वर्षे किव्वा त्याहून अधिक काळ आपला ताबे कब्जा असल्यास , आपण adverse possession द्वारे मालक घोषित होउइ शकता.
तसे खरेदी करते वेळी आपण दिलेल्या मोबदल्याबाबत पावती, धनादेश अथवा अन्य पुरावा असल्यास आपणास त्याचा उपयोग होईल. पिक पाहणी च्या द्वारे आपण न्यायालयाचे निदर्शनास आणून देऊ शकता कि , आपला जमिनीवर ताबा आहे व आपण जमीन कसत आहात.
मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम ५३ अ चा आधार घेऊन , दिवाणी न्यायालयात आपण , जमिनीचे मालक घोषित करणे बाबत दावा हि करू शकता . तसेच संबंधितांविरुद्ध कायमचा मनाई हुकुम घेऊ शकता. आपल्या दिवाणी वकिलांशी या मुद्या बाबत सल्ला मसलत करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय वाघमारे
14-10-2013
sanjaywaghmare70@rediffmail.com
सर,तुकडेबंदी कायदयानुसार प्रत्येक जिल्हयाचे प्रमाणभूत क्षेत्रा ची माहिती (Annexure) उपलब्ध असल्यास क़पया माझे मेलआयडी वर पाठवावे हि विनंती मी आपला अत्यंत आभारी राहीन.
आपण आपल्या अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधा. एकत्रित सर्व जिल्ह्यांची मिळणे कठीण आहे. जमाबंदी आयुक्त , पुणे यांचे कडे प्राप्त होईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by pravin vishnu patil
13-10-2013
ppatil821@gmail.com
अव्वल कारकून याचं चार्ज मंडळ अधिकारी यांना देत येईल kay
15 05-10-2013 अव्वल कारकून सतत आजारी रजेवर जातात. अधिकारी यांनी अव्वल कारकून यांचा चार्ज मंडळ अधिकारी यांना दिला अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हे वेगवेगळे संवर्ग आहे. अव्वल कारकून यांचा चार्ज मंडळ अधिकारी यांना देऊ शकते काय ?
मेघा वारे
meghaware81@gmail.com देऊ शकतात.
श्री. किरण पानबुडे
Dy collector
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by prafulla
12-10-2013
ps_godbole@yahoo.com
१९/९/१९५७ च्या फेरफार मध्ये -
स .कु. क्ष क्ष क्ष सदर जमीन लावत निहित , खातेदारांना नोटीस दिली हरकत नाही मंजूर असा शेरा असल्यास त्याचा अर्थ काय
आपल्या अंदाजे प्रश्नावरून खालील तर्क ....
बहुतेक संरक्षक कुळ......... परंतु कृषक दिंनांनंतर सलग काही वर्से/काळ जमीन लावत /कसत नाही म्हणून .......म्हणून कुळ रद्द हा अर्ज मंजूर केला असावा असे वाटते . कृषक दिनाच्या लगत वहिवाट तपासणी अंती "वहिवाट" नसावी ....................
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by INGOLE VIJAY HARI
11-10-2013
vv_rt@rediffmail.com
जेव्हा एखादे प्रकरण RRC म्हणून वसूल करणेसाठी तेव्हा ती वसूल केलेननंतर १० टक्के रक्कम आपल्याला घेयाची असते तर तशी रक्कम कोणत्या विभागाकडून घेऊ शकतो म्हणजे उदाहरण कोर्टाकडून decree order आली असेल किवा जिल्हा ग्राहक न्यायालय कडून decree order आली असेल तर तशी RRC वसूल केली म्हणून १० टक्के रक्कम आपल्याला मिळते काय व असे कोणकोणते विभाग आहेत याची माहिती मिल्नेस विनंती
महाराष्ट्र शासनाचे अन्य विभागाकडून प्राप्त RRC वसूल केल्या नंतर , १० % रक्कम वसूल करता येत नाही. अन्य राज्याची वसुली मध्ये करता येत नाही. ग्राहक मंच आदेश वसुली मध्येहि अशी १० रक्कम वसूल करता येत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by prafulla
11-10-2013
ps_godbole@yahoo.com
अविभक्त हिस्शाची आणेवारी झालेली असेल तर ती जमीन साठेखाताने खरेदी करता योते का ? व नोंद करताना इतर सह्हिस्सेदरनि हरकत घेतल्यास काय करावे
साठेखताने जमीन खरेदी केली जात नाही. साठेखाताद्वारे जमीन , अटींची काही बाबींची पूर्तता झाल्यावर खरेदी अथवा विक्री करण्याबाबत करार केला जातो.
सह हिस्सेदार व विक्रेता यांना जमीन वंश परंपरा पद्धतीने प्राप्त झाली असल्यास , ( consanguine ) असतील तर , सह हिस्सेदार यांना जमीन खरेदी करण्याचा अग्ग्रहक्क आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Imad Hashmi
10-10-2013
imadhashmihashmi@gmail.com
जात पडताळणी करण्या साठी जाती चे पुरावे अनिवार्य कोण कोणते?
वडिलांची जात हि मुलाची/ मुलीची जात. या तत्वाचे आधारे, वडील यांचे , शाळा सोडल्याचा दाखला, जन्म नोंद दाखला, नोकरीत असल्यास सेवा पुस्तक जात नमूद पृष्ट.
भाऊ / बहिण यांची जातवैधता झाली असलास , वैधता प्रमाणपत्र च्या प्रत.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजी राजेम्हादिक
10-10-2013
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पाणबुडे सो,
७/१२ व फेरफार काढला आहे त्यावरून किंमत निश्चित झालेली नाही. त्यामुळे limitetion ची बाधा येणार नाही ना ?
राजे ,
विधवा जमीन मालक १९८० मध्ये मयत झालेल्या आहेत. कुळाने २ वर्षात , जमीन खरेदी करणे आवश्यक होते. जमीन खरेदी केलेली नसल्यास , किंमत निस्षित कार्यवाही निरर्थक होईल .३२ प कारवाई सुरु होईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by khairnar vishal eknath
10-10-2013
vishalkhairnar84@rediffmail.com
अर्जदार यांनी जमीन १९७३ साली खरेदी केली आहे त्याचे खरेदी खत अर्जदार याचे कडे आहे त्यांनी मिळकत पत्रिके वर नाव लावलेले नाही तसेच त्याचे कडे खरेदी खत शिवाय कुठलेही दस्त नाही ती जागा त्याचे ताब्यात नाही व ज्या व्यक्तीने जागा विकली होती ती व्यक्ती मयत झाली असून सदर जागा त्याचे वारसाचे ताब्यात असून त्यावर त्यांनी बाधकाम केलेले नाही परतू जागा ज्या व्यक्ती कडून घेतली होती त्याचे वारसांनी मिळकत पत्रिकेवर वारस म्हणून नाव दाखल केले आहे. तर अशा वेळी अर्जदार यांनी मिळकत पत्रिकेवर नाव दाखल करणे साठी व जागा त्याब्यात घेणे साठी काय करावे तसेच त्या जागेचे सूची क्रमाक २ मिळवण्यासाठी काय करावे
You file declatory suit under Specific Relief Act before civil court.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुनील tarudkar naib tahasildar kalmeshwar
09-10-2013
suniltarudkar@gmail.com
if nazul land acquired by d.p for widening road can corporation sanction the building permit
Question by शिवाजी राजेम्हादिक
09-10-2013
shivajirajetarale@gmail.com
सर,
कुळाच्या नावे ३२ ग किंमत निश्चिती झाली आहे का नाही याची माहिती कशी घ्यावी लागेल
७/१२ पहा . फेरफार काढा. शेतजमीन न्यायाधिकरणाकडे तपासा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सदाशिव नाईक
08-10-2013
pmlbby@polymechplast.com
२००८ या वर्षी जमीन खारेदिखाताने घेऊन नोंदणी केलेली आहे ,परंतु २०१३ मध्ये नवीन सहहीसेदार मालक तयार होऊन जमीन त्याची असल्याचे दावा करीत आहे. कृपया सल्ला देण्याची विनंती
वारसांनी दावा दाखल केला असल्यास , आपण विचार करावा . जर आपण bona fide पुर्चासेर असाल तर , खरेदी किंमत व्याजासह विक्रेत्याकडून मिळू शकते. जागेचा विकास केला असल्यास, आपले अपरिमित नुकसान होईल अशे , न्यायालाचे निदर्शनास अनु देल्यास जमीन आपले कडे राहू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपल्या प्रकरणात सहसा एकत्र कुटुंबाची जमीन वारस नोंदिवेळी एकाच्याच नावे किंवा ए .कु. म्य.( एकत्र कुटुंबाचा म्यानेजर ) लागली असेल आणि त्याने ती बाब आपल्याला अंधारात ठेवून इतरांची परवानगी / समती न घेता आपल्याला विकली असेल . आपण जर मागील ३० वर्षाचा " शोध" घेतला असता तर आपल्याला सहा-हिस्सेदारांची नावे त्यात आढळली असती . कृपया "SEARCH " घेवून खात्री करा ........................
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
जमीन खरेदी करताना " मालमत्ता हस्तांतरण " कायद्यानुसार काही मुलभूत बाबी पाहणे आवश्यक आहे .....जसे ...
१) जमिनी बाबत साधारण मागील ३० वर्स मागे रेकॉर्ड तपासावे लागते , त्यामध्ये मागील " मालक तसेच मालकीचा " आरसा समोर येतो .
२) जमीन जेथे आहे तेथे स्थानिक चौकशी करून ताबे-वहिवाट, जमिनीच्या चातुर्सिमा व आत्ताचे व पूर्वीचे मालकांची स्थानिकांकडून चौकशी इत्यादी माहितीची खातरजमा व खात्री करावी लागते
३) जमीन विकत घेणेबाबत स्थानिक वृत्त-पत्रात जमिनीचा व इतर तपशील देवून , जाहिरात / पुब्लिक नोटीस देवून खरेदी-विक्रीचा उद्देश जाहीर करावा लागतो .
ह्या मुलभूत बाबी पाळल्या तर आपल्या सारखी परिस्थिती उदभवत नाही .
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजी राजेम्हादिक
06-10-2013
shivajirajetarale@gmail.com
सर, मागील विचारलेल्या सर्व प्रश्नांपेकी फेरफार संबंधी प्रश्नाबाबत सविस्तर माहिती आपल्याला द्यायची आहे परत सविस्तर माहिती देऊन प्रश्न विचारला तर चालेलका?
Question by शिवाजी राजेम्हादिक
06-10-2013
shivajirajetarale@gmail.com
एकूण जमीन मालक ११ आहेत त्या ११ जमीन मालकांची आणेवारी प्रमाणे नावे आहेत व कुळाने ताराबाई २ आणे वगेरे ४ यांचे साधे कुल म्हणून फेरफार ९६९ सरठीफाय केला त्या फेरफार मध्ये वगेरे ४ यांची आणेवारी चा उल्लेख नाही किवा वगेरे ४ कोण याचा उल्लेख नाही शेरे कोष्टकात नोटीस रुजू करणे, नोटीस देणे असे शेरे आहेत परंतु नोटीस रुजू असा शेरा नाही त्या फेरफार मध्ये आता जे जमीन मालक आहेत त्यांचे नाव नाही वा त्यांच्या अनेवारीचा उल्लेख नाही असा सरठीफाय केलेला फेरफार आहे फेरफारास कबुलायतीचा किवा दुसरा कोणताही आधार नाही कुळ सदर फेरफारच्या आधारे कुळ हक्क सांगत आहेत mutation register हे कुळ हक्क शाबित करणारा पुरावा होत नाही असा मुंबई हाय कोर्टाचा निकाल आपल्याकडे आहे कुळ हक्काचे जमिनीमध्ये कुळाची रीत ३ असते सन १९४० ते १९५३ पर्यंत व १९६५ ते १९८० पर्यंत अखेर जमीन कसणाराची रीत १ असा उल्लेख आहे सन १९५४ ते १९६४ पर्यंत रीत ३ असा उल्लेख आहे फक्त सन १९६२ - ६३ व १९६३ - ६४ साला करिता खंडाचा उल्लेख १२ दिसतो खंडाचा उल्लेख १९५३ सालापासून का नाही जमीन मालकीण १९५० पासून विधवा होती तिला कायद्याचे ज्ञान न्हवते व तिला नोटीस मिळाली नाही त्या मुळे तिने तक्रार करण्याचा अगर हरकत घेण्याचा प्रश्नच येत नाही मग अशा वेळी जमीन मालकीण १९८० साली मयत झाली व कुळाने १९८४ साली मयताच्या नावे ३२ ग खाली नोटीस दिल्याचा पुरावा दिला असेल हे जमीन मालकाच्या वारसाला २०१२ साली वरील बाबी वारस नोंद झाल्यानंतर लक्षात आले शिवाय tillers day postpone झाला त्यामुळे land lord ची dissability सम्पुष्टात आली असेल व फेरफार ९६९ हा सर्व कायदेशीर तरतुदी डावलून अस्तित्वात आणला आहे मूलतः रद्दबातल असल्याने त्याबाबतच्या तक्रारीस limitation ची बाधा येत नाही आपण प्रांत साहेबांच्याकडे सरठीफाय झालेला फेरफार रद्द करू शकतो असे आमच्या वकिलांचे म्हणणे आहे मग अश्या वेळी आम्ही कोणता आधार घ्यावा किंव्हा काय करावे
राजे,
कुळाचे नावें ३२ ग किंमत निश्हीत झाली आहे का?
किंमत निश्हीत झाली नसल्यास , विधवा मालक झाले पासून २ वर्षाचे आत किंमत निश्हीत न झाल्याने, कलम ३२ प अन्वये , जमिनीची vilhevat लावावी लागेल. विल्हेवाट लावताना जमीन मालकास प्राधान्य हक्क आहे.
मात्र किंमत निस्षित झालेली असल्यास , मुदत कायद्याची badha येयील.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपण सर्व बाबी अत्यंत उत्कृस्ठ्णे मांडलेल्या आहेत त्यामुळे आपण तज्ञ वकिलांचा सल्ला घेणे व अपील करणे उचित होईल.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by सतीश प्रसादराव भुतेकर
06-10-2013
sbhutekar@rediffmail.com
सर, कृपया माझ्या २/८/२०१३ च्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
Question by मेघा वारे
05-10-2013
meghaware81@gmail.com
अव्वल कारकून सतत आजारी रजेवर जातात. अधिकारी यांनी अव्वल कारकून यांचा चार्ज मंडळ अधिकारी यांना दिला अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हे वेगवेगळे संवर्ग आहे. अव्वल कारकून यांचा चार्ज मंडळ अधिकारी यांना देऊ शकते काय ?
Question by शिवाजी राजेम्हादिक
05-10-2013
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पाणबुडे सो, नमस्कार आपण सुरु केलेल्या वेबसाईट मुळे आमच्या प्रश्नांना आपल्या मार्फत मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आमच्या सारक्या सामान्य नागरिकांच्या ज्ञानात वाढ होऊन आम्हाला महसूल कायद्या विषयीची माहिती आपल्याकडून प्राप्त होते. हि बाब अतिशय चांगली आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
वेब सायीट मी सुरु केलेली नाही. Dr विकास नाईक साहेब यांनी सरू किली आहे. आपण सार्वजन त्यांना धन्यवाद देयू.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय वाघमारे
05-10-2013
sanjaywaghmare70@rediffmail.com
सर,माझा प्रश्न असा आहे की, एखादया ईसमाने श्रध्देपोटी आपली स्वतःची मालमत्ता एखादया संस्थानच्या नावाने धारण केलेली असेल (खाजगी संस्थान) ज्याची धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी केलेली नाही अशा वेळी त्यास ती जमिन विकायची असल्यास त्याला परवानगी घ्यावी लागेल काय?
दिवाणी प्रक्रिया संहिता कलम ९२(फ) अन्वये दिवाणी न्यायालयाची परवानगी घेणे उचित.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
