जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by shailesh bhojane
09-08-2013
ybhojane72@gmail.com

सन 1958 साली गणु गायकर हे जमीनी ल कुल नोंद
सन 1964 साली 32 ग प्रमाने खरेदी कीमत ठरली
सन 1986 साली 32 म प्रमाने खरेदी प्रमाण पत्र दिले त्यात गावचे नाव चुकले त्यामुले कुलाने 7/12 सदर गावी 32ग आणि 32 म च अमल घेतला नाही
सदर जमीन कुल खातेदार यानी रजिस्टर मृत्युपत्र करून आपले भावाची मुलगी याणा ही जमीन दिली तसा गावी फेरफार नोंद करून आज रोज़ी कुळ सदरी भावा च्या मुली ची मुलगी मन्हजे नाती चे नाव कुळ सदरी लागले
सदर फेरफार मा. उपविभागीय अधिकारी याचे कड़े आवह्नीत करण्यात आला आहे
सन 2013 साली अर्जदार मंजे कुलाची नात यानी 32 म प्रमाणपत्र या मध्ये गावचे नाव दुरुस्त करून मिलावे या साठी शेत जमीन न्या. कड़े अर्ज दाखल केला त्या प्रमाने दुरुस्ती आदेश जहाले
प्रश्न 1 अर्जदार कुलाची नात यानी 32ग आणि 32म आदेश प्रमाने गावी नोंद करावी असा अर्ज दिला त्या प्रमाने नोद करावी किवा कसे?
प्रश्न 2 फेरफार नोंद केल्यास ती मंजूर करताना कोणती खबरदारी घ्या वी
प्रश्न 3 मंडल अधिकरी यानी फेरफार मंजूर केल्यास 7/12 कसा अंमल घ्या वा
प्रश्न 4 मा. उपविभागीय अधिकारी यांचे कड़े फेरफार न्याय प्रविष्ट असताना कोणती कार्यवाही करावी
उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सदर वस्तुस्थिती निदर्शनास आणून द्यावी.जेणे करून सर्वसमावेशक आदेश प्ररित होईल.अन्यथा उपविभागीय अधिकार्यांनी अपील मान्य केल्यास , कुलावर अन्याय होईल व महसूल न्यायाधिकरणाकडे पुनिरीक्षण दाखल करावे लागेल.
तहसीलदार यांनी या बाबत अहवाल सादर करावा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

gr and circular regarding 7b perepatrak case
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.आरटीएस - ४३७८ / ५९६६ -ल - ६ मंत्रालय , मुंबई दिनांक २१ मार्च १९७९ पाहावे.

Reply by श्रीधर गालीपेल्ली | नायब तहसीलदार

Question by विनोद
05-08-2013
thorvevinod80@gmail.com

प्रतिनियुक्तीवर असणारे कर्मचारी यांची मूळ कार्यालयाने सेवा पुस्तक प्रतिनियुक्ती वरील कार्यालयात पाठविले आहे. असे करता येते काय? या बाबत जी.आर. काय आहे.
हो. सेवापुस्तक प्रतिनियुक्ती कार्यालयातच पाठ्वावावे लागेल . प्रतीनियाक्ती कालावधातील सेवा विषयक बाबी मुल विभागास माहित असण्याचा प्रश्नच असू शकत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
MLRC 1966 पूर्वी जमीन विषयी कोणते कायदे अस्तित्वात होते,७/१२ पूर्वी जमिनीचा अभिलेख कोणत्या स्वरुपात ठेवला जायचा? जर १९२२ सालचा जमिनीचा मालकी बाबद वाद असेल तर तो महसूल न्यायालयात चालवावा कि दिवाणी न्यायालयात ?
Earlier there was Bombay Land Revenue Code in Konkan and W Maharashtra.( Erstwhile Bombay state) . MP , Berar act in Vidrabha .
Title dispute irrespective of year is agitated in civil court only.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शासकीय निवृत्ती नंतर गावी वास्तव्य करण्यसाठी शासनाकडून राहनेसाठी/शेतीसाठी योग्य तो मोबदला घेवून जागा मिळते काय कृपया
निवृत्ती नंतर निवृत्ती फायद्यान्शिवाय अन्य मोबदला मिळत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अ.का. व. मंडळ अधिकारी यांची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्धी करताना अ.का.व.मंडळ अधिकारी यांचा पदोन्नती दिनांक विचारात न घेता सेवा प्रवेश दिनांक विचारात घेण्यात येवून यादी तयार करण्यात आली . सदरची कार्यवाही नियमानुसार आहे काय
कृपया खालील दुव्यावर क्लिक करा

http://indiankanoon.org/doc/287363/

Reply by विष्णू पाटील | सर्वसाधारण

रिट पिटीशन न. ८४५२/२००४ च्या निर्णयाची कॉपी अपलोड करण्याची विनंती आहे .

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

महसूल अहरता उत्तीर्ण झालेल्या दिनांकापासून सेवा जेष्ठता ग्रहाय धरले जाते.उच्च न्यायालयाने रिट पिटीसन क्र.८४५२/२००४ मधील आदेश पाहावे.

Reply by श्रीधर गालीपेल्ली | नायब तहसीलदार

Question by Pramod Kerkar
02-08-2013
tdodnat02.si-mh@nic.in

संस्था सहकारी अधिनियम १९६० चे कलम ४८ ग खाली १६ लाखाचे ई-करार करता येतो का ?
पूर्वी झालेल्या भाऊहिस्सा शेतीवातनी प्रमाणे एकाला हलकी जमीन व वाटणीत असलेली सामैयक झाडे यासाठी काही गुंठे जमीन जास्तीची सोडलेली आहे परंतु ती ७/१२ ला लावलेली नाही ती लावण्यासाठी काय करावे,कृपया मदत करावी.
आदरणीय महोदय ,
प्रथम श्री. राजेश जे वझीरे साहेबांचे आभार .
खुल्या गटातील महिलांसाठी नॉन क्रीमिलेयर बाबत कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेताना वेतन व शेतीपासून आलेले उत्पन्न विचारात घेतले जाते का ? माझ्या माहितीनुसार इतर मागासवर्गीयांसाठी वेतन व शेतीपासून आलेले उत्पन्न नॉन क्रीमिलेयर साठी विचारात घेतले जात नाही ?

यासाठी मी सदर प्रश्न विचारला आहे .

सदर बाबतीत समाजात फार मोठ्या प्रमाणात अज्ञान दिसून येते कारण उत्पन्न कोणते धरायचे (आई आणि वडिल का पतीचे व पत्नीचे ), कोणाचा सामाजिक दर्जा विचारात घ्यावयाचा ? कृपया सखोल मार्गदर्शन करावे म्हणजे सर्वांना या प्रश्नाच्या अनुषंगाने फायदा होईल .

विकास नामदेव गरड
सदर शासन निर्णयानुसार कुटुंबाचे उत्पन्न ग्राह्य धरताना कुटुंबाच्या व्याख्येमध्ये विवाहित महिलेच्या बाबतीत पती, मुले यांचे तर अविवाहित महिलेच्या बाबतीत आई, वडील आणि अविवाहित भावंडे यांचा समावेश राहील.
तसेच इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग यांचे करिता उन्नत आणि प्रगत व्यक्ती अथवा गट (क्रिमीलेअर) बाबत सामाजिक न्याय विभागाने वेळोवेळी निश्चित केलेले निकष व अटी तसेच वाढीव उत्पन्न मर्यादा खुल्या गटातील महिलांना नॉन क्रिमीलेअर देताना लागू राहतील, असे सदर शासन निर्णयामध्ये नमूद आहे.
त्यामुळे खुल्या गटातील महिलांना नॉन क्रिमीलेअर देताना विवाहित महिलेच्या बाबतीत पती, मुले यांचे तर अविवाहित महिलेच्या बाबतीत आई, वडील आणि अविवाहित भावंडे यांचे वेतन व शेतीपासून मिळणारे उत्पन्न आपण जसे इतर मागासवर्ग यांना नॉन क्रिमीलेअर देताना ग्राह्य धरत नाही, तसे ग्राह्य धरू नये.

Reply by राजेश जे वझीरे | नायब तहसीलदार

आदरणीय महोदय ,

खुल्या गटातील महिलांसाठी नॉन क्रीमिलेयर साठी कोणत्या अटी आहेत ? सदर बाबतीत समाजात फार मोठ्या प्रमाणात अज्ञान दिसून येते कारण उत्पन्न कोणते धरायचे (आई आणि वडिल का पतीचे व पत्नीचे ), कोणाचा सामाजिक दर्जा विचारात घ्यावयाचा ? कृपया सखोल मार्गदर्शन करावे म्हणजे सर्वांना या प्रश्नाच्या अनुषंगाने फायदा होईल .

विकास नामदेव गरड
खुल्या गटातील महिलांसाठी ३० % आरक्षणाकरिता नॉन क्रिमिलयर साठी महिला व बालकल्याण विकास विभाग यांचा शासन निर्णय क्र. ८२/२००१/मसैआ-२०००/प्र.क्र.४१५/सा-२ दिनांक-२५/०५/२००२ बघावा.

Reply by राजेश जे वझीरे | नायब तहसीलदार

सर, मुख्य पानावर ७/१२ व मिळकत पत्रिका व त्यास mahabhulekh ची लिंक दिल्यास जनतेस सोपे होईल.
A and B are neighbourer, A sold 16 R land to C when B is willing to purchase that land, now whether any remedy is available to B? If yes, what is it?
Santosh देशमुख
8275006945
Remedy is available only when A and B are heirs specified in Class I of schedule and property is devolved upon them by succession. When one proposes to transfer , others have preferential right to purchase it.Courts intervention can be sought to compel A.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जन पीठ हे प्राथम्याने जनतेसाठी आहे; महसूल अधिकाऱ्यांनी महसूल व्यासपीठ मध्ये discussion करावे, म्हणजे एकाच ठिकाणी चांगली माहिती संकलित होईल.
MCS!

Reply by MCS Maharashtra | इतर

विचारलेले प्रश्नांना उत्तर दिले व त्यामध्ये माहिती टाकतांना चूक झाली (उदा. १९७२ च्या ऐवजी १९६८ झाले) व उत्तर पोस्त करण्यात आल्यानंतर चूक लक्ष्यात आली अश्यावेळेस मुल उत्तरात बदल करण्याची सुविधा आहे काय?
नाही; सुधारित उत्तर म्हणून परत एकदा दुरुस्त माहितीसह उत्तर देता येते. दोन्ही उत्तरे एकाखाली एक अशा स्वरुपात दिसत असल्याने अडचण सुटू शकते. तसेच काही नव्याने addition करायचे असेल तरी ते नवीन उत्तरात करता येते.

Reply by MCS Maharashtra | इतर

जिल्हाधिकारी व अप्पर जिलाधिकारी यांचे कार्य शासनाने ठरवून दिलेले आहे अश्या प्रकारे तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे कार्य याबाबत शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना / परिपत्रक / जी. आर असल्यास कृपया अवगत करावे.
तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे कामाबाबत परिपत्रक नाही आहे, पण महसुल व निवासी नायब तहसीलदार यांच्या कामाबाबत विभागणी केलेले परिपत्रक आहे.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे कामाबाबत परिपत्रक नाही आहे, पण महसुल व निवासी नायब तहसीलदार यांच्या कामाबाबत विभागणी केलेले परिपत्रक आहे.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by Pallavi Pednekar
27-07-2013
tdodclk01.si-mh@nic.in

What is the website address of Settlement Commisioner?
भूसंपादन कायदा कलम १२(२) चे नोटिशीवर आसलेल्या नावापैकी काही खातेदारांनी इतर कामकाजासाठी ह्हाक्कासोड पत्रक करून दिले असेल तर अश्या प्रसंगी तेच हक्कासोडपत्राचे आधारे भूसंपादन मोबदला अदा करता येईल काय
इतर कामासाठी हक्क सोडल्या मुळे त्या आधारे मोबदला वाटप करता येणार नाही

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

Section 12 will have to be read with section 1(4) of the Maharashtra Project Affected Person Act 1999.
It will depend upon the applicability of the MPAP act .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर आपले ज्ञान अथांग आहे .
तरी पण मला माहित असल्याप्रमाणे जर हक्कसोड लेख कलम ४ पूर्वी झालेला असेल तर भूसंपादन नियम पुस्तिका १९७२ नियम १२ नुसार झालेला बदल विचारात घेवून मोबदला अदा करण्यास हरकत नसावी . जर हक्कसोड कलम ४ नंतर झालेला असेल तर महा. प्र.ब. व्य. पु.अधि.१९९९ (१९७६) कलम १२ च्या तरतुदी लागू होत असल्यामुळे मोबदला अदा करता येणार नाही .

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

नाही. १०० रु. चा संमतीपत्रावर सर्व खातेदारांची संमती प्राप्त करून त्या आधारे मोबदला अदा करणे योग्य राहील.

चंद्रकांत जाजू
उपजिल्हाधिकारी वाशीम

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

७/१२ च्या उता-यात मालकाच्या नावाआधी अ.पा.क असे लिहिलेले असते त्याचा अर्थ काय
Vishnu, section 8 is applicable to property which is absolute property of minor.Before amendment to Hindu Succession Amendment Act 2005, child's share was fluctuating and hence such property was not absolute property of child . Hence Court observed that section 8 inapplicable. However property which is in the name of child/ devolved upon him is his absolute property and in such case section 8 is applicable.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर कृपया या निकालावर भाष्य करा
Smt. Sandhya Rajan Antapurkar & ... vs State Of Maharashtra on 25 November, 1999

Reply by विष्णू पाटील | सर्वसाधारण

In such cases , property cannot be sold without leave of the court during the minority .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अ.पा .क म्हणजे अज्ञान पालन कर्ता.In English it is called Guardian of the Minor(person below 18 Years.)

Reply by श्रीधर गालीपेल्ली | नायब तहसीलदार

आपल्या नावावरील जमिनीचा १९७० पृविचा फेरफार तहसील मध्ये मिळत नाही तर तो मिळवण्यासाठी काय करावे,व कुठे मिळेल. कृपया मदत करावी.
जर तहसीलमध्ये मिळत नसेल तर मिळणे अश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

फेरफार हे अ प्रकारचे अभिलेख असल्याने ते कायमस्वरुपी जतन करावे लागते. जर आढळ होत नसेल तर त्याचे कारण काय हे तहसीलकडुन माहिती करुन घ्यावे.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

मी दि. १४/०७/२०१३ रोजी अव्वल कारकून म्हणून रुजू झालो लिपिक संवर्गातील माझे वेतन १९०० ग्रेड पै मध्ये रु ६९७०/- एवढे होते परंतु मला अव्वल कारकून संवर्गात पूर्वी 2800/- ग्रेड पे (आता ३५००/- आहे) ग्रेड पे लागू केला परंतु त्याचे किमान वेतन २८००/- ग्रेड पे नुसार ८५६०/- व ३५००/- प्रमाणे ८९२०/- होणे अपेक्षित आहे (महा सिविल सर्विस रूल) कनिष्ठ कर्मचार्या पेक्षा वरिष्ठ कर्मचार्या चे वेतन कमी असू नये असा नियम आहे
समजा अ ने ब ला जमीन विक्रीकामी व पुनर्वसन परवानगी
कमी कुलमुखत्यारपत्र करून दिले असून ब ने क ला कुलमुखत्यार पत्राने सर्व अधिकार दिले असून क ने अ च्या मिळकतीचे कुलमुखत्यार पत्राच्या आधारे रजिस्टर खरेदीखत ब ला करून दिले असून फेरफार नोंदीबाबत मूळ मालक अ ला notis dyavi ka?
B has not any right to give it to C,so in this case the transition done by B to C is not legal.Then also if registration is done,you shold issue notice to A ,B and C.And cancel the mutation..

Reply by विकास खरात | उप जिल्हाधिकारी

As per section 190 of Contract Act , agent cannot delegate his work to another agent. In your case , wheb B has been appointed to obtain permissions and sale the property of A , he cannot delegate his work to C which he himself has undertaken to perform.when C has transferred property to B , then why A himself has not transferred property to B ?
A should have appointed C as attorney to sale his property .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, लीसपेंडन्सी रजिस्टर दस्त व दिवाणी न्यायालयात चालू असलेल्या दाव्यावरून फेरफारनोंद धरली असता त्यावर त्यातील वादीची तक्रार आली असता तक्रार रजिस्टरला धरून तक्रार केस तालुक्यात पाठवावी का? अशा नोंदीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार नोटीस बजवायची आवश्यकता असते का?
तक्रार नोंद आहे , तालुक्यात पाठवणे आवश्यक .कलम १५० प्रमाणे notice देणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तुक्डेबंदी कायद्याचा भंग केव्हा होतो ?
२४.८ गुंठ मोजणी करण्या साठी साधारण किती खर्च येईल ?
आकारफोड पत्रक तयार करून घेण्य साठी मोजणी अर्जाबरोबरच अर्ज करावे लागेल का ?
प्रत्येक जिल्ह्यासाठी आदर्श क्षेत्र निशित करण्यात आले . वर्षभर बागायत क्षेत्रासाठी आदर्श क्षेत्र ०-०५-०० ha-R , हंगामी बागायत क्षेत्रासाठी ०-१५-००, तर जिरायत क्षेत्रासाठी हे प्रमाण ०-२०-०० आहे. या पेक्षा कमी क्षेत्र विक्री-व अन्य कारणामुळे निर्माण होत असेल तर भंग होतो. आपले जिल्ह्याचे आदर्श क्षेत्र काय आहे हे तपासून घ्या.
प्रश्न २ व ३ बाबत , भूमी अभिलेख खात्याशी संपर्क साधा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sanjaydalvi
21-07-2013
sanjaydalvi67@gmail.com

i joined the service in 1994 and pass r q in nov.2001 requesting a suggestion for yesterdays question.
Seniority is fixed on the basis of date of passing of RQ provided you have passed the examination within three chances .
Among candidates who have passed the examination on same date , the date of continuous service in clerk cadre. If both are same for more candidates then candidate older in age is senior and so on.........

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

२४.८ गुंठ्यान मध्ये अर्धे करून माझा वेगळा गट क्रमांक (७/१२) मिळेल का ?
तसा नसेल होणार तर माझ्या ७/१२ मधला गट नंबर विभागून मिळेल का जेणे करून मी माझ्या हिस्स्याचा धारा भरू शकेन अर्धा हिस्सा माझा आहे
जर तुमची जमीन भातशेती असेल तरच तिचा फाळणी-बारा (आकार-फोड...... म्हणजे आपले 12.4 गुंठे क्षेत्राचे दोन तुकडे ) होईल, अन्यथा नाही. कारण तुकडेबंदी कायद्यानुसार महाराष्ट्र मध्ये सर्वसाधारणपणे 20 गुंढेचे आत कोठेच जमिनीचा तुकडा पाडता येत नाही.

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

तुक्डेबंदी कायद्याचा भंग झाला झाला नसेल / होत नसेल तर , रीतसर उप अधिषक भूमी अभिलेख यांचेकडे जमीन मोजणीचा अर्ज करून , आकारफोड पत्रक तयार करून घ्यावे . आपले हिस्याचे जमिनीस पोट हिस्सा /पोट सर्वे नंबर मिळेल.तसेच धारा हि जमिनीचे शेत्र, प्रती प्रमाणे निशित केला जाईल . आकारफोड पत्रकाचे आधारे स्वतंत्र वेगळा ७/१२ मिळेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sanjay a dalvi
20-07-2013
sanjaydalvi67@gmail.com

what is the criteria used for seniority list after passing revenue qualifying exam for circle officers.
संवर्गातील प्रवेश दिनांक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.48 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3