जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

१३-२-२०१४ पासून राज्यातील महसूल कर्मचारी व अधिका-यांचा प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप आहे. आपल्याकडील अधिकारी यात सहभागी होणार आहेत,याबाबत आपली भूमीका काय आहे. कृपया कळवावे.

Question by Prashant Wakare
28-01-2014
prashantwakare@gmail.com

Dear Sir
I am planning to establish Biomass Briquetting Project at agricultural land.I wish to know whether the conversion of land (NA) is required for this project OR it is exempted.
Thanks and Regards
Prashant Wakare
Mobile-9714044557
Dear Wakeriji
I have replied you earlier and has also given you mobile no .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vijay ingole
28-01-2014
vv_rt@rediffmail.com

आरआरसी प्रकरणात वसुल केलेल्‍या रकमेचे १०% वसुल केलेली रक्‍कम कोणत्‍या लेखाशिर्षाखाली जमा केली पाहीजे यांचे कृपया माहिती मिळावी व तसेच तहसिल कार्यालय किंवा जिल्‍हाधिकारी कार्यालयात जमा केली पाहीजे यांचेसुध्‍दा माहिती मिळावी
वसुल केलेल्या आर आर सी पैकी 10% रक्कम घेण्याबाबत सध्या तरतुद लागु नाही.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

सर, मला जमीन अकृषिक करायची आहे ती जमीन महसुल अधिनियम १९६६ कलम ४४अ या पद्धतीने तर ती कशी करायची माहिती हवी आहे . धन्यवाद .
Unless the land you intend to purchase falls in the category asmentioned in section 44 A , it cannot get deemed NA status . Otherwise you can apply under section 44 .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mohan
28-01-2014
mohanmsutar@gmail.com

साहेब
मी अत्यंत गरीबप्रकल्पग्रस्त कुटुंबातील सदस्य आहे . आमचे शेत जमीन १९९७ मदे भूसंपादन झालेले आहे.त्यावेळी आमचे आजोबा निरिक्ष्रर असल्याने आमचे सर्व शेत जमीन बागायत होते .सदर ७/१२ उतार मदे जिरायत नोंद असलेने जिरायत म्हणून मोबदला स्वीकारण्यासाठी नोटीस काढण्यात आले. आम्ही ते स्वीकारण्यात आले नसुन त्याबाबत मार्च २००० मदे मुंबई हाय कोर्टात ३०० शेतकरी सोबत याचिका दाखल केले . त्यमदे २५० शेतकरी ८० टक्के मोबदला घेतले होते. ५० टक्के काही नाही घेतले . २५० शेतकर्यांनी त्यांना वाटेल तसपैसे देऊन न्याय पदरात पडून घेतले.आमचे पूर्ण शेत जमीन भूसंपादन झाल्याने आमचे दुसरे काही उत्पन्न नसल्याने त्याबाबत काही पाठ पुरव केले नाही .भूसंपादन करते वेळी मी ७वि वर्ग मदे शिकत होते. आमचे आजोबा वडील काका निरक्षर असल्याने .पैसे नसल्याने आम्ही काहीही करू शकले नाही. दिसेम्बेर २०११ मदे हाय कोर्टाने दिलेले निर्णयानुसार भूसंपादन विभागाने नोटीसा दिले ते नोटीस स्वीकारण्यात आले असून १२ एकर शेत जमीन साठी जुन्या बाजार भाव प्रमाणे ५०००००/ पैसे मंजूर करण्यात आले . आम्हाला पैसे नकोय आम्हाला तेवढे शेत जमीन हवाई त्यासाठी मार्गदर्शन द्यावे कारण पैसे घेतलेले शेतकरी बरोबर निकाल देनेत आलेले आहे. आम्ही काही पैसे न घेतल्याने आमचे शैक्षनिक नुकसान झालेले आहे.शैक्षनिक अर्हता कमी असल्यास नोकरीसाठी अर्ज सुद्धा करतयेत नाही .आमचे थोरला भाऊ २००१ मदे प्रकल्पग्रस्त दखल कादले असून त्यांना २००९ मदे नोकरी मिळाली . सदर २००१ मदे मी १०वि वर्गात शिकत होते. त्यानंतर पैसे नसल्याने माझे शैक्षनिक नुकसान झाले शासनाने पूर्ण भूसंपादना झालेले प्रकल्पग्रस्त कुटुंबातील सदस्यांचे शैक्षनिक अर्हते मदे सूट देनेचे तरतूद आहे काय?काही पैसे नघेतलेने शेत जमीन मिळवण्याचे तरतूद आहे काय? व प्रकल्पग्रस्त कोट्यात नोकरी लागलेले कर्मचाऱ्यांना पूर्ण भूसंपादना झाल्यास सद्य kahi शेत जमीन नसल्यास हमी पत्रावर पदोन्नतीसाठी अर्ज करण्याचे तरतूद आहे काय? माहिती सर्व वाचून मार्गदर्शन द्यावे विनंती .

Question by वंदना maske
27-01-2014
ntesrpbn@gmail.com

संरक्षित कुल असताना हि संरक्षित कुलास जमिनीतून बेदखल करता येते का ?
माझ्या वडिलांनी १९८५ साली ४ घुन्ते जमीन घेतली ४ घुन्त्यच्य मधोमध घर बांधलेले आहे त्याची घरपट्टी व पाणीपट्टी वडील भरतात पण ती जागा अजून नावावर करून घेतलेली नाही.पण आत्ता तो मालक नावावर करून द्यायला तयार आहे पण तुकडा बंदी प्रमाणे ४ घुन्ता नावावर होत नाही? तर काय करावे आपल्या नावावर ४ घुन्ता जमीन होण्यासाठी ?
१.आपले कब्जे हक्कास अडथला आणू नये म्हनून न्यायालयात दावा दकहल करता येऊ शकते.
२. नमुना ८ वर जर मुल मालकाचे नाव कायम असेल व मालक नावाने करून देण्यास तयार असेल तर नमुना ८ च्या आधारे इमल्याची विक्री (घराची) करून घेत येईल .

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

आपणास प्रचलित पद्धतीने जागा नावावर होणे शक्य नाही. मात्र १९८५ पासून तुकडे बंदी कायद्याचे अनुषगाने जमीन २० वर्षे होऊन न हि संपादित/ताब्यात घेतली नसल्याने , आपले तबेकब्जस अडथला आणू नये असा दावा न्यायालयात दाखल करता येउल का याचा वकील सल्ल्याने विचार करावा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वाटणी पत्र नोंदणीकृत नसून तो ५ साक्षदरांचे समक्ष सहहिस्से दारांनी लिहून घेतलेले असल्यास फेरफार घेता येईल काय?
हटकत नाही. सह हिस्से दारांना हरकत नसल्यास नोंदणीकृत वाटणी पत्राची गरज नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by balaji
27-01-2014
www.abdarerokrt@rediffmail.com

माझ्या वडीलानी आईचा नावाने तीन एकर जमीन १९८३ ला घेतली( खरेदीखताने) सातबरा व आठ अ वर ही दिला, पण भुमापन , गट नं. दिला नाही व आज सातबरा दुसर्याचा नावे आहे . त्यामुळे तीनदा मोजणी करुन घेतली .फाऴणी बाराचा आमल करुन मिऴवण्यासाठी काय करावे ?
प्रश्न सविस्तर माडवा.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by balaji
27-01-2014
www.abdarerokrt@rediffmail.com

माझ्या वडीलानी आईचा नावाने तीन एकर जमीन १९८३ ला घेतली( खरेदीखताने) सातबरा व आठ अ वर ही दिला, पण भुमापन , गट नं. दिला नाही व आज सातबरा दुसर्याचा नावे आहे . त्यामुळे तीनदा मोजणी करुन घेतली .फाऴणी बाराचा आमल करुन मिऴवण्यासाठी काय करावे ?
सर,
माझ्या वडिलाची पंधरा एकर शेती आहे व मी ऐकच मुलगा असल्यानी त्या मधील आर्धी शेती माझ्या नावावर करण्यासाठी registry करावी लागेल कि १०० रुपयाच्या स्टंप paper वर watnipatrak केले तर चालेल.कृपया मार्गदर्शन करावे.
आपले वडील अर्धी शेती नोंदीकृत बक्षिसपत्र करून आपले नावे करू शकतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी जिल्हा परिषद येथे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे व मला डिप्लोमा सिविल इंजिनीरिंग ला प्रवेश घ्यायचा आहे. यासाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागेल तसेच हा डिप्लोमा पूर्णवेळ आहे पण मी केवळ परीक्षेला ४ दिवस जाणार आहे व लिपिक नोकरी सोडणार नाही. याबाबतीत पूर्णवेळ शिक्षण व पूर्णवेळ नोकरी परवानगी आहे का? पूर्णवेळ शिक्षण घेत असताना मी शासकीय कामात कोणताही अडथला येणार नाही याची हमी पत्र देईन.
कृपया मला मार्गदर्शन करावे हि विनंती.
आपल आभारी
आपले विभाग प्रमुखांची परवानगी घेणे आवश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रेश्नाचे उत्तर दिल्या बद्दल धन्यवाद सर. माझे वडीलांचे नावे असलेली जमिन ही 1992 पासुनची आहे. तसेच जमा पावती ( जमिन कर) माझ्या वडीलांचा नावाने 1992 पासुन आहेत. तर 21 वर्षे ती जमिन माझे वडील करित आहेत.ज्या वेळेस माझे वडीलांच्या नावे जमिन करण्यात आली.त्या वेळेस त्यांना एवढेकही समजत नव्हते.कारण ते आडाणी आहेत.तसेच ज्यांचाकडुण जमिन घेतली तेही आडाणीच होते त्या काळातील ही फेरफार केवळ विश्वास ठेवुनच झालेली आहे.पण आज सर्व सुशिक्षित आसल्याने कायद्याचा आधार घेतात. या स्थितित ती जमिन मुळ मालकाकडे परत जाऊ नये या साठी काय करता येईल? कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद.
आपण अथवा आपले वडील जमीन कसत असल्यास , चुलत्यांनी अडथला केल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची वडिलोपाजीत जमीन आहे आमचे आजोबांचे निधन झाल्या नंतर आमच्या मोठया चूलत्यांच्या जमीन त्यांच्या नावावर झाली आमच्या आजोबाना ६ मुले ३ मुलगे ३ मुली असे असतानाही फ्क्त मोठया काकाणच्या नावावर जमीन झाली पण आता मोठे काका मृत्यू पावले आहेत तर आता आमच्या वडिलांचे व अन्य काकाणचे नाव सात बरावर् कसे लावायचे याची माहिती देणे
मोठ्या काकांचे नाव एकत्र कुटुंब पुढारी म्हणून दाखल असेल. प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्र ३९ दिनांक २१ जूर्ले २०१२ कुळकायद्यातील जमिन विक्री साठी परवानगी ची गरज नाही यासबाबतचे पत्र शासन निर्णयामध्ये समाविष्ट नाही. उपलब्ध करुन या वेबसाईटवर प्रसिध्द करणेतयावी हि विनंती
आपला संजय वळवी . नायब तहसिलदार कोल्हापूर

Question by Prashant Wakare
23-01-2014
prashantwakare@gmail.com

Dear Mr Kiran Panbude
Sir, this is with reference to your reply to my query (dated, 20-01-2014).I think, I have not given sufficient information and elaborating the same now.I am planning to establish biomass briquettes manufacturing project at my own agricultural land situated at Village-Pilkapar, Tahsil-Kalmeshwar, Dist-Nagpur.I have approached bank for loan, they told me that my agricultural land is to be converted to non-agriculture(NA), then only they will process my loan application form.Now as per my knowledge and understanding there are two options [1] to apply under normal NA procedure which is very complex, time consuming and requires professional help (agent) who charges huge amount, which I can't afford and want avoid it [2] to apply under section-44A, which states that no permission required for bonafide industrial use of land subject to fulfillment of certain conditions.For me this procedure is convenient and also it is acceptable to bank(Bank just want sanad for NA for biomass briquettes manufacturing project).Requesting you kindly suggest accordingly.My contact no. is 9714044557(Baroda).It would be very nice if you share your contact no., I shall contact you over phone to resolve/discuss, doubts/queries.Requesting you kindly suggest accordingly.
Thanks and Regards
Prashant Wakare

Question by Prashant Wakare
20-01-2014
prashantwakare@gmail.com

Dear Mr Kiran Banbude
Sir, this is with reference to your reply to my query(dated 6-1-2014).The agricultural land available is not under industrial zone, kindly suggest accordingly
Thanks and Regards
Prashant Wakare
If the land is not situted within the industrial zone or agricultural zone where industrial use is not permissible , then you can not purchase land under section 63-1A . You will have to apply to Collector under section 63 of the act.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अव्‍वल कारकून पदावर अनु.जातीच्‍या बिंदुवर पदोन्‍नती मिळाल्‍यानंतर अपंगत्‍व प्राप्‍त झाल्‍यानंतर संबधीत कर्मचा-यास अपंगाच्‍या अव्‍वल कारकून पदाच्‍या पदोन्‍नतीमधील राखीव बिंदु मध्‍ये भरलेले आहे.असे आस्‍थापनेकडून दाखविण्‍यात आलेले आहे.एकाच कर्मचा-यांस एकाच पदावर वेगवेगळया स्रवर्गातून पदोन्‍नती दिलेली आहे असे दाखवता येईल का.कृपया असल्‍यास आदेशाची दिनांक मिळण्‍यास विनंती आहे.

Question by shastri
17-01-2014
nt27567@gmail.com

जिल्हाएधिकारी हे पद जिल्हाशदंडाधिकारी असल्यालबाबतचे राजपत्रची प्रत पाहिजे आहे ती कोठे व कशी मिळेल कृपया मार्गदर्शने करावे प्रत उपलब्धस असल्या स दिलेल्या मेल आय डी वर मिळेका का
सर
मला हे विचारायचे की,माझा वडीलांच्या नावे आसलेली जमीन ही माझे चुलत काका यांच्या कडुन विकत घेतली आहे पण फेरफार ही चुलतभाऊ अशी आहे. १९९२ पासुन ७/१२ माझा वडीलांचा नावे आहे. पण आज त्या जमीनिच्या मुळ मालकांनी ती जमिन परत घेण्यासाठी आमच्यावर खटला चालवला आहे की हे आमचे नातेवाईक नाहीत. तर ती जमीन त्यांच्याकडे परत जाईल का? नविन शर्तिची आसल्याने त्याची पट वगैरे भरलेली नाही. तसेच कोणताही प्रकारचा स्टॅंप लिहीलेला नाही. मुळात मझ्या कांकानीही स्टॅंप लिहीलेला नाही. कृपया मार्गदर्शन करावे
नवीन शर्थीची जमीन विना परवानगी हस्तांतरित करता येत नाही . तुमच्या काकांनी कायदेशीर प्रक्रिया सुरु केल्यास व जमीन केवळ तोंडी वर्दीने आपले वडिलांचे नावावर झाली असल्यास , कदाचित पुन्हा जमीन काकांचे नावावर होईल. तथापि मुदत कायद्याचा आधार घेऊन व adverse possession चा आधार घेऊन काही करता येते का , याचा विचार करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

लेखापाल या पदाची पाञता मिळणे बाबत
लिपीक संवर्गातून अव्‍वल कारकून पदावर पदोन्‍नती झाल्‍यानंतर एखादा कर्मचारी अपंग झाला तर त्‍यास अव्‍वल कारकून पदावर पदोन्‍नती दिलेले आहे असे दाखविता येईल का. किंवा पदोन्‍नतीसाठी आरक्षण पुढील पुढील पदावर नायब तहसिलदार पदास पात्र असेल याबाबत मा्र्गदर्शन होणेस विंनती आहे.
अपंगांना वर्ग-2 व पुढील पदोन्‍नतीसाठी आरक्षण नाही, परंतू अपंग आहे म्‍हणून पात्र कर्मचा-यास नियमानुसार इतरा प्रमाणे पदोन्‍नती मिळेल त्‍यास डावलले जाणार नाही

Reply by रामदास के कोळगने | नायब तहसीलदार

सर कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार संरक्षण अधिकारी हे पूर्वी तहसीलदार होते पण आता हे अधिकार कोणाला दिले आहे. cdpo यांना ते अधिकार दिले आहे का
कृपया या शंकेचे निरसन करावे.
या बाबत काही शासन निर्णय अगर परिपत्रक असेल तर त्याबाबत माहिती द्यावी
एकात्मीक बालविकास अधिकारी हे संरक्षण अधिकारी म्ह्णुन सध्या काम करतात्

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by devendra
13-01-2014
jyotitandel82@gmail.com

सर
प्रश्नाचे उत्तर दिल्या बद्दल धन्यवाद
सदर जमिनीच्या पिक पाहणीवर कुल म्हणून माझ्या आजोबांची नोंद नाही परंतु १९३० सालीच्या आकारफोड नुसार कब्जेदार माझे आजोबा आहेत व आज पर्यंत धारा देखील आम्ही देत आहोत तर अम्या आजोबांची कुल म्हणून नोंद करण्यासाठी काय करावे लागेल याचे मार्गदर्शन करावे
पण कब्जेदार असताना कुल होण्यात अथवा कुल म्हणून नाव लावण्यात अर्थ काय ? कदाचित पिक पाहणी सदरी नाव लावणे बाबत आपला प्रश्न असावा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मला लेखापाल या पदाची पाञता व माहिती विचायरावयाची आहे.

This page was generated in 0.41 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3