जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by atul
10-02-2014
ambhorea@yahoo.com

नवीन गौण खनिज अधिनियम 2013 नुसार तहसिलदार 500 ब्रास पर्यंत गौणखनिजाची परवानगी देवू शकतात

तर एखादी स न xyzजमिनी 4 ते 5 व्‍यक्‍तीची नावे असलेल्‍या जमिनीत एका व्‍यक्‍तीस 500 ब्रासची परवानगी दिली आहे परंतू आता त्‍याच जागेत त्‍यांचेचपैकी दुसरा व्‍यैक्‍ती 500 ब्रास माती उत्‍खननाची परवानगी मागत आहे तर त्‍याच जागेत तशी परवानगी देता येईल काय
?
जागा एकच असुन 4 ते 5 व्‍यक्‍तीची नावे सह हिस्‍सा म्‍हणुन आहे
जागा जरी ४-५ लोंकाचे मालकीची असली तरी , त्यांचे हिस्से निशित असतात. अन्य सह धारकांची संमती असल्यास परवानगी देण्यास हरकत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी मौजे दोडी खु ,ता सिन्नर,जि नाशिक येथील रहिवाशी आहे .येथील शेतजमीन गट नं ४६३ हा भिका गणू सुतार यांच्या नावावर असून ते मयत आहेत सदर जमिनीवर माझे पणजोबा पासून आमचा कब्जा आहे .सन १९३४ पासून सदर जमीन आमच्या काब्ज्यात असून जमीन कसणाऱ्या ठिकाणी माझे पणजोबा आजोबा व आता माझे वडील याचे नाव आहे .सदर मूळ मालक भिका गणू सुतार हा पूर्वी पणजोबा असताना मयत झालेला असून त्याची मयत नोंद पण भेटत नाही तरी पिक पाहणी सादरी पणजोबा ,आजोबा ,अ आता वडिलांचे नाव आहे सदर जमीन आम्हाला आता मालकी हक्क मिळण्यासाठी काय करावे लागेन. आम्ही कुळकायदयाने अर्ज दिला होता पण कुळकायदा बंद झाला आहे असे सांगितले . तरी सदर जमीन आम्हाला मालकी हक्काने मिळण्यासाठी काय करावे लागेन किवा कुठल्या कायद्या ने मिळेल .
िवाणी न्यायालयात दावा दाखल करा. adverse possession ने आपण मालक जाहीर होऊ शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by madhav n mule
09-02-2014
madhavnmule@gmail.com

नैमीतीक सत्ता प्र कार महनजे काय
कुळ कायद्याच्या जमीनीला आता परवानगीची आवश्यकता नाही काय सविस्तर माहीती मिळावी
१० वर्षे किव्वा त्यापेक्षा जादा वर्षापूर्वी कुल मालक झाला असल्यास परवानगीची गरज नाही. नुकतेच सुधारणा कायद्यास म. राष्ट्रपती यांनी समती दिली आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ravi
09-02-2014
virravi3@gmail.com

सरकारी शेतजमीनीवरील पट्टेदारास कुळ म्हटले जाते काय आणि त्याला नियमानुसार किती वर्षांनी ती जमीन नियमीत करण्यात येते
सरकारी जमिनीवरील पत्तेदारास कुल म्हटले जात नाही. कलम २(४०) म.जा.म. अ. १९६६

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mo
08-02-2014
mohanmsutar@gmail.com

सर
मी प्रकल्पग्रस्त कुटुंबातील आहे. १९९७ मदे आमचे १हे.१३आर व ३हे.१५आर जमिन संपादित झालेले आहे.त्यावेळी आम्हाला योग्य नुकसान भरपाई मिळाले नसलेने पैसे घेनेत आलेले नाही.त्याबाबत सर्व शेतकरी सोबत कोर्टात याव्हिक दाखल केले होते..त्यमदे पैसे घेतलेले शेतकरी जास्त असलेने मुंबई हयकोरत डेक २०११ पैसे घेणेबाबत १२ नंबरचे नोटीस देण्यात आले . आम्ही कोर्टाकडून मुक्त करून घेण्यासाठी नोटीस घेतले असून .क्षेत्र जमीन मदे २०१२ शासन नाव नोंद झालेले आहे. ४हे २८ आर साठी ५०००००/ कोर्टाकडून मंजूर झालेले आहे सदर त्यपैसे मदे शेत तेवढे शेत जमीन मिळत नाही.त्या कारणाने पैसे ऐवजी शेत जमीन घेणार आहे .त्यावेळी अर्ज करण्यासाठी आमचे आजोबा काका va आमचे वडील निरक्षर अल्पभशिक आणि ोळ्यांनी अपंग असलेने त्याबाबत पाठ पुरव केले नाही.आता आमचे दुसरे शेत जमीन देशात कुठेहि नाही. सदर आम्हाला शेत जमीन घेनेसाथि कराव कारण कोर्टाकडून योग्य न्याय मिळाले नसलेने त्याबाबत अपील करण्यासाठी आमचे पैसे नसलेने १७ वर्ष पासून अत्यंत कठीण जीवन जगात आहे.जमीन संपादन होऊन १७ वर्ष जाले. आम्हाला पैसे एवजी शेत जमीन मिळेल त्याबाबत आम्हाला त्यावेळी स्र्वे३ करणारे अधिकारी किंवा कोणाही मार्फत माहिती मिळाले नसलेने अडचणीत सापडलेले आहे . शासनाने या गरीब कुटुंबाना उचलून धारणेचे मार्ग सांगावे. विनंती.
जल संपदा प्रकल्पासाठी जमीन संपादन झाली असल्यास , लाभ क्षेत्रात जमीन चे बदल्यात पर्यायी जमीनदेण्याची तरतूद आहे.
अन्य संपादनासाठी अशी तरतूद नाही.
आपण नुकसान भरपाई स्वीकारणे सयुक्तिक आहे.
म.ज.म. आ १९६६ अन्वये जमीन मागणी करा. मात्र आपणास जमिंची भोगवटा किंमत भरावी लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१.मदत माश व खिदमत माश यात काय फरक आहे.
2मश्रुतल माश काय आहे
३.मदतमाशइनाम abolation कायद्या खाली खालसा होते का ?
४ .मुतवलि च्या ताब्यात जमीन नसेल तर विरासत मंजूर करता येईल का?
sir
My friend Kishor Jadhav is establishing his two stage individual lift irrigation scheme project for his agricultural land.He has just completed his stage 1of the scheme with the help of finance given by ratnakar bank ltd.MSEB has approved the electricity connection for his first stagefor lifting water form river.Now for 2nd stage finance again he needs the electricty connection and he applied for the same to elctricity board but the board has withhold his application based on new GR dated 29Jan2014.for single user lift irrigation scheme.its been ayear he is working on project bbearing financial loss due to delay in work because of the permissions needed from mseb.her we request your guidance in this matter as he want to complete the project at the earliest
thank you
संदीपजी , महसूल विषयाशी संभांदातीत प्रश्नांना उत्तरे दिली जातात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by MADHAV N MULE
07-02-2014
MADHAVNMULE@gmail.com

आदीवासी लोकांच्‍या एकत्र कुटुबातील शेतीचे आपसात हीसेवाटणी करण्‍यासाठी कोणाची परवानगी घ्‍यावी लागेल काय
परवानगीची गरज नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शासकीय कर्मचा-यासाठी एका वीभागातुन दुस-या वीभागात mutual बदली पाहीजे असल्‍यास mutual बदलीने येना-या व जाना-या कर्मचा-याचे बदलीसाठी प्रवर्ग एकच पाहीजेत का
गरज नाही, दोन्ही विभागात असलेली रिक्त पदावरून अॅडजस्ट केले जाऊ शकते

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

धन्‍यवाद पानबुडे सर
परंतु अ नावाची व्‍यक्‍तीस बांधकाम दुर करणेसाठी व तसेच अकृषिक वापराबाबतची दंड भरणेसाठी नोटीस दिली असता ते सागंतात की, सदरचा वापर मी करत नसुन ब नावाची व्‍यैक्‍ती करत असल्‍याने सदरचा दंड त्‍यांचेकडुन घेणम यावा व तसेच बंाधकाम दुर करणे बाबत ब नावाची व्‍यक्‍ती म्‍हणते की, अ व ब माझयात करार झाले आहे तरी याबाबत मार्गदर्शन मिळावे
कायदेशीर प्रक्रिया सुरु करा. अ लाच notice देणे आवश्यक आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रति, किरण पाणबुडे सर

कृपया मार्गदर्शन व्‍हावे.

महसूल विभागात लिपीक संतर्गातून अ.का. संवर्गात पदोन्‍नती मिळाल्‍यानंतर वेतननिश्‍चीती बाबत मार्गदर्शन व्‍हावे.
लिपीक पदावर वेतन रुजु 6820 (ग्रेड पे 1900)
अ.का. पदावर रुजु 24/01/2014
अ.का. ग्रेड पे 3500
सरळसेवा अ.का. पदावर नियुक्‍ती झाल्‍यास मुळ वेतन 8920 (ग्रेड पे 3500) तर उपरोक्‍त प्रमाणे पदोन्‍नती झाल्‍यावर मुळ वेतन किती ?

Question by अतुल
07-02-2014
ambhorea@yahoo.com

नवीन गौण खनिज अधिनियम 2013 नुसार तहसिलदार 500 ब्रास पर्यंत गौणखनिजाची परवानगी देवू शकतात

तर एखादी स न xyzजमिनी 4 ते 5 व्‍यक्‍तीची नावे असलेल्‍या जमिनीत एका व्‍यक्‍तीस 500 ब्रासची परवानगी दिली आहे परंतू आता त्‍याच जागेत त्‍यांचेचपैकी दुसरा व्‍यैक्‍ती 500 ब्रास माती उत्‍खननाची परवानगी मागत आहे तर त्‍याच जागेत तशी परवानगी देता येईल काय
?
जागा एकच असुन 4 ते 5 व्‍यक्‍तीची नावे सह हिस्‍सा म्‍हणुन आहे
परवानगी देण्यास हरकत नाही . अन्य सह धारकांची समती घेणे उचित.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अ व्‍यक्‍तीला भूकंपग्रस्‍त प्रमाणपत्राच्‍या आधारे वर्ग क ची शासकीय नोकरी मिळाली तर वर्ग क च्‍या इतर शासकीय नोकरीसाठी त्‍याच व्‍यक्‍तीला त्‍याच प्रमाणपत्राचा लाभ मिळेल काय ?
प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्राचे आधारे एकदाच (आरक्षणाचा ) नोकरीचा लाभ घेत येतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ravi
06-02-2014
virravi3@gmail.com

१. शेत वहीती ७ ब बाबत शासन निर्णय क्रमांक देण्याची कृपा करावी ?
२. शेतकरी नसलेल्या व्यक्तीस कुलाची जमीन विकत घ्यायची असल्यास सध्या परिस्थितीत त्याचे उत्पन्न किती पाहिजे ?
.३ भोगवटादार वर्ग २ च्या शेत जमिनीस ७ ब लागू होतो काय बाबत शासन निर्णय ? कृपया प्रतिसाद द्यावा
महाराष्ट्र जमीन महसूल ( अधिकार अभिलेख ) तयार करणे नियम , या मध्ये विस्तृत तपशील दिलेले आहे.
कलम ६३ अन्वये बिगर शेकरी व्यक्तीचे अन्य मार्गांनी होणारे उत्तपन्न १२००० पेक्षा जादा आसू नये.
कुलाची जमीन म्हणजे नियंत्रित सत्ता प्रकार जमिनीची विक्री परवानगी कलम ४३ अन्वये दिली जाते त्यास उत्त्पन्न अट नाही.
भोगवटादार २ म्हणजे शर्तीने दिलेली जमीन. या मध्ये ज्यास जमीन दिलेली आहे त्याने कसणे आवश्यक . भोगवातादाराशिवाय अन्य व्यक्तीने जमीन कसल्यास शर्थ भंग होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जर एखादी जागा अ नावाच्‍या व्‍यक्‍तीची आहे व तदनंतर अ व ब नावाच्‍या व्‍यक्‍तीचा करारनामा दोघात होऊन ब नावाच्‍या व्‍यक्‍तीने त्‍या जागेत कारखाना टाकुन अनधिकृतपणे अकृषिक वापर चालु केला आहे तर अनधिकृत अकृषिक वापराबाबत दंडाची कारवाई व तसेच सदरचे बांधकाम निष्‍काषित करणेची कार्यवाही करणेसाठी कोणाला नोटीस दिली पाहीजे म्‍हणेजेच अ व्‍यक्‍तीला की ब नावाच्‍या व्‍यक्‍तीला इत्‍यादी मार्गदर्शन मिळावे
प्रमाणित दस्त झालेनंतर त्याची फेर फार नोंदणी करताना विक्री करणारा भोगवटादार फेर फार नोटिशी ला हरकत घेऊ शकतो का?
रात्रीची वाळूचोरी पकडण्यासाठी महसूल अधिकारी कर्मचारी यांना आदेशित करू नये अथवा बंधनकारक करू नये असा मा उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरने एका खटल्यात निर्देश दिले हे खरे आहे का? कृपया प्रत पाठवावी.
माहितीचा कायदा अन्वये बीपीएल खालील इसमाला माहिती देताना जी माहितीची रक्कम आधीच निश्चित केली असेल आणि त्याने साधा अर्ज केला असता तरी त्याला ती माहिती उपलब्ध झाली असती तर अश्या इसमाला ती माहिती मोफत द्यायची का
आणि जर त्या कडून फी घ्यायची असेल तर त्याचा शासन निर्णय किवा नियम आहे का
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या अंतर्गत अर्ज केला नसेल तर, इतर बाबतीत बी. पी. एल. धारकांना नक्कल फी अधिनियमाच्या तरतुदी लागू होतील.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

सदर माहिती मोफत द्यावी.....

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

महसुल विभागात लिपीक संवर्गातून अव्‍वल कारकून संवर्गात पदोन्‍नती मिळाल्‍यानंतर वेतननिश्चिती बाबत मार्गदर्शन व्‍हावे.
लिपीक पदावर वेतन 6820 ग्रेड पे 1900
अव्‍वल कारकून पदावर रूजु 24/01/ २०१४
अ. का. ग्रेड पे 3500 आहे . सरळसेवेद्वारे अ. का. पदावर नियुक्‍ती झाल्‍यास मुळ वेतन 8920 ग्रेड पे 3500 तर उपरोक्‍त प्रमाणे पदोन्‍नती झाल्‍यास मुळ वेतन किती असावे, याबाबत मार्गदर्शन व्‍हावे.
लिपिक पदावरील वेतन = ६८२०+३५०० =१०३२०. अव्व्वल कारकून पदावरील वेतन =१०३२०*३%=३१० +६८२०=७१३०. म्हणून मूळ वेतन ७१३० होईल व महसुल विभागामध्ये अ.का या पदाची सरळ सेवेने निवड होत नाही.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

धन्यवाद , श्री. किरण पानबुडे साहेब,
महोदय श्री. किरण पानबुडे साहेब,
मला माझ्या पडीक जमिनी मध्ये साया , आंबा , काजू , जांभूळ हि झाडे लावायची आहेत. तरी त्यांचे बियाणे व रोपे कोठे भेटू शकतात या बद्दल कृपया माहिती द्याल का ?
कृपया मला मार्गदर्शन करावे हि विनंती.
आपला आभारी
संदीप मोरे
संदीपजी या संकेतस्थळावर mahsul विषयाशी nigdit प्रश्नांची उत्तरे दिली जातात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

धन्यवाद , श्री. किरण पानबुडे साहेब,
तगाई शेर व सहकारी सोसायटी इकरार बोजा ७/१२ वर असल्यास तो कसा काढतात या बद्दल माहिती द्याल का ?
तगाई कर्ज माफ करण्यात आलेले आहे . असे शेरे काढून takne बाबत जुना शाषण nirnay आहे. तहसीलदार यांचे कडे arja करावा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mohan
31-01-2014
mohanmsutar@gmail.com

महोदय
आमचे आजोबांचे नावार असलेले सन. २५५/२अ १.हे १३आर व २५६/२अ ३हे १५आर या दोन्ही सन. चे शेत जमीन १९९७ मदे भूसंपादन झाले असून दोन्ही सन मिळून एकच प्रकल्पग्रस्त दखल काढण्यात आलेले आहे .आता सनम २५५/२अ पैकी ९० आर शेत जमीन उरलेले आहे.सदर जमीन आमचे वडील व दोघ काकांचे नावावर ३०-३०-३० तिघांचे नावावर ७/१२ उतार मिळतात .उतार नमुना ८ तिघांचे नावावर आहे. त्यामदे पण प्रत्यक उतार मदे तिघा जनाचे नाव येतात जमीन ल .पा.मदे संपादन झाले असलेने उरलेले जमीन पैकी २० आर पर्यंत जमीन वारंवार पाण्याखाली जातात .ते जमीन आम्हाला कसनेसाठी येत नाही,भूसंपादन झाल्यापासून आमचे नुकसान होत आहे . आणी आम्हाला वाराव्वर पाण्याखाली जाणार जमीन चे प्रकल्पग्रस्त दखल मिळवण्यासाठी व त्याबाबत पाठ पुरव कोणते कार्यालयाकडे करायचे त्याबाबत माहिती मिळावे. विनंती
आपले ऐकून जमिनीपैकी काही जमीन संपादित झाली असून उर्वरित जमीन जी आपले नावावर आहे ती पाण्याखाली जात आहे. पाण्याखालील जमीन संपादित झाल्याशिवाय आपणास प्रकल्प ग्रस्त दखल मिळणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री रामदास सायगावकर सर ,
माझे गाव - बोरावळे तालुका - पोलादपूर , जिल्हा - रायगड आहे. माझे पंजोबा श्री लक्ष्मण जानू मोरे यांनी शेतजमिनीवर सावकार सुंदर गांधी यांच्या मदतीने १९६३ मध्ये शासकीय तगाई कर्ज घेतले होते त्या कर्जाची रक्कम व व्याजासकट ३०/३/१९९४ मध्ये भरली गेली आहे . आमच्या कडे शासकीय तगाई कर्ज भरलेली प्रत हि आहे . परंतु त्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्या मध्ये भोगवटदार म्हणून सावकार सुंदर गांधी यांना दाखवले जाते व इतर अधिकार मध्ये ज . मा. अज्ञान (२१९२) वि . तहकूब कुळाचे नाव , संरक्षित कुळ , श्री लक्ष्मण जानू मोरे, रामा ,शिवराम, अंबाजी ,बोजा सहकारी सोसायटी इकरार घागरकोंड चा (२२५७) असे येते.
माझे ७/१२ उतारा नंबर आहेत १७/८ , २५/१० , ३२/२३ , ५७/१६ , ६५/२ , ६६/२, ६९/२ तसेच एका ७/१२ उताऱ्यावर वेबसाईट वर गट क्रमांक -μÚ.È./1 , खाते क्रमांक - २५९ , फेरफार नंबर - २०७० असे दाखवले जाते. शेत जमीन आमच्या नावावर करण्यासाठी काय करावे लागेल
कृपया मला मार्गदर्शन करावे हि विनंती.
आपला आभारी
संदीप म. मोरे
आपण तहसीलदार पोलादपूर यांचेकडे अर्ज करावा. कुल अज्ञान असल्याने ३२ ग किंमत ठरवलेली नाही. कुल अज्ञान आहे म्हणून tillers day पुढे जात नाही. अन्य कुलप्रमाणे असा कुल मानीव खरेदीदार होतो.
तगाई कर्ज आणि कुल कायदा याचा सम्भन्द नाही. तगाई शेर ७/१२ वर असल्यास तोही काढून तक्ता येऊ शकतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.38 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3