जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Satish Bhutekar
23-02-2014
sbhutekar@rediffmail.com
औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार दि ०१ फेब २०१४ पासून आपसातील वाटणी पत्रकानुसार फेर घेण्यासाठी वाटणी पत्र नोद्निक्रुत करण्याची अट रद्ध करण्यात आल्या बद्दल परतेक तहसीलदार यांना कळवण्यात आलेले आहे. व यापुढे वाटणीचा फेर रु १०० च्या बॉन्ड वर करून घेण्याचे निर्देश दिलेले असताना हि परभणी जिल्ह्यातील तलाठी व मंडळ निरीक्षक वत्निपत्रक नोंदणीकृत करण्याची सक्ती करत आहेत.तरी त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.
तलाठी व मंडळ निरीक्षक वाटणी पत्रक नोंदणीकृत करण्याची सक्ती करत आहेत म्हणजे काय? वाटणी पत्रक नोंदणीकृत करण्याबाबत फेरफार नोंदीवर निर्णय दिला असेल तर अपील करावी .
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
असि बाब असेल तर , आपण संबंदित तहसीलदार/ प्रांत साहेब / निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कडे निदर्शनास आणून द्यावी .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mahadeo dane
23-02-2014
mahadeodane444@gmail.com
सर वाटणी अथवा विभागणी करायची असल्यास तहसिलदार यांची परवानगीची आवश्यकता आहे काय ? तलाठी यांना वाटणी विभागणी करायचे अधिकार आहेत का?
वाटप करण्याचे अधिकार तहसीलदार यांनाच आहेत. म.ज.म.अ. १९६६ चे कलम ८५ अन्वये आपण तहसीलदार यांचेकडे अर्ज करावा. मात्र सह काब्जेदारांमध्ये हिस्से अथवा मालकी बाबत वाद असू नये.
तसेच आपण नोंदणीकृत दस्ता द्वारे हि परस्पर वाटप करू शकता.
हिस्सेबाबत अथवा मालकी हक्क बाबत वास असल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अरूण गुंडगळ
22-02-2014
a.gundgal@pcmcindia.gov.in
आजोबाची जमिनी, वहिवाट सदरी 1947-48, १९४८/४९ मध्ये दुस-याचे नाव लागले आहे.त्यामुळे त्याचे नाव संरक्षित कुळ म्हणून ७/१२वर इतर अधिकारात लागलेले आहे.तदुनंतर १९५१-५२ पासून खुद्द म्हणून वहिवाट लागलेली आहे. गटवारीमध्ये ५ गट एकत्रित झालेले आहेत. सर्वांचा एकच गट ७/१२ झालेला आहे. १९७०ते ८७ पर्यंत शेती पट्टी भरलेली पावत्या आहेत तसेच सोसायटी काढलेली आहे. तदनंतर १९८७मध्ये वाटप होवून ६ हिस्से पडले आहे. वाटप पत्राने माझ्या नाववर ३एकर जमीन आलेली आहे. त्यानंतर मी त्या जमीनीवर पाईपलाईनसाठी भुविकास बँकैचे १९९७मध्ये कर्ज काढले असून ते पूर्णपणे२०१३मध्ये फेडले आहे. तसेच सोसयटीकडून त्या गटनंबरवर ट्रँक्टर खरेदी केला होता. आता सुध्दा ताबा जमिनमालकाचा आहे. सं.कु. म्हणून सदर इसमाचे नाव आहे. तर ते नाव काढण्यासाठी काय करावे ?
मुंबई कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम १४ अन्वये कुल वहिवाट समाप्त करणेसाठी अर्ज करा. कुल जमीन कसत नाही या मुद्द्यावर.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by shashikant
22-02-2014
shashipakhare@rediffmail.com
mi OBC ya pravargatil ahe ani 33 varsh purna jhali ahet. mi OPEN chya post la apply karu shakato ka? OPEN chya jage sathi mala age relaxation milu shakate ka? majhe kade caste, non creamylayer ani validity ahe.
Dhanyavad
आपण खुल्या जागेसाठी अर्ज करू शकता. गुणवत्ते आधारे आपली निवड होऊ शकते. मात्र वय शिथिलता मिळणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सोनल tarte
22-02-2014
tartesonal@gmail.com
पाणबुडे सर,
आपण माझ्या प्रश्नाला तत्परतेने प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद .
आपल्यामुळे आम्हाला खुपच मदत होत आहे .
धन्यवाद .
Question by शरद जावळे
20-02-2014
sharadjawle@gmail.com
माझी उपजिल्हाधिकारी पदासाठी
निवड झाली आहे.मी सद्दा परी.नायब तहशिलदार पदावर आहे .मला उपजिल्हाधिकारी पदाचा परीविक्षअधीन कलाविधी त काही सुठ मिळते का ? ते मिळवणाकरिता काय करावे लागेल .
Question by sonal tarte
20-02-2014
tartesonal@gmail.com
sir,can we do construction in coastal regulation zone? can land near or adjacent to river will be come under auqisition by govt?
आपण तटीय क्षेत्रात बांधकाम करू शकत नाही. समुद्राच्या उच्चतम भरती रेषे पासून ५०० मीटर अंतरच्यात बांधकाम करता येत नाही. खाडी पासून १०० मीटर अथवा खाडी रुंदी एवढ्या अंतराचा आत बांधकाम करता येत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vandana dabhade
18-02-2014
vandanadabhade@gmail.com
आदिवासी जमीन कायदा
आदिवासी व्यक्तीच्या मालकीची जमीन बिगर आदिवासी व्यक्तीस हस्तांतरित करता येत नाही. त्यासाठी शाशनाची पूर्व परवानगी आवश्यक.
म.ज.म.अ . कलम ३६ अ वाचा.
तसेच विना परवाना हस्तांतरित जमीन आदिवासींना पुनर्स्थापित करणे कायदा हि वाचा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महाडीवाले के.व्ही.
18-02-2014
mahadiwalek.v2009@gmail.com
शा.क.प.पा.हो.वि.प्रति.अधिनियन २००५ हा अधिनियम कुठे मिळेल आपणाकडे असल्यास अपलोड करा किंवा ईमेल करावा. ही विनंती
Question by मदनसिंग परदेशी
17-02-2014
madanpardeshi261987@gmail.com
माननीय सर,
७/१२ ला शासकीय फी तलाठी किती आकारु शकतात व कोणत्या शासकीय नियमाप्रमाणे
प्रती ७/१२ पान ५/- शुल्क सध्या वसूल केले जाते.
महाराष्ट्र जमीन महसूल ( भूमी अभिलेख निरीक्षण , शोध आणि पुरवठा) नियम १९७०
खंड १२ सह अनुसूची अ अनुक्रमांक १.
पूर्वी २ /- शुल्क होते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
17-02-2014
mohanmsutar@gmail.com
साहेब
७/१२ उतार मदे कुळाचे नावामदे बिगर कब्जेदार वारसदर मयत झाल्यास त्यांचे नावे कमी करता येईल काय? माहिती मिळावे विनंती .
जन्मनाव व व्यावहारिक नाव ? ........
आपले शाळा अभिलेखात कोणते नाव आहे ? जन्मनाव कि व्यावहारिक नाव?
तहसीलदार यांचेकडे अर्ज करा. ......
आपला प्रश्न विस्ताराने हि मांडा
१. ७/१२ वर नाव काय आहे?
२. आपले व्यावहारिकनाव काय आहे ?
३. जन्मनाव ७/१२ सादरी लावण्याचे प्रयोजन काय होते ?
४. शाळा अभिलेखात जन्म नाव आहे का?
५. नाव बदल बाबत राजपत्रात जाहीर करण्यात आले आहे काय ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by माधव न mule
16-02-2014
madhavnmule@gmail.com
एखादया व्यक्तीचे दोन दोन नावे असतात एक जन्मनाव व दुसरे व्यवहारीक नाव
७/१२ वर आलेले जन्मनाव कमी करुन व्यवहारीक नाव कोणत्या फेरफार पध्दतीने घेता?
जन्मनाव व व्यावहारिक नाव ? ........
आपले शाळा अभिलेखात कोणते नाव आहे ? जन्मनाव कि व्यावहारिक नाव?
तहसीलदार यांचेकडे अर्ज करा. ......
आपला प्रश्न विस्ताराने हि मांडा
१. ७/१२ वर नाव काय आहे?
२. आपले व्यावहारिकनाव काय आहे ?
३. जन्मनाव ७/१२ सादरी लावण्याचे प्रयोजन काय होते ?
४. शाळा अभिलेखात जन्म नाव आहे का?
५. नाव बदल बाबत राजपत्रात जाहीर करण्यात आले आहे काय ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सोनल तरटे
14-02-2014
tartesonal@gmail.com
सर,
NA ORDER ही ठराविक मुदती पर्यतच असते का ?सदर मुदती नंतर ती ओर्डेर revise
करावी लागते का?प्रत्येक NA ORDER ला हा नियम लागू आहे काय
साधारणत: एन ए परवानगी दिल्यानंतर एका वर्शात त्याचा वापर सुरु होणे आवश्यक आहे, नाहीतर एन ए आदेश रिन्यु करुन घ्यावे लागते.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by अमोल चव्हाण
14-02-2014
amolchavhan234@gmail.com
मी दिनांक १३.५.२००८ रोजी कनिष्ट लिपिक या पदावर रुजू झलो व जुलै २०१३ मध्ये सातव्या संधीत दुय्यम सेवा उत्तीर्ण झलो आणि महसूल आर्हता अक्टोबर २०१३ मध्ये उत्तीर्ण झलो माझी सेवा जेष्ठत कोणती राहील कृपया कळवावे आपला नम्र
Question by Deepakkale472@gmail.com
13-02-2014
Deepakkale472@gmail.com
आपला प्रश्न/सूचना ...सर मी 15 वर्षापुर्वी सिलिंगची जमिन घेतलेली आहे त्याचा 30 वर्षाचा भाडेपट्टा करुन सातबारावर वहिवटदार म्हणुन नाव आहे ती जमिन खरेदी करण्यासाठी मला परवानगीची गरज लागेल का? व लागत असेल तर मला त्याविषयी माहिती द्या
Question by vijay
12-02-2014
vv_rt@rediffmail.com
गौणखनिजाचे परवाना देताना TDS चलन भरुन घेतो तर सध्या गौणखनिजाकरीता TDS चा काय रेट आहे व तसेच सेस किती घ्यावा उदाहारण १,00,०००/- करिता किती TDS घतला पाहीजे
Question by रमेश कांबळे
12-02-2014
rameshkamble152@yahoo.in
शासन निर्णय दि.०५/०३/२००४ अन्वये अंपगाच्या पदोन्नतीसाठी बिंदु क्र.१,३४.६७ आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत.क्र.०१व ६७ हे अनु.जातीसाठी राखीव आहेत. अव्वल कारकून पदी अनू.जाती प्रवर्गातून एका कर्मचा-याची पदोन्नती सन २००८ मध्ये झालेली आहे.त्यानंतर सदरचा कर्मचारी सन २००९ अपंग झाल्यानंतर त्याला अव्वल कारकून पदावर अनु जाती अपंग बिंदु पदोन्नतीने भरलेला आहे. असे दर्शविलेले आहे.तरी एकाच कर्मचा-यास वेगवेगळया संवर्गातून एकाच पदावर पदोन्नती दिलेली आहे.असे दाखविता येईल का कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
Question by संतोष जवरे
12-02-2014
jaware_sb@rediffmail.com
एका ७/१२ मध्ये दोन व्यक्ती ची नावे आहेत त्यांची दोन महसुली गावामध्ये मिळकत आहे. त्यांच्या दाव्याचा कोर्ट तून निर्णय दिला कि एका व्यक्तीला एका गावाची व दुसर्या व्यक्तीला दुसर्या गावाची मिळकत दिली. तर त्यानुसार फेरफार टाकणे योग्य राहील का?
कोर्टाच्या निर्णयानुसार फेरफार घेण्यास काहीच हरकत वाटत नाही. फक्त अपील कालावधीची मर्यादा पहा आणि निर्णयानुसारच तपशील फेरफारात ठेवा.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष जवरे
12-02-2014
jaware_sb@rediffmail.com
घरवाडा ची व्याख्या व कलम कोणती
Question by कुणाल अंकुश जाधव
12-02-2014
mr.k1387@gmail.com
जर एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा दुसऱ्या कार्यालयात वर्ग झालेली असेल तर त्यांना अतिकालिक भत्ता, गणवेश भत्ता व इतर भत्ते कोणत्या कार्यालयाकडून देण्यात यावे ? मूळ आस्थापना की सेवा वर्ग आस्थापना ?
वास्तविक सेवा वर्ग करणे हि चुकीची प्रथा आज प्रत्येक कार्यालयात दिसून येते.
सेवा वर्ग आदेशामध्ये अतिकालीम भत्ते, व इतर भत्ते मुल विभागाने द्याव्यावेत असा उल्लेख केला जातो. जरी उल्लेख केलेला नसला तरी , मुल विभागानेच भत्ते देणे आवश्यक आहे.
सेवा ज्या कार्यालयात वर्ग केलेली आहे तिथे तरतूद नसते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
जेथे प्रतींनियुक्ती आहे तेथेच मिळायला पाहिजे. वाटल्यास मूळ विभाग व प्रतींनियुक्ती विभाग हे अति व शर्ती नुसार त्याबाबत नंतर ताळमेळ /जमाखर्च घेऊ शकतात.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
जेथे प्रतींनियुक्ती आहे तेथेच मिळायला पाहिजे. वाटल्यास मूळ विभाग व प्रतींनियुक्ती विभाग हे अति व शर्ती नुसार त्याबाबत नंतर ताळमेळ /जमाखर्च घेऊ शकतात.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by dayanand thakurdas
11-02-2014
day12877@gmail.com
मला सिलिंग मधील जमीन अर्ज केलेनंतर १९७८ साली ४ एकर मंजुरीने मिळाली मला नगरपालिकेत नोकरी असल्याने खोटा अर्ज करून शासनाची दिशाभूल करून जमीन मिळाली असल्याने सदर जमीन शासनाने जमा करून घ्यावी असा अर्ज एकाने माझेविरुध्य केल्याने मला सर्कल ची नोटीस आली आहे मी जमीन १९७८ पासून कसत आहे म्हणजे ३६ वर्ष कसत आहे मी काय करावे कळत नाही
मंडळ अधिकारी यांना नोटीस देण्याचा अधिकार नाही.
आपण अर्ज करताना नगर पालिकेत नोकरीस होता का ?
नोकरीत आहे म्हणून , जमीन मिळण्यापासून आपण वंचित होऊ शकत नाही
जर आपले नावे २.५ एकर जिरायत, १.२५ एकर हंगामी बागायत / भात शेती जमीन मंजुरी वेळी असेल तरच आपणास जमीन मंजूर होऊ शकत नाही.
नोकरी हे जमीन काढून घेनेसाठी कारण असू शकत नाही
३६ वर्ष एवढ्या प्रदीर्घ कालावधी नंतर कारवाई/ कार्यवाही करता येणार नाही.
आपणास नोटीस केवळ जमीन मंजूर करणारे कार्यालय देऊ शकते. जिल्हाधिकारी/ आयुक्त. मंडळ अधिकारी नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ravi
11-02-2014
virravi3gmail.com
सर आपण दि 17.9.13 रोजीच्याक्र 23 1 च्या दिलेल्या प्रतिसादामध्येउल्लेख केलेल्या शासन निर्णय चा क्रमांक देण्याची कृपा करावी
Question by m n mule
11-02-2014
madhavnmule@gmail.com
हिंदु एकत्र कुटुंबात वडीलोपार्जीत जमीनीचे आपसात वाटणीपत्र करण्यासाठी हिंदु एकत्रा कुटुंबातील कोणती कोणती कोणती नाते ग्राहय धरली जातील
Question by माधव न mule
11-02-2014
madhavnmule@mail.com
सन 2001 वर्षी एका जील्हयातील तीन गावाचे अभयारान्यामुळे
दुस-या जील्हयामध्ये पुनरवसन झाले सदर पुनरवसीत लोकांना दीलेली जमीन आज रोजी 7/१२ अभीलेखावरती भो वर्ग 2 म्हणुन रेकॉर्डला आहे. पुनरवसीत लोकांचे पुनरवसन होउन आज 10 वर्ष पुर्ण झाले असुन सदर प्रकल्पग्रस्तांची जमीन भो वर्ग 1 होईल का ? भे वर्ग 1 होत असल्यास त्याचा GR आहे ?
Question by मदनसिंग परदेशी
10-02-2014
madanpardeshi261987@gmail.com
महोदय,
उदा.एखादा लिपीक (अबक) आंतरविभागीय बदली होऊण पुणे विभागातुन औरंगाबाद विभागात बदली झाली तर त्याला दुय्यम सेवा परीक्षा व महसुल अर्हता परिक्षा पुन्हा दयायची गरज नाही का? असल्यास कोणत्या नियमाद्रवारे किंवा कसे?
१.दिनांक २०.९.१९९० च्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार तलाठी यांना आंतरविभागीय बदली नंतर नवीन विभागात दुय्यम सेवा परीक्षा उत्तीर्ण करणे आवशक आहे. परतू लिपिक यांना या तरतुदी लागू होतात काय ? किव्वा वेगळ्या सूचना आहे ते तपासून घायाव्या.
२.महा.शा.कर्म.ब.वि.आणि शा.क.प.पा.हो.वि.प्रति.अधिनियन २००५ हा दिनांक १ जुलॆ २००६ लागू झालेला आहे त्यामुळे दिनांक १ जुलॆ २००६ पुर्वी बदल्या बाबत काढण्यात आलेले सर्व शासन निर्णय रद्द झालेले आहे.
३. दिनांक ३.६.२०११ चे शासन निर्णयाचे अवलोकन करावे.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
