जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

भूजल अधिनियम १९९३ प्रमाणे कोणत्या विहीरीला सार्वजनिक विहीर म्हणावे.
साहेब, अ गावातील एका ग्रामस्थांने पाच वर्षांपूर्वी बक्षीसपत्राने आपली जमीन ही ब गावातील सरकारी प्राथमिक दवाखान्याला दिली आहे. परंतु प्राथमिक दवाखाना हा जिल्हा परिषद मध्ये येत असल्याने जिल्हा परिषदने त्या जागेत आपल्या अनुदाने/स्वखर्चाने त्या जागेत विहीर बांधली. मात्र सध्या ब गावातील ग्रामस्थांना ती विहीर नळ पाणी योजनेसाठी देण्याचा ठराव जिल्हा परीषदने केला. मात्र मूळ मालक म्हणजे बक्षीस पत्र धारक ब गावातील नळ पाणी योजनेला विरोध करत आहे. तर मला ही नळ पाणी योजना वाद-विवाद न होता पूर्णत्वास नेण्यास मार्गदर्शन करावे ही विनंती.
ग्रामसेवक
मी एका भूखंडाचे रजिस्टर खरेदीखत 2001 ला केले होते त्याचा फेर तलाठी ऑफिस ला आपोआप नोंद होईल असे गृहित धरुन तलाठयाकडे आपल्या व्यवहाराची माहिती गेली आहे किंवा नाही याची खात्री केली नाही. दरम्यान मूळ मालक मरण पावला व त्याचे वारसांची नावे भूखंडास लागली आहेत. आता मालकी हक्क माझे नावे करण्यासाठी ही नोंद हक्क पत्रकी घेण्यांत यावी म्हणून खरेदी खताची नोंद प्रक्रिया पूर्ण केली मात्र 6 महिन्यापासून नोंद घेण्यात येत नाही. तलाठ्याकडे चौकशी केली असता तिथे जागा शिल्लक आहे का? अशी विचारणा केली जाते. जागामालकाने जागा ताब्यात दिलेली आहे. परंतु तलाठी नोंद घेण्यास तयार नाहीत. मी काय करावे ?

1)खरेदीखताची रीतसर नोंद घेण्यासाठी तलाठी/मंडल अधिकारी यांना खरेदीची कागदपत्रे तसेच इंडेक्स ई ची अनुसूची याबाबत वर्दी द्या ....त्यावर त्यांचा रीतसर आदेश घ्या .
2) आदेश नकारात्मक असेल तर प्रांत साहेबांकडे मुदतीत अपील करा

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

मी भाऊसाहेब सुकदेव गोसावी मौजे दोडी खु ,ता सिन्नर,जि नाशिक येथील रहिवाशी आहे .येथील शेतजमीन गट नं ४६३ हा भिका गणू सुतार यांच्या नावावर आहे ते मयत असून त्यांना कोणीही वारस नाही . सदर मूळ मालक भिका गणू सुतार हा पूर्वी आजोबा असताना मयत झालेला असून ते आजोबाचे मित्र होते .त्याची मयत नोंद पण भेटत नाही.सदर मूळ मालक जिवंत असताना पण माझे आजोबा जमीन कसत होते व आजपर्यंत जमीन आमच्याच कब्ज्यात आहे. .सन १९३४ पासून सदर जमीन आमच्या काब्ज्यात असून जमीन कसणाऱ्या ठिकाणी किवा पीक पाहणी सदरी ७/१२ रेकॉर्ड वर
माझे आजोबा-(सन १९३४ ते १९६७ ,) ते मयत नंतर
माझे वडील (सन १९६८ ते २००७ ) ,ते मयत नंतर
मी स्वतः (२००७ ते आजपर्यंत ) नाव आहे .
तरी पिक पाहणी सदरी ,आजोबा ,वडील व आता माझे नाव आहे .तसेच सदर जमिनीच्या ७/१२ रेकॉर्ड वर इतर अधिकार सदरी “ करारनामा घेणार गावकरी पंच लोक “ असा शेरा आहे .पण गावाकडे त्या संबधित कुठलेच रेकॉर्ड नाही आणि आम्हाकडे पण कुठलेच रेकॉर्ड नाही .व आम्ही ७/१२ वरील सर्व नोंदी काढल्यात त्यात पण तसा काहीच उल्लेख नाही .पण सन १९३४ ते १९४० च्या ७/१२ वर माझे आजोबा “ महादुगीर चिमणगिर गोसावी तोंडी करार ११ महिने रोख रुपये १० सारा कुळाकडे “ असा उल्लेख आहे.पण सन १९४० नंतरच्या अदयाप पर्यंतच्या सर्व उताऱ्यावर असा उल्लेख नाही. सदर जमीन गेली ८० वर्षापासून आमच्या कब्ज्यात आहे.
तरी सदर जमिनीच्या ७/१२ वर आता फक्त तीन च नावे आहेत
१ ] भोगवटदाराचे नाव – “ भिका गणू सुतार “ {मूळ मालक }
२ ] इतर अधिकार - “ करारनामा घेणार गावकरी पंच लोक “
३ ] जमीन कसणाऱ्याचे नाव -“ भाऊसाहेब सुकदेव गोसावी “{ मी स्वतः }
मा. सर माझे प्रश्न खालील प्रमाणे आहेत
१)सदर जमीन आम्हाला आता मालकी हक्क मिळण्यासाठी काय करावे लागेन ?.
२)सदर जमिनीत गावकरी हक्क दाखवतात किवा अडवणूक करतात .पण सर्व जमीन मीच कसत असून गावाला कुठलाच हिस्सा देत नाही .तरी यात गावची मालकी आहे काय ? .
३)सदर जमिनीत मालकी मिळवण्यासाठी . adverse possession योग्य आहे कि कुळ कायदा आणि कुळ आहे कि नाही हे कुठे कळेल आणि मी कायम कुळात येतो कि साधे कुळ मध्ये मोडतो .?.
४)सदर जमीन माझे वडील १९६८ ते २००७ पर्यंत एकटेच कसत होते .व पिक पहाणी सदरी तसी नोंद पण आहे .मला दोन चुलते होते पण ते हि जमीन कसत नवते .तर आता त्यांची मूले (माझे चुलत भाऊ ) आता हिस्सा मागतात .तसा त्यांचा हिस्सा किवा हक्क आहे का ?.
५)सदर जमीन गावकरी जमा करण्याची धमकी देतात .तरी गावाला तसा अधिकार आहे कि शासन जमा करू शकते ?
६)सदर जमीन क्षेत्र ६.७६ इतके आहे मालकी मिळवण्यासाठी मला किती महसूल भरावा लागेन .?

jar जमीन मालक मयत झाला असेल व त्यास वारस नसेल तर अशी जमीन शाषण जमा होते. शाशकीय जमीनस कुल कायदा तरतुदी लागू नाहीत.
कृपया adverse possession दावा दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तलाठी हे क्षेत्रीय स्तरावर माहिती अधिकारी आहेत ओ मंडळ अधिकारी हे प्रथम अपिलीय अधिकारी आहेत का? असल्यास कृपया परिपत्रक कोणते
होय, आहेत. याबाबत कार्यालयीन प्रमुखांनी जाहीर करावयाचे आहे.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

१. एखाद्या इसमाकडे शेती नसल्यास व त्याने रजिस्टर खरेदीने शेती घेतल्यास व त्या संबंधी नोंद घेणेसाठी कोणतही पुरावे सादर केले नाही तर त्याचे नावे नोंद मंजूर करता येईल का.
२. किवा मागील ५ ते ६ वर्ष पूर्वीचा ७/१२ उतारा त्याचे किवा त्याचे वडिलांच्या नावे असलेला ७/१२ उतारा सादर केला, मात्र आता त्याचे नावे शेतजमीन नाही तर त्याचे नावे नोंद मंजूर करता येईल का.
३. किवा त्याचे कुटुंबातील कोणताही व्यक्तींचा नावे ७/१२ उतारा असल्यास चालेल का. असल्यास कोणत्या व्यक्तींच्या नावे.
कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
कुल कायद्या प्रमाणे खरेदी करणार इसम शेतकरी असणे आवश्यक. नोंद मंजूर होणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by संताेष
01-05-2014
vv_rt@rediffmail.com

७/१२ वरती इतर अधिकारात वने असा उल्‍लेख केलेला दिसुन येत आहे परंतु किती क्षेत्र आहे याचा उल्‍ल्‍ेाख नाही तर असा वेळा संबधीतानी सदर जागेवर गौणखनिज भराव / सपाटीकरणाची परवानगी माग‍ीतली आहे तर तशी परवानगी देता येईल किंवा कसे व तसेच दयाची असल्‍यास कोणत्‍या अटीवर देता येईल याचे कृपया मार्गदर्शन मिळावे
परवानगी देता येणार नाही.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

१. अ व ब या व्यक्तीस शासनाने गावी हाळ भरनेचे अटीवर नवीन शर्तीवर शेतजमीन दिली. यापैकी ब हि व्यक्ती गावातून साधारणतः ५० ते ६० वर्षापासून गावसोडून निघून गेली. तेव्हा ब या व्यक्तीने शर्त भंग केला म्हणून त्याचे नाव कमी करता येईल किवा कसे. सध्या ब हि व्यक्ती मयत असून त्यांचे वारस देखील बाहेरगावी राहतात. तर ब या व्यक्तीने शर्त भंग केल्या म्हणून त्यांचे नावे कमी करता येईल किवा कसे. असल्यास कोणत्या प्रकारे.
कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
एका पदावर ३६४ दिवस अथवा जास्त दिवस तात्पुरती पदोन्नती देण्यात आली असेल तर ३६५ दिवसानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून पदानावत करता येते किवा नाही?. याबाबत काही शासन निर्णय, न्यायायलीन निर्णय असल्यास मला देण्यास विनंती.
तसेच तात्पुरत्या एकस्तर/एक टप्पा पदोन्नतीवर १० वर्षापेक्षा जास्त कालावधी अखंडित सेवा केल्यावर, त्या व्यक्तीला पुन्हा पदानवत केले आहे. त्या व्यक्तीला काही पदानवत न होण्यासाठी की करावे लागेल- त्याला काही मदत करता येईल का?
त्या व्यक्तीचा पगार आहे तोच राहण्याबाबत काही तरतूद आहे का?
--------------------------------------------------
अधिक माहिती:-
त्या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली झाल्याने त्यांना पदान्वत केले आहे-

कारण सदर पदोन्नती हि त्या कार्यालयात नेमणुकीस असल्यामुळे/प्रोस्तावन म्हणून देण्यात आलेली होती.
पदोन्नती देताना "पाच वर्षासाठी देण्यात आलेली आहे" असा काही जनाच्या पदोनत्ति ओर्डेर मध्ये उल्लॆख आहे.

काही जनाच्या पदोन्नती ओर्डेर मध्ये तसा कुठेच उल्लेख नाही.

तसेच सर्वांचा पगार हा कायमस्वरूपी पदातून पारित होतो. म्हणजेच सर्व पदे हि स्थायी आहेत.
किमान पाच पिढ्यांची वंशावळ काढण्यासाठीचे पर्याय सांगा.
1) गावातील व नात्यातील जुने जाणते माणसांना वंशावळ विचारा
2) त्याप्रमाणे तहसील कार्यालयातील जुन्या जन्म -मृत्यू नोंदी काढा
3) आपल्याकडे असलेले जुने दस्त , 7/12,घराचे उतारे, जुन्या नोंदी, शाळा शिकले असतील त्यांचे दाखले , इत्यादि दस्त जमवा व त्यावरून जन्म -मृत नोंदी मिळवा ..ताळमेळ घ्या ......वंशावळ जुळवा

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

मी महसुल कर्मचारीमध्‍ये रजीस्‍टर मेंबर असुन password व username टाकले असता महसुल व्‍यासपीठवरील माहीती open होत नाही
it is for revenue officers,we are starting karmachari vyaspith soon,that will be available to revenue staff.

Reply by MCS Maharashtra | इतर

सास-यांनी 2000 साली 7/12 ला सहहिस्सेदार म्हणून नाव लावले.तेव्हा चुलत सास-यांच्या नावे नोंद असलेल्या वडिलोपार्जित घराला सहहिस्सेदार म्हणून नाव लावायचे राहिले...ते नाव लावण्यासाठी काय करावे लागेल.?
वडिलोपार्जित घर असेल तर , गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा .मात्र आपला घरामध्ये हिस्सा आहे हे सिद्ध करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब, माहीतीचा अधिकारान्वये माहीत मागवली असता साधारण मागील ८ ते१० वर्षांची कींवा त्यापेक्षा मागील कीती वर्षांपर्यंतची माहीत सरकारी कर्यालयामध्ये उपलब्ध होवू शकते आणि माहीती अधिकाराचा अर्ज करताना ठराविक शब्द संख्याची मर्यादा असते का. ( महसूल विषयक प्रश्न नाही आहे तरी कृपया माहीती सांगावी ही विनंती )
We are thankful to Dr Chandrakant Pulkundwar, Yashda's National level Master Trainer for RTI for replying query in detail.

Reply by MCS Maharashtra | इतर

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधे कालमर्यादेची अशी कोणतीही अट नाही. जे अभिलेख आपल्या विभागास लागू असलेल्या कोणत्याही नियम/अधिनियमातील तरतुदी नुसार,जेवढा काळ जपणुक करणे आवश्यक आहेत, अशा कालावधीची जुनी माहीती देखील मागता येते. उदा. ABCD वर्गीकरणानुसार A वर्गाचे अभिलेख कायम जतन करुन ठेवायचे आहेत. याचा अर्थ अशी कायमस्वरुपी कागदपत्रे कीतीही जुनी असली तरीही ती मागता येतात. अर्थात उपलब्ध असतील तरच.

या बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या CBSE प्रकरणातील दि.०९-०८-२०११ च्या निर्णयात पॅरा ३५ मधे "The RTI Act provides access to all information that is available and existing " असे आॅब्जरवेशन आहे. अाता इथे ABCD नुसार माहीती उपलब्ध असणे आवश्क आहे परंतु प्रत्यक्षात उपलब्ध नसेल तर ही बाब उचित प्राधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून जबाबदारी निश्चित करणे क्रमप्राप्त ठरते.

कलम ८(३) मधे २० वर्षाचा मुद्दा वेगळ्या अर्थाने आहे. त्याचाही अर्थ सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त निर्णयातील पॅरा ३० मधे स्पष्ट केला आहे तो असा -
Section 8(3) provides that information relating to any occurrence, event or matters which has taken place and occurred or happened twenty years before the date on which any request is made under section 6, shall be provided to any person making a request. This means that where any information required to be maintained and preserved for a period beyond twenty years under the rules of the public authority, is exempted from disclosure under any of the provisions of section 8(1) of RTI Act, then, notwithstanding such exemption, access to such information shall have to be provided by disclosure thereof, after a period of twenty years except where they relate to information falling under clauses (a), (c) and (i) of section 8(1).
In other words, section 8(3) provides that any protection against disclosure that may be available, under clauses (b), (d) to (h) and (j) of section 8(1) will cease to be available after twenty years in regard to records which are required to be preserved for more than twenty years

राज्य शासनाने दि.१६-०१-२०१२ च्या अधिसुचनेद्वारे नियमात बदल केले असुन त्यानुसार अर्जदार एका अर्जात एकाच विषयाची माहिती मागू शकतो,तसेच माहितीचे वर्णन १५० शब्दात लिहावे अशीही मर्यादा घालण्यात आली आहे.

Still,if anybody has any doubt or need copies of judgements,please sms me on 07588930743

Reply by श्री.चंद्रकांत पुलकुंडवार | अपर जिल्हाधिकारी

आपल्याला कोणती माहिती हवी आहे,त्यावर कालावधी अवलंबुन आहे. माहितीचा अर्ज करताना साधारणता १५० शब्द असणे आणि एकच विषय असावे.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

सार्वजनिक अगर खाजगी नळयोजनेसाठी पाईप लाईन टाकण्यासाठी मध्ये येणा-या शेत जमिनीमध्ये सदर शेतक-याची वा जमीन मालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे का.
होय सम्भंधित शेतकर्याची परवानगी आवश्यक.
मात्र जर असा शेतकरी परवानगी देत नसेल तर म.ज.म.अ. १९६६ मध्ये नल पाणीपुरवठा योजना साठी pipe line टाकण्यासाठी परवानगी देण्याची तरतूद नाही.
शेती साठी पाणी पुरवठा करण्याकरता कलम ४९ अन्वये परवानगी देण्याची तरतूद आहे. तहसीलदार यांना परवानगी देण्याचे अधिकार आहेत.

(1)If any person (hereinafter called "the applicant") desires to construct a water course to take water to irrigate his land for the purpose of agriculture from a source of water to which is he entitled ...........

sarkari jagetun pipeline टाकण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकार यांना आहेत.

मात्र right of way अथवा right to lay pipe line ( पाणी पुरवठा line ) मिळवण्या बाबत kayda नसावा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सार्वजनिक अगर खाजगी नळयोजनेसाठी पाईप लाईन टाकण्यासाठी मध्ये येणा-या शेत जमिनीमध्ये सदर शेतक-याची वा जमीन मालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे का.
सर्वसाधारणपणे शेतकरी एकमेकांला अडवत नाही.............. परंतु तशी परिस्थिति असल्यास परवानगीची तरतूद आहे

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

चुलत भावाच्या नावे नोंद असलेल्या वडिलोपार्जित घराला सहहिस्सेदार म्हणून नाव लावण्यासाठी काय करावे लागेल.?
चुलत भावाचे नावावर घर असेल तर , तुम्हास चुलत भावाने घरातील अर्धा हिस्सा नोदानिकृत दस्ताद्वारे बक्षीस पत्र अथवा विक्री पत्र करणे आवश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद-

एका पदावर ३६४ दिवस अथवा जास्त दिवस तात्पुरती पदोन्नती देण्यात आली असेल तर ३६५ दिवसानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून पदानावत करता येते किवा नाही?. याबाबत काही शासन निर्णय, न्यायायलीन निर्णय असल्यास मला देण्यास विनंती.
तसेच तात्पुरत्या एकस्तर/एक टप्पा पदोन्नतीवर १० वर्षापेक्षा जास्त कालावधी अखंडित सेवा केल्यावर, त्या व्यक्तीला पुन्हा पदानवत केले आहे. त्या व्यक्तीला काही पदानवत न होण्यासाठी की करावे लागेल- त्याला काही मदत करता येईल का?
त्या व्यक्तीचा पगार आहे तोच राहण्याबाबत काही तरतूद आहे का?
--------------------------------------------------
अधिक माहिती:-
त्या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली झाल्याने त्यांना पदान्वत केले आहे-

कारण सदर पदोन्नती हि त्या कार्यालयात नेमणुकीस असल्यामुळे/प्रोस्तावन म्हणून देण्यात आलेली होती.
पदोन्नती देताना "पाच वर्षासाठी देण्यात आलेली आहे" असा काही जनाच्या पदोनत्ति ओर्डेर मध्ये उल्लॆख आहे.

काही जनाच्या पदोन्नती ओर्डेर मध्ये तसा कुठेच उल्लेख नाही.
सर, पाणी पुरवठयाच्‍या साधनासाठी,विहिरीसाठी...इत्‍यादी करीता एक, दोन ...दहा गुंठे जमीन विक्री करीता परवानगी मागण्‍यासाठी अर्ज प्राप्‍त होत आहेत .सदर परवानगी देण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत काय असल्‍यास कोणत्‍या अधिनियमान्‍वये / शासन निर्णयान्‍वये आहेत, नसल्‍यास कोणत्‍या अधिनियमान्‍वये / शासन निर्णयान्‍वये आहेत या बाबत कृपया लवकरात लवकर माहिती दयावी ही विनंती.
सदर परवानगी देण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना नाही. सदर विहारीच्या पाण्याचा उपयोग सार्वजनिक लोकांना होत असेल तर जिल्हाधिकारी तुकडे जोड तुकडे बंदी क्याद्याखालील नियम १९५९ मधील नियम ६ ला अधीन राहून परवानगी देण्यास सक्षम आहे.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by ganesh
25-04-2014
ganeshpingale2014@redifmail.com

अ या काब्जेदाराने त्याच्या नावें असलेली जमीन ब या व्यक्तीस रजिस्टर खरेदीने विकली परंतु त्या जमिनीच्या ७/१२ च्या इतर हक्कात क,ख, म, र या व्यक्तीचे नावें आहे त्यातील ख व म या व्यक्ती मरण पावल्या आहेत त्यांचे वारस लागले नाहीत तरी रजिस्टर खरीदी, रजिस्टर कार्यालयाने इतर हकाकात नावें असताना केली आहे. तरी सदर गटावर ब या खरेदीने घेतलेल्या व्यक्तीचे नाव लागेल किवा कसे याबाबत मार्गदर्शन मिल्नेस विनंती आहे.
खरेदीदाराचे नाव लागेल. जमिनीच्या ७/१२ च्या इतर हक्कात क,ख, म, र या व्यक्ती व त्यांचे वारस यांना नोटीस देऊन प्रकरण निकाली काढावे. आक्षेप आल्यास विवादित प्रकरण नोंदवून निकाली काढावे.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

सर, मुखत्यारपत्र कीती ( नावे ) प्रकारचे असतात. विशेषतः तसेच जमीनीसाठी, घरासाठी कोणते मुखत्यारपत्र असते. जर मुखत्यारपत्रामधे सही करणारे ७ पैकी ३ हिस्सेदार मयत असतीस तर मुख्यातर पत्र आपोआप रद्द होते का. जर होत नसेल तरते रद्द करता येते का.
मुखत्यार अधिनियम १८८२ नुसार सर्वसाधारण मुखत्यार पत्राचे ८ प्रकार आहे. क्रमांक २ चा नमुना मालमत्ते करिता वापरतात. मुखत्यार करून देणार जिवंत असेल तरच मुखत्यार पत्राचा अंमल होतो. जो पर्यंत मुखत्यारनाम रद्द करत नाही तो पर्यंत ते कायम असते.मुखत्यारनाम रद्द करत करता येते.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

आमच्या् राहत्या घरांची विभागणी म्हणजे अ,ब करावयाची आहे. तसेच जमीनीची सुध्दा वाटणी करावयाची आहे. जर सामोपचाराने होत नसेल तर लोकन्यायालयामध्ये अर्ज केला तर चालेल का. लोक न्यायालयामध्ये अशा केसेेस स्वीकरतात का.
माझ्या मते प्रलंबित असलेल्या केसेसवर सामोपचाराने निकाली काढण्याबाबत लोकन्यायालयामध्ये कार्यवाही केली जाते. आपणास मालकीहक्क करिता नव्याने दावा दाखल करावा लागेल.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

महसुल विभागातील नायब तहसिलदार (म १) व नायब तहसिलदार (म२) च्‍या कामाची विभागणी बाबत कोणता शासन निर्णय आहे त्‍याबाबत माहीती दयावी.
महसूल व वन विभागाचे आदेश क्र संकीर्ण2006/प्रक्र275/ई-9 दिनांक 20 सप्‍टेंबर 2010 अन्‍वये निवासी नायब तहसीलदार व नायब तहसीलदार महसूल यांचे कामांची विभागणी केलेली आहे

Reply by रामदास के कोळगने | नायब तहसीलदार

नायब तहसिलदार सावर्गाच्या कामाची विभागणी बाबत शासकीय आदेश नाही. तहसील स्तरावर नायब तहसिलदार यांनी त्यांचे कडे सोपविलेल्या सर्कलचे काम काज पाहणे अपेक्षित आहे.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by Sandeep
22-04-2014
patilsandeep737@gmail.com

सर,
एका पदावर ३६४ दिवस अथवा जास्त दिवस तात्पुरती पदोन्नती देण्यात आली असेल तर ३६५ दिवसानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून पदानावत करता येते किवा नाही?. याबाबत काही शासन निर्णय, न्यायायलीन निर्णय असल्यास मला देण्यास विनंती.
तसेच तात्पुरत्या एकस्तर/एक टप्पा पदोन्नतीवर १० वर्षापेक्षा जास्त कालावधी अखंडित सेवा केल्यावर, त्या व्यक्तीला पुन्हा पदानवत केले आहे. त्या व्यक्तीला काही पदानवत न होण्यासाठी की करावे लागेल- त्याला काही मदत करता येईल का?
त्या व्यक्तीचा पगार आहे तोच राहण्याबाबत काही तरतूद आहे का?
पदानवत कुठल्या कारणांने केले कुपया नमूद करावे .

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

जमीन महसूल कायदा १९६६ कलम २४७ आणि २५८ विषयी माहित
सांगा
जमीन महसूल कायदा १९६६ कलम २४७ नुसार वरिष्ठ (सक्षम) अधिकारी यांचे कडे अपील करण्यासंबंधी आहे. तर २५८ पुर्विलोकना बाबत तरतुदी करिता आहे.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by किरण
21-04-2014
kiranpwr10@gmail.com

महोदय, मला माझ्या आस्थापनेने पितृत्व रजा नाकारली असून, कारण दिले आहे कि महाराष्ट्र नागरी सेवेत तसा नियम नाही. मला तसा जी आर पण मिळला नाही आहे. कृपया मला मदत करावी. मला महाराष्ट्र शासनाचा पितृत्व रजेचा जी आर मिळवा किवा लिंक द्यावी जेणेकरून मी तिचा लाभ घेऊ शकेन हि विनंती. धन्यवाद.
महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमात या बाबत तरतूद नाही.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

This page was generated in 0.39 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3