जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by ravi
20-04-2014
virravi@3gmail.com
सर, तलाठी, कोतवाल यांचा कार्यालयीन वेळ कोणता ? आणि जर ठरलेल्या वेळात तलाठी कार्यालयात हजर नसेल तर ते कोणत्या कामासाठी गेले त्या बाबत लेखी नोंद कार्यालयात ठेवली जाते काय ?
तलाठी यांचे कार्यालयीन वेळ सकाळी ९.०० ते सांय ५.०० अशी आहे. जर तलाठी बाहेर जाणार असतील तर त्यांच्या सजातील हालचाल नोंदवहीत याची नोंद घेतली जाते.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by शिवाजी खंडू शेळके
19-04-2014
shivajishelke157@gmail.com
मी नांदूर शिंगोट येथील रहिवासी आहे .आमचे सी टी सर्वे न ४३७ असून तो वर्ग अ आहे आम्हाला कर्ज घ्य्याचे आहे त्यासाठी बांधकाम आर आर सी आहे त्यासाठी कोणाची परवानगी लागेल व त्यासाठी काय काय दस्तावेज लागतील व कोणाची परवानगी लागेल कर्ज बँक ऑफ महारास्त्र सविस्तर माहिती द्यावी हि नम्र विंनती
Question by विनायक आहेर
16-04-2014
vinayakaher@gmail.com
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद सर, पण अजूनही मला समजले नाही कृपया जरा सर्विस्तरपणे सांगा.
एकत्रीकरण केलेल्या म्हणजेच गट नंबर पडलेल्या जमिनीतील हिस्सा / क्षेत्र लगतच्या धारकाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस विकता येतो का ? अशा व्यवहारास तुकडेबंदी तुकडेजोड कायद्यामधील कलम ३१ प्रमाणे जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते का ?
एकत्रीकरनाच्या वेळी तुकडा म्हणून नोंद झालेली असेल तर परवानगीची गरज नाही.इतर वेळी मात्र परवानगी आवशक आहे
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by विनायक आहेर
13-04-2014
vinayakaher@gmail.com
१. एकत्रीकरण केलेल्या म्हणजेच गट नंबर पडलेल्या जमिनीतील हिस्सा / क्षेत्र लगतच्या धारकाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस विकता येतो का ? अशा व्यवहारास तुकडेबंदी तुकडेजोड कायद्यामधील कलम ३१ प्रमाणे जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते का ?
Question by श्री. गणेश सुभाष माजरेकर.
11-04-2014
mjrkrganesh@gmail.com
महोदय, माझ्या चार पैकी लहान भावाने आमच्या वडिलांच्या मुत्यूनंतर आमचे रहाते घर ग्रामपंचायतीच्या (८ अ )असेंसमेंन्टला लावून घेतले आहे. परंतु मी माहीतीच्या आधार माहीती मागविली असता, ते घर कुठच्याही ठरावाद्वारे ,बाँन्ड द्वारे, वा मुत्यूपत्राद्वारे नोंदविलेले नाही. तरी हे घर पुन्हा सर्व चार भावांच्या नावे होण्यासाठी पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करावे. ही विनंती. धन्यवाद
Question by संदीप आखाडे
08-04-2014
akhade_sandip@yahoo.co.in
१९८८ साली माझ्या वडिलांनी आणि चुलत्यांनी जमीन खरेदी केली मोठा भाऊ म्हणून चुलत्यांचे नाव लावले माहे वडील हयात नाहीत , सध्या चुलते वारस म्हणून सुद्धा आमचे नाव लावण्याला तयार नाहीत वारस म्हणून नाव कसे लावता येईल .७/१२ मध्ये फक्त चुलत्यांचे नाव आहे .आमचा सुद्धा हक्क आहे अशी नोटरी चुलत्यांनी ५ वर्षापूर्वी करून दिली आहे त्याची एक प्रत आमच्याकडे आहे .पण ७/१२ मध्ये ते आमची नावे लावत नाहीत काय करावे
कृपया १९८८ सालचे खरेदी खतात खरेदी घेणार या सदरी आपले वादिलाचेही नाव असणे आवश्यक आहे.
जर जमीन खरेदी करताना आपले वडिलांनीही काही रक्कम दिली असल्यास व त्या बाबत आपणाकडे पुरावा असल्यास आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून आपले वडिलांचा व पर्यायाने आपला हक्क सिद्ध करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sonwane ravindra vitthalrao
08-04-2014
ravindravitthalrao@gmail.com
सर,
सवरक्षित कुळ चे इतर हक्कात नाव असतांना अन्दंजे २५,३० वर्ष नंतर कुळाने मालकी हक्काची तहसीलदार सर यांचे कडे मागणी केली, त्या नंतर त्यांना मालकी हक्क प्रदान करण्यात आले . सदर जमीन मूळ मालकाने दोघांना खरेदी खत आधारे विक्री केली व आज त्या दोघांचे नाव मालकी हक्कात आहे ,तहसीलदार सर यांनी दिलेल्या निर्णयात वरील दोघांचे खरेदी खत अवैदय ठरवून कुळास मालकी हक्क प्रदान केले व तसेच कुळाचे प्रमाणपत्र वितरीत केले व आदेशित केले कि प्रमाणपत्र च्या अनुषंगाने योग्य कार्यवाही करण्यात यावी . प्रश्न असा आहे कि वरील खरेदी घेणार दोघांची नावे कमी करणे बाबत आदेश नाही तरी निर्णया आधारे व प्रमाणपत्र आधारे खरेदीदाराचे नावे कमी करता येतील का या बाबत सविस्तर मार्गदर्शन व्हावे
सौरीक्षित कुल असेल तर , अन्य व्यक्तीचे कुल म्हणून नाव लागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सौरीक्षित कुल कृषक दिनी मालक झालेला आहे.
जर मिल्कातीला कुल असेल तर , मालक व कुल यांनी संयुक्त रित्या विकणे आवशयक आहे. एकट्या मालकाला विकत येणार नाही. त्याही पेक्षा सौरीक्षित कुल कृषक दिनी मालक झालेला आहे. त्यामुळे मालकाला जमीन विकण्याचा अधिकार नाही.
कृपया आपण अपील करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप आखाडे
07-04-2014
akhade_sandip@yahoo.co.in
जमीन महसुल कायदा १९६६ कलम २४७ आणि कलम २५८ विषयी माहिती
Question by kishor jadhav
07-04-2014
kishorjadhav151@gmail.com
महोदय, शासनाच्या कोणत्या परिपत्रकाद्वारे तहसिलदार हे अवलंबुन प्रमाणपत्र निर्गमित करतात. कृपया कळवा.
Question by kishor jadhav
07-04-2014
kishorjadhav151@gmail.com
Purgrasta sathi aarakshit jamini war aslele atikraman kadhnya sathi shaskiya nirdharit pranali dware karawahi babat kalwine
Question by कुणाल अंकुश जाधव
05-04-2014
mr.k1387@gmail.com
शासनाच्या कोणत्या परिपत्रकाद्वारे वारस दाखला तहसीलदारांकडून दिला जातो ?
असे कोणते परिपत्रक असल्यास मिळणेस विनंती आहे.
मयत गिरणी कामगारांच्या वारसांना वारस दाखला देण्याबाबत दि ६/७/२०१३ रोजी महसुल व वन विभागाने शासन निर्णय जारी केले आहे.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by ambhore
04-04-2014
vv_rt@rediffmail.com
शिक्षण कर ,रोहयो कर,वाढीव शिक्षण कर यासाठी 10 अंकी लेखाशिर्ष( ठाणे जिल्हयासाठी )काय आहे याची माहिती मिळावी
अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकातील सुचेने नुसार (शिक्षण कर ००४५-००६२ ,रोहयो कर ००४५-००७१ ,वाढीव शिक्षण कर ००४५-००६२ )
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by प्रीती dudulkar
04-04-2014
pritymdudulkar@gmail.com
सर एका व्यक्तीने त्याची वडिलोपार्जित जमीन १९७२ साली विकली . ते दोन सर्वेय नंबर होते . इस्सार पत्रावर व्यवहार झाला . जमीन विकणाऱ्या व्यक्तीने राजीस्त्री करून दिली नाही करिता खरेदीदाराने दिवाणी कोर्टात दावा दाखल केला . कोर्टाने विक्री करून दिली . परंतु एकाच शेताचा फेरफार झाला . परंतु ताबा दोन्ही शेताचा खारेदिदाराकडेच आहे . आता शेत विक्नार्याचे वारस आक्षेप घेत आहे कि सदर मालमत्ता हि वडिलोपार्जित असल्याने त्यांच्या वडिलांना विकण्याचा अधिकार नाही करिता फेरफार घेऊ नये . काय केले पाहिजे?
Question by ambhore
04-04-2014
vv_rt@rediffmail.com
CRZव ESZ या मध्ये काय फरक आहे व असे क्षेत्र घोषीत केल्यामुळे कोणकोणत्या गोष्टीस अटकाव होतो
उदा.दगड वा रेती उत्खनन करता येईल किंवा नाही व तसेच इतर विकास कामे
सीआरझेड म्हणजे "किनार नियमन क्षेत्र" होय; तर ईएसझेड म्हणजे " पर्यावरणीय संवेदनाशील क्षेत्र" होय. सीआरझेड चे एकुण जैवविविधता व किनार्यापासुनच्या अंतराच्या आधारावर एकुण ५ प्रकार पडतात. वरील दोन्हीमध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी आहे आणि कोणत्या गोष्टींना परवानगी नाही, त्याबाबत सीआरझेड नोटीफिकेशन २०११ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम ५ चे निर्बंध वाचावेत.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by प्रीती dudulkar
04-04-2014
pritymdudulkar@gmail.com
सर एका व्यक्तीने त्याची वडिलोपार्जित जमीन १९७२ साली विकली . ते दोन सर्वेय नंबर होते . इस्सार पत्रावर व्यवहार झाला . जमीन विकणाऱ्या व्यक्तीने राजीस्त्री करून दिली नाही करिता खरेदीदाराने दिवाणी कोर्टात दावा दाखल केला . कोर्टाने विक्री करून दिली . परंतु एकाच शेताचा फेरफार झाला . परंतु ताबा दोन्ही शेताचा खारेदिदाराकडेच आहे . आता शेत विक्नार्याचे वारस आक्षेप घेत आहे कि सदर मालमत्ता हि वडिलोपार्जित असल्याने त्यांच्या वडिलांना विकण्याचा अधिकार नाही करिता फेरफार घेऊ नये . काय केले पाहिजे?
Question by अंभोरे एस.व्ही . तलाठी
04-04-2014
amarambhire1@yahoo.com
सर बाबुराव यांनी १९५७ वर्षी २ हेक्टर जमीन खरेदीने विकत घेतली होती सन १९७३ पासून ७/१२ ला त्यांचे भाऊ पंडित यांचे नाव आलेले आहे येकत्रिकरणाच्या वेळेस कबुली जबाबाने भाऊ हिस्स्याने सदर जमीन पंडित यांच्या नावाने झाली आहे परंतु भुमिअभुलेख कार्यालयात jababachya प्रती उपलब्ध नाही पंडित यांचा नावाने झालेला फेरफार उपलब्ध नाही सन१९७३ पासून जमीन पंडित यांच्या ताब्यात आहे त्या पैकी ०.३३ आर जमीन मुलीचे नावाने केली आहे मुलीने जमीन लेंभे यांना विकली आहे लेंभे यांनी फेरफार साठी दस्त दिले बाबुराव चे वारसांनी फेरफार न करणे बाबत हरकत अर्ज दिला आहे फेरफार करावा कि नाही
आपण तलाठी असाल तर नोंद घेणे आपली प्रथमिक जबाबदारी आहे. त्या बाबत आक्षेप आला तर त्याची नोंद घ्यावी. (नोंदणी कुतविक्री दस्त नाकारणे महसुल न्यालयाच्या कार्यकक्षेत नाही)
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by महाडीवाले के.व्ही
03-04-2014
mahadiwalek.v2009@gmail.com
सर, कालब्ध्द पदोन्नतीचा लाभ मिळण्याकरीता विभागीय दुय्यम सेवा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे काय या बाबत माहिती दयावी ही विनंती.
नियमीत पदोन्नतीसाठीचे सर्व अटी/शर्ती कालबध्द पदोन्नतीसाठी लागू आहेत.
Reply by रामदास के कोळगने | नायब तहसीलदार
Question by विश्वास मांडे
03-04-2014
vishwasmande@yahoo.com
शासकीय कर्मचार्यासाठी २०१३-२०१४ इतर मागासवर्गीय वर्ग उन्नत गट (क्रिमी लेयर) उत्पन्न मर्यादाबाबत शासकीय निर्णय मार्गदर्शन हवे आहे? एकून उत्पन्न ग्राह्य धरताना वेतन आणि शेती पासूनचे उत्पन्न धरावे कि वेतनशिवा य इतर उत्पन्न धरावे.
Question by Sachin Bhingarde
02-04-2014
bhingarde.sachin@yahoo.in
आदिवासीचीनची जमीन प्रकल्पग्रस्त व्यक्ती खरेदी करू शकतो का? करता येत असेल तर त्या साठी कोणता जी. आर. आहे.
जिल्हाधिकारी यांचे पूर्व परवानगी शिवाय आदिवासीचीनची जमीन कुणलाही घेता येत नाही.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by जितेंद्र shirsekar
01-04-2014
jitendrashirsekar@gmail.com
माझे वडील आणि त्यांचे सक्खे भाऊ यांनी १९८७ ला २८ एकर जागा विकत घेतली. खरेदीखतात दोघांचे प्रत्येकी आठ आणे नमूद केलेले आहेत. जागेच्या कोणत्याही प्रकारे वाटण्या झालेल्या नाहीत. काकांनी परस्पर आम्हाला कळू न देत त्यापैकी १० एकर जागा विकली. हि विक्री कायदेशीर आहे का? हि जागा खरेदी करण्याचा आम्हाला हक्क आहे का? असल्यास आम्ही तो कसा बजावावा.
Question by विजय सदाशिव बोंगाणे
01-04-2014
vijaybongane@yahoo.co.i
महाराष्ट्र नागरी सेवा नियम पाहिजेत
Question by gunjal jyoti
28-03-2014
gunjaljyoti25@gmail.com
probationary naib tahsildar cha probationary period madhe caual leave count hotat ka ? probationary cha period कसा count kela jato? plz i want documenatary how many document require for complete probationary period?
नियमाप्रमाणे किरकोळ रजा घेतल्यास परि. कालावधी पुढे वाढतो तसेच अर्जित रजा घेतल्यास तेवढा कालावधी परि. काळ पुढे जातो. परि. काळ संपल्याचे जाहीर करण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे:- १) परि. काळातील सर्व दैनंदिन्या आणि मुल्यांकन अहवाल, २) विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेबाबतचे पत्र, ३) मराठी, हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेबाबतचे पत्र, ४) पायाभुत प्रशिक्षण पुर्ण झालेबाबतचे पत्र इ.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by sonal tarte
28-03-2014
tartesonal@gmail.com
सर ,बिगरशेतीसाठी (na ) करण्यासाठी १एकर जागा असावी लागते का?त्यापेक्षा कमी जमीन na होऊ शकता नाही का?
असा काही नियम नाही..... पण एक एकर वर बिनशेती करावयाचे असेल तर रेखांकन करावे लागते.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by raviं
27-03-2014
virravi3@gmail.com
मृत्युपत्र, बक्षीसपत्र,किंवाकोणताही दस्त परवाना धारक बाँड रायटरनेच लिहणे आवश्यक आहे काय किंवा कोणीही लिहू शकतो ? याबाबत माहिती कोणत्या नियमात मिळेल
Question by कवडे रवि
27-03-2014
kawade.ravi123@gmail.com
शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी ओळखपत्राचा विहित नमुना आहे का ? ( रंग, आकार, मजकूर ई.) असल्यास कृपया तो मला मेल करावा, ही विनंती.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
