जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by kumar solankar
28-03-2015
kumarsolankar27@gmail.com
भगवान कोळेकर पूर्व बाजूला अंबादास देवकते पश्चिम बाजूला यांनी मिळून एकत्रित अकरा एकर शेती घेतली पण प्रत्यक्षात शेतीत वावरताना दिशा बदलली हे दोघे मयत झाले त्यांच्या वारसांनीही वावराप्रमाणेच नोंद केली नंतर अंबादास देवकते वारसांनी जमीन मला विकली. हे सर्वाना वीस वर्षानंतर कळाले मला जमीन विकायची आहे विकताना अडचण येईल का? हे दुरुस्त करता येईल का?कृपया यावर उपाय सांगा
भगवान कोळेकर -पूर्व तर अंबादास देवकाते -पच्छिम , अशी खरेदी झाली
पण वही वाट कोळेकर -पच्छिम व देवकाते पूर्व अशी होती . त्याप्रमाणे वारस नोंद होताना पूर्व जमिनीस वारस म्हणून देवकाते यांची लागले तर पच्छिम बाजूस कोळेकर यांचे वारसांची नावे आहेत .
मुल खरेदी खतात दुरुस्ती करणे आता शक्य आहे का? २० वर्षांनी दुरुस्ती अश्यक वाटते
१. ११ एकर शेतीचे ७/१२ किती आहेत ? कि एकच ७/१२ आहे ?
२.एकत्रित ७/१२ असल्यास अडचण येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by shinde mahadeo goroba
28-03-2015
mahadeoshinde3594@gmail.com
सर
संघटनेने एखाद्या विषयाचे निवेदन तहसील कार्यालयाला दिले आणि त्या निवेदनांचा प्रती मा मुख्य मंत्री, आमदार व मंत्रालयातील इतर विभागाच्या प्रती त्यांनी न पाठवता मार्फत तहसीदार करून त्या तहसीलदार यांच्या कडे दिल्या तर अशा प्रती शासकीय कार्यालय मार्फत शासकीय खर्चातून पाठवता येतात काय ? कृपया मार्गदर्शन हवे.
तहसील कार्यालयात प्राप्त होणारी निवेदने , हि शासन निर्णय / शासन अखत्यारीतल विषयाशी निगडीत असतील तर , जिल्हाधिकारी कार्यलयात पाठवली जातात . जिल्हाधिकारी कार्यालय शासनास पाठवते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by devendra
27-03-2015
jyotitandel82@gmail.com
सर
एखादी व्यक्ती कुल म्हणून असल्यास त्या व्यक्तीस वारस नसल्यास ती व्यक्ती हक्क सोड पत्राने भावाच्या मुलास कुळाचे हक्क देवू शकते का
कुल वहिवाट वारसा हक्काने हस्तांतरित होते . मुल कुलास स्वताची मुले/मुली नसली तरी वारसा कायद्याने अन्य , भाऊ , त्यांची मुले कुल होतात .
हयातीत व्यक्तीस कुल- हक्क, भावाचे मुलाचे नावें सोडून देत येणार नाही . कुल्काय्द्यात कुळाने स्वत जमीने कसणे आवश्यक अन्यथा मिळकत कलम ३२ र अन्वये , शासन जमा होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नितिन बच्छाव
26-03-2015
Dsebachhavnitin@gmail.com
माझी zp नाशिक येथे इ व द विभागात ESBC ( मराठा ) आरक्षण मधुन निवड झाली असुन कागदपत्र पडताळणी पण झाली हे सवॅ अरक्षणला टे लागलयानंतर झाले पर पेपर आधी झाला होता कमी का झप खुला पण अजॅ केले होते परंतु अरक्षण टे लागला नव्हते यामुळेच मी मराठा मधुन पेपर दिला आता मी न्यायालयात नियुकती साठी दाद मांगु शकतो का
आपण न्यायालाय्त दाद मागू शकता . मात्र त्याचा उपयोग होणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोरख चंद्रसेन हाडूले(माजी सैनीक)पाेलीस शपाई
26-03-2015
hadulegorakh@gmail.com
मी यवतमाळ यते नोहेमबंर 2013 पासून भरती आहे तरि मला बीड येते बदली पाहिजे आहे तरी माझी पत्नी किडणि रोगाने गृसत आहे तिची किडणि डायलेसिस करावे लागते तसे कागद पण आहेत व जिल्हा C S चे Certificate पण आहे मला महणतात २०११ पासून पोलिस खात्यात तसा जी आर नाही माजी सैनिकांना तसा जी आर आसेल किंवा पोलिस शिपाई चा तसा जी आर असेल तर मला मदत करा आई वडील पण घरी महतारे आहेत मी 17 साल बाहेरच सैन्य मध्ये राहिले आहे मला मदत करा का MAT मध्ये जावे लागेल गाईड करा साहेब
Question by शाम चौधरी
25-03-2015
choudhary.sham64@gmail.com
राहूरी कृषी विद्यापीठात काम करणारे जे कर्मचारी आहे .त्यांची बदली दुस-या कृषी विद्यापीठात होउ शकते का ?
असल्यास तसे शासन निर्णय कठे उपलब्ध होउ शकते कृपया मार्गदर्शन व्हावे
शामजी
या व्यासपीठावर , महसूल , जमीन विषयक बाबी संदर्भात उत्तरे दिले जातात .
आपण जर कृषी विद्यापीठात काम करत असाल तर , त्या विद्याप्थाचे , सहायक निभंडक यांना भेटा. ते समर्पक उत्तरे देतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ganesh Lavbe
25-03-2015
lavhe.ganesh@yahoo.com
पती पत्नी एकत्रीकरन जीआर
Question by अमित
24-03-2015
amit.labtakar@gmail.com
२००६ ला पाझऱ तलावात शेत गेले आहे ते अजून पुरण झाले नाही ते वापरू शकतो
का
जमिनीचा ताबा भू संपादन अधिकार्यास देई पर्यंत , जमीन मुळ मालकाचे ताब्यात राहते. ताबा देई पर्यंत वापरावांवर निर्बंद नाही . मात्र या कालावधीत आपण जमिनीवर जी सुधारणा कराल त्याचा मुल्यान्कानामध्ये विचार केला जात नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजी vidhate
24-03-2015
vidhate.g.shivaji@gmail.com
सर माझ्या पणजोबांचे गावी जमीन होती परंतु आजोबा कामा निमित्त बाहेरगावी आले व जमीन भावास कसण्यास दिली परंतु आजोबांच्या भावाने ती सर्व जमीन स्वतःच्या नवे करून घेतली . माझ्या वडिलांनी ती केस २० वर्ष लढली आमच्या बाजूने निकाल लागूनही जमीन आम्हाला मिळाली नाही . वडील हि आता थकले आहेत. आता कुठल्याही ७/१२ वर आजोबा ,वडील किवा माझे नाव नाही . तर मी आता कधीही शेत जमीन घेऊ शकणार नाही का ???
१. आपण आपले प्रश्नात नमूद केले आहे कि , निकाल २० वर्षाचे अथक परिश्रमानंतर आपले बाजूने लागला आहे
२. निकालाचे प्रतीचे अवलोकन करा .
३.निकालपत्रात मिल्कतीस आपले वडील/आजोबा यांचे नाव दाखल करणे बाबत उल्लेख असल्यास , ती प्रत आपले तहसील कार्यालयास सदर करा .
४. निकाल तुमचे बाजूने लागला असल्यास , निच्छित आपले नवे जमीन होईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजी vidhate
24-03-2015
vidhate.g.shivaji@gmail.com
सर माझ्या पत्नीच्या माहेरी वडिलोपार्जित जमीन आहे . जर त्यांनी दुसर्या गावी शेतजमीन खरेदी करून तिचा हिस्सा तिला दिला तर ती तिच्या नावे पुन्हा शेत जमीन खरेदी करू शकते का?
Question by दिलीप चव्हाण
24-03-2015
chavandilip20@gmail.com
मला मागासवर्ग सहकारी गृहनिर्माण योजना पी.डब्ल्यू.आर.२१९ विषयी पूर्ण माहिती हवी आहे
Question by गणेश शिंदे
23-03-2015
bkganesh.shinde10@gmail.com
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार लीज पेंडन्सी नोटीसची नोंद गाव दप्तरी घेता येते का? त्याबाबत शासन निर्णय ,परिपत्रक आहे का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
घेण्यात येऊ नये
कृपया आपण अधिकार अभिलेख , कलम १४८ वाचावे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमित जगताप
23-03-2015
amitjagtap89@gmail.com
मा. किरण पाणबुडेसर
सर मला भारत गैसची डीलरशीप मिळवायची आहे तरी त्याबद्दल आपण मला सर्व माहिती द्यावी हि विनंती.
अमितजी ,
भारत पेट्रोलियम महामंडळामार्फत , जाहिरात काढली जाते . प्राप्त अर्जाची छाननी करून , पात्र अर्जादारामधून चिठी काढून निवड केली जाते
जाहिरात वर्तमानपत्रात येते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sujit Jagtap
23-03-2015
spj100@rediffmail.com
“मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ मधील कलम ४३ ची माहिती मिळावी.
कुल कायद्या अंतर्गत प्राप्त झालेली जमीन , विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी / प्रांताधिकारी यांचे परवानगीशिवाय विक्री करता येत नाही .
मात्र कलम ३२ अन्वये प्राप्त झालेली जमीन , १० वर्षाच्नंतर विक्री करावयाची असल्यास , अश्या परवानगीची गरज नाही
आपण सबंधित कायद्याचे कलम वाचन करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by balajipanchal
23-03-2015
balaji.panchal3@gmail.com
सिव्हील डिफेन्स म्हणजे काय व त्याची नियुक्ती कोण करते ?
Question by कृष्णकांत पुजारे
23-03-2015
krishnakantpujare@outlook.com
सातबारामधून कुटुंबा बाहेरील व्यक्तीचे मयत झाल्यास आणि वारस तपास होवून त्यांच्या पत्नीचे तसेच मुलांचे पडीक जमिनीमध्ये स्वारस्य नसल्यास काय करणे उचित ठरेल ? हक्क सोड पत्र कि बक्षीस पत्र ? तसेच त्यांची स्टाम्प शुल्क किंवा इतर खर्च किती असेल ?
कुटुंबाबाहेरील व्यक्ती असल्यास , हक्क सोड पत्र करणे योग्य
४ % मुन्द्रंक शुल्क ( जमीन किमतीच्या )
१ % नोंदणी फी ( जास्तीत जास्त ३०,०००/-)
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिपक
22-03-2015
deepakkulkarni702@gmail.com
माझी व्यक्तिगत इनाम शेतजमीन ( ग वर्ग) सांगली येथील आहे.तिची विक्री परवानगी मिळणेबाबत काय करावे लागेल?
Question by ganesh babasaheb gite
22-03-2015
ganeshgite@7875mail.com
सर
Indian Economic service ही upsc ची परिक्षा मराठीत देता येऊ शकते का ? सर माहीती सांगा .
Question by shamal kiran palav
22-03-2015
kir.plv@rediffmail.com
maharashtra jamin mahsul abhiniyam 1666 che kalam 36 va 36 a nusar ekach aadivashi jamatitil natyatil aadivashina hakkasod patra kartana collectorchi parawangi aavashyak aahe ka
Question by महाडीवाले के व्ही
22-03-2015
mahadiwalek.v2009@gmail.com
सर
एका प्रकरणात अ या महाराष्ट्रातील युवकाचे कर्नाटकातील स्वजातीय युवतीशी विवाह झाला त्याची नोंद ग्रा प येथे झाली पतीच्या नावाने मतदान कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड, तहसिल चे रहिवाशी , मिळाले आहे
प्रकरणात वरील पुराव्याधारे तहसिलदार मार्फत एसडीओ कडे सासरच्या नावाने जात प्रमानपत्राची मागणी केली असता एसडीओने अर्जदार कर्नाटकातील असल्यामुळे जात प्रमाणपत्र देता येत नाही असे कळवले आहे .
प्रकरणात असा निर्णय देता येतो का ?
नागरीकाच्या मुलभुत हक्काचे भंग होते का ?
याविरूध्द अपिल कोठे करावे ?
१. होय.
२. नाही
३. वैधता समितीकडे
अ या युवकाचे पत्नीने , तिच्या वडिलांना , आजोबाना अथवा नातेवाईकांना दिलेले कर्नाटक राज्यातील प्रमाणपत्र सदर करणे आवश्यक . अश्या प्रमाणपत्राचे आधारे , प्रांताधिकारी नमुना ६ अथवा १० मध्ये जात प्रमाणपत्र देतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रकाश रमेश कवटे
22-03-2015
kavateprakash@gmail.com
मा. महोदय,
स.न.वि.वि.
मी एक अल्पशिक्षित २४ वर्षाचा तरुण आदिवासी भूमिहीन शेतमजूर आहे,
माझे आजोबांचे नावे मौजे कवडास, तालुका, जव्हार, जिल्हा, ठाणे
(आता जिल्हा, पालघर) येथे १९६० साली ५एकर २२ गुंठे जागा ३२ ग
कुळ कायद्या प्रमाणे मिळाली होती. परंतु गरिबीमुळे त्याचा किमतीचे
हप्ते नभरता आल्याने सदर जागा ३२ प (2)(c) प्रमाणे १९६५ साली
सरकारजमा करून ती एका प्रकल्पग्रस्तास देण्यांत आली. त्यामुळे आमचे कुटुंब
भूमिहीन झाले. त्यानंतर आजोबांचा लगेचच मृत्यू झाल्याने आजीनी मोलमजुरी
करून कुटुंबाचे पालनपोषण केले.
माझा प्रश्न असा आहे कि मला शासनाकडून 3 ते 4 एकर शेत जमीन वनहक्क वा इतर योजनेद्वारे
मिळू शकेल का? या साठी विनंती अर्ज व पाठपुरावा कोणाकडे करावा लागेल? कि मी आयुश्यभर
भूमिहीन शेतमजूरच राहणार? कृपया आपण याबाबत मला मार्गदर्शनकरावे. हि नम्र विनंती
प्रकाश रमेश कवटे
1. वन हक्क कायद्या खाली जमीन मिळण्यासाठी आपण वन जमिनीवर१३/१२/ २००५ पूर्वीपासून वास्तव्य / वहिवाट असणे आवश्यक
२. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याखाली आपण जमिनी शेती करण्यासाठी शासनाकडे मागणी करा .
३. आपण ३२ ग हप्ते न भरल्याने , शासन जमा होऊन , ३२ प खाली वाटप झाली आहे .
कृपया आपण खात्री करा कि , हप्ते न भरल्याने , आपणाकडून जमिनीच्या थाक्बाकीप्रमाणे , हप्ते वसुली बाबत कारवाई करण्यात आली होती का ?
या कायद्याचे कलम ३२ म प्रमाणे , हप्ते भरण्यास कसूर केल्यास , शेत जमीन न्यायाधिकरणाने हप्ते वसुली , म.ज.म.अ.१९६६ च्या तरतुदीप्रमाणे , जमिनीची थकबाकी म्हणून वसूल करणे आवश्यक . न्यायाधिकरणाने अशी वसुली केली नसल्यास , आपली शेत जमीन केवळ आपण हप्ते भरले नाहीत म्हणून . शासन जमा करता येणार नाही .
आपण जुने कागद पत्र पहा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mahadeo kale
21-03-2015
mahadeo.kale.88@.g.mail
१९४१ साली वडील मयत असतील तर ,मुलीचा जन्म 1933 चा असेल तर मुलीच्या वारसाला वडिलांच्या प्रोपेर्तीमाडे हिस्सा मिळतो का ,मुलगी १९८६ साली मयत आहे.
होय.
१९५६ हिंदू वारसा कायदा नुसार , वडिलांचे मिळकतीत , मुलीना हिस्सा होता . फक्त २००५ पूर्वी पर्यंत , वडील हयातीत , मिळकतीचे वाटप झाल्यास त्यात हिस्सा मिळत नसे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shivaji L Gande
21-03-2015
shivajigande.85@gmail.com
sir
please answer me my question dt 26-2-2015
Question by राम काशीनाथ चोथवे
21-03-2015
ramchothve@gmail.com
ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वभूमी अभिलेख मधे नोंद असलेल्या जागेची दूमजली इमारत पैकी तळ मजला तळ जमीनीसह खरेदी केला असता नोंद भूमी अभिलेख करत नाहीये कारन कळावे
Question by Sambhaji
20-03-2015
paragelectronic@gmail.com
महाराष्ट्र गुंठेवारी २००१ प्रयोजन बदल करता येते का अाणि येत असेल तर कोणती कागद पञ लागतात
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
