जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

साहेब, नमस्ते
१. वडिलांच्या कालावधीत झालेल्या मोजणीची माहिती आता हवी असल्यास कुठे आणि कशी मिळेल?
२. खरीप जमिनीची मोजणी झाली आहे परंतु त्याचे रेकॉर्ड आमच्या कडे नाहीत कसे मिळतील?
३. एकत्र कुटुंबा मध्ये मोजणी कारवाया तयार नसतील तर काय करावे?
४. ठाणे आत्ताच्या पालघर जिल्यात मोजणी साठी कोणाकडे जावे व त्यास किती वेळ व खर्च येईल?

आपला कृपाभिलाषी
आपण जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पालघर या कार्यालयाशी संपर्क करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
जिल्हाधिकारी यांनी दीलेला बिगरशेती आदेश रद्द करण्याचा कोनाला अधिकार आहे .
सरकारी कर्मचारी यांना निवडणूक लडता येते का
Gd.evng sir.
Maza asaa question aahe ki geli 9 varsh amhi mhanje maze kaka ani maze vadil hyani bahinicha hakk sod patrak ani power of atony amchya navi kelay resistar kelay..ani amchya zaminit mazi aatya hine geli 25 years ghar bandlay pan ti zaimin navavar karnyas sagte tar ti hou shakte ka?ani hakksod karun dilay utter have aahe
देवस्थान इनाम जमिनी (७) भोगवटदार वर्ग-२ या जमिनीच्या विक्री परवानगीसाठी काय करावे लागेल?
देवस्थान जमीन la जमीन महसूल सूट कायदा १८६३ लागू आहे .
या कायद्याच्या उपकलम ३ कलम ८ , नुसार देवस्थान जमीन विक्री करता येत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

संगणकावरील ७/१२ उतारा काढला असता मुल मालकांना कंस असून हा ७/१२ बंद झाला आहे,असे म्हटले आहे.कृपया स्पष्ट करावे..
Sir
Maza ha khup mahatvacha que ahe plz to kasa solve hoil he sanga
Prashna mi samor mandt ahe
Mi chandrapur jilha cha rahvasi ahe
Amche ajoba name karuji he shet krit hote 1952 te 1958 paryant asa record ahe mi goda kela tya khasra patrakavr mud malkache nav patta kulache adhikar mhnje mazya abajiche nav ahe tyana 2 mul ahet maze ajoba 1959 madhe marn pavle tr mazya ajine dirashi lagn kel tyache nav mengaji ahe tya record nusar 1960-61 madhe tyani te shet aplya navani kel ani te 2001 madhe marn pavle tya nantr 2003 madhe tyachya varsani aple nav 7/12 vr chadhavile pan amche nav nai chad vile tr amhi prashna kela tyana amche nav ka nai chadhvile mhntl tr te mhnale ki tumchya vadilach ethe kahich nai tr kas chadhvaych nav
Tr sir mala he sanga mazya abaji cha kahich nai ka tya shetavr adhikar ani part ek que kul he badlt jate ka. Kulat nav rahil tr patta tyachyach navacha asto ka
Plz sir mala hya que che ans lavkr dya karn mala maza adhikar midvaycha ahe
आपले आजोबा १९५२ ते १९५८ कालावधीत कुल होते . कुल कायद्यानुसार ते कृषक दिनी म्हणजे १ एप्रिल १९५७ रोजी मिळकतीचे मालक होते. त्यांचे पश्चात आपलेवडील , चुलते व आजीचे नाव वारस म्हणून मिल्कातीसलागणे आवश्यक होते.
ज्या फेरफार पत्रकाने चुलत आजोबांचे वनंतर त्यांचे वारसांचे नावदाखल झाले त्या विरुद्ध प्रांत अधिकारी यांचे कडे अपील दाखलकरा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

What is mean by Probate ?
Probate chi nond karnyasathi 1 application majhyakade aale ahe tya sambhadhi, which document i need with this probate mahiti dyawi
Probate is a legal document. Receipt of probate is the first step in the legal process of administering the estate of a deceased person, resolving all claims and distributing the deceased person's property under a will. A probate court (surrogate court) decides the legal validity of a testator's (person's) will and grants its approval, also known as granting probate, to the executor. The probated will then becomes a legal instrument that may be enforced by the executor in the law courts if necessary. A probate also officially appoints the executor (or personal representative), generally named in the will, as having legal power to dispose of the testator's assets in the manner specified in the testator's will. However, through the probate process a will may be contested.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

The court process by which a Will is proved valid or invalid. The legal process wherein the estate of a decedent is administered.
When a person dies, his or her estate must go through probate, which is a process overseen by a probate court. If the decedent leaves a will directing how his or her property should be distributed after death, the probate court must determine if it should be admitted to probate and given legal effect. If the decedent dies intestate—without leaving a will—the court appoints a Personal Representative to distribute the decedent's property according to the laws of Descent and Distribution. These laws direct the distribution of assets based on hereditary succession.
In general, the probate process involves collecting the decedent's assets, liquidating liabilities, paying necessary taxes, and distributing property to heirs.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

साहेब, नमस्कार
आमची वडलोपार्जीत जमिनीचे वाटप वडिलांनी त्यांच्या भावान मध्ये केले आहे. परंतु जमीन नावी असल्या प्रमाणे ताब्यात नसून अ ची नवी जमीन ब च्या ताब्यात आहे ताब्यात दिलेली जमीन एक गठ्ठा आहे व नावी असलेली जमीन वेगवेगळय ठिकाणी आहे.
१. सदर जमीन ताब्या प्रमाणे नावी करायची असल्यास काय करावे ?
२. त्यास किती खर्च येईल?
३. नावी असल्या प्रमाणे ताबा घ्यावयाचा असल्यास काय करावे लागेल व खर्च काय येईल ?
४. तसा अर्ज कुणाकडे करावा लागेल?
आपला कृपाभिलाषी
दुरुस्ती वाटप पत्र करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब,
आम्ही मित्र मिळून शेतजमीन खरेदी करत आहोत तरी सदरहू जमिनीचा एक ७/१२ ज्यात आम्हा मित्रांची नवे लागू शकतात काय? पुढे आम्हा पैकी कुणालाही त्यातील जमीन विक्री करताना काही त्रास होवू शकतो का? त्यासाठी काय करावे?

आपला कृपाभिलाशी
आपण सर्व मित्र एकत्रित जमीन खरेदी करू शकता . मात्र आपण शेतकरी असणे आवश्यक . म्हणजे आपले नावे शेतजमीन असावी . महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन कायदा १९४८ व त्या खालील नियम मध्ये बिगर शेतकरी व्यक्तीस शेत जमीन खरेदी करावयाची असल्यास , जिल्हाधिकारी परवानगी देण्याची तरतूद आहे . मात्र अश्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न १२००० पेक्षा जादा असता कामा नये . त्या मुले परवानगी मिळणे अशक्य . मात्र आपण बिनशेती जमीन खरेदी करू शकता .
महाराष्ट्र तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्या नुसार , प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र खरेदी करता येत नाही .

प्रमाणभूत क्षेत्र प्रमाण प्रत्येक जिल्ह्यात वेगळे आहे . त्या बाबत आपणास तलाठी , भूमी अभिलेख खाते यांचे कडे माहिती मिळेल .
कोंकण जिल्ह्यात हे प्रमाण
वर्कस शेती २० गुंठे
भात शेती १५ गुंठे
बागायत शेती ५ गुंठे
असे आहे

त्यामुळे आपण चार मित्र असाल , तर खरेदी करताना , प्रत्येकी या प्रमाणभूत क्षेत्र एवढे अथवा त्या पेक्षा जादा क्षेत्र खरेदी आवश्यक


उदा
खरेदी करण्यात येणाऱ्या जमिनीचे क्षेत्र ६५ गुंठे आहे . जमीन भातशेती स्वरुपाची आहे . व आपण ३ मित्र आहात तर , प्रत्येकी कमीत कमी १५ गुंठे क्षेत्र खरेदी करणे आवश्यक

एकास जमीन विक्री करावयाची असल्यास दोन मित्रांना अथवा एका मित्रासच विकण्याचे बंधन नाही . आपण कोणास हि विकू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by devendra
27-04-2015
jyotitandel82@gmail.com

सर
जमिनीस १९३२ सालापासून सावर्क्षित कुल असल्यास परतू ३२ग ते ३२ आर लागू नसल्यास त्या जमिनीवर कुलाचा काही हक्क राहतो का तसेच सदर जमीन कुलाच्या ताब्यात आहे अशावेळी कुल सदर जमीन मालक कडून कश्या प्रकारे नावे करता येईल याचे मार्गदर्शन करावे
जमिनीचे स्वरूप काय आहे त्यामुळे ३२ ग ते ३२ र लागू होत नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir E- Class(VARG ) jaminivar Atikarman Gayran jamin kadhi purvi kadhalyas niymit hote tyachi prarkiya kay ahe sadar atikarman Mouja chakur tq manora dist washim yethe kele ahe
सर
स्टे आडर बद्दल माहीती सांगा
१. स्टे आडर देण्याचा कोनाला अधिकार आहे.
२.एखाद्या जमीनीच्या बाबतीत प्रांताधिकारी यांच्या कोटात वाद अथवा अपिल चालू असेल तर प्रांत साहेब त्या न्यायप्रलबिंत जमीनीच्या खरेदी विक्री बाबत व वहीवाटी बाबत स्टे आडर देवू शकतील का?
. अ‍ . जर प्रांत साहेब परवागनी देवू शकनार नसतील तर अशी वस्तूस्थिती असताना त्या जमीनीबाबत स्टे आडर कोन देईल .त्या साठी काय करावे लागेल.
. ब जर प्रांत साहेब परवागनी देनार असतील तर त्यासाठी काय करावे लागेल .
३. सर स्टे आडर कोन देवू शकतो ,स्टे आडर देनेबाबत कोनाला - कोनाला अधिकार आहेत . याबाबत कायद्यात काय तरतूदी आहेत .
४. स्टे आडर देताना काय पाहीले जाते.
५. सर मला स्टे आडर बाबतीत सखोल माहीती हवी आहे मला ती माहीती कशातून ऊपलब्ध होईल .
१. म ज म आ १९६६ चे कलम २५६ अन्वये , ज्या अधिकार्याने निर्णय प्रारीत केला आहे त्यास किव्न्हा अपिलीय अधिकार्यास आदेशाचे अंमल बजावणीस स्थगिती देता येते .
२. स्थगिती आदेश हा अपील / दावा चालू असेल त्या बाबतीत असतो
३. आपण परवानगीचा उल्लेख केला आहे . कोणती परवानगी ?
४. आपण म ज म आ १९६६ चे कलम २५६ वाचा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir devstan ennam asel ter vares nod kerta yeail ka
देव्स्तःन इनाम जमीन , हि देस्थान ला अथवा न्यासाला प्रदान केली असल्यास वारस नोंद करता येणार नाही

मात्र जर देवाचे धार्मिक कार्य करण्यासाठी ( दिवाबत्ती , झाडलोट व इतर ) , व्यक्तीस जमीनप्रदान केलीअसल्यास, वारसनोंदकरतायेयील
प्रदान konas वकोणत्या शर्ती नुसार केलीआहे , त्या वर अवलंबून आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, आदीवासी व्यक्तीने गैरआदीवासी व्यक्तीकडून दिनांक ६/७/१९९४ प्रारंभापुर्वि अथवा प्रारंभानंतर शेतजमिन खरेदी केली. आज रोजी दिनांक दिवसी सदर जमिन जमातीच्याच अथवा जमातेत्तर व्यक्तीस विक्री करावयाची असल्यास म. ज.म.अधिनीयम १९६६ चे कलम ३६, ३६(२), व ३६अ च्या तरतुदी लागु होतीला किंवा कसे.
बिगर आदिवासी व्यक्तीने आदिवासी व्यक्ती,कडून जमीन खरेदी केलेली आहे . त्यासाठी परवानगी घेतली आहे का? घेतली नसल्यास , आदिवासी व्यक्तीकडे जमीन पुनर्स्थापित होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सरळसेवा भरतीने नियुक्‍त झालेल्‍या शिपाई संवर्गातील कर्मचा-यांची जेष्‍ठता सूची तयार करत असताना कोणते निकष लक्षात घेतले जातात त्‍यासंबंधी काही शासन निर्णय किंवा परिपत्र्क आहे का ?
रत्नागिरी ,लांजा,शिपोशी येथे १९७७ साली जमीन एकत्रिकरण योजना राबवली गेली.सदर योजने दरम्यान आम्ही उपस्थितनव्हतो अथवा कोणाला निर्णय घेण्यासाठी मुखत्यार पत्र दिलेले नव्हते.
सदर योजना राबविताना ज्या प्रमाणे गट बांधणी करण्यात आली आहे त्यात योजने पूर्वी माझा माझ्या जमिनीत जाण्याचा माझा हक्क कमी करण्यात आला आहे.म्हणजे माझी जमीन योजने पूर्वी रस्त्यास लागून होती परंतु योजने मध्ये जमीनिंची अदलाबदल करताना माझी रस्त्यास लागून असलेली जमीन लगतचे कबजेदार यांना दिली व मला मागची जमिन देण्यात आली त्यामुळे आता मला माझ्या जमिनीत जाण्यास कुठूनही वाट नाही.व लगतचे कबजेदार यांनी आता पुनर गटबंधणी कारनेस विरोध केला आहे व तसा जबाब उप अधिक्षकांकडे नोंदवला आहे.
त्या साठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रत्नगिरी यांचेकडे अपील केले असता त्यांनी उप संचालक भूमी अभिलेख यांचे कडे तक्रार अर्ज करनेस संगितले आहे..त्या प्रमाणे तक्रार अर्ज सादर केला आहे..
आता सदर अर्ज उप अधीक्षक लांजा यांचे कडे गेला आहे.अशा प्रकारे वाट बंद करण्याचा जमिन धारकाचा योजनेपुरवी असलेला हक्क अधिकार कमी करण्याचा अधिकार सहाय्यक एकत्रीकरण अधिकार्‍यांना नाही.तरीही त्यांनी असे केले आहे.
सर मी २००९ पासून हे प्रकरण भूमी अभिलेख कार्यालयात दाखल केले आहे अजून निर्णय होत नाही मी काय करावे?
म ज म आ १९६६ च्या कलम १४३ प्रमाणे , एखादे शेती मिळकतीत जाण्यासाठी रस्ता नसेल तर ,मध्ये येणाऱ्या. शेतांच्या बांधावरून तहसीलदार रस्ता देऊ शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by devendra
23-04-2015
jyotitandel82@gmail.com

सर
मूळ जमीन मालक हा सर्वे २७१अ व २७१ ब चा मालक असून सन १९७३ रोजी त्याने मधुकर यास सर्वे २७१अ पैकी ४ एकर जागा विकली परंतु दस्त मध्येसर्वे २७१अ पैकी ४ एकर लिहिली असून चतुर सीमा या सर्वे २७१ब च्या असून कब्जे वहिवाट व ताबा हि सर्वे २७१ब चा जागेचा दिला मधुकरने १९९९ पर्यंत सर्वे २७१ ब ची जागा कसली व नंतर मधुकरने १९९९ साली ती जागा वासुदेवला विकली सदर जागेवर वासुदेवने घर बांधले परंतु आज जमिनीचे मूळ मालकाची मुले सदर सर्वे २७१ब जागा विकली नसल्याचे सांगतात सादर विक्रीत मालक हा अशिक्षित होता दस्त मध्ये सर्वे २७१ अ व ब जागा मधुकरला माहित नोवती अशा वेळी वासुदेव काही दोष नसताना दस्त तील चुकीचा दुरुस्ती साठी की कायदेशीर मार्गदर्शन करावे
The Specific Relief Act १९६३ च्या कलम २६ प्रमाणे , दस्त दुरुस्त करून देणे बाबत उप निबंधक यांना आदेशित करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा


Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Akolkar
23-04-2015
ravikirana510@gmail.com

amachi 5 gunthe jamin 40 varshapasun dusaranakade ahe ti milal ka???? krupaya mahiti dya.....
ज्याचे ताब्यात आहे तो देण्यास तयार aslyas मिळू शकते
नाहीतर न्यायालयात दावा दाखल करा . त्याने adverse - possession चा / द्वारे हक्क सांगतला नाही , तर आपणास जमीन मिळूशकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार,

सिंधुदुर्ग येथील कमीत कमी किती गुंठे जमिनीची सरकारी मोजणी होऊ शकते तसेच त्याची प्रक्रिया काय आहे. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील तसेच किती वेळ लागेल ब खर्च काय असेल.
स नंबर किव्न्हा पूर्ण गटाची मोजणी होऊ शकते
उ दा
mul सर्वे नंबर २.४५ एकरचा आहे . मात्र त्याचे पोट हिस्से , तलाठी याने केलेआहेत . आकार्फोड पत्रक झालेले नाही . अश्या पूर्ण सनंबरची मोजणीकरणे आवश्यक
मात्र जर सनंबर आकार्फोड पत्रकहोऊन ०.४० र आहे. व या सर्वे नंबरचीमोजणीकरावयाची असल्यास . ती होऊशकते

क्षेत्रवर अवलंबून नाही


मोजणी साठी उपाधीक्षक भू अभिलेख यांचे कडे अर्ज करणेआवश्यक

तत्काळ मोजणीआठी ३००० शुल्क आहे

सध्या मोजणीसाठी १००० शुल्कआहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, माझे आजोबा आणि चुलत आजोबा हे दोन सख्खे भाऊ होते. ते एकत्र शेती करायचे . पण जेव्हा कुळकायदा झाला तेव्हा ती जमीन चुलत आजोबांच्या नावे झाली. चुलत आजोबाना चार मुले होती, पण नंतर ती जमीन फक्त मोठ्या मुलाच्या नावे झाली. त्या जमिनीला त्यांनी वारस म्हणून इतर कोणाची नावे लावली नाहीत. आता माझ्या वडिलांचे व इतर तीन चुलत भावांची नावे लावली आहेत. पण फेरफार मध्ये माझ्या आजोबांचे नाव सापडत नाही. परंतु मोठ्या काकांनी त्या जमिनीला इतर वारस लावण्यास समती दिली होती. आता ७/१२ वर आजोबांचे नाव आहे .पण आता त्यांचा मुलगा एकट्याला अखंड हिस्सा मागतो, तर त्याचा अखंड हिस्सा द्यावा लागेल काय? आणि जर फेरफार मध्ये आजोबांचे नाव नसेल तर आम्ही हिस्सेदार होऊ शकत नाही का?
या पूर्वी उत्तर दिले आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by anil laxman mane
22-04-2015
anil.mane1987@gmail.com

माझे आजोबा बंडू माने हे
दयाळ भांबेरी या गावी ऑफ झाले आहेत. तर तहशील कार्यालयात चवकशी केली असल्यास मृतू दाखला नाही आहे. अस तहशील करणे सांगितले तर त्या करता मी काय करावे. त्या साठी तुम्ही मला मार्ग दाखवा.






जन्म मृत्य नोंदणी कायदा १९६९ च्या कलम १३(४) अन्वये , आजोबांची ग्राम्पांच्यात दप्तरी नोंद करण्यासाठी , ग्रामसेवक यांना आदेशित करण्यासाठी, तालुका न्यायालयात अर्ज करा .
न्यायालयाने आदेश दिल्या नंतर गरम सेवक आपले आजोबांचीदप्तरी मृत्यनोंदकरेल . आपणास मृत्य दाखला मिळेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्‍कार सर, मला पदोन्‍नती करताना महसुल अर्हता परीक्षा अगोदर उत्‍तीर्ण झालेल्‍या उमेदवाराचा विचार करावा या बाबत मॅटने नुकताच दिलेला निकाल हवा आहे तो मला कृपा करुन माझ्या ई-मेल आयडीवर पाठविण्‍यात यावा.
sir E- Class Atikarman jamin kadhi purvi kadhalyas niymit hote tyachi prarkiya kay ahe
इ क्लास अतिक्रमण म्हणजे काय ?

अपना अशे अतिक्रमण कोठे केले होते ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझे वडील १९७८ पासून ई क्लास जमीन अतिक्रमण करून कसत आहे ती नियमित होण्याची काय प्रर्क्रिया आहे लिपिक मनतात कि नियमित होणे बंद झाले पण आमचे मागील नागरिकाचे ई क्लास अतिक्रमण नियमित झाले मी जिलाधिकारी कार्यालय याचे संकेत स्तलावर पाहणी केली असता अतिक्रमण नियमित यादी व प्रतिशा यादी आहे तसेच माझे वडिलाचे नाव त्यात नाही तरी मला या बाबत सविस्तर माहिती मिळावी विनती

This page was generated in 0.37 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3