जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार
मा. किरण पाणबुडेसाहेब
उपजिल्हाधिकारी

माझे जुने नाव सुधीर गांगर्डे असे होते आणि मी ते बदलविण्यासाठी शासन राजपत्रामध्ये सूचना प्रसिद्ध केली होती व त्यानुसार माझे नाव बदलले आहे आणि ते हर्षल गांगर्डे असे केले आहे, तरी त्याबाबत आपण मला पुढील माहिती द्यावी हि विनंती.
१. मी पदवीधर असून माझ्या SSC, HSC, आणि पदवीच्या गुणपत्रकावर माझे नाव सुधीर असे आहे तरी मला आता पुढे MBA चे शिक्षण घ्यायचे आहे व ते मी कोणत्या नावाने घेऊ, (सुधीर कि हर्षल) त्यासाठी शासन राजपत्र दाखल करता येईल का ?
२. जर मी हर्षल या नावाने शिक्षण घेतले तर मला माझ्या सुधीर या नावाने असणाऱ्या जातीचा दाखला, जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला तसेच अन्य कागदपत्रांचा उपयोग होईल का ?

तरी आपण मला वरीलप्रमाणे माहिती द्यावी हि विनंती.

कळावे,

आपला विश्वासू
हर्षल गांगर्डे
१.या पुढे आपणास हर्शल या नावाचा उपयोग/वापर करणे आवश्यक
२.सुधीर या नावाने काढलेले सर्व कागत्पत्र वापरता येतील . प्रत्य्क्वेली राजपत्र प्रत जोडणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by राकेश
12-03-2015
r.kakare@gmail.com

मी १० मार्च ला एक प्रश्न विचारला होता कृपा करून त्याचे उत्तर देऊ शकता का
------------------------------------------------
10-03-2015 राकेश
r.kakare@gmail.com प्रश्न/सूचना :
दोन्ही प्रतिसाद वाचून थोडा गोंधळ होतोय , कृपया स्पष्ट करा
------------------------------------------------
राकेश्जी
हिंदू वारसा कायदाबाबत , उत्तर देनेत आले आहे
त्याच बरोबर आपले मैल वर माहिती पाठवण्यात आली आहे

हिंदू वारसा सुधारणा कायदा २००५ पूर्वी हि , मुलीना वडिलांचे मिळकतीत हिस्सा होता . मात्र त्यांना वडील हयात असताना जर मिळकतीचे वाटप करावयाचे असेल तर , त्या मध्ये वाटा नव्हता . हा दोष २००५ चे कायद्याने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे

आपणास हिंदू मधील पूर्वीचे coparcenary and dayabhaga succession समजून घेणे आवश्यक .

२००५ पर्यंत कॉपार्सिनार्य succession होते . २००५ नंतर बंद झाले

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by rajaram anpat
12-03-2015
rajaram@gmail.com

कुंडेटकर सर,
आपला उत्तर मिळाले पण माझा प्रश्न असा होता कि १९७० साली माझे आजोबा वारून ३५ वर्ष झाली आहेत आजोबा मायेत झाल्यावर ६ क फेर्फारला माझ्या वडिलांची व आत्यांची नावे वारसदार म्हणून लागलेली आहेत तेंवापासून ७/१२ वरती माझ्या मोठ्या चुलत्याचे नाव ए.कु. में.म्हणून लागलेले आहे चुलत्याने आमची कुणाची आणेवारी न लावता जमीन विकलेली आहे आमचे वाटप पत्र ,साम्म्न्ति पत्र ,हक्क सोड पत्र झालेले नाही .तसेच आमच्या वडिलांच्या/ आत्यांची सह्या घेतलेल्या नाहीत पण आता ती जमीन ए.कु.में नाव कमी करून ती जमीन विकलेली आहे मग ते नाव तलाठी ने कसे कमी केले .आम्ही तलाठी याला विचारले असता त्याने सांगितले कि ए.कु. में. ची नोंद नजरचुकीने झाले आहे,पण सर यामुळे आमची जमीन ७/१२ वर ए.कु. में नाव कमी करून चुलत्याने जमीन विकलेली आहे आता आम्ही काय करू शकतो ,तलाठी यांच्या विरोधात कोणाकडे अपील करू तसेच दावा कोणावर करू चुल्त्यावर करू का तलाठी यांच्यावर करू कृपया मार्गदर्शन करुन सहकार्य करावे. याला जबाबदार कोण
ए.कु. म्या. ज्या फेरफार ने कमी झाले त्या विरुद्ध प्रांताकडे अपील करा. खरेदीखतावर दिवाणी न्यायालया कडून स्थगिती मिळावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Bhushan jadhav
12-03-2015
Ajaymalbhar30@gmail.com

सर, 20 वर्षापूर्वी माझी आई माझ्या वडिलांपासून काही छळाला कंटाळून मला माहेरी घेऊन गेली ....मी 2-3 वर्षाचा असताना माझ्या वडिलांनी दुसरी बायको केली ....तिला आता 2 मुले पण आहेत .....आई आणि मी परत कधी गेलो नही वडिलांकडे.....तर
1.आता मला मालमत्ता व जमिनीचा वाटा मिळेल का ?
2.मिळाल्यास किती प्रमाणात ?
१. आपले वडिलांचे मिळकतीत , त्यांचे मृत्य पश्चात , आपण , आपली आई व द्वितीय पत्नीची २ मुले कायदेशीर वारस आहेत .
२. मात्र द्वितीय पत्नीस वडिलांचे मिळकतीत हिस्सा नसतो .
३. त्यामुळे ४ वार्सामध्ये मिळकतीचे वाटप होणे अपेक्षित .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वडील मयत असतील तर तुम्हाला तुमचा कायदेशीर वाटा नक्कीच मिळेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर आपन 27/02 चे प्रश्ना चेउत्त्तर दिले पण साहेबाना पत्र दिले सर आपन म्हणाले की अक्रुषक झाले परंतु 7/2 कसे ओपन होणार अक्रुषक नकाशा वर शिका लागेल तलाठी नोंद कशी घेणार व विकास परवानगी कोनाकडून घावी अक्रुषक झाल्या चे जीआर ची कॉपी पाठवावी ही विनंती
अजय्जी ,
१. विकास परवानगी ग्रामीण भागात जिल्हाधिकारी देणार .
२. नगरपालिका / महानगरपालिका क्षेत्रात , संबंधित मुख्याधिकारी/ आयुक्त देणार .
३. विशेष नियोजन क्षेत्रात , सबंधित , नियोजन अधिकारी परवानगी देणार.
४. हा शासन निर्णय नाही . कायदा दुरुस्ती आहे .
५. आपले e mail वर कायदा दुरुस्ती अधिसूचना पाठवण्यात आली आहे . कृपया अवलोकन करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गांव आडिवली तां पनवेल जि रायगड
या गावातल्या सर्वे नंबरच्य
5/5/१
5/२
5/10/अ
5/7/१
या जमिनीवर आमची आजी सुं कुल म्हणून दाखल आहेत त्या जमिनीवर सावकार आरविंद प्राॅ ली अहमदाबाद असे
नांव होते त्या जमिनीवर म्हारास्ट्र शासनाचे नाव लागले तर ति जमिन सुं कुलांची आहे ताबा वहिवाट कुलांची आहे तर ति जमिन कुलाच्या नावावर होईल का
म्हारास्ट्र शासनाचे नाव कसे लागले याची फेरफार वरून खात्री करा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Sunil
11-03-2015
sunilnpatil@gmail.com

सर मी शेत जमीन खरेदी करण्यास इच्छुक आहे

परतु सदर जमीनीच्या उतारया मध्ये
नवीन अविभाज्य शर्त
असा शेरा आहे

सदर शेत जमीन ही एकूण ५० गुठठे असून त्यापैकी मी २० गुठठे जमीन विकत घेवू इच्छीतो

सर,
१ सदर जमीन मी विकत घेउ शकताे का
२ सदर जमीनीचे खरेदीखत करताना काही अडचणी आहेत का
3 सदर ५० गुठठे जमीनीपैकी मी खरेदी केलेली २० गुठठे जमीन मला वेगळी करता येईल का,
४- नवीन अविभक्त शर्त म्हणजे काय
५ जर खरेदी करायची असेल तर मला काय करावे लागेल
6 म्हणजेचे सदर जमीन मी विकत येणे योग्य
ठरेल अथवा नाही

याबाबत क़पया लवकर मार्गदर्शन व्हावे
तर मला पुढील व्यव्हार थांबविता येईल अथवा पूर्ण करता येईल
नवीन अविभक्त शर्त म्हणजे शासनाच्या परवानगी शिवाय ती जमीन विकता येणार नाही. शर्त कोणती आहे ते बघा. आपण शेतकरी असाल तर शासनाच्या परवानगीने जमीन विकत घेत यॆइल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर, अंदाजे 20 वर्षापुर्वी 7/12 पुर्नलेखन मध्‍ये झालेल्‍या चुका दुरूस्‍त करण्‍याचे अधिकार कोणाला असतात या बाबत कोठे अर्ज करणे अपेक्षीत आहे. कृपया तात्‍काळ माहिती दयावी हि विनंती
म. ज. म. अधिनियम कलम १५५ खाली तहसीलदार कडे अर्ज करा. ''चुक होऊन २० वर्षे झाली आहेत त्यामुळे विलंब माफ करण्यास प्रांत सक्षम आहेत, त्यांचेकडे अपील करावे'' असे उत्तर घ्या. नंतर प्रांताकडे अपील करा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by राकेश
10-03-2015
r.kakare@gmail.com

दोन्ही प्रतिसाद वाचून थोडा गोंधळ होतोय , कृपया स्पष्ट करा

प्रश्न/सूचना :
तुम्ही जर खालील कायद्याच्या कलम ६ नुसार
Hindu succession act Amendment २००५
६. Devolution of interest of The Hindu Succession (Amendment) Act, 2005-
6 (l). Devolution of interest in coparcenary property.

(1) On and from the commencement of the Hindu Succession (Amendment) Act, 2005, in a Joint Hindu family governed by the Mitakshara law, the daughter of a coparcener shall,--
(a) by birth become a coparcener in her own right the same manner as the son ;
|
|
मला प्रश्न आहे कि हि amendment - On and from the commencement of the Hindu Succession (Amendment) Act, 2005,

ह्याचा नक्की अर्थ कसा लावावा ??

प्रतिसाद :
prospective
श्री. किरण पानबुडे
उपजिल्हाधिकारी
प्रतिसाद :
amendment संमत झाले पासून , त्याची अंमलबजावणी पर्भावापासून
*****************************

प्रश्न/सूचना :
नमस्कार साहेब,
Civil Services संकेतस्थळ चालु केल्या बद्दल आपला मनपूर्वक आभारी आहे.
वरील कायदयाची न amendments ची प्रत कुठे मिळेल.
आणि कुळ कायद्याच्या जमीनी मधे बहिणीं ना किती हिस्सा मिळतो(ज्यांची लग्ने 25 वर्ष्या पूर्वी झाली असतील तर).
एका जमीनी मधे
आई वडील expired (म्हणजे माझे आजी न आजोबा)
2 भाऊ (वडील न त्यांचा भाऊ)
5 बहिनी आहेत (माझ्या आत्या)
किती वाटा असेल त्यांचा न काय काय हकक असतील ह्या विषयी माहिती द्यावी.


प्रतिसाद :
बहिणींना , bhava इतकाच हिस्सा आहे
राकेश्जी ,
आपली शंका व confusion रास्त आहे .

हिंदू वारसा सुधारणा कायदा २००५ अमलात येण्यापूर्वी , मुलीना , मिळकतीमध्ये मुलां इतकाच हिस्सा होता . मात्र हा हिस्सा , वडील मयत झालेवर मिळत असे .
सुधारणा कायद्यापुर्वी , पुरुषांना जन्मताच मिळकतीत हिस्सा मिळत आसे . त्यामुळे वडील हयात असताना सुद्धा , मिळकतीचे वाटप करणे शक्य होते .
उदा . वडील , दोन मुले , तीन मुली अशे कुटुंबातील सदस्य असतील व मिळकतीची वाटणी , करावयाची असेल तर , वडील व दोन मुले यांना प्रत्येकी एक त्रीत्यांश हिस्सा या प्रमाणे , वाटप होत असे . वाटपात मुलीना हिस्सा नसे . मात्र जर वडील मयत झाले तर , वारस म्हणून , दोन मुले व दोन मुली यांना प्रत्येकी एक चतुर्थांश हिस्सा मिले .

हि तफावत दूर करण्यासाठी , सुधारणा कायदा करण्यात आला .
आपणास हिंदू धर्मातील , coparcenary succession व dayabhaga succession समजून घेणे आवश्यक .

मागील उत्तरात , On and from the commencement of the Hindu Succession (Amendment) Act, 2005,
याचा शब्दश अर्थ , prospective हे उत्तर दिले होते . मात्र या बाबत म उच्च न्यायालयाचे निर्णय , या नुसार , बहिणीची लग्ने २५ वर्षापूर्वी जरी झाली असली तरी , वडिलांचे मिळकतीत त्यांना , मुलां इतकाच , अनुसूची मधील वर्ग १ वारसान प्रमाणे होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by shamal palav
10-03-2015
kir.plv@rediffmail.com

Talathi yani hakkasod patrachi nondh kiti divsat karavi
अर्ज मिळताच नोंद करावी, नोटीसा बजावल्या नंतर सर्कलने त्यावर निर्णय घ्यावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by kiran
10-03-2015
kirant.lote94@gmail.com

1967 la mul malakane (A) vektila jamin kharedi khatane vikat dili.parantu (A) vektine kharedi khat Talati office mahde 7/12 var noand karnyasati jama nahi kele . 1968la mulmalkache mrutyu zale. tya mule 1969 LA vars tapas zalyane mulmalkachya mulachya nave ti jamin punha varasla milali. tya nantar 1991 (22) varshane tya mulane ti jamin (B)mansala vikali (B)mansane ti jamin 2014 LA (23) varshane jamin (c)mansala manje mala vikali.A vekati te C vekati paryant 45 varsh zali.mulmalk ani A vekati mayat zali ahet.parantu ata( A ) vekatichya mulane (C) vekatichya manje mazya varti kes dakhal keli ahe.kes ashi keli ahe ki (C) vekati manje maza kharedi khat radha karwa.plz sir aple margdharsan milave.
दिवाणी न्यायालयातून तुमचा हक्क सिद्ध करून घ्यावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

धन्‍यवाद सरजी आपण माहिती दिल्‍याबदृल मी आपला खुप आभारी Thanks

Question by rajaram anpat
10-03-2015
rajaram@gmail.com

तलाठी यांच्या विरोधात कोणाकडे अपील करू शकतो.
Talathi can not decide anything on his own. Hence no provision for appeal against Talathi. Can not understand your exact problem. Pl. explain.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by ambhore atul
10-03-2015
ambhorea@yahoo.com

तालुक्याकडून 7 किंवा 15 दिवसासाठी 100 ते 500 ब्रास चे तात्पुरते गौणखनिज माती परवाने दिले जातात तर असे दिलेले परवाने हे खनिपट्टे आहे असे समजायचे का
'तात्पुरते' हा शब्द लक्ष्यात घ्यावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर
माझ्या वडीलांनी २५/५/१९६२ रोजी आसराजी मल्हारी गिते याच्यांकडून स. न. ४९/१, ४९/२ ४९/४ ,व ४९/६ या शेतजमीनी खरेदी घेतल्या आहेत. तेव्हापासून सदर जमिनी आजपयत आमच्या ताब्यात व वहिवाटित आहेत. सदर खरेदी खताची नोंद १९६२ रोजीच ७/१२ ऊतारयावर घेण्यात आली आहे .व माझ्या वडिलांचे नाव ७/१२ ऊतारयावर दाखल झाले आहे. परंतू सदर खरेदी खताच्यावेळी नजरचूकीने खरेदीखतात आम्ही खरेदी घेतलेल्या स.न. ४९/६ या स.न. नाव टाकायचे राहून गेले आहे .आसराजी मल्हारी गिते हा१६/२/१९६३ रोजी मयत झाला आहे .त्याचे लग्न झाले नसल्यामूळे त्याला ईतर कोनीही वारसदार नाही. त्याला भाऊ अथवा बहिन नाही ,त्याचे आई वडिल पूवीच मयत झाले आहेत.त्याचे आजच्या स्थितीला कोनीच वारसदार जिवंत नाही. मात्र आमचा सदर स.न. त्याच्याच नावावर आहे. सदर स.न. खरेदी घेतल्यापासून आमच्याच ताब्यात व वहिवाटीत आहे.सदर स.न.वर माझ्या वडीलांचे नाव दाखल करायचे आहे . तरी ऊपाय सांगा
If survey no. is not mentioned in Sale deed, no Revenue officer can do any thing to help u.. If there is no legal heir for the land, the land should be confiscated u/s 34 of M.L.R.C. 1966

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Lahanbhau Varpe
10-03-2015
lahanbhauvarpe@gmail.com

7507989306
सर
आमचाकडे कुल कायद्याने
मिळालेली जमीन आहे १९८२ पासून ती आम्हिच करतो पण आमचाकडे फक्त १९८२ चा उतारा आहे व १९८२ ते २००० परियंत भूमी अबिलेख चे रेकॉर्ड आहे पण तलाठी कार्यालयात २००० नंतर कहिच रेकॉर्ड सापडत नाही काय करावा लागेल
रेकॉर्ड सापडत नाही असे प्रमाणपत्र तलाठी कडून घ्या

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

तसे प्रमाणपत्र तलाठी कडून घ्या.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर, निलंबन कालावधीत जर मुख्‍यालय बदलले असेल तर कर्मचा-यास मुख्‍यालयास लागू असणा-या दराने निर्वाह भत्‍ता मिळतो का त्‍याच्‍या मूळ कार्यालयास लागू असणा-या दराने निर्वाह भत्‍ता मिळेल
मुख्‍यालयास लागू असणा-या दराने. तसा आदेश सक्षम अधिकार्याकडून मिळवावा लागेल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर मी विचारलेल्‍या प्रश्‍नाचे उत्‍तर मला मिळाले आहे पंरतु मा.न्‍यायलयाची निकाल दिनांक डिसेबरं 2014 च्‍या निकालाची प्रत मध्‍ये शेवटचे पान क्रं 14 मिळाले नाही कृपया पाठविण्‍यास विंनती आहे
शामराव

निकालपत्राचे पृष्ट क्रमांक १४ आपणास आपले मागणी प्रमाणे mail करण्यात आले आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by narshing
09-03-2015
narshingtugave@gmail.com

sir नमस्कार
me talathi aahe v mazakde yk aarj aalela aahe tyamadhe pudhilpramane mhnle aahe.
Gavthanatil gavacha aantrabdl dakhala denyat yava ase mhnle. 2 gavacha gavthanatil aantr he 700 sq. M aslyacha dakhala denyacha adhikar talatyas aahe ka ? me 2 ggavatil gavthanabdlcha antracha ddakhala deu shakto kka ?
असा दाखला तलाठी याने देण्याचा प्रश्न उद्भवत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
आमची गावाकडे २ एकर ईतकी शेतजमिन आहे.सदर जमिन माझ्या वडिलांनी त्यांचे आजोबा यांच्याकडून १७/१/१९९५ रोजी मा दुय्यम निबंधक यांच्यासमोर नोंदवविलेल्या रजिस्टर खरेदीखताद्दारे खरेदी घेतलीआहे.सदर खरेदखताची नोंद त्याचवेळी लावण्यात आली आहे.तेव्हांपासून सदर जमिन माझ्या वडिलांच्या नावावर व ताबा वहिवाटित आहे. मध्यंतरी दिड वषापूवी सदर जमिनीच्या मालकी संदभात वडिलांच्या चूलत्याने प्रातांकडे सदर जमिनीवरील माझ्या वडिलांच्या नावाची नोंद रद्द करुन मिळनेबाबत अपिल दाखल केले होते. सदर अपिलाचा निकाल आमच्याच बाजूने २/२/२०१५ रोजी लागला. माझ्या वडिलांच्या नावे आज सदर जमिन आहे अशी वस्तूस्थीती असताना
१ ) दिड वषापूवी सदर अपिलाच्या कामकाजाकरिता आमची बाजू मांडणेकामी माझ्या वडिलांनी एक वकिल नेमला होता.माझे वडिल अडाणी असल्याने वकिलाने त्याचा गैरफायदा घेत माझ्या वडिलांना असे सांगितले की" नोटरीसमोर नोंदवलेला एक स्टेम्प पेपर आपल्याला अपिलाच्या कामकाजाकामी हवा आहे' असे सांगून माझ्या वडिलांना फसवून त्याने दिड वषापूवी माझ्या वडिलांकडून नोटरीसमोर नोंदविलेले आमच्या जमिनीचे तीन महिने मूदतिचे साठेखत करुन घेतले आहे.सदर साठेखताबाबत आम्हाला काहीच कळू दिले नाही.पैसेही दिले नाहीत .त्या वकिलाने आमची फसवनूक केली आहे
अ.) सर त्या तीन महिने मूदतीच्या नोटरीसमोर नोंदविलेल्या साठेखतास व्हल्यू आहे काय ?





ब.) सर वकिलाने आम्हांस फसवले आहे त्याच्या विरोधात आम्ही काय कारवाई करु ?
क.)सर त्याला नोटरीच्या आधारावर आमच्याकडून कायदेशिररित्या खरेदी घेणेकामी कोटात जाता येईल क?
ड.)सर वकिलाने आमच्याकडून घेतलेले नोटरी समोरील साठेखत हे तो पून्हा दूसरयास साठेखत म्हणून देऊ शकतो का?
ई.)सर आमची जमिन वकिलाच्या तावडितून वाचवण्याकामी ऊपाययोजना सांगा .
१. या बाबत आपण Bar Council कडे तक्रार दाखल करू शकता.
२.साठे खत अंमलबजावणीसाठी ३ वर्षापर्यंत न्यायालयात दावा दाखल करू शकतो . मात्र सध्या स्थितीत , साठे करारावर हि पूर्ण , स्टंप duty भरणे आवश्यक त्यामुळे , त्याच्या दाव्यास अर्थ राहणार नाही . न्यायालय अश्या स्टंप paper वरील साठे करारास ग्राह्य धरणार नाही . मात्र तो न्यायालयात जाऊ शकतो
३. नाही
४. आपणच न्यायालयात त्याचे विरुद्ध साराचे साठे खत रद्द करून मिळणे साठी न्यायालयात दावा दाखल करा . एकदा साठे करार रद्द झाला के आपणास , चिंता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर निलंबन काळामध्‍ये मुख्‍यालय बदलेले असेल तर कर्मचा-यास मुळ कार्यालयला लागू असणा-या दराने वा मुख्‍यालय असलेल्‍या दराने निर्वाह भत्‍ता मिळेल याविषयी मार्गदर्शन करावे व तसा शासन निर्णय असेल तर त्‍ासेही कळवावे ही विनंती
मुख्‍यालय असलेल्‍या दराने. तसा आदेश सक्षम अधिकार्याकडून प्राप्त करून घ्यावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मा.सराना माझा नमस्‍कार ,
सर मी 18 ऑगस्‍ट 2009 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात रूजू झालेला आहे.व माझे सोबत एकुण निवड झालेले 59 कर्मचारी होते तसेच मी विभागीय दुययम परिक्षा मार्च 2010 मध्‍ये उर्तीण झालो व म‍हसूल अर्हता जानेवारी 2014 मध्‍ये उर्तीण झालेा माझे सोबत लागलेले माझे सहकारी हे माझे नंतर महसूल अर्हता उर्तीण झाले आहे तर त्‍याची विभागीय पदोन्‍न्‍ाती समीती मध्‍ये माझे सोबत लागलेले कर्मचारी ज्‍याची जेष्‍ठता क्रंमाक हा माझे पूर्वीचा आहे तर त्‍यांची निवड अ.का. म्‍हणून माझे नंतर होईल की माझे अगोदर उदा.
1.माझाा जेष्‍ठता क्रमाक 890
महसूल अर्हता उर्तीण जाने 2014
2. माझे सहकारी जेष्‍ठता क्रम 870
महसूल अर्हता उर्तीण डिसेंबर 2014
ज्‍यावेळी पदोन्‍नती समितीची बैठक होईल त्‍यात माझे नावाचा विचार अगा्ेदर होइल की नंतर परिक्षा उर्तीण झालेली दिनांक अगोदर धरतात की जेष्‍ठता क्रमाका नुसार निवड करतात कृपया याबाबत स्‍वंयस्‍पष्‍ट मार्गदर्शन करावे ही नम्र विंनती
शामराव ,
या पूर्वी उत्तर दिले आहे . विभागीय अहर्ता परीक्षा जो अगोदर उत्तीर्ण होतो त्याचे promotion अगोदर , हा नुकत्याच MAT निर्णय दिलेला आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. किरण पाणबुडेसाहेब
उपजिल्हाधिकारी

सर
मला सायबर कॅफेचा व्यवसाय सुरु करायचा असून त्याबद्दल माहिती द्यावी व त्याबाबत असणारे सर्व काही अर्ज असतील तर ते माझ्या इमेल वरती पाठवून द्यावेत हि विनंती.
सायबर कॅफे सुरु करण्यासाठी जिल्हा कार्यालयाने मुंबई पोलिस कायदा अंतर्गत नियम तयार केले असतील तर , परवानगीची गरज आहे
अन्यथा परवानगीची गरज नाही . आपण ज्या जिल्ह्यात राहता , तेथील उप चिटणीस शाखेशी संपर्क साधा . ( तेथे नियम केले असतील तर आपणास अर्जही तेच देतील )

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नगर परिषद हद्दीत असूनही माझा प्लॉट नगर परिषद नकाशावर नाही कारण आमचे प्लॉट तहसीलदार लेआऊट ३६ चे आहेत व नोंद नगर परिषद मध्ये नाही.
करिता नगर परिषद बांधकाम परवानगी देत नाही, गुंठेवारी मध्ये संपूर्ण प्लॉट चे एकदाच रूपांतरण करा असा त्यांचा आग्रह आहे आणि खर्च व उशीर दोन्ही लागेल, एका होम लोन कंपनीने अश्या वेळी तहसीलदारांची बांधकाम परवानगी काढणे सोपे आहे आणि मिळते असे सांगितलं हे खरे आहे काय आणि असल्यास कृपया माहिती द्यावी.
सर, गायरान जमीनीचा वारसा फेर घेण्याकरीता परवानगीची आवश्यकता असते का ? असल्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते.
प्रश्न कळत नाही. गायरान जमीन शासनाच्या मालकीची असते

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.47 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3