जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by devendra
05-05-2015
jyotitandel82@gmail.com
सर
सर्वे ७०१/१ क्षेत्र १२० गुंठे असून सदर जमिनीस दोन कुले गोपाल व राजाराम आहेत त्यापैकी गोपालने मालकाकडून त्यचा हिस्साची १८ गुंठे जागा खरेदी खताने खरेदी केली व नंतर गोपालने १८ गुंठे जागा जनार्दनला विकली आज ७/१२ उतार्यावर मुल मालक व जनार्दन यांचे नवे असून कुल म्हणून राजाराम याचे नाव आहे माझा प्रश्न असा आहे कि सदर ७/१२ उतर्यातून जनार्दन च्या हिस्साची १८ गुंठे चा विभक्त ७/१२ करता येईल का कारण धारा कुल राजाराम भरतो आहे व जमीन मोजणी कुल करू शकत नसल्याने काय करावे
कुळाचे नावे विक्री किंमत निच्छित करून घ्या . कुळाचे नाव मालक सदरी दाखल झाल्यावर , आपण भूमी अभिलेख खात्याकडून मोजणी करून घेऊ शकता . मोजणी नंतर आकार फोड पत्रक भूमी अभिलेख खात्याकडून प्राप्त झाल्यावर , आपला ७/१२ स्वतंत्र होईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विध्याधर मोकाशी
05-05-2015
vishvidhyam@gmail.com
साहेब,
माझ्या प्रश्नाच्या उत्तर दाखल आपण दुरुस्ती वाटप पत्र करण्याचे सुचविले आहे, परंतु मुल वाटप पत्र जे वडिलांनी त्यांच्या भावांमध्ये केले होते त्याची प्रत आमच्या कडे नाही तसेच ती त्याकाळी नोंदवली होती कि नाही ते माहित नाही, अत्ता काका व आमचे सर्वांचे वडिलांच्या पश्चात नवे ७/१२ वारस लागले आहेत तर दुरुस्ती वाटप पत्र करता येईल का? याची चौकशी कोन कडे करावी लागेल? ताब्य प्रमाणे नवी करायचे झ्याल्यास स्टम्प डूटी नोदणी फी भरावी लागेल काय व किती? भरावयाची नसल्यास उपाय काय? कारण जमीन हि वडलोपार्जित आहे.
जर नोंदणीकृत वाटप झाले नाही तर वाटप प्रमाने ७/१२ स्वतंत्र झाले आहेत का ? ७/१२ स्वतंत्र झाले नसतील तर , आपण आताही वाटप पत्र करू शकता . मात्र त्यास सर्वांची संमती आवश्यक
मात्र ७/१२ स्वन्त्र झालेला असेल तर , आपणास आता वाटप करता येणार नाही . अथवा आपणास न्यायालयाकडून पूर्वी झालेली वाटप चुकीच्या पद्धतीने झाले असल्याने , ते रद्द करून देणे बाबत व नव्याने वाटप करणे बाबत दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक पाटील
05-05-2015
rachnavinay123@gmail.com
Dear Sir,
Me Alibaug yethil rahiwasi asun, maza prashna khalil pramane.
Apan please hyache uttar deun smadhan karave he vinanti.
Prashna: Sir,
1) Mazya Panjobanchi 194 Gunthe itki shet-jamin hoti. Tya utaryavarti, Ajobanche bahu ani bahini hyanchi nave hoti.
Kahi varshanpurvi, chulat Ajobanni vatapa karita "divani khatla" dakhal kela va nantar khatla mage gheun sarva sammatine vatapa karita magni keli.
Ajoba va sarva bhavandani sarva sammatti ne jamini-che vatap patra kele va tya nusar Alibaug Ragistar office madhye vatap patra karun ghetle.
Chultyanni tyanchya vatyala aalelya jaminichi vikri suddha keli.
2) Ajobanchya mrutyu pashyat, tyanchya vatyala alelya jaminiche vatap, maze vadil va tyanchi bhavande hyanchyat vhave ashi magni hou lagli.
Tya-nusare kahi divasan-purvi, sarva-sammattine hee jamin maze vadil va tyanchi bhavande hyat vatap patra-dware vatanyat aali. Registar office Alibaug yethe sarva bhavandanni jaun swaksharya kelya aahet.
Sir, Varil donhi babinmadhye, a) Shetichi mashagat; b) Shet-sara bharne c) Court kacheri cha kharcha d) bhavandancha sambhal tasech tyanchi lagna ....... ashi anek karne lakshat gheun, case 1) madhye Ajobanna tasech; Case 2) madhye Vadilanna sarva samattine jyada jamin vatap karnyat aali aahe. Sarva jamini che hakka sod patra (vatap Patra) registar zale aahe. Sarva bhavandanni registar office madhye jaun swaksharya kelya aahet.
Varil sarva bab lkshat gheta, bhavishyat amchya vatyala aalelya jaminit, aamche chulte( Ajobanche Bhavande) va Mazya Vadilanche bhavande konta dava,hakka sangu shaktat ka. sadar jamin aamchya tabyat asun tithe developement karnya purvi mazya manatli hya khup motha prashnala aapan uttar dyave he vinanti.
विनायकजी
आपण सखोल माहिती दिली , त्या बद्दल धन्यवाद
१. पणजोबांचे मिळकतीचे व नंतर आजोबांचे मिळकतीचे सर्व संमतीने वाटप झाले आहे . वाटप जसे झाले त्या प्रमाणे जमिनीचा ताबा व ७/१२ प्रत्येकाचे नवे झाले असतील तर , भविष्यात प्रश्न निर्माण होणार नाही अथवा चुलत आजोबा यांचे वारस , चुलते -त्यांचे वारस , तुमच्याकडे जड देण्यात आलेल्या मिळकती बाबत हक्क सांगणार नाहीत.
२. मात्र झालेले वाटप , हे कोणताही fraud करून अथवा चुकीची माहिती आधारे झालेले नसावे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेंद्र मधुकर साळुंखे
04-05-2015
vighnarajendras@gmail.com
१९८० साली कोकणातील एकत्र कुटुंब पध्दतीमुळे वडिलांच्या (आजोबांच्या) मृत्यूमुळे त्यांच्या नावावरील सबंध मालमत्ता (गावातील जमीन व मुंबईतील घर) कुटुंबप्रमुख म्हणून मोठ्या मुलाच्या (काकाच्या) नावे आहे. माझे वडील लहान भाऊ होते, त्यांच्या मृत्युपश्चात सदर मालमत्तेत सह हिस्सेदार म्हणून माझ्या आईचे नाव नोंदवण्यासाठी काकासोबत सामंजस्य करार करता येईल का ?
कृपया माहिती द्यावी, धन्यवाद
आजोबांचे मिळकतीत आपला हक्क आहे . त्या साठी साम्जास्या करार कश्यासाठी ?
हक्क मग तो देणे काका यांना क्रमप्राप्त आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shirish Chavan
04-05-2015
shirish8985@rediffmail.com
Hakka sod patra karnyasathi lagnare doc. Ani hakkasod patrasathi aslele niyam va ati
१. हक्क सोड पत्र करण्यासाठी , ज्या मिळकती संदर्भात हक्क सोडण्याचा आहे , त्या मिळकतीचे अधिकार अभिलेख ( ७/१२)
२. जी व्यक्ती हक्क सोडणार आहे त्याचे ओळख पुरावे
३. हक्क सोड करण्यासाठी लागणारी नोंदणी शुल्क व मुन्द्रंक शुल्क
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जयंत शं. मुथा
04-05-2015
jayantmutha@yahoo.com
प्रथम ह्या सुविधा व उपक्रमाबद्दल अभिनंदन व धन्यवाद---
विकास योजना लागू असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील मंजूर अभिन्यासामधील मोकळी जागा व अमीनिटि प्लॉट मधील फरक काय.
अमीनिटि प्लॉटवर बांधकाम नियंत्रण नियम व अमीनिटि प्लॉटची मालकी, खरेदी व विक्री बाबत नियम काय आहेत.कृपया सविस्तर माहिती मिळावी
Amenity म्हणजे रस्ते , बगीचे , शाळा , मैदाने , मनोरंजन ठिकाणे , सार्वजनिक रस्ते इत्यादी
कलम २(२) - महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ . पहा
मोकळी जागा म्हणजे जी जागा विकसित केली नाही
या जागा विक्री करता येत नाही . या जागा स्थानिक स्वराज्य संस्था यांचे मालकीच्या असतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रशांत कदम
03-05-2015
prashant.kadam7@gmail.com
स.न. 1972 रोजी माझी आजी कै.ताईबाई कदम यांनी नाशिक येथे प्लट खरेदी केला. सदर खरेदीखत दुय्यम
निबंधक यांचे कडे नोंदविलेले आहे. परंतु सदर जमिनीस (7/12) नाव लावले
नाही. याच जमिनीवर आम्ही घर बांधुन राहात असुन त्याची घरपट्टी नगर
परिषदेस व महानगर पालीकेस अदा करीत आलेलो आहे.
सन 2009 मध्ये माझे वडीलांचा स्वर्गवास झाला. मला सदर जमिनीस माझे , माझे
भाऊ व अन्य वारस यांचे नाव लावायचे आहे यासाठी मला पुढील गोष्टीसाठी
मार्गदर्शन करावे ही विंनती.
1. या जमिनीचा नजराना आजच्या बाजार भावाने भरणे अपेक्षीत राहीत
किंवा खरेदी च्या वेळच्या मुल्यानुसार व त्याची प्रक्रिया काय असते
2. या संबधीत काही शासन निर्णय, कायदा असल्यास त्यांचे दि. अथवा
क्रमांक , विभाग
3. वरील जमिनीस भोगवट वर्ग -2 म्हणुन नाव लावता येवशकते का व
त्यासाठी काय प्रक्रीया असते.
१. आपण कथन केल्यानुसार , जी जमीन आपले आजीने खरेदी केली आहे व ती वर्ग १ असेल तर , आजीचे सर्व वारसांची नावे मिल्कतीस लावता येतील
२. मात्र मिळकत वर्ग २ ची असल्यास , सक्षम अधिकारी यांची , मिळकत खरेदी करण्या पूर्वी परवानगी घेणे आवश्यक होते .
३. आपण कथन केल्यानुसार , मला सदर जमीन वर्ग २ ची असावी अशी वाटते
४. जमिंचे स्वरूप विस्तृत पाने स्पष्ट करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिनव kadam
03-05-2015
abhinavukadam@gmail.com
सर,
7/12 वर promolgation होणेवर असे लिहले जात आहे तरी याचा सविस्तर अर्थ सांगा? व याचा तोटा होऊ शकतो का?
promulgation म्हणजे प्रख्यापण .
७/१२ दर १० वर्षांनी लिहला जातो . नवीन लिहलेला ७/१२ जुन्या ७/१२ शी पडताळणी केली जाते
मंडळ अधिकारी यांनी १०० % ,७/१२ पृष्ठे तपासणे आवश्यक ( सर्व पृष्ठे )
तहसीलदार यांनी १० % , पृष्ठे तपासणे आवश्यक आहे
उदा , एका गावात २४०, ७/१२ पृष्ठे आहेत ( हिस्सा / पोट हिस्सा धरून ) . मंडळ अधिकारी यांनी २४० तर तहसीलदार यांनी २४ पृष्ठे तपासणे आवश्यक
हि तपासणी झाल्यानंतर , तहसीलदार शेवटचे ७ /१२ वर , तपासणी / पडताळणी केलेल्या ७/१२ चे सर्वे नंबर नमूद करून ७/१२ प्रख्यापण झाले असा शेरा लिहतात . त्या नंतर नवीन ७/१२ उपयोगात आणला जातो
या प्रज्रीयेस ७ /१२ प्रख्यापण असे म्हणतात . अशी तपासणी प्रलंबितअसेल म्हणून , प्रख्यापण होणे वर असा शेरा नमूद केला असेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिनव कदम
03-05-2015
abhinavukadam@gmail.com
महोदय,
मी दिनांक ७/१२/२०१३ रोजी माझ्या गटाची मोजणी करणयासाठी पैसे भरले तयानुसार माझी मोजणी झाली व मला 'क' परत देणयात आली. तयानंतर तयालगतचे आमचे व चुलत भावांचे गटाची मोजणीसाठी आमही पैसे भरले.व दिनांक २९/०५/२०१४ रोजी मोजणी व जबाब झाले.
तयानंतर दोन दिवसांनी दिनांक31/05/2015 रोजी हे पाच गट वगळता गावातील शेजारचा गट जो इनाम आहे आणी तयामधये तबबल 80 लोक आहेत तया गटातील 8 वयकतींनी तकरार अरज मोजणी झालयानंतर दिला.
तद् नंतरभूमी अबिलेख कारयालयाने आमहाला पेरमोजणीची नोटीस काढली परंतू तया दिवशी मोजणी झाली नाही.तयानंतर आमहाला परत मोजणीची नोटीस काढली परंतू मोजणी सुरू असताना पाऊस आला.
एका गटाची मोजणी झालेली आहे व क परत देणयात आलेली आहे व तया शेजारील गटाची मोजणी होऊण एक वरष झाले तरी क परत देत नाही.साधया तकरार अरजावरुन क परत अडवता येते का?व क परत मिळणयासाठी काय करावे?
जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधा व वस्तीस्थिती आम्हाला कळावी असा अर्ज द्या
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by राजेंद्र पाटील
02-05-2015
patil.rajendra@gmail.com
एक्स हा प्लॉट 30 वषापुर्वी वाय या व्यक्तीस देणेत आलेला आहे. तथापि सदर व्यक्ती त्या जागी राहत नाही. ते परगावी कोठेतरी राहतात . सदया एक्स या प्लॉटवरती झेड ही व्यकत्ी राहत असून त्यांनी सदरचा प्लॉट मिळविता येईल का ?
निरंतर, अव्ह्यात , शांततामय मार्गाने सलग ३० वर्षे ताबा असेल तर प्रतिरोध ताबा कायद्यानुसार दिवाणी कोर्टात प्रकरण दाखल करा
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Adverse possession या तत्वानुसार मालक म्हणून जाहीर करून मिळणे बाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by prashant chunarkar
01-05-2015
p.chunarkar786@rediffmail.com
Dhanyavad sir mazya 28/4/2015 la prashna kramank 3 che uttr dilya babddal pan त्यात thodishi mahiti ankhi add karaychi hoti ti mhnje
Maze ajoba karuji 1952-58 parynt sheti krit hote tyana 2 mul hoti tyache nav ramchandra v ganpat ani anjanabai as tyachya patniche nav hote v te 1959 madhe varle v mazya आजीने म्हणजे अंजना बाई ne dirashi mhnje mengashi lagn kel tyana 9 aptya zali tyanantr ti jamin 1960-61 menga hyachya navane ti jamin 38e pramane decleare zali v te २००१ madhe varle त्यानंतर त्यांचा पूर्ण अपत्यांचे नाव त्या ७/१२ व चढले आमचे नाव वारसान म्हणून नाही लावले तर आमचा वारसान म्हणून त्याच्या ९ मुलां बरोबर हक्क राहील का करुजी ची जमीन mhanun मालक होईल का खर म्हणजे मला हे जाणायच आहे त्या जमिनीवर आम्हाला काय म्हणून हक्क मिडेल कृपया मार्गदर्शन करा dhanyavad
Question by राजेंद्र पाटील
01-05-2015
patil.rajendra@gmail.com
एक्स व्यकतीने परगणा वतन इनामर्ग 5 च्या जमीनीची सहापट रक्कमभरलेमुळे सरकारचे नांव कमी करुन नवीन अविभाज्य शर्तीवर तबलीस न करणेच्या शर्तीवर जमिन मिळालेली आहे. सदर जमीन विक्री करावयाची झालेस महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक /वतन/1099/प्र.क्र./233/ल-4 दिनांक 09/07/2002 प्रमाणे परवाणगी घ्यावी लागणार नाही अगर कसे याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
Question by सुजाता मोरे
01-05-2015
sujatamore28@gmail.com
१. माहितीच्या अधिकाराचा वापर करून आपण Airetl सीम कार्ड कंपनीकडून सुटलेले, घेतलेले आणि मिस call बाबत माहिती मागवू शकतो का ?
२. पोलीस ज्या वेळेस सीम कार्ड कंपनीकडून सुटलेले, घेतलेले आणि मिस call बाबत माहिती मागवितात त्यावेळेस यापैकी सर्व माहिती त्यांना मिळते का ?
३. सीम कार्ड कंपनीकडून सुटलेले, घेतलेले आणि मिस call बाबत माहिती मिळविण्यासाठी काय करावे ?
१. नाही
२.होय
३.आपणस पोळीचे तपासाठी आवश्यक असेल तरच हि मिळू शकते . या साठी आपणास गृह विभागाकडे अर्ज करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by devendra
01-05-2015
jyotitandel82@gmail.com
सर
जमिनीस दोन कुले कमला व राघो आहेत मालक पुशोत्तम कडून कुळ राघोने १९५६ साली खारेदिखाताने जमिनीपैकी १७ गुंठे जमीन खरेदी केली व सदर जमीन कुळ राघोने दुसर्या व्यक्ती जनार्दन ला विकली आता सातबारा उतार्यावर मालक म्हणून मुल मालक पुरषोत्तम व जनादन आहेत व कुल म्हणून कमला आहे एकूण जमीन ९३ गुंठे आहे सदर जमीन कुल कमला सर्वे करू शकत नाही परतू सदर मालक जनार्दन च्या हिस्सा १७ गुंठे चा आकार फोड करू शकतो काय कारण जनार्दन जमीन मोजणीसाठी परवानगी देत नाही व मुल मालक मयत असून ते बाहेगावी राहतात सदर जमिनीचा धारा कुल भरतो तेव्हाजनार्दन च्या खरेदी खताच्या आधारे आकार फोड करू शकतो काय व आकार फोडाच्या आधारे सातबारा विभक्त करू शकतो काय मार्गदर्शन करावे
Question by devendra
01-05-2015
jyotitandel82@gmail.com
सर
श्री बेंडू यास जमीन मालक श्री बाजी यांनी १८९२ साली एकूण २० सर्वे नंबर च्या जमिनीपैकी त्यांचा १/२ हिस्सा फारोखात खताने विकला परंतु फरोक्त खातात तुम्ही सांगाल तेव्हा स्व खर्चाने नावी करून देवू असा उल्लेख केला बेंडू हे अशिक्षित होते सदर खरेदी खात करणारे बेंडू व बाजी मयत झाले १९४५ साली बेंडू चा मुलगा राम हा बाजीचा मुलगा पुरषोत्तम कडे गेल्यावर त्यांनी सदर खरेदी खताचे पुन्हा साठे पत्र तयार करून राम कडून ३००० रुपये पुन्हा घेतले पण साठे पत्र तील जमीन हि बाजी किवा पुर्शोतामच्या नावी नोवती तेवा त्यांनी त्यांच्या नवे असलेल्या २० जागा नावी करण्याचा कागद तयार केला पण त्या पैकी १० जागा नावी करून देण्यात आल्या व १८९२ च्या खरेदी खतावर १९४६ साली सदर जागा देण्या आली असा शेर मारून पुरषोत्तम याने सही केली आहे राम हा अशीषित असल्याने १८९२ च्या खरेदी खात काय लिहिल्याच माहित नोव्हात अश्या वेळी १८९२ च्या खरेदी खातात दिलेल्या जमिनी बाजीच्या नावी नसतानाही त्यांनी खरेदीखत करून दिले व त्यांच्या मुलाने स्व खर्चाने नावी करून द्यावयाचे असतानाही राम कडून १९४६ साली ३००० घेतले व जमीनही दिली नाही व जमीन दिल्याचा शेर लिहिला आहे सदर व्यवहारात रामची फसवणूक झाली अशावेळी जमीन मालकावर दावा करू शकतो काय
Question by निलेश सदाशिव पाटील
30-04-2015
nsp.00111@gmail.com
नमस्कार सर , मी 2007 साली श्री बालू जमभुलकर या व्यक्ति कडून 47 गुंठे जमीन विकत घेतली . हा व्यवहार चालू असताना ती व्यक्ति मयत जाली . नंतर आम्ही त्याच्या पत्नी कडून व आई कडून सदर व्यवहार पूर्ण करून घेतला. बालू जामभुलकर याला 3 भाऊ व 5 बहिनी आहेत . त्यातील एक बहिन मयत आहे. व्यवहार चालू असताना आम्ही त्याच्या 4 बहिनिंच हक्क सोड पात्र बनावुन घेतल आहे व त्याचा मोबदला त्याना दिलेला आहे.जी बहिन मयत आहे तिच्या मुलानी व बालू जामभुलकर च्या एका भावाने अत्ता (2014 साली)कोर्टात दावा दाखल केलेला आहे. 1992 साली त्यांच वाटनी पत्र ज़ल्याची नोंद फेरफार वर आहे.( वडिल मयत ज़ल्यावर 8 वर्षानी वतनी जाली) त्यावेळी बहिनिना कुठलाही वाटा दिल गेल नवत .म्हणून आम्ही जमीन घेताना त्यांच हक्का सोड करूँ घेतल. त्याच्यात वाटणी पत्र जाला त्याच्या आधी (अंदाजे 10 वर्ष) बहिणीचा मृतु जाला आहे . वाटणी पत्र जाल तेव्हा त्याच्या भावाच्या वाट्याला दूसरी जमीन दिलेली आहे. त्यानी आमच्यावर केलेला दावा योग्य आहे का ? भावाला दूसरी जागा दिली असताना ह्याजगेत कितपत हक्क आहे? असल्यास कोणत्या कायद्या प्रमाने त्याना दोघना हिस्सा मिळेल ? व किती हिस्सा मिळेल? कायद्या नुसार पुरावा म्हणुन फेरफार योग्य व पुरेसा आहेका?
१.दावा दाखल करण्याचा प्रत्येकाला हक्क आह्रे . त्यांचा दावा योग्य आहे का नाही त्या बद्दल , न्यायालय ठरवेल .
२.जमीन घेताना आपण title search केला असेल व papar notice दिली असेल व त्या वेळी कोणी हरकत घेतली नसेल तर , आपणा विरुद्ध निकाल जाणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by समीर जगताप
30-04-2015
spj100@rediffmail.com
आमचे गावी वडिलोपार्जित घर असूनत्यावर चुलतभावांचा ताबा असून घरपट्टी व सर्व कर आम्ही
भरत असूनआम्हाला ताबा मिळण्यासाठी काय करावे लागेल
कोठे अर्ज केला पाहिजे याची
माहिती मिळावी
वडिलोपार्जित घर म्हणजे आजोबांचे घर आहे का ?
जर आजोबांचे घर असेल तर आपणास त्या मध्ये हक्क आहे
आपण आपला हिस्सा मिल्नेसाठी व हिस्स्याच्या मिळकतीचा ताबा मिल्नेसाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जोशी सुनील गंगाधरराव
30-04-2015
suniljoshi052@gmail.com
सर,
शासनाने सेवा अधिनियम लागू केला आहे सदर अधिनियमाची अंमलबजावणी करतांना ब-याच अडचणी समोर येतील असे वाटते उदा. जून-जूलै या महिन्यामधे मोठया प्रमाणावर जातीची,उत्पन्नाची रहीवाशी प्रमाणपत्र द्यावी लागतात द्याव्या लागणा-या प्रमाणपत्र्ाची संख्या विचारात घेता कमी वेळात जास्तीतजास्त प्रमाणपत्र्े निर्गमीत करतांना अडचण निर्माण होणार आहे
त्यासाठी जादा कर्मचारी वर्गही नाही तसेच सदरचे काळात प्राथम्यक्रमाने करावयाची कामे जसे नैसर्गीक अपत्ती निवडणूका इ.मुळे वेळेत कामे करणे अवघड होणार आहे अशा प्रसंगी सेवा अधिनियमातील तरतुदीनुसार होणारा दंड इ. बाबत मार्गदर्शन करणेस विनंती आहे.
Question by SHAM
30-04-2015
choudhary.sham64@gmail.com
मा.सर नमस्कार ,
सर ज्यावेळी पदोन्नती समतिीची बैठक असते त्यात तलाठी तून मंडळ अधिकारी यापदासाठी निवड करायची असल्यास त्याची नियमावली ही वेगळी असते की लिपीक जक अ.का याचे सारखी त्याची निवड करण्याची पध्दत आहे जर वेगळी असेल तर त्याचे शासन निर्णय किंवा परिपत्रकाची दिंनाक देण्यात येवून मार्गदर्शन व्हावे ही विंनती आहे
Question by prashant chunarkar
30-04-2015
p.chunarkar786@rediffmail.com
38 e pramane jamin decleare hone mhnje kay
Question by नागेश काळे
29-04-2015
nageshkale051@gmail.com
नमस्कार
साहेब मी करमाळा तालुकयातील रहीवासी आहे. आमच्या आजोबांना 1955 साली कुळ कायद्याने सर्व साधारण कुळ म्हणून जमीन मिळाली. माझे आजोबा अशिक्षित असल्याने २ पार्ट्यानी त्याचा बरोबर व्यवहार करून जमीन विकत घेतली. त्यानंतर ७/१२ काढला तर त्यावर कुळ कायद्या विरूद्ध व्यवहार असा ईतर हक्की शेरा येतो. साहेब आज विचार केला तर या घटनेला खूप वर्षे लोटली आहेत. त्यामुळे आम्ही काय करावे क्रुपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
आता काही करता येणार नाही
१. सध्या जमीन कोणाचे ताब्यात आहे ?
२. जमीन शासन जमा झाली आहे का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मेघराज पेंदाम, भंडारा
29-04-2015
sonkusare.ghanshyam@gmail.com
सर, महाराष्ट्र जमिन महसुल अधिनीयम १९६६ चे कलम ३६ मघ्ये कोणकोणत्या प्रकारच्या जमिनीचा समावेश केलेला आहे./अंतर्भाव आहे.
Question by Vinod Dapat
29-04-2015
vinoddapat@gmail.com
नमस्कार सर
१.कुळ कायदा कलम ४३ च्या शती॓स पात्र.
म. ज. म. अ. १९६६ कलम ३६ व ३६ अन्वये हस्तांतरणास बंदी .
२. फोरेस्ट खात्याच्या खाजगी वन म्हनून १ ते ६ अटीवर.
ही जागा नावावर करने आहे आदीवासी कडून आदीवासी कडे.सूरवाती प्रसून या बद्दल माहीती सांगावी. ?
१. कुल कायद्या अंतर्गत जमीन व्यक्तीचे नावे झाल्यावर , अश्या कुल मालकास , १० वर्षाचे आत मिळकत विकावयाची असल्यास , प्रांत अधिकारी यांची परवानगी आवश्यक
२.सदर उजमीन आदिवासी खातेदार यांचे मालकीची आहे त्यामुळे , अशी जमीन शासनाचे पूर्व परवानगी शिवाय विकत येत नाही
३.जमि खाक्गी वन आहे त्या मुले या जागे वर वन या प्रयोजानाशिवाय अन्य वापर करता येनात नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vinod Dapat
29-04-2015
vinoddapat@gmail.com
नमस्कार सर
१.कुळ कायदा कलम ४३ च्या शती॓स पात्र.
म. ज. म. अ. १९६६ कलम ३६ व ३६ अन्वये हस्तांतरणास बंदी .
२. फोरेस्ट खात्याच्या खाजगी वन म्हनून १ ते ६ अटीवर.
ही जागा नावावर करने आहे आदीवासी कडून आदीवासी कडे.सूरवाती प्रसून या बद्दल माहीती सांगावी. ?
Question by SHAM
29-04-2015
choudhary.sham64@gmail.com
नमस्कार सर मी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे लिपीक या पदावर आहे .आमच्या येथे पदोन्न्ाती समितीची बैठक होणार आहे .बैठकी पूर्वी लिपीक संर्गातून पात्रता यादरी प्रसिध्द करण्यात आली आहे .परतु या यादी मध्ये जे अगोदर महसूल अर्हता उर्तीण झाले त्यांचा क्रंमाक हा नंतर पास झालेल्या लिपीका नंतर आहे मी महसूल अर्हता परिक्षा उर्तीण 18.01.2014 रोजी झालो .पंरतु यादी मध्ये लिपीक संर्गातील जेष्ठते नुसार यादी प्रसिध्द केली आहे.माझा त्यात 20 क्रंमाकावर माझे नांव आहे जे 19 जण आहे त्याचा जेष्ठता क्रमाक हा माझे पूर्वीचा आहे म्हणजे 870 व माझा जेष्ठता क्रमाक 890 आहे व ज्याचा 870 हा जेष्ठता क्रमाक आहे तो नंतर अर्हता परिक्षा उर्तीण केलेला आहे आता पदोन्नती च्या बैठकीत जेष्ठते नुसार निवड करणार की अर्हता परिक्षा उर्तीण दिनांका नुसार जर जेष्ठते नुसार निवड होत असेल तर मी कोणती भूमीका घ्यायला पाहिजे या बाबत कृपया मार्गदर्शन.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
