जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by कुणाल अंकुश जाधव, लिपिक
07-07-2014
mr.k1387@gmail.com
एका मंडळ अधिकारी यांची एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात बदली झालेली आहे. बदली झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त केलेले आहे. परंतु, ते बदली होऊन दीड वर्ष झाले तरी बदली झालेल्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. तर त्या कर्मचाऱ्याचे "सेवा पुस्तक व अंतिम वेतन प्रमाणपत्र" कोणत्या कार्यालयाकडे पाठवण्यात यावे ?
जिल्हाधिकारी कार्यालय की बदली झालेले तहसील कार्यालय ? कृपया मार्गदर्शन मिळावे.
Question by कुणाल अंकुश जाधव, लिपिक
07-07-2014
mr.k1387@gmail.com
शासकीय सेवेत असताना अपंगत्व आले असेल तर अपंग असल्याचे फायदे घेता येतात का ? त्याबाबत शासन निर्णय असल्यास मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे.
शाशकीय कर्मचार्यास सेवेत astana अपनगतव आल्यास , व तो काम करण्यास असमर्थ असला तरी त्यास नोकरीतून काढून टाकले जात नाही अथवा कमी केले जात नाही. सेवानिवृत्त होए पर्यंत त्यास नोकरीत ठेवले जाते.विहित पद्धतीने त्यास पदोनति हि दिली जाते.
उपचार खर्चाची परतफेड हि शाषण करते.
The Persons with Disabilities (Equal Opportunities, Protection of Rights and Full Participation) Act, 1995
Section 47 प्रमाणे हे सौरक्षण देण्यात आलेले आहे.
या पेक्षा कोणता वेगळे फायदे अश्या कर्मचार्यास आवश्यक आहेत.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
04-07-2014
mohanmsutar@gmail.com
सर
७/१२ मदे इतर हक्कात बिगर कब्जेदार वारसदार यांची म्र्युत्यू झाला आहे. सदर त्यांचे वारसदार २ मुलगा व ३ मुलगी असेल तर त्यामधील एकाचे उपस्तीतीवर अर्युडेत स्टंप करता येईल काय ? एकाच वेळी वारसा नोंद हक्क सोड पत्र दोन्ही करता येईल काय? इतर हक्कातील म्र्युत्यू झाल्यास त्यांचे वारसदारांचे वारसा नोंदीचे नियम सांगावे विनंती.
Question by मोहन
04-07-2014
mohansutar52@gmail.com
सर
१९९७ मदे भूसंपादन झाले आहे.२०११ मदे १२ नुम्बेर नोटीस दिले सदर व्यक्तींचे ४ एकर शेत जमीन उरले .त्या व्यक्तींना प्रकल्पग्रस्त दाखला मिळतो का ? जर ती व्यक्ती नातेवाईकांचे काहीषेत जमीन नसलेस त्याला प्रकल्पग्रस्त मिळ्वनेसाथि समती देत येईल काय?
कमीत कमी २० गुंठे क्षेत्र जर संपादित झाले असेल तर , प्रकल्प ग्रस्त दखल मिळेल.
नातेवायिक यामध्ये केवळ मुलगा/ मुलगी / नातू/ नात यांचा समावेश होतो.
या पैकी जर असेल , संमती देत येईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vijay
03-07-2014
vv_rt@rediffmail.com
फळबागावर राेहयो कर व भाजीपालावर शिक्षण कर घेणेबाबत काही शासन निर्णय आहे की,याची माहिती मिळावी
आपला आभारी आहे
महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (अधिभार) कायदा १९६२ च्या कलम ४ ब प्रमाणे शिक्षण कर ऊस ,बागायती कापूस, खाण्याची पाने , केली , द्राक्ष, सुपारी, तंबाखू , हळद , चिकू पिकवणाऱ्या शेत जमिनीबर लावला जातो.
या कायद्याच्या कलम ६ ब प्रमाणे बागायती pike पिकवणाऱ्या जमिनीबर रोजगार हमी कर लावला जातो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल
03-07-2014
jaganthakare58@gmail.com
महाशय माझी माहिती वाचून मला मार्गदर्शन करावे माझ्या वडिलांनी माझ्या चुलत काकान कडून जमीन विकत घेतली आहे . सन 1992 मध्ये पण त्या वेळेस काकांनी खरेदीपत्र न करता तलाठी यांचाकडे फक्त ७/१२ उतारा त्यांचा नावे केला आहे .तसेच ड पत्रकात भाऊ हिस्सा म्हणून फेरफार करण्यात आली आहे .
तसेच काकांनीही जमीन विकत घेतली आहे व तेव्हा त्यांनीही खरेदीपत्र केलेले नाही फक्त ७/१२ उतारा त्यांचा नावे आहे . हे त्यांनी सन १९९० मध्ये केले आहे . व त्याचा ड पत्रकात देखील भाऊ हिस्सा या प्रमाणे नोंद आहे .
आता समस्या अशी आहे कि सन २०११ मध्ये जे मूळ मालक आहेत त्यांनी जिल्हा उप विभागीय अधिकारी यांचाकडे अपिल दाखल केली होती त्यात त्यांनी काकांना जेवढी जमीन विकली त्या सर्व जमिनीचा उल्लेख केला त्यात माझ्या वडिलांनी घेतलेली जमीन देखील आली .त्या खटल्याचा निकाल मूळ मालक (अपिल्कर्ता )यांचा बाजूने देण्यात आला . नंतर आम्ही त्या निकालावर स्थगनादेश आणून जिल्हा अधिकारी यांचाकडे अपिल केली व अपिल मान्य करण्यात आली व तसा आदेश आम्ही इकडील कार्यालयात 17/1 ला जमा केला व इकडील कार्यालयास उप जिल्हाधिकारी यांचाकडून 21/1 आदेश आला कि सदरची जमीन मूळ मालक यांचे नवे करण्यात यावी नंतर तलाठी यांनी तसी नोंद ७/१२ उतार्यावर केली नंतर आम्ही स्थगिती आदेश देवून ति नोंद रद्द करून पूर्वरत परिस्थिती केली .
पण मला आता फक्त माझ्या वडिलाचे नवे असलेली काकाकडून विकत घेतलेली जमीन कुळ कायद्याने खरेदी पत्रासाहित नावावर करण्यासाठी अपिल करायची आहे .यासाठी मी कोणाकडे अपिल करू शकतो ? अपिल मन्य होईल्का ? आणि या प्रकरणात जमीन मूळ मालकाकडे परत जाईल का ? कृपया मार्गदर्शन करावे .
उपविभागीय अधिकारी यांचे आदेश विरुद्ध उपजिल्हाधिकारी स्थगती आदेश देऊ शकत नाही.( ठाणे जिल्हा वगळून)
उपविभागीय अधिकारी यांचे आदेशां विरुद्ध अपर जिल्हाधिकारी यांचे कडे अपील करावे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by raj
03-07-2014
143hasislovemail143@gmail.com
प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
Question by vijay
03-07-2014
vv_rt@rediffmail.com
रोजगार हमी उपकर कशावरती घ्यायाचे व शिक्षण कर व वाढाीव शिक्षण कर कशावरती घ्यायाचे व याबाबत शासन परीपत्रक अथवा इतर माहिती मिळावी
Question by राजेश
02-07-2014
rajeshp1980@rediffmail.com
सर
मी महसुल खात्यात लिपिक म्हणून सरळसेवा भारती ने ४ महिने आधी रुजू झाले व एक दिवस काम केले आणि आईचे आजारपणासाठी गेले चार महिने बिनपगारी राजा घेत आहे. परंतु मी खाजगी कंपनीत काम करत आहे (नियुक्ती पत्र नाही पण मास्तर वर सही व बँकेत पगार जमा होतो ). आता माझ्या नंतर वेटिंग लिस्ट च्या उमेदवाराने तक्रार केली आहे कि मी शासकीय सेवक असून सुधा खाजगीत काम करत असून त्याने मला धमकी दिली आहे कि महसुल अस्थापना द्वारे तुमची चोव्क्षी करून फौजदारी गुन्हा दाखल करायला लावेन.(जेणे करून मी राजीनामा दिला कि त्याचा वेटिंग मुले नंबर बसेल). तर मला असे विचारायचे आहे कि मी ज्या खाजगी कंपनीत काम करत आहेत तेथे मला नियुक्तीपत्र दिले नाही पण मस्टर वर सही व बँकेत पगार जमा होतो. तर माझ्यावर खरेच फौजदारी होऊ शकते का? कृपया उत्तर द्यावे हि विनंती
राजेश
फौजदारी दाखल होणार नाही परंतु आपण सरकारी नोकरी असतानासुद्धा खाजगी नोकरी का करत आहात?
या मुले आपली लिपिक पदाची सेवा संपुष्टात आणली जाऊ शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prakash
02-07-2014
prakashdhumane867@rediffmail.com
सर,
माझ्याकडे ४.४० हेक्टर जमिनीपैकी
२.३८ हेक्टर जमीन माझ्या आईच्या नावे आहे,आणि २.०२ हेक्टर माझ्या भावाच्या नावे आधीच करून दिलेली आहे.ती जमीन मला आता
माझ्या नावाने करायची आहे.आम्ही दोन भाऊ एक बहिण आहे,मोठा भाऊ आणि लहान बहिण यांचे लग्न झालेले
आहे.ती २.३८ हेक्टर जमीन माझ्या नावे करण्यास
त्यांची संमती आहे,तर ती जमीन
माझ्या नावाने करता
येईल
याचा कृपया मार्ग सांगा.
Question by mohan
02-07-2014
mohansutar52@gmail.com
साहेब
इतर हक्कातील बिगर कब्जेदार वारसदार किंवा त्यांचे वारसदार यांना भूसंपादना झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त दाखला मिळतील काय? माहिती द्यावे
Question by Dev shinde
01-07-2014
shindedev74@gmail.com
Please sir....
Answer my previous question about farmer sucide case.
Question by sanchi patil
01-07-2014
sapatil50@gmail.com
सर,
सामाईक घराचे अ ब असे विभाजन करताना सह हिस्सेदाराची परवानगी लागते का?
तशी परवानगी न घेता जर एखाद्याने घराचे विभाजन केले असेल तर त्याची माहिती कशी व कुठे मिळेल?
घर ज्या गावात आहे तेथील ग्रामसेवकाकडे हि माहिती मिलेले.
आपण अपील दाखल करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
unless co-holder / co-owner' s consent , division of house cannot be effcted .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
01-07-2014
mohansutar52@gmail.com
साहेब
इतर हक्कातील बहिणींचे नांव असेल तर सदर जमीन भूसंपादन झाल्यावर प्रकल्पग्रस्त दाखला
कडता येइल काय ? आणि त्याला
मंजूर रक्कम मदे हिस्सा किती असते .माहिती मिळावे विनंती .
इतर हक्कातील वारस व कब्जेदार सदरी वारस असे वारस नसतात. सर्व वारसांची नवे कब्जेदार सादरी असणे आवश्यक आहे.
बहिण हि हिंदू वारसा कायदा नुसार वडिलांची वर्ग १ वारसदार आहे. बहिणाला , भावा इतकाच वडिलांचे मिळकतीत हिस्सा आहे.
जमिनीचे संपादन होताना मिळकत वारसांचे नावावर asel तर , बहिनालाही प्रकल्प ग्रस्त दखल milane आवश्यक आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दया जाधव
30-06-2014
dayadutt13@gmail.com
सर ,
मला अधिकृतरीत्या बिगरशेती झालेल्या जमिनीमधील १/२ गुंठे इतकी जागा आणि त्यावर बांधलेले घर विकत घ्यायचे आहे. जागा आणि घर विकत घेतल्यानंतर त्याची नोंद ७/१२ उताऱ्यामध्ये माझ्या नावे होऊ शकते का? जर होत नसेल तर ७/१२ उताऱ्यात नाव येण्यासाठी काय करावे लागेल (सदर जागेवरील घराची नोंद नगरपरिषद मध्ये झालेली आहे.) कृपया मार्गदर्शन करावे … धन्यवाद .
अनधिक रित्या बिनशेती झालेल्या जमिनीचे विक्रीवर निर्म्बंध नाही. मात्र अनधिक रित्या बिन शेती व त्यावरील बांधकाम या मुळे होणारे परिणाम भोगण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे.
आपण बिगर परवानगी केलेली बिन शेती जागा नियामंकुल करता येयील . अर्ज करा जिल्हाधिकारी/प्रांताधिकारी.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रमेश kamble
28-06-2014
rameshkamble152@yahoo.in
लिपीक टंकलेखक संवर्गातील जेष्ठता यादी ही महसूल अर्हता परिक्षा ९ वर्षात३संधीमध्ये पास झाल्यास मुळ जेष्ठता अबाधीत राहते असा शासन निर्णय आहे मात्र काही जिल्हामध्ये विभागीय दुययम सेवा ४ वर्षात ३ संधीमध्ये उत्तीर्ण न झाल्याने मुळ जेष्ठता देण्यात आलेली नाही तरी जेष्ठता यादी ही महसूल अर्हता परिक्षेवर आहे की विभागीय दुययम सेवा परिक्षेवर कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
कर्मचारी महसूल विभागात नियुक्त झाले वर , साधारपणे १ वर्षनंतरदुय्यम सेवा परीक्षेस बसू शकतो. ४ वर्षात कार्माच्र्याने तीन संधीत हि परीक्षा पास होणे आवश्यक आहे. मात्र त्याने ९ वर्षात तीन संधीत अहर्ता परीक्षा हि पास होणे आवश्यक आहे. जर एखादा कर्मचारी दुय्यम सेवा परीक्षा विहित मुदतीत पास झालेला आहे त्यास तो ज्या तारखेस सेवेत दाखल झालेला आहे ती त्याच्गी जेष्ठ तारीख निस्षित होते परंतु तो अहर्ता परीक्षा विहित वेळेत व संधीत पास न झालेस त्याची जेष्ट्था गमावतो व त्यो ज्या वेळेस अहर्ता परीक्षा पास होईल त्या वेळेस त्यास पास दिनाकाची जेष्ट्था तारीख मिळते . जर तो वयाचे ४५ वर्षापर्यंत अहर्ता परीक्षा पास झाला नाही तर त्यास
४५ वर्षे पूर्ण केलेमुळे सुट मिळाली असल्यास , सुट मिळायचा दिनाक हा जेष्ट्था दिनांक असतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by लतीफ
28-06-2014
latif.mujawar02@gmail.com
Sir aamche gat no. var aamche kaka yanche nawavar shetra 1-57-5 yevade hoty, va aamchya vadilanche nawe 1-57-5 yevade shetra lihile hoty. vadil nokari nimit bahir gavi hoty tyanche don varsha purvi nidhan zale tyancha varsane aamche nave 7/12 dakhal zali. aamchya kaka ne tyanche hishacha shetra paiki 1-00-0 shetra vekari keli. jamin vikari kartana vadilanchi samnti n gheta vavhar kela. Sadar jamini paiki bharipotichi jamin vikari keli aahe va halkya potiche jamin aamchya sathi thevali aahe. Ha kela vavhar kaydeshir hoto ka? Naslyas kay karave.
वडील व काकांचे नावावर प्रत्येकी १-५७-५ शेत्र होते कि एकत्र १-५७-५ शेत्र होते?
जर वडील व काकांचे नावावर प्रत्येकी १-५७-५ शेत्र असेल तर काकांना त्यांचे शेत्र विकण्याचा अधिकार आहे.
जर मिळकतीचे वाटप झाले नसते तर हिंदू वारसा कायदा कलम २२ प्रमाणे आपणास , काकांची वाटणीची जमीन खरेदी करण्याचा प्राथांम्याने अधिकार होता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिंदे MAHADEO JALINDAR
24-06-2014
shindedev74@gmail.com
Dear sir, shetkari aatmhatya babtit talathi yanchi kartayva kay aahet? 1-43 mudyancha ahwal koni sadar karava? sambandhitache bayan koni ghave ya babtit ....please margdarshan karave
Question by ganesh pingale
24-06-2014
ganeshpingale2014@redifmail.com
Q.No. 65 चे कृपया उत्तर लवकर द्यावे हि विनंती
या पूर्वीच उत्त्तर दिले आहे.
७\१२ शेत्र नमूद नाही मात्र इतर हक्कात वने असा उल्लेख आहे म्हणजे पूर्ण शेत्र वने आहे.
वनेतर काम करता येणार नाही.
परवानगी देत येणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mahadeo dane
23-06-2014
mahadeodane444@gmail.com
सर
महसुल कर्मचारी यांना घराचे बांधकाम करायचे असल्यास वाळूसाठी राँयल्टीची गरज आहे का?
वाळू महसुल कर्मचार्याला मोफत मिळू शकते काय तसा G.R.असल्यास क्रुपया email वर send करा़
Question by प्रकाश dhumane
20-06-2014
prakashdhumane867@rediffmail.com
माझ्या भावाच्या नावाने २.०२ हेक्टर
जमीन आहे.त्यातील १ हेक्टर जमीन विकायची आहे.तालुका निर्ब्न्धक कार्यालय कळंब,जिल्हा यवतमाळ,येथे विचारणा केली असता त्यांनी ६ एकर पेक्षा कमी जमिनीची विक्री करता येत नाही असे सांगितले,कृपया मार्गदर्शन द्या.
यवतमाळ जिल्ह्यासाठी , standard area क्षेत्र तुकडे बंदी कायद्यासाठी किती आहे याची , भूमी अभिलेख खाते /तहसील कार्यलय यांचेकडून माहिती घ्या.
जर standard area क्षेत्र १.००.० हे पेक्षा जादा असल्यास १.००.० हे क्षेत्र विकत येणार नाही.
परंतु माझे मते standard area ( प्रमाणभूत क्षेत्र ) एवढे जादा असणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by pramod b dalvi
19-06-2014
boicrsocldt@gmail.com
aamhi 75 varshe vhivat karat asalelya jaget vihir padli sadar jagechi mojani aata keli asata ti dusaryachi asalyache kalale tya babat aata kay karayache ha prashana padala aahe tya babat margadarshan karave dhanyavad
ज्या दुसर्याची जागा आहे त्याचेबरोबर जागेची अडला बदल करणे श्याक्या आहे का ? हा पर्याय तपासा. अन्यथा त्या दुसर्या व्यक्तीवर अवलंबून आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विकास pawase
19-06-2014
vikaspawase8@gmail.com
sir,
our crop inspection case pending in tahsil office after hearing for result since last 2 years. is there any time limit to give decision on form no. 14 cases.
please guide.
नियमामध्ये प्रकरण किती दिवसात निर्नायीत करावे या बाबत मर्यादा दिलेले नाही. तथापि चौकशी पूर्ण झाले वर ८ सप्ताहात निर्णय देणे अपेक्षित.
महाराष्ट शासनाने अर्ध- न्यायिक प्रकरणाचा निकाल सुनान्वणी संपले नंतर ८ आठवड्यात द्यावा या बाबत , एका जनहित याचिकेचे अनुषंगाने परिपत्रक काढले आहे. ( २००८-२००९) .
पवार साहेब हि याचिका , रस्ता भाव दुकान सुनावणी संदभातील आहे. त्यामध्ये शासनाने अर्ध न्यायिक प्रकरण सुनावणी पद्धत विशद केली आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किरण भरगुडे
18-06-2014
bkiru.4787@gmail.com
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७,२५७,२५८ याची सविस्तर माहिती मिळावी.
सर, माझी मिळकत मला मुंबई कुल कायदा १९४८ चे ३२ ग सर्टिफ़िकेट वरुन मिळाली आहे. परंतु माझे चुलत बंधू यांनी पूर्वी माझे विरुध तहसीलदार यांचेकडे अपील केले ते फेटाळले, त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांचेकडे कलम २४७ नुसार अपील केले ते मान्य केले त्यानंतर मी पुन्हा अप्पर जील्हधिकरि यांचेकडे अपील केले ते मान्य केले. पुन्हा माझे चुलत बंधू यांनी अप्पर आउक्त यांचेकडे अपील केले त्यामध्ये त्यांना स्टेटस को मिळाला पुन्हा माझे चुलत बंधू यांनी तहसीलदार यांचेकडे माझी झालोली नोंद रद्द करणेसाटि रिविजन केले व ते मान्य केले त्यावर मी मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडे त्याविरुद्ध कलम २५७ कालि रिविजन केले ते मान्य करून तहसीलदार यांचेकडे कलम २५८ खाली फ़ेर्चोक्षिने निर्णय घेनेसटि पाट्विले व ते मान्य करून माझ्या नावाची सादर जमिनीला नोंद झाली आहे त्यावर माझेविरुद्ध मा. उपविभागीय अधिकारी यांचे कोर्टात पुन्हा माझे चुलत बंधू यांनी अपील केले आहे. तरी कृपया मला अशी माहिती हवी आहे कि प्रस्तुत केलेले अपील योग्य आहे का? व मी पुढे काय करू याचे मार्गदर्शन करा.
आपले चुलत बंधूने कोणत्या मुद्द्यावर उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील केलेले आहे?
३२ ग प्रक्रिये नंतर आपले नावे मिळकत झाली आहे त्यामुळे अप्पर आयुक्त यांचे कडे यांचेकडे दुसरे अपील कसे झाले ? अपिलाचा मुद्दा कोणता होता?
status - quo हा अंतिम आदेश नसतो तर तो अंतरिम ( तात्पुरता) आदेश असतो. त्यामुळे त्या आदेशाचे अनुषंगाने , चुलत भावाने तहसीलदार यांचेकडे तुमचे नाव कमी करण्याचा अर्ज कसा दाखल केला? अप्पर आयुक्त यांचे कडे दुसरे अपील चालू असताना , तहसीलदार चुलत भाऊ यांचा अर्ज दाखल करून घेऊ शकत नाहीत. त्यांनी तो अर्ज फेटाळणे आवश्यक होते.
आपले वादाचा तपशील थोडा विस्तृत मांडणे आवश्यक आहे.
एकदा एखादे प्रक्नावर निर्णय झाला असेल तर पुन्हा त्या मुन्द्यावर दावा/अपील दाखल करता येत नाही. दिवाणी प्रक्रिया संहितेत , त्यास res judicata हे तत्व म्हणतात . हे तत्व कदाचित या प्रकरणास ते लागू शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कुणाल अंकुश जाधव
18-06-2014
mr.k1387@gmail.com
७/१२ च्या इतर हक्क सदरी वनेतर कामास बंदी असा शेर आहे. त्याचा खरेदीखत झालेला आहे. तर तो तलाठी यांना फेरफार मध्ये नोंद घेत येईल का ? व मंडळ अधिकारी यांनी काय करावे ?
फेरफार नोंद घेता येयील . मंडळ अधिकारी यांनी नोंद मंजूर करावी.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
