जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by देवेंद्र
23-08-2014
jyotitandel82@gmail.com
सर प्रश्न १ १९३२ साला पूर्वीचा ७/१२ उतारा किंवा महसुली रेकॉर्ड कोणता होता व कोठे मिळेल
प्रश्न २ फेरफार पुस्तक हरवल्यास त्याचा दुसर्या ठिकाणी म्हणजे तहसील प्रांत कार्यालयात रेकॉर्ड असतो काय
प्रश्न ३ गावठाण जमिनीचा १९३२ साला अगोदर रेकॉर्ड होता काय
Question by देवेंद्र
23-08-2014
jyotitandel82@gmail.com
सर धन्यवाद
सावर्क्षित कुल म्हणून १९३२ ते १९५४ पर्यंतच्या ७/१२ नाव असताना परतू सदर कुलाचा फेरफार नोड नाही व १९३२ पासून खंड भरल्या नंतरही जमीन मालक १९४८ साली दुसर्या व्यक्तीस जमीन विकू शकतो काय
Question by tushar
23-08-2014
tsshewale@gmai.com
सर,
भोगवाटा वर्ग-१ च्या ८-अ वरिल "खालसा(सरकारी)"चा अर्थ काय?अश्या क्षेत्राची खरेदी घेता येते का?
Question by संदीप जाधव
23-08-2014
mastermindrajgad@gmail.com
सर प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
तुम्ही सांगितल्याप्रमाणे
mahaonline च्या जिल्हा प्रतिनिधीने दर महिन्याला प्रत्येक तालुक्याकडून ७/१२ ची CD घेण्याची आहे. प्राप्त CD राज्य महोन्लीने ला देण्याची आहे.
mahaonline व NIC यांनी , ७/१२ अद्यावत ठेवन्याचे आहेत व website वर उपलब्ध करून देण्याचे आहेत. या बाबत शाषण निर्णय आहे.
कृपया तो शासन निर्णय किंवा त्याचा नंबर उपलब्ध करून द्यावा हि विनंती .
Question by Shrikant Pisal
22-08-2014
shreekantpisal1@gmail.com
My question sir,
1) sanrkashit kulach mirashi hakka transfer hou shakto?
2) vishestha to devastan inam class 3 cha?
Question by गणेश दिगंबर पिंगळे
21-08-2014
gpinagle8181@gmail.com
अव्वल कारकून संवर्गात मी आक्टोंबर २००६ मध्ये उत्तीर्ण झालो आहे. व ६/१२/१९९३ मध्ये सेवेत रुजू झालो आहे. व माझी जन्मतारीख १६/७/१९६८ आहे. माझ्या बरोबर असलेले अ व ब हे अनुकमे आक्टोंबर २००६ मध्ये उत्तीर्ण झाले मात्र त्यांचा सेवेत रुजू झाल्याचे वर्ष हे जून १९९४ आहे. त्यांचा जन्मतारीख अनुकमे १९६७ आहेत. सेवाजेष्टाता यादीत अ, ब व त्यानंतर माझे नाव दिले आहे हे बरोबर आहे किवा कसे. वर्ष निहाय जेष्ठता करता सेवेत रुजू झाल्याचा १९९३ चा मी एकच कर्मचारी आहे त्यामुळे अव्वल कारकून संवर्गात जरी आम्ही आक्टोबर २००६ पास असलो तरी रुजू होण्याचा दिनक व वर्ष हे १९९३ नंतरचे आहे. तरी याबाबत माझे नाव अ व ब च्या पहिले यावयास पाहिजे हे बरोबर आहे किवा कसे असल्यास कृपया परिपत्रक सह कळवावे हि विनंती.
Question by देवेंद्र
21-08-2014
jyotitandel82@gmail.com
सर एखाद्या जमिनीचा खंड १९३२ साला पासून राम देत असल्यास जमीन मालक १९४८ साली सदर जमीन दुसर्या व्यक्तीला विकू शकतो काय
राम याचे नाव सौरीक्षित कुल म्हणून नोंदणे आवश्यक होते.
तथापि मिल्कातीस सौरीक्षित कुल म्हणून नाव लावणे बाबत आपण दावा दाखल करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by देवेंद्र
21-08-2014
jyotitandel82@gmail.com
सर जमिनीस १९३२ सालापासून राम हा खंड भरत असल्यास व दिनांक २०/५/१९५७ रोजी कुल म्हणून नोद असल्याल्स जमीन मालक सदर कुल नोद दिनांक २२/६/१९६२ रोजी कमी करून जमीन मालक दिनांक ०९/०८/१९६२ रोजी दुसर्या व्यक्तीस विकतो तर सदर कुल सदर जमिनीचा दावा करू शकते का
नाव कमी करण्याचे कारण काय होते? फेरफार वरून पहा.
नाव कमी केकेले बाबत अपील करणे हितावह.
मात्र झालेला विलंब याबाबत न्यायालयास समाधानकारक उत्तर देणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by dinesh valmik patil
21-08-2014
apdinesh.2012@rediffmail.com
एखादया व्यक्ती कडून २०:०० आर बागायत जमिनीचे क्षेत्र कायम फारोक्ताची खरीदीने घेतलेले असेल व पूर्वी त्याच व्यक्तीकडून त्याच गटातील व सर्वे नंबर मधील एकूण क्षेत्र ८१:०० आर कायम फारोक्ताची खरीदीने घेतलेले असेल तर सबंधित २०:०० क्षेत्राचा स्वतंत्र ७/१२ उतारा कोणत्या शासन निर्णयाच्या,नियमाच्या,परिपत्रकाच्या अनुषंगाने मिळू शकतो.त्याची माहिती द्यावी
Question by संदीप जाधव
21-08-2014
mastermindrajgad@gmail.com
नमस्कार सर,
महाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख) या ''websitevar'' शासनाने ''online 7/12'' उपलब्ध करून दिले आहेत . परंतु ते ''updated'' नाहीत ..त्यामुळे त्यांचा वापर करण्यात अडचणी येत आहेत .
१) यासंदर्भात कोणाशी संपर्क साधावा किंवा पत्रव्यवहार करता येईल का?
२) ७/१२ ''update'' करण्यासाठी सरकारने यंत्रणा ठेवली आहे का असेल तर ती कोणती ??
mahaonline च्या जिल्हा प्रतिनिधीने दर महिन्याला प्रत्येक तालुक्याकडून ७/१२ ची CD घेण्याची आहे. प्राप्त CD राज्य महोन्लीने ला देण्याची आहे.
mahaonline व NIC यांनी , ७/१२ अद्यावत ठेण्याचे आहेत व website वर उपलब्ध करून देण्याचे आहेत. या बाबत शाषण निर्णय आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जमीर रझवी
20-08-2014
kejsiyasat@gmail.com
माझा प्रश्न असा आहे?
हैदराबाद कुळ कायदा १९५० नुसार.
१. विधवे महिलेच्या जमिनीला कुळ कायदा लागू आहे का ?
२. जर असेल तर, ज्या व्यक्तीच्या कुळ लागला आहे , त्याने जमीन जर जिल्हा अधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय विक्री केली असेल तर(शर्तभंग ) झाली असेल तर , मूळ मालकास जमीन परत मागण्याचा अधिकार आहे का ? व ते परत मिळू शके काय ?
विधवेच्या जमिनीला कुल कायदा लागू आहे. कृषक दिनी जर जमीन मालक विधवा असेल तर , विक्री किंमत ठरत नाही . विधवा मालक मयत झालेवर २ वर्षाचे आत कुळाने , विक्री किंमत निच्छित करून मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे
जमीन मालक स्वतचे बिन शेती वापरासाठी अथवा स्वताला कसनेसाठी ,जमीन किंमत निश्चीत होणे पूर्वी जमीन परत मागू शकतो ( शर्तीची पूर्तता होत असेल तर , उदा. जमीन मागणी १९५६ पूर्वी केलेली आहे , मालकाकडे किफायतशीर क्षेत्र पेक्षा जादा क्षेत्र होत नाही)
जमीन जिल्हाधिकारी यांचे पूर्व परवानगीशिवाय विकली असेल तर, शर्थभंग झालेला आहे , जमीन शाषण जमा करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वैशाख वाहुरवाघ
20-08-2014
neovaishakh@gmail.com
मला माझ्या तहसीलदार संवर्गाची यादी कुठे मिळेल ?
अस्थापना शाखा , आयुक्त कार्यालय / अस्थापना, महसूल व वन विभाग
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजितकुमार मोरे
20-08-2014
ajitmore667@gmail.com
ठेव संलग्न विमा योजने अंतर्गत मंजूर झाले नंतर मृताच्या वारसास किती दिवसात त्याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.
Question by Shrikant Pisal
19-08-2014
shreekantpisal1@gmail.com
Sir,
Q.1) Talathi kitiwela pherphar radda karu shakto? & tayar karu shakto?
Q.2) sanrakshit kul konas mhanawe & te kashawarun siddh kele jate?
Q.3) wahiwat nondicha form no. 14 kuthe milel?
तलाठ्यास फेरफार रद्द करण्याचा अधिकार नाही .
तलाठी एकदाच फेरफार टाकू शकतो
वरिष्ट अधिकारी/ प्राधिकरण यांनी जर आदेशित केले असेल तर , तलाठी आदेश निर्देश प्रमाणे पुनर फेरफार टाकू शकतो
जर कुल १ जानेवारी १९३८ किंवा १ जानेवारी १९४५ पूर्वी सलग ६ वर्षे जमीन जमीन कसत असेलतर अशी व्यक्ती ९ नोव्हेंबर १९४८ नंतर , सौरीक्षित कुल आहे म्हणून नोंद केली जाते.
वहिवाट नोदीचा नमुना १४ अधिकार अभिलेख , तयार करणे , सुस्थित ठेवणे नियम १९७१ मध्ये दिलेला आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shrikant Pisal
18-08-2014
shreekantpisal1@gmail.com
आपला प्रश्न/सूचना ... नमस्कार सर,
पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले
त्याबद्दल धन्यवाद.
पण सर आम्ही देवस्थान ईनाम खरेदी न
करता त्या जमीनीचा संपुर्ण मिराशी हक्क खरेदि केलेला आहे
जो त्या मालकाने
पुर्वी खरेदि केलेला होता तद्नंतर
तो मिराशी हक्क आम्ही खरेदि केला व
या व्यवहाराचे खरेदिपत्र
दिवाणी कोर्टाने ग्राह्य धरले आहे
तरी माझा आपणास प्रश्न आहे की जर· प्रथम व्यक्ती दुसर्या व्यक्तीस हस्तांतर
करु शकतो तर दुसरा व्यक्ति तोच
मिराशी हक्क
तिसर्या व्यक्तिला का हस्तांतर होऊ
शकत नाहि?
Question by Sagar
18-08-2014
saggyy.1206@gmail.com
माझा प्रश्न.
१). ७/१२ उतार्यावर आमच्या नावे नसलेली परंतु आजतागायत वडिलो परजीत आमच्या कब्जा वहिवाटीत असलेया जमिनीचा TDR जर बिल्डर ने वापरला असेल तर अशी जमीन बिल्डर ने प्रशासनाला handover करून अश्या जमिनीच्या बाबत ची ताबा पावती प्रशासनाला बिल्डर ला देता येते का ?.
या जमिनीवर कोणतेही खडीकरण करण्यात आलेले नाही.
तसेच या जमिनीवर आमच्या वाहिवातीतली ३०-४० वर्ष जुनी झाडे अजून हि आहेत.
२). आणि जर ताबा पावती प्रशासनाने बिल्डर ला दिली असेल तर आम्ही कोठे तक्रार करू शकतो का?..
या विषयी आमचे काय हक्क आहेत या विषयी जर मार्गदर्शन करावे..
Question by जमीर रझवी
18-08-2014
kejsiyasat@gmail.com
माझा प्रश्न
शासनाने ज्या प्रयोजना करिता जमीन संपादन केली, त्या प्रयोजना व्यतरिक्त अन्य दुसऱ्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोगात आणू शकते काय ?
Question by भगत गणेश प्रकाश
16-08-2014
ganesbhagat88@yahoo.com
सर मी भगत गणेश प्रकाश पद - तलाठी नेमणूक सातारा येथे दि 03 डिसेबंर 2014 पासुन कार्यरत असुन मला पुणे विभागातुन औरंगाबाद विभागात उस्मानाबाद जिल्हात बदली करावयचि असुन महाराष्ट्र शासकीय कर्मच्यार्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणा-या विलांबास प्रतिबंध अधीनियम, 2005 मधील तरतुदीनुसार बदली करण सक्षम असलेल्या प्राधीकार्याच्या मान्यतेने आणि उक्त अधिनियमाच्या कलम 4 (4) (दोन) आणि कलम ४ (5) मधील तरतुदिनुसार माझी बदली होईल काय ? माझी बदली होनेकामी मला कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागेल.
विहित कालावधीची अट शासनाकडून शिथिल करून अधिनियमाच्या कलम 4 (4) (दोन) नुसार बदली करता येईल.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by सुजित चव्हाण
16-08-2014
sujitchavan456@gmail.com
एकत्रीकरण फेरफार मध्ये नाव कमी केले असेल तर ते का केले याची माहिती कोठे मिळेल कारण त्यापुढे फेरफार नंबर लिहीला नाही
आपणास एक्त्रि कर्णाचे अभिलेख पाहावे लागतील. सदर अभिलेख उपसंचालक भूमी अभिलेख अथवा अधीक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालयातही पाहणेस मिळतील.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुजित चव्हाण
16-08-2014
sujitchavan456@gmail.com
सर माझे चुलत पंजोबा विठु यानी स.१९१८ साली पाटील ईनाम सर्वे नं.२११/११ खरेदी ५१ गुंठे घेतले तसेच वर्डोलोपार्जित सर्वे जमिनीचे खाते त्याचे नावे होती माझे सख्खे पंजोबा पांडु हे विठु यांचे लहान भाऊ विठु स.१९३० ला मयत झाले वारसा हककाने सर्वे खातेना विठु यांचा मुलगा गेनु आ.पा.आई अशी नोंद झाली स.१९६१ ला पांडु यानी वर्दी जबाबाने तसेच गेनु न हरकतेने नोटीस रूजु करून सर्व जमिनीना ८ ने प्रमाणे नोंद केली नंतर १९६२ ला विर डँम साठी भुसंपादन झाले सर्व जमिनी पैकी पाटील ईनाम २११/११ सर्व्हे नं ५१ गुठे ही जमिन शिल्लक राहीली परंतु पांडु याचा १ नं मुलगा तुका यांने १९५६ साली २११/११ यातील सा.अर्धा हिस्सा विकत घेतला होता १०० रू खरेदीने त्यामुळे गेनु यांचे नावे २११/११ यातील जमिन राहीली नाही कारण अर्धा हिस्सा पांडु यांचा होता बाकी जमिन भुसंपादन झालेनी गेनु यांचे नावे जमिन शिल्लक राहिली नाही म्हणुन गेनु यांनी पुन्हा २११/११ यातील सा. अर्धा हिस्सा तुका यांच्याकडुन १०० विकत घेतला त्यामुळे पांडु व गेनु दोघांचे २११/११ ८ने प्रमाणे नावे लागली पण १९६८ ला गेनु हे मयत झाले व त्याचा मोठा मुलगा गोरख व त्याचे ६ भाऊ याचे वारस फेरफार झाला पण ७/१२ गोरख याचे एकट्याचे नाव कब्जेदार सदरी २११/११ अर्धा हिश्याला आले वअर्धा हिश्याला पांडु यांचे पण ईतर हक्कात गोरख यांचे भावाची नावे आली नाहीत एकटे गोरख यांचेच आले स.१९७२ ला पांडु मयत झाले त्यांच्या वारसाची नावे लावायची राहीली १९७५ गटवारी मध्ये गोरख एकटयाचे स्कीम बुकला नाव लागले परंतु एकत्रीकरण योजनेत स.नं.२११/११ याचा स.नं ६ते ८/१० झाला त्यामुळे ६ते८/१० हा स.नं स्किम बुकला आला व त्याचा गट १५५० झाला ्स्किम बुकला गोरख एकट्याचे नाव लागल्यामुळे गट नं.१५५०ला गोरख एकट्याचे नाव आले तसेच १९७५ /७६ नमुना १२ला वहीवटीत गोरख २५ गुठे व पांडु २ मुलगे तुका व सोपान यांचे नावे तुक १३ गुठे व सोपान १२ गुठे पिक पानी ठिकानी नोंद पेन्सिलने आहे नंतर १९८० पासुन गोरख याचे एकट्याचे ७/१२ कब्जेदार सदरी नाव आहे व२०१४ ला पर्यंत तुक व सोपान यांची वहीवट चालु आहे गोरख यांने ५१ गुठ्याची विक्री केली आहे सर मला आपण सविस्तर कायदेचे मार्ग सांगावे हि नम्र विनंती
वास्तविक एवढ्या विलंबाने या बाबत कायावाही करताना अडचणी येणार आहेत.
एकत्रीकरण योजनेत मालकी हक्क असणारांची नावे घेताना चुका झाल्याचे प्रथमदर्शनी आपले कथनावरून दिसून येते.
प्रथम एकत्रीकरण चुका दुरुस्त करणेसाठी , भूमी अभिलेख खाते यांचे कडे अर्ज करावा लागतो. त्या विभागाकडून या चुन्काची दुरुस्ती होते. मात्र प्रश्नाधीन मिळकतीची विक्री हि , गोरख या व्यक्तीने केलेली आहे . त्या मूळे , भूमी अभिलेख खात्याकडे , दिलासा देण्याचा मार्ग फारसा शिलाक्का राहिलेला नाही.
मालकी हक्क जाहीर करून मिल्नेसाठी व गोरख, या महाशयांनी विठू यांचे वारसांचे मालकीचा हिस्सा विक्री व्यवहार रद्द करून मिल्नेसाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे संयुक्तिक व हितावह.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुहासकुमार दुधे
16-08-2014
s.dudhe12@gmail.com
सर, माझे गावामध्ये पाझर तलावाकरिता आमच्या पाच जणांमध्ये सामाईक असलेल्या मालकी हक्काच्या एका गटातील 4.08 हे. आर या संपूर्ण क्षेत्रापैकी 0.54 हे. आर क्षेत्राचे दि. 30/08/2007 रोजीच भूसंपादन झाले असून प्रकल्प पूर्ण झालेला आहे. संबंधित जमीनीच्या 7/12 उता-यावरील सहहिस्सेदारांपैकी फक्त एकाच व्यक्तीचे नाव लागल्याचे दिसून येते. सदर व्यक्तीशिवाय इतरांना त्यावेळी नोटीस देखील मिळालेली नाही. परंतु जमिनीतील हक्काबद्दलचे सर्व पुरावे आजही उपलब्ध आहेत. सदरहू प्रकरण न्यायालयामध्येदेखील गेले नाही. तेंव्हा माझ्या हक्काची जपणूक करण्यासाठी मला काय करता येईल. कृपया मार्गदर्शन करावे.
भू संपादन कायदा १८९४ चे कलम १८ प्रमाणे निवडा जाहीर झालेपासून अश्या वादाचे निराकरण करणेसाठी ६ महिन्याचे आत जिल्हाधिकारी यांचेकडे सन्धर्ब दाखल करणे आवश्यक . २००७ मध्ये निवाडा जाहीर झालेला असेल तर , जिल्हाधिकारी आपला वाद सन्धर्ब न्यायालयात दाखल करणार नाहीत.
आपण प्रथम जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा . जिल्हाधिकारी यांनी अर्ज फेतालेवर , त्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ashok
16-08-2014
nikaleashok@yahoo.co.in
सर, नवीन उपविभाग निर्मितीमुळे तलाठी यांचेकडून विकल्प घेण्याबाबत सविस्तर द्यावी .
Question by आशिष औटी
15-08-2014
ashish.monalisa@gmail.com
सर एखादा कर्मचारी निलंबित असताना सुमारे ६ महिने कारागृहात राहिल्यास त्याला कारागृहातील कालावधी चा निर्वाह भत्ता देय असेल काय असल्यास त्याबाबत नियम कोणते कृपया कळवावे हि विनंती
Question by shreekantpisal1@gmail.com
15-08-2014
shreekantpisal1@gmail.com
आपला प्रश्न/सूचना ... श्रीपती या व्यक्तीने त्याच्या ताब्यात
असलेली देवस्थान इनाम वर्ग -3 ची जमीन सन 1944 सदाशिव
या व्यक्तीने नोँदणीक्रत दस्ताने
मिराशी हक्क खरेदी केला व ताच
मिराशी हक्क नोँदणीक्रत दस्ताने
शिवाजी या व्यक्तीने सदाशिव या व्यक्तीकङून
खरेदि केला आहे तरी सातबारावर शिवाजी या व्यक्तीची नोँद होत
नाही तरी आपण मार्गदर्शन करावे ?
१८६३ चे , जमीन धारा सूट कायदा नुसार , देवस्थान इनाम जमीन हस्तांतरित करता येत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर चंद्रकांत नेमाने
15-08-2014
sagarnemane7@gmail.com
१९९४ साली अगोदर बहिणी वारस इतर हक्कात आहे आज रोजी बहिणी मयत जाले आहे ते नाव कमी केले तर वारस लागतील का ?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
