जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by तुकाराम रावसाहेब राहिंज
18-10-2014
tukaramrahinj@gmail.com
आदरणीय सर ,
ल ७४ चा नमुना माझ्या ई मेल आयडीवर पाठ्वाना
Question by तुकाराम रावसाहेब राहिंज
17-10-2014
tukaramrahinj@gmail.com
आदरणीय सर,आमची वडिलोपार्जित जमीन होती तीचे १९७२ साली गट पडले तेव्हा चुकून ७/१२ वर कमी अधिक जमीन लागली आहे तेव्हा ते दुरुस्त करणे साठी काय करावे लागेल.
Question by भगत गणेश प्रकाश
12-10-2014
ganeshbhagat88@yahoo.com
सर मी भगत गणेश प्रकाश. सातारा येथे तलाठी या पदावर १ वर्षापासुन कार्यरत असुन मला पुणे विभागातुन औरंगाबाद विभागात उस्मानाबाद जिल्हात बदली करावयचि असुन महाराष्ट्र शासकीय कर्मच्यार्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणा-या विलांबास प्रतिबंध अधीनियम, 2005 मधील तरतुदीनुसार बदली करण सक्षम असलेल्या प्राधीकार्याच्या मान्यतेने आणि उक्त अधिनियमाच्या कलम 4 (4) (दोन) आणि कलम ४ (5) मधील तरतुदिनुसार माझी बदली होईल काय ?
तीन वर्षे सेवा पूर्ण होणे आवश्यक .
मात्र विशेस बाब म्हणून शाषण आपली बदली करू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रशांत सुरे
09-10-2014
prashantsure1707@gmail.com
घर बांधणी बाबत अग्रीमाची मागणी करताना कोणकोणती कागदपत्रे जोडावीत याबाबतचा शासन निर्णय कोणता आहे
Question by shrikant pisal
09-10-2014
shreekantpisal1@gmail.com
sir, mla vahiwat nondicha form no. 14 mazya mail id var send kara hi vinanti
महाराष्ट्र जमीन महसूल ( अधिकार अभिलेख तयार करणे ) नियम १९६९ मध्ये दिलेला आहे. कृपया पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
महाराष्ट्रास जस्मिन महसूल ( अधिकार अभिलेख तयार करणे ) नियम १९६९ मध्ये दिलेला आहे. कृपया पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नामदेव उखा राऊत
08-10-2014
namdeoraut5@gmail.com
मा.
किरण सर,
मी आपणास मला दोन जुळ्या मुली जन्म दिनांक १ जुन २००५ असुन नंतर एक मुलगा दिनांक १ नोव्हे 2011 झालेला आहे. तर नियमानुसार माझे एकुन किती अपत्य समजले जातील. माझी पत्नीची आंगणवाडी सेविका म्हणुन नेमणुक २४ जुन २०१४ रोजी झालेली आहे. ......... तरी म.रा.शा.परीपत्रका क्र.एबावि-२०१२/प्र.क्र.४२९/का,०६.दिनांक१३/ऑगस्ट,२०१४ नुसार जुळे असल्यास एकच अपत्य समजावे................
Question by तुकाराम GAIKWAD
08-10-2014
tukaramgaikwad@gmail.com
सर , वैदकीय प्रतिपूर्ती आदेशावर माननीय निवासी उप जिल्हाधिकारी यांना स्वाक्षरी करण्याचे अधिकार प्रत्यायोजित करता येतात का. असल्यास शासन निर्णय क्रमांक व विभाग नमूद करावे
Question by तुकाराम GAIKWAD
08-10-2014
tukaramgaikwad2008@gmail.com
खर्चाबाबतचे लेखा परीक्षण करणे बाबतचे मुद्दे कोणते त्याची सविस्तर माहिती मिळावी
Question by PRASHANT BHIMASHANKAR SURE
08-10-2014
prashantsure1707@gmail.com
आदरणीय सर,
घर बांधणी साठी आवश्यक असणारी कागद पत्राची यादी समाविष्ट असणारा शासन निर्णय
Question by vikas kapkar
07-10-2014
vikaskapkar27@gmail.com
sir mi saral sewa bharti2013 madhe jalsampada vibhagat driver mhanun laglo aahe mala yach vibhagat jr clerk mhanun samayojan karta yeil ka?
आपण पदवीधर असाल व तीन वर्षे झाली असतील तर महसूल ख्त्यात लिपिक संवर्गात सामोयोजित केले जाते .
जलसंपदा विभागात पण अश्याच पद्धीतीचे नियम असतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
05-10-2014
mohanmsutar@gmail.com
साहेब
काही भरती प्रकियेत खुला व मागासप्रवर्ग साठी अर्ज मागवतात अर्ज करते वेळी मागासाप्रवार्गात अर्ज करताना त्यांचे वय ३४ असल्यास गुनुवात्तेनुसार त्यांचे खुला प्रर्गात नियुक्ती होण्यास पात्र असल्यास त्यांचे नियुक्ती होते काय ?
Question by संदीप लटके
05-10-2014
latakesandip01@gmail.com
कार्यालयाचे दफ्तर सहा गट्टा पद्धतीत लावणे साठी मोठी अडचण म्हणजे दफ्तर अभिलेखात पाठवणे - एंक तर अन्द्र्सन लिस्ट मराठीत नाही . जे विषय त्यानंतर नव्याने महसूल खात्याकडे आहेत ती बंद झालेली प्रकरणे अ ब क क १ पैकी कशामध्य समाविष्ठ करावी या बाबत कोणतेही निर्देश नाहीत - तरी तालुका झिल्ला स्तरावर हाताळले जाणारे सर्व विषय एकत्रित करून त्याचे एकत्रित अ ब क प्रमाणे वर्गीकरण यादी शासन किवा आयुक्त स्तरावरून जाहीर करणे बाबत कार्यवाही त्दन्य अधिकारी याचे कडून होणेश विनंती
आपला प्रश्न रास्त आहे
मात्र ज्या नवीन विषयांचा समावेश A , B , C , D लिस्ट मध्ये नाही त्या बाबत कार्यालय प्रमुख यांनी निर्णय घेणे अपेक्षित
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप लटके
05-10-2014
latakesandip01@gmail.com
कॅश बुक हे सहा गट्टा पद्धतीतील कोणत्या गाठ्यात समाविष्ठ करावे
Question by charushila shevade
03-10-2014
shevade.charushila@yahoo.com
मी सहकार पणन वस्त्रोद्योग लेख परीक्षण विभाग लिपिक या पदावर ६ वर्षे काम केले आहे . आता माझी तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथे लिपिक पदावर नियुक्ती झाली आहे. सदर परीक्षेस बसने पूर्वी मी अनुमती घेतली होती. आता मला मी केलेली ६ वर्षाची सेवा जोडून घ्यायची आहे तर या बाबत मला कसा प्रस्ताव तयार करावा लागेल? सदर प्रस्तावास मंजूर करण्याचे अधिकार नियुक्ती प्रधीकारीना आहेत का? असल्यास संबधित शासन निर्णय सांगावा. धन्यवाद. आपल्या उत्तराची प्रतीक्षा आहे.
Question by नामदेव उखा राऊत
03-10-2014
namdeoraut5@gmail.com
मला दोन जुळ्या मुली जन्म दिनांक १ जुन २००५ असुन नंतर एक मुलगा दिनांक १ नोव्हे 2011 झालेला आहे. तर नियमानुसार माझे एकुन किती अपत्य समजले जातील. माझी आंगणवाडी सेविका म्हणुन नेमणुक २४ जुन २०१४ रोजी झालेली आहे.
Question by प्रसाद patil
02-10-2014
prasad123mr@gmail.com
साहेब, माझ्या वडिलांना फसवुन जमीनीच्या कागदपत्रावरती सह्या घेतल्या. त्यासाठी आपण मह्णालात की फौजदारी व कोर्ट कारवाई करा. परंतु साहेब फौजदारी म्हणजे नक्की सांगीतल तर बरं होईल...
Question by santosh jaware
02-10-2014
jaware_sb@rediffmail.com
एका प्रकरणी महसुल मंत्री यांचा निर्णय प्राप्त झाला परंतु विरुद्ध पक्षकाराने सदर निर्णयास योग्य त्या न्यायालयात अपील दाखल न करता, लेखी पत्र ने हरकत घेतली आहे तर फेरफार नोंद करावे किंवा कसे? याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. तसेच सदर निर्णयास अपील कुठे करता येते?
म. महसूल मंत्री यांचा निर्णय म.ज.म अ १९६६ प्रमाणे अंतिम आहे. त्या विरुद्ध अपील नाही . केवळ writ याचिकेद्वारे उच्च न्यालयात त्यास आव्हान देत येयील .
लेखी हर्कतीस अर्थ नाही .म. मंत्री महोदय यांचे निर्णय नुसार नोंद घालणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप latake
02-10-2014
latakesandip01@gmail.com
झील्लाधिकारी कार्यालयाची रचना व कार्य पद्धत्ती हे मराठी पुस्तक कोठे मिळेल व कोणत्या लेख्खाचे घ्यावे
१. मनोरा आमदार निवास बाहेर एक पुस्तक विक्रेता बसतो . त्याकडे मिळू शकेल
२. पुणे येथे अप्पा बळवंत चौकात पुस्तन्काची खूप दुकाने आहेत , तेथे पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विजय सांगले
01-10-2014
vijayrao.sangle@Gmeil.com
नक्कल साठी अर्ज केल्या नंतर किती पयशे भर लागतात
Question by विनायक बांदकर
30-09-2014
vinayak0000bandkar@gmail.com
साहेब, पोलीस ठाण्यातून पुढे दिलेली चाप्टर केस ची माहीती जर आम्हांला माहीतीच्या आधारे तहसिलदारांकडून मागवता येते का..
Question by dipak gangadhar kute
30-09-2014
kute1785@gmail.com
Sir,I have applicate my land for commercial NA ;townplaning dept.demand us 12meter road but i have only 9meter
So,give me proper advice
मला वाटते, आपण रस्त्याच्या रुंदीबद्द्ल बोलत आहात. नवीन नियमावलीनुसार रस्त्याची रुंदी ही लांबीवर आधारीत करण्यात आले आहे.....त्यामुळे आपल्या रस्त्याची लांबी किती आहे हे पाहावे.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by राजेंद्र शिंदे
30-09-2014
amey_entp@yahoo.co.in
ठाणे जिल्हातील सरकारी आकारी पडित जमिनीवरील अतिक्रमण नियामाकुल करणे बाबत 2001 पासून प्रलंबित प्रकरणाची यादी कोठे मिळेल व प्रकरण पुन्हा सदर करण्यासाठी कोणाशी संपर्क साधावा.
Question by प्रमोद शिर्के
29-09-2014
psshirke14@gmail.com
महोदय
मी तहसील कार्यालयाकडे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत खालील प्रमाणे माहिती मागविली होती.
१. कार्यालयात सन २०१० पासून आजपर्यंत दाखल झालेल्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ८५ प्रमाणे सर्व प्रकरणाची माहिती.
२. वरीलप्रमाणे मागविलेली सर्व माहिती आपण CD द्वारे द्यावी.
वरील प्रमाणे अर्ज सदर केला असता त्यांनी मला असे पत्र दिले आहे की, आपण मागविलेली माहिती हि कार्यालयाच्या संगणकामध्ये
उपलब्ध नसल्याने आम्ही आपणाला ती देवू शकत नाहीत आपण जर मागविलेली माहिती zerox प्रतीमध्ये मागाल तर
आम्ही ती सर्व माहिती आपणास उपलब्ध करून देवू शकतो.
परंतु मला वरील सर्व माहिती CD द्वारेच मिळावी हि इच्छा आहे तरी ती मला मिळू शकेल का व ती मिळविण्यासाठी मला काय करावे लागेल.
आपल्याला आवश्यक असलेली माहिती कार्यालयाकडे ज्या स्वरुपात उपलब्ध आहे, त्याच स्वरुपात आपल्याला पुरवली जाईल...... आपण कगदोपत्री असलेली माहिती सीडी मार्फत हवी किंवा सीडी मध्ये असलेली माहिती कागदोपत्री द्यावी अशी माहिती मागता येणार नाही.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by संदीप
27-09-2014
patilsandeep737@gmail.com
एका पदावर ३६४ दिवस अथवा जास्त दिवस तात्पुरती पदोन्नती देण्यात आली असेल तर ३६५ दिवसानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून पदानावत करता येते किवा नाही?. याबाबत काही शासन निर्णय, न्यायायलीन निर्णय असल्यास मला देण्यास विनंती.
तसेच तात्पुरत्या एकस्तर/एक टप्पा पदोन्नतीवर १० वर्षापेक्षा जास्त कालावधी अखंडित सेवा केल्यावर, त्या व्यक्तीला पुन्हा पदानवत केले आहे. त्या व्यक्तीला काही पदानवत न होण्यासाठी की करावे लागेल- त्याला काही मदत करता येईल का?
त्या व्यक्तीचा पगार आहे तोच राहण्याबाबत काही तरतूद आहे का?
--------------------------------------------------
अधिक माहिती:-
त्या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली झाल्याने त्यांना पदान्वत केले आहे-
कारण सदर पदोन्नती हि त्या कार्यालयात नेमणुकीस असल्यामुळे/प्रोस्तावन म्हणून देण्यात आलेली होती.
पदोन्नती देताना "पाच वर्षासाठी देण्यात आलेली आहे" असा काही जनाच्या पदोनत्ति ओर्डेर मध्ये उल्लॆख आहे.
काही जनाच्या पदोन्नती ओर्डेर मध्ये तसा कुठेच उल्लेख नाही.
तसेच सर्वांचा पगार हा कायमस्वरूपी पदातून पारित होतो. म्हणजेच सर्व पदे हि स्थायी आहेत.
---------------
आपले मार्गदर्शन लवकर मिळण्यास विनंती आहे.
Question by Swapnil Shivaji Gaikwad
26-09-2014
swapnilcp@gmail.com
साहेब नमस्कार, maharashtracivilservice.org वर आपली माहिती मिळाली.
साहेब, इतर अधिकारातील मुलींची नावे (वारसनोंद) कब्जेदार सदरी नोंदवुन घेण्यासाठी कोणत्या कायद्याचा वापर होतो? आमचे प्रकरण 8 महिन्यांपासुन शिरुरमध्ये पडुन आहे. भोर तालुक्यातील एक प्रकरण उदाहरणार्थ मी सादर केले. त्यात महाराष्ट्रजमीन महसुल कायदा 1966 कलम 155 उल्लेखित आहे. पण आमचे तहसिल साहेब मान्य करत नाहीत. कृपया प्रतिक्रिया द्या. आपला संपर्क क्रमांक मिळाला तर फार बरे होईल. धन्यवाद, आपला दिन शुभ असो.
आपले प्रकरण १५५ अंतर्गत येणार नाही आपणास अपील दाखल करावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
