जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by संदीप मनोहर गंग्रस
24-09-2014
sandipG0207@gmail.com
शासकीय कर्मचा-याला इतर शेक्षणिक परिक्षा द्यावयाचे झाल्यास कार्यालय प्रमुखाचे परवानगीची आवश्यकता आहे काय
Question by Dilip Badki
23-09-2014
dilipbadki58@gmail.com
१.दोन वेगवेगळ्या गात नंबरचे एकत्रीकरण करण्याचे अधिकार प्रांत अधिकारी यांना आहे काय?
२.भूखंडाचे चेत्राफालाचा तुकडा padnyachi ग्रामीण व शहरी भागासाठी मर्यादा kiti आहे?
१. आहे
२. प्रत्येक विभागात वेगवेगळे आहे जमाबंदी बाबत अधिचुचना पहा.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by मधुकर कोकाटे
23-09-2014
९६०४३७८०५२
साहेब मला आदिवाशी जमीन मा शासन महसूल व वन विभागाकडिल जावक क्रमांक अादिवाशी -३४११/१३३७/प्र. क्र. ३१८/ल-९ दिनांक २२/११/२०११ ला हस्तांतरणास मजुरी दिली आहे तरी ति माहिती मला मिळवा हि विनंती आपला आदिवासी सेवक
विक्री परवानगी प्रत संबंदित शाखेकडून / desk कडून आपणास प्राप्त होईल. अथवा आपण त्यांना विचारणा करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नरेंद्र बडेरे, तलाठी
22-09-2014
nrbadere@gmail.com
शासकीय कर्मचा-यांना 45 वर्षाचे झाल्यास विभागीय दुय्यम सेवा परीक्षा/महसूल अर्हता परीक्षा देण्यापासुन सुट प्रदान करण्यात आलेली आहे. परंतु सदर सुटीचा दिनांक कसा मोजावा या बाबत काही परिपत्रक/शासन निर्णय असेल तर कृपया मार्गदर्शन करावे.....
Question by दिपाली गुरव
22-09-2014
dipali111gurav@gmail.com
साहेब नोदणीकृत बक्षीस पत्र, नोदणी कृत बाँन्ड, नोदणीकृत मुखत्यारपत्र म्हणजे मला महसूल विभागातील नोंदणीकृत या शब्दाची व्याख्या द्यावी आणि नोंदणीकृत करणारे महसूल अधिका-याची पदे कळविलात तर बरे होईल. विनंती
नोंदणीकृत म्हणजे भारतीय नोंदणी कायदा १९०८ अन्वये दुय्यम निबंदक याचेकडे नोंदणी ( registered ) केलेलं असते.
निभन्दक तहसील कार्यालयातच त्याचे बहुतांशी ठिकाणी कार्यालय आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by pradip waghchaure
21-09-2014
www.pradipwaghchaure81.pw@gmail.com
स्वमालकीच्या जमिनी शेजारीसरकारी गायरान जमिनीत विहिर (भुडकी)खोदण्यास परवनगी मिळते काय?जर पूर्वी अशी परवानगी मिळालेली असल्यास व विहिर खोदलेली नसल्यास नुतनीकरण करून विहिर खोदता येईल काय कृपया मर्गद्शन करावे
Question by GANESH MAKARELAR
20-09-2014
mjrkrganesh@gmail.com
साहेब, मी तहसिलदार कार्यलयामध्ये मुखत्यार पत्र मिळविण्यासाठी प्रत नकला मिळण्यासाठी अर्ज केला होता. परंतु दहा पंधरा दिवसांनतर मी पुन्हा कार्यलयात गेलो असता २००४ चा रेकाँर्ड आमच्या नाही आहे. आम्ही तुम्हाला नंतर कळवू . अशी उडवाउडवी ची उत्तरे देण्यात आली. नंतर मी लगेच माहीतीच्या अधिकाराखाली अर्ज जावक विभागता दिला आहे. परंतु साहेब मला कळेल का जर पीटीसी अंतर्गत वा प्रत नकला मिळण्याबाबत अर्ज दिला तर तो अर्ज कीती दिवसांत निकालात काढला जातो.कींवा त्याची प्रोसिजर काय आहे. जर ते देत नसतील वा टाळाटाळ करत असतील तर कींव २००४ सालाचे कागदपत्रे मिळविण्यासाठी मला पुढील सल्ला आपण मला द्यावा. ही विनंती.
Question by सदाशिव घोडेराव
19-09-2014
sadanandghoderao@gmail.com
सर माझे गाव ठाकर आडगाव तालुका गेवराई जिला बीड आहे माझी वडील उपार्जित सर्वे नंबर ३०८/२ हा आहे पूर्वी या शेताला जाण्यासाठी सरकारी पायवाट होती पण आता ती काही शेतकर्यांनी बंद केली आहे आज मला शेतात जाण्याशाठी तब्बल २ कि.मी चा फेरा मारून जावे लागत आहे जर शासनाने जुन्या पाय वाटा बंद केल्या असतील तर मला शासन निर्णयाची सत्य प्रत देण्यात यावी
माम्लेतदार कोर्ट कायद्या खाली तहसीलदार यांचे कडे दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुभाष प Koli
18-09-2014
ksubhash83@gmail.com
सर जर जमीन वर leege ऑफ pendecy असले व त्याची नोद २०१३ साली झाली असेल व ते खोटी असले तर त्या साठी कोणता कायदा आला आहे का ? कृपया सहकीर्या करावे
तसेच आपण महसूल अधिकारी असाल तर "महसूल व्यासपीठ" मध्ये याच विषयावर दि ०२.०७.२०१३ व २२.०७.२०१३ रोजीच्या चर्चेचा उपयोग करून घेवू शकता.
Reply by MCS Maharashtra | इतर
lis pendans हि नोंद ७/१२ वर घेण्याची गरज नाही. मात्र अशी नोंद घेतलेली असेल तर , प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करून , काढून घ्या.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ram
17-09-2014
ramkumar.nathani@gmail.com
Dear सर
in the year 1972, sdo chadrapur dist chandrapur ordered bhumidhari convert to bhumiswami of ballarpur .I want to know in which basis did he passed the order, whether any G.R available.
म.ज.म.अ. १९६६ चे कलम २९ (2) (क) अन्वये भूमिदाह्री वर्ग २ यांना भूमिधारी वर्ग १ करण्याची तरतूद आहे. त्या खाली नियमही आहेत.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पल्लवी शिंदे
17-09-2014
pallavi@gmail.com
मा.सर
माझ्या आजोबांच्या नावावर २० एकर एवढी जमीन असून त्यांनी तिचे वाटप माझे वडील व चुलते यांच्या नावावर होण्यासाठी
तहसीलदार यांच्याकडे कलम ८५ प्रमाणे सुमारे ४ महिन्यापूर्वी अर्ज सादर केला होता तर आज तहसीलदार यांनी तो अर्ज बाद केला आहे त्यांनी असे म्हटले आहे कि कलम ८५ प्रमाणे वाटप करता येत नाही व सदर वाटप होवू शकत नाही तुम्ही कोर्ट वाटप करा असे सांगितले आहे यावर माझ्या वडिलांनी त्यांच्याकडे तशी लेखी मागितली असता त्यांनी ती देण्यास नकार दिला व माझ्या वडिलांना कार्यालयातून बाहेर हाकलून
लावले. तर यावर आता आम्ही काय करावे.
१. कोणाकडे दाद मागावी.
२. कलम ८५ प्रमाणे सदर वाटप होवू शकत नाही का.
३. आपण काहीतरी मदत करावी हि विनंती.
जमिनीचे मालकी हक्क बाबत वाद नसेल तर , कलम ८५ प्रमाणे तहसीलदार वाटप करू शकतात.
आपण प्रांत स्धिकारी यांचे कडे दाद मागा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद शिर्के
16-09-2014
psshirke14@gmail.com
मा. सर
माझे नाव प्रमोद शिर्के असून मी मतदार यादीमधील नाव दुरुस्तीसाठी अनेक वेळा अर्ज केलेला आहे परंतु माझे नाव काही दुरुस्त होत नाही म्हणून मी प्रांत अधिकारी तसेच निवडणूक कार्यालय अहमदनगर यांचीही भेट घेतली आहे परंतु त्यांनी माझे नाव दुरुस्त केलेले नाही व तेसुद्धा दुरुस्त करत नाहीत, मतदार यादीमध्ये माझे नाव प्रमोद शिर्के एवढेच असून तेथे माझ्या वडिलांचे नाव नाही मी वारंवार दुरुस्तीचा फोर्म भरत आहे सध्या फोर्म भरल्यानंतर मी निवडणूक कार्यालय अह्मेद्नगर येथे गेलो होतो तर त्यांनी माझे नाव आहे
तसेच ठेवले आहे आणि हि माहिती मी http://103.23.150.75/valvi या वेब साईटवर पहिली आहे तर त्यांनी माझे नाव दुरुस्त करण्यासाठी मी काय करावे.
कृपया आपण मला आपला फोन नंबर देवू शकाल का ?
जर फोन नंबर मुलाला तर मी पुन्हा निवडणूक कार्यालय अहमदनगर येथे गेल्यानंतर आपल्याशी संपर्क करू शकतो.
Question by प्रदिप वाघचौरे
16-09-2014
www.pradipwaghchaure81.pw@gmail.com
100रू मुद्रांकावर नोटरी केलेले वाटणीपत्रतलाठी कार्यालय व ग्रामपंचायत तथा
भुमीअभिलेख कार्यालय येथे दिली असता वाटणी होते काय कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
Question by मनोहर mhasekar
16-09-2014
mak.mhasekar98@gmail.com
लग्न झालेल्या व वर्ग ३ पदावर कामाला लागलेल्या, महिलेच्या नोन क्रिमी लेअर प्रमाणपत्रासाठी काय तरतुदी आहेत. वडिलांचे काढायचे कि नवर्याचे?
Question by manohar mhasekar
16-09-2014
mak.mhasekar98@gmail.com
पुणे जिल्ह्यात कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी १९२० पूर्वीचा मोडी लिपीतील एक पुरावा आहे. परंतु तेव्हढा पुरेसा आहे का? १९२० नंतरची नोंद सापडतनाही. याबाबत काही शासन निर्णय आहे का?
इतर मागास प्रवर्गासाठी १९६७ हे मानीव वर्ष आहे. त्या पूर्वीचा कोणताही पुरावा , तुम्ही कुणबी प्रवर्गातील आहात हे सिद्ध करतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद शिर्के
16-09-2014
psshirke14@gmail.com
मा. सर
माझे नाव प्रमोद शिर्के असून मी मतदार यादीमधील नाव दुरुस्तीसाठी अनेक वेळा अर्ज केलेला आहे परंतु माझे नाव काही दुरुस्त होत नाही म्हणून मी प्रांत अधिकारी तसेच निवडणूक कार्यालय अहमदनगर यांचीही भेट घेतली आहे परंतु त्यांनी माझे नाव दुरुस्त केलेले नाही व तेसुद्धा दुरुस्त करत नाहीत, मतदार यादीमध्ये माझे नाव प्रमोद शिर्के एवढेच असून तेथे माझ्या वडिलांचे नाव नाही मी वारंवार दुरुस्तीचा फोर्म भरत आहे सध्या फोर्म भरल्यानंतर मी निवडणूक कार्यालय अह्मेद्नगर येथे गेलो होतो तर त्यांनी माझे नाव आहे
तसेच ठेवले आहे आणि हि माहिती मी http://103.23.150.75/valvi या वेब साईटवर पहिली आहे तर त्यांनी माझे नाव दुरुस्त करण्यासाठी मी काय करावे.
कृपया आपण मला आपला फोन नंबर देवू शकाल का ?
जर फोन नंबर मुलाला तर मी पुन्हा निवडणूक कार्यालय अहमदनगर येथे गेल्यानंतर आपल्याशी संपर्क करू शकतो.
आपण उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांना हि बाब निदर्शनास आणून द्या
अथवा राज्य निवडणूक अधिकारी यांचे संकेत स्थळावर अर्ज करा . तत्काळ दखल घेतली जायील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वाटणी पत्र
15-09-2014
ankush098@yahoo.com
महोदय,
जमीन जर नियंत्रित सत्ता प्रकार असेल तर वाटणी पत्र करता येते का ?
वाटणी पत्रामध्ये जर समती असेल तर हिस्सा कमी किवा जास्त लावता येतो का ?
अंकुश माने
१. होय.
२. नाही.
कमी जास्त क्षेत्रा प्रमाणे हक्क सोड पत्र/बक्षीस पत्र करावे लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वाघमारे संदीप
15-09-2014
sandeep007588@gmail.com
मी सध्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागात स्टेनो पदावर आहे. त्या अगोदर मी जिल्हा न्यायालयात क.लिपिक पदावर साडेतीन वर्ष सेवा केली आहे तेथून मला रीतसर कार्यमुक्त करण्यात आले आहे व व दुस-याच दिवशी मी रुजू झालो आहे. त्यामुळे मी पूर्वीची सेवा सातत्य करण्यास पात्र आहे. मी नवीन डी.सी.पी.एस. स्कीम मध्ये आहे. तरी मी पूर्वीच्या सेवेतील कोण कोणते लाभ घेऊ शकतो व त्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवेतील कोण कोणते नियम लागू होतील कृपया सविस्तर कळवावे.
Question by सीमा गजभीये
14-09-2014
gajbhiyeseema2@gmail.com
तहसीलदार कोणकोणत्या तालुकास्तरीय समित्यांचा प्रमुख असतो?
Question by Pradip Namdeo Borle
13-09-2014
pradip.borle6226@gmail.com
सन २०११ ची जनगणना मधील तालुका तसेच गावनिहाय लोकसंख्या,पुरुष,स्त्री,अ जा,अ ज व इतर ची माहिती पहावयाची आहे.कृपया वेब साईट ची माहिती द्यावी.
Question by gajbhiye seema manohar
13-09-2014
gajbhiyeseema2@gmail.com
various committes headed by tahsildar, inter departmental coordination
Question by rahul Sawant
12-09-2014
rahul9619309796@gmail.com
सर माजी मावशी विधवा आहे तिचि ४९ गुंटे ज़मीन आहे तर त्या जमनीच्या सात बारा वर एका राकान्या मधेनिसबर लहिलेले आहे तर निसबर म्हनजे काय ?तिलाकोन्हि मूल बाल नाही आपल्या उधर निर्वहासाटि या जमनितिल २० गुंटे जगा विकायची आहे तर ती २० गुंटे जगा वीकू शकते काय ?
नि.स. प्र अशी नोंद असावी .
mhanje नियंत्रित सत्ता प्रकार
विक्रीसाठी परवानगीची आवश्यकता aahe.
२० गुंठे जागा विकू शकते
नवीन सुधारणा कुल kaydyanusar , vikri किंमत निस्षित होऊन १० वर्षे zali astil tar परवानगीची garaj nahi
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विक्रांत खरतडे
12-09-2014
vikrantkhartade@yahoo.co.in
नवीन परिभाषित अंशदान याजानेत समाविष्ट असणारे कर्मचारी यांना जुनीच पेन्शन यजन लागू करता येईल काय ?
होय तर ती किती कालावधीत लागू करता येईल ?
सन २००५ नंतर शासकीय सेवेत रुजु झालेल्या सर्वाना नवीन परिभाषित अंशदान योजनाच लागु असेल
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by mahendra
12-09-2014
mahendraj165@gmail.com
सर...
कुलकायद्याची जमीन NA करता येते का? व कुलकायद्याची शर्थ ७/१२ वरून कमी होऊ शकते का ?
३२ म होऊन जर १० वर्ष झाले असेल तर चाळीस पट रक्कम शासन जमाकरुन वर्ग १ करता येईल आणि त्यानंतर आपण एन ए करु शकता
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by निलेश फेगडे
12-09-2014
nileshfegade@yahoo.co.in
नमस्कार किरण सर,
९ तारखेला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
त्या प्रश्नाला अनुसरून दोन प्रश्न होते,
१) शेतकरी दाखल्याची खरोखर गरज कुठे असते?
२) दुसऱ्या जिल्ह्यात जमीन विकत घेतली असेल तर त्या जमिनीच्या ७/१२ वर नाव टाकण्यासाठी शेतकरी दाखल्याच्या ची गरज असतेच. मी चुकत असेल तर कृपया चूक दुरुस्त करावी.
१. महाराष्ट्रात कुल कायद्याचे कलम ६३ अन्वये बिगर शेतकरी व्यक्तीस शेत जमीन खरेदी करता येत नाही.
२. बरोबर.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
