जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

महोदय, जिल्हानिहाय आवर्षण ग्रस्त गावांबाबत माहिती कोणत्या विभागाशी निगडीत आहे.
सिटी सर्व्हे ला मिळकत नोंदी मध्ये जर एकाचे नाव एकुमे व इतर हक्कात राहिलेले भाऊ असतील तर त्यापैकी एकास जर मिळकत नांवे करून घ्यावयाची असेल तर हक्कसोड पत्राच्या आधारे घेता येईल का ? हक्कसोड पत्र देण्यास सर्वजण तयार नसतील तर जे तयार आहेत त्यांचे नावचे क्षेत्र सोडून इतर क्षेत्र हक्कसोड पत्र लिहून घेणाऱ्याच्या नावे करता येते का ?
सर, मला पीजी करायचे असून ते २ वर्षे कालावधीचे, पूर्ण वेळ शिक्षण आहे. याकरिता मला शैक्षणिक रजा नको आहे तर, प्रती नियुक्ती हवी आहे. (नोकरी व शिक्षणाचे शहर एकच आहे.) या संदर्भातील नियम, अटी मला कुठे प्राप्त होतील??
पदवी उत्तर शिक्षण , नोकरीवर परिणाम होणार नसेल तरच रजे शिवाय
पूर्ण करता येते.
पूर्ण वेळ शिक्षण असेल तर , तर करतायेणार नाही . रजा घ्यावी लागेल
distance education घेणे संयुक्तिक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by prakash
12-08-2014
prakashdhumane867@rediffmail.com

२.३८ हेक्टर जमीन माझ्या आईच्या नावे आहे,ती जमीन मला आता
माझ्या नावाने करायची आहे.आम्ही दोन भाऊ एक बहिण आहे,मोठा भाऊ आणि लहान बहिण यांचे लग्न झालेले
आहे.ती २.३८ हेक्टर जमीन माझ्या नावे करण्यास
त्यांची संमती आहे,तर ती जमीन १०० रुपयाच्या स्टम्पवर नोंदणीकृत दानपत्र
माझ्या नावाने करता
येईल का?
याचा कृपया मार्ग सांगा.
आपणास नोंदणीकृत दान पत्र करावे लागेल. १०० रुपयाचे स्टंप पेपर वर करता येणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vijay
12-08-2014
prakash78@gmail.com

सर,
माझ्याकडे मौजे कोठा त.kalamb
जिल्हा यावात्मा येथे सर्वे नं.१३५/१ २.०२ हेक्टर शेत आहे,मी बेरोजगार असून माझ्यामागे पत्नी व १ मुलगी आहे,आतापर्यंत माझे कुटुंब चालवण्यासाठी मी माझ्या आत्या कडून मदत घेत आलेलो आहे,tichyakade जमीन नाही. त्याचा मोबदला म्हणून मला माझ्या जमिनी मधून १ हेक्टर जमीन तिला विकत द्यायची आहे.नोंदणी कार्यालयात गेलो असता त्या जमिनीत तुकडा पडता येत नाही असे सांगण्यात आले,कृपया मला माझी १ हेक्टर जमीन जमीन तीच्यानावे करण्यासाठी मार्ग सांगा.









१३५/1
यवतमाळ जिल्ह्याचे प्रमाणशीर क्षेत्र मर्यादा किती आहे याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अथवा उपाधीक्षक भूमी अभिलेख यांचे कडे चौकशी करा.
१ hectar क्षेत्र मोठे आहे त्यामुळे तुकडा पडणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by tushar
12-08-2014
tsshewale@gmail.com

सर,७/१२ var
इतर hakkat पोक्ळिस्त फेराने padleli नवीन शर्त म्हणजे काय?
सर , माझ्याकडे नोंदणीकृत मृत्युपत्र मंजुरी करिता आले. त्यात खातेदाराने आपल्या मिळकतीचे ५ एकर शेतीमधून ३ एकर शेती आपला नातू याचे नावाने करून ठेवले.शिल्लक २ एकर शेतीचा या मृतुपत्रात काहीही उल्लेख नाही. करिता हि २ एकर शेती कोणाकडे जाईल किवा सदर मृत्युपत्राचा फेरफार रद्द करून नवीन वारसाचा फेरफार घेण्यास तलाठी यांना निर्देश देऊ
३ एकर क्षेत्र नातुचे नावावर करण्यास हरकत नाही.
उर्वरित क्षेत्र वारसा कायद्याप्रमाणे , उत्तराधिकारी यांचे नावे होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर , माझ्याकडे नोंदणीकृत मृत्युपत्र मंजुरी करिता आले. त्यात खातेदाराने आपल्या मिळकतीचे ५ एकर शेतीमधून ३ एकर शेती आपला नातू याचे नावाने करून ठेवले.शिल्लक २ एकर शेतीचा या मृतुपत्रात काहीही उल्लेख नाही. करिता हि २ एकर शेती कोणाकडे जाईल किवा सदर मृत्युपत्राचा फेरफार रद्द करून नवीन वारसाचा फेरफार घेण्यास तलाठी यांना निर्देश देऊ

Question by mohan
10-08-2014
mohanmsutar@gmail.com

नमस्ते साहेब
मी आपल्या निवारण समिती कडे एक व्यक्तीने न कळत दोन वेगवेगळे सर्वे नंबर मिळुन एकच प्रकल्पग्रस्त दखल २००१ मदे काढले आहे. २००९ मदे नोकरी मिळाले .सदर त्यामाडे एक सर्वे नंबर गृहीत एक दखल नोकरी साठी गृहीत धराव आणि त्यामाडे एक सर्वे नंबर चे दखल वेगळे करून त्याच कुटुंबातील दुसर्यांना द्यावे कारण शासनाने भूसंपादन करताना १९९७ मदे दोनी सर्वे नंबर चे वेगवेगळे निवड जाहीर केले होते. २००० मदे रक्कम योग्य मोबदला न मिळाल्याने मुंबई न्यायालयात याचिका दखल केले होते २००६ मदे न्यायालयाने एक समिती नेमून आमचे चावडी मदे येउन पाहणी केले त्यावेळी आम्ही दोन्ही सर्वे नंबर मिळून योग्य मोबदला मिळण्यासाठी ekch अर्ज केले होते त्यावेळी शासनाने दोन्ही सर्वे नंबर साठी वेगवेगळे निवडा जाहीर केले.निवड जाहीर करताना भेदभाव केले आहे ज्याप्रमाणे दोनी सर्वे नंबर मिळून मोबदला मिलानेसाठी व दखल मिलानेसाठी अर्ज केले होते .सदर संबंदित कार्यालयाकडून दखल वेगवेगळे कदणेसाठी काहीही माहिती मिळाले नाही .निवडा प्रमाणे दाखला एकच गृहीत धरून एक वेगळे करून देणे बाबत तरतूद होणार काय?माहिती मिळावे विनंती
अॅसिड व तत्‍सम द्रव्‍य बाबतचे परवाने कोणत्‍या कार्यालयाकडून निर्गमित केले जातात त्‍या कार्यालयाचे नाव
मोहोदय.
सर मी वाहन चालक या पदावर जिल्हा नियोजन समिती गोंदिया येथे कर्येरत असून माझा मूळ विभाग महसूल आहे. व मी लिपिक या पदाची शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असून मला वाहन चालक या पदावरून लिपिक या पदावर जायेचे असल्यास कोणत्या नियमानुसार करता येईल. कृपया मार्गदर्शन करा.
या पूर्वी अश्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
आपणास लिपिक परीक्षेस बसावे लागेल.
वर्ग ४ मधील कर्मचारी जर लिपिक सावर्गाचीअहर्ता धारण करत असेल तर , तीन वर्ष सेवा झाले नंतर , वर्ग ३ लिपिक म्हणून पद्दोनत होऊ शकतो.
वाहन चालक वर्ग ३ पद आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एका पदावर ३६४ दिवस अथवा जास्त दिवस तात्पुरती पदोन्नती देण्यात आली असेल तर ३६५ दिवसानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून पदानावत करता येते किवा नाही?. याबाबत काही शासन निर्णय, न्यायायलीन निर्णय असल्यास मला देण्यास विनंती.
तसेच तात्पुरत्या एकस्तर/एक टप्पा पदोन्नतीवर १० वर्षापेक्षा जास्त कालावधी अखंडित सेवा केल्यावर, त्या व्यक्तीला पुन्हा पदानवत केले आहे. त्या व्यक्तीला काही पदानवत न होण्यासाठी की करावे लागेल- त्याला काही मदत करता येईल का?
त्या व्यक्तीचा पगार आहे तोच राहण्याबाबत काही तरतूद आहे का?
--------------------------------------------------
अधिक माहिती:-
त्या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली झाल्याने त्यांना पदान्वत केले आहे-

कारण सदर पदोन्नती हि त्या कार्यालयात नेमणुकीस असल्यामुळे/प्रोस्तावन म्हणून देण्यात आलेली होती.
पदोन्नती देताना "पाच वर्षासाठी देण्यात आलेली आहे" असा काही जनाच्या पदोनत्ति ओर्डेर मध्ये उल्लॆख आहे.

काही जनाच्या पदोन्नती ओर्डेर मध्ये तसा कुठेच उल्लेख नाही.

तसेच सर्वांचा पगार हा कायमस्वरूपी पदातून पारित होतो. म्हणजेच सर्व पदे हि स्थायी आहेत.
---------------
आपले मार्गदर्शन लवकर मिळण्यास विनंती आहे.

Question by yadav
09-08-2014
yadavpethkar511@gmail.com

आमचे वडील वारल्यानंतर आम्ही दोघा भावांनी जमीन आठ -आठने फेरफार लाऊन घेतला. त्या नंतर वाटणी करून घेतली.वाटणी पत्रकावर खुठापासून भरलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ ज्याचे त्यालाच राहील व ते दप्तरी लाऊन घ्यावे असे लिहिण्यात आले आहे .त्या क्षेत्रफळात समानता असल्यास किंवा नसल्यास ते त्याचे त्यालाच राहील .मात्र माझा मोटा भाऊ या वाक्याचा फायदा घेत खुटे उपटून आमच्या बाजूने रोऊन वारंवार अतिक्रमण करत आहे. वाटणी पत्रक १०० रुपयाच्या बॉन्डवर गावातील माणसे बोलावून केले आहे . बॉन्ड नोंदणीकृत नाही. बॉन्डला ८ वर्षे झाले आहेत. बॉन्ड वर क्षेत्रफळ लिहिले नाही .काय करावे सल्ला द्या.
५०-५० टक्के क्षेत्र आपण दोन भावाचे नावावर असणे व त्या प्रमाणे वाटप करणे/ होणे आवशयक आहे/ होते. हिस्स्या प्रमाणे जमीन नावावर होणे व ताबा मिळणे साठी दावा दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mohan
08-08-2014
mohanmsutar@gmail.com

साहेब
आमचे भावांनी न कळत दोन सर्वे नंबर मिळून एकच प्रकल्पग्रस्त दाखल २००१ मदे कडले त्यादाखालावरून नोकरी मिळाले आहे .सदर आपल्या निवारण समितीकडून दोनी सर्वे नंबर मिळुन एकच दाखल मिळतो असे उत्तर दिले आहे. सदर दोनी सर्वे नंबर मिळुन एकच दाखला मिळावे असे उल्लेख नाही .अर्ज करताना दोनी सर्वे नंबर टाकला आहे महसुल विभागाकडून त्याबाबत दोन सर्वे नंबर वेगवेगळे असताना आम्हाला कोणतेही माहिती समजून सांगितले नाही सदर कोर्टनी रक्कम मंजूर करण्यासाठी एक समिती नेमण्यात आले होते .त्यावेळी सुद्धा दोनी सर्वे नंबर मिळुन एकच अर्ज दिले .त्या समितीने रक्कम मंजूर करताना एक सर्वे नंबर ला १हे .१३ आर साठी १९९७ पासून व्याज सहित ३१७००० रु मंजूर केले. आणि दुसरे सर्वे नंबर ला ३हे १५ आर साठी १७०००० रु मंजूर केले .रक्कम मंजूर करताना भेदभाव केले आहे .दखल देताना भेदभाव केलेले नाही.ज्या प्रमाणे रक्कम मंजूर मदे वेगवेगळे केले आहे त्याप्रमाणे त्यांना एक सर्वे नंबर चे दखल मंजूर करवा आणि दुसरे सर्वे नंबर त्याच कुटुंबातील इतरांना देणेत यावे करण येते रक्कम मंजूर वेगळे असताना महसुल विबगाने समजाउन सांगायला हव होते . योग्य माहिती मिळावे विनंती.
निवारण समितीने दिलेले उत्तर बरोबर आहे. प्रकल्पग्रस्त दाखला , कितीही स.नंबर , संपादित झाले तरी एका कुटुंबास yekach दाखला मिळतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साठे खत म्हणजे काय ?
साठे खात म्हणजे जमीन भविष्यात विक्री करण्याचा करार.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वाहन चालक या पदावरून लिपिक या पदावर नियुक्ती मिळेल का व कसे
आपणास लिपिक सवर्ग या परीक्षेस बसावे लागेल . लिपिक पदाची अहर्ता धारण करत असला तरी आपणास पद्दोनति मिळणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय.
मी महसूल विभाग जिल्हाधिकारी कार्यालये गोंदिया येथे वाहन चालक या पदावर कार्यरत आहे. मी लिपिक या पदाची शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली आहे. लिपिक या पदावर जायचे असल्यास काय करावे लागेल.कृपया मार्गदर्शन करा.
सर,माझी जामीन वर्ग २ ची आहे मला
तिची विक्री करायची आहे तर त्यासाठी
काय करावे लागेल कृपया यावर मार्गदर्शन करा
वर्ग २ म्हणजे विक्रीवर निर्बंद. परवानगीशिवाय जमीन किक्त येत नाही.
शाश्नाने जमीन दिलेली असल्यास , परवानगी आयुक्त , कुल्काय्द्या खाली जमीन मिळाली असल्यास प्रांत अधिकारी, कमाल मर्यादा धारण कायदा असेल तर जिल्हाधिकारी परवानगी देतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मला नवीन भूसंपादन कायदा 2013 हवा आहे. तर तो कुटे शोधावा वेबसाईट????
Website
https://rfd.maharashtra.gov.in/Default.aspx#MainPage

Reply by श्री.ओ.आर. अग्रवाल | उप जिल्हाधिकारी

केंद्र सरकारचे ग्राम विकास या संकेत स्थळावर मिळेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब, फेरफार म्हणजे काय...
नातेवाईक जर खाते पुस्तक देत नसतील तर खाते पुस्तकाची दुसरी प्रत मिळविण्यासाठी काय करावे लागेल.. कृपया मार्गदर्शन मिळावे
खातेपुस्तक कालबाह्य झाले आहे.
तलाठी यांचे कडे आपणास फेरफार मिळेल.
फेरफार म्हणजे जमीन हस्तांतराचा नमुना.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, ग्रामीण भागातील नवीन शर्तीचे (बखळ प्लॉट) चे विक्रीचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या ऐवजी प्रांताधिकारी यांना आहे या बद्दलचा जी आर हवा आहे किवा कोणत्या आशयाखाली ते विक्रीची परवानगी देऊ शकतात या बद्दल माहिती हवी आहे कृपया लवकर मिळाली तर बर होईल माझ प्रकरण थांबल आहे (प्रांताधिकारी यांचे म्हणणे आहे कि एन.ए. ओर्डेरवर जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय विक्री करू नये असे म्हटलेले आहे त्यामुळे मी परवानगी देऊ शकत नाही कृपया मार्गदर्शन करा हि विनंती.)
सर ,
प्रकल्पग्रस्त दाखला हस्तांतरणीय होऊ शकतो का?
म्हणजे दाखला माझ्या नावे असेल आणि माझ्या भावाला सरळसेवा भरतीमध्ये अर्ज करायचा असेल तर दाखला त्याच्या नावे करता येतो का ?

Question by atul
05-08-2014
atulpuntambekar@gmail.com

सर, माझा आत्याने वडिलांना फसवून बक्षीस पत्र बनविले आहे. त्यावेळी वडिलांना न सांगता फसवून सही करून गेतली आहे आत्ता ती जागेवर हक्क सांगत आहे. वडिलांना काहीच हिस्सा मिळत नाही तर मार्ग सुचवावा.
दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा व बक्षीस पत्र रद्द करून घ्या.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी मंत्रालयीन कर्मचारी तून पोलिस विभागात लिपिक या पदावर कार्यरत आहे तरी मला इतर विभागात बदली करून जाता येईल का
सर
फेरफार मध्ये १९५५ साली माझ्या आजोबांनी हरी या व्यक्तीस जमीन विकल्याचा उलेख आहे परतू सदर जमीन आजतागायत माझ्या ताब्यात आहे व त्या जमिनीपैकी एकावर सोसायटीचा बोजा आहे व दुसर्या जमिनीवर तागैतीचा बोजा असताना सदर फेरफार मंजूर केला आहे
सर बोजा असताना फेरफार मंजूर करता काय
नसल्यास मी सदर फेरफार विरुद्ध दावा करू शकतो काय
बोजा असला तरी जमीन विकत येते.
घेणार्यावर बोजा कर्ज फेडण्याची जबाबदारी राहते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.34 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3