जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अभीजित
19-12-2015
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... 1930 ते 1970 या काळातील इनाम वर्ग 6ब(पाटील) या जमीनींना कुळ कायदा 1948 लागू होता का? कारण कब्जेदार सदरी सरकार असे नाव होते तदनंतर 1970 साली ईनाम खालसा झाले त्यामुळे ईतर जमीनीवर ज्या प्रमाणे महसुल विभागाने कार्यवाही केली त्याप्रमाणे या जमीनीवर का करण्यात आली नाही
Question by गणेश शिंदे
18-12-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,५ भावांपैकी १ भाऊ २ वर्षापासून परागंदा आहे.तो अविवाहित असून.परागंदा असलेबाबत FIR दाखल आहे.तरी त्याचा जमिनीतील हिस्सा सोडून ४ भावांना आपापसात रजि.वाटणीपत्र करता येईल का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
18-12-2015
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, मुखात्यार्पत्राची नोंदणी करणे कायद्याने सक्तीचे आहे काय? कुलमुखत्यारपत्र व जनरल मुखत्यारपत्र यात काय फरक आहे.
नोंदणी महानिरक्षक यांचे नवीन सूचनानुसार , मुखत्यारपत्र नोंदणी करणे आवश्यक
भारतीय नोंदणी कायदा कलम ३३ प्रमाणे हि मुखत्यार पत्राची नोंदणी आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रवि जाधव
16-12-2015
ravijadhav222@gmail.com
नमस्कार
बागायतीसाठी जमीन खरेदी करावयाची असल्यास काय काळजी घ्यावी जेणेकरून भविष्यात वादविवाद टाळता येतील तसेच मुद्रांक फी आणि नोंदणी फी काय असेल.
Question by विजय परब
16-12-2015
vijayparb2525@yahoo.co.in
आदारणीय सर,
सातबारा मधील कुटुंबाबाहेरील व्यक्तीच्या नावावर हक्क सोड पत्र करावयाचे आहे आणि आम्ही कुटुंबीय मुंबईत आहोत. आम्हा सर्वजणांना सब रजिस्ट्रार कडे जावे लागेल का ? एखादी व्यक्ती जावून हक्क सोड पत्र करू शकते का ? त्या साठी काय करावे लागेल ? त्या साठी कोणती कागदपत्रे लागतील ?
कुटुंब बाहेरील व्यक्तीचे नावे हक्क सोड पत्र करता येईल . मात्र खरेदी खत एवढे मुन्द्रंक शुल्क आवश्यक
आपणास सर्वाना दुय्यम निभंडक यांचे कडे जावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप निघोट
15-12-2015
sandeep.nighot@gmail.com
नमस्कार सर माझ्या मित्राची जमीन त्याच्या आजोबांनी विक्री केली होती ती जमीन खरेदी घेणार शेतकरी नसल्याने सदरची जमीन ८४ क शेरा ठेऊन अव्वल कारकून तहसीलदार यांनी सरकार जमा केली. त्या जमिनीच्या मालक सादरी सरकार शेरा दाखल आहे ती जमीन माझ्या मित्राला परत कशी मिळेल
कुल कायदा कलम ३२ प खाली , तहसीलदार यांनी या जमिनीचा विक्री लिलाव जाहीर केल्यास , मित्रास त्यास सामील होण्यास / अर्ज करण्यास सांगा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रशांत राजपूत
14-12-2015
rajputprashant910@gmail.com
माननीय किरण सर,
मला विहीर मालकी हक्क संबधी आजून माहिती हवी,
सर आपण दिलेल्या माहिती वरून मी काही प्रमाणात संतुस्त
आहे.परंतु तरीही मला आजून माहिती हवी आहे,तुम्ही दिलेल्या माहिती नुसार तूर्तास मालकी हक्क हा जमीन मालकाचा आहे.पण तरीही तो खर्च देवू नाही शेकत मग त्या नुसार आम्ही त्या विहिरीवर आमचा मालकी हक्क आहेना.
धन्यवाद,
Question by Ganesh Shinde
13-12-2015
shindeganesh046@gmail.com
Vikat ghetaleli jaga navavar karnyasathi lagnari mahiti.sarv process
Question by wasim sayyed
13-12-2015
wasimsayyed2007@gmail.com
सर 19, December 2014 ला एक प्रश्न विचारलं होता. त्या प्रश्नाचे उत्तर मला श्री. बी.पी. काकडे तहसीलदार, रावेर साहेब यांच्या कडून मिळाले. धन्यवाद सर ! सरांनी संगीत्याला प्रमाणे आपण प्रश्नात पूर्ण माहिती नमूद केलेली नाही. त्यामुळे मी काढलेल्या दाखल्याच्या आधारे पूर्ण माहिती नमूद करत आहो. मिळालेल्या उत्तर प्रमाणे मी सर्व दाखले काढलेले आहे. माझा प्रश्न असा होता कि, आजोबानो शेत सर्वे नं. ५२ १९५२ ला २००० रु. ला खरेदी केला होता. एकूण क्षेत्रफळ २५७१७ एवढ होता. काही काळ स्वतः वहीती केल्या नंतर आजोबाने शेत एका व्यक्तीला मक्त्याने दिला सन १९६०-६१. "पेरे पत्रक" नुसार त्याने सन १९६० ते १९७० पर्यंत मक्त्याने शेत वहीती करत होता. सन १९७३ ला शेत त्याने स्वतःच्या नावाने केला. असा उल्लेख फेरफार नोंदी मध्ये आहे. सन १९७३ ला एकाच दिवशी २०/०८/१९७३ त्याच्या नावाने तीन फेरफार झाले आहे. ते पुढील प्रमाणे –
१) सर्वे नं. ५२/१ एकूण क्षेत्रफळ २४७१६,
२) सर्वे नं. ५२/२ एकूण क्षेत्रफळ १७१
३) सर्वे नं. ५२ एकूण क्षेत्रफळ २५७१७.
असे एकूण एकाच दिवशी तीन फेरफार झाले आहे. फेरफार नं. १ व २ च्या समोर “भूस्वामी खरेदी हक्काने श.मा.क्र. ४७९/५९(१३)/६३-६४ प्रमाणे शेत सर्वे नं. ५२ सरकार पासून खरेदीस घेतला” असा शेरा आहे. व फेरफार नं. ३ च्या समोर “पोट हिस्सा एकत्र झाल्यामुळे फेरफार” असा शेरा आहे. हक्क नोंदी पत्रकात सुद्धा अश्याच प्रकारे उल्लेख आहे. खरेदी खताच्या नक्कल मध्ये “Purchase under section 43 of the Bombay Tenancy and Agriculture Lands (Vidarbha Region and Kutch Area) Act, 1958.” प्रमाणे दिनांक २२/०५/१९७३ ला शेत ९२२ रु. खरेदीस घेतला असा उल्लेख आहे. अश्या प्रकारे आजोबा च्या मालकीचा शेत मक्त्याने करणाऱ्या वैक्तीच्या ताब्यात गेला. या सर्व प्रकरणाच्या कालावधीत आजोबा जिवंत होते. आजोबा अशिक्षित असल्यामुळे संबधित व्यक्तीने याचा फायदा घेऊन शेतावर आपला ताबा केला.
सर माझा प्रश्न असा आहे कि आजोबाला भूमिहीन करून सरकारने शेत संबधित व्यक्तीला कसा काय विकला असेल? या प्रकरणी आमचा दावा चालू शकतो का? किंवा कसे? किती एकर पर्यंत कुळ कायद्यांतर्गत शेत कुळाच्या ताब्यात जातो? शेत मालकाला पूर्णतः भूमिहीन करता येवू शकते का? कुळ मयत झाल्यामुळे आता आम्ही आमचा मालकी दावा करू शकतो का? किंवा कसे? सर कृपया सविस्तर माहिती द्यावी.
Question by गणेश शिंदे
12-12-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,१९३० ते १९५० च्या कालावधीत अपाक.नाव मुलगा/मुलगी किती वर्षाची झाल्यावर कमी होत होते.
मुलगा / मुलगी १८ वर्षाचे झालेवर सज्ञान होतात . त्या ननतर अ प क कमी होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by pravin r. upadhyay
12-12-2015
upadhyaypravin678@gmail.com
Dear sir I'm talathi joined at dt. 25 /5/1999 my qu. is which dt. for my timeboud promotion & tell me about criteria &M.N.S.Rules.
Question by अमित कोन्दालकर
12-12-2015
amitkumar20k@gmail.com
सर
१) वयस्कर व्यक्तींना मृत्युपत्र बनवण्याकरता वयाची काही मर्यादा आहे का?
२) मृत्युपत्र बनवण्यासाठी (वृद्ध पण व्यक्ती नॉर्मल असेल तर) डॉक्टरांचा काही दाखला मिळवण्याची काही गरज असते का? असेल तर सरकारी किवा खाजगी या पैकी कोणत्या डॉक्टरांचा दाखला हवा असतो?
Please help
Question by Arjun
12-12-2015
mohanms9775@gmail.com
साहेब
A व्यक्ती १९७० मध्ये मयत झाले नंतर A ला B व K असे २ मुले आणि XYZ असे ३ मुलींचे नांव बिगर कब्जेदार सदरी इतर हक्कात नोंद आहे B या व्यक्ती कुटुंब प्रमुख
होते K या व्यक्तीने १९९० मध्ये ७/१२ चे वाटणी करून घेताना त्यांचे ७/१२ मध्ये XYZ या बहिणींचे लावानेत आलेले नाही सदर त्या बहिणींचे नांव B या व्यक्तीचे ७/१२ वर नांव आहे X 1995 मध्ये मयत झाले Y 2001 मध्ये मयत झाले आणि Z vyakti 2005 मध्ये मयत झाले . कुटुंब प्रमुख B या व्यक्तिंचे २००१ मध्ये मयत झाले सदर B या व्यक्तीला ३ मुले वारसदार झाले सदर ७/१२ क्षेत्र भूसंपादन १९९७ मध्ये झाले आहे आज तागायत काही पैसे घेतले नसुन सदर या तिनी XYZ महिलांचे वडील १९७० मध्ये २००५ पूर्वी मृत्यू झाले असलेने संबंदित महिलांचे वारसांचे नांव लावणे आवश्यक आहे काय ? सदर महिलांना समान हक्क मिळणार काय ? व K या व्यक्तीने वाटणी करून घेतले योग्य आहे काय ? माहिती मिळावे विनंति.
Question by ohan
12-12-2015
mohanmsutar@gmail.com
आदरणीय साहेब एका कुटुंबाचे भूसंपादन झाल्यानंतर सदर त्या कुतुंबंचे राज्यात व इतर राज्यात कोतेही शेत नसल्यास सदर त्या कुटुंबातील व्यक्तीला उशिराने नोकरी मिळणे संबंदित कुटुंब भूसंपादन करते वेळी त्या कुटुंबाला योग्य मोबदला मिळाले नसल्यास योग्य दर मिल्नेसाठी कोर्टात गेलेनंतर १०-१५ वर्षांनी निकालास वेळ लागणे ह्याजामुळे त्या कुटुंबात प्रतीक्षा असणारे सर्व व्यक्तिंचे काहीही साधन nasalene शिक्षण पूर्ण न होत वय उलटून गेलेने त्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यासा त्याक कुटुंबातील दुसर्या व्यक्तींना प्राधान्य देणे आवश्यक आहे हि माझे अभिप्रायास माहिती मिळावे vinanti
Question by राजेंद्र शांताराम वरतक
11-12-2015
rajendra.vartak2012@gmail.com
नमस्कार सर मी या आधी ९ डीसेंबरला प्रश्न विचाला होता. सर माझा प्रश्न असा आहे की माझी सरकारी मोजणी २००७ साली झाली होती .तेव्हा तालुका भूमी अभिलेखा कडून नकाशा वेगळा व जागेवरील खुणा वेगळया . नकाशा व प्रत्येक्ष जागा या मधे खुप तफावत होती. भूमी अभिलेख मधे चौकशी केली असता पुन्हा पैसे भरून मोजणी करावी लागेल असे सांगीतले. त्याप्रमाणे पुन्हा मोजणी फी भरून चुकीची दुरूस्ती करण्यात आली.व सर्व लगतदाराना ती मोजणी मान्य होती. परंतु 18जून २०१५ रोजी उत्तरेकडील कबजेदारान मोजणी केली असता ती माझ्या हद्दीत आडीच फुट आली त्यामुळे माझा उत्तरेकडील मार्ग बंद झाला. एकदा हद्द कायम केलया नंतर ती पुन्हा कशी बदलू शकते या मुद्द्यावर मी जीलहाधीकारी व जीलहा अधीक्षक भूमी अभिलेख येथे तक्रार केली .त्याप्रमाणे पुन्हा २७ ऑगस्ट २०१५ ला फेर मोजणी झाली व ती २००७ प्रमाणे आली. व 18 जून ची मोजणी रद्द करण्यात आलेली आहे असे लेखी पत्र माला देण्यात आले आहे.
२७ ऑगस्टची मोजणी ही शिरस्तेदाराने केलेली होती. अता पुन्हा जीलहा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कडून असे पत्र आले आहे की ही मोजणी शिरस्तेदाराने केलेली असून सवतः उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुखांनी समक्ष मोजणी कामाची पाहणी करणे अपेक्षित होते. हे काम कोणी करावे हा निर्णय त्या कार्यालयाचा होता. यात माझा दोष काय? मोजणी ऑफिसचा सततच्या होणाऱा त्रासाचे काय करावे? आणि किती वेळा मोजणी करावी? आता पुढे मी काय करावे. मला कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. अता तक्रार कुठे करावी?
Question by गणेश शिंदे
11-12-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,एखाद्या जमिनीबाबत नोंदणीकृत समजुतीचा करारनामा करता येईल का?करता न आल्यास नोटरी कडील करारनाम्यास किती महत्व राहील?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by खंडू बबनराव गोरे
11-12-2015
ssmms. jobsms@gmail.com
सर मी औरंगाबाद ला राहतो.....माझी सासुरवाड़ी वाशिम आहे... मला 2 सासु आहेत... पहिल्या सासुला 4 मुले अणि दुसऱ्या सासुला 1 मुलगी अणि 1 मुलगा आहे .... म्हणजे एकूण 5 मेहुने आहेत... अत्ता माझे जे सासरे आहेत ते माझे सख्हे मामा पण आहेत...म्हणजे मी मामाची मुलगी माझी पत्नी आहे...वाशिम ला 160 गुंठे ज़मीन आहे...त्यांच्या घरगुती अंतर्गत भांडने सुरु होते...सासरे वाटनि करुण द्यायला तैयार नव्हते....नंतर आम्ही म्हणजे मेहुने अणि मी कोर्टात याचिका दाखल केलि...नंतर लगेच ससऱ्याने वाटनि करुण दिली सर्वांना 20.55 एवढा हिस्सा मिळाला.... नंतर मेहुने अणि मामाने 80 गुंठे मधे प्लॉटटिंग केलि...अणि वीकली पण माझा हिस्सा अणि 80 गुंठे जमीन बाजूला राहिली.... परंतु सासर्यांनी वाटनि पत्र कॅन्सल करीता न्यायालयात याचिका दाखल केलि...अणि फ़क्त मझीच जमीन त्यांना परत हवी आहे....
तर हे शक्य आहे का ? धन्यवाद
Question by Rajendra Sonawane
10-12-2015
rajendra.sonawanelokmat@gmail. com
आमचे आजोबा वरल्या नंतर त्यांच्या इतर मालमत्ता यांना संपूर्ण वारसांची नावे लागली ,परन्तु १मालमत्ता संपूर्ण वारसांची नावे न लगता फक्त मोठ्या चुलते याचे नाव लागले त्या मुळे मोठ्या चुलत्याने या बिन्शेती मालमत्तेतिल काही जमीन विक्री केली व बाकी त्याच्या मुलाचे नावे केली आम्ही १५५ वारस चौकशी अंतर्गत तहसीलदार यांनी संपूर्ण नोंदी रद्द करणे बाबत मत व्यक्त केले असून संपूर्ण नोंदी रद्द करणे बाबत उपाधिकारी यांचे कडे आपील करा .मी त्यानुसार आपील दाखल केले आहे परन्तु सामनेवाले राजकीय व वाम मार्गाचा वापर करून निकाल त्यांच्या बाजूने लावन्याचा प्रयत्न करून निकाल बदलू शकतात का..?
Question by प्रफुल मोरे
10-12-2015
prafuldm@rediffmail.com
सर मला एक मार्गदर्शन हवे आहे.
मी मुंबईत राहत असून रोहा रायगड येथे भात शेती करतो खरीपात. माझ्या हिश्याला आलेली जमीन माझ्या ताब्यात आहे. पण दोन वर्षा पूर्वी मी जेव्हा jcb लावला तेव्हा फारेस्ट वाले आले आणि म्हणाले यातील अर्धि जमीन फॉरेस्ट ची आहे आणि ही त्यांची खुणेचि दगड आहेत. ते म्हणाले तुम्ही शेती करा पण मशीन लवायची नाही. हे मी नाते वाइकाना सांगितले तर ते म्हणतात की पाहू नंतर आता सध्या बिझी आहोत.
आता माझ्या किंव्हा माझ्या वडील व् आजोबा यांच्या नावावर जमीन नाही आजोबांच्या भावांच्या नावावर सर्व आहे. त्या जमिनिचा 7/12 सुद्धा नाही आणि गांव नकाशात ती जागा सुद्धा दिसत नाही.
आता मला दुसऱ्या ठिकाणी शेत जमीन विकत घ्यायची आहे.
पण जरी मी शेती करत असलो तरी तांत्रिक दृष्टया मी शेतकरी नाही.
तर मी आता शेत जमीन कशी विकत घेवू शकतो.
माझे तेच नाते वाइक जे तल्याठ्या कड़े हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी येत नाहीत ज्यानी ती जमीन आमच्या हीश्यचि म्हणून आमच्या ताब्यात दिली ते म्हणतात की
जी जमीन मला विकत घ्यायची आहे ती माझ्या व् त्यांच्या नावावर विकत घेवुया आणि नंतर ते हककसोड करून जमीन माझ्या नावावर करतील. पण जमीन मला माझ्या आणि पत्नीच्या नावे विकत घ्यायची आहे.
कृपया मार्गदर्शन करावे.
आपण कथन केल्याप्रमाणे अर्धी जमीन आपले म्हणजे आपल्या चुलत आजोबांचे नावावर आहे . आपण म्हणता काही जमीन आपले हिस्स्याद आली आहे . हिस्स्यास आलेल्या जमिनीचे वाटप अंमल दया व ७/१२ सदरी आपले नाव दाखल करा. आपले नाव ७/१२ सदरी दाखल झाल्यानानातर आपण शेतकरी होता आपण अतिरिक्त जमीन खरेदी करू शकता
मात्र जरी जमीन आपले नावावर होत नसेल तर पर्यायाने आपण शेतकरी होत नाही . महाराष्ट्र कुल्वहिवत व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६३ प्रमाणे बिगर शेतकरी व्यक्तीस शेत जमीन खरेदी करता येत नाही.
मात्र याच कलमाचे पोटकलम २ अन्वये बिगर शेतकरी व्यक्ती शेती प्रयोजनासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन शेती जमीन खरेदी करू शकते . मात्र अश्या व्यक्तीचे अन्य सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न दहा हजारापेक्षा कमी असणे आवश्यक . दहा हजारापेक्षा कमी उत्पन्न , आजचे काळात अश्यक गोष्ट आहे . त्यामुळे आपणास शेत जमीन खरेदी करता येणार नाही . मात्र आपणास बिन शेती प्रयोजांसाठी शेत जमीन खरेदी करता येयील . त्यासाठी उत्पन्नाची अट नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रफुल मोरे
10-12-2015
prafuldm@rediffmail.com
सर मला एक मार्गदर्शन हवे आहे.
मी मुंबईत राहत असून रोहा रायगड येथे भात शेती करतो खरीपात. माझ्या हिश्याला आलेली जमीन माझ्या ताब्यात आहे. पण दोन वर्षा पूर्वी मी जेव्हा jcb लावला तेव्हा फारेस्ट वाले आले आणि म्हणाले यातील अर्धि जमीन फॉरेस्ट ची आहे आणि ही त्यांची खुणेचि दगड आहेत. ते म्हणाले तुम्ही शेती करा पण मशीन लवायची नाही. हे मी नाते वाइकाना सांगितले तर ते म्हणतात की पाहू नंतर आता सध्या बिझी आहोत.
आता माझ्या किंव्हा माझ्या वडील व् आजोबा यांच्या नावावर जमीन नाही आजोबांच्या भावांच्या नावावर सर्व आहे. त्या जमिनिचा 7/12 सुद्धा नाही आणि गांव नकाशात ती जागा सुद्धा दिसत नाही.
आता मला दुसऱ्या ठिकाणी शेत जमीन विकत घ्यायची आहे.
पण जरी मी शेती करत असलो तरी तांत्रिक दृष्टया मी शेतकरी नाही.
तर मी आता शेत जमीन कशी विकत घेवू शकतो.
माझे तेच नाते वाइक जे तल्याठ्या कड़े हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी येत नाहीत ज्यानी ती जमीन आमच्या हीश्यचि म्हणून आमच्या ताब्यात दिली ते म्हणतात की
जी जमीन मला विकत घ्यायची आहे ती माझ्या व् त्यांच्या नावावर विकत घेवुया आणि नंतर ते हककसोड करून जमीन माझ्या नावावर करतील. पण जमीन मला माझ्या आणि पत्नीच्या नावे विकत घ्यायची आहे.
कृपया मार्गदर्शन करावे.
Question by गणेश शिंदे
09-12-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,४ वर्षापूर्वी शेती झोन मधील जमीन निवासी झोन मध्ये करण्यासाठी नगरविकास विभाग मुंबई (मंत्रालय)यांचेकडे अर्ज केला होता.त्याबाबत कार्यवाही पूर्ण होत आली होती.परंतु आता नवीन नियमानुसार सदर अधिकार विभागीय आयुकांकडे असल्याचे सांगण्यात येते.तरी त्याबाबत काही शासन निर्णय/परिपत्रक आहे का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
Question by राजेंद्र शांताराम वरतक
09-12-2015
rajendra.vartak2012@gmail.com
मझा प्रश्न असा की माझी सरकारी मोजणी २००७ मधे झालेली असून सर्व लगतदाराना ती मान्य होती. 18जून २०१५ रोजी उत्तरेकडील कबजेदारान मोजणी केली. ती माझ्या हद्दीत आडीच फुट आली .त्यामुळे माझा उत्तरेकडील मार्ग बंद झाला. एकदा हद्द कायम केलया नंतर ती पुन्हा कशी बदलू शकते या मुद्द्यावर जीलहाधीकारी व जीलहा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कडे तक्रार केली. त्याप्रमाणे 27 ऑगस्ट २०१५ ला फेर मोजणी झाली व ती २००७ प्रमाणे आली. तसेच 18जून ची मोजणी रद्द करण्यात आलेली आहे असे लेखी पत्र माला देण्यात आले.ती मोजणी शिरस्तेदाराने केलेली होती. जीलहा अधीक्षक भूमी अभिलेख यांचे मते ती मोजणी स्वतः उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी करायला हवी होती. परंतु मोजणी कोणी करायची हा निर्णय त्या कार्यालयाचा होता . माझा दोष काय? सतत भूमी अभिलेख कार्यालयाचा त्रास सहन करावा लागतो. आता पुढे मी काय करावे कृपया मला मार्गदर्शन करावे.
Question by गणेश शिंदे
09-12-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर, ७/१२ सदरी ०-१७ आर क्षेत्र आहे.शेतजमिनीची मोजणी केली असता ०-१९ आर भरते तरी ७/१२ सदरी कोणाची हरकत नसल्यास मोजणीनुसार क्षेत्र ७/१२ सदरी दाखल करुन ७/१२ वेगळा करता येईल का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by अरुण सुभाष पवार
09-12-2015
arun.pawar06@yahoo.co.in
सर माझ्या घरासमोर ग्राम पंचायतीची बखल जागा असून ती आमची रहदारीची वाट होती.काकांना काम करण्यास जागा नव्हती म्हणून वडिलांनी त्यांना ती दिली .परंतु आता ते त्या जागेवर त्यांचा मालकी हक्क सांगत आहेत. ते असाही सांगतायत कि त्यांनी २००७ मध्ये ग्राम सेवक व पंचायत सदस्यांना लाच देवून ती जागा नावे करून घेतली. या बाबतीत चौकशी केली असता पंचायत हि त्यांचाच मालकी हक्क सांगत आहेत. भविष्यात जर आम्ही घर बांधले तर ती जागा आमचे आंगणच असणार आहे .कारण घराच्या उतार्यावर त्या जागेचा उल्लेख बखल जागा असा केला आहे.नवीन उतारा आणला तेव्हा त्यात ती जागा त्यांची आहे असे नमूद केले गेले.सदर जागेवर ती व्यक्ती घरकुल बांधण्याचा प्रयत्न करत आहे त्यास आम्ही विरोध करत आहोत त्यामुळे त्या व्यक्तीने पोलिस पाटीलच्या सल्ल्याने आमच्यावर केस केली आहे.यात सर्व पंचायत सदस्य त्यांचीच बाजू घेत आहेत.
माझा प्रश्न असा आहे कि काय ग्राम पंचायत सरकारी जागा खाजगी व्यक्तीला विकू शकते का ?किंवा नाही ?
मी असा ऐकलय कि सरकारी जमिनीची खरेदी विक्री करण्याचा अधिकार केवळ जिल्हाधिकारी यांना आहेत काय हे खरे आहे का ? मग ग्राम पंचायत ती जागा त्यांना कशी विकू शकते किंवा त्यांच्या नवे करू शकते ?
गावातील काही व्यक्ती आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत व त्रास देत आहेत .
या बाबतीत न्यायासाठी काय मी कोर्टात किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकतो का ?
कृपया मार्गदर्शन करा.
महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा १९५८ च्या कलम ५५ चे परंतुक अन्वये ग्रामपंचायत स्वताचे मालकीची जमीन केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे परवानगीने विकू शकते . आपण ,जर अशी परवानगी न घेता जमीन विकली असेल तर , मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे अर्ज करा व दाद मागा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विलास वसंत मेहेर
08-12-2015
vilasmeher82@gmail.com
खाजगी जमीन बदल्यात गावठाण जमीन मिळवण्याबाबत पद्धती ..
मा. महोदय माझ्या वडील दलित समाजासाठी आणि सटवाई मंदिरासाठी १ गुंठ जागा सन २००७ साली बक्षीस पत्र मा.सरपंच ग्राम पंचायत यांनी खासदार निधी मिळण्याकरता दिले आणि त्या बदल्यात संबंधित गावांनी २००७ साली ठराव करून गावठाण हद्दीत सरपंच ग्राम पंचायत हि १ गुंठ जागा दिली परंतु वडीलना कायदया बाबत सरकारी कागदपत्रात काय माहिती नसल्यामुळे त्यावेळी कर्ते माणूस असल्यामुळे त्यांनी त्याठिकाणी गाळे बांधले परंतु त्यानंतर वडील वारले आता २०१५ साली आमच्या हाती कारभार आला असून आम्हाला समजले हि गाळे अनिधिकृत आहे संबंधील जागा नावे करिता आणि अधिकृत करण्याकरिता काय करावे लागेल याबद्दल कृपया मार्गदर्शन मिळावे हि आपणास विनंती
गावठाणातील जागा ग्राम पंच्यात यांचे मालीकीची असते . ग्राम पंच्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे परवानगीने जागा विकू शकते . आपण ग्राम पंच्यातीस त्या प्रमाणे , मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे प्रसात्व पाठवण्यास सांगा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
