जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by पाठक
04-05-2016
ymm6339@gmail.com
आदरणीय सर, कांबळे यांना 1 गुंठा जमीन विकायची आहे व त्यास पैशाची फार गरज आहे. मी संगितले की कागदपत्रे असल्याशिवाय मी काही घेणार नाही. फारच हाता-पाया पडल्यावर कागदपत्रे देवून काहीही करा पण माझा गुंठा घेवून माला पैसे द्या असे सांगून कांबळे निघून गेला. कागदपत्रे तपासल्यावर लक्षात आले की जमीन गुंठेवरी मध्ये आहे व महानगर्पालिके कडून बिगर शेती परवाना घेतलेला आहे. परंतु अजून कलेक्टर कडून बिनशेती आदेश घेतला नाही व 7/12 वर नावही नाही. म्हणून जागेची खरेदी होत नाही. फारच जबरदस्ती केल्यानंनातर मी त्याला नोटरी खरेदीपूर्व करार नोटरी करून 2 लाख दिले. काही दिवसांनी मी 7/12 वर कांबळे चे नाव लावलेनंतर उरलेले 2 लाख देवून जागा खरेदी करन्याचे ठरले. मी सावध राहून 2 लाख रूपयांचा बँकेचा चेक दिला. त्याने बँकेतून पैसे काढून घेतले. मी त्याच्या जागेवर त्याचे नाव 7/12 वर लावून घेतले. नंतर मी त्याला ठरलेला व्यवहार पूर्ण करण्यासाठी निबंधक कार्यालयात येउन सही करण्यास संगितले. आता तो साफ नकार देत आहे. म्हणतो तुम्ही देत असलेला दर फार कमी आहे व नोटरी खरेदिपूर्व करार ला काही महत्व नाही. पैसे वाढवून द्या असे म्हणून फारच जास्त पैसे मागत आहे. त्याचे जागेची मूळ कागदपत्रे, नोटरी केलेले कागदपत्रे, बँकेतून पैसे काढलेला पुरावा (चेक चे झेरॉक्स) माझ्याकडे आहे. मी त्याला कोर्टात खेचतो असे म्हटल्यावर आता तो म्हणतो मी ही 1 गुंठा जमीन दुसर्यास विकतो तुम्ही कोर्ट-कचेरी करत बसा, नोटरी ला काही महत्व नाही. मी त्याला म्हटले नोटरी का केली तर तुझे नाव 7/12 वर न्हवते म्हणून आता निबंधक कार्यालयात करार व खरेदी होते पण तू बदललास. नोटरी केलेल्या खरेदीपूर्व करार मध्ये जागेचा दर निश्चित केलेला आहे. The Specific Relief Act खाली दावा दाखल करून न्यायालयाकडून खरेदी करून देण्याबाबत कांबळे ला आदेश देवू शकतो का ? कृपया मार्गदर्शन करावे.
नोटरी खरेदीपूर्व कराराला कायद्यात किमत नाही. जमीन गुंठेवरी मध्ये आहे, कलेक्टर कडून बिनशेती आदेश घेतला नाही तर त्याच्या जागेवर त्याचे नाव 7/12 वर कसे लावून घेतले? तुम्ही The Specific Relief Act खाली दावा दाखल करून न्यायालयाकडून खरेदी करून देण्याबाबत कांबळे ला आदेश देण्याचा प्रयत्न करू शकता
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by anand salve
04-05-2016
salveanand89@gmail.com
नमस्कार सर , माझ्या वडिलांनी माझ्या नावे रजिस्टर मुतुपत्र केले आहे .त्या नुसार मी आमच्या गावी तलाठी कडे माझ्या वडिलाच्या नावे असलेल्या जमिनीच्या ७/१२ वर माझे नाव दाखल करण्यासाठी अर्ज केला होता.तलाठी नि माझ्या घरच्या लोकांना नोटीसा सुद्धा पाठवल्या.त्यांनी त्याला हरकती घेतल्या व वारस नोंद साठी अर्ज दाखल केला.तलाठी नि वारस नोंद नुसार सगळ्याचे नाव लावले.पण मुर्तुपत्र नुसार माझ्या एकट्याचे नाव लावले नाही व मला म्हणाला तुम्ही पुन्ह्या अर्ज करा त्या नंतर तहसीलदार कडे तुमची केस चालेल व तहसीलदार त्यावर निर्णय देइल.तलाठी ची हि कारवाई योग्य आहे का ? आता मी काय करू ?तहसीलदार त्यावर काय निर्णय देइल?
तलाठी ची हि कारवाई योग्य आहे कि नाही हे कागदपत्र पाहिल्यानंतरच सांगता येईल . तुम्ही त्या फेरफार विरुद्ध प्रांत कडे अपील करू शकता
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास सखाराम पाबळे
03-05-2016
rohidaspable@yahoo.in
नवीन गावठाण विस्तार मधील मिळालेला प्लॉट ला १५ वर्षे झाले आहे सदर प्लॉट विकता येतो का त्यास विक्रीस परवानगी मिळते का कोणाकडून परवानगी घ्यावी
गावठाण विस्तार योजनेतील भूखंड प्रांत अधिकारी यांचेकडून प्रदान ( Grant ) केले जातात त्यामुळे , हस्तांतरास परवानगी देण्याचे अधिकार हि त्यांनाच आहेत .
आपण प्रांत अधिकारी यांची परवानगी घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by माधुरी निवेंडकर
03-05-2016
madhurinivendkar@gmail.com
मी १९९५ मधे चिपळूणमधे १ फ्लॅट खरेदी केला. साठेखत केले व खरेदीखत करणे राहून गेले. माझ्याकडे पझेशन लेटर आहे. त्या आधारावर बॅंकेकडून कर्ज घेतले व कागदपत्रे बॅंकेच्या ताब्यात दिले. नोकरीतून निवृत्त झाल्यावर चिपळूणमधे कायम वास्तव्यास रहाण्याचे ठरवले. बॅंकेचे कर्ज फेडून कागदपत्रे ताब्यात घेतली. नगरपरिषदेत फ्लॅटनावावर करण्यास गेल्यावर खरेदी खत न केल्याचे लक्षात आले. आता सोसायटी रजिस्टर झालेली असून असेसमेंट चेअरमन सोसायटीच्या नावाने होत आहे. माझे नाव भोगवटदार म्हणून नोंदलेले आहे. परंतू मालक म्हणून नोंद होण्यासाठी खरेदीखत आवश्यक असल्याचे नगरपालीका कार्यालयातून सांगण्यात आले. तसेच खरेदीच्यावेळी रीतसर स्टॅंपड्युटी भरलेली असल्याने फक्त रू.100/- च्या स्टॅंप पेपरवर सोसायटीच्या चेअरमन सोबत खरेदीखत करावे असे सांगण्यात आले. चेअरमन असे खरेदीखत सही करण्यास तयार नाही. अशा परीस्थितीत काय करावे?
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
03-05-2016
ravindra.golesar@rediffmail.com
मरण पावलेल्या व्यक्तीने मृतुपत्र तयार करून ठेवल्यास त्यांच्या वारसांना हिंदू वारस कायदा १९२५ प्रमाणे हिस्सा मिळतो कि हिंदू विल्स कायदा प्रमाणे हिस्सा मिळतो. हिंदू वारसा कायदा व हिंदू मृतुपत्र कायदा या दोन भिन्न व्याख्या आहे काय ?
याच site वर अपलोड केलेला वारस कायदे आणि मृत्यू पत्र संबंधित माझा लेख वाचवा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by बाळू गारगोटे
03-05-2016
gargotebalu9@gmail.com
१)आम्ही आमचे आजोबा वारले . तेव्हा तलात्याकडे वारस नोंद लावण्याकरता अपित्युत करून दिली .३ महिने जाले तरी वारस नोंद झाली नाय .त्यांना विचारले असता ते म्हणाले .वारस नोंद online करतात त्यामुळे वेळ लागत आहे .२) तर आता आमची आजी वरल्या आहेत .ते जे अपितुत बनवले आहे त्याच्या मध्ये आजीचे जिवंत असताना नाव लावले होते.तर काय करावा लाघेल
संगणीकरणाचे काम चालू आहे. थोडा वेळ लागेल. तलाठी कडे अर्ज देऊन पोहोच घेउन ठेवा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
02-05-2016
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
१) ८ अ आणि आपले खाते क्रमांक हे कोणत्या आधारे निर्माण होते .
२) ५० ते ८० वर्षापूर्वीची आपले खाते क्रमांकाची माहिती कशी मिळवावी .
३) वारस हक्क गाव नमुना ६ क कोणत्या आधारे बनविला जातो
१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १६८ (१) अन्वये महसूलाचे प्रदान करण्याासाठी प्रथमत: जबाबदार असणार्या प्रत्येक व्यक्तीने राज्य शासनाला जमीन महसूल आणि उपकर म्हणून देय असणार्या रकमेचा हिशोब करण्या्साठी हा नमुना उपयोगी आहे. यालाच 'खातेनोंदवही' असेही म्हणतात.
गाव नमुना आठ-अ मध्ये गावातील प्रत्ये्क शेतकर्याची, त्या गावात विविध ठिकाणी जी शेतजमीन आहे त्याची नोंद असते. गाव नमुना सात-बारा आणि आठ-अ च्या् सहाय्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५१ अन्वये खातेपुस्तिका तयार करणे व विहित फी भरल्यानंतर त्याची प्रत देणे तलाठी यांना शक्य होते.
२) ५० ते ८० वर्षापूर्वीची आपले खाते क्रमांकाची माहिती अभिलेख कक्षात अर्ज करून घ्यावी
३) वारस हक्क गाव नमुना ६ क ही एक दुय्यम नोंदवही आहे. खातेदार मरण पावल्यावर, मयत खातेदाराच्या मालमत्तेचा उत्तराधिकार प्राप्त होणार्या सर्व वारसांच्या नावाची हिंदु उत्तराधिकार अधिनियम उपबंधान्वये वारसाहक्क नोंदवहीत नोंद करावी लागते. एखादा खातेदार मयत झाल्यानंतर त्याचे वारस तलाठी यांचेकडे, मयत व्यक्तीाच्या नावाऐवजी वारसहक्काने वारसांची नावे दाखल करण्यासाठी अर्ज देतात. त्यानुसार काही ठिकाणी तलाठी वारसांची नोंद प्रथम गाव नमुना सहा-क मध्ये करतात.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by bhausaheb kedar
02-05-2016
bhausaheb.kedar@gmail.com
Adaraniy panbude sir नोंदनीकृत वाटपपात्र जर मंडलाधिकारी यांनी वाटप चुकीचे आहे व् सर्व सहहिस्सेदार यामधे सहभागी न्हवते म्हणून नोंद चुकीची थरावली आहे ,तर ते रद्द होते का?
नोंदणीकृत वाटप केले असेल आणि मंडळ अधिकारी यांनी नोंद रद्द केली असेल तर त्या विरोधात अपील करता येयील.नोंदणीकृत दस्त रद्द करण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयास ahet
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by योगेश रुद्रुके
30-04-2016
yogeshrudruke@gmail.com
वाढीव गावठाणातील भोगवटादार वर्ग २ ची जमीन गृह कर्ज घेण्यासाठी बँकेस तारण देत येते का
Question by रोहित जठार
30-04-2016
www.roraj8@gmail.com
आमच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये माझ्या मोठ्या भावाने आमची कायदेशीर वारसानची कोणतीही सहमती न घेता सदर घर त्याच्या बायकोच्या नावे केले आहे त्यास साधारणपणे १० वर्षे झाली आहेत आम्ही गावी नसतो म्हणून त्याने आमच्या खोट्या सह्या केल्या व आमच्या वडिलोपरजीत जमिनीवर घर बांधून ग्रामपंचायत मध्ये नोंद करून घेतली
तर या विरोधात आम्हला न्याय हवा आहे तरी आपण आम्हास सहकार्य करावे
भावाने खोट्या सह्या केल्या असतील तर त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा. मालमत्तेचे कायदेशीर वाटप आणि नोंद करून घ्या.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गौरव ढोले
30-04-2016
www.gauravdhole55@gmail.com
आमच्या वडिलोपार्जित घरावर माझे वडील कर्ज काढणार आहे व त्यास आमचा विरोध आहे
सदर घर हे आमच्या आजोबांच्याच नावावर आहे व ते मयत आहेत व आजही सदर घर आजोबांच्याच नावावर आहे
तरी कायदेशीर वारस म्हणून आम्हाला सदर घरावरती कर्ज घेण्यास हरकत आहे
कारण ते खूप वृद्ध झाले आहेत व या नंतर कर्ज भरण्यावरून आमच्यात भांडणे होऊ नये म्हणून आमची हरकत आहे
कृपया मार्गदर्शन करावे
हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) अधिनियम-२००५ कलम ४ अन्वये पूर्वीच्या कायद्यान्वये वारसाला, त्याच्या पूर्वजांनी (वडील, आजोबा, पणजोबा) घेतलेली कर्जे फेडण्याची जबाबदारी होती. याला ‘पवित्र जबाबदारी (पायस ऑब्लिगेशन)’ म्हटले जात होते. असे कर्ज वारसाने न फेडल्यास, असे कर्ज देणार्यास न्यायालयात दाद मागता येत होती. केंद्र शासनाने सन २००५ च्या या सुधारीत कायद्यान्वये वारसाची, त्याच्या पूर्वजांनी (वडील, आजोबा, पणजोबा) घेतलेली कर्जे फेडण्याची जबाबदारी रद्द केली आहे व असे कर्ज देणार्यास आता न्यायालयात दाद मागता येणार नाही अशी तरतुद केली आहे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by pramod
30-04-2016
pramodderle@yahoo.com
नमस्कार सर
आमुच्या दोन भावामध्ये सुलेहानामा कोर्तामार्फात ०२/०४/१९८१ रोजी झहालेला आहे त्यात आमुच्या वाट्याला ३० R क्षेत्र हलक्या जमिनीच्या मोह्बाद्ल्यात जास्त आलेले आहे त्यानुसार आता ३५ वर्ष्यानंतर माझ्या भावाने ते वाढीव क्षेत्र परत मिळण्यासाठी व समसमान वाटप होण्यासाठी दावा दाखल केला आहे .
१) तर यात किती वर्ष्यापर्यंत सुलेह्नाम्याविरोधात तक्रार दाखल करता येते ??
२) सुलेहनामा झाल्यानंतर मी ज्या स्वकष्टाने जमिनी घेतल्या आहेत त्या जमिनी आम्ही या वाढीव क्षेत्राच्या उत्पन्नावरून घेतल्या आहेत असा दाव्यात उल्लेख करण्यात आला आहे व हिंदू एकत्र कुटुंब नुसार सदर जमिनीत देखील हिस्सा मागितला आहे तर सदर दाव्यात किती तथ्य आहे
योग्य मार्गदर्शन करावे
Question by संतोष जवरे
29-04-2016
jaware_sb@rediffmail.com
एका खालासा जमिन च्या 7/12 उताऱ्यात वडीलांचे नांव असून ते आजरोजी हयात आहेत. ती जमिन वडीलांनी व एका मुलगा यांनी दुसऱ्या मुलाकरीता रजिष्टर हक्कसोडपत्राने हक्क सोडला आहे. तर सदरचे हक्कसोडपत्राने दुसऱ्याच मुलाचे 7/12 उताऱ्यात नांव दाखल करावे अगर कसे याबाबत मार्गदर्शन होणे विनंती आहे.
हक्कसोडपत्र घेणार व देणार यांचे उताऱ्यात नाव असणे आवश्यक आहे ...हक्कसोड पत्राने नवीन नाव उताऱ्यात दाखल करता येत नाही
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by विनोदसिंग राजपूत
29-04-2016
sonurajput113.sr@gmail.com
माझ्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये आम्हाला अधिकार मिळाला नाही. वडिलांचे खोटे हक्कसोड पत्र चुलत्याने तयार केले.त्यामुळे आता ७/१२ ला आमचे नाव नाही.पण जमीन आजही आमच्या ताब्यात असून हक्क आम्ही सोडलेला नाही. टी मी कसतो आहे. तरी आपण मला जमीन परत मिळवण्यासाठी काय करावे ते सांगावे.
हक्कासोद्पात्र खोटे होते आणि तुमचा ताबा आहे सिद्ध करून दिवाणी न्यायालयातून जमीन मिळवता येयील.
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by सतीश आव्हाड
29-04-2016
s.avhad124@gmail.com
आदरणीय सर दुय्यम निबंधकांकडे खोटी कागदपत्रे जोडून मामाने दस्त तयार केला आहे .त्याविरुद्ध नोंदणी अधिकारी दुय्यम निबंधकांकडे तक्रार दाखल करता येते का ? दुय्यम निबंडक नोंदणी अधिनियम ८२ नुसार कोणती कार्यवाही करू शकतात ?
दस्त नोंदणीकृत असेल तर तो रद्द करण्या साठी दिवाणी न्यायालयात जावे लागेल.
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by bhaurav kekan
28-04-2016
bhaukkd84@gmail.com
Adaraniy पानबुडे सर अगोदारच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल आभारी अपन date 17 एप्रिल ला दिलेल्या उत्तरप्रमाने माझी आई ही वारस आहे व् वारस म्हणून तिचे नाव रिकॉर्ड ऑफ़ राईट ला इतर अधिकारत दाखल आहे, आईचा आक्षेप वाटपाल आहे , कारण मामने काही आर्थिक देवघेव 5लाख रुपये आइकडून 1998 साली घेतले होते, तेव्हा मामचे अणि आईचे सम्बन्ध चांगले होते ,आज रोजी अनेक टाळाटाळ करुन मामने पैसे बुडविल्यातच जमा आहे, तरी ते पैसे परत मिळवण्यासाठी आई भावमधे वाटप हिस्सा मागणी करात आहे , पण त्यानी आईचे नाव इतर अधिकार सदरी कायम ठेवून आपपसत वाटप केले आहे ,,,,, हे वाटप योग्य आहे का? आईने यावर तलाठी कड़े आक्षेप घेतला आहे, नोंद प्रमाणित न होण्यासाठी काय करावे ? आपण विचारल्यावरुं मावशिने हककसोड पत्र नोदिव दुय्यम नि कड़े केले आहे . आणि आईचा आक्षेप तिल मिलकतीत हिस्सा मिळावा म्हणून आहे ,.दिवाणी दावा दखल करावा का?
वारसदार यांचे नाव इतर अधिकारात ठेवण्याचे कारण नाही ते कब्जेदार सदरी असणे आवश्यक आहे . तहसीलदार यांचेकडे कलाम 155 खाली लेखन प्रमाद चूक दुरुस्त करण्याचा अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sandip darade
28-04-2016
sandidarade23@gmail.com
आदरणीय सर A ,B,C अशी भावंडे व् C (सीताबाई) त्यांची बहिण आहे , वडिलोपार्जित जमींन 20 एकर असुन गट no 234 , 238 ,383 437, 492 , आशा पाच गट असून गट no 234,238 ची कही जमिन natinal highway साठी भुसंपदित झाली आहे त्याचा मोबादला आला असून त्यसाठी सर्वांच्या सम्मतीची आवश्यकता होती , सिताबाईचे नाव सर्व गटांवर इतर अधिकार सदरी असून ती मोबादला मागते व खातेफोड करण्यास विरोध करते आहे म्हणून A ,B,C यानि परस्पर सहमतीने वाटपपत्र दुय्यम निबंदक पुढे केले, असे करताना सिताबाईचे नाव इतर अधिकारत कायम ठेऊन ते गट no मोठा भाऊ A च्या गटावर ठेवले , वाटपपत्र नोंद केलि। सिताबाईचे नोंदिवर आक्षेप घेतला असता मंडलअधिकारी यानि नोंद बरोबर ठरवून प्रमाणित केलि, वाटप पत्राला सीता बाईची सम्मत्ति नव्हती। तरी मंडल अधिकारी यानि निर्णय दिला ।यामुळे पुढे अपील प्रांताधिकारी कड़े करूँ महसुली यंत्रनेवर विस्वास नसल्याने वाटपपत्र रद्द करेनेसाठी काय करावे । गट no 234 ,238 भुसंपदित झाला व् त्यावर आता सिताबाईचे नाव नसल्याने त्याचे मोबादल त्याना मिळणार , तो मिलु नए म्हणून काय करता येईल , महसुली न्यायवर विश्वास नहीं । न्यायालयात वाटप पत्र नोंद रद्द होण्यास अणि प्रमाणित नोंद दाखवून B C पैसे भुसंपदन कडून घेऊ शकता , ते थाम्बवन्यसाठी काय करावे , सीताबाई वृध्द व् गरीब असल्याने योग्य मार्गदर्शन करावे
आपण नोंदीविरुद्ध प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करा . त्याच बरोबर सीताबाई हि वारस आहे म्हणून तिचे नाव कब्जेदार सदरी लावनेबत तलाठी व मंडळ अधिकारी यांना आदेश देण्याबाबत मागणी करा .
स्थानिक प्रांत अधिकारी यांच्याकडूनही आपणास न्यायाची अपेक्षा नसल्यास , म ज अ नि 1966 च्या कलाम 226 खाली अन्य उपजिल्हाधिकाऱ्याकडे अपील / प्रकरण वर्ग करण्याबाबत मागणी करा .
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जमीन संपादन केल्यामुळे , नुकसान भरपाई वाटपाचा प्रश्न आहे . संबंधित काला ( Competant Authority Land Acquisition ) प्रकरण राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 च्या कलम 3 हा (4 ) अन्वये , आपला वाद जिल्हा दिवाणी न्यायालयात निर्णयासाठी refer करतील .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sujit
27-04-2016
sujitchavan456@gmail.com
सर आमचे गावाचे पुर्नरवसन झाले आहे गावामधील घराचा प्लाँट आजीच्या नावावर आहे ती मयत आहे तिला ३मुले आहेत तो प्लॉट ३मुलांच्या नावावर करायचा आहे ग्रांमपंचायत अर्ज केला असता ग्रामसेवक म्हणतायेत कि रजिस्ट्रर वाटणी पत्र करुन आणा मगच वारसाची नोंद घेतो ग्रामंपंचायत मध्ये अर्जावर वारस नोंद घेता येते का रजिस्ट्रर वाटणी पत्र करण्याची आवश्यकता आहे का तसेच आम्हाला घराच्या प्लॉटचे कब्जा पावती मिळाल्या नाहीत कब्जा पावती कोठे मिळेल तसेच घराच्या प्लॉटची मोजणी करायची आहे मोजनी कोण करते व कशी करतात आमचे जुने गाव धरणा मध्ये गेले आहे योग्य माहिती मिळावी विनंती
आणि जर का नवीन गावठाण अद्याप ग्राम पंचायत ला हस्तांतरित नसेल तर वारस तहसील मधून स्थानिक चोकशी ,तलाठी ,मंडळ अधिकारी अहवालानंतर निश्चित होतात .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
नवीन गावठाणातील प्लॉट विषयी : तुम्हाला वारस नोंद करायची आहे कि वाटणी ? वारस नोंदी साठी नोंदणीची आवश्यकता नाही . स्थानिक चौकशी करून ग्रामसेवक नोटीस काढून वारस चढवतील . कब्जा पावती तहसील कार्यालयात मिळते . मोजणी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात करावी .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by jyoti काकड
27-04-2016
jmaruti7@gmil.com
आदरणीय सर माझा प्रश्न important आहे कृपया उत्तरासाठी घ्यावा हक्कावरुण वाद असल्यास (भाऊ व् बहिनीचे हिस्सा वाद) बहिनीं ने भुसंपादित जमिनित हिस्साहिस्सा मिळावा म्हणून वाद निर्माण केल्यास रक्कम मिळावी म्हणून काय करता येईल, ?
आपण भूसंपादन अधिकार्यांकडे रकमेसाठी आक्षेप नोंदवू शकता . तुमच्यात आपसी सहमती होत नसेल तर भूसंपादन अधिकारी अशी प्रकरणे मा दिवाणी न्यायालयात दाखल करतात . व तेथे निकल अंती रक्कम मिळते .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by VIKRAM YADAV
27-04-2016
vikram.vy11135@gmail.com
नामकर सर, आपण माझ्या प्रश्नानाचे उत्तर दिले तय्साठी धन्यवाद पुढे मला असे विचारायचे आहे कि माझ्झे राहते घर वडिलोपार्जित आहे .ते मात्र आता पडले अह्हे मी ते दुरुस्ती करून बध्नाय्साठी तयारी केली ,तेओह आई व बहिणीने ते आमचे घर आहे व आमचा मंजे आईचा नवे अह्हे त्यामध्ये तुज कहीही आदिकर नाही असे सगुण घर बध्ण्यास अडथला आणत आहेत.मी ग्राम्पुंचात मध्ये मागि घर्साठी नोद लागावी त्या साठी अर्र्ज केला पुन काही प्रठीसाद दिला नाही .तर माझ्झा त्या घरावर हक्क अह्हे कसे शिध करू ? त्या घरावर माझ्झा बहिणीचा हाक अह्हे का ?दोघी विवाहित अह्हेत .कृपया मार्गदर्शन करा.
वडिलोपार्जित मिळकतीवर तुमच्या सोबतच आई आणि बहिणीचा हि हिस्सा असेल . आपसी सहमतीने वाद मिटवा .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by प्रवीण पाटील
27-04-2016
pypatil77@gmail.com
नमस्कार सर आमचा गट न ४०/१ (५ .०४ हेक्टर ) व शेजारी गट न ४०/२ ( ४.२० हेक्टर ) आहे तसेच ४०/१ मधून ५.०४ हेक्टर पैकी २.२ हेक्टर २ इसमांना विकले आहे आम्ही सरकारी मोजणी केली पण त्यांनी पूर्ण गट मोजला आमचे पोट हिस्से मोजले नाहीत तरी महाशयांना विंनती आहे कि पोट हिस्सा सरकारी मोजणी करणेबाबत आम्हाला माहिती द्यावी
Question by भाऊसाहेब केदार
27-04-2016
bhausaheb.kedar@gmail.com
आदरणीय प्रशाषण अधिकारी वर्ग , एखादे वाटप पत्र करताना सह हिस्सेदार बहिण जिचे नाव जुन्या नियमाने इतर अधिकार सदरी जरी असले तिला टाळून तिचे कोणतेही हक्कसोड न करता केलेले वाटप पत्र जर ते दुय्यम निबंदाकाकडे केले असले तर त्याची नोंद होते का?
२) जर बहिणीला वगळून इतर चुलत भवानी व सक्ख्या भावाने जर वाटप केले तर गुन्हा होतो का.? कोणावर दाखल होईल .ni
३) जर दुय्यम निबंधकांनी असा दस्त नोंदणी केली ज्यावर भावाने बहिण वारस नाही असे खोटे प्रतीण्यापात्र सदर केले व दस्त नोंदणी केली तर याविरुद्ध तक्रार कोठे करावी नोंदणी करताना खोटे दस्त तयार करून नोंदणी केलू तर काय karavE
Question by VIKRAM YADAV
26-04-2016
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर , एक छोटा प्रश्न अह्हे कि खरेदीखत नोदानिकृत झालेआसेल तर ते रद्ध कार्नायचा अधिकार कोणाला आहे ,तय्साठी काय करावे लागेल ?
केवळ न्यायालय नोंदणीकृत दस्त रद्द करू शकते.न्यायालयात आपण तो दस्त कसा खोटा आहे हे पुरावे देऊन सिद्ध करावे लागते.वकिलाशी चर्चा करून पुढील कोर्टातील कार्यवाही करावी
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by प्रविण तांबे
26-04-2016
tambepm@rediffmail.com
माझे मी नगर मधील संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे,सर गट स्कीम जेव्हा आली तेव्हा आमच्या गट नं मध्ये शेजारील लोकांचे क्षेत्र समाविष्ट करण्यात आले,परंतु आमच्या क्षेत्रातील पोट खराबा हा शेजारील शेतकऱ्यांच्या नावावर वर्ग झाला असे ऑनलाईन सातबारा काढल्यावर दिसते ,परंतु तलाठी दप्तरी रेकॉर्ड ला त्याची नोंद नाही व फेरफार रेकॉर्ड नाही ,मा.तलाठी साहेबाना विचारले असता त्यांनी सांगितले कि ते कसेकाय झाले ते आम्ही सांगू शकत नाही ,पाच ते सहा वर्षा पूर्वीचा उतारा पहिला असता त्यात पोट खराबा नोंद नावावर नाही ,परंतु ऑनलाईन आता ऑनलाईन दिसते ,तर काय करावे , व जुने १९९५ ते २००० उतारे व फेरफार कुठे भेटलीत ,कृपया मार्गदर्शन करावे.
तहसील कार्यालयात अभिलेख कक्षात आपणाला सर्व जुने उतारे व फेरफार मिळतील.तसेच गट स्कीम उतारा तालुका भूमी अभिलेख यांचे कडून घेऊन गटाचे एकूण क्षेत्र व पोटखराबा क्षेत्र तपासून घ्यावे.गट स्कीम उतारा पाहणे गरजेचे आहे.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by प्रशांत p
25-04-2016
vv_rt@rediffmail.com
नैसर्गिक/कृत्रिम गाव तलाव बंधारे यामधील मुरुम/माती खोदकाम करुन खोली वाढविणेची परवानगी अर्जास तहसिल कार्यालयातुन परवानगी देता येते का व जर देता येत असेल तर कोणत्या शासन निर्णय/योजना/नियमाखाली तसेच कोणकोणत्या विभागाचे ना हरकत/अभिप्राय/अहवाल घेतले पाहीजे कृपया मार्गदर्शन करणेंस विनंती आहे
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
