जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

माहीतीच्या अधिकाराखाली प्रांत कार्यलयामध्येम मी एक पत्रकार असल्याने गावातील एका तलाठी निलंबन केस फाईलसाठई अर्ज केला असता त्यांनी कलम ८(१)(त्र ) नुसार माहीती देता येत नाही. असं लेखी कळविले. जर हरकत असेल तर ३० दिवसांच्या आत अपील करावे असे लिहीले. परंतु अपीलाची तारीख दिली असता प्रांत साहेब तारखेला टाळाटाळ करतात. तरी मला सदरची आवश्यक माहीती मिळण्यास काय करावे लागेल तसेच माहीती अधिकार अंतर्गत कलम ८(१)(त्र ) याबाबत मी अनभिज्ञ असल्यामुळे सदर कलमाचे स्पष्टीकरण देण्याची विनंती करीत आहे. कृपया सल्ला द्यावे.
माहितीचा अधिकाराखाली शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांची वैयक्तिक माहिती किंवा त्यांच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करणारी माहिती, माहितीचा अधिकाराखाली देता येणार नाही.
लोकहिताच्या दृष्टीने व्यापक जनहित साध्य न करणारी किंवा वैयक्तिक वादाच्या अनुषंगाने मागितलेली माहिती, माहितीचा अधिकाराखाली देता येणार नाही.
कारणे व उद्देश विचारणारी प्रश्नादर्थक माहिती, माहितीचा अधिकाराखाली देता येणार नाही.

परंतू जी माहिती संसदेला किंवा राज्य विधान मंडळाला देण्यास नकार देता येणार नाही ती माहिती कोणत्याही व्यक्तीला देण्यास कलम 8 (ज) खाली नकार देता येणार नाही. या कायद्याखाली विचारलेली माहिती नाकारतांना, माहिती नाकारण्याची संपूर्ण कारणे दिली पाहिजेत.


Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माझ्या बहिनिंच्या सह्या हक्कसोड पत्रावर फसवुण घेतल्या आहेत.हक्कसोड पत्राचे पुस्तकच त्यांचे घरी नेहुण सह्या घेतल्या असे बाहिनिंचे म्हननेआहे.तपास करून दोषी व्यक्तिवर कारवाई करता येईल का ? कोठे? मार्गदर्शन व्हावे.
फसवणुकीबाबत पोलिस तक्रार करा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

एखादया व्‍यक्‍तीला एका सज्‍जातील तीन गावात अनुक्रमे एक हेक्‍ट., दिड हेक्‍ट. व दोन हेक्‍ट. जमीन आहे तर ती व्‍यक्‍ती अल्‍प भुधारक की बहुभुधारक?
शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा

क. जिराईत जमीन: 54 एकर (21.85 हेक्टर)
ख. हंगामी बागायत जमीन: 36 एकर (14.56 हेक्टर)
ग. बारमाही बागायत जमीन: 27 एकर (10.92 हेक्टर)
घ. कायम बागायत जमीन: 18 एकर (07.28 हेक्टर)

Marginal Farmer' means a farmer cultivating (as owner or tenant or share cropper) agricultural land up to 1 hectare (2.5 acres). 'Small Farmer' means a farmer cultivating (as owner or tenant or share cropper) agricultural land of more than 1 hectare

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महाराष्ट्रातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील छोट्या आरा गिरणी कोणत्या कारणाने व कोणत्या नियमाने बंद केल्या गेल्या आहेत ? व त्या चालु करण्यासाठी कोणाकडे चौकशी करावी ?
sir. आमच्या आत्यानी शेत जमिनी वरील हक्क सोड पत्र जुने २०१५ केल आहे तरी आम्हास तलाठी कार्यालयात हक्क सोड पत्र च्या index ला जमा करण्यास काही कारणास्तव उशीर झाला आहे तरी किती दिवसांची वैध्य्ता असते .
नोंदणीकृत दस्तऐवज एका वर्षात द्यावा असा संकेत आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार sir, आमचे आजोबा सन १९९१ मध्ये वारले आहेत . आजोबाना
३ मुल ३ मुली आहेत तर त्यांच्या जमीनीच वाटप कश्याप्रकारे होयला हव आहे
केंद्र शासनाने सन 2005 मध्ये कलम 6 अन्वये सुधारणा केली असून, दिनांक 20 सप्टेंबर 2005 नंतर हिंदू अविभक्त कुटुंबातील मिळकतीत कन्येला, मुलाप्रमाणेच आणि मुलाइतकाच जन्म जात हक्क असेल अशी तरतुद केली आहे.

असा हक्क मुलींना फक्त एकत्र कुटुंबाच्या वडिलोपार्जित मिळकतीतच मिळणार आहे. जर हयात असणार्या वडिलांची स्वकष्टार्जित मिळकत असेल, तर मुलगी किंवा मुलगा यांना त्यात जन्मत: हक्क प्राप्त होत नाही.

उपरोक्त सन 2005 च्या कायद्यान्वये 17 जुन 1956 ते 8 सप्टेंबर 2005 या दरम्यान जन्मलेल्या मुलींनाही, हिंदू अविभक्त कुटुंबातील मिळकतीत मुलाप्रमाणेच आणि मुलाइतकाच जन्म जात हक्क असेल अशी तरतुद केली आहे. परंतू अशी मुलगी दिनांक 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असावी अशी तरतूद होती. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 16/10/2015 रोजी दिवाणी अपिल क‘. 7217/2013 (प्रकाश आणि इतर विरुध्द फुलवती आणि इतर या प्रकरणात निकाल देऊन ‘ वडिलोपार्जित हिंदू अविभक्त कुटुंबातील मिळकतीत मुलाप्रमाणेच आणि मुलाइतकाच जन्म जात हक्क मिळणारी मुलगी आणि त्या मिळकतीत हक्क असणारा सहदायक (कोपार्सनर) हे दोन्ही दिनांक 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असावेत, मग ती मुलगी कधीही जन्मली असो.‘ असे म्हटले आहे.
तथापी, 20 डिसेंबर 2004 पूर्वी ज्या वाटण्या घडून आल्या त्यांना यामुळे बाधा येणार नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर गावातील तलाठी कार्यालयात पतीच्या नावावरील जमिनीची फोड करून काही जमीन पत्नीच्या नावे करायची आहे परंतु तलाठी साहेब तसे करण्यास तयार नाहीत काय करावे ते तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करण्यास सांगतात
परंतु माहिती नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करणे अवघड आहे काय करावे
वाटप करण्याचे अधिकार म.ज.म.अधिनियमानुसार तहसीदार यांना आहेत, तलाठीला नाही. तालुक्याला जाणे आवश्यक.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मला माझ्या घरगूती वापरासाठी सोलार पॅनल बसवायचे आहेत. त्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेसाठी मी पुर्वीच उद्यान व बगीचा या कारणासाठी अकृषी परवाना घेतलेला आहे. माझे दोन प्रश्न आहेत. १. घरगुती वापरासाठी सोलर पॅनल बसविणे हे अकृषी उपयोगासाठी कोणते प्रयोजन समजले जाईल , रहिवासी की औद्योगीक ? २. मला उद्यानाचे प्रयोजन बदलुन सोलर पॅनलसाठी नव्याने अकृषी परवाना घ्यावा लागेल का ?
From April ६, २०१५, planning permission will no-longer be required to install solar PV or solar thermal on non-domestic buildings. The new rules will also mean that ground-mounted systems up to nine square metres - 3m x 3m - will be able to go ahead without a planning application.

The new regulations, which are coming into effect by an amendment to Permitted Development Rights (PDRs), will have a great impact on the requirements for planning for retrofits on commercial and agricultural buildings. Those who were held back, or forced to cancel projects due to the delays planning caused when the feed-in tariff changes were going through, will no longer face such restrictions.

However, there are certain conditions that must be met.

Roof mounted solar

A roof-mounted solar system must not protrude more than 200mm from the roof/wall surface it is mounted on. There is an exception to this is if the system is on a flat roof, where the solar PV must be less than 1m in height above the highest part of the flat roof excluding any chimneys.

The roof-mounted solar installation must also be more than 1m away from the external edge of the roof or the joint of the wall that it is on and if the system is situated in an area of outstanding natural beauty, or land with similar restrictions (article 1(5) then the solar cannot be on a roof slope or wall fronting the highway.

Furthermore, planning permission is required if the solar is on a listed building, on a building within the curtilage of a listed building or upon a site designated as a scheduled ancient monument.

Further conditions

The solar equipment must, so far as practicable, be sited so as to minimise its effect on the external appearance of the building;
The solar equipment must, so far as practicable, be sited so as to minimise its effect on the amenity of the area; and
Solar equipment no longer needed for micro generation must be removed as soon as reasonably practicable
Ground Mounted

In terms of ground-mounted solar, the new planning conditions also mean that installations of up to nine square metres will not require permission. However, the solar must not be taller than 4m and only one ground mounted system can be present in any one building.

Further, the solar must not be installed within 5m of the boundary of the curtilage and planning permission will still be required if the solar is within the curtilage of a listed building or on a site designated as a scheduled ancient monument.

Further conditions

The ground mounted solar must, so far as practicable, be sited so as to minimise its effect on the amenity of the area; and
Ground mounted solar which is no longer needed for micro generation must be removed as soon as reasonably practicable.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

कुळाचे नावाची नोंदीचा फेरफार हा मंजूर अथवा रद्द झाला नाही. परंतु त्याचा अंमल कामगार तलाठी यांनी मिळकतीचे ७/१२ चे उताऱ्यावर त्याच फेरफार नोंदीच्या आधारे दिला आहे. तर अशी नोंद कमी करणेसाठी कायद्यातील कलमाचे आधार देवून कृपया मार्गदर्शन करावे व समस्या सोडवावी
प्रांताकडे फेरफार विरुद्ध अपील करावे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
शैक्षणिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग दोन ची जमीन खरेदी करायची आहे त्यासाठी परवानगी ची गरज असते काय असेल तर कोणाची याविषयी सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
भोगवटादार वर्ग दोन जमीन सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीने वर्ग एक करून घ्या त्यांनंतर खरेदी करणे योग्य होईल

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by अनंत
08-01-2016
anantzeple2202@gmail.com

आमची आसुर्डे चिपळूण ला जागा आहे ती आम्ही सन २००८ ला घेतली पण आजून खरेदी खत केल नाही आहे तर खरेदी खत करायला किती खर्च येयिअल जागेजी रक्कम १८००००/- आहे जागा १८ गुंते आहे. तर खरेदी खत ची करायला येणारा खर्च आणि त्यावर किती मुद्रांक शुल्क भरावे लागेल याची माहिती द्यावी जेणे करून आम्हाला अंदाज येअल . फ़ेब्रुअर्य मध्ये आम्हाला जागा नावावर करायची आहे .
संबंधित दुय्यम निभांधक कार्यालयात आपणास माहिती मिळेल

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

आदरणीय सर,ग्रामपंचायत हद्दीतील शेती झोनमधून निवासी झोन करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतील,कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
संबंधित कार्यालयात विचारणा करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर गायरान जमीन पटे १९७९ ला झालेले आहेत त्याचीनोंद ७/१२ ला घेतली होती ती नोंद नंतर कमी झाली ती नोंद घेन्या साठी काय करावे लागेल. तलाठी व तहशीलदार नोंद घेता येत नाही असे सागत आहेत
नोंद कोणत्या कारणामुळे कमी झाली होती याबाबत सांगावे

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

नोंद कोणत्या कारणामुळे कमी झाली होती याबाबत sangave

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर, जमिनी संद्र्भात आर.टी.एस . चा अर्थ काय आहे ?
रेकॉर्ड ऑफ राईट्स .महसुली केसेस karita वापरण्यात येतो

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by abhijit
06-01-2016
abhijitkadam55@gmail.com

आपला प्रश्न/सूचना... महोदय सं नं 470 व 471 मिळुन नवीन गट नं 1182
तयार झालेला आहे परंतु सं
नं 471 ला 1930 पासुन संरक्षित कुळ कलम 4अ
(1)नुसार आजही आहे सदर जमिनी
ईनाम वर्ग 6(ब) च्या होत्या एकञिकरणावेळी
संनं 470 मधील सर्व नावे व
आणेवारी नवीन गटात हस्तांतरीत झाली पण
471 मधील नावे व आणेवारी
हस्तांतरीत न होता फक्त कुळाचे नाव व एकुण
क्षेञ (20एकर ) हस्तांतरीत
झालेची नोंद एकञिकरण योजनेत आहे याचा
नेमका अर्थ काय? यामुळे
एकञिकरणानंतर गट नं 1182 च्या संपुर्ण गटाच्या
ईतर हक्कात कुळाची नोंद
आजही आहे त्यामुळे कुळाचे नावे स्वतंञ 7/12
करता येणार नाही का? त्याची
कार्यपध्दती सविस्तर सांगुन मार्गदर्शन करावे
ही विनंती
Reply
कुळ कायदा तरतुदीनुसार तहसीलदारकडे दावा दाखल करावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

तहसिलदार/उपजिल्हाधिकारी यांचेवर विभागीय चौकशी सुरु (कलम ८) करण्यासाठी विभागीय आयुक्त हे सक्षम प्राधिकारी आहेत काय ?
होय, शासनाच्या मान्यतेने

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मी पोटहिस्सा मोजणी केली.सहधारक व मी एकाच हिस्स्यात हक्क सांगत आहे. म्हणून सहधारकाने मोजणी रद्द करण्याचा अर्ज दिला.तर ती मोजणी रद्द करण्याचे अधिकार कोणाचे ????? उप.अ.भू.अ. कि जि.अ.भू.अ.??????
अव्वल कारकून यांची रजा मंजूर करण्याचे अधिकार कार्यालय प्रमुख या नात्याने तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांस आहेत का ? असल्यास, किती दिवसांची अर्जित किंवा वैद्यकीय रजा कार्यालय प्रमुख (तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी) मंजूर करु शकतात ?
सर 19, December 2014 ला एक प्रश्न विचारलं होता. त्या प्रश्नाचे उत्तर मला श्री. बी.पी. काकडे तहसीलदार, रावेर साहेब यांच्या कडून मिळाले. धन्यवाद सर ! सरांनी संगीत्याला प्रमाणे आपण प्रश्नात पूर्ण माहिती नमूद केलेली नाही. त्यामुळे मी काढलेल्या दाखल्याच्या आधारे पूर्ण माहिती नमूद करत आहो. मिळालेल्या उत्तर प्रमाणे मी सर्व दाखले काढलेले आहे. माझा प्रश्न असा होता कि, आजोबानो शेत सर्वे नं. ५२ १९५२ ला २००० रु. ला खरेदी केला होता. एकूण क्षेत्रफळ २५७१७ एवढ होता. काही काळ स्वतः वहीती केल्या नंतर आजोबाने शेत एका व्यक्तीला मक्त्याने दिला सन १९६०-६१. "पेरे पत्रक" नुसार त्याने सन १९६० ते १९७० पर्यंत मक्त्याने शेत वहीती करत होता. सन १९७३ ला शेत त्याने स्वतःच्या नावाने केला. असा उल्लेख फेरफार नोंदी मध्ये आहे. सन १९७३ ला एकाच दिवशी २०/०८/१९७३ त्याच्या नावाने तीन फेरफार झाले आहे. ते पुढील प्रमाणे –
१) सर्वे नं. ५२/१ एकूण क्षेत्रफळ २४७१६,
२) सर्वे नं. ५२/२ एकूण क्षेत्रफळ १७१
३) सर्वे नं. ५२ एकूण क्षेत्रफळ २५७१७.
असे एकूण एकाच दिवशी तीन फेरफार झाले आहे. फेरफार नं. १ व २ च्या समोर “भूस्वामी खरेदी हक्काने श.मा.क्र. ४७९/५९(१३)/६३-६४ प्रमाणे शेत सर्वे नं. ५२ सरकार पासून खरेदीस घेतला” असा शेरा आहे. व फेरफार नं. ३ च्या समोर “पोट हिस्सा एकत्र झाल्यामुळे फेरफार” असा शेरा आहे. हक्क नोंदी पत्रकात सुद्धा अश्याच प्रकारे उल्लेख आहे. खरेदी खताच्या नक्कल मध्ये “Purchase under section 43 of the Bombay Tenancy and Agriculture Lands (Vidarbha Region and Kutch Area) Act, 1958.” प्रमाणे दिनांक २२/०५/१९७३ ला शेत ९२२ रु. खरेदीस घेतला असा उल्लेख आहे. अश्या प्रकारे आजोबा च्या मालकीचा शेत मक्त्याने करणाऱ्या वैक्तीच्या ताब्यात गेला. या सर्व प्रकरणाच्या कालावधीत आजोबा जिवंत होते. आजोबा अशिक्षित असल्यामुळे संबधित व्यक्तीने याचा फायदा घेऊन शेतावर आपला ताबा केला.
सर माझा प्रश्न असा आहे कि आजोबाला भूमिहीन करून सरकारने शेत संबधित व्यक्तीला कसा काय विकला असेल? या प्रकरणी आमचा दावा चालू शकतो का? किंवा कसे? किती एकर पर्यंत कुळ कायद्यांतर्गत शेत कुळाच्या ताब्यात जातो? शेत मालकाला पूर्णतः भूमिहीन करता येवू शकते का? कुळ मयत झाल्यामुळे आता आम्ही आमचा मालकी दावा करू शकतो का? किंवा कसे? सर कृपया सविस्तर माहिती द्यावी.
सर माझ्या शेती मध्ये शेजारील शेतकरयानी खाणलेल्या विहिरीचा ४०% भाग माझ्या शेती मध्ये येत आहे मोजणी केली आहे अतिक्रमण आहे असे सांगितले आहे तरी मी काय करावे वअतिक्रमण कसे काढावे मार्गदर्शन मिळावे
अतिक्रमण काढण्यासाठी अर्ज करा किवा विहिरीच्या ४०% पाण्यावर हक्क मिळावा म्हणून अर्ज करा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,एखादी इमारतीचे कायदेशीरपणे बांधकाम करताना उत्खनन केलेल्या गौनखनिजाचा वापर पुन्हा त्याच मिळकतीत केल्यास शासनास रॉयलटी / दंड भरावा लागेल का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
नमस्कार सर कृपया मला 11 डिसेंबरच्या प्रश्नांचे उत्तर दयावे ही विनंती. कृपया मला मदत करा.

महोदय,
आमच्या आजोबांची स्वकामयी व वडिलोपरजीत शेतीजमीन चे दोन गट नंबर(४२९० व १६९७) केंदूर तालुका शरूर जिल्हा पुणे येथे होते . आजोबा वारल्यानंतर त्यांचे वारस पत्नी मुल आणि मुली आसे एकूण सात जनाची नवे सात बारा वर लागली पैकी सहा जनांनी २००२ -२००३ मध्ये त्या पैकी गट नंबर ४२९० हि शेती जमीन सर्वात लहान भाऊ यास उदरनिर्वाहा साठी त्यांचा नवे करण्याचे ठरवली त्या साठी ज्याच्न्चा नावे जमीन करण्याची होती त्यांनी स्पेसल पावर ऑफ अटर्नी नोटरी समोर करून देण्याचे सांगितले व तसा मजकूर हि दाखवून नोटरी समोर सह्या घेतल्या नंतर पुन्हा तस्याच सह्या उप निबंधक यांच्या समोर करावयाचा सांगून एक वाटणी पत्र तयार करून घेऊन त्यामध्ये परस्पर त्या मध्ये दोनीही गट नंबर चा ऊलेख करून उप निबंधक समोर सह्या घेऊन फक्त वाटणी पत्राद्वारे(हक्क सोड पत्र केलेलं नाही ) दोनीही शेती जमिनी स्वत च्या नवे करून फसवणूक केली आहे. पैकी गट नंबर ४२९० हि शेतजमीन विक्री केलेली आहे व गट नंबर १६९७ आजही त्याचं नवे आहे. तरी या संदर्भात काय करता येईल मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
पोलिस तक्रार करा किवा दिवाणी न्यायालयात दाद मागा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझ्या आजोबांच्या नावाने सिटी सर्वे ला गावठाण वर्ग ब 2 ची जागा आहे.पण family member अशिक्षित असल्याने ती ग्रामपंचायत मध्ये एकाने परस्पर त्याच्या नावाने करून घेतली आहे.तरी ती जागा ग्रामपंचायत ला आमच्या नावाने करायची आहे.तरी आपण उपाय सुचवा हि विनंती.
ग्राम पंचायत आकारणी नोंद वहीत झालेलेया नोंदीबाबत , गट विकास अधिकार यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्राम पंचायत आकारणी नोंद वहीत झालेलेया नोंदीबाबत , गात विकास अधिकार यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मामाची जमीन बक्षीस पत्राने नावावर करायची आहे .त्यासाठी किती खर्च येयील.व त्यासाठी काय करावा लागेल .
शीघ्र सिद्ध गणकात नमूद जमिनीचे किमतीचे २ % मुन्द्रंक शुल्क आहे . मात्र मामा भाचे हे एका मेकाचे lineal , ascendant or decedent नाहीत . त्या मुले , बाजार मूल्याच्या ३ %

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नोंदणीकृत बक्षिसपत्रकरण्याकरिता निबंधक कार्यालयात संपर्क करा

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

This page was generated in 0.42 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3