जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by यतिन ह. पाटिल
12-11-2015
ypatil73@gmail.com
मा. महोदय,
मी मुम्बई येथे राहत असून माझे रायगड ता. ऊरण येथे वडिलोपार्जित घर आहे. घरपट्टी माझ्या नावावर आहे. मला त्या घराचा व लागून असलेल्या जागेची मोजणी करायची झाल्यास कोणती कागदपत्रे लागतील. माझ्याकडे घरपट्टी सोडल्यास इतर कोणतीही कागतपत्रे नाहीत, ती मिळवण्यासाठी मला काय करावे लागेल.
मोजणी जागेची करायची झालेस आपले घर कोणत्या जागेत आहे त्याची संबंधित तलाठी यांना भेटून खात्री करा ...............नगरपालिका असेल तर प्रोपेर्ती कार्ड तपासा
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by रामेश्वर काष्टे
12-11-2015
kashte876@gmail.com
आपल्या न्यायालयीन निर्णय सदरात अपलोड केलेले साहीत्य कसे पहावे,open होत नाही ?
Question by विष्णु गर्जे
11-11-2015
vishnu.garje2405@gmail.com
नमस्कार सर पत्नीच्या मृत्यू नंतर पतीने पुनर्विवाह केला तर अनुकंपा तत्वावर पतीला नोकरी मिळते का मार्गदर्शन करावे ही विनंती
Question by विष्णु गर्जे
10-11-2015
vishnu.garje2405@gmail.com
नमस्कार सर विधवाने पुनर्विवाह केला तर त्यांना फॅमिली पेन्शन मिळते परंतु विधूराने जर पुनर्विवाह केला तर त्यांना फॅमिली पेन्शन मिळत नाही विधूर फॅमिली पेन्शन साठी न्यायालयात दाद मागु शकतो का कृपया मार्गदर्शन करावे
Question by गणेश शिंदे
10-11-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,
अ व्यक्तीस क व ख ही दोन मुले होती.अ व्यक्ती १९/११/१३ रोजी व क व्यक्ती १९२० ला मयत झाली.क व्यक्तीस मुले नव्हती.३मुली होत्या.क व्यक्तीची पत्नीही पूर्वीच मयत झाली होती.सन १९३५ रोजी फाळणी मोजणी होऊन क च्या एका मुलीचे नाव (श)७/१२ च्या कब्जेदार सदरी दाखल होऊन अपाक.म्हणून ख व्यक्तीच्या मुलाचे म्हणजेच चुलत भावाचे नाव दाखल झाले.सदर मुलगी (श) १९४६ रोजी मयत झाली.तिला मुले होती.
परंतु सन १९७९ साली ख व्यक्तीच्या मुलांच्या मुलांनी (नातवांनी) श व्यक्ती १९७५ साली मयत झाली (४ वर्षापूर्वी )असा अर्ज का.त.यांचेकडे देऊन स्वतःची नावे लावून घेतली.(जबाबामध्ये शासनाची दिशाभूल करुन श व्यक्ती ख च्या मुलाची मुलगी आहे,(म्हणजेच स्वतःची बहिण) असे दाखवले आहे.)त्यानुसार गावदप्तरी ७/१२ उताऱ्यास नोंदी करुन घेतल्या.
सदर जमिनीची चुलत भावांच्या मुलांनी सन १९९४ रोजी करारनामा करुन सदर जमीन इनामवर्ग ६ ब ची असल्याने शासनाची बिनशेती प्रयोजनार्थ जुनी शर्त विक्री परवानगी घेऊन सन २००८ मध्ये तिऱ्हाईत व्यक्तीस विक्री केली .आज रोजी ७/१२ सदरी तिऱ्हाईत व्यक्तींची नावे आहेत व्यक्तीचेआहेत व्यक्तीचे नाव आहे.
तरी ‘श’व्यक्तीच्या मुलांना,बहिणीच्या मुलांना,नातवांना सन२००५ च्या वारसा अधिनियमानुसार प्रस्तुत जमिनीत हक्क मागता येईल का? त्यासाठी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
Question by विष्णु गर्जे
10-11-2015
vishnu.garje2405@gmail.com
नमस्कार सर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी अनुभवाचा नियम आहे काय विस्तार अधिकारी शिक्षण विभागा मध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी तीन वर्षेचा अनुभव सर्टिफिकेट मागितले आहे बीएबीपीएड पात्रता विस्तार अधिकारी शिक्षण विभागा मध्ये नियुक्ती साठी पात्र आहे काय मार्गदर्शन करावे ही विनंती
Question by अतुल दिनेश कुलकर्णी
09-11-2015
atulkulkarni707@gmail.com
जिल्हा भूमी अभिलेख यांनी सर्वे द्वारे घोषित केलेल्या महाराष्ट्र शासन असा शेरा असलेल्या गावठाण हद्दीतील जमिनीवर अतिक्रमण असल्यास ते काढण्यासाठी अतिक्रम नित जागाची मोजणी करणे कामी भूमी अभिलेख कडे मोजणी शुल्क भरण्याची जबाबदारी नेमकी कुणाची असते याची तपशीलवार माहिती द्यावी .
Question by गणेश शिंदे
09-11-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,सिलिंग मध्ये एखाद्या व्यक्तीची काही जमीन गेल्यास पुन्हा त्याची जमीन एखाद्या प्रकल्पासाठी संपादित होऊ शकते का?त्याबाबत शासन निर्णय आहे का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
सिलिंग मध्ये , आपणाकडे कमाल धारण मर्यादेपेक्षा अतिरिक्त जमीन असल्याने , शाषण निहित झाली आहे . मात्र त्या मुले , आपली जमीन संपादित होणार नाही असे नाही. आपली जमीन संपादितहोऊ शकते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
09-11-2015
bkganesh.shinde10@gmail.com
दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...आदरणीय सर,जमिनीचा ९९ वर्षाचा भाडेकरार संपल्यास व त्यावर इमारतीचे बांधकाम असल्यास सदर जमीन मूळ मालकाच्या ताब्यात द्यावी लागते का?
कराराची मुदत संपल्यावर , जरी जमिनीवर बांधकाम असले तरी , जमीन मुल मालकास परत करावी लागते . बांधकाम निश्काशित करून , बांधकाम धारक , समान परत घेऊ शकतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मांगीलाल सहदेव
09-11-2015
sahadeomangilal@gmail.com
कृपया खालील प्रश्ना सबंधी जि आर असेल तर आय डी वर पाठवण्यात यावा.
८एकरच्या वरी जमींन असेल तर त्याचा हककसोड होतो का?
उदा.१२ आणि १३ असे दोन गट नंबर आहे.त्यांचे एकूण क्षेत्र ६.८६ आहे.गट नंबर १२ वरुन सहा व्यक्तीचे व् गट नंबर13वरुण सहा व्यक्तीचे हककसोड करुण घ्यायचे आहे.तर हककसोड होउ शकतो का?
जमिनीवर काही निर्बंध ( उदा. जमीन पुनर्वसनासाठी राखीव , सिलिंग मधील तरतुदी लागू , नियंत्रित सत्ता प्रकार इत्यादी ) नसतील त्तर हक्कासोड पत्र करता येईल
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by अनिल koli
08-11-2015
kolianil79@gmail.com
नमस्कार सर माझी पत्नी नगर पंचायतच्या निवडणूकीत मागास प्रवर्ग याआरक्षीत जागेवर उमेदवारी करीत आहे. त्यासाठी जात पडताळणी करायची आहे परंतु अॉनलाईन अर्ज भरतांना निवडणुकचा अॉप्शन येत नाहीये.फक्त शैक्षणिक व नोकरी हेच अॉप्शन येत आहेत कृपया मार्गदर्शन करावे.
Question by शिवाजी बनसोडे
08-11-2015
shivajikb17@gmail.com
सर नमस्कार सातबारा वरील क्षेत्र व खरेदीखत वरील क्षेत्र जुळत नसल्यास फेरफार रद्द होतो का किंवा खरेदीखत दुरूस्ती करता येते का याविषयी सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
Question by गणेश वाघ
08-11-2015
wagh.ganesh@yahoo.com
इतर अधिकार मध्ये
हस्तांतरणास बंदी
नाला
5लिंब 7 स्तवंञ (1)
अशी नोंद आहे याचा अर्थ काय हस्तांतरणास बंदी संपूर्ण जमिनीवर आहे कि फक्त नाला व झाडांवर आहे
भोगवटादार क्र. 1 आहे
सदर जमीन हि काही तरी अति /शर्थी / इनाम/नियंत्रित सत्ता प्रकार इत्यादी असू शकते ..............कृपया मागील फेरफार पहा. हस्तांतरास बंदी हा शेर जमिनी साठी आहे ..झाडांसाठी नाही
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by भारत borude
07-11-2015
bharatborude69@gmail.com
सर्व महसूल अधिकारी वर्गाला दिवाळीच्या हार्दिक शुभेछया
माझ्या ०३.११.१५ प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल श्री पाणबुडे साहेबाना मनापासून धन्यवाद,
सर मला १) माझ्या आई कडे असलेले क्षेत्र कसे घेता येईल(बक्षीस पत्राने कि खरेदीने )किवा कुटल्या मार्गाने व त्याला भावाची संमती लागेल का? तलाठी साहेब म्हणतात कलम ८५ खाली घ्या ते शक्क आहे का?(वडिलाकडून व माज्याकडून भावाने वहीती जमीन जास्त घेतलेली
आहे मला माळरान धीलेले
आहे) २)पोट हिस्स्याची मोजणी लगेच करावी का? किंवा आईची जमिनीला माझे
नाव लागे पर्यंत थांबावे.३)घरासाठी बक्षिसपत्र होईल का, मी उपनिबंधक साहेबाकडे घरच ८ चा उतारा घेऊन गेलो होतो परंतु ते म्हणाले त्याचे इथे काहीही करता येणार नाही कारण घराखालची
जमीन तुमच्या नावे आहे व घर शेतजमिनीत आहे ते जर
बिगरशेती असते तर जमले असते.आपण ग्रामसेवक यांचे कडे जावे. तरी सर काही मार्ग आहे का?
४) आईच्या जमिनीला भाऊ च्यालेंज करू शकतो का?
(भाऊ व वहिनी खूप त्रास देतात आईला व वडिलांना)
उप निबंडक यांनी , आपले दस्त नोंदणीकृत करणे आवश्यक आहे . जर ते दस्त नोंदीकृत करून देत नसतील तर , त्यांना तसे लेखी द्यावे असे त्यांना सांगा
त्यांनी दिलेले उत्तराविरूढ , अपील दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
07-11-2015
ravindra.golesar@rediffmail.com
मला एका ठिकाणी जमीन खरेदी करावयाची आहे. त्यासाठी ३० वर्षापासून सर्व फेराफार नोंदी तपासून घावायाच्या आहे ते बघण्यासाठी कोणत्या अधिकारीकडे जावे लागेल. ती जमीन त्या माणसाच्या नावावर कशी झाली. या बाबतीची खात्री कोणाकडे करता यईल. जमिनीमध्ये नाव न नोंदविलेले परंतु जमिनीत हिस्सा मागू शकतील असे काही कायदेशीर हिस्सेदार कसे शोधावे. जमिनीच्या इतर हक्का मध्ये बँकेचा किंव्हा अन्य वित्तीय संस्थेचा बोजा आहे काय? हे कसे शोधावे . खरेदीच्या व्यवहारामुळे प्रस्थापित कोणकोणत्या कायद्याचा भंग होतो का? हे कसे शोधावे कोणत्या अधिकार्यांकडे जावे लागेल या बाबत उचित मार्गदर्शन व्हावे हि विनंती.
What you are asking is a title search report of the property .
You need to visit the office of Sub Registrar ( Assurance/Registration ) . Search the register of the past transaction.
beside that give public notice inviting if any one have objection .
as suggested in earlier reply , local lawyer can do all this
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
07-11-2015
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय श्री.शेखर गायकवाड साहेब, श्री.प्रल्हाद कचरे साहेब, श्री.किरण पाणबुडे साहेब, श्री.चंद्रकांत पूलकुंदवार साहेब, श्री.डुबे पाटील साहेब, श्री.व्ही . आर. थोरवे साहेब, श्री.संजय भागवत साहेब, श्री.श्रीधर जोशी साहेब, श्री.तरुण खत्री साहेब, श्री.कामराज चौधरी साहेब, श्री.शशिकांत जाधव साहेब, श्री. कुंडेटकर संजय साहेब, श्री.मगर विनायक साहेब, मोहसीन शेख साहेब व इतर महाराष्ट्र सिविल सर्व्हिस संकेत स्थळावरील महसुल अधिकारी,
सर्वाना दिवाळीच्या शुभेछ्या !
Question by मांगीलाल सहदेव
07-11-2015
sahadeomangilal@gmail.com
८ एकरच्या वरी जमींन असेल तर त्याचा हककसोड होतो का?
उदा.१२ आणि १३ असे दोन गट नंबर आहे.त्यांचे एकूण क्षेत्र ६.८६ आहे.गट नंबर १२ वरुन सहा व्यक्तीचे व् गट नंबर13वरुण सहा व्यक्तीचे हककसोड करुण घ्यायचे आहे.तर हककसोड होउ शकतो का?
हक्क सोड पत्रामुळे , महाराष्ट्र तुक्देबंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मांगीलाल सहदेव
07-11-2015
sahadeomangilal@gmail.com
वन हक्काने मिळालेली जमिन आहे.इतर अधिकार मधे तसि नोंद पण झाली आहे.परंतु ८ अ अजुन बनला नाही.८अ तयार करुण घ्या साठी काय कराव लागेल?
मंडळ अधिकारी यांना भेटाव तसा अर्ज करा ................काम झाले नाहीतर तहसीलदार यांना अर्ज करा
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
06-11-2015
swati.swami@yahoo.com
तलाठी यांनी राजीनामा दिला आहे . तलाठी हे एक वर्षापासून परवानगी न घेता गैरहजर आहेत . तर राजीनामा मंजूर करता येईल का ? कोणत्या नियम आधारे ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
Question by भरत Borude
06-11-2015
bharatborude69@gmail.com
माझ्या वडिलांनी आमची वडिलोपार्जित शेतीची कौटुंबिक वाटणी करून दिलेली आहे (भाऊ आणि मी) परंतु भावांनी त्याच्या हिस्स्यात नवीन घर बांधून त्याची नोंद ग्रामपंचायत ला केलेली आहे,परंतु वडिलांचे घर(शेतजमिनीवरील)
मला आलेले आहे(वडिलांच्या नावावर जमीन अजिबात नाही घराच्या खालील जमीन माझ्या नावावर आहे),त्याची नोंद अजून वडिलांच्या नावावर आहे ते माझ्या नावावर नोंद करायची आहे त्यासाठी काय करावे लागेल ,वडिलांनी अर्ज केला होता,त्याला भावाची सहमती होती परंतु ग्रामसेवक यांनी सांगितले आहे असे करता येणार नाही,आणि मी घराचा नमुना ८ घेऊन
उप निबंधक साहेबाकडे गेलो होतो तर त्यांनी सांगितले कि
तुमची जमीन हि बिगरशेती नाही त्यामुळे ,ते काम ग्रामसेवक यांच्याकडूनच करावे लागेल ,तरी आपण मला
मार्ग सांगावा.
धन्यवाद
Question by कुणाल अं. जाधव
05-11-2015
mr.k1387@gmail.com
खुल्या प्रवर्गातील महिला कर्मचारी (वर्ग 3) यांची निवड नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग २ च्या पदावर झाली आहे. त्यानंतर सदर महिलेने ३०% महिला आरक्षणाचा दाखला मिळावा म्हणून तहसीलदार कार्यालयात अर्ज केला आहे. परंतु, पती पत्नीचे एकूण उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त आहे. तरी, सदर व्यक्ती ३०% महिला आरक्षणासाठी पात्र ठरते का ?
Question by रामेश्वर काष्टे
04-11-2015
kashte876@gmail.com
प्रश्न:सर्वोच्छ न्यायालयाने नुकताच असा निर्णय दिला की,सन 2005 पूर्वी जर वडीलांचा मूर्त्यू झाला असेल तर मुलींना वडीलोपार्जीत संपत्तीमध्ये वाटा मिळणार नाही;या निर्णयाची काॅपी/प्रत कोठे मिळेल,वेबसाईट व ईतर माहीती कृपया कळविण्याची तसदी घ्यावी ही नम्र विनंती.माहीती दिल्यास सर्वांना उपयोग होईल.धन्यवाद
न्यायालयीन निर्णय सदरी, मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय upload करण्यात आला आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
04-11-2015
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय श्री. मगर भाऊसाहेब मी दि. ३१/१०/२०१५ रोजी माझा प्रश्न मांडला होता. त्यास आपण प्रतिसाद दिलेला असून मला दिलेले उत्तर समजले नाही. मी पुन्हा माझा प्रश्न मांडतो कि, वडिलांनी वडिलोपार्जीत जमिनीचे मृतुपत्र केले आहे. त्यात त्यांनी फक्त मुलांना जमिनी मध्ये हिस्से दिले असून, मुलीना काहीच जमीन हिस्से दिले नाही. वडिलांचे निधन झाले असून मुलांना मृतुपत्र प्रमाणे वाटणी करावयाची आहे परंतु वडिलांच्या मुलींची ७/१२ वर वारस नोंद झाली आहे. आता मुलांना वाटणी करताना त्यांच्या बहिणीचे हक्क सोडपत्र घ्यावे लागेल का ? या बाबत मार्गदर्शन द्यावे हि विनंती.
Question by विनायक विभूते तलाठी सातारा
03-11-2015
vibhutevm@gmail.com
सर्वाना दिवाळीच्या शुभेछा
भोगवटदार वर्ग 1 नविन शर्त च्या जमिनिवर राष्ट्रीयकृत बँक कडून कृषि कर्ज व इतर कर्ज मिळते का?
क़र्ज थकित झाल्यास बँक लिलाव करून सदर जमिन हस्तांतरित करू शकते का?
संबंधित शासन निर्णय वा नियम/कायदा कोणता
१. होय
२. होय
३. जमिनीचे विक्री वर निर्बंध असेल तर , बँक सक्षम अधिकारी यांची परवानगीचा कर्ज देण्या पूर्वी अग्ग्रह धरतात
बँकेचे देणे थकल्यास , बँक कर्ज रक्कम वसुलीसाठी , जमिनीची विक्री करते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजी बनसोडे
03-11-2015
shivajikb17@gmail.com
सर नमस्कार माझा प्रश्न असा आहे की, बिनशेती करताना बाजुच्या शेतकर्यांनी बिनशेती साठी तहसिलदार यांचेसमोर समंतीपत्र करून दिलेले आहे पण संमती दिल्यानंतर एका शेतकर्याने बिनशेती करण्यास हरकत घेतली आहे तसा अर्ज त्याने प्रांत अधिकारी यांचेकडे केला आहे त्यामुळे सदर प्रकरणी प्रांत अधिकारी कुठलीही कार्यवाही करताना दिसत नाहीत सदर बिनशेती हि शैक्षणीक कारणाने असल्याने काय उपाय योजना करावी लागेल सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
बिन शेती करण्यासाठी , बाजूचे शेतकर्याची साम्म्मातीची आवश्यकता नाही . तथापि , मिळकतीत जाण्यासाठी रस्ता असणे आवश्यक आहे .
आपण रस्त्या बाबत बाजूचे शेतकर्याचे संमती बाबत कथन करत असाल तर , ज्या शेतकर्याने हरकत घेतली आहे , त्याने आपणास त्याचे मिळकतीतून आपलमिळकतीत जानेसाठी रस्ता देणे आवश्यक .
जर रस्त्या बाबत संमती देत नसेल तर , त्यास compel करता येत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
