जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
नवीन ७/१२ संगणकीकृत करताना अथवा हस्तांतरित ७/१२ चे इतर हक्कातील विवाहित मुलीची नोंद कब्जेदार सादरी दाखवू शकतो का व असे केले तर इतर हक्कातील नवे कब्जेदार सदरी ठेवताना कब्जेदार सदरी असलेले खातेदार आपल्याला कायदेशीर त्रास देउ शकतो का ? नावे आम्हास पत्र न देता डायरेक्ट कब्जेदार सादरी कशी नोंद केली.
कृपया विवेचन द्यावे.
मुलिनाहि वडिलांचे मिळकतीत मुलां इतकाच हक्क आहे . त्या मुळे, मुलीची नावे , ७/१२ सदरी कब्जेदार असणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
सन २००९ रोजी फेरफार मंजूर आहे परंतु त्यांचा अंमल ७/१२ ला न झालेले त्याचा अंमल देताना गाव तलाठी तालुकेकडून या बाबत परवानगी न घेता आज तारखेस अंमल होऊ शकतो का ?
कृपया विवेचन द्यावे.
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
ख-या खु-या औद्योगिक क्षेत्रासाठी कोणत्याही सक्षम अधिकारी कडून परवानगी न घेत समोरची व्यक्ती दस्तावेज करू शकतो / कोणतीही शर्तीची जमीन असली तरी असे प्रचलित परिपत्रक आहेत हे खरे असेल तर असे व्यवहार गाव दप्तरी अथवा सब रजिस्टर कार्यालयात का नोंदविले जात नाही.
कलम ६३अ सुधारणा कायदा अन्वये , शेती झोन मध्ये जरी कमिन असली व औद्योगिक वापर , अनुनेया असेल तर , परवानगीची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
कुल या संज्ञेत जातीची अट नाही मग आदिवासी व्यक्तीचे वर्ग १ चे जागेवर बिगर आदिवाशी व्यक्तीची कुळ नोंद होते का ?
कृपया विवेचन करावे.
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
एखादे खातेदाराने गावठाण जागेतील जागा मोजणी साठी अर्ज करून जागा सर्व्हे खातेकडून मोजणी करून मिळते का?
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
एखादे झाडे किती वर्षाचे झालेवर त्याचेवर रोजगार हमी योजना/शिक्षणकर / विशेष शिक्षण आकारणी करतात.
कृपया विवेचन करावे.
Question by शशिकांत नाना पाटील
20-01-2016
shashikantnanapatil@gmail.com
आदरणीय सर,
एखादे व्यक्तीने त्याचे मूळ गावाशिवाय अन्य ठिकाणी जमीन खरेदी केली आहे व त्याचा अकस्मात मृत्यू झाला तर त्याची वारस चौकशी ज्या गावी जमीन खरेदी केली आहे. तो मंडळ अधिकारी अथवा असा कारकून फेरफार मंजूर करू शकतो का? किंवा त्याने मूळ गावी वारस चौकशी करून असा फेरफार नोंदविणे गरजेचे आहे.
कृपया विवेचन द्यावे.
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
ज्या त्या ठिकाणी मोबाईल टोवर्स आहेत प्रत्येक तलाठी / मंडळ अधिकारी / तहसीलदार/प्रांत / वेगवेगळे नियम सांगतात म्हणून किती रुपये अनधिकृत कर वसूल करावा. तरतूद सांगा.
Question by राजेंद्र लांडगे
19-01-2016
rajlandge12 @gmail.com
सर ,
नॅशनल हायवेवरील टोल नाक्याला ग्रा .पं. कर ला वू शकते का ?
टोलनाका दाद देत नाही काय करावे .
Question by गणेश शिंदे
19-01-2016
ganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,एखाद्या तक्रार केसमध्ये मं अ.यांनी अर्जदार व जाब देणार हजर राहत नसल्याने अपिलाचे कामकाज काढून फेरफार नोंद रद्द केली असल्यास त्याबाबत मा.प्रांत साहेब यांचेकडे अपील करावे लागेल का? किंवा का.त. फेरनोंद घेऊ शकतात का? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by खेडकर दुर्योधन शंकर
19-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
एखाद्या शेतक-याने जमिनीवर कर्ज घेतले त्याची नोंद फेरफार वहीत केल्यावर अथवा एखाद्या शेतक-याने घेतलेल्या कर्जाची पूर्ण परतफेड केल्यावर त्याची नोंद फेरफार पुस्तकात घेतली जाते. यासाठी हे दोन्ही फेरफार मंजूर करताना १५ दिवसाचा कालावधी कलम १५० अन्वये आवश्यक आहे अगर कसे कि हा फेरफार १४ दिवसाच्या अवधीची वाट न बघता हा फेरफार मंडळ अधिकारी यांना मंजूर करता येईल अगर कसे मार्गदर्शन करावे.
Question by abhijit
19-01-2016
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय सिटी स न ची मालमत्ता ९९ वर्षाच्या रजिस्टर भाडेपट्टयाने १९८३ ला घेतला पट्टेदार म्हणुन नोंद आहे धारक म्हणुन मुळ मालकाची नोंद आहे तर धारक म्हणुन नोंद लावण्यासाठी काय करावे लागेल
Question by खेडकर दुर्योधन शंकर
19-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
एखाद्या ७/१२ उता-यावर रवींद्र जयराम कासार चे प्रोप्रायटर धारा इंटरप्राईजेस अशी नोंद ७/१२ चे उता-यावर आहे असे असताना जर प्रोप्रायटर व्यक्ती मयत झाल्यास त्याचे वारस नोंदवण्याची काय तरतूद आहे कृपया मर्गदर्शन करा.
Question by खेडकर दुर्योधन शंकर
19-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
एखाद्या ७/१२ उता-यावर मेसर्स महलक्ष्मि भागीदार संस्था चे मालक / प्रोप्रायटर १) सुभाष जीवन घरत २) अगाळे एकनाथ मडवी याला दिला व याबाबत दोघा व्यक्तीने शंभर रुपयाच्या स्टंप पेपरवर प्रतीज्ञापत्र / नोटरी करून तलाठी कार्यालयात एका पार्टनरचे नाव कमी करण्यास अर्ज दिलेले नोंदणीकृत दस्तावेज नसताना हे नाव कमी करता येईल अगर कसे यावर मार्गदर्शन करावे.
मुळातच भागीदारी संस्था कायदेशीर दृष्ट्या व्यक्ती नाही . त्यामुळे मिळकत भागीदारी संस्थेच्या नावे करता येत नाही .
मात्र अश्या भागीदारी संस्थेच्या नावे हि मिळकती खरेदी केल्या आहेत व नावे लावली आहेत .
या प्रकरणात , नोंदणीकृत दस्त घेऊन दुसर्या भागीदाराचे नाव लावावे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by बापू गावडे
19-01-2016
bapurao.gavade314@gmail.com
सर ,
वडिलोपार्जित जमिन आजोबा अनेक नातवापैकी एका नातवाला खरेदी देऊ शकतो का ?
Question by राजेंद्र लांडगे
18-01-2016
rajlandge12 @gmail.com
सर , १९८ ५ साली सिटी सर्वेमध्ये चौकशी उताऱ्यात माझे आजोबांचे ऐवजी चूलत आजोबांचे धारक म्हणून नाव लागले आहे . पण त्याच उताऱ्यात सदर जागा माझे आजोबांनी खरेदी केले चा उ लेख आहे . त्याचे खरेदीखत पण आ
हे . सदर जागा ग्रा .प. दप्तरी पण माझे आजोबांचे नावे आहे . ही कार्यालयीन चूक दुरुस्त होईल का
कालावधी किती ला गेल .
हे दुरुस्ती अधिकार कोणाला आहेत .
कायदेशीर तरतूद: महसूल अधिनियम 1966 चे कलम 155
अधिकार अभिलेखात किंवा एखाद्या महसूल नोंदवहीत जर काही चुक झाली असेल किंवा एखादा लेखन प्रमाद झाला असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये अशी चुक किंवा लेखन प्रमाद दुरुस्त करण्यासाठी तहसिलदारांकडे अर्ज करता येतो.
अशा चुका दुरुस्त करण्यापूर्वी सर्व हितसंबंधितांना नोटीस बजावणे आवश्यक आहे. अशा चुका किंवा लेखन प्रमाद झाल्याचे संबंधीत पक्षकारांनी कबुल केले पाहीजे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by राजेंद्र लांडगे
18-01-2016
rajlandge12 @gmail.com
सर,
जमिन खरेदी केली आहे . पण देणाऱ्या चे पत्नीची सहमती घेतली नाही . तिने अपील केल्यास खरेदी र द्द होईल का ?
तिचा हिस्सा असेल तर अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सविस्तर उत्तरासाठी अधिक माहिती आवश्यक.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
16-01-2016
ganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,एखाद्या स.नं.मधील शेतजमिनीत अ व्यक्तीचे नाव०-१३ आर क्षेत्रास असल्यास त्याने आणखी त्याच स.नं.मधील ०-०३ आर जमीन ब व्यक्तीकडून खरेदी केल्यास ७/१२ सदरी त्या क्षेत्राची नोंद घेता येईल का?तुकडेबंदी व्यवहार लागू होतो का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by भारत borude
16-01-2016
bharatborude69@gmail.com
आदरणीय सर,
मला माझ्या जिरायत (माळरान) जमिनीचे सपाटीकरण करून (जमीन खूप उंच सखोल,दगड धोंडे ,व मुरुमाची आहे) व गाळ भरायचा आहे,तरी मला कोणत्या विभागाची परवानगी घ्यावी लागेल,व त्याची माहिती कोठे मिळेल ,मला मार्गदर्शन करावे,अशी नम्र विनंती..
Question by श्री नितीन बाळशिराम दांगट
16-01-2016
nitinrupa@gmail.com
स्वातंत्र्यसैनिकांना शासनाने दिलेल्या जमिनीची विक्री करता येते का व येत असल्यास कोणाचे परवानगीने आवश्यक आहे. मार्गदर्शन करावे व शासन निर्णय अथवा परिपत्रकाचे प्रत मिळावी.
Question by Rohit Jathar
16-01-2016
www.rorak8@gmail.com
सर्वाना नमस्कार
गणपत व गुलाब दोन भाऊ आहेत. याच्या दोघांच्या नावे संपूर्ण जमीन आहे. त्यात गणपत हा आपल्या हिस्शाची जमीन त्याच्या एकाच मुलाच्या नावे बक्षिसपत्र द्वारे करण्यास पाहतो आहे. गणपतला दोन मुले व दोन मुली आहेत. यास गुलाब याचीही संमती नाही.
तर बक्षिसपत्र करता येईल का?
तर मृत्यूपत्र करता येईल का?
किंवा इतर मार्गाने त्यांचा स्वार्थ पूर्ण होईल का?
खाते फोड नाही फक्त जमिनी खाण्याकरिता कोणत्याही कागदपत्रा शिवाय वाटून घेतल्या आहेत.
कृपया मार्गदर्शन करावे.
Question by अशोक टेकाळे
14-01-2016
ashoktekale17@gmail.com
नमस्कार सर
शैक्षणिक बिनशेती साठी खरेदीखत २०१५ मध्ये झाले खरेदीखत करताना बिनशेती वापरासाठी म्हणून जादा मुद्रांक शुल्क भरले आहे व लगेच बिनशेती साठी आवश्यक सर्व प्राधिकरणाचे नाहरकत घेउन प्रांत अधिकारी यांचेकडे रितसर प्रस्ताव सादर केला अनधिकृत बिनशेती वापराबाबद दंडाचे चलन भरले व बांधकाम चालू केले परंतु काम पुर्ण झाले तरी बिनशेती झालेले नाही आता मंडळ अधिकारी यांनी बांधकाम परवानगी नसल्याची बाब पुढे करत दंड भरावा लागेल असा तगादा लावला आहे बिनशेती झाल्यावर बांधकाम परवानगी मिळेल कि अगोदर काय करावे लागेल सविस्तर मार्गदर्शन व्हायला विनंती
Question by गणेश शिंदे
14-01-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,रामोशी वतन जमीन विक्री कामी कोणती कागदपत्रे दाखल करावी लागतील अर्ज कोणाकडे दाखल करावा लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by स्वप्नाली जनार्दन आपटे
14-01-2016
swapnapte@gmail.com
दोन वर्षांपूर्वी वारस तपास झाल्यानंतर माझ्या पतीचे वारस तापासात हलगर्जीपणा म्हणून तलाठ्यांचे प्रांत साहेबांनी निलबंन केलेेले आहे. तरी मी पुढे माझे पती पुढे तलाठी या पदावर पुन्हा कार्यरत होण्यासाठी कोणाकडे जावू वा तक्रार करू...वा न्याय मागू..त्याच बरोबर मी आपणाला सांगू इच्छीते की सदरचे प्रकरण मँट या कोर्टामध्ये प्रलंबित आहे. तरी मला आपल्याकडून सल्ल्याची आवश्यकता आहे.
मँट या कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित असल्याने मँट कोर्टाच्या निकालाशिवाय निर्णय होण्याची शक्यता कमी आहे
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by दिपाली गुरव
14-01-2016
dipaligurav1994@gmail.com
माझ्या भावाला पोलीसांनी बीसएनलच्या चोरीखाली अटक केली व त्याला न्यायालयात हजर केले असता...त्याला न्यायालयाने पोलीस कस्टडी एका दिवसांची दिली. आम्हांला या घटनेवरती विश्वास नाही..तरी माझ्या भावाला तसेच माझ्या कुटूंबाला झालेल्या त्रासाबद्दल वा पोलीसांनी केलेले खोटे आरोप व पंचनामा आदिंची माहीती कुठे मिळू शकते तसचे आमच्या अनुसूचित कुटूंबाला दिलेली शिवीगाळी तसेच महीलांबरोबर केलेला वाद या विरूध्द कोठे तक्रार करू शकतो.कृपया साहेब मार्गदर्शन मिळावे.
ज्या न्यायालयाने पोलीस कस्टडी एका दिवसांची दिली त्याच न्यायालयात नकलेसाठी अर्ज केल्यास कागद पत्रांची नक्कल मिळेल. इतर बाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्याकडे तक्रार करावी
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
