जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

मुलगी/बहीणीचे नाव 7/12वर वारसा मध्ये नाही ते लावण्या साठी काय केले पाहीजे?
वारस चढ वतांना फेरफार घेतला असेल आणि त्याचा अंमल झाल्यावर ७/१२ दुरुस्त झाला असेल . तो जुना फेरफार रद्द करण्यासाठी प्रांत कडे अपील करावी लागेल आणि त्यांच्या आदेश नंतर मुलगी / बहिण वारस सिध्द झाल्यास नवीन वारस फेरफार चा आदेश होईल आणि त्या प्रमाणे वारस फेरफार घेऊन ७/१२ वर त्याचा अंमल येईल .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

आदरणीय सर,नगरपरिषद हद्दीत बिगरशेती परवानगी घेऊन नियमानुसार बांधकाम सुरु केले असून जोते तपासणी प्रमाणपत्र मिळाले आहे.परंतु काही क्षेत्रात शेजारील व्यक्तीने भिंत बांधलेली असून अतिक्रमण केले असल्याने नियमानुसार जागा सोडण्यास अडचण निर्माण होत आहे.तरी सदर भिंत तोडता येईल का?त्यासाठी कोठे दाद मागावी लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदाराने मागितलेली माहिती स्वतः नेणार असे अर्जात नमूद केल्यानुसार अर्जदारास उपलब्ध असलेली माहिती फीचा भरणा करून माहिती घेवून जाण्याबाबत पत्राने कळविण्यात आले.परंतु अर्जदाराने अद्याप फीचा भरणा केलेला नाही व माहिती नेलेली नाही.ह्याला महिन्याचे वर कालावधी झालेला आहे अश्या वेळी अर्ज निकाली काढण्या साठी काय करावे.कृपया मार्गदर्शन करावे.
माहिती करिता लागणारे शुल्क भरण्य बाबत अर्जदाराला पत्राने कळवितो त्या पत्रातच वाजवी मुदत द्यावी अन्यथा मागितलेल्या माहितीत स्वारस्य नसल्याचे समजून अर्ज निकाली काढण्यात येयील असे नमूद करता येयील

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

आदरणीय सर माझ्या आजोबांनी १ हेक्टर जमिन माझी सावत्र आई व भाऊ यांच्या नावें नोँदनिकृत व्यवस्था पत्राने करून दिली आहे (न्यायालयातील पोटगीची केस काढुन घेण्याच्या बदल्यात ) व राहिलेली सर्व जमीन वडिलांच्या सोडपत्राने काकांच्या नावे केली आहे सध्या मी काकांकडे राहतो
१ मला १ हेक्टर मध्ये हिस्सा मिळेल का?
२ काका अवीवाहित आहे त्या जमीनीला माझे नाव लावायचे आहे मॄत्यु पत्र केलेतर चालेल का
३ व्यवस्था पत्र रद्द होउ शकते का
आजोबांची जर ती स्वकष्टार्जित जमीन असेल तर त्यांना त्या जमिनीची विल्हेवाट त्यांचे पद्धतीने लावण्याचा अधिकार आहे .
मात्र आजोबांची वडिलोपार्जित मिळकत असेल तर ,व्यवस्थापत्र व हक्कसोड आव्हानात करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्रामपंचायत हदीतील आमचे घराचे दक्षिण बाजूस खुली सामायिक जागा आहे.त्या खुल्या जागेविषयी आमचे खरेदी खतात 'आमची जागा' असा स्पष्ट उल्लेख आहे.परंतु त्या जागेचा सिटी सर्वे उतारा पाहिला असता आम्ही व दक्षिणेकडील दोन शेजारी असे तिघांची सामायिक नावे आहेत.सदर खुली जागा गेली ५० वर्शेपासून आमचे वापरात आहे.त्या खुल्या जागेची स्वच्छता ,झाडलोट,डागडुजी,निगराणी व वहिवाट हि आम्ही एकटे करीत आहोत.सदर खुल्या जागेतून परंपरेनुसार आमची वहिवाट आहे.फक्त आमचे खरेदी खतात त्या खुल्या जागेतून वहिवाटीचा उल्लेख नाही.सदर खुल्या जागेतून आमची वहिवाट कायदेशीर करणेकरिता काय करावे?
जर 50 वर्षे आपली वहिवाट असेल तर , आपण न्यायालयाकडून आपण adverse - possession मालक झाल्याचे जाहीर करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मृत्युपत्राद्वारे झालेली वाटणी हि जमीन वाटपाचा कोणता प्रकार असतो नोंदणी कृत वाटणी, म.ज.म.अ.कलम ८५ अन्वये वाटप कि, वाटप दरखास्त
७/१२ चे वाचन कसे करावे
आपण मा.शेखर गायकवाड सरांचे शेत्कार्यानो जमीन सांभाळा हे पुस्तक वाचावे. आपल्या ७/१२ संबंधीत सर्व संकल्पना व अडचणी बाबत मागदर्शन होईल .

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by P M Jadhav
25-05-2016
ldchr6230@gmail.com

R/s/m
Pls guide
एखाद्या वाक्तीच्या नवे गावठाण अंतर्गत कोठेही जमीन
नसताना गम्पंचायत घरपट्टी आकारू शक्तेका? व
गम्पंचायतने घरपट्टी आकारणी केलेने अशा वाक्तीस
सदर जमिनीची मालकी प्राप्त होतेका ?
केवळ घर पट्टी आकारणी मालकीचा पुरावा होऊ शकत नाही .

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by P M Jadhav
25-05-2016
ldchr6230

R/s/m
Pls guid us
Q 1 Satta prakar "G" (Goverment) Kasa
badalta yeil / Procedure.
Q 2 City Serve uttarya varil nav nond व 8-अ
varil nav nond veg veglya vaktinchi nond
aahe. sadar durusti kashi karavi ,
procedure & require Documents.
pls guid.


आदरणीय किरण सर
विचारलेल्या सदर प्रश्नांचे "आम्ही ३ भाऊ असून वडील हयात नाहीत. आमची एकूण ३ एकर शेती आहे. जमीन अजूनहि वडिलांच्या नावावर आहे. वडिलांनी जमिनीत विहीर खोदलेली आहे मात्र त्याची नोंद ७/१२ वर नाही. त्या वेळी वडिलांनी जमिनीचे हिस्से प्रत्येकाला वाटून दिले होते. सदर विहीर माझ्या हिस्यात आहे. आम्ही तिघेही त्याच विहिरीतून पाणी भरतो. मात्र विहिरीमुळे माझे जवळ जवळ २ गुंठे क्षेत्र बाधित होत आहे तसेच त्रासही होत आहे. सदर विहिरीची नोंद ७/१२ वर नसल्यामुळे मी ती विहीर गाडून त्या ठिकाणी माझ्या हिस्स्यापुरते बोरिंग करू इच्छित आहे. तेव्हा सदर विहीर मी गाडू शकतो का ? जर गाडू शकतो तर इतर २ भाऊ माझ्या विरुद्ध काय करू शकतात ? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती" आपण उत्तर दिले "The well is dug by your father. The water from the well is supplied to the entire Land. So the well is common well and everybody has a right to draw water from it. You cannot unilaterally close the well. They may sue you for depriving them from the use of water."
त्याबद्दल धन्यवाद. पुढे मी असे विचारू इच्छितो कि खातेफोड झाल्यानंतर म्हणजे तिघांचेही ७/१२ वेगळे झाल्यावर सदर विहीर मी गाडू शकतो का ? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती प्रदीप सहाने
जर आपले इतर दोन भावांनी , विहिरीवरचा हक्क सोडला तर , आपण विहीर बुजवु शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by pramod
24-05-2016
pramodderle@yahoo.com

नमस्कार सर
आमुच्या दोन भावामध्ये सुलेहानामा कोर्तामार्फात ०२/०४/१९८१ रोजी झहालेला आहे त्यात आमुच्या वाट्याला ३० R क्षेत्र हलक्या जमिनीच्या मोह्बाद्ल्यात जास्त आलेले आहे त्यानुसार आता ३५ वर्ष्यानंतर माझ्या भावाने ते वाढीव क्षेत्र परत मिळण्यासाठी व समसमान वाटप होण्यासाठी दावा दाखल केला आहे .
१) तर यात किती वर्ष्यापर्यंत सुलेह्नाम्याविरोधात तक्रार दाखल करता येते ??
२) सुलेहनामा झाल्यानंतर मी ज्या स्वकष्टाने जमिनी घेतल्या आहेत त्या जमिनी आम्ही या वाढीव क्षेत्राच्या उत्पन्नावरून घेतल्या आहेत असा दाव्यात उल्लेख करण्यात आला आहे व हिंदू एकत्र कुटुंब नुसार सदर जमिनीत देखील हिस्सा मागितला आहे तर सदर दाव्यात किती तथ्य आहे
योग्य मार्गदर्शन करावे
सुलेहनामा विरुद्ध अपील होते शकत नाही .
तेही 35 वर्षानंतर तर , शक्य नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by prashant mali
23-05-2016
police9015@gmail.com

आपला प्रश्न/सूचना... sir eka prakalpagrast dakhlyacha vapar karun kiti vyaktina government job milu shakato?
एका व्यक्तीस .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

आदरणीय मगर सर प्रथमतः प्रश्नाचे उत्तराबाबत आपले आभार .....तुकडा बंदी कायद्यानाये प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान मर्यादा वेगळी आहे ती कुठे पाहता येयील ....त्याबाबत माहिती कोठून मिळेल ...... नाशिक जिल्हा मर्यादा किती आहे
आपले तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आपणास सदर माहिती मिळेल

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by anand salve
23-05-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर, कायद्यात conformation letter ला काही महत्त्व आहे का ?

Question by anand salve
22-05-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर, माहितीच्या अधिकाराने महानगर पालिका कोणाची वयक्तिक माहिती देऊ शकते का ?
सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १७ ऑक्टोबर 2014 परिपत्रकानुसार व्यापक जनहिताशी संबंध नसलेली वैयक्तिक माहिती देत येत नाही

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by ganesh kadam
21-05-2016
ganesh.kadam45@gmail.com

Adaraniy सर... तुकडेबंदी कायदा १९४७ अन्वये कित्ती कमाल मर्यादेपर्यंत तुकडा पडता येतो ... ६ गुंठे तुकडा वाटपाने पडत असल्यास अशी नोंद ग्यावी का ? 3 भावांचे २० गुंठे क्षेत्र वाटप करायचे असल्यास परस्पर समत्तीने वाटप केले (registered ) तर चालेल का ? अशी नोंद होण्यात कही अडचण येते का? काय करावे ?
जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून जमिनीचे प्रकारानुसार प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेलं आहे ./ करण्यात येते
या पूर्वी नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी हे प्रमाण भिन्न आहे .
तलाठी यांचेकडे या बाबत माहिती मिळेल
किँकनातील जिल्ह्यासाठीहे प्रमाण
बागायत -12 महिने आश्वासित पाणी पुरवठा -0.05.00 H -R
एकपिकी-0.15.00
जिरायत-वरकस -0.20.0 H - R

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रत्येक जिल्ह्यात तुकडा क्षेत्र वेगवेगळे आहे. तुकडा पडत असेल तर नोंद होणार नाही.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

आम्ही ३ भाऊ असून वडील हयात नाहीत. आमची एकूण ३ एकर शेती आहे. जमीन अजूनहि वडिलांच्या नावावर आहे. वडिलांनी जमिनीत विहीर खोदलेली आहे मात्र त्याची नोंद ७/१२ वर नाही. त्या वेळी वडिलांनी जमिनीचे हिस्से प्रत्येकाला वाटून दिले होते. सदर विहीर माझ्या हिस्यात आहे. आम्ही तिघेही त्याच विहिरीतून पाणी भरतो. मात्र विहिरीमुळे माझे जवळ जवळ २ गुंठे क्षेत्र बाधित होत आहे तसेच त्रासही होत आहे. सदर विहिरीची नोंद ७/१२ वर नसल्यामुळे मी ती विहीर गाडून त्या ठिकाणी माझ्या हिस्स्यापुरते बोरिंग करू इच्छित आहे. तेव्हा सदर विहीर मी गाडू शकतो का ? जर गाडू शकतो तर इतर २ भाऊ माझ्या विरुद्ध काय करू शकतात ? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती. प्रदीप सहाने
सदर बाब वयैक्तिक आहे . तरीही २ गुंठे क्षेत्रासाठी ,आणि भावनाच पाणी द्यावे लागते म्हणून ती बुजवणे योग्य नाही . तुम्ही विहिरीत हि बोर घेऊ शकता . गावातील ग्रामसेवक , ग्राम रोजगार सेवक यांचे कडून नरेगा मध्ये या बाबत काही तरतूद आहे का माहिती काढा .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by satish darade
20-05-2016
s.darafe1234@gmail.com

Adaraniy sir ... कार्यकारी दंडाधिकारी समोर वारसांचे नोंद करणे कामी खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले असेल तर कोणाकडे कोणाकडे तक्रार करावी काय कारवाही होते
खोटे शपथपत्र केले म्हणून आपण भारतीय दंड संहितेच्या कलाम 193 व 199 अंतर्गत गुन्हा दाखल करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. दिवाणी न्यायालयाकडे . भारतीय दंड संहिता १८६० चे क . १९९ .The offence under this section is non-cognizable, bailable and non-compoundable, and is triable by court of session, metropolitan magistrate or magistrate of the first class.

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

पुणे विद्यापीटच्या अभियांत्रिकी डिपार्टमेंट दिली जाणारी २०१४-२०१५ EBC बदल
आदरणीय सर,खाजगी जागेतील अतिक्रमण काढण्याचे अधिकार कोणास आहेत?त्यासाठी काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
दिवाणी न्यायालयाकडुन आदेश घ्यावे लागेल

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

नमस्कार सर

अ आणि ब या लोकांची सामाइक जमीन असून त्या जमिनीमध्ये दोघांचे एकच घर असून त्यावर दोन घरपट्टी आहे आणि आज रोजी जमीन आणि घराचा ताबा हा दोघांकडे आहे . पण क हि वेक्तीचा इतर हक्क मधून नाव निघून गेले आहे आणि तसा फेरफार आहे तरी आज रोजी क या वेक्तीचा पुढील पिडीची नावे आज रोजी सातबारात भोगवटा मध्ये आहेत . आज रोजी अ आणि ब हे लोक हि जमीन कसत आहेत आणि दस्त हि भरत आहेत . क या वेक्तीचा कुठलाहि संबंध नसताना ते अ आणि ब या लोकांशी भांडत आहे

या प्रकरणावर थोडे मार्गेदर्शन करावे हि विनंती
फेरफार झाला आहे असे म्हणता ,याचा अर्थ त्याचा अंमल घेतलेला नाही ,त्या मुळे ७/१२ दुरुस्त झाला नाहीय . आणि क च्या मृत्यू नंतर वारस चढलेले वाटतात . फेरफाराचा अंमल घेण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज करा .प्रांत कार्यालयात अपील करा . क हि बहिण / मुलगी असेल आणि फेरफार हा चुकीच्या पद्धतीने घेतला असेल तर विषय बदलतो . नंतर ची बाब हि तुमची व्यक्तीक आहे .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

नमस्कार सर ,

जर आमच्याकडे १९२२ पर्यंत जुने फेरफार आहेत पण जुने सातबारा १९५६ च्या नंतरचे आहेत . पण १९५६ च्या आधीचे सातबारा
बद्दल आम्ही तहसील आणि तलाठी कार्यालयात विचारणा केली तर आम्हाला १९५६ आधीचे सातबारा नाही आहेत , १९५६ पासूनच सातबारा आहेत असे सागितले .

तर जुने सातबारा कसे शोधावे किवा जमिनीचा मुळ मालकीहक्क कसा शोधावा या बद्दल मार्गदर्शन करावे
जमिनीच्या हक्का संबंधी सर्वे नंबर चे हक्क नोंदणी उतारा संबंधीत तहसिल मधिल अभिलेखागारातुन प्राप्त करता येईल....

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

नमस्कार सर ,

दारिद्र रेषेखाली विहीर आणि घर बांधण्यासाठी सरकार कडून अनुदान मिळते का आणि मिळत असेल तर त्याची काय कार्यपद्धती आहे या बद्दल मार्गदर्शन करावे .
योजना आहेत .घरांच्या योजनासाठी आपण ग्रामीण साठी ग्राम पंचायत व शहरी भागासाठी नगर परिषद कडे संपर्क साधावा . विहिरी ग्रामीण भागात narega ,jawahar vihiri,jalyukt shivar ya sathi gram panchyat aani B D O KARYALAYAT ,krishi sahayak yancheshi sampark sadhava . gavatil gram rojgar sevakachi madat ghyavi . arakhada vishisht velet tyar hoto , aapli vihir arakhadyat manjur pahije .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by anand salve
18-05-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर, १) ०.०९ पोट खराबा, ००.४ आर २) ०.४१ पोट खराबा, ००.४आर ३) १ हेक्टर,०.९ आर, ०.१६ पोट खराबा हे एकूण क्षेत्र एकर प्रमाणे किती होइल.

Question by suraj mankar
18-05-2016
sepune17@gmail.com

पानशेत पूरग्रस्त ला मिळालेल्या जमिनी विषयी ची माहिती व नियम sanga.

This page was generated in 0.40 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3