जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

भिल व्यक्ती च्या नावे असलेली जमीन बिगर भिल व्यक्तीस संस्थेच्या नावे घेता येईल का?
परवानगी घ्या शासनाची

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय
सर/मॅडम
आदिवासी ने आदिवासीला ला जमीन विकायची असल्यास कुठला कायदा आहे आणि ती जमीन कश्या प्रकारे मिळवावी.

मी आदिवासी आहे माझी जमीन आदिवासी कडे गहाण होती. आता ती सोडून घ्यायची आहे तर मला कुठल्या प्रकारचे मार्ग अवलंबाव लागेल. पुढचा व्यक्ती सरकारी नोकरदार आहे तरी सुद्धा सावकारी धंदा करतो त्याच्या कडे मान्यता आहे कि नाही हे माहित नाही जर त्याने माझी जमीन मला देण्यास नकार दिल्यास मी कश्या प्रकारे ती जमीन मिळवू शकतो.
प्रस्ताव सादर करत असताना
१) तहसीलदार २) एस डी ओ ३) कलेक्टर यांच्या मार्फत जाणार ना?
आणि कलेक्टर सर ची मान्यता घायवीच लागते का?
प्रस्ताव कश्या प्रकारे सादर करावा कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार किरण सर,

वेगवेगळे असे ९ सात बाऱ्यांचे (अंदाजे २५ एकर) ४ हिस्से पाडायचे आहेत आणि त्या सर्व सात-बारयत चारही कुटुंबातल्या सर्व सदस्यांची नावे आहेत.

चौथ्या कुटुंबातील हिस्यामध्ये २ बहिणींचे नावे ७/१२ मध्ये आहेत पण आता या जमिनींचे ४ समान वाटप करताना किंवा ७/१२ स्वतंत्र करताना दोघींपैकी एक बहीण तयार होत नाही आहे, ती बहीण हक्क सोडायला हि तयार नाही आणि चौथा हिस्सा करण्यासही तयार नाही परंतु दुसऱ्या बहिणीला लवकरात लवकर वाटप करावयाचे आहे.

कृपया खालील प्रश्नाचे निरसन करावे,
१) चौथ्या कुटुंबातील एक बहीण सही करण्यास नकार देत असेल तरीही दुसऱ्या बहिणीच्या संमतीने हे वाटप होऊ शकते का?
२) सध्या हे वाटप ५०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मजकूर लिहून आणि चारही कुटुंबाच्या संमतीने होणार आहे. तर हि प्रक्रिया बरोबर आहे कि वाटप सरकारी कार्यालयात व्हायला हवे.

कृपया मार्गदर्शन करावे.
सर,
नमस्कार
एका हिस्सा नंबर मध्ये पैकीचे दोन सातबारे आहेत. त्यापैकी पहिल्या सातबाराच्या जमिनी बाबत महसूल न्यायालयात दावा केस चालू आहे व दुसऱ्या सातबाराची जमीन निर्विवाद आहे.
सदर दुसऱ्या सातबाराच्या जमिनी बाबत फेरफार नोंदण्या साठी तलाठी यांचेकडे अर्ज केला असता त्यांनी सादर मिळकतीचा दावा चालू आहे असे सांगून अर्ज निकाली काढला व तसे लेखी पत्र सुद्धा पाठवून दिले.मात्र प्रत्यक्षात ती दावा मिळकत नाही दावा मिळकत वेगळी आहे. पण तलाठी ऐकत नाही.
फेरफार मंजूर करून घेण्यासाठी काय करावे लागेल?
तलाठी यांच्या निर्णया विरुद्ध अपील करता येते का व कसे?
या बाबत कृपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद


तलाठी यांना फेरफार नामंजूर केला असेल तर , त्याची प्रमाणित प्रत मागा . त्या प्रतीचे आधारे अपील दाखल करा .
जर तलाठी प्रत देत नसेल अथवा लेखी उत्तर देत नसेल तर सेवा हमी कायद्या खाली तहसीलदार यांचेकडे अर्ज दाखल करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
आमची गावठाणात वडिलोपार्जित स्वमालकी वहिवाटीची जागा आहे. ती आमच्या पंजोबानी १८७३ साली बाबर याला स्टॅम्प वर लिहून भाड्याने दिली तो स्टॅम्प आमच्याकडे आहे. तो निघून गेल्यावर ती जागा आमच्या आजोबानी रामा शिंदे याला भाड्याने दिली तो भाडेपट्टा आमचे जवळ नाही. त्याने त्या जागेवर ग्रामपंचायत ला १९२२ साली ४३ x ४३ घर अशी त्याच्या नावावर नोंद केली. त्याची माहिती आम्हाला न्हवती. पुढे तो वारला त्यानंतर त्याच्या मुलाची नोंद त्या जागेला लावून घेतली. तो १९७० साली नोकरीवर निघून गेला त्यावेळी त्याने त्याचे घराचा पत्रा कडून न्हेला व आम्हाला तोंडी सांगितले कि तुमची जागा तुमच्या ताब्यात घ्या. नंतर आम्ही ती जागा १९७१ ते १९८० या सालात कुलकर्णी याना भाड्याने दिली त्याच्या स्टॅम्पची झेरॉक्स आमच्याकडे आहे, व १९८० साली जागा सोडतानाच ओरिजनल स्टॅम्प आमच्याकडे आहे कि तुमची जागा तुमच्या ताब्यात दिली म्हणून .
१९९० साली आमच्याकडे असणारे वरील दोन स्टॅम्प दाखवून आम्ही आमच्या घराचे दक्षिण बाजूच्या खुल्या जागेला ग्रामपंचायतीला ६५ x ८५ मोजमापाचीं खुली जागा अशी नोंद करून घेतली. १९९५ साली सिटी सर्वे झाला त्यावेळी त्यांचे कोणीही हजर न्हवते आमचे वडील हजर होते त्यांनी वरील स्टॅम्प दाखवून आमच्या नावाची नोंद सिटी सर्वे ला करून घेतली. शिंदे यांच्या उताऱ्या बाबत विचारले असता वडिलांनी त्यांना सांगितले कि ते भाडेकरू होते. मग सिटी सर्वे साहेबानी आमची नोंद जागेला करताना शेरा मारला कि शिंदे यांच्या वहिवाटीबाबत माहिती सांगतात ते भाड्याने राहत होते असा शेरा मारला.
पुढे आमच्या वडिलांनी ती जागा २० वर्षाच्या कराराने २००७ साली रिलायन्स tower ला भाड्याने दिली आहे.
शिंदे यांच्या वारसांच्या नावाची नोंद ग्रामपंचायतीला अजूनही पडीक जागा ४३ x ४३ अशी आहे पण त्यांचा मिळकत नंबर वेगळा आहे व आमच्या जागेचा मिळकत नंबर वेगळा असून मोजमाप ६५ x ८५ असे आहे.
आता शिंदे यांच्या वारसांनी त्यांच्या व त्यांच्या वारसांच्या नावांची नोंद असलेले उतारे २००८ साली काढले व २०१५ साली सिटी सेर्वेला साधे पत्रं लिहिले आमची नोंद करावी म्हणून मग सिटी सर्वे ने त्या पत्राला उत्तर म्हणून तुम्ही योग्य कारणांच्या विलंब माफी अर्जासह अपील दाखल करावे असे पत्र पाठवले. त्या नुसार त्यांनी आम्ही सर्विस मुळे बाहेर होतो असे सांगून विलंब माफी अर्ज केला व अपील दाखल केले आहे तर त्यांचा विलंब माफ होईल का ? त्यांचे अपील चालेल का ?
अपील दाखल करताना त्यांनी आमचे वडील हयात असताना मयत वारस म्हणून आमच्या मोठ्या भावांच्या नावे नोटिसा काढल्यात ते चालेल का ? आम्हाला काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.


वाटपपत्र झाले आहे. परंतु सापडत नाही असे तेहसीलदार यांनी लेखी कळवले आहे.पोटहिस्सा मोजणी होऊन सातबारा वेगळेकरने कमी काय करावे लागेल.कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद.
तहसीलदार यांनी कलम ८५ खाली वाटप केले आहे का ? असल्यास , सरस निरस वाटप केले असल्यास , त्याचे प्रत , उप अधीक्षक भूमी अभिवलेख यांचे कडून प्राप्त करून घ्या .
जर नोंदणीकृत वाटप असेल तर , प्रमाणित नक्कल दुय्यम निभांदक कार्यालयात मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे वडील दारूचे व्यसणी आहेत .त्याचा गैरफायदा घेऊन इतर समाजाच्या मानसानी सर्व 2 हेक्टर जमिन स्वतःच्या नावे करून घेेतली. नतंर 1 लाख रू. दिल्यावर नावे करतो असे म्हणाला परंतु मी गरीब असल्याने 1 लाख रू देऊ शकलो नाही. त्यामुळे त्यांनी 2 हेक्टर पैकी 44 आर जमीन 1 लाख रू ला दुसरया आदिवासी मानसाला विकली आहे. मी आदिवासी समाजाचा आहे. मला ती सर्व जमीन परत मिळु शकेल का? कृपया मार्गदर्शन करावे?
इतर समाजाचे म्हणजे बिगर आदिवासी आहेत का ?
१. म.ज.म. अ. १९६६ चे कलम ३६ अ अन्वये , आपले वडिलांनी ( परवानगीशिवाय) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व कुळवहिवाट कायदा सुधारणा कायदा १९७४ नंतर विकली असेल , तर अशे हस्तांतरण अवैध आहे . आपणास जमीन पार्ट मिळू शकेल . आपण जिल्हाधिकारी यांचे कडे भोगवटा परत मिळण्यासाठी अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
मी कोतवाल या पदावर कार्यरत आहे. मला पुढे शिकण्याची इच्छा आहे,तर मी नोकरी करीत असताना पुढील शिक्षण घेता येते का ? कोणत्या अधिनियम लागू पडेल.
होय आपण पुढील शिक्षण घेऊ शकता . मात्र आपणास बहिस्थ पद्धीतीने शिक्षण घ्यावे लागेल . आपल्या शिक्षणामुळे आपले कामावर परिणाम होता काम नये .
आपण उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब,मला कुणबी जातीचे प्रमाणपत्र काढायचे आहे त्यासाठी जातीचा उल्लेख असलेली कोणकोणती जुनी कागदपत्रे काढावी लागतील.तसेच वंशावळी साठी कुठले कागदपत्रे आवश्यक आहे.आपल्या मदतीसाठी आभार.
माणसाची जात हि त्याचे वडिलांची जात आहे . कुणबी जातीसाठी मानीव दिनांक १९६७ चा आहे . त्यामुळे आपले वडिलांचे आजोबांचे , कोणतेही अभिलेख ( शाळा सोडल्याचा दाखला , जन्म नोंद ए ) १९६७ पूर्वीचे असणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कार्यालयातील अभिलेख गहाळ झाला असेल व तो नेमका कधी गहाळ झाला हे माहित नसेल आणि अर्जदार याची दोषी कर्मचारीवर गुन्हा दाखल करन्याची मागणी असेल तर अशा वेळी काय करावे? अज्ञात व्यक्ती विरुद्व फोजदारी गुन्हा दाखल करावा अथवा काय काय कार्यवाही करावी याबाबत मार्गदर्शन करावे
आपण गुन्हा कोणावर दाखल करणार ? सद्य कार्यरत कर्मचारी , अभिलेख गहाळ होण्यास जबाबदार आहे हे कशे ठरवणार ?
घाहल झाला म्हणजे , कर्मचाऱ्यांनी अभिलेख घेऊन गेले असा होत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Subhash Gund
02-12-2016
rajmudra123@gmail.com

सर, आमच्याण गावामध्येउ एक पाझर लाव आहे. परंतु का‍ही लोक स्वमतःच्या स्व र्थासाठी पाझर तलावातील सर्व पाणी उपसुन घेतात. त्यायमुळे उन्हाकळयामध्येक आजुबाजुच्याम रानातील पशु-पक्षी व इतर वन्यापशु यांचे पाण्यातवाचुन खुप हाल होतात. तसेच गावातीलही गाई वासरांचे पाण्याचवाचुन हाल होतात. तसेच बरेच पशु गेल्याचवर्षी पाण्यानवाचुन व्या.कुळ होउुन इतर भटकत होते. त्याचमुळे पझार तलावातील २० ते २५ टक्केा पाणी साठी राखुन ठेवण्या साठी आपण काही उपाय सुचवला अशी आपेक्षा आहे किंवा स्टे ऑर्डर घेता येईल का ?

सुभाष गूंड
उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई असेल तर , जलसंपदा विभागाकडून , पाणी राखून ठेवणे बाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देतात . त्यावेळी जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास हि वस्तुस्थिती आणून , पाणी राखून ठेऊ शकता.
तलाव ज्या प्राधिकरणाचे मालकीचा आहे , त्यांनी पाणी उचलण्यासाठी काही लोकांना परवाना दिला आहे का ? जर परवाना दिला नसेल तर , त्यांना प्रतिबंध करणे बाबत त्या प्राधिकरणास कळवा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by abhijit
02-12-2016
abhijitkadam55@gmail.com

महोदय सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणारी व्यक्ती मयत असेल आणि वारस नोंद केलेली नसेल तर अशा वारसांनी जर स्थानिक स्वराज संस्थेसाठी ऊमेदवारी अर्ज दाखल केला तर तो वैध ठरतो का तसेच जिवंत व्यक्तींनी अतिक्रमण केले तर त्याच्या वारसांना ऊमेदवार म्हणुन वैध ठरवता येते का
सार्वजनिक संस्थेचे सदस्याने सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले तरच , असा सदस्य , सदस्य म्हणून चालू राहण्यास अपात्र ठरतो . तो सदस्य असेल तर त्यास अपात्र ठरवता येते .
अतिक्रमण केले म्हणून , उमेदवारीसाठी अपात्रता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by goroba pawar
02-12-2016
gorobap@gmail.com

X या जमिनीवर माझ्या आजोबांचे कुल होते. त्यांचे मृत्यू नंतर वारस म्हणून आजोबांच्या मुलींनी कु.का.क. ३२ग ने खरेदी केली व वारस म्हणून आजोबांच्या दोन्ही मुलींची नवे लागली पण माझे वडील त्यावेळी लहान असल्याने त्यांचे नावाची नोंद केली नाही. त्यामुळे सदर च्या जमिनीवर फक्त आजोबांच्या मुलींचीच नवे आहेत माझ्या वडिलांच्या नावाचा त्यांनी कुठेही उल्लेख केला नाही आता माझ्या वडिंलाचं मृत्यू झाल्याने त्यांचे वारस म्हणून सदर जमिनीचे ७/१२ ला माझे नाव लावणेकरिता काय करावे
होय आपण करू शकता .
मात्र यासाठी विलंब खूप झालेला आहे .
फेरफार आव्हानात करावे लागतील . मात्र अपिलीय अधिकाऱ्याने , आपला विलंब माफ केला पाहिजे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ता.तुळजापूर गावहद्दीतील गट नंबर - १९१ मध्ये माझ्या वडीलांची पिढीजात विहिर आहे .१९१ गटाच्या सातबारा सदरी माझ्या वडीलांचा हिस्सा (०.८) बाबू गरड (०.८) असून सदर सातबारा रमेश बाबू गरड ,सुरेश बाबू गरड,सतिश बाबू गरड यांचे नावावर असून सदर विहरीसाठी माझ्या वडीलांनी गट नं - १९२ मधील १० गुंठे जमीन त्यांना विहीरीचा मोबदला म्हणून दिला आहे .विहरीचा
अर्धा हिस्सा अर्धा खर्च गेली ४० वर्षे माझ्या वडीलांचा असून तो आम्ही ४० वर्षे वापरत आहोत .पण राजकारणी लोकांच्या मदतीने दबाव आणून सदर विहिर ही माझ्या सातबारयावर व माझ्या शेतात असल्यामुळे तुझा त्यावर काही हक्क नाही .विहीर का तुझ्या बापाची आहे का? विहिरीवर याल तर जिवंत माघारी जाणार नाहीत.....विळा घालुन फाडून टाकू अशी गुंडगीरीची ,निझामशाहीची भाषा वापरत आहेत .तुमची विहीर नाही विहरीवर याल तर घराबारावर फौजदारी कारवाई करू .मुलांच्या नाेकरया घालवू .माझी दोन्ही मुले १.कुशल राम गरड शिक्षक जि.प.सांगली.२.विनोद राम गरड शिक्षक जि.प.औरंगाबाद. शिक्षक असून जीव मारण्याच्या व नोकरी घालवण्याच्या धमकीमुळे आम्ही हक्काच्या विहरीवर पण गेलो नाही. नोकरीत असने गुन्हा आहे का?का कुणीही आयाबहिणीवर शिव्या द्यायच्या ,नोकरीत असणारयांनी त्या सहन करायच्यया असा कायदा आहे का? आज गुंडगीरीने हक्काच्या विहिरीतून काढलेत, उद्या हक्काच्या विहरीतून आणि आपण काहीच कारवाई केली नाही तर हक्काच्या गावातून सुद्धा हाकलून लावतील अशी भीती वाटते .स्वतंत्र भारतात राहत आहोत की निझामशाहीत हाच प्रश्न पडला आहे.पेरलेल्या शेतास पाणी नाही . सदर विहीर वरील तिघेजण पाव हिस्सा असताना पूर्ण वापरत आहे .आमचा अर्धा हिस्सा असताना पाणी वापरू देत नसतील तर त्यांना ही मनाई हुकूम करावा किंवा आमचा हक्क मिळावा.
आपण दखल घ्याल हीच आशा
आपला विश्वासू
राम यशवंता गरड
The Indian Easement Act अन्वये आपला या सामायिक विहिरीतून पाणी काढण्याचा हक्क आहे .आपण The Specific Relief Act दिवाणी दावा दाखल करा . व विहिरीतून आपणास पाणी काढण्याचा हक्क आहे हे जाहीर करून मग तसेच आपणास पाणी काढण्यासाठी प्रतिबंध करू नये म्हणून मनाई हुकूम मागा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दि.22-11-216 रोजीच्या उत्तरास अनुसरून प्रश्न.सन 1961-62 सालीच जर कूळवहिवाटीची नोंद घेताना चुकून तीन सातबारा ऐवजी दोन सातबाराची खरेदी किम्मत लावली असेल तर त्यावेळची चूक आता दुरुस्त करता येईल काय?. कारण तिसऱ्या सातबारावर आजोबांची कूळ वहिवाटीची नोंद आढळून येत नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी तरी तीन ऐवजी दोन सातबाराची किम्मत लागलेची चुक त्यावेलीच झालेली आहे.अन्यथा तीसरी मालमत्ता मुळ मालकाने त्या वेळेसच आमचे ताब्यातून काढून घेतली असती.त्याकाळापासुन ते आजपावेतो तीसरी मालमत्ता आमचेच ताबेकब्जात आहे.त्या वेळेची चुक आता कशी दुरुस्त करता येईल.कृपया योग्य मार्गदर्शन करावे.
मिळकत ताब्यात असणे आणि मिळकतीस कुल म्हणून नोंद असणे या भिंन्न गोष्टी आहेत
जमीन ताब्यात कुल म्हणून हि असू शकते . त्याच बरोबर , अनधकृत पणे हि अश्या जमिनीवर ताबा असू शकतो .
जमिनीला कुल म्हणून नाव असेल तर ३२ ग किंमत निश्चित होऊ शकेल
जमीन १२ वर्ष्याहून अधिक काळ ताब्यात असेल व हि बाब जमीन मालकास माहित असेल तर , आपण adverse possession चा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. किरण पाणबुडे सर
मा. संजय कुंडेटकर सर
नमस्कार

आम्ही चांदे खुर्द या गावच्या हद्दीत राहतो.

आम्ही वस्तीवरती राहतो आणि आमची वस्ती हि जवळ-जवळ 200 लोकसंख्येची वस्ती आहे.

आमची वस्ती हि चांदे खुर्द या
गावच्या हद्दीत आहे परंतु आमच्या घराच्या नोंदी ह्या चांदे बुद्रुक या गावच्या ग्रामपंचायत मध्ये आहेत. चांदे खुर्दच्या ग्रामपंचायत मध्ये नाहीत.

आमच्या जमिनी सुद्धा चांदे खुर्द च्याच हद्दीत आहे.

आमचे मतदान, रेशनकार्ड हे सर्व चांदे बुद्रुक या गावचे आहे.

दोन्ही गावामधील अंतर अवघे 2 km आहे.

आमच्या वस्तीवरील 10 लोकांनी व मी आपापल्या जमिनीमध्ये शासकीय योजनेमधून शेततळे बनविण्यासाठी अर्ज केला आहे.

शेततळ्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव आवश्यक असतो म्हणून आम्ही आमच्या रहिवाशी म्हणजे चांदे बुद्रुक या ग्रामपंचायतीमध्ये गेलो असता त्यांनी आम्हांस असे सांगितले कि आपली जमीन हि चांदे खुर्द या गावच्या हद्दीत आहे तरी आपण चांदे खुर्द या ग्रामपंचायत मधून ठराव घ्यावा.

आम्ही चांदे खुर्द मध्ये गेलो असता तेथे आम्हांस असे सांगितले की, आपणांस ठराव मिळणार नाही कारण आपण आमच्या गावचे रहिवाशी नाहीत तसेच आपले मतदान व रेशनकार्ड हे सुद्धा आमच्या गावचे नाही.

तसेच चांदे खुर्द या गावच्या सरपंच यांनी आम्हा वस्तीवरील सर्व लोकांची बैठक घेऊन असे सांगितले आहे की, आपण सर्वांनी लवकरात लवकर आपले मतदान व रेशनकार्ड हे चांदे खुर्द या ग्रामपंचायतीत स्थानांतरण करावे तसेच आपल्या घराच्या नोंदी आमच्या हद्दीत राहता म्हणून आमच्या ग्रामपंचायत मध्ये लावून घ्याव्यात. अन्यथा आम्ही आपल्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करणार आहोत.

त्यांनी असे संगीतल्यानंतर आम्ही आमच्या सध्या रहिवाशी असणाऱ्या चांदे बुद्रुक या गावच्या सरपंचांची भेट घेतली व त्यांना सदर सर्व घटना कथित केली, परंतु त्यांनीही आमची मदत करण्यास नकार दिला व असे सांगितले की, आपण ज्या गावच्या हद्दीत राहता त्याच गावचे रहिवास स्वीकारा, आणि आपले मतदान, रेशनकार्ड व घरांच्या नोंदी आमच्या येथून चांदे खुर्द येथे स्थानांतर करा. कारण आपण चांदे खुर्द या गावच्या हद्दीत राहता.

1. आम्ही चांदे खुर्दच्या हद्दीत राहत असल्याने घराच्या नोंदी सुद्धा चांदे खुर्द मधेच घ्याव्यात का

2. आम्ही चांदे बुद्रुक मधील मतदार यादीतील नाव व रेशनकार्ड हे चांदे खुर्द मध्ये स्थानांतरित करावे का

3. आम्ही चांदे खुर्दच्या हद्दीत राहत असून चांदे बुद्रुकच्या ग्रामपंचायत मध्ये आमच्या घराच्या नोंदी आहेत तरी हे बेकायदेशिर आहे का व तसे असल्यास आमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते का

4. आमच्या घरांच्या नोंदी चांदे खुर्द मध्ये नसल्याने त्यांना आम्हांस ठराव न देण्याचा अधिकार बनतो का

प्लिज सर आपण लवकरात लवकर माझ्या समस्येचे निराकरण करावे हि विनंती

आपला आभारी
अमित शिर्के
१. होय
२.होय
३.आपणावर कायदेशीर कारवाई होण्यापेक्षा , सभांडीत ग्रामपंचायतीने , आपले घराचे नोंदी बुद्रुक गावात कश्या करून घेतल्या ? ते आपण पेक्षा जादा दोषी आहेत
४. हो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by anand salve
01-12-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर , तीन वर्षांपूर्वी माझे वडील खाजगी रुग्णालयात दाखल होते,ते रुग्नालयात दाखल होते त्या बाबत माझ्या कडे कुठलाही पुरावा नाही,माहिती अधिकाराने मला तास पुरावा मिळू शकतो का ? त्यासाठी काय करावे लागेल ?
शासकीय रुग्णालयात असतील तर माहिती अधिकारात माहिती मिळू शकेल . तथापि , रुग्णालयाचे नियमपणाने , अभिलेख जतन करण्याचा कालावधी क्ती आहे या वर ते अवलंबून आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by दीपक
01-12-2016
sathe.dipak@gmail.com

महोदय ,
आमच्या जमिनीजवळ असणारी मोकळी जागा पूर्वी आमची होती असे मला समजल्या नंतर चौकशी केल्या नंतर असे समजले कि, सदर जमीन माझ्या वडिलांनी एका संस्थेस विकली आहे . सदर जमिनीचा फेरफार नोंद पहिली व असे आढळले कि फेरफार माझ्या वडिलांच्या मृत्यू नंतर नोंद केलेला आहे . फेरफार वरून निबंधक कार्यलयाकडे सदर खरेदी दस्त मागणी केली परंतु खरेदी ३५ वर्ष पूर्वीची असलेने दस्त दोन प्रतीमध्ये केला जात नव्हता असे सांगितले व खरेदी रजिस्टर मधील नोंदीची झेरॉक्स दिली गेली सदर रजिस्टर वर खरेदी देणार म्हणून माझ्या वडिलांचे नाव आहे पण त्यांची त्यावर सही नाही पण सहीच्या ठिकाणी अंगठा असा मोकळा चौकोनी शिक्का मारलेला आहे तेथे अंगठा उमटवलेला नाही परंतु माझे वडील सही करत होते याची माहिती त्यांनी या पूर्वी ३ वर्षे आधी घेतलेल्या खरेदीवरून समजते.
सदर संस्थेचे अस्तित्व आता कोठेही जाणवत नाही. तसेच तालुका व जिल्हा सहकार रजिस्ट्रार कार्यालयात चौकशी केले असता संस्थेच्या नावाची नोंद सुद्धा आढळत नाही .आज रोजी सदर जागेवर काही व्यक्ती तसेच इतर संस्था मूळ संस्तेने जमीन आम्हास दिली होती असे सांगत आपला हक्क सांगत आहेत .
१) सदर जागेच्या जुन्या खरेदीवर ,बोगस व्यक्ती नेऊन खरेदी केली आसा अर्थ काढता येईल का ?
२) मूळ वारस अवसायक नेमण्याची मागणी करू शकतात का ?
३ ) सदर संस्था बंद असल्यास व अवसायक नेमला गेल्यास सदर जमीन विकताना वारसांना प्राधान्य मिळू शकते का ?
आपले कथनावरून खरेदी खात एक तर बोगस असले बाबत आपणस संशय आहे . आपण खरेदी खत बोगस असल्याचे जाहीर करून मिल्ने बाबत The Specific Relief Act खाली दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Savita Gaykar
01-12-2016
savitagaykar@gmail.com

श्री किसन यांना दोन पत्नी, जनाबाई आणि मंदाबाई आहेत. पहिल्या पत्नीचा, जनाबाई यांचा मोठा मुलगा महादू याने २००२ साली किसन यांची पावणे तीन एकर जमिन खरेदीखत करून घेतली. जमिन वडिलोपार्जित आहे. खरेदीखत करताना फक्त घरखर्चासाठी पैसे दिल्याचे सोडुन इतर कोनत्याही प्रकारचे पैसे दिल्याचा पुरावा नाही. त्यावेळेस किसन यांच्या दुसऱ्या पत्नाची, मंदाबाई यांची किंवा तिच्या मुलांची कोनत्याही प्रकारची NOC घेतली नाही. हे सर्व घडताना किसन यांना नशेत ठेवलं होतं. आता यावर यांच्या दुसऱ्या पत्नीला, मंदाबाई यांना किंवा त्यांच्या मुलांना काय मार्ग काढता येइल का?
किसान यांनी मंदाबाई यांचे मुलास कोणतीही अन्य मिळकत दिली नाही का ? अथवा किसन यांना केवळ पावणे तीन एकर जमीन होती .
जर फक्त पावणे तीन एकर जमीन एकट्या महदूस दिली असेल तर त्या वर , मंदाबाईच्या मुलाचा निम्मा हक्क आहे . जमीन वडिलोपार्जित असल्याने , त्या जमिनीचे किसनरावांना त्यांचे इच्छे प्रमाणे वाटप/विल्हेवाट लावता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Yogesh Rudruke
30-11-2016
Yogeshrudruke@gmail.com

नमस्कार सर
मी 1996 मध्ये तीन गुंठे Non NA जमीन खरेदी केली
होती दस्ता वर तशी नोंद आहे परंतु तलाठी कार्यालायमधील 7/12 उताऱ्या ला दोन गुंठे जमिनीची नोंद झाली आहे तरी तीन गुंठे
जमिनीची नोंद होणे साठी काय करावे लागेल या विषयी सल्ला मिळावा ही नम्र विनंती
उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील करा . नोंद आव्हानात करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्न :- मी सण १९८५ मध्ये मूळगावी २२०० sq भूखंड खरेदी खतानुसार खरेदी केला व आज रोजी माझेच नावे आहे. पण काही काळानंतर माझे वडिलांनी ती जागा एका इसमांस तात्पुरती राहायला म्हणून दिली. आज रोजी त्या इसमाचे त्या जागेवर घर बांधून वास्तव्य आहे. व त्यांनी ग्रामपंचायत दप्तर ला नोंद सुद्धा केली व नमुना ८ ला त्याचा नावे निघाला. आता मी सेवा निवृत्त झालो आहे आणि आता मला परत माझे मूळ गावी यायचे आहे. तर ती जागा मला परत कशी मिळवता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे.

आपण दिलेला उत्तर :- त्याने जागेचा मोबदला दिला तर तो स्वीकारावा .
जागे वर घर बांधले आहे , त्या मुले तो जागा आपणास परत करणार नाही
जागा किती वर्षे त्याचे तांबे कब्जात आहे ?
जर १२ वर्षापेक्षा , त्याचे ताब्यात असेल तर , तो adverse possession चा दावा दाखल करू शकतो . जागेची मालकी त्याचे नावे जाहीर करून मिळण्यासाठी चा दावा मान्य होऊ शकतो .

स्पष्टीकरण :- ज्या व्यक्तीला ती जागा निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात राहायला दिली होती ती व्यक्ती आता त्या जागेवर राहत नाही त्या व्यक्तीने ती जागा सोडल्या नंतर ती व्यक्ती मरण पावली. परंतु माझा मालकीची जागा त्या व्यक्तीने परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला दिली. व ती तिसरी व्यक्ती आज त्या जागेवर घर बांधून राहायला आहे. तसेच त्या तिसऱ्या व्यक्तीने गैर मार्गाने ग्राम पंचायत दप्तर ला नोंद करून घेतली.
आपले जमिनीवर , अतिक्रमण केले आहे , त्यास आपली जागा खाली करण्यासाठी दिवाणी दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय
सर/मॅडम
आदिवासी ने आदिवासीला ला जमीन विकायची असल्यास कुठला कायदा आहे आणि ती जमीन कश्या प्रकारे मिळवावी.

मी आदिवासी आहे माझी जमीन आदिवासी कडे गहाण होती. आता ती सोडून घ्यायची आहे तर मला कुठल्या प्रकारचे मार्ग अवलंबाव लागेल. पुढचा व्यक्ती सरकारी नोकरदार आहे तरी सुद्धा सावकारी धंदा करतो त्याच्या कडे मान्यता आहे कि नाही हे माहित नाही जर त्याने माझी जमीन मला देण्यास नकार दिल्यास मी कश्या प्रकारे ती जमीन मिळवू शकतो.
प्रस्ताव सादर करत असताना
१) तहसीलदार २) एस डी ओ ३) कलेक्टर यांच्या मार्फत जाणार ना?
आणि कलेक्टर सर ची मान्यता घायवीच लागते का?
प्रस्ताव कश्या प्रकारे सादर करावा कृपया मार्गदर्शन करावे.
आदिवासी व्यक्तीने बिगर आदिवासी व्यक्तीस जमीन हस्तांतरण केले असल्यास , अशी जमीन जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करून जमीन परत मिळवता येते . आदिवासी व्यक्तीने आदिवासी व्यक्तीकडे गहाण ठेवली असल्यास , जिल्हाधिकारी /प्रांताधिकारी यांचेकडे अर्ज करून , जमीन गहनातून सोडवता येणार नाही . आपण जमिनीचे घेतलेले पैसे , ज्यास जमीन गहाण दिली आहे त्यास परत द्या .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,१५ वर्षापूर्वी मोबदला देऊन जमिनीचे कुलमुखत्यार पत्र नोटरी केलेले होते.त्यानंतर त्याबाबत संबंधित व्यक्तींकडून रजि.मान्यतापात्र घेतले होते.त्यापैकी एक व्यक्ती मयत झाली.तरीही आजरोजी कुलमुखत्यारधारकाने सादर जमिनीची विक्री केल्याने गावदप्तरी नोंद घेण्यात आली आहे.तरी सडे व्यवहार कायदेशीर आहे का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..
कुलमुखत्यातरपत्र देणार्यांपैकी मयत झालेल्या व्यक्ती्ची जमीन, तो मयत झाल्यानंतर विकली असेल तर ते अवैध आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महोदय ,
दि. १९/११/२०१६ रोजी विचारलेल्या प्रश्नानुसार सहकारी संस्थेने जमीन खरेदी केल्याचे फेरफार वरून दिसते ( १९६६ साली ). फेरफार वरील नोंदीनुसार खरेदी झाल्यानंतर १९७२ साली फेरफार नोंदविण्यात आला परंतु जमीन देणारा इसम १९७१ साली मयत झाला होता. १९७२ साली सदर फेरफार नंतर मूळ गटातून खरेदी जमिनीचा वेगळा गट नंबर तयार झाला आहे ( ६९० ब). फेरफार वरील; नोंदीनुसार उपलब्ध खरेदी दस्त नंबर व तारीख नुसार रजिस्ट्रार ऑफिसकडे विचारणा केल्यानंतर सदर खरेदीची नोंद आढळत नाही. मागील प्रश्नात सांगितल्याप्रमाणे सदरची संस्था आता अस्तित्वात नाही. आता मयत इसमाच्या वारसांना काय करता येईल
दस्त झाल्यानंतर खरेदी देणार किंवा खरेदी घेणार मयत झाला तरी दस्ताच्या कायदेशीरपणावर परिणाम होत नाही. मयताच्या‍ वारसांना रेकॉर्डवर आणून नोंद प्रमाणीत करता येते. एकदा विकलेली जमीन कायदेशीर हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केल्या‍शिवाय पुन्हा प्राप्त करता येत नाही. जरूर तर दिवाणी न्याायालयात दाद मागावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार किरण सर,

वेगवेगळे असे ९ सात बाऱ्यांचे (अंदाजे २५ एकर) ४ हिस्से पाडायचे आहेत आणि त्या सर्व सात-बारयत चारही कुटुंबातल्या सर्व सदस्यांची नावे आहेत.

चौथ्या कुटुंबातील हिस्यामध्ये २ बहिणींचे नावे ७/१२ मध्ये आहेत पण आता या जमिनींचे ४ समान वाटप करताना किंवा ७/१२ स्वतंत्र करताना दोघींपैकी एक बहीण तयार होत नाही आहे, ती बहीण हक्क सोडायला हि तयार नाही आणि चौथा हिस्सा करण्यासही तयार नाही परंतु दुसऱ्या बहिणीला लवकरात लवकर वाटप करावयाचे आहे.

कृपया खालील प्रश्नाचे निरसन करावे,
१) चौथ्या कुटुंबातील एक बहीण सही करण्यास नकार देत असेल तरीही दुसऱ्या बहिणीच्या संमतीने हे वाटप होऊ शकते का?
२) सध्या हे वाटप ५०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मजकूर लिहून आणि चारही कुटुंबाच्या संमतीने होणार आहे. तर हि प्रक्रिया बरोबर आहे कि वाटप सरकारी कार्यालयात व्हायला हवे.

कृपया मार्गदर्शन करावे.
१) नाही. सर्वांची संमती आवश्‍यक
२) दस्‍त नाोंदणीकृत हवा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.38 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3