जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

aami 3 bhau(brothers) ani 2 bahini (sisters) aaichya mrutyu (death ) 2016 la jali. aai chya nawe aami jamin kharedi(1996nantar ) keli asun aaichya death nantr tiche watp kase hoil ya babat shanka aahe. majya bahini hakkasod patr detil ki nahi ya babat shanka aahe. bahininchi lagne 1992 ani 1996 la jali aahet. milakat swakashtachi asli tari aaichya nawe keli hoti . kaydyane kay pryay aahet ki 3 bahwanchi nawe lagtil. than यौ
आई चे हिस्याचे जमिनीस 3 भाऊ व 2 बहिणीची नावे लागतील .
बहिणीची इच्छा असेल तर हक्क सोड पात्र देतील . पण आपण मनाचा मोठेपणा दाखवा , बहिणींना हिस्सा द्या
आई चे मृत्य नांतर , वारसा हक्क प्रमाणे वाटप होते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर महिला 30 टक्के आरक्षण साठी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र किती वर्ष्याच्या कालावधीसाठी मिळते
पूर्वीच्या वनजमिनी परंतु 50 वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी भूमिहीनांना नवीन शर्तीने वाटप केल्या सदरजमिनीच्या विक्री भाडेकरार करता येतात का
या जमिनीचे निर्वनीकरण झाले आहे का ? निर्वनीकरण होऊन त्या प्रमाणे आदेश झाले असतील तर , ही जमीनचा वन दर्जा राहत नाही . आपणास वविक्री भाडे करार मा. आयुक्त यांचे परवानगीने करता येईल
मात्र निर्वनीकरण झाले तर , ही जमीन वन स्वरूपाची आहे . अश्या जमिनीचे हातांतरां गैर आहे . ही जमीन वन असल्याने या जमिनीवर गैर वन काम करता येणार नाही . या ही अपरोक्ष ज्यांना जमीन वाटप करण्यात आली आहे त्यांचा भोगवटा बेकायदेशीर आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by anand salve
10-07-2016
salveanand89@gmail.com

नमस्कार सर , जमिनीवरील आपला मालकी हक्क व जमिनीवरील आपला कब्जा सिद्ध करण्यासाठी कुठले कागदपत्र जवळ ठेवावी .
जमीन ग्रामीण क्षेत्रातील असेल तर दरवर्षी आपल्या जमिनीचा 7/12 , 8a , नकाशा ,हे नमुने आपल्या फाईल ला ठेवावे . दरवर्षी देय महसुलाची पावती, महसूल भरून ठेवावी . कब्जा बाबत जमीन वादात असेल तर पीक पाहणी लावून घ्यावी . फॉर्म no 14 आणि 7 ब आपल्या फाईल ला ठेवावे.

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

गावठाण जागेत घरे बांधून रहिवास करणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांची घरे भोगवट्यास लावता येतील काय या बाबत मार्गदर्शन मिळावे .
आपणास अश्या घरांची नोंद 7/12 सदरी करता येतील का अशे विचारावयाचे आहेका?
अश्या घरांचे नोंदी 7/12 सदरी करता येणार नाही .
मालमत्ता कर अभिलेख नोंदवहीत अश्या नोंदल्या करतायेतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गावठाण विस्तार चे प्रस्ताव तहसीलदार मार्फत मा . प्रांत यांच्याकडे पाठवता येतात . गावठाण विस्तार बाबत अधिक मार्गदर्शन संबंधित तहसीलदार कार्यालयातून घ्यावे .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by vishal
10-07-2016
vishalrajeshinde143@gmail.com

माननीय महोदय,
मला १९५० ते १९७० दरम्यानचेे ७/१२ उतारे पाहिजे आहेत पण महसुल विभागातील रेकॉड ला १९७० चा पुढील ७/१२ उतारे मिळतात .
तर काय करावे लागेल सविस्तर उत्तर मिळावे विनंती .
त्वरीत उत्तर मिळावे विनंती
resurvey पूर्वी अधिकार अभिलेख पंजी असा रेकॉर्ड होता तो तपासा.

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by naeem
09-07-2016
naeem1111@gmail.com

Sir 10 varshapurvi mi mazya shetjaminiche 180000 rs. Che sathekhat karun tyala shetjamin vahivatila dili hoti. tevapasun mazi shetjamin to Manus vahivatit ahe . ata mala mazi shetjamin parat pahije tar mi Kay karu? V sir to jamin sodayla tayar nahi.....
आपणास जमिनीचे पैसे मिळाले असतील तर आपणास जमीन परत मिळणे अशकय
जर पैसे मिळाले नसतील तर , त्यास व्याजासह आपण पैसे मागणी करू शकता
हे करूनही तो खरेदी रक्कम ( पैसे) देत नसेल तर , आपण साठे करार रद्द करून मिळणे बाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपल्याला पूर्ण रक्कम 10 वर्षांपूर्वी प्राप्त झाली आहे का ? असल्यास शब्द पाळा.

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

वाढीव गावठाणा मध्ये घरासाठी प्लॉट मिळाला आहे. वडिल जिवंत आहेत तो प्लॉट व घर वडिलांनी तिघांना १०० रुपयाच्या स्टम्प पेपर वर अॅपुडेड करून वाटप केले आहे.
वडील जिवंत असताना वाटप करू शकतात का?
100 रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील हस्तांतरण वैद्य नाही .
वडिलांना त्यांची मिळकत विल्हेवाट लावण्याचा खरेदी खात , बक्षीस पात्र या द्वारे अधिकार आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर एखादा शासकीय/निमशाशकीय कर्मचारी बेपत्ता, परागंदा असेल, तर त्याच्या बाबत काय कार्यवाही करावी ? या बाबतचा शासन निर्णय द्यावा.
आपणास त्या विरद्ध शिस्तभंग कारवाई करता येईल
सेवेतून काढून टाकणे , बाढतर्फ करणे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

भारतीय पुरावा कायदा, १८७२ च्याह कलम १०७, १०८ अन्वये दिवाणी न्यायालयातून दाखला आणावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Rj
08-07-2016
www.roraj8@gmail.com

माझ्या आजोबाच्या व चुलत आजोबाच्या नावे १० एकर वडिलोपार्जित जमीन आहे तर माझ्या आजोबाने माझ्या चुलत्याच्या बायकोच्या(सून) नावे ४ एकर जमीन व माझ्या(नातू) नावे १ एकर जमीन हि मुत्युपात्राने दिलेली आहे व बाकीच्या मुला, मुलींना काहीच दिले नाही.
तरी आम्हाला समजताच आम्ही माझ्या वडिलांच्या नावे मा.तहसीलदार व मा. तलाठी यांना हरकतीचे अर्ज दिले आहेत
माझे आजोबा आजून ह्यात आहेत परंतु ते कोणतीही बाब मान्यास तयार नाही ते माझ्या चुलत्याच्या बाजूने बोलत आहेत.
जमिनीमध्ये माझ्या अजोबा व चुलत अजोबा यांच्यात कोणतीही खाते फोड अगर वाटणी, हिस्सेवारी झालेली नाही कोणत्याही चतु:सीमा हि पडल्या नाहीत. फक्त खाण्यासाठी वेगवेगळी जमीन कसत आहेत.
तरी हे मृत्युपत्र आम्हाला मान्य नाही. तर मा.तहसीलदार व मा.तलाठी यांना आम्ही हरकतीचे अर्ज दिलेले आहेत तर या व्यतिरिक्त अजून काय करावे ?
१)न्यायालयात वाटपपत्र साठी अर्ज करावा ?
२) वडिलांच्या नावे वारसदार म्हणून जमिनीवर स्टे टाकावा ? 3rd party stay
३) रक्ताच्या नात्यामध्ये सून येत नाही म्हणून केस टाकावी ?
४) कि, या व्यतिरिक्त काही करावे ?
कृपया आपल्या सर्वांच्या सहकार्च्याही अपेक्षा आहे.
आपले आजोबाना 5 एकर जमीन होती . जर ही जमीन आजोबांचे वडिलांकडून आजोबानाप्राप्त झाली असेल तर , आजोबांचे हयातीत , आजोबांचे खालील 4 पिढ्यापर्यन्त ( पुरुष ) वारसांना , हिंदू coparcenary तत्वानुसार जमीन वाटप करून मागण्याचा हक्क होता .
सध्या आपले आजोबा मयत आहेत , त्यांनी त्यांचे नावावर असलेली जमीन , जिचा त्यांना त्यांचे इच्छे प्रमाणे विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे , त्याप्रमाणे त्यांनी ती जमीन मृत्यपत्राने एक सुनेला व मातुल दिलेली आहे. त्या मुले आता त्यात खावी करता येईल असे मला वाटत नाही .

मृत्यपत्राचे वैधतेबाबत शंका असल्यास त्यास आपण आव्हानात करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आजोबांची जमीन जर वडिलोपार्जित म्ह्णजे आजोबांच्या वडिलांकडून वारसा हक्काने आली असेल तर आजोबांना त्यांंच्या हिस्या‍पुरतेच मृत्यू्पत्र करता येईल ज्याचा अंमल त्यांच्या निधनानंतरच होईल.
भावनिक न होता व्यवहार व वारसाहक्कांचा विचार करून तुम्ही न्यायालयात वाटपासाठी अर्ज करू शकता.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Rj
08-07-2016
www.roraj8@gmail.com

ग्रामसेवकाकडे तीन महिन्यापूर्वी घराच्या नोंदी वेळी दिलेल्या कागदपात्रांची प्रमाणित नक्कल मागितली होती
तर ग्रामसेवक आमच्याकडे घराच्या नोंदी वेळी दिलेली कोणतीही कागद पत्रे नाही असे तोंडी सांगत आहे
2000 साली घराची नोंद झालेल्या सर्व घरांची नोंद ग्रामपंचायत कडे आहे तर सदर घराची नाही याचा काय अर्थ घ्यावा
कोणत्याही कागद पत्राशिवाय घराची नोंद होते की , घराची नोंद खोटी आहे
तर mala लेखी स्वरूपात उत्तर मिळण्यासाठी काय करावे
आपणास घराची नोंद करण्यासाठी दाखल केलेले अभिलेख हवेत आहे की ग्रामसेवक यांचे कडून , घराची झालेली नोंद खोटी आहे ही लेखी हवे आहे ?

पहिली माहिती आपण मागू शकता . मात्र दुसरी माहिती ( , घराची झालेली नोंद खोटी आहे) हे माहिती अधिकारात मिळणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपण माहितीच्या अधिकाराचा वापर करू शकता

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माझ्या ७/१२ वर विविध कायद्याखाली नवीन शर्त असे लिहिले आहे तर ती शेत जमीन मला विकत येईल का, विकता येत असेल तर कुठल्या नियमाखाली विकत येईल कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
शासन प्रदान जमीन असेल तर अशी जमीन अविभाजय सत्ता प्रकार म्हणून 7/12 सादरी दाखल असेल. अश्या जमिनी मा. आयुक्त यांची परवानगी घेऊन व अनार्जित रक्कम शासन जमा करून विकत येतील.
Watan कायद्याखाली जर जमीनदिलेली असेल , तर केवळ शुल्क जमाकरून जमीनविकतायेईल . तर काही Watan जमिनीची परवानगीघ्यावी. लागेल .
ceiling कायद्याखालील जमिनीची परवानगी जिल्हाधिकारी यांचे कडून घ्यावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

योग्य ती रक्कम शासनाच्या. तिजोरीत जमा करुन नवीन शर्तीची जमीन विकता येते. आपण संबंधित तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Sadik
07-07-2016
Sadik11m@rediffmail.com

Kiran panbude sir v sanjay kundetkar sir aplya doghani dilelya margdarshanamule eka garibala tyacha haqq milala tyamule mi apla manpurvak aabhari ahe..mi ek samajik karykarta aahe..tumchasarkhe adhikari janmala yavet ashi mazi ishwarakade ichha ahe..
धन्यवाद सादिक साहेब. जनतेला जास्तीत जास्त कायदेशीर मदत करणे हाच या संकेतस्थळाचा उद्देश आहे. आमच्या सल्यामुळे आपले काम झाले याबाबत आम्ही समाधानी आहोत.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by sadik
06-07-2016
sadik11m@rediffmail.com

1 bigha mhnje kiti acre
विविध क्षेत्रात बीघा या मोजमापात फरक आहे.
बिहार मध्ये् एक बिघा म्हणजे 2529.2 चौरस मीटर (27,225 चौरस फिट)
राजस्थानमध्ये् एक बिघा म्हणजे 2500 चौरस मीटर
बंगाल मध्ये् एक बिघा म्हणजे 1333.33 चौरस मीटर
आसाम मध्ये् एक बिघा म्हणजे 14,400 चौरस फ़ीट
अंदाजे चार बिघा म्हणजे एक एकर

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मी भोगवटादार वर्ग – 2 इतर अधिकार नवीन अविभाज्य शर्त ( 1 ) जमीन 2010 साली विभागीय आयुक्तांची परवानगी घेवुन विकत घेतली आहे.आणि मी 50% बाजार मुल्य भरलेले आहे.तरी सात बारा वर भोगवटादार वर्ग – 2 इतर अधिकार नवीन अविभाज्य शर्त ( 1 ) असेच आहे. तरी मला भोगवटादार वर्ग – 1 करण्यासाठी काय करावे लागेल.
अशी जमीन भोगवटादार वर्ग 2 चा राहते . ती भोगवटादार वर्ग 1 होत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पैसे भरल्याचे चलन व इतर कागदपत्रे घेऊन संबंधीत तलाठी किंवा तहसिलदार यांना भेटावे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माननीय महोदय,
मला १९५० ते १९७० दरम्यानचेे ७/१२ उतारे पाहिजे आहेत पण महसुल विभागातील रेकॉड ला १९७० चा पुढील ७/१२ उतारे मिळतात .
तर काय करावे लागेल सविस्तर उत्तर मिळावे विनंती .
त्वरीत उत्तर मिळावे विनंती
संबंधीत तहसिल कार्यालयाची निर्मिती होण्यापूर्वी ते इतर कोणत्या तालुक्यात समाविष्ट होते काय याची चौकशी करावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय sir आमचा 7/12 आमच्या नावावर आहे पण जमीन कसणाऱ्याचे नाव चुलत चुलत्यांचे आहे ती जमीन आम्हाला विकायची आहे तर काही अडचण येईल का ? काय करावे लागेल
चुलता कोणत्या अधिकाराने जमीन वहिवाटतो याचा उल्लेख आपण केला नाही. अनाधिकाराने कोणालाही कोणाची जमीन वहिवाटण्याचा अधिकार नाही. जमीन विकायची असल्यास चुलत्याची संमती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणार्याा पिक पहाणीच्या वेळेस ही बाब तलाठी यांच्या निदर्शनास आणावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

पोट हिस्सा हॅन्ड बुक कुठे उपल्बध होईल कृपया या बाबत माहिती द्यावी आपल्या पैकी कुणाकडे असल्यास संकेत स्थळ वर उपल्बध करून द्यावे
पोट हिस्सा नोंदवही- गाव नमुना ६-ड, तलाठी यांच्याकडे उपलब्ध असते. पोट हिस्साबाबत इतर माहितीसाठी आपण भुमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर, एखादा कर्मचारी एका कार्यालयातुन दुस-या कार्यालयात निवड झाल्‍यामुळे पहिल्‍यापदावरुन तांत्रिक बाब म्‍हणून कार्यमुक्‍त होऊन नवीन पदावर रुजु झाला व तेथे काही काळ सेवा केल्‍यानंतर त्‍याला पुन्‍हा पहिल्‍या सेवेत येता येईल का ? त्‍याबाबत काही तरतुद असल्‍यास कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
त्यास पहिल्या सेवेत येत येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 चे अधिकार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना आहे का?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 मध्ये *महसूल अधिकारी* असा उल्लेख आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 2(31) ची व्याख्या वाचली तर भू- मापन अधिकारी महसूल अधिकारी आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माझे वडील माझी सैनिक आहेत, त्यांना निवृत्तीचे वेळी 2 एकर जमीन शासनाकडून प्राप्त झाली व सदर जमीन वर्ग -1 मध्ये आहे .सदर जमीन भंडारा जिल्यात आहे व आम्ही नागपूर जिल्यात वास्तव्य करतो. त्यामुळे सदर जमीन वाहने अडचणीचे आहे. कृपया सदर जमीन विकत येऊ शकेल काय अथवा सदर जमीन शासनास परत करून नागपूर जिल्यात परत मिळवता येईल काय? या बाबत मार्गदर्शन व्हावे, ही विनंती.
शासनाने जमीन दिली आहे . त्यामुळे ती वर्ग 2 ची जमीनआहे . ही शासन प्रदान जमीनआपणास विकत येईल .मात्र आपणास त्या बाबत विक्री परवानगी घ्यावी लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

या बाबत आपण जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Vilas Gahane
04-07-2016
vilasgahane7@gmail.com

सर ,जबरान जोत जमीन मी कसत आहे ,जमीन १९७८ मध्ये काढली असुन ती आईने काढली .पंरतु आई ह्मातारी असल्याने दंड माझ्या नावे २००२ मध्ये भरलेला आहे .बाजुच्या शेतक-यांना पट्टे मीळाले आहेत मला अजुन पर्यत अप्राप्त आहे.पट्टा मिळण्याबाबत मार्गदर्शन करावे
आपण तहसिलदार कार्यालयात संपर्क साधावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by sadik
03-07-2016
sadik11m@rediffmail.com

सर शेतजमिनीच्या कोणत्या बाजूच्या बांधावर आपला अधिकार असतो
शेतकऱ्याच्या गरजेनुसार बांधावरून रस्त्याचा हक्क आहे . Kalam 143 प्रमाणे कोणत्या एक बाजूने हक्कनसतो. रस्ता हक्क मान्य करताना ज्याचे बांधावरून रस्ता देण्याचा आहे, त्याचे ही कमी ता कमीनुकसान व्हावे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sadik
03-07-2016
sadik11m@rediffmail.com

सर नाझी जमीन एक माणूस 5 वर्ष करत होता सात बारा माझ्या नावावर आहे आता मला तो जमीन पेरून देत नाही मी काय करू
जर आपण जमीन 5 वर्ष कालावधीसाठी कसण्यासाठी त्या इसमास दिली असेल व तो आता जमिनीचा ताबा देण्यास टाळा ताल करत असेल, व 6 महिन्याचा कालावधी संपला नसेल तर , आपणमामलतदार कोर्ट कायद्याचे कलाम 5 चा. आधार घेऊन दावा दाखल करू शकता.
जर ही वस्तुस्थिती नसेल तर , आपणास न्यायालयात त्याच्याविरुद्ध दावादाखल करावा लागेल व आपणास जमिनीचा ताबामागावा लागेल वभविष्यात. आपले कासवणुकीस अडथळा करूनये म्हणून मनाई हुकूम मागावालागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तहसीलदारकडे अर्ज करा. म. ज. म . अधिनियम 1966, कलम 242 नुसार तहसीलदार कारवाई करू शकतात

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Sudhakar kamdi
02-07-2016
Kamdisudhakar@gmail.com

तलाठी यांच्याकडे हरकत प्राप्त झाली फेरफार नोंद घातली नसल्याने त्याने ती निकाली काढली नंतर फेरफार आला तर ती हरकत धरावी की नाही.

This page was generated in 0.53 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3