जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by महेश थोरात
22-07-2016
mahesh123@gmail.com
सर मी एक जमीन ग.न .२१ क्षेत्र ३ एकर या जमीन मिळकतीवर एकुण ५ नावे आहेत पैकी २ लोकांनी त्यांच्या हिस्याचे क्षेत्र 1 एकर विकले आहे व त्याची आणेवारी नसल्याने नोंद करता येणार नाही असे तलाठी सांगतात तर ती नोंद करण्यासाठी कायदेशीर तरतूद आहे का?
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ४४ अन्वये अनेक सहधारकांपैकी एक सहधारक आपल्या हिस्याचे क्षेत्र विकू शकतो. अशा विक्रीमुळे ते क्षेत्र खरेदी घेणार्या व्यक्तीला सहहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो. आणेवारी नसल्याने नोंद करता येणार नाही हे म्हणणे चुकीचे आहे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक बुवाजी patil
20-07-2016
Vbpatil96@gmail.com
आदरणीय sar, आमचेकडे 1948 पासून शेतजमीन आहे त्या जमिनीमध्ये माझे आजोबा 1954 साली संरक्षित कुल झाले पण आम्ही अजून वारस नोंद केली नाही पण पीक पाहणी सादरी वडिलांचे नाव आहे तसेच इतर हक्कात जनरल ट्रस्ट 1954 पासून आहे tari ती जमीन आमच्या नावावर होईल का , त्या साठी काय karave
आपण आधी वारस नोंद करावी. आपल्या प्रश्नाचे उत्तर कागदपत्रे पाहिल्याशिवाय देणे अवघड आहे. आपण एखाद्या वकीलाचा सल्ला घेणे उचित ठरेल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास सखाराम पाबळे
20-07-2016
rohidaspable@yahoo.in
एखाद्या व्यक्तीचे 50 आर क्षेत्र आहे त्यामधील 18 आर त्याने विकासकाला रजिस्टर दास्ताने अग्रीमेंट करून दिले परंतु विकासकाने सदर व्यक्तीस कोणतीही माहिती न देता 50 आर क्षेत्र बिगरशेती करून घेतले नगर रचना व प्रांत कार्यालयाने 18 आर दिलेल्या क्षेत्राचा विचार ना करता संपूर्ण क्षेत्राचा बिनशेती आदेश दिला गेला मंजूर नकाशावर मूळ मालकाच्या सह्या नाही .तरी सदर बिनशेती आदेश रद्द करण्यासाठी काय करावे लागेल
बिन शेती आदेश दुरुस्त करण्यासाठी ज्या अधिकाऱ्याने आदेश दिले आहेत त्याचे कडे अर्ज करा . जर त्याने दुरुतीस नकार दिला तर , आपण अपील करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास सखाराम पाबळे
20-07-2016
rohidaspable@yahoo.in
7/12 च्या इतर अधिकारात पुनर्वसनासाठी राखीव शेरा आहे सदर पुनर्वसनसची अधिसूचना अपव्यक्त होऊन 10 वर्षे झाली आहे तरी सदर शेरा कायम ठेवून जमीन विक्रीची परवानगी मिळू शकेल काय
Question by गावीत मथुवेल मालू
20-07-2016
mathuvelgavit@gmail.com
नमस्कार सर, जिल्हा निवड समिती नंदुरबार तलाठी भरती 2015 अंतर्गत पदवीधर अंशकालीन या समांतर आरक्षण गटातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग दि.19 सप्टेंबर 2013 च्या शासन परिपत्रकाअन्वये सर्वसाधारण उमेदवारामधून गुणवत्तेनुसार आमची सर्वसाधारण प्रतीक्षा यादीतील उमेदवारामधून निवड करण्यात आलेली आहे ,परंतु नियुक्ती आदेश निर्गमित करण्याअगोदर जिल्हाधिकारी यांची बदली झाल्याने नवीन आलेले जिल्हाधिकारी नियुक्ती आदेश देण्यास तयार नाहीत ,तरी आम्हाला पाठवलेल्या पत्राअन्वये आम्ही चरित्रयापडताळणी प्रमाणपत्र सुद्धा जमा केलं असून 3 महिने झाले असून तरी आत्तापर्यंत नियुक्ती आदेश दिले गेले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तपास केला असता आस्थापना सरचिटणीस म्हणाले की,जिल्हाधिकारी साहेब बोलले की ,प्रतीक्षा यादीतील एकाही उमेदवाराला नियुक्ती आदेश मी देणार नाहीत आणि सुरवातीला निवड झालेल्या सर्वसाधारण उमेदवारामधून 2 उमेदवारांनी joining केलंच नाही. तर ते सुरवातीचे 2 अंशकालीन 3 अशा 5 उमेदवारांची निवड करण्यात अली आहे.तरी सरांनी याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती! (संदर्भ सामान्य प्रशासन विभाग gr date: 19/sept./2013)
Question by विनायक बुवाजी patil
19-07-2016
Vbpatil96@gmail.com
रेस्पेक्टड sir, आमच्या एकत्रित कुटुंबाची सं 1975 साली तोंडी 1985 साली लेखी पण रेजिस्टरेड नाही 2002 साली रेजिस्टरेड दस्ताने वाटणी झाली आहे 2002 सालच्या वाटणीपत्राने आम्हाला समान वाटणी झालेली नाही सर्व जमीन वडिलोपार्जित आहे तसेच वाटणीपत्रामध्ये संपूर्ण मालमत्तेचा तपशील नाही vatni पत्रावर हरकत घेता येते ka
आपले वाटणीपत्र नोंदणीकृत नाही म्हणून त्याला कायदेशीर महत्व नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by arjit
18-07-2016
àrjit12@gmail.com
sir gavthanamadhe mazi 1guntha जागा आहे.त्याचा 7/12 मिळू शकतो का
Question by रोहिदास सखाराम पाबळे
18-07-2016
rohidaspable@yahoo.in
शेतीत बांधलेले घर विकता येते का त्याचा रजिस्टर दस्त होतो का
परवानगी असो व नसो आपणास घर नोंदणीकृत विकता येईल . मात्र परवानगी घेतलेले घर विकत घेणे/ विकणे हितावह .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
शेतीत बांधलेले घर जर रितसर परवानगी घेऊन बांधले असेल तर विकता येते आणि त्याचा रजिस्टर दस्त होतो.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
18-07-2016
sadikmullaa@gmail.com
1)शेतजमिनीची मिळकत पत्रिका असते का
2)घराचा जमिनीचा 7/12 असतो का
3) ड्युअल ओनरशिप म्हणजे काय
प्लिझ उत्तरे द्या
1.शेत जमीन जर , सर्वे झालेल्या गावात /नगरपालिका क्षेत्रात असेल तर , मिळकत पत्रिकाच असते .
2.होय. घर जर शेत जमीन म्हणजे सर्वे नम्बरमध्ये बांधले असल्यास , घराचे खालील जमिनीचा 7/12 असतो .
3. Duel Ownership म्हणजे , जागा एकाचे मालकीची व त्या वर सौरचना ( बांधकाम ) दुसऱ्याचे मालकीचे . आपले देशात Duel ownership प्रचलित आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
1) शेतजमिनीची मिळकत पत्रिका नसते, 7/12 असतो
2) घराचा जमिनीचा 7/12 नसतो मिळकत पत्रिका असते
3) ड्युअल ओनरशिप म्हणजे सह मालकी
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
18-07-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,नगरपरिषद हद्दीत मा.उपविभागीय अधिकारी साहेब,यांचेकडून 0-07 आर क्षेत्राची बिगरशेती परवानगी घेऊन राहण्यासाठी घराचे बांधकाम 75%झालेले आहे.तसेच बिनशेती मोजणीही झालेली असून नगरपरिषदे कडून जोते तपासणी दाखलाही मिळाला आहे.तरीहीअतिक्रमण करून भिंत बांधलेबाबत(वास्तविक कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झालेले नाही) तिऱ्हाईत इसमाने कु.मु.पत्राद्वारे बिनशेती परवानगी रद्द करणेकामी मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांचेकडे अर्ज दाखल केला आहे.तरी सदरची परवानगी रद्द होऊ शकते का?किंवा कसे कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..
तिऱ्हाईत इसमाचे म्हणणे जर अतिक्रमण केले आहे अशे असेल तर , त्याने आपण अतिक्रमण केले आहे हे दाखवून देणे आवश्यक . त्यासाठी मोजणी प्रतहाम करणे आवश्यक. मोजणी त्याने करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
अनधिकृत बांधकाम केले बाबत नगरपालिकेकडून आपणास नोटीस प्राप्त झालेली आहे का ?
उत्तर नाही असेल तर , आपली परवानगी रद्द होणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
उपविभागीय अधिकारी सर्व पुरावे बघुनच निर्णय देतील. सुनावणीच्याकवेळेस तुम्हीम तुमच्याचकडील पुरावे सादर करा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
18-07-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांनी दिलेला बिनशेती आदेश रद्द करण्याचे अधिकार कोणास आहेत ? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
उपविभागीय अधिकारी यांच्या कोणत्याही निर्णयाविरुध्द मा. अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे मुदतीत अपील करावे लागते.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by मजिद सौदागर
18-07-2016
latif.saudagar@gmail.com
साहेब नमस्कार...माझे वडील मयत झाल्यानंतर त्यांच्या नावे असलेल्या जमीनीच्या पट्टयाचे दिवाणी न्यायालयाच्या आदेशान्वये आम्हा आठ भावंडांमध्ये वाटण्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सदर जमिनीच्या 7/12 वर आम्हा सर्व आठही भावंडांची नावे प्रत्येकास मिळालेल्या जमिनीच्या क्षेत्रफळासहित दाखल करण्यात आली आहेत. आता मला माझा हिस्सा विकायचा असुन त्यासाठी माझ्या नावावर स्वतंत्र 7/12 होणे आवश्यक आहे. यासाठी कोणाकडे व कसा अर्ज करावा याबद्दल कृपया मार्गदर्शन व्हावे, ही विनंती.
तुम्हाला तुमचा हिस्सा विकायचा असल्यास स्वतंत्र 7/12 होणे आवश्यक नाही. तुम्ही तुमचे क्षेत्र विकू शकता. मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ४४ अन्वये अनेक सहधारकांपैकी एक सहधारक आपल्या हिस्याचे क्षेत्र विकू शकतो. अशा विक्रीमुळे ते क्षेत्र खरेदी घेणार्या व्यक्तीला सहहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by संजय रा. कोकरे
18-07-2016
S.r.kokare1992@gmail.com
माझ्या गावामध्ये माझे २५ वर्षापुर्वी खरेदी हक्काने विकत घेतलेले घर आहे. परंतु तेथे कोणीही राहत नसल्यामुळे व माझ्या अद्न्यानामुळे मी त्या घराची नोंद करायची नाही. मात्र आता मला त्या घराची नोंदणी करायची आहे. माझ्याकडे त्या घराची खरेदीखत आहे. परंतु सरपंच नोंदणी करण्यास नकार देत आहे. मी काय करावे
सरपंचांनी नोंदणी करण्यास नकार देण्याचे कारण नाही. सरपंच नोंदणी अधिकारी नाहीत. तुमची कागदपत्रे कायदेशीररित्या नोंदणीकृत असतील तर ती कोणीही नाकारू शकत नाही. तुम्ही योग्य ती कागदपत्रे ग्र.पं. कार्यालयात सादर करा. त्याची रितसर पोहोच घ्या. जरूर तर गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by रोहित जठार
18-07-2016
www.roraj8@gmail.com
शेतीला जाण्या-येण्यासाठी सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता मागणी अर्ज केला असता मा.तहसीलदार सोहेब यांनी ६ फुटी रस्त्याचा आदेश पारित केला असून सदर प्रतिवादी यांनी सदर आदेशावर मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याकडे अपील केले असून अपिलचा निर्णय काय लागू शकतो ?
सदर सर्वे नंबरच्या फाळणी नकाशा सोबत जोडला आहे तरी आम्हाला रस्ताच्या मंजुरीचा आदेश मा.उपविभागीय अधिकारी साहेब हे किती दिवसात देऊ शकतील ? आदेश काय स्वरूपाचा असू शकेल ?
उपविभागीय अधिकारी सर्व पुराव्यांची पडताळणी करून योग्य तो निर्णय देतील. निमन्याययीक प्रकरणात सर्व पुरावे व युक्तीवाद संपल्यानंतरच निर्णय दिला जातो. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांना भारतीय घटनेच्या कलम 226, 227 कलमांन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन, रिट पिटिशन क्र. 4101/2007 मध्ये निम-न्यायीक अधिकार्यांना (सर्व मंत्री, सचिव, अधिकारी, दावेदार) यांच्यासाठी अपील, पुनर्निरीक्षण, पुनर्विलोकन यांच्याबाबतीत सुनावणी घेणे, निर्णय घेणे याबाबत कशी कार्यवाही करावी यासाठी काही निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार सुनावणी आणि युक्तीवाद संपल्यानंतर कमाल चार ते आठ आठवड्यात निकाल देण्यात यावा.
तथापि, या निकालावर आपले समाधान झाले नाही तर आपण अपील दाखल करू शकता.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
18-07-2016
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार ,
सर्व अधिकारी साहेबांचे मनापासून धन्यवाद ज्या प्रमाणे आपण आमच्या विचारलेल्या प्रश्नवर माहिती देऊन मार्गदर्शन करता या बद्दल आम्ही सर्व मनापासून पासून आभारी आहोत .
महोदय,
खरोखरीच महसूल अधिकारी त्यांच्या कडील कामाच्या व्यापातून वेळ काढून जण सामान्यांच्या समस्या सोडविण्याचा स्वतः होऊन प्रयत्न करीत आहेत आणि त्या विषयी आम्हाला मिळणाऱ्या चांगल्या व प्रेरणादायी प्रतिक्रिया व अभिप्राय आम्हाला उत्साह देत असतात. आमच्या अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा या निमित्ताने आपला सहभाग वाढविण्याविषयी विनंती आहे. धन्यवाद.
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by दिनेश दाभोलकर
18-07-2016
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
एखाद्याचे नाव 56 वर्षापूर्वी इतर हक्क मध्ये निगुन गेले असेल आणि तसा जुना फेरफार असेल तरीही आज रोजी त्यांच्या पुढील पीडीनी नावे आमच्या सातबाराच्या भोगवटामध्ये नोंद केली आहेत . पण आत्ता खूप विलंब झाला असेल तरी ही जर हा फेरफार आदेश न पाहताच नावे कशी काय मंजूर होतात या वर थोडे मार्गदर्शन करावे , तसेच 56 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या फेरफार आधारे आम्ही या लोकांवर आत्ता हरकत घेऊ शकतो का आणि त्यासाठी आम्हाला काय करावे लागेल आणि कोणाला भेटावे लागेल .
आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्वये तहसिलदारकडे अर्ज करू शकाल.
या कलमान्वये 'लेखन-प्रमादांची दुरुस्ती' ची तरतुद आहे. त्यानुसार,
"कोणताही लेखन प्रमाद किंवा अधिकार अभिलेखात किंवा या प्रकरणान्वये ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत ज्या चुका झाल्या असल्याचे हितसंबंधित पक्षकारांनी कबूल केले असेल किंवा ज्या चुका एखाद्या महसूल अधिकाऱ्यास, तो निरीक्षण करीत असताना आढळतील अशा कोणत्याही चुका जिल्हाधिकाऱ्यास कोणत्याही वेळी दुरुस्त करता येतील किंवा दुरुस्त करवून घेता येतील.
परंतु, जेव्हा एखाद्या महसूल अधिकाऱ्यास, तो निरीक्षण करीत असताना, कोणतीही चूक आढळून आली असेल, तेव्हा पक्षकारांना नोटीस देण्यात आल्याशिवाय व वादग्रस्त नोंदींसंबंधीच्या कार्यपद्धतीनुसार कोणत्याही हरकती असल्यास त्या हरकती अंतिमरित्या निकालात काढल्याशिवाय अशी कोणतीही चूक दुरुस्त करता येणार नाही."
अधिकार अभिलेखात किंवा एखाद्या महसूल नोंदवहीत जर काही चूक झाली असेल किंवा एखादा लेखन प्रमाद झाला असेल तर या कलमान्वये अशी चूक किंवा लेखन प्रमाद दुरुस्त करण्यासाठी तहसिलदारांकडे अर्ज करता येतो.
अशा चुका दुरुस्त करण्यापूर्वी सर्व हितसंबंधितांना नोटीस बजावणे आवश्यक आहे. अशा चुका किंवा लेखन प्रमाद झाल्याचे संबंधीत पक्षकारांनी कबुल केले पाहीजे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
17-07-2016
dabholkar.dinesh@gmail.com
आमची जमीन सामायिक आहे आणि जमिनीमध्ये चार खातेक्रमांक आहेत त्या पैकी 1 खातेक्रमांक आम्हाला हक्क सोड पत्र देण्यासाठी तयार आहेत , तर हक्क सोड हे कोणाच्या नावाने घ्यावे तसेच हक्क सोड हे नोंदणीकृत असेल पाहिजे काय , आणि नोंदणीकृत करण्यासाठी काय करावे लागेल , तसेच हक्क सोड हे 100 रु च्या स्टॅम्प पेपर वर घेतले तर चालेल का
हक्कसोडपत्र
हक्कसोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने, सहहिस्सेदाराने, त्याचा त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वत:च्या हिस्याबातचा वैयक्तिक हक्क, त्याच एकत्र कुटुंबाच्या सदस्याकच्या किंवा सहदायकाच्या, लाभात, स्वेच्छे्ने आणि कायमस्वरुपी सोडून दिल्यासबाबत नोंदणीकृत दस्त.
हक्कसोडपत्र कोणाला करता येते ?
एकत्र कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य, सहहिस्सेदार हक्कसोडपत्र करु शकतो.
हक्कसोडपत्र कोणत्या मिळकतीचे करता येते ?
फक्त वारसहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणार्या, एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या हिस्याच्या मिळकतीपुरते हक्कसोडपत्र करता येते.
हक्कसोडपत्र कोणाच्या् लाभात करता येते ?
फक्त त्या्च एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात हक्कसोडपत्र करता येते. त्या एकत्र कुटुंबाचे सदस्य किंवा सहहिस्सेदार नसलेल्या व्यक्तीेच्या लाभात झालेला दस्त हक्क सोडपत्र होत नाही. असा दस्त हस्तांतरणाचा दस्त म्ह्णून गृहीत धरला जातो व मुंबई मुद्रांक कायदा १९५८ मधील तरतुदींन्व्ये मूल्यांकनास व मुद्रांक शुल्कास पात्र ठरतो.
हक्कसोडपत्राचा मोबदला
सर्वसाधारणपणे हक्क्सोडपत्र विनामोबदला केले जाते परंतू हक्कसोडपत्र हे मोबदल्यासह असू शकते. मोबदल्यासह असणारे हक्कसोडपत्र त्याच एकत्र कुटुंबातील सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात असल्याने त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जात नाही तथापि हक्कसोडपत्र नोंदणीकृत असते त्यांमुळे ते नोंदणी शुल्कास पात्र असते.
हक्कसोडपत्र नोंदणीकृत असावे काय?
होय, हक्कसोडपत्र हे लेखी आणि नोंदणीकृत असणे अत्यावश्यूक आहे अन्यंथा त्यांची नोंद सरकारी दप्तरात होणार नाही.
हक्कसोडपत्र कसे करावे ?
एकत्र कुटुंबातील मिळकतीवरील हक्क सोडणारा आणि तो हक्क ग्रहण करणारा यांना स्वतंत्रपणे अथवा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना संयुक्तपणे, त्याच एकत्र कुटुंबातील कोणाही एक किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या लाभात हक्कसोडपत्राचा दस्त करता येतो.
असा दस्त रक्क्म रु. २००/- च्या (अद्ययावत तरतुद पहावी) मुद्रांकपत्रावर (स्टँप पेपरवर) लेखी असावा. याकामी जाणकार विधिज्ञाचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.
हक्कसोडपत्राच्या दस्तात खालील गोष्टी नमूद असाव्यात.
हक्कसोडपत्राचा दस्त लिहून देणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
हक्कसोडपत्राचा दस्त लिहून घेणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
एकत्र कुटुंबाच्या सर्व शाखांची वंशावळ.
एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सा निहाय विवरण.
दोन निष्पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील व स्वााक्षरी.
दस्ताचे निष्पाषदन व नोंदणी.
हक्क सोडपत्राची मुदत
हक्क सोडपत्र कधीही करता येते, त्यास मुदतीचे बंधन नाही. हक्कसोडपत्रासाठी ७/१२ अथवा मिळकत पत्रीकेवर कुटुंबाच्या सदस्याचे नाव दाखल असण्याची आवश्यकता नसते. फक्त तो एकत्र कुटुंबातील सदस्य असल्याचे सिध्द करण्य इतपत पुरावा असावा.
••••••••••••
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by subhash Dhole
17-07-2016
www.roraj8@gmail.com
मी जुन्नर तालुक्यात येणेरे गावचा रहिवाशी असून माझे राहते घर गावठाणात आहे १९६५ साली येणेरे गावाचे सिटी सर्वे रेकोर्ड तयार झाले असून आमच्या घरच्या पूर्व दिशेला जाण्या-येण्यासाठी सामाईक ७ फुटी बोळ ठेवला होता त्या प्रमाणे सिटी सर्वे रेकोर्डला त्याची नोंद आहे . सदर सिटी सर्वेच्या बोळा मध्ये पक्के बांधकाम करता येते का ? सदर बांधकाम शेजारील व्यक्तीने केले असल्यास कोणत्या आधारे काढता येईल ?
Question by विकास तुकाराम लकडे
16-07-2016
vikastlakade@gmail.com
नमस्कार मला भोगवटादार वर्ग - 2 ची जमीन विकत घायवयाची आहे सदर जमिनीच्या सात बारा वर नवीन शर्तीने खरेदी ( 827 ) ( 1275 ) व नवीन शर्तीचा भंग झला आहे ( 1275 ) असे नमूद आहे या जागेत घर बांधायचे आहे घर झाल्यावर काही अडचण येऊ शकते का अशी जमीन कुळ कायदा असतो का मला असे कळले की पूर्वी ब्राह्माण होता त्याची जमीन आहे या जमिनीस कोणता कायदा असेल तो दूर करण्या साठी काही उपाय आहे का सदर जागेसाठी काही आगाऊ रक्कम मी दिली आहे
आपणास प्रथम झालेला शर्तभंग नियमित करुन घ्यावा लागेल. आपण एखाद्या वकीलाचा सल्ला घेणे योग्य .
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Purushottam
15-07-2016
jadhavpurushottam.6@gmail.com
नोटरी खरेदीपूर्व कराराला कायद्यात किमत नाही असे आपण एक उत्तरात नमूद केले आहे. तथापि नोंदणी कायदा १९०८,कलम १५, स्पष्टीकरण १५ नुसार नोटरी खरेदीपूर्व कराराअन्वये दावा दाखल करता येऊ शकतो का?
15[Explanation: A document purporting or operating to effect a contract for the sale of immovable property shall not be deemed to require or ever to have required registration by reason only of the fact that such document contains a recital of the payment of any earnest money or of the whole or any part of the purchase money.]
नोटरी समोर केलेल्या दस्ताच्या आधारे शासकीय दप्तरात नोंद होऊ शकत नाही. खरेदीची प्रक्रिया सुरू होती यासाठी पुरावा म्हणून त्या दस्ताचा उपयोग होऊ शकेल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
15-07-2016
dabholkar.dinesh@gmail.com
1) जमिनीचा ताबा तसेच वहिवाट पूर्वीपासून आमच्याकडे आहे , पण हे सिद्ध होण्यासाठी कुठले कागदपत्र जवळ ठेवावी .
2) तसेच जमीन सामायिक असेल आणि अनेक खाते क्रमांक जमिनीत असतील तर एकाच खातेक्रमांक शेतसारा भरतं असेल तर त्याची मालकी हक्क त्याचा होते का
1. वहिवाट आले तर , पीक पाहणी सादरी नाव असणे आवश्यक
2. जमिनीत विहीर , घर असेल व त्या साठी विद्युत जोडणो आपले नावावर घेतली असेल तर तो ही एक पुरावा आहे.
3. लगतचे शेतकऱ्याचे प्रतिज्ञा पत्र
4. घर असल्यास कर पावती ,
5. जमिनीचा धारा भारत असल्यास , पावती
आपले दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर -नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास सखाराम पाबळे
15-07-2016
rohidaspable@yahoo.in
40 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामासाठी खडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्याच्या जमीन संपादित केल्या आहे 7/12 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे आहे सदर जागेचा 25 वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणताही वापर केला नाही ह्या जमिनी मूळ मालकाच्या ताब्यात आहे ह्या जमिनी मुलं मालकांना मिळण्यासाठी काय करावे लागेल
संपादित जमिनीचा वापर संपादन प्रयोजनासाठी न केल्यास जमीन मूळ मालकास परत देता येत नाही .
या बाबत भास्कर पिले विरुद्ध केरळ शासन या , सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार , अशी जमीन अन्य सार्वजनिक उपक्रमासाठी वापरण्यात यावी. अन्यथा जाहीर लिलावाद्वारे जिल्हाधिकारी यांनी विक्री करावयाची आहे .
आपणास जमीन मिळणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Purushottam
15-07-2016
jadhavpurushottam.6@gmail.com
नोटरी खरेदीपूर्व कराराला कायद्यात किमत नाही असे आपण एक उत्तरात नमूद केले आहे. तथापि नोंदणी कायदा १९०८,कलम १५, स्पष्टीकरण १५ नुसार नोटरी खरेदीपूर्व कराराअन्वये दावा दाखल करता येऊ शकतो का?
15[Explanation: A document purporting or operating to effect a contract for the sale of immovable property shall not be deemed to require or ever to have required registration by reason only of the fact that such document contains a recital of the payment of any earnest money or of the whole or any part of the purchase money.]
Question by दिनेश दाभोलकर
14-07-2016
dabholkar.dinesh@gmail.com
आपल्या जमिनी मध्ये कोण कोण शेतसारा भरतोय हे पाहण्यासाठी कुठले उतारा पाहावा किंवा पावती पाहावी
Question by रोहिदास सखाराम पाबळे
14-07-2016
rohidaspable@yahoo.in
पूर्वीच्या वनजमिनी परंतु 50 वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी भूमिहीनांना नवीन शर्तीने वाटप केल्या सदरजमिनीच्या विक्री भाडेकरार करता येतात का याचे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद सर सदर जमिनी निर्वनीकरण करण्यासाठी काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन करावे
निर्वनीकरण करण्यासाठी , तेवढेच क्षेत्र वन विभागास वन लागवडीसाठी द्यावे लागते
तसेच निर्वनीकरण आदेश भोपाळ येथून घ्यावा लागतो
सविस्तर प्रस्तावासाठी आपण उपवनसौंरक्षक यांचे कार्यालयात चौकशी करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
