जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आदरणीय सर, मृत्यूपत्रा नुसार वारस फेरफार नोंद होण्यासाठी मा.प्रांतसाहेबांकडे अपील केले आहे. परंतु दोन महिने झाले त्या बाबत काहीच उत्तर आले नाही. साधारणपणे किती महिन्यात माझे अपील निकाली निघेल. कृपया मार्गदर्शन व्हावे नम्र विनंती.
aapan ma . prant sahebanna samaksh bheta . aapan prativadinna notice kadhanyasathi process fee bharli aahe ka naslyas ti bharavi . prativadinna notice kadhalyashivay prakaran chalu hot nahi . prakarnachi sadyasthiti karyalayatun mahiti karun ghya .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

नमस्कार सर
मी वाशिम जिल्ह्यात राहतो . माझी ०.५८ गुंठे शेत जमीन २०१२ मध्ये धरण प्रकल्पात संपादित केली आहे. व जमीन संपादित करून ०.२५ गुंठे जमीन शिल्लक राहिली आहे . व आताच्या GR नुसार मला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळू शकेल का?? कृपया करून मला लवकर कळवावे हि विनंती.
व मला नवीन GR मेल करावा कृपया करून.
आपण संपादन अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

वडिलांच्या खरेदीच्या जमिनीत मुलींना समान हिस्सा मिळेल का वडिलांचा मृत्यु 1962साली झाला आहे
वडिलांचा मृत्यू २००५ नंतर झाला असेल तर समान हक्क आहे.हिंदू वारसा कायदा १९५६ मधील सुधारणा व मा.सर्वोच्च न्यायालय यांचे निर्णयानुसार

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

आदरणीय सर,सन 2008 मध्ये मूळ मालकांकडून जमीन खरेदी केली.परंतु त्यापूर्वी सन 2006 मध्ये मालकांनी सदर जमिनीचे रजि.कु.मु.व विकसन करारनामा तिऱ्हाईत व्यक्तीच्या नावे करून दिले.त्याबाबत गावदप्तरी इतर अधिकारात त्यांची नोंद घेण्यात आली आहे.तरी सदर खरेदीखताची गावदप्तरी नोंद घेता येईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
नोंदणीकृत खरेदी खत हा हस्तांतरणाचा वैध दस्त आहे. कु.मु.पत्र किंवा विकसन करारनाम्या ने हक्क हस्तांतरीत होत नाही. आपल्या नोंदणीकृत खरेदी खताची नोंद होण्यास काहीच कायदेशीर अडचण नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Prasad Rege
29-07-2016
Prashant.reghe@facebook.com

रहात्या घरावर मालकी हक्काच्या जागेत म्हाडाचे आरक्षण पडु शकते का?
म्हाडा कार्यालयात चौकशी केल्यास आपणास अधिकृत माहीती मिळू शकेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आपल्याला मी ०८/०७/२०१६ रोजी आजोबाने केलेल्या मृत्युपत्र या बाबत प्रश्न विचारला असता, आपणाच्या म्हण्यानुसार मी न्यायालयात माझ्या वडिलांच्या नावे वाटणीचा अर्ज केला आहे. व त्याच्या नोटीसा सर्व वारसांना व सह हिस्सेदाराना पाठविल्या आहेत.
माझे अजोबा जिवंत आहेत व माझ्या आजोबाना २ मुले व २ मुली आहेत.
तर आता
१)जमिनीचे हिस्से कसे पडतील ?
२)आजोबांच्या मृत्यू नंतर केस चालू राहील कि बाद होईल ?
३) आजोबांच्या मृत्यू नंतर मृत्युपत्र केस चालू असताना ग्राह्य धरले जाईल का?
धन्यवाद सर
मृत्यूपत्राचा अंमल हा मृत्यूनंतर दिला जातो. आपला दावा आता न्या‍यालयात आहे. न्यायालय त्याबाबत योग्य तो निर्णय घेइलच. त्या‍वर आता भाष्य करणे उचित ठरणार नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

संरक्षित कुल मयत झाल्यानंतर वारस नोंद कोणाकडे karaychi (तलाठी कि कुल कायदा विभाग तहसील कचेरी)
जमिनीचा सर्वे कसा केला जातो . आणि तो करण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल . आणि त्या साठी लागणारी कागतपत्रे कोणती
माेजणी विभागाशी संपर्क साधावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,

मला खालील प्रश्नांवर मार्गदर्शन आणि शंकांचं निरसन करावे हि विनंती .
१) एका व्यक्तीने पूर्वी जमीन खरेदी केली असून त्यांना तीन मुले होती त्यांची नावे रामा, लक्ष्मण, काशिनाथ अशी आहेत.ही जमीन त्यांनी तिघांमध्ये आपापसात वाटून घेतली. आणि हद्दीच्या निशाणी ठरवून वाटण्या एकमेकांत मान्य केल्या. पण त्या तिघांमध्ये कोणताही लेखी करार झाला नाही फक्त एकमेकांच्या सहकार्याने तोंडी वाटण्या झाल्या. त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांच्या वारसांची नावे चढली ती अशी रामा च्या जागी गणेश, लक्ष्मण च्या जागी कमला आणि काशिनाथ च्या जागी सुधाकर. ही जमीन सामायिक आहे आणि खाते क्रमांक एकच आहे. तर सुधाकर यांना त्यांच्या हिश्याची जमीन स्वतःच्या नावे करायची आहे परंतु त्यांच्याकडे वाटणीचा कोणताही पुरावा आता नाही. आणि गणेश व कमला हे दोघे जण सहकार्य करत नाहीत. हरकत दाखवत आहेत तर सुधाकर यांना जमीन नावे करण्यासाठी काय करावे लागेल ?

२)एका व्यक्तीच्या जमिनीचे दोन जुने सातबारे एकत्र करण्यात आले आहेत, एका सातबाऱ्याची जमीन खरेदीची तर दुसऱ्या सातबाऱ्याची जमीन कुळकायद्याने मिळालेली आहे. तर हे सातबारे पुन्हा दोन करता येतील का ? आणि कसे ?
१) जर सुधाकरच्या नावे स्वतंत्र क्षेत्र दर्शविले असेल तर ते क्षेत्र सुधाकरच्यां नावे आहेच. जर सुधाकरला त्या‍च्या हिस्याचे क्षेत्र विकण्याची इच्छा असेल तर तो ते क्षेत्र आजही विकू शकतो.त्यासाठी गणेश व कमलाच्या संमतीची आवश्यकता नाही.

२) जर भूमापन क्रमांक एकच असेल तर करता येणार नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माझ्या आईने व मावशीने त्यांच्या नावावर १९९१ साली एक गुंठा जागा सातारा शहरालगत पण ग्रामपंचायत हद्दीत घेतली. त्याची पूर्व-पश्चिम लांबी ५२ फुट आणि दक्षिणोत्तर रुंदी २१ फुट आहे. पूर्वेला लागून जमीन मालकाने दिलेला रस्ता आहे. दोन्ही जागांचे दस्त वेगवेगळे आहेत. पण जागेची लांबी व रुंदी सोयीची नसल्यामुळे असं ठरलं की, एकाने पूर्वेकडे म्हणजे रस्त्यांच्या बाजूला आणि एकाने पश्चिमेला म्हणजे मागच्या बाजूला जागा घ्यावी. आणि जो पूर्वेला जागा घेईल त्याने मागे म्हणजे पश्चिमेला राहणाऱ्यास मुख्य रस्त्यापासून ४ फुटी रस्ता सोडावा. मग माझी मावशीने पूर्वेला म्हणजे रस्त्याच्या बाजूला जागा घेवून, आम्हाला ४ फुटी रस्ता देण्याचे तोंडी कबुल केले. त्यावेळेस संबध चांगले असल्यामुळे हा तोंडी लिहून घेण्याच्या प्रश्न आला नाही. त्यात आम्ही १९९६ साली साधे पत्र्याचे घर बांधले. व साधारण १९९८-९९ पासून आम्हाला घरपट्टीही चालू झाली. नंतर २००२ पासून ज्यावेळेस मावशीने तिच्या जागेत घर बांधले तेव्हापासून त्यांनी रस्ता देण्यास कुरकुर चालू केली. २०१२ मध्ये आम्ही जुने घर पाडून त्या ठिकाणी आर.सी.सी. बांधकाम करण्याचे ठरवले. पण त्या अगोदर मावशीकडून स्टॅपपेपर वर रस्ता लिहून घेतला व तो पेपर नोटरी केला. त्यावर तिच्या एका मुलाची साक्षीदार म्हणून सहीसुद्धा आहे. वर दिल्याप्रमाणे दोन्ही वेळा घराचे काम करताना त्यांनी आम्हास मनाई केली नाही.पण हल्ली खूपच त्रास सुरु झालाय. रस्त्यात अडथळे निर्माण करतात. नेहमी भांडणे काढतात. मावशी तिच्या गुंडप्रवृत्तीच्या जावयाला आणून धमक्या देते. माझे आई-वडील खूप साधे आहेत. त्यांनी खूप कष्टाने आम्हाला वाढवलं. मावशीने आम्हाला पेपर वर लिहून दिल्यामुळे मी कर्ज काढून घर बांधलं. आणि आता हा त्रास सुरु झालाय.
मला काही प्रश्न आहेत,
१. या प्रश्नावर कोर्टाबाहेर काय काय करता येईल?
२. उद्या जर कोर्टात जायची वेळ आली तर मावशीने मुख्य रस्त्याच्या बाजूला जागा घेतल्याने त्यांना कमर्शियल फायदा मिळतोय, त्यावर कोर्टात आम्हाला फायदा होईल का?
३. आम्ही जर उद्या मूळ जागा आहे तशी म्हणजे पूर्व-पश्चिम मागितली तर ती कोर्टात मिळू शकेल? आणि जर तसे झाले तर मावशीने लिहून दिल्यावर मी कर्ज काढून घर बांधले त्यावर कोर्टात नुकसान भरपाई मागता येईल?
४. भांडण, धमक्या सुरु आहेत त्यावर काही करता येईल?

याबाबतीत आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
आपण वकीलाचा सल्ला् घेणे योग्य राहील

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by बाळू
27-07-2016
gargotebalu9@gmail.com

सर माझे वडील व माझे आजोबा मयत झाले असून आजोबांच्या नावावर जमीन आहे .वारस नोंद झालेली नाय आहे . तर मला 2 चुलते आहेत तर ते सोसायटी चे पैसे कडू शकतात का .कारण मी बाहेर गावी असतो ते मला सोसायटी चे पैसे देत नाही हंसे असेल तर सोसायटी चे पैसे बंद करायचे असतील तर काय करावे
tatkal talathi yanche kade arj karun varas nond karun ghya . society che paise mhanje pik karj asel te dey asalyane kunihi advanar nahi . tumhala tyatle paise dene ha personal vishay aahe . varas nond asel aani tyani karj kadhale tar tyanchya navavar,tyanchya hissyavar karjachi nond karta yeil. ata karj jyachya nave satbara aahe tyachech nave hoil .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

नमस्कार,
मला सातारा तालुक्यातील चिखली गाव येथे शेतजमीन खरेदी करायची आहे. जमीन मूळ गावापासून बाहेर आहे. परंतु माझे सातबारा उताऱ्यावर नाव नाही, मात्र वडिलांचे आहे. तर मी ती शेतजमीन खरेदी करू शकतो का ? त्यावर घर बांधू शकतो का ? शिवाय ती शेतजमीन खरेदी करण्यासाठी माझ्याकडे कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
कृपया मार्गदर्शन करावे
aaple vadil shetkari aahet mhanje aapan shetkari aahat .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

आदरणीय सर,मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांनी बिनशेती आदेश दिला असल्यास बांधकाम 95 टक्के पूर्ण होऊन बिनशेती मोजणी झाली असल्यास एखाद्या व्यक्तीने तक्रार अर्ज दिल्यास सदर बांधकामास ते स्थगिती आदेश देऊ शकतात का? तसेच बिनशेती आदेश रद्द करू शकतात का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
उपविभागीय अधिकारी कागदपत्रे बघून योग्य तो निर्णय घेतील. कागदपत्रे न बघता काहीही भाष्य करणे उचित ठरणार नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या चुलतयाचे ए कु मॅ म्हणून आमच्या सामाईक जमिनीत नाव होते ए कु मॅ च्या फेरफार नुसार आमची वारसनोंद केली त्यानुसार पाच आत्या व वडिल आणि चुलते आशी नोंद झाली वडील मयत असल्याने आमची वारसनोंद झाली आतया मयत आहे त्यांची वारसनोंद झाली आहे त्यांच्या वारसांकडून आम्ही जमीन खरेदी केली आहे तर त्यांचा हिस्सा किती असेल आजोबा 1962साली मयत झाले आमचे वाटणीपत्र झाले नाही कृपया मार्गदर्शन करावे
आपला प्रश्न अत्यंत त्रोटक आहे. जमीनीचे क्षेत्र, जमिनीचे स्वरूप याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. त्रोटक माहितीवर सल्ला् देता येणार नाही. आपण कागदपत्रे दाखवून वकीलाचा सल्ला घेणे उचित ठरेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माननीय सर शासकीय कर्मचारी याना सेवेत असताना अपंगत्व आल्यास शासनाचे PWD ACT, 1995
THE PERSONS WITH डिसॅबिलिटीएस या नियमानुसार मिळणाऱ्या सवलती बाबत खालील मुद्द्यावर मार्गदर्शन करावे.
मी महसूल विभागात अव्वल कारकून पदावर कार्यरत असताना सण 2008 मध्ये मला कायमचे 100 टक्के अपंगत्व आले आहे. व अद्यापही मला कुठल्याच प्रकारची शारीरिक हालचाल करता येत नाही. सदर अपंगत्वामुले मला शासनाने दि 01/10/2010 रोजी वैद्यकीय कारणास्तव रुग्णता सेवानिवृत्त केले आहे. माझे सेवानिवृत्तीच्या दिवशी सहा वर्ष नियत वयोमानानुसार सेवा शिल्लक राहिली होती एकीकडे शासनाचे PWD ACT, 1995
THE PERSONS WITH डिसॅबिलिटीएस या नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना अपंगत्व आल्यास बऱ्याच सवलती मिळतात मात्र मला शासकीय सेवेत असताना 100 टक्के कायमचे अपंगत्व आले असताना मला शासनाचा कोणत्याही नियमानुसार सवलती / फायदे मिळणार नाहीत काय ? कृपया मार्गदर्शन व्हावे.
आदरणीय सर,ग्रामपंचायत हद्दीत निवासी झोनमधील दिड आर जमीन खरेदी केली आहे.तर तुकजोड तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार होईल का?तलाठी गावदप्तरी नोंद घेण्यास तयार नाहीत.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
नियमा नुसार सक्षम प्राधिकारी/अधिकारी यांचे पुर्वपरवानगी न घेता झालेला व्‍यवहार हा तुकडेबंदी कायदे विरुद्ध होईल.

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

नमस्कार सर ,

मला खालील प्रश्नवर मार्गदर्शन करावे हि विनंती .

1) आमची जमीन सामायिक आहे आणि अनेक खाते क्रमांक जमिनीत आहेत आणि जमीन प्रत्यक्ष आमचे खातेक्रमांक कसत आहे तर पीक पाहणी सादरी आमचे खातेक्रमांक लागण्यासाठी काय करावे लागते किंवा सध्या आमच्या जमिनीत पीक पाहणी सादरी कोणाचे नाव किंवा खातेक्रमांक लागले आहे हे कसे पाहावे .

2) जर पीक पाहणीला सर्व खातेक्रमांक चे नाव लागले असेल तर जमीन आम्ही कसत असल्याचा कोणता पुरावा दिल्याने फक्त आमचेच नाव पीक पाहणी सादरी लागेल . कारण इतर खातेक्रमांक आज रोजी जमीन कसतच नाही .
जमीन सामाईक असेल तर त्‍यात वेगवेगळी खाते असता कामा नये......व जर खाते वेगवेगळी असेल तर जमिन सामाईक होणार नाही. एकाच स.नं मध्‍ये जर वेगवेगळे खाते नुसार खातेदार असेल तर त्‍यांची पिक पाहणी ही वेगवेगळी लागेल आणी जर एकाच स.नं मध्‍ये सामाईक एकच खातेे असेल तर सामाईक पिक पाहणी लागेल वयक्‍तीक पिकपाहणी लागणार नाही.

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय आणि ते मिळण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा आणि त्यासाठी लागणारी कोणकोणती कागतपत्रे दिली तर आपल्याला ते मिळते
भुमी अभिलेख कार्यालयातील कार्यक्षेत्रात (शहरी किंवा नागरी)असलेले भुखंड/प्‍लाॅॅट संबंधी संंपुर्ण माहीती दर्शविणारी'आखीव पत्रीका'म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. तालुकाभुमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा.

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

नमस्कार सर ,

मला खालील प्रश्नवर मार्गदर्शन करावे हि विनंती .

1) जर आम्हाला जुने मोडी लिपी मध्ये रेकॉर्ड चेक करायचे आहेत पण आकारफोड पत्रे भूमिअभिलेख मधून आणा असे सांगितले आहे , आकारफोड पत्र भूमिअभिलेख मध्ये अर्ज केला तरीहि ते जुना रेकॉर्ड मिळत नाही असे लिहून देण्यात आले आहे . तर आत्ता आम्ही काय करावे

2) मोडी लिपी मधले रेकॉर्ड हे किती जुने असू शकतात
सर आमदार निधीतून खाजगी जागेत सार्वजनिक कामासाठी सभामंडप बांधता येतो का? येत असल्यास त्यासाठी कायदेशीर कोणत्या गोष्टीची पूर्तता करावी लागते.(उदा.जागेचे दानपत्र,प्रशासकीय मंजुरी वगैरे)
Mahoday ,माझे aajoba1954 पासून संरक्षित kulआहेत पण जर कलम 32p (1)लागू असेल ani ajun jamin 32g pramane kharedi keli nasel tar kul kadhle jau shakte ka
Namaskar sir मागील माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल कुटेकर साहेब पाणबुडे साहेब व फाळके मॅडम यांचे आभार। सर वडील मयत झाल्यावर माझ्या आईचे नाव इतराधिकार सदर होते आता तिची आई 1992 साली मयत झाल्यावर आजीची वारस नोंद केली नाही ती आता 2016 मध्ये करत आहे , माझे तलाठी ना म्हणणे आहे कि तिची वारस नोंद करताना माझा आईचे नाव भोगवटदार सदरी करा ,तर तलाठी सो म्हणतात कि इतर अधिकार मध्ये असताना आता ते भोगवतदार सादर येणार नाही ,

तर सर मी काय करू शकते माझी आईचा हक्क डावलला जाईल , माझ्या आईला मी एकाच मुलगी आहे , माझे लेडीज म्हणून तलाठी ऐकत नाही , आणि समोरचे तलाठी हाथी धरत आहे तर मी काय करू जेणे करून माझ्या आईचे नाव भोगवतदार सादर दाखल होईल।
वडील मयत झाल्यावर आईचे नाव वारस म्ह‍णून इतराधिकारात लावले असेल तर ते योग्य नाही. वारस महिलांची नावे कब्जेहक्कातच दाखल होणे आवश्यक आहे. आपण तहसिलदारांची किंवा प्रातांची भेट घ्या‍वी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

वडील मयत झाल्यावर माझ्या आईचे नाव वारस म्ह‍णून इतराधिकारात लावले असेल तर ते योग्यं नाही. वारस महिलांची नावे कब्जेहक्कातच दाखल होणे आवश्य क आहे. आपण तहसिलदारांची किंवा प्रातांची भेट घ्या‍वी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मंडळ निरीक्षकांनी केलेल्या नोंद प्रमाणित केल्याबद्दल आम्ही त्यावर प्रांत साहेब याकडे अपील केले आहे ती केस प्रलंबित आहे तर त्याच उताऱ्यावर दुसरा फेरफार घेता येईल का ?
आपला प्रश्न त्रोटक आहे, खुलासेवार विचारावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या वडिलांच्या नावावर एक शेत जमीन आहे त्याच्या जाणाऱ्या रस्त्याची खरेदी पत्र केले होते ते नोंद घालण्यास दिलेहोते पण गेली 1 वर्ष होऊन गेले अद्याप नोंद झाली नाही काय करावे विचारणा केल्यास अपेक्षित उत्तर मिळत नाही काय करावे
वरिष्ठांची भेट घ्यावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर, एखादा शासकीय कर्मचाऱ्याने एकूण सेवा 19 वर्ष 7 महिने 20 दिवस झाल्या नंतर स्वेच्छा निवृत्तीची नोटीस दिली व त्यांचा 3 महिन्यांच्या नोटीस पिरियड संपल्यावर 20 वर्षाची अहर्ताकारी सेवा पूर्ण होते. म्हणजे त्यांचा नोटीस पिरियड अहर्ताकारी सेवेत गणला जाईल का ?, त्यांना पेन्शन मंजुरीत काही अडचण येईल का ?

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3